|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय २४ वा - अन्वयार्थ
सांख्ययोग - अथ पूर्वविनिश्चितं सांख्यं - यानंतर आता मी ज्या सांख्य-शास्त्राची पूर्वी महर्षींनी निश्चयेकरून स्थापना केली ते - ते - तुला - संप्रवक्ष्यामि - सांगतो - यत् विज्ञाय - जे सांख्यदर्शन जाणले असता - पुमान् - विवेकी पुरुष - सद्यः - तत्काल - वैकल्पिकं भ्रमं - विकल्प उत्पन्न करणारा भ्रम - जह्यात् - सोडून देण्याला समर्थ होतो - ॥१॥ अयुगे - युगाच्या पूर्वी - ज्ञानं अथो अर्थः - ज्ञान आणि सर्व अर्थ म्हणजे ज्ञेय ही दोन्ही - एकं एव - एकच एकरूप - अविकल्पितं आसीत् - आणि भेदशून्य होती - आदौ कृतयुगे - सर्वारंभी असणार्या कृतयुगात - यदा विवेकनिपुणाः - ज्यावेळी लोक विवेकी असतात त्यावेळी ज्ञानज्ञेय एकरूपच असते - ॥२॥ सत्यं बृहत् - सत्य सर्वव्यापी - केवलं - एकजिनसी - निर्विकल्पितं - भेदाभेदशून्य - तत् - ते ब्रह्म - मायाफलरूपेण - माया=दृश्य व फल या रूपांनी - वाङ्मनोगोचरं द्विधा समभवत् - वाणीला व मनाला गोचर होणारे द्विधा झाले - ॥३॥ तयोः एकतरः हि अर्थः प्रकृतिः - त्या दोन प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे प्रकृति होय - सा उभयात्मिका - ती प्रकृति दोन जातीची असते - ज्ञानं तु अन्यतमः भावः - पण ज्ञान हा दुसरा प्रकार होय - सः ‘पुरुषः ’ अभिधीयते - त्याला पुरुष असे म्हणतात - ॥४॥ मया पुरुषानुमतेन च प्रक्षोभ्यमाणायाः प्रकृतेः - मी आणि जीवांचे मत यांनी प्रक्षुब्ध केली म्हणजे प्रेरित केली जी माया तिच्यापासून - तमः रजः सत्त्वं इति गुणाः अभवन् - तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुण प्रकट झाले - ॥५॥ तेभ्यः सूत्रं समभवत् - त्या गुणांच्या वैषम्याने सूत्र प्रकट झाले - सूत्रेण महान् संयुतः - सूत्र आणि महत् यांचा संयोग झाला - ततः विकुर्वतः - नंतर विकृतरूप असलेल्या संयोगापासून - अहंकारः जातः - अहंकार उत्पन्न झाला - यः विमोहनः - हा अहंकारच मोहाचा कारक आहे - ॥६॥ वैकारिकः, तेजसः च, तामसः च इति त्रिवृत् अहं - वैकारिक, तेजस आणि तामस असा तीन प्रकारचा अहंकार असतो - चिदचिन्मयः - तो चित् आणि अचित् म्हणजे अजड व जड या उभयतांनी बनलेला आहे - तन्मात्रेंद्रियमनसां कारणं - तो तन्मात्रा, इंद्रिये व मन यांच्या उत्पत्तीचे कारण असतो - ॥७॥ तामसात् तन्मात्रिकात् अर्थः जज्ञे - तमोमय तन्मात्रांपासून पृथ्वीप्रभृति पंचमहाभूते झाली - तैजसात् इंद्रियाणि च - व तैजसापासून ज्ञानकर्मेंद्रिये - वैकृतात् एकादश देवताः च आसन् - आणि वैकृतापासून अकरा इंद्रियांवर स्वामित्व ठेवणार्या देवता उत्पन्न झाल्या - ॥८॥ मया संचोदिताः - मी प्रेरणा केलेले - सर्वे भावाः संहत्यकारिणः - सर्व महतत्त्वादि भाव क्रियाशक्तीने एकत्र झाले - अंडं - त्यांनी एक अंडे - उत्पादयामासुः - उत्पन्न केले - मम उत्तमं आयतनं - ते अंडे माझे राहण्याचे उत्तम स्थान होय - ॥९॥ तस्मिन् सलिलसंस्थितौ अंडे - त्या जलात असणार्या अंडयामध्ये - अहं समभवं - मी प्रकट झालो - मम नाभ्यां विश्वाख्यं पद्मं अभूत् - माझ्या नाभीमधून एक विश्वनामक कमल उत्पन्न झाले - तत्र च आत्मभूः - आणि त्या कमलात स्वयंभु ब्रह्मदेव उत्पन्न झाला - ॥१०॥ रजसा युक्तः सः विश्वात्मा - रजोगुणाने युक्त असलेल्या त्या विश्वात्म ब्रह्मदेवाने - तपसा - तप केले - मदनुग्रहात् - माझ्या अनुग्रहाने - सपालान् लोकान् असृजत - अध्यक्ष देवतांसह लोक म्हणजे भुवने उत्पन्न केली - भूः भुवः स्वः इति त्रिधा - भूलोक, भुवर्लोक, आणि स्वर्गलोक असे तीन प्रकार त्या भुवनांचे आहेत - ॥११॥ स्वः देवानां ओकः आसीत् - स्वर्गलोक देवांच्या राहण्याचा लोक आहे - भुवः च भूतानां पदं - भुवर्लोक हे भूतांचे स्थान आहे - भूः मर्त्यादीनां लोकः च - आणि भूमि ही मनुष्यादि प्राण्यांचे भुवन आहे - सिद्धानां त्रितयात् परं - या तीन भुवनांच्या पलीकडे सिद्ध राहतात - ॥१२॥ भूमेः अधः - भूलोकाच्या खाली - असुराणां नागानां ओकः प्रभुः असृजत् - पाताळात असुर लोक व नागलोक राहतात - त्रिगुणात्मनां कर्मणां - सत्त्वादि गुणांनी प्रेरित केलेल्या सर्व कर्मांचे - सर्वाः गतयः - फलसर्वस्व - त्रिलोक्यां - भूर्भुवादि तीन लोकांतच मिळते - ॥१३॥ योगस्य तपसः च एव न्यासस्य - परंतु योग तप आणि संन्यास यांपासून निर्माण होणारी - गतयः - फले - अमलाः - गुणमलाने दूषित झालेली नसतात - महः, जनः, तपः, सत्यं - त्या निर्मळ गति म्हणजे महर्लोक, जनोलोक, तपोलोक आणि सत्यलोक यांची प्राप्ति होय - भक्तियोगस्य मद्गतिः - माझी भक्ति युक्तत्वाने करणार्या भक्ताला माझा लोक व माझे स्वरूप ही प्राप्त होतात - ॥१४॥ कालात्मना धात्रा मया - काळस्वरूपी जो मी सर्वकर्ता परमेश्वर त्याने - इदं जगत् - हे भूर्भुवादि लोक - कर्मयुक्तं - कर्मानेच जीवास प्राप्त व्हावे अशी योजना केली आहे - एतस्मिन् गुणप्रवाहे - या विश्वातील लोक सत्त्वादि तीन्ही गुणांच्या प्रवाहात - उन्मज्जति निमज्जति - वर येतात व खाली जातात - ॥१५॥ अणुः, बृहत्, कृशः, स्थूलः - लहान, मोठा, कृश आणि लठठ अशा प्रकारचा - यः यः भावः - जो जो भाव - प्रसिद्ध्यति - पदार्थ प्रकट होतो - सर्वः अपि - तो तो म्हणजे सर्व पदार्थ - प्रकृत्या पुरुषेण च उभयसंयुक्तः - प्रकृति आणि पुरुष या उभयतांच्या संयोगाने सिद्ध झालेला असतो - ॥१६॥ यस्य यः तु आदिः, अंतः च - जो ज्याचे आदि म्हणजे उत्पत्तिकारण आहे व लयस्थानही आहे - तस्य सः मध्यं च वै - तो त्याचे मध्यही निश्चयाने असतो - सन् - तोच सत् असतो - विकारः व्यवहारार्थः - सर्व प्रकारचे विकार व्यवहाराला मात्र उपकारक होतात - यथा तैजसपार्थिवाः - उदाहरणार्थ तेजाचे म्हणजे सुवर्णप्रभृतींचे व पार्थिव म्हणजे मृत्तिकेचे विकार म्हणजे कुंडलादि व घटादि कार्ये व्यवहाराला उपयोगी होतात - ॥१७॥ तु यत् उपादाय - परंतु ज्याचा उपादानरूपाने स्वीकार करून - पूर्वः भावः - पूर्वी असणारे निमित्त कारण - अपरं - अपराला म्हणजे कार्याला - विकुरुते - उपादानातून उत्पन्न करते - यदा यस्य आदिः अंतः - ज्यावेळी ते ज्याचे आदि-अंती असते - तत् सत्यं (इति) अभिधीयते - त्याला सत्य असे म्हणतात - ॥१८॥ अस्य सतः प्रकृतिः हि उपादानं - त्या सत्याचे प्रकृति हे उपादान कारण आहे - परः पुरुषः आधारः - परम पुरुष त्या सत्याचाच आधार असतो - कालः अभिव्यंजकः - गुण प्रकट करणारा काल आहे - तु तत् त्रितयं - परंतु प्रकृति, परम पुरुष, काल ही त्रयी - अहं ब्रह्म - मीच ब्रह्म आहे - ॥१९॥ यावत् ईक्षणं - जोपर्यंत परमेश्वराची ईक्षणक्रिया चालते - तावत् - तोपर्यंत - पौर्वापर्येण - कारण-कार्यरूपाने - महान् सर्गः - हा प्रचंड प्रपंचव्यवहार - नित्यशः - नित्य, अखंड - प्रवर्तते - चालतो - गुणविसर्गार्थः - हा सृष्टिक्रम गुणविसर्गासाठी मात्र चालत असतो - स्थित्यंतः - सृष्टिक्रम स्थितीच्या शेवटपर्यंत चालतो - ॥२०॥ मया आसाद्यमानः - मी ज्याला व्यापितो, तो - लोककल्पविकल्पकः - लोकांचे उदयास्त करणारा - विराट् - विराट् म्हणजे ब्रह्मांड - भुवनैः सह - १४ भुवनांसह - पंचत्वाय विशेषाय कल्पते - पंचमहाभूतरूप विभागाला योग्य होतो - ॥२१॥ अन्ने मर्त्यं प्रलीयते - मर्त्यशरीर अन्नामध्ये लीन होते - धानासु अन्नं लीयते - अन्नाचा धान्यबीजात लय होतो - धान्यः भूमौप्रलीयंते - बीजे भूमीत लय पावतात - भूमिः गंधे प्रलीयते - भूमी गंधगुणात लीन होते - ॥२२॥ गंधः अप्सु प्रलीयते - गंध जलामध्ये लीन होते - आपः स्वगुणे रसे च - जल रसात लीन होते - रसः ज्योतिषि लीयते - जलरस तेजामध्ये लीन होतात - ज्योतिः रूपे प्रलीयते - तेज रूपामध्ये विलीन होते - ॥२३॥ रूपं वायौ - रूप हे वायूत - सः च स्पर्शे - तो वायु स्पर्शगुणात - सः अपि च अंबरे लीयते - आणि तो स्पर्शही आकाशात लीन होतो - अंबरं शब्दतन्मात्रे - आकाश हे आपल्या तन्मात्रेत, शब्दात - इंद्रियाणि स्वयोनिषु - ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये आपआपल्या कारणात म्हणजे सूर्यादि देवतांत लीन होतात - ॥२४॥ सौम्य ! योनिः - उद्धवा, त्या त्या इंद्रियदेवता - वैकारिके मनसि ईश्वरे लीयते - सात्त्विक व समर्थ मनात लीन होतात - भूतादिं शब्दः अप्येति - भूतकारण अहंकारात शब्द - प्रभुः भूतादिः महति - तो समर्थ व भूतकारण अहंकार महतत्त्वात - ॥२५॥ गुणवत्तमः सः महान्-स्वेषु गुणेषु लीयते - तो सर्वगुणोत्तम महान् स्वतःच्या सत्त्वादि गुणात लीन होतो - ते अव्यक्ते संप्रलीयंते - ते गुण अव्यक्तात लय पावतात - तत् अव्यये काले लीयते - ते अव्यक्त अखंड कालात लय पावते - ॥२६॥ कालः मायामये जीवे - मायायुक्त जो जीव-सगुण ईश्वर, त्यात काल - मयि अजे आत्मनि - मी अज व अमर परमात्मा त्यात - जीवः - जीव लीन होतो - विकल्पापायलक्षणः केवलः आत्मा आत्मस्थः - विकल्प व अपाय म्हणजे विश्वाची उभारणी व संहारणी करणारा केवल म्हणजे निर्गुण आत्मा स्वरूपातच राहतो - ॥२७॥ एवं अन्वीक्षमाणस्य - याप्रमाणे समर्थून विचार करणार्याला - वैकल्पिकः भ्रमः कथं तिष्ठेत - भेद उत्पन्न करण्याचे वेड कोठून येणार ? - मनसः हृदि - भेद मनात उत्पन्न कसा होणार ? - व्योम्नि अर्कोदये तमः इव - ज्याप्रमाणे आकाशात सूर्योदय झाला असता अंधकाराची उद्भव स्थिती होत नाही त्याप्रमाणे - ॥२८॥ संशयग्रंथिभेदनः - संशयाचे जाळे तोडणारे - प्रतिलोमानुलोमाभ्यां - प्रतिलोम व अनुलोम पद्धतीने - एषः सांख्यविधिः - हे सांख्यदर्शन - परावरदृशा मया प्रोक्तः - भूतभविष्य जाणणार्या अशा मी सांगितले - ॥२९॥ अध्याय चोविसावा समाप्त |