श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय २२ वा - अन्वयार्थ

तत्त्वांची संख्या आणि पुरूषप्रकृतिविवेक -

विश्वेश प्रभो - हे विश्वस्वामिन प्रभुराया - ऋषिभिः कति तत्त्वानि संख्यातानि - ऋषिपंडितांनी किती मूळतत्त्वे सांगितली आहेत - इह नव एकादश पंच त्रीणि त्वं आत्थ शुश्रुम - येथे नऊ + अकरा + पांच + तीन = अठ्ठावीस तत्त्वे आहेत असे तू म्हणालास हे आम्ही ऐकले आहे. ॥ १ ॥

केचित् षड्‌विंशतिं, अपरे पंचविंशतिं प्राहुः - काही ऋषि सव्वीस, दुसरे काही पंचवीस तत्त्वे सांगतात - सप्त एके, केचित् नव षट् चत्वारि, अपरे एकादश - कोणी सात, कोणी नऊ, कोणी सहा, कोणी चार, काही अकरा. ॥ २ ॥

केचित् सप्तदश, एके षोडश त्रयोदश प्राहुः - कोणी सतरा, कोणी सोळा, कोणी तेरा, अशा मूलतत्त्वांच्या संख्या सांगतात - हि यद्विवक्षया - जी विवक्षा धरून - संख्यानां एतावत्वं - तत्त्वसंख्या इतकीच असे - ऋषयः पृथक् गायंति - ऋषि पृथक् गातात - इदं - ती विवक्षा - आयुष्मन् - हे चिरंजीव प्रभो - नः वक्तुं अर्हसि - आम्हाला सांगण्यात तू योग्य व समर्थ आहेस. ॥ ३ ॥

ब्राह्मणाः यथा भाषंते - ब्राह्मण सांगतात त्याला आधार - सर्वत्र युक्तुयः संति - सर्वत्र योग्य युक्ति आहेतच - मदीयां मायां उद्‌गृह्य - माझ्या मायेचा स्वीकार केल्यानंतर - वदतां - बोलणार्‍याला - दुर्घटं किं नु - अशक्य असे काय आहे. ॥ ४ ॥

यथा त्वं आत्थ एवं एतत् न - तू जसे म्हणालास तसे हे नाही - यत् अहं वच्मि तथा तत् - जसे मी म्हणतो तसेच ते आहे - एवं विवदतां हेतुं - अशाप्रकारे विवाद करणार्‍यांचा हेतु - मे दुरत्ययाः शक्तयः - माझ्या दुर्लंघ्य शक्ति होत. ॥ ५ ॥

यासां व्यतिकरात् - ज्या शक्तिंचा क्षोभ झाल्यामुळे - पदं वदतां - वादीप्रतिवादींच्या विषयांत - विकल्पः आसीत् - भेद उत्पन्न झाला होता - शमदमे प्राप्ते अप्येति - इंद्रियदमन आणि मनःशांति मिळाली म्हणजे नष्ट होतो - तं अनु वादः शाम्यति - त्यानंतर वादविवादही अर्थात् मिटतो. ॥ ६ ॥

पुरुषर्षभ - हे पुरुषश्रेष्ठा - तत्त्वानां परस्परानुप्रवेशात् - मूलतत्त्वांनी अन्योन्यांमध्ये प्रवेश केला असल्यामुळे - पौर्वापर्यप्रसंख्यानं - कारण आणि कार्य यांचा विनिश्चय होतो तो - वक्तुः - बोलणार्‍याच्या - यथा विवक्षितं - प्रतिपादनेच्छेवर अवलंबून असतो. ॥ ७ ॥

पूर्वस्मिन् वा अपरस्मिन् वा एकस्मिन् अपि तत्त्वे - पूर्वस्मिन् म्हणजे कारणात्मक अथवा अपरस्मिन् म्हणजे मागाहूनच्या कार्यात्मक एकाच तत्त्वात - इतराणि सर्वशः च तत्त्वानि - इतर तत्वे= कारण तत्त्वांत इतर सर्व कार्यतत्त्वे आणि कार्यरूप तत्त्वात इतर सर्व कारणतत्त्वे - प्रविष्टानि दृश्यंते - अंतर्भावाने प्रविष्ट झालेली दिसतात. ॥ ८ ॥

अतः म्हणून - अमीषां पौर्वापर्यं प्रसंख्यानं - या तत्त्वांचे कारणकार्यसंबंध व त्यांची गणना ही - अभीप्सतां - बोलण्याची इच्छा करणार्‍या वाद्यांपैकी - यथा यद् वक्त्रं - ज्याची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे त्याचे बोलणे - (वयं) विविक्तं गृह्‌णीमः - आम्ही खरेपणाने स्वीकृत करतो - युक्तिसंभवात् - सर्व ठिकाणी युक्तीच्या साह्याचा संभव असतो. ॥ ९ ॥

अनाद्यविद्यायुक्तस्य पुरुषस्य - अनादिकाल असणार्‍या मायेने अथवा मायाजन्य अज्ञानाने मूढ झालेल्या पुरुषाला - स्वतः - आपल्याचपासून - आत्मवेदनं - आत्मज्ञान मिळण्याचा - न संभवात् - संभव नसतो म्हणून - अन्यः तत्त्वज्ञः ज्ञानदः भवेत् - दुसरा तत्त्वज्ञ म्हणजे गुरु, ज्ञान देणारा होतो. ॥ १० ॥

अत्र - या पक्षात - पुरुषेश्वरयोः वैलक्षण्यं - पुरुष व ईश्वर यांमध्ये स्वरूपभेद - अणु अपि न - किंचित सुद्धा नाही - तदन्यकल्पना अपार्था - ते भिन्नस्वरूपी आहेत ही कल्पनाच व्यर्थ आहे - च - आणि - ज्ञानं - ज्ञान हा - प्रकृतेः गुणः - प्रकृतीचाच गुण आहे. ॥ ११ ॥

प्रकृतिः गुणसाम्यं वै - प्रकृतीचे स्वरूप म्हणजे खरोखर सत्त्वादि तिन्ही गुण समसमान असणे होय - स्थित्युत्पत्यंतहेतवः - स्थिति, जन्म, आणि मरण यांचे कारक - सत्त्वं, रजः, तमः इति - सत्त्व, रज आणि तम हे गुण आहेत - प्रकृतेः गुणाः - अर्थात् हे गुण प्रकृतीचे होत - न आत्मनः - आत्म्याचे नव्हेत. ॥ १२ ॥

सत्त्वं ज्ञानं - सत्त्व म्हणजे ज्ञान - रजः कर्मः, तमः अज्ञानं - रजोगुण कर्मप्रवर्तक आणि तम म्हणजे अज्ञान होय - इह उच्यते - या सांख्यशास्रात म्हणतात - गुणव्यतिकरः कालः - गुणांचा क्षोभ म्हणजे काल - च - आणि - स्वभावः सूत्रं एव - स्वभाव म्हणजे सूत्र अथवा महतत्त्व होय. ॥ १३ ॥

पुरुषः, प्रकृतिः, व्यक्तं, अहंकारः, नभः, अनिलः, ज्योतिः, आपः, क्षितिः - पुरुष, प्रकृति, महतत्त्व, अहंकार, आकाश, वायु, तेज, जल व पृथ्वी - इति नव तत्त्वानि मे उत्त्कानि - अशी नऊ तत्त्वे मी सांगितली आहेत. ॥ १४ ॥

श्रोत्रं त्वक् दर्शनं घ्राणः जिव्हा इति ज्ञानशक्तयः - कर्ण, स्पर्श, नेत्र, नासिका, जीभ ह्या पाच ज्ञानशक्ति (ज्ञानेंद्रिये) आहेत - वाक्पाण्युपस्थपायु अंघ्रिः कर्माणि - वाणी, हस्त, शिश्न, मलद्वार आणि चरण ही पाच कर्मेंद्रिये होत - अंग- उद्धवा - मनः उभयं - मन हे उभय म्हणजे कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये आहे. याप्रमाणे ५ + ५ + १ = ११ तत्त्वे झाली. ॥ १५ ॥

शब्दः, स्पर्शः, रसः, गंधः, रूपं च इति अर्थजातयः - शब्द, स्पर्श, रस, गंध आणि रूप या विषयाच्या जाति आहेत - गत्युक्त्युत्सर्गशिल्पानि कर्मायतनसिद्धयः - गमन, वचन, दोन उत्सर्ग म्हणजे मलमूत्रत्याग व शिल्प ही कर्मेंद्रियांची जी कर्में त्यांची फळे होत. ॥ १६ ॥

कार्यकारणरूपिणी प्रकृतिः - कार्याचे व कारणाचेही स्वरूप धारण करणारी प्रकृति - अस्य सर्गादौ - या विश्वाची उत्पत्ति वगैरे होण्याच्या आधी - सत्त्वादिभिः गुणैः - सत्त्व, रज आणि तम या गुणांच्या साह्याने - धत्ते - उत्पत्तीला योग्य अशी अवस्था धारण करते - अव्यक्तः पुरुषः ईक्षते हि - विकृत न होणारा पुरुष म्हणजे ईश्वर फक्त अवलोकन मात्र करतो. ॥ १७ ॥

विकुर्वाणाः व्यक्तादयः धातवः - प्रक्षुब्ध झालेले महतत्त्वादि धातु म्हणजे तत्त्वे - पुरुषेक्षया लब्धवीर्याः - ईश्वरसंकल्पाने वीर्यवंत होऊन - प्रकृतेः बलात् संहताः - प्रकृतिबलाने व आश्रयाने एकत्र होऊन - अंडं सृजंति - ब्रह्मांड उत्पन्न करतात. ॥ १८ ॥

सप्त एव धातवः इति - मूल तत्त्वे सातच आहेत, असे म्हणतात - तत्र - त्यांच्या प्रक्रियेत - पंच खाद्यः अर्थाः - आकाशादि पंचमहाभूते हे ज्ञेय विषय होत - ज्ञानं - ज्ञाता जीव आहे - उभयाधारः आत्मा - ज्ञेय आणि ज्ञाता या उभयतांचा आधार आत्मा आहे - ततः - त्यांच्यापासून - देहेंद्रियासवः - शरीर, इंद्रिये आणि प्राण उत्पन्न होतात. ॥ १९ ॥

‘षट् ’ इति अत्राऽपि - सहाच तत्त्वे मानणार्‍यांच्या प्रक्रियेत सुद्धा - पंच भूतानि - आकाशादि पाच महाभूते - षष्ठः परः पुमान् - व सहावे तत्त्व उत्तम पुरुष होय - तैः आत्मसंभूतैः युक्तः - तो त्या स्वतःपासून निर्माण झालेल्या भूतांचे उपादान करून - इदं सृष्ट्‌वा - हे विश्व निर्मितो - समुपाविशत् - त्यात प्रविष्ट होतो. ॥ २० ॥

चत्वारि एव इति - चारच तत्त्वे ज्यांच्या मती आहेत - तत्रापि - तेथेही - तेजः आपः अन्नं - तेज, जल, व पृथ्वी - आत्मनः जातानि - आत्म्यापासून झाली आहेत - तैः इदं जातं - त्यापासून हे विश्व झाले - अवयविनः जन्म खलु - सावयव असणारी कार्ये यांचा जन्म वस्तुतः या पृथ्व्यादि चार तत्त्वांपासून झाला. ॥ २१ ॥

सप्तदशके संख्याने - तत्त्वे सतरा आहेत या मताप्रमाणे - भूतमात्रेंद्रिया च पंच पंच - पाच भूते, त्यांच्या पाच मात्रा, म्हणजे सूक्ष्मरूपे आणि पाच इंद्रिये अशी मिळून १५ तत्त्वे; अथवा ५ भूतमात्रा व १० ज्ञानकर्मेंद्रिये मिळून १५ तत्त्वे - एकमनसा आत्मा सप्तदशः स्मृतः - एक मनासह सत्रावा आत्मा अशी १७ तत्त्वे स्मृति म्हणते. ॥ २२ ॥

तद्वत् षोडशसंख्याने आत्मा एव मनः उच्यते - त्याचप्रमाणे १६ मूळतत्त्वे आहेत या मतात जीवात्माच मन होय असे म्हणतात - भूतेंद्रियाणि पंच एव, मनः आत्मा - ५ भूते, ५ इंद्रिये, १ मन, आणि जीवात्मा व परमात्मा मिळून २ - त्रयोदश - एकंदर १३ तत्त्वे होतात. ॥ २३ ॥

एकादशत्वे - ११ च मूलतत्त्वे या मतात - असौ आत्मा महाभूतेंद्रियाणि च - तो आत्मा, ५ महाभूते, व ५ इंद्रिये मिळून अकरा होतात - च - आणि - नव एव इति - ९ तत्त्वेच होत या मतात - अष्टौ प्रकृतयः अथ पुरुषः च - आठ प्रकृति म्हणजे महतत्त्व, अहंकार, मन व पंचमहाभूते आणि मग नववा पुरुष होय. ॥ २४ ॥

इति तत्त्वानां नानाप्रसंख्यानं ऋषिभिः कृतं - याप्रमाणे अनेक ऋषींनी नानाप्रकारे तत्त्वसंख्या परिगणली - युक्तिमत्वात सर्वं न्याय्यं - ती प्रत्येक युक्तिसिद्ध म्हणून न्यायघटित आहे - विदुषां किं अशोभनं - विद्वानांचे कोणते वाक्य अन्याय्य असते ? ॥२५ ॥

कृष्ण - कृष्णा - प्रकृतिः पुरुषः च उभौ - प्रकृति आणि पुरुष ही दोन्ही - यद्यपि आत्मविलक्षणौ - जरी स्वरूपाने परस्पर भिन्न आहेत - अन्योन्यापाश्रयात् - परस्परांचा परस्पर आश्रय करतात म्हणून - तयोः भिदा न दृश्यते - त्यांच्यामध्ये भेद आहे असे दिसत नाही. ॥ २६ ॥

हि आत्मा प्रकृतौ लक्ष्यते - कारण, प्रकृति व तिची महदादि कार्य यांत आत्मा-जीव दृग्गोचर होतो - तथा च आत्मनि प्रकृतिः - आणि तशीच प्रकृतीही आत्म्यामध्ये जीवस्वरूपात दृग्गोचर होते - एवं - याप्रकारचा - पुंडरीकाक्ष - कमलनयना देवा - मे हृदि महांतं संशयं - माझ्या अंतःकरणात वास्तव्य करणारा मोठा संशय - सर्वज्ञ - सर्वज्ञ ईश्वरा - नयनैपुणैः वचोभिः - न्यायपूर्ण भाषणांनी - छेत्तुं अर्हसि - कापून काढण्यास योग्य आहेस. ॥ २७ ॥

हि त्वत्तः जीवानां ज्ञानं - कारण, सर्व प्रकारचे ज्ञान, जीवास तुझ्यापासूनच मिळते - ते शक्तितः अत्र प्रमोषः - तसेच या ज्ञानप्रकरणी तुझ्याच शक्तिने ज्ञानाचा नाश होतो - हि - कारण - आत्ममायायाः गतिं - तुझी जी माया तिची गति तिचा विकास व विलास हे सर्व - त्वं एव वेत्थ - तुलाच समजते - च अपरः न - दुसर्‍या कोणाला नाही. ॥ २८ ॥

पुरुषर्षभ - पुरुषश्रेष्ठा - प्रकृतिः पुरुषः च इति विकल्पः - प्रकृति आणि पुरुष या उभयतांमध्ये फार मोठा भेद आहे - गुणव्यतिकरात्मकः एषः सर्गः - गुणांचा क्षोभ हेच आहे स्वरूप ज्या सृष्टीचे ती सृष्टि - वैकारिकः - विकारात्मक आहे. ॥ २९ ॥

अंग - अगा उद्धवा - मम माया गुणमयी - माझी माया गुणांनी युक्त आहे - च - आणि - गुणैः - ती आपल्या गुणांच्या साह्याने - विकल्पबुद्धीः - भेद आणि भेदबुद्धी - अनेकधा - अनेक प्रकारांनी - विधत्ते - उत्पादिते - वैकारिकः त्रिविधः - ही विकारपूर्ण सृष्टि तीन प्रकारची आहे - एकं अध्यात्मं अथ अधिदैवं - एक आध्यात्मिक, दुसरा आधिदैविक - अन्यत् अधिभूतं - आणि तिसरा आधिभौतिक असे ते तीन प्रकार होत. ॥ ३० ॥

दृक् रूपं अत्र रंध्रे आर्कं वपुः - दृष्टि, रूप, आणि या गोलकामधील सूर्याचे अंशभूत शरीर - परस्परं सिध्यति - ही अन्योन्यांच्या आश्रयाने सिद्ध होतात - यः स्वतः खे - जो सूर्य स्वरूपतः आकाशात असतो त्याचा अंश नेत्रगोलकात असतो - यत् - ज्याअर्थी - एषां यः आत्मा - या अध्यात्मादिकांचा जो आत्मा आहे तो - अपरः आद्यः स्वया अनुभूत्या - याहून भिन्न, या सर्वांचे कारण आणि स्वयंप्रकाश आहे - अखिलसिद्धसिद्धिः - सर्व सिद्धवस्तूंचाही साधक आहे - एवं त्वगादि श्रवणादि चक्षुः जिव्हादि नासादि च चित्तयुक्तं - याचप्रमाणे स्पर्शादि, श्रवणादि, नेत्रादि, जिव्हादि, गंधादि आणि चित्तादि; ॥ ३१ ॥

प्रधानमूलात् महतः प्रसूतः - प्रकृति आहे ज्याचे उपादानकारण अशा महतत्त्वापासून उत्पन्न झालेला - यः असौ गुणक्षोभकृतः विकारः - जो हा गुणांच्या प्रक्षोभाने निर्माण केलेला विकार आहे - अहं - अहंकार होय - मोहविकल्पहेतुः - मोहाचा व भेदबुद्धीचा कारक आहे - वैकारिकः तामसः ऐंद्रियः च त्रिवृत् - सात्त्विक, तामस आणि राजस असा तीन प्रकारचा आहे. ॥ ३२ ॥

आत्मा परिज्ञानमयः - आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे - अस्ति इति, न अस्ति इति भिदा विवादः - तो आहे की नाही हा भेदवाद - अर्थनिष्ठः अपि व्यर्थः हि - अर्थनिष्ठ असला तरी व्यर्थच आहे - स्वलोकात् मत्तः - सर्वांचा लोक जो मी त्या मजपासून - परावृत्तधियां पुंसां - परावृत्त झालेल्या बुद्धीच्या लोकांमधून हा वाद - न उपरमेत - नाहीसा होणे नाही - एव - हेच खरे. ॥ ३३ ॥

प्रभो - ईश्वरा - त्वत्तः परावृत्तधियः - तुझ्यापासून ज्यांनी आपली बुद्धि निवृत्त केली असे लोक - स्वकृतैः कर्मभिः - आपण केलेल्या कर्मांनी - यथा - ज्याप्रकारे - उच्चावचान् देहान् गृह्‌णंति विसृजंति च - श्रेष्ठ कनिष्ठ योनींमध्ये देह घेतात व पुढे सोडून देतात. ॥ ३४ ॥

गोविंद - कृष्णा- अनात्मभिः दुर्विभाव्यं - आत्मज्ञानशून्यास अतिकष्टाने समजणारा - तत् मम आख्याहि - तो विषय मला सांग - एतत् विद्वांसः - हा विषय जाणणारे - लोके - व्यवहारात - प्रायशः न संति - बहुधा नसतात - हि - कारण - वंचिताः - बहुजन अज्ञानाने फसलेले असतात. ॥ ३५ ॥

नृणां - लोकांचे - पंचभिः इंद्रियैः युतं कर्ममयं मनः - पाची इंद्रियांसह कर्मप्रधान असलेले मन - लोकात् लोकं प्रयाति - एक देह सोडून दुसर्‍या देहात जाते - अन्यः आत्मा - आणि मनाहून विलक्षण असणारा आत्मा - तत् अनुवर्तते - मन जाईल तिकडे जातो. ॥ ३६ ॥

कर्मतंत्रं - कर्मप्रधान असल्यामुळे - दृष्टान् वा अनुश्रुतान् विषयान् - प्रत्यक्ष पाहिलेले अथवा ऐकलेले = श्रुतिस्मृतींनी सांगितलेले जे विषय त्यांचे - अनु ध्यायत् मनः - सदैव चिंतन करणारे मन - अथ - नंतर - उद्यत् - ध्यानी असलेल्या विषयांत जागृत - सीदत् - ध्यानी नसलेल्या विषयांत निद्रित होते - तत् अनु - त्यानंतर - स्मृतिः शाम्यति - स्मृतिही शांत होते. ॥ ३७ ॥

विषयाभिनिवेशेन - भोगविषयांचा अभिमान असल्यामुळे - कस्यचित् हेतोः - आणि कोणत्या तरी कारणाने - यत् पुनः आत्मानं न स्मरेत् - पुनः पूर्वरूपाची विस्मृति होणे ही - अत्यंतविस्मृतिः - जी अत्यंत विस्मृति - जंतोः मृत्युः वै - तोच जीवाचा मृत्यु होय. ॥ ३८ ॥

च- आणि - भूरिद - उदार मनाच्या उद्धवा - तु - परंतु - सर्वभावेन आत्मतया पुंसः - सर्वथा आपले स्वतःचे स्वरूपच सर्वथा विषयरूप होय असे जाणून केलेला - विषयस्वीकृतिं - विषयांचा स्वीकार हाच - जन्म प्राहुः - जीवाचा पुनर्जन्म होय, असे म्हणतात - यथा स्वप्नमनोरथः - जसा स्वप्नातील मनोरा ज्याचा जन्म व मृत्यु तसा. ॥ ३९ ॥

इत्थं - अशाप्रकारे - तत्र - विद्यमान स्वप्नात व मनोरथात - प्राक्तनं स्वप्नं मनोरथं च - पूर्वीच्या स्वप्नांचे व मनोरथांचे - असौ न स्मरति - त्याला स्मरणच होत नाही - च - आणि - पूर्वं आत्मानं अपूर्वं इव अनुपश्यति - पूर्वी असलेल्या आपणाला अपूर्व असे आताच जन्मलेला पाहतो. ॥ ४० ॥

इंद्रियायनसृष्टया - ज्ञानकर्मेंद्रियांचे अयन म्हणजे जे आश्रयस्थान त्याने उत्पन्न केलेल्या सृष्टीमुळे - इदं त्रैविध्यं - अशा प्रकारची त्रिविधता - वस्तुनि भाति - ज्ञात वस्तूंमध्ये दिसते - बहिरंतर्भिदाहेतुः - तेच मन अंतर्बाह्य भेद निर्माण करण्याचे कारक असते - यथा जनः असज्जनकृत् - ज्याप्रमाणे सामान्य पुरुष स्वप्नामध्ये नसणारे भिन्न लोक उत्पादितो. ॥ ४१ ॥

अंग - उद्धवा - भूतानि नित्यदा - ही भूते म्हणजे शरीरादि सर्व जडाजड वस्तू प्रतिक्षणी - भवंति - जन्म पावतात - न हि भवंति च - व मरतातही - अलक्ष्यवेगेन कालेन - ज्याचा वेग चित्ताला आकलन करता येत नाही अशा प्रचंडवेगी कालाच्या सामर्थ्यामुळे - (परंतु) - तत् सूक्ष्मत्वात् न दृश्यते - हे रूपांतर अतिसूक्ष्म असते म्हणून इंद्रियगोचर होत नाही. ॥ ४२ ॥

यथा अर्चिषा - ज्याप्रमाणे दीपज्वालांच्या - स्त्रोतसां च - किंवा नदीप्रवाहांच्या - वा वनस्पतेः फलानां - वा वृक्षाच्या फलांच्या - वयोऽवस्थादयः कृताः - वयोवस्था होतात - तथा एव सर्वभूतानां - त्याचप्रमाणे सर्व जडाजडांच्या अवस्था कालप्रभुत्वाने होतात. ॥ ४३ ॥

अर्चिषां सः अयं दीपः - दीपज्योति प्रतिक्षणी भिन्न होतात तरी तोच हा दिवा - स्त्रोतसां तत् इदं जलं यद्वत् - नदीच्या ओघाचे पाणी प्रतिक्षणी भिन्न होत असते तरी तेच हे जल असे एकत्वसूचक बोलतो - मृषायुषां नृणां - अज्ञानाने व्यर्थ झाले आयुष्य ज्यांचे अशा लोकांची - सः अयं पुमान् इति मृषा गीः धीः - हाच तो पुरुष - अशी प्रतिक्षणी भिन्न होत आहे शरीर ज्याचे अशा पुरुषासंबंधाची वाणी व बुद्धि व्यर्थ अथवा असत्य होय. ॥ ४४ ॥

सः अपि अयं पुमान् - तोच हा पुरुष हाही - स्वस्य कर्मबीजेन - स्वतः कर्मरूपी बीजाने - मा जायते म्रियते वा - उत्पन्न होत नाही अथवा मरतही नाही - अमरः - अमर आहे - भ्रांत्या - तो जन्मतो मरतो ही भ्रांति होय - दारुसंयुतः अग्निः यथा - लाकडाची उपाधि असलेला जसा अग्नि. ॥ ४५ ॥

निषेकगर्भजन्मानि - सिंचित रेत, गर्भ, जन्म, - बाल्यकौ‌मारयौवनं - बालपण, कुमारता, तारुण्य, पोक्तपणा, - वयोमध्यं जरा मृत्युः इति तनोः नव अवस्थाः - वृद्धत्व व मृत्यु ह्या शरीराच्या ९ अवस्था आहेत. ॥ ४६ ॥

हि - प्रसिद्ध आहे की - अन्यस्य - दुसर्‍या म्हणजे देहाच्या - एताः उच्चावचाः तनूः - ह्या उत्तम व अधम नऊ अवस्था - मनोरथमयीः - मनोत्पादित असतात - गुणसंगात् उपादत्ते - गुणांची संगती केल्यामुळे या अवस्था स्वीकारतो - क्वचित् कश्चित् जहाति च - परंतु कोणी एखादाच शहाणा केव्हा केव्हा यांचा त्याग करतो. ॥ ४७ ॥

पितृपुत्राभ्यां - आपला पिता मेला व पुत्र जन्मला यावरून - आत्मनः भवाप्ययौ अनुमेयौ - आपला देहही जन्ममरणवंत आहे असे अनुमानाने जाणता येते - भवाप्ययवस्तूनां अभिज्ञः द्वयलक्षणः न - पण जन्ममरणात्मक देहादि जड वस्तूंचा द्रष्टा असणारा आत्मा जन्ममरणवंत असणे शक्य नाही. ॥ ४८ ॥

तरोः बीजविपाकाभ्यां - वृक्ष व वनस्पतींच्या बीजफलाच्या साह्याने - तरोः जन्म संयमौ यः विद्वान् - वृक्षवनस्पतीचे जन्ममरणादि होते असे जो जाणणारा - (तरोः) विलक्षणः द्रष्टा - तरूंचा द्रष्टा तरूहून विलक्षण असतो - एवं तनोः द्रष्टा (तनोः) पृथक् - याप्रमाणे शरीराचा द्रष्टा शरीराहून निराळा असलाच पाहिजे. ॥ ४९ ॥

आत्मानं एवं - आत्म्याला याप्रमाणे - प्रकृतेः अविविच्य - प्रकृतीपासून विवेकतः निराळा न काढता - तत्त्वेन स्पर्शसंमूढः - प्रकृतीशी सामरस्य करणार्‍या इंद्रियांनी मूढ केलेला - अबुधः पुमान् - अज्ञानी पुरुष - संसारं प्रतिपद्यते - जन्ममरणात्मक संसाराच्या प्रवाहात शिरून सर्वथा पडतो. ॥ ५० ॥

कर्मभिः - कर्मे करकरून - सत्त्वसंगात् ऋषीन् देवान् - सत्त्वगुणसंगतीने ऋषींच्या किंवा देवांच्या - रजसा असुरमनुषान् - रजोगुण असला तर असुरांच्या किंवा मनुष्यांच्या - तमसा भूततिर्यक्त्वं - तमोगुणांचे प्राबल्य झाले तर स्थावरांच्या अथवा पशुपक्ष्यांच्या - भ्रामितः याति - भ्रमण करकरून जातो. ॥ ५१ ॥

यथा नृत्यतः गायतः पश्यन् तान् एव अनुकरोति - ज्याप्रमाणे इतर नाचतात, गातात, त्या प्रकारांचीच हुबेहुब नक्कल उठवून आपण वागतो - एवं बुद्धिगुणान् पश्यन् - आणि याप्रमाणे इतरांचे मनोधर्म पाहिल्यामुळे - अनीहः अपि - त्याची इच्छा नसली तरी - अनुकार्यते - ते ते इतरांचे बुद्धिगुण प्रबल होऊन त्याला इतरांप्रमाणे वागण्याला भाग पाडतात. ॥ ५२ ॥

यथा प्रचलता अंभसा - वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहाबरोबर - तरवः अपि - स्थावर वृक्ष सुद्धा - चलाः इव - चालतातसे दिसते - भ्राम्यमाणेन चक्षुषा - आपले नेत्र जोराने फिरविले तर - भूः भ्रमति इव दृश्यते - स्थिर पृथ्वीही फिरते असे दिसते. ॥ ५३ ॥

यथा स्वप्नदृष्टाः मनोरथधियः (स्वप्नदृष्टः) विषयानुभवः च मृषा - ज्याप्रमाणे मनोरथबुद्धि व स्वप्नात पाहिलेल्या विषयांचा अनुभव खोटा असतो - तथा - त्याप्रमाणे - दाशार्ह - यादवांच्या दाशार्ह कुलात जन्मलेल्या उद्धवा - आत्मनः संसारः - आत्म्यावर आरोपित झालेल्या जन्ममरणात्मक संसार मृषा आहे. ॥ ५४ ॥

हि - कारण - विषयान् ध्यायतः अस्य - विषयांचे ध्यान अखंड करणारा असतो म्हणून ह्या जीवाचा - संसृतिः - संसार - अविद्यमाने अपि अर्थे - वस्तुतः त्या विषयांचे पदार्थ नसतात तरी - न निवर्तते - नाहीसा होत नाही - यथा स्वप्ने अनर्थाग मः - जसा पदार्थ वस्तुतः नसताही स्वप्नद्रष्टयाला विषय सत्य वाटतात. ॥ ५५ ॥

तस्मात् - म्हणून - उद्धवा - उद्धवा - असद्रिंदियैः - खोटेच असणार्‍या इंद्रियांनी - विषयान् मा भुंक्ष्व - विषयांचा भोग घेऊ नको - आत्माग्रहणनिर्भातं वैकल्पिकं भ्रामं पश्य - आत्म्याच्या अज्ञानामुळे हा भेदरूप भ्रम होतो हे जाण. ॥ ५६ ॥

असद्‌भिः अज्ञैः क्षिप्तः अवमानितः प्रलब्धः अथवा - दुष्टांनी व मूर्खांनी तिरस्कारिले, अपमानिले, फसविले, असूयितः ताडितः सन्निबद्धः वा वृत्त्या वा परिहापितः - मत्सर करून गांजले, अथवा मारले, कैदेत टाकले किंवा आपली चरितार्थवृत्ति काढून घेतली - वा - किंवा - निष्ठितः मूत्रितः - थुंकण्याने, मूत्राने अंग मळविले - एवं बहुधा प्रकंपितः - याप्रकारे अनेक घाबरविणारी दुःखे दिली तरी - कृच्छ्‌रगतः - दुःखात लोटलेला - श्रेयस्कामः - जो मोक्षेच्छु त्याने - आत्मना - आपण स्वतःच - आत्मानं उद्धरेत् - आपल्या आत्म्याचा उद्धार करावा. ॥ ५७-५८॥

वदतां वर - प्रवचन करणार्‍यांमध्ये श्रेष्ठा - एवं यथा अनुबुध्येयं (तथा) नः वद - हे त्वदुक्त मला समजेल अशा रीतीने मला सांग - आत्मनि इमं असदतिक्रमं - हा दुष्टांचा अमर्याद छळ - सुदुःसहं - असह्य आहे - मन्ये - असे वाटते. ॥ ५९ ॥

विश्वात्मन् - हे विश्वमूर्ते - हि - कारण - विदुषां अपि प्रकृतिः बलीयसी - विद्वानांस सुद्धा प्रकृतीचे बल अनावर आहे हे ठाऊक असते - त्वद्धर्मनिरतान् शांतान् ते चरणालयान् ऋते - मात्र तुझ्या भागवतधर्माचे एकनिष्ठ, शांत आणि तुझ्या चरणाचा आश्रय केलेल्या भक्तांशिवाय बाकीचे विद्वान प्रकृतीलाच वश असतात म्हणून दुःख पावतात. ॥ ६० ॥

अध्याय बाविसावा समाप्त

GO TOP