|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय १५ वा - अन्वयार्थ
विभिन्न सिद्धींची नावे व लक्षणे - जितेंद्रियस्य जितश्वासस्य युक्तस्य - जितेंद्रिय, जितप्राण युक्त - मयि चेतः - माझ्या ठिकाणी चित्त - धारयतः योगिनः - स्थापन करणार्या अशा योग्याला - सिद्धय उपतिष्ठन्ति - सर्व सिद्धि प्राप्त होतात. ॥ १ ॥ अच्युत कया धारणया सिद्धिः - हे ईश्वरा - कोणत्या धारणेने सिद्धि - कास्वित् - कोणत्या बरे नावाची - कथंस्वित् - कोणत्या स्वरूपाची - काति वा सिद्धयः - सिद्धि किती आहेत - तत् ब्रूहि - ते सांग. - भवान् योगिनां सिद्धिदः - तूं योग्यांस सिद्धि प्राप्त करून देणारा आहेस. ॥ २ ॥ योगपारगैः - योगपारंगत विद्वानांनी - अष्टादश सिद्धयः - अठरा सिद्धि - धारणाः च प्रोक्ताः- व अठरा धारणा सांगितल्या आहेत - तासां अष्टौ मत्प्रधानाः - त्यांपैकी आठ सिद्धींचे आधारस्थान मी आहे. - दश गुणहेतवः एव - दहा सिद्धि सत्वांचा उत्कर्ष करणार्या म्हणजे सत्त्वगुणप्रधान म्हणून गौण आहेत. ॥ ३ ॥ मूर्तेः अणिमा महिमा लघिमा - देहसंबंधी अणिमा, महिमा व लघिमा या तीन सिद्धि होत - इंद्रियैः प्राप्तिः - इंद्रियदेवतांच्या संबंधी प्राप्ति - श्रुतदृष्टेषु प्राकाश्यं - श्रुत आणि दृष्ट वस्तूला प्रकट करणारी ती प्राकाश्य - शक्तिप्रेरणं ईशिता - ईश्वराचे ठिकाणी मायेची व इतरांचे ठिकाणी मायेच्या अंशांची प्रेरणा करणारी ती ईशिता - गुणेषु असंगः वशिता - विषयगुणांसंबंधे अनासक्ति ही वशिता - यत्कामः तत् अवस्यति - इच्छेची पूर्ति - सौम्य, एताः मे अष्टौ - मत्संबंधी या आठ महासिद्धि - ’औत्पत्तिकाः मताः - मत्सहभूत असतात असे ज्ञानी म्हणतात. (४-५) अस्मिन् देहे - या वर्तमान देहामध्ये - अनूर्मिमत्वं - क्षुधा तृषा इत्यादि शारीरिक आवेगांचा अभाव - दूरश्रवणदर्शनं - दूरचे ऐकण्याचे व पाहण्याचे सामर्थ्य - मनोजवः - मनाच्या शीघ्रगतीप्रमाणे शरीराची शीघ्र गति - कामरूपं - इच्छेला येईल ते रूप घेता येणे - परकायप्रवेशनं - दुसर्या शरीरात प्रवेश करण्याचे सामर्थ्य. ॥ ६ ॥ स्वच्छंदमृत्युः - इच्छामरणाचे सामर्थ्य - देवानां सह क्रीडाऽन्य्दर्शन - देवांसह स्वर्गीय विलासांची प्राप्ति - यथा संकल्पसंसिद्धिः - स्वतःच्या संकल्पांची पूर्ति होणे - अप्रतिहतागतिः आज्ञा - निरंकुश आज्ञाशक्ति ॥ ७ ॥ त्रिकालज्ञत्वं - भूत-भविष्य वर्तमानकालांचे ज्ञान - अद्वंद्वं - शीतोष्ण सुखदुःखादि द्वंद्वे सहन करण्याचे सामर्थ्य - परचित्तादि अभिज्ञता - - दुसर्याचे मनोविचार व मनोवृत्तिप्रभृति कळणे - अग्नि अर्क अंबु विषादीनां प्रतिष्टंभः - अग्नि, सूर्य, जल, विष वगैरे मारक पदार्थांचे गुन स्तंभित करणे - अपराजयः - अपयशाचा अभाव - ॥ ८ ॥ एताः - या - योगधारणयसिद्धयः - योगधारकांनी प्राप्त होणार्या सिद्धींपैकीं काहींचा म्हणजे तेवीस सिद्धींचा - उद्देशतः च प्रोक्ताः - उल्लेख केवळ उदाहरणादाखल आहे - यया धारणया या स्यात् - ज्या विशिष्ट धारणेने जी विशेष सिद्धि प्राप्त होते ते - यथा वा स्यात् - आणि कशी प्राप्त होते ते - मे निबोध - मजपासून ऐक. ॥ ९ ॥ भूतसूक्ष्मात्मनि मयि - भूतपरमाणूसंबंधी उपाधि असणारा जो मी भगवान त्या माझे ठिकाणी - मनः तन्मात्रं धारयेत् - योगसाधकाने परमाणूचा आकार असणारे आपले मन ठेऊन चिंतन करावे - तन्मात्रोपासकः मम - या तन्मात्रोपासकाला माझी - अणिमानं अवाप्नोति - अणिमा - अत्यंत सूक्ष्म स्वरूप सिद्धि मिळते. ॥ १० ॥ महति आत्मन् मयि परे - महत् तत्त्वासंबंधी उपाधि असणारा जो परमात्मा मी, त्या माझे ठिकाणी - यथासंस्थं मनः दधत् - आपले मन तितकेच मोठे करून त्याचेच चिंतन करणारा - भूतानां पृथक्पृथक् च - पृथ्वीत्यादि महद्भूतांचे निरनिराळ्या - महिमानं अवाप्नोति - महत्स्वरूपाला प्राप्त होतो. ॥ ११ ॥ भूतानां परमाणुमये मयि - भूतांचा परमाणूंची उपाधि असणार्या माझ्या ठिकाणी - चित्तं रंजयन् योगी - मनाला एकाग्रतेने रंजविणार्या योग्याला - कालसूक्ष्मार्थतां - कालसूक्ष्मतेचे स्वरूप - लघिमानं अवाप्नुयात् - अशी लघिमा सिद्धि प्राप्त होते. ॥ १२ ॥ वैकारिके अहंतत्त्वे मयि - महत्तत्त्वाचा विकार असनारा जो अहंकार तीच उपाधि असणार्या माझ्या ठिकाणी - अखिलं मनं धारयन् - आपले सर्व मन धारण करणार्या - मन्मनाः - मदेकनिष्ठ योग्याला - सर्वेंद्रियाणां आत्मत्वं - सर्व इंद्रियांचे नियंतृत्व प्राप्त होणे - प्राप्तिं प्राप्नोति - एतद्रूप ’प्राप्ती’ नामक सिद्धि प्राप्त होते. ॥ १३ ॥ महति आत्मनि सूत्रे मयि - महत्तत्व उपाधि हाच ज्याचा आत्मा आहे - सूत्रे मयि - असा जो सूत्रात्मा त्या माझे ठिकाणी - यः मानसं धारयेत् - योग्याने आपले मन एकाग्रतेने स्थापले म्हणजे - अव्यक्तजन्मनः मे - अव्यक्तजन्मा जो मी त्या माझे - पारमेष्ठ्यं प्राकाश्यं - पारमेष्ठ्य म्हणजे उत्कृश्तत्व तद्रूप प्राकाश्य नामक सिद्धि - विन्दते - त्या योग्याला मिळते. ॥ १४ ॥ कालविग्रहे त्रधेश्वरे विष्णौ - कालस्वरूप त्रैलोक्याधीश्वर विष्णूच्या ठिकाणी - यः चित्तं धारयेत् - जो चित्त धारण करतो - सः - तो - क्षेत्रक्षेत्रज्ञचोदनां - सर्व चराचरांची प्रेरणा करण्याचे सामर्थ्यरूप - ईशित्वं अवाप्नोति - ’ईशित्व’ नामक सिद्धीला प्राप्त होते. ॥ १५ ॥ भगवत् शब्द शब्दिते - ’भगवान’ हे ज्याचे अन्वर्थ नाव आहे त्या - तुरीयाख्ये - तुरीय अवस्थेच्या - नारायणे - नारायणरूप अशा - मयि मनः आदधत् - माझ्या ठिकाणी आपल्या मनाची धारणा करणारा - मद्धर्मा योगी - माझा स्वभाव प्राप्त झालेला योगी - वशितां इयात् - ’वशिता’ नामक सिद्धि प्राप्त करून घेतो. ॥ १६ ॥ निर्गुणे ब्रह्मणि मयि - स्वरूपतः निर्गुण ब्रह्म असणार्या माझ्याच ठिकाणी - विशदं मनः धारयन् - आपले शुद्ध चित्त स्थान करणार्या - योगी - योग्याला - परमानंदं आप्नोति - श्रेष्ठ आनंदाची प्राप्ति होते - यत्रः कामः अवसीयते - जेथे सर्व काम आशा, मनीषा प्रभृति समाप्त होतात. ॥ १७ ॥ शुद्धे धर्ममये - शुद्ध धर्ममूर्ति असणार्या - श्वेतद्वीपपतौ मयि - श्वेतद्वीपाचा स्वामी जो मी त्या माझे ठिकाणी - विशदं चित्तं धारयन् नरः - निर्मल मनाची स्थापना करणारा योगी - षडूर्मिरहितं - क्षुधादि सहा शारीरिक ऊर्मींनी रहित होत्साता - श्वेततां याति - श्वेत म्हणजे शुद्ध सात्विक होतो. ॥ १८ ॥ आकाशात्मनि आकाशाचा आत्मा असणारा - प्राणे मयि - - जो समष्टि प्राण त्या रूपाची मला उपाधि असणार्या माझ्या ठिकाणी - मनसा घोषं उद्वहन् - मन ठेऊन अनुहत ज्ञाना होता - असौ हंसः - हा जीव - भूतानां वाचं शृणोति - तेथील सर्व प्रकारचे आवाज भूलोकीच बसून ऐअण्याला समर्थ होतो. ॥ १९ ॥ त्वष्टरि चक्षुः - सूर्याचे ठिकाणी नेत्राचा - त्वष्टारं अपि चक्षिषि - आणि नेत्राचे ठिकाणी सूर्याचा - संयोज्य - संयोग करून - तत्र - त्या ठिकाणी - मां मनसा ध्यायन् - माझे एकाग्र ध्यान करणारा - सूक्ष्मदृक् विश्वं पश्यति - सूक्ष्मद्रष्टा होत्साता सर्वांगांनी विश्व पाहतो. ॥ २० ॥ मनः तद् अनुवायुनां देहं - मन आणि त्यामागून जाणार्या वायूसह देह - मयि सुसंयोह्य - माझ्या ठिकाणी स्थापला असता - मद्धारणानुभावेन - माझ्या ठिकाणी केलेल्या धारणेच्या माहात्म्याने - यत्र मनः तत्र आत्मा वै - जेथेच मन तेथेच आत्मा म्हणजे देहही जातो. ॥ २१ ॥ मनं उपादाय यदा - मनालच उपादानकरण करून जेव्हा - यत् यत् रूपं बुभूषति - जे जे स्वरूप प्रप्त व्हावे अशी योग्याला इच्छा असते - तत् तत् मनोरूपं भवेत् - तेव्हां ते ते मनोवांछित रूप प्राप्त होते - मद् योगबलं आश्रयः - माझ्या योगबलाचा त्याला आश्रय असतो. ॥ २२ ॥ परकायं विशन् सिद्धः - परकी शरीरात् शिरण्याची इच्छा करणार्या सिद्धाने - आत्मानं तत्र भावयेत् - आपण त्या परकी शरीरात आहोतच अशी दृढ भावना करावी - वायुभूतः प्राणः - वायुस्वरूपच झालेला प्राण - पिंडं हित्वा आविशेत् - स्वस्थूल देह सोडून त्यात प्रवेश करतो. ॥ २३ ॥ षडंघ्रिवत् - भ्रमर जसा एकांतून दुसर्या पुष्पात् प्रवेश करतो त्याप्रमाणे - पार्ष्ण्या गुदं आपीड्य - टाचेन अधोद्वार बंद करून - हृदुरः कंठमूर्धसु प्राणं आरोप्य - लिंगदेहाला हृदय, उर, कंठ आणि शिर या उत्तरोत्तर ऊर्ध्वस्थानी स्थापून - ब्रह्मरंध्रेण ब्र्ह्म नीत्वा - ब्रह्मरंध्राच्या द्वाराने ब्रह्मस्थानी त्या लिंगदेहाला मनाने नेऊन - तनुं त्यजेत् - स्थूल देह सोडावा. ॥ २४ ॥ सुराक्रीडे विहरिष्यन् - देवांचे विलास हवे अशी इच्छा करणार्या योग्याचे - मत्स्थं सत्त्वं विभावयेत् - माझ्या ठिकाणी असलेल्या शुद्ध सत्त्वाचे चिंतन करावे - सत्त्ववृत्तीः सुरस्त्रियः - सत्त्वशील देवांगना - विमानेन उपतिष्ठन्ति - विमाने घेऊन येतात आणि सेवेला सादर असतात. ॥ २५ ॥ मयि सत्ये मनः युंजन् - सत्यस्वरूपी जो मी त्या माझे ठिकाणी मन स्थापून - मत्परः पुमान् - मन्निष्ठ पुरुष - बुद्ध्या - बुद्धिपुरःसर - यदा वा यथा संकल्पयेत् - जेव्हा अथवा जसे संकल्प करतो - तदा तथा तत् समुपाश्नुते - तेव्हा त्याचे ते ते संकल्प पूर्ण होतात. ॥ २६ ॥ ईशितुः वशितुः मत् - सर्व नियंता व सर्वतंत्र असा जो मी त्या माझ्या - भवं आपन्नः - स्वभावाला प्राप्त झालेला - यः पुमान् - जो पुरुष - कुतश्चित् न विहन्येत वै - अगदी कोठेही पराभूत होत नाही - तस्य च आज्ञा यथा मम - कारण त्याची आज्ञा ती मीच केलेली आज्ञा असते. ॥ २७ ॥ मद्भक्त्या - माझ्या भक्तीने - शुद्धसत्त्वस्य - ज्याचे मन शुद्ध झाले आहे अशा - धारणाविदः तस्य योगिनः - धारणा जाणणार्या त्या योग्याला - जन्ममृत्यूपबृंहिता - जन्ममृत्यूच्या ज्ञानासह - त्रैकालिकी बुद्धिः - तीन्ही काळांचा ज्ञान प्राप्त होते. ॥ २८ ॥ मद्योगश्रांतचित्तस्य मुनेः - माझे ध्यान करणार्या योग्याचे चित्त श्रांत म्हणजे मन्मय झाले असल्यामुळे - यादसा यथा उदकं - जसे जलचरांना जल घातक होत नाही त्याप्रमाणे - योगमयं वपुः - त्या मुनीचे मूर्तिमंत योगरूप झालेले शरीर - अग्न्यादिभिः न हन्येत - अग्न्यादिकांनी पीडित होत नाही. ॥ २९ ॥ ध्वजापत्रव्यजनैः - ध्वज, छत्र, चामर यांसह - श्रीवत्सास्त्रविभूषिताः मद्विभूतीः - श्रीवत्स, सुदर्शन, प्रभूतींनी झालेल्या झाल्या अवतारांचे - अभिध्यायन् - दृढ ध्यान करणारा - सः अपराजितः भवेत् - तो अजिंक्य होतो. ॥ ३० ॥ एवं योगधारणया - याप्रमाणे निरनिराळ्या योगधारणांनी - मां उपासकस्य मुनेः - माझी उपासना करणार्या मुनींच्या - पूर्वकथिताः सिद्धयः - आताच सांगितलेल्या सिद्धि - अशेषतः उपतिष्ठन्ति - सर्वथा सेवेला सादर असतात. ॥ ३१ ॥ जितेंद्रियस्य दान्तस्य - इंद्रियांना वश करणारा आणि दान्त - जितश्वासात्मनः मुनेः - प्राणायामपरायण मुनीने - मद्धारणां धारयतः - माझी शास्त्रोक्त धारणा केली असता - सुदुर्लभा सिद्धिः - अत्यंत दुर्लभ अशी सिद्धि - का सा ? - कोणती असणार ? ॥ ३२ ॥ मया संपद्यमानस्य - माझ्या साह्याने माझी परम प्राप्ति करून घेण्यासाठी - उत्तमं योगं युंजतः - उत्तमोत्तम योगसाधन निष्कामत्वाने करणार्या योग्याला - एताः अंतरायान् वदन्ति - या सिद्धि म्हणजे मोक्षमार्गांतील अडथळेच होत असे म्हणतात - कालक्षपणहेतवः - या सिद्धि म्हणजे कालाचा व्यर्थ अपव्यय होय. ॥ ३३ ॥ जन्मौषधितपोमंत्रैः - जन्मामुळे, औषधींनी, तपसामर्थ्याने, मंत्राच्या प्रभावाने - इह यावतीः सिद्धयः - येथे ज्या सिद्धि प्राप्त होतात - ताः सर्वाः योगेन आप्नोति - त्या सर्व योगाने मिळतातच - अन्यैः योगगतिं न व्रजेत् - अन्य जन्मादिकांनी योगलभ्य मुक्तीचा लाभ मिळत नाही. ॥ ३४ ॥ अहं - मी - सर्वासां अपि सिद्धीनां - या सर्वच्या सर्व सिद्धींचा - हेतुः पतिः प्रभु च - - कारण, पालक व स्वामी आहे - अहं योगस्य सांख्यस्य - मी योगशास्त्राचा, सांख्यशास्त्राचा - धर्मस्य, ब्रह्मवादिनांच - धर्मशास्त्राचा आणि तत्त्ववेत्त्यांचाही - ॥ ३५ ॥ सर्वदेहिनां अहं आत्मा - सर्व शरीराचा आत्मा मी आहे - आंतरः - अंतर्नियामक आहे - बाह्यः - बाहेरून सर्वव्यापक मी आहे - अनावृतः - मला कसलेही आवरन नाही - यथा भूतेषु - ज्याप्रमाणे त्रिभुवनातील सर्व प्रकारच्या पदार्थांच्या - बहिः अन्तः - आत बाहेर - भूतानि स्वयं - पृथ्वीप्रभृति पंचमहाभूते स्वतः असतात - तथा - त्याप्रमाणे. ॥ ३६ ॥ अध्याय पंधरावा समाप्त |