श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय १४ वा - अन्वयार्थ

भक्तियोगाचा महिमा व ध्यानविधिचे वर्णन -

कृष्ण ! - हे कृष्णा ! - ब्रह्मवादिनः - वेदवेदांतांची चर्चा करणारे पंडित - श्रेयांसि - मोक्षाचे साधने - बहूनि वदन्ति - अनेक आहेत असे म्हणतात. - तेषां विकल्पप्राधान्यं - त्यांपैकी कोणतेही साधन घेतले तरी त्याला तत्काळी प्राधान्य असते - उत आहो एकमुख्यता - अथवा त्यांतेल एकच मुख्य म्हणावयाचे ? ॥ १ ॥

स्वामिन् - प्रभो - अनपेक्षितः भक्तियोगः - सर्वस्वतंत्र असा, निष्काम भक्तियोग - भवता उदाहृतः - आपण सांगितला आहे - निरस्य सर्वतः संगं - सर्व प्रकारची आसक्ति सर्वथा ज्या भक्तियोगाने तुटते तो - येन मनः - ज्या भक्तियोगाने जीवाचे मन - त्वयि आविशेत् - त्वत्स्वरूपात प्रविष्ट होते. ॥ २ ॥

यस्यां मदात्मकः धर्मः - ज्या वेदवाणीमध्ये मत्स्वरूपी धर्म आहे अशी - आदौ मया ब्रह्मणे प्रोक्ता - सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाला मी सांगितली - इयं वेदसंज्ञिता वाणी - ही वेद नावाची वाणी - कालेन प्रलया नष्टा - कालसामर्थ्यामुळे प्रलयकाल झाला तेव्हा नष्ट झाली. ॥ ३ ॥

पुत्राय पूर्वजाय मनवे - ब्रह्मदेवाने मनु नामक प्रथम पुत्र - तेन च सा प्रोक्ता - त्याला ती वाणी सांगितली - ततः - त्या मनूपासून - भृग्वादयः सप्त - भृगुप्रभृति सात - ब्रह्ममहर्षयः अगृह्णन् - ब्रह्मर्षि शिकले. ॥ ४ ॥

तेभ्यः पितृभ्यः - त्या सप्त पितरांपासून - तत्पुत्राः, देवदानवगुह्यका, - त्यांचे पुत्र, देव, दानव, गुह्यक, - मनुष्याः, सिद्धगंधर्वाः, सविद्याधरचारणाः, - मनुष्य, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, चारण, - किन्देवाः, किन्नराः, नागा, रक्षः किंपुरुषादयः - किंदेव, किंनर, नाग, राक्षस, किंपुरुष हे शिकले. - तेषां रजःसत्त्वतमोभुवः - त्यांच्या राजस, सात्त्विक तामस गुणांनुरूप - बह्व्यः प्रकृतयः - अनेक प्रकारच्या प्रकृति झाल्या. ॥ ५-६ ॥

याभिः भूतानि - ज्या प्रकृतिवैचित्र्यांनी चराचर भूते - तथा भूतानां मतयः भिध्यंते - व त्यांच्या त्यांच्या बुद्धि भिन्न केल्या जातात, भिन्न होतात - यथा प्रकृति - जशी प्रकृति असते, स्वभाव असतो, - सर्वेषां - सर्व जीवांच्या - चित्राः वाचः स्रवंतिहि - सर्वांच्या चित्रविचित्र वाणी मुखांतून निघतात. ॥ ७ ॥

एवं - याप्रमाणे - प्रकृतिवैचित्र्यात् - स्वभावभेदामुळे - नृणां मतयः भिध्यंते - मनुष्यांच्या प्रकृतीत, शारीरिक, व मानसिक स्वभावात वैशिष्ट्य येते म्हणून बुद्धि भिन्न होतात - केषांचित् पारंपर्येण - काहींच्या बुद्धी, संप्रदाय वैचित्र्यामुळे भिन्न होतात - अपरे पाखंडमतयः - कित्येक पाखंड मताचे होतात. ॥ ८ ॥

पुरुषर्षभ - हे पुरुषश्रेष्ठ उद्धवा - मन्मायामोहित पुरुषाः - ज्यांची बुद्धि माझ्या मायेने मूढ झाली आहे असे पुरुष - यथाकर्म - संचितानुरूप जसा स्वभाव प्राप्त झाला असतो त्याप्रमाणे - यथारुचि - किंवा ज्याची जशी आवड असते त्याप्रमाणे - अनेकांतं श्रेयः वदन्ति - श्रेय म्हणजे श्रेष्ठ पुरुषार्थ व त्यांची साधने अनेकत्वाने सांगतात. ॥ ९ ॥

एके धर्मं - कोणी वेदोक्त धर्म - अन्ये यशः, कामं सत्यं - कोणी कीर्ति, कोणी काम, कोणी सत्य - दमं शमं अन्ये वदन्ति - तर कोणी दम शम म्हणतात - वा स्वार्थं ऐश्वर्यं त्यागभोजनं केचित् - कोणी स्वार्थ, ऐश्वर्य, त्याग वा भोजन - यज्ञतपोदानं, व्रतानि, नियमान्, यमान् - तर कोणी यज्ञ, तप, दान, यम, नियम - ॥ १० ॥

एषां लोकाः - या संप्रदायप्रवर्तकांनी सांगितलेले लोक - कर्मविनिर्मिताः - कर्मांनी उत्पन्न झालेले - आद्यंतवंत एव - उत्पत्ति व विनाश असणारे जन्ममृत्यु स्वरूपाचे - दुःखोदर्काः - दुःखच हेच फल असणारे - तमोनिष्ठाः - अज्ञानरूप तम हाच ज्यांचा अंत आहे - क्षुद्रानंदाः - जेथील सुख क्षुद्र असते - शुचार्पिताः - शोकमोहांनी ग्रस्त झालेले - ॥ ११ ॥

सभ्य - सभ्य - सर्वतः निरपेक्षस्य - सर्वथा निष्काम झालेल्याचे - मयि अर्पितात्मनः - ज्याने आपले मन, आत्मा मलाच अर्पण केले आहे अशाला - मया आत्मना - मीच आत्मा असल्यामुळे - यत् सुखं - त्याला जे अपूर्व सुख असते - तत् विषयात्मनां कुतः स्यात् - ते सुख विषयभोग हाच पुरुषार्थ मानणार्‍यास कोठून मिळणार ? ॥ १२ ॥

अकिंचनस्य - दरिद्री अशा - दान्तस्य शांतस्य - इंद्रिये व मन वश ठेवणारा अशा - समवेतसः - समबुद्धि अशा - मया संतुष्टमनसः - माझ्या संगतीतच सुखी असणार्‍या मद्‌भक्ताला - सर्वाः दिशः सुखमयाः - दाही दिशांस सर्वत्र सुखच व असते. ॥ १३ ॥

मयि अर्पितात्मा - माझा अनन्य भक्त - मद्विना अन्यत् - माझ्या खेरीज दुसरे काहीही - न इच्छति - इच्छित नाही - म पारमेष्ठ्यं - न ब्रह्मदेवादि लोक - न महेंद्रधिष्ण्यं, न सार्वभौमं - हा लोक नाही, स्वगलोक नाही - न रसाधिपत्यं, योगसिद्धिः वा पुनर्भवं - चक्रवर्तित्व नाही, पाताळाचे स्वामित्व किंवा योगांच्या अष्टसिद्धि किंवा मोक्षही नाही. ॥ १४ ॥

यथा भवान् मे प्रियतमः - माझा भक्त म्हणून ततू जसा मला प्रिय आहेस - तथा न आत्मयोनिः - तसा ब्रह्मदेवही नाही - न शंकरः - शंकरही नाही - नच संकर्षणः - बलरामही नाही - न श्रीः - लक्ष्मीही नाही - न आत्मा एव च - आणि आम्झा प्रत्यक्ष आत्माही नाही. ॥ १५ ॥

निरपेक्षं शान्तं - निष्काम, शांत - निर्वैरं, समदर्शनं - द्वेषरहित, समबुद्धि - मुनिं - मुनीच्या पाठीमागे पावलावर पाऊल ठेऊन - अहं नित्यं अनुव्रजामि - मी नित्य मागून जातो - अंघ्रिरेणुभिः पूयेय इति - त्याच्या चरनधूलीने मला पवित्रत्वच प्रात होत असते म्हणून. ॥ १६ ॥

निष्किंचना - कसली उपाधि नसणारे - मयि अनुरक्तचेतसः - माझ्या ठिकाणीच ज्यांची मने रमली आहेत - शांताः महांतः - शांत व मोठ्या मनाचे - अखिलजीववत्सलः - सकल जीवांवर पुत्रसम प्रेम करणारे - कामैः अनालब्धधियः - ज्यांच्या बुद्धींत वासणास प्रवेशच मिळत नाही असे पुरुष - यत् नैरपेक्ष्यं मम सुखं - जे मिष्काम, स्वतंत्र असनारे मत्सुख - जुषन्ति - उपभोगतात - तत् अमुए न विदुः - ते इतरांस समजण्याला सुद्धा अशक्य आहे. ॥ १७ ॥

अजितेंद्रियः मद्‌भक्तः - इंद्रियांवर जय न मिळविलेल्या माझ्या भक्ताला - विषयैः बाध्यमानः अपि - विषयांनी प्रथम प्रथम त्रास दिला तरी - प्रगल्भया भक्त्या - ती त्याची भक्ति दृढ व गंभीर झाली, उत्कर्ष पावली म्हणजे - प्रायः विषयैः - बहुतकरून विषय त्याला - न अभिभूयते - त्रास देत नाहीत. ॥ १८ ॥

उद्धव, यथा - हे उद्धवा, ज्याप्रमाणे - सुसमृद्धार्चि अग्निः - चांगल्या प्रचंड ज्वाला उत्पन्न झालेला अग्नि - एधांसि भस्मसात् करोति - सर्व काष्ठे वगैरे दाह्य वस्तु भस्मसात करतो - तथा मद्‌विषया भक्तिः - माझी मात्र भक्तिः - कृत्स्नशः एनांसि - सर्वथा महापातके नाहीशी करते. ॥ १९ ॥

उर्जिता मम भक्तिः - उत्कर्षाला पावलेली माझी भक्ति - यथा मां साधयति - जशी माझी प्राप्ति करून देते - न योगः, न सांख्यं, धर्मः च - ना योग, न सांख्य किंवा श्रुत्युक्त धर्म, - न स्वाध्यायः, तपः, त्यागः, - किंवा स्वाध्याय वा तप अथवा संन्यास - न मां साधयति - यांपैकी कोणीही माझी प्राप्ति करून देण्याला समर्थ नाही. ॥ २० ॥

सतां प्रियः आत्मा - सज्जनांस अत्यंत प्रिय व त्यांचा आत्माच असा - अहं एकया श्रद्धया भक्त्या - केवळ एका श्रद्धापूर्ण भक्तीने मात्र - ग्राह्यं - वश केला जातो - मन्निष्ठा भक्तिः - माझी अनन्य भक्ति - श्वपाकान् अपि - चांडाळास सुद्धा - संभवात् पुनाति - नीचकुलजन्मदोष यांपासून मुक्त करते. ॥ २१ ॥

हि - कारण - सत्यदयोपेतः धर्मः - सत्य, दया यांनी अलंकृत झालेला धर्म - तपसा अन्विता विद्या वा - अथवा तपस्यायुक्त अशी विद्या - मद्‌भक्त्या अपेतं आत्मानं - माझ्या भक्तीने रहित असलेल्या जीवाला - न सम्यक् प्रपुनाति - यथार्थ रीतीने शुद्ध करीत नाही. ॥ २२ ॥

उद्धव - उद्धवा - रोमहर्षं विना - सर्वांगी रोमांच उभे राहिल्याविना - द्रवता चेतसा विना - सद्‌गदित अंतःकरणविना - आनंदाश्रुकलया विना - आनंदाश्रु गळल्याविना - भक्त्या विना - माझ्या एकनिश्ठ भक्ती शिवाय - आशयः कथं शुद्ध्येत् - अभिमानाने मलीन झालेला देह कसा पवित्र व्हावा ? ॥ २३ ॥

यस्य वाक् गद्‌गदा - ज्याची वाणी प्रेमाने सद्‌गदित झाली - चित्तं द्रवते - चित्त द्ववित झाले - यः अभीक्ष्णं रुदति - जो पुनः पुनः रडतो - क्वचित् च हसति - कधी हसतो - विलज्ज सन् उद्गायति - निर्लज्ज होऊन गातो - नृत्यति च - व नाचतो - मद्‌भक्तियुक्तः भवनं पुनाति - माझा अनन्य भक्त सर्व जगाला पवित्र करतो. ॥ २४ ॥

यथा अग्निना - जसे अग्नीमध्ये घालून - ध्मातं हेम - तापविलेले सुवर्ण - मलं जहाति - आपला मळ टाकून देतो - पुनः च स्वं रूपं भजते - आणि पुनः आपले स्वरूप प्राप्त करून घेते - आत्मा च मद्‌भक्तियोगेन - आत्माही माझ्या भक्तियोगाने - कर्मानुशयं विधूय - कर्माशयातील, चित्तातील मळ धून काढून - अथ मां भजति - नंतर मत्स्वरूपाला प्राप्त होतो. ॥ २५ ॥

मत्पुण्यगाथाश्रवणाभिधानैः - माझ्या पवित्र कथांचे श्रण करून व संकीर्तन करून - यथा यथा - जसा जसा क्रमशः - असौ आत्मा परिमृज्यते - हा जीवात्मा निर्मळ होत जातो - तथा तथा - तशी तशी - सूक्ष्मं पश्यति - सूक्ष्म म्हणजे इंद्रियादिकांस अगोचर असणारी वस्तु परमात्म्याला गोचर होऊ लागते - अंजनसंप्रयुक्तं - जसे अंजन घातले असता - चक्षुः एव यथा - त्या डोळ्याला सूक्ष्म गोष्टी दिसू लागतात. ॥ २६ ॥

विषयान ध्यायतः चित्तं - विषयांचे नित्य चिंतन करणारांचे मन - विषयेषु विषज्जते - विषयांमध्येच अत्यासक्त होते - मां अनुस्मरतः चित्तं - माझेच चिंतन रात्रंदिवस करणार्‍या भक्तांचे अंतःकरण - मयि एव प्रविलीयते - मत्स्वरूपांतच लीन होते. ॥ २७ ॥

तस्मात् - म्हणून - यथा स्वप्नमनोरथं - स्वप्नातील मनोरथाप्रमाणे मिथ्या असणारे - असद् अभिध्यानं हित्वा - असत् वस्तूचे चिंतन टाकून देऊन - मद्‌भावभावितं - माझ्यावरील श्रद्धायुक्त भक्तीने शुद्ध झालेले चित्त - मयि समाधत्स्व - माझ्या ठिकाणी सुस्थिर कर. ॥ २८ ॥

स्त्रीणां स्त्रीसंगिनां च - स्त्रियांची व स्त्रियांशी संबंध असणार्‍यांचीही - संगं - संगति - क्षेमे विविक्ते आसीनः - निर्भय अशा एकांत ठिकाणी बसून - मां अतंद्रितः चिंतयेत् - माझे निरलसतेने चिंतन करावे. ॥ २९ ॥ यथा योषिसंगात् - जशी योषितांच्या - हथा तत्संगिसंगतः - आणि त्यांच्याशी संगति करणार्‍यांच्या समागमांत - पुंसः क्लेशः बंधः च - पुरुषाला ताप आणि बंधन उत्पन्न होते - तथा अस्य - त्याप्रमाणे त्याला - अन्यप्रसंगतः न भवेत् - इतर समागमाने होत नाही. ॥ ३० ॥

अरविंदाक्ष - हे कमलनेत्र कृष्णा - यथा - ज्या पद्धतीने - यादृशं - ज्या स्वरूपाने - यदात्मकं वा - ज्या निजरूपाचे - त्वां मुमुक्षुः धायेत् - मुमुक्षुने तुझे ध्यान करावे - एतत् ध्यानं - ते ध्यान - त्वं मे वक्तुं अर्हसि - मला सांगावयास तूच योग्य आहेस. ॥ ३१ ॥

यथासुखं समे आसने - आपल्याला सुखकर होईल अशा आसनावर - समकायः आसीनः - पाठीचा कणा, शिर छाती एकाच रेषेत येतील अशा रीतीने बसावे - हस्तौ उत्संगे आधाय - हात मांडीवर ठेवावे - स्वनासाप्रकृतेक्षण - आपल्या नाकाच्या टोकावर एकाग्र दृष्टी ठेवावी. ॥ ३२ ॥

निर्जितेंद्रियः - इंद्रियांचे दमन करावे - पूरकुंभकरेचकैः - पूरक, कुंभक व रेचक यांच्या साह्याने - प्राणस्य मार्गं - प्राणाचा मार्ग - शनैः शोधयेत् - हळूहळू शुद्ध करावा. - विपर्ययेणापि - रेचक, कुंभक पूरक या पद्धतीने सुद्धा प्राणशोधन करावे - अभ्यसेत् - हा अभ्यास नित्य करावा. ॥ ३३ ॥

बिसोर्णवत् - कमलतंतूप्रमाणे - अविच्छिन्नं घंटानादं ओंकारं - अखंड घंटानादाप्रमाणे असणारा ओख्मारध्वनि - हृदि प्राणेन उदीर्य - अंतःकरणामध्ये प्राणाने स्पष्ट उच्चार युक्त करून - अथ पुनः तत्र स्वरं संवेशयन् - मग पुन्हा तेथे स्वराची स्थापना करावी. ॥ ३४ ॥

एवं प्रणसंयुक्तं प्राणं एव - याप्रमाणे ओंकारयुक्त असणारा जो प्राणायाम त्याचा - त्रिषवणं - प्रातःकाळी, मध्यान्ही व सायंकाळी - दशकृत्य समभ्यसत् - दहा दहा वेळा दृढ अभ्यास करावा - मासात् अर्वाक् - एक महिन्याच्या आंतच - जितानलः - अभ्यासकाला प्राणजय साधेल. ॥ ३५ ॥

अंतस्थः - आंत असणारे - ऊर्ध्वनालं अधोमुखं - ज्याचा दांडा वर व मुख खाली आहे असे उलटे असणारे - हृत्पुंडरीकं - हृदयकमल - ऊर्ध्वमुखं उन्निद्रं - ते ऊर्ध्वमुख आहे, पूर्ण विकसित आहे, - सकर्णिकं अष्टपत्रं - कर्णिकेसह आठ पाकळ्यांचे आहे असे हृदयपीठाचे - ध्यात्वा - ध्यान मनात आणून - कर्णिकायां उत्तरोत्तरं - त्या कर्णिकेमध्ये क्रमाने - सूर्यसोमाग्नीन् न्यसेत् - सूर्य, चंद्र व अग्नि यांची स्थापना करावी - मम एतत् रूपं ध्यानमंगलं - हे माझे मंगल ध्यानरूप - वह्निमध्ये स्मरेत् - अग्नीमध्ये आहे असे स्मरण करावे. ॥ ३६-३७ ॥

समं प्रशांतं सुमुखं - प्रमाणबद्ध अवयवयुक्त, शांत सुंदर वदनाचे - दीर्घचारुचतुर्भुजं - गुढघ्यापर्यंत लांब व सुंदर चार हात आहेत - सुचारु, सुंदरग्रीवं - रमणीय, सुंदर मान आहे - सुकपोलं - गाल पुष्ट आहे - शुचिस्मितः - सुंदर स्मितहास्य आहे - ॥ ३८ ॥

समानकर्णविन्यस्त - एकाच आकाराच्या दोन्ही कानांत घातलेली - स्फुरन्मकरकुंडलम् - देदीप्यमान मकरकुंडले आहेत - हेमांबरं - सुंदर पीतांबर नेसलेले - घनश्यामं - मेघतुल्य श्यामल - श्रीवत्सश्रीनिकेतनम् - श्रीवत्स आणि लक्ष्मी यांनी अलंकृत - ॥ ३९ ॥

शंखचक्रगदापद्म - शंख, चक्र, गदा, पद्म ही चार आयुधे चार हातात असणारे - वनमालाविभूषितं - वनमालेने सुशोभित - नूपूरैः विलसत्पादं - झणत्कार करणार्‍या नूपुरांनी चरण भूषित आहेत - कौस्तुभप्रभया युतं - दैदीप्यमान कौस्तुभाच्या प्रभेने युक्त - द्युमत्किरीटकटक - लखलखित किरीट व कडी - कटिसूत्रांगदायुत - कटिदोरा, करगोटा अंगद यांनी युक्त - सर्वांगसुंदर - अंगप्रत्यंगाने सुंदर - हृद्यं - रमणीय - प्रसादसुमुखेक्षणं - ज्याचे मुख व नेत्र प्रसन्न आहेत - ॥ ४०-४१ ॥

सर्वांगेषु - सर्व अंगप्रत्यंगावर - मनः दधत् - ज्ञानदृष्टि ठेऊन - सुकुमारं अभिध्यायेत् - त्या सुकुमार ईशस्वरूपाचे ध्यान करावे - इंद्रियार्थेभ्यः - इंद्रियांच्या विषयांपासून - इंद्रियाणि मनसा आकृष्य - सर्व इंद्रियांना मनाने आकर्षित व निवृत्त करून - तत् मनः - तेच मन - बुद्ध्या सारथिना - बुद्धिरूप सारथ्याच्या साह्याने - धीरः - बुद्धिवंताने - सर्वतः मयि प्रणयेत् - सर्वथा माझ्या ठायीं स्थिर करावे. ॥ ४२ ॥

सर्वव्यापकं तत् चित्तं - सर्व अंगावर स्थिर झालेले ते मन - आकृष्य - ओढून घेऊन - एकत्र धारयेत् - एका ठिकाणी स्थिर करावे - भूयः - फिरून - अन्यानि न चिंतयेत् - दुसर्‍या कशाचाही विचार मनात आणू नये - सुस्मितं मुखं भावयेत् - सुहास्य वदनच आपण पाहात आहोत, अशी भावना करावी. ॥ ४३ ॥

तत्र लब्धपदं चित्तं - त्या मुखावर ठेवलेले मुखध्यान करणारे चित्त - आकृष्य - तेथून काढून - व्योम्नि धारयेत् - सर्वकारण जे आकाश तिकडे लावावे - तत् च त्यक्त्वा - ते आकाश टाकून देऊन - मदारोहः - निर्विशेषस्वरूपी जो मी त्या माझ्या ठिकाणी येऊन पोहोचलेल्या भक्तिपूर्ण योग्याने - किंचिदपि न चिंतयेत् - कशाचेही चिंतन करू नये. ॥ ४४ ॥

एवं समाहितमतिः - याप्रमाणे ज्याची बुद्धि स्वरूपामध्ये स्थित झाली असा भक्त - मां एव आत्मनि - मलाच आपल्या आत्म्यामध्ये - आत्मानं च सर्वात्मन् - आणि आपला आत्मा सर्वात्मक अशा - मयि संयुतं विचष्टे - माझ्यामध्ये संयुक्त झालेला पाहतो - ज्योतिषि संयुतं ज्योतिः इव - ज्योतीशी ज्योती मिळाल्यावर एकरूप होतात त्याप्रमाणे आत्मा व परमात्मा एक होतात. ॥ ४५ ॥

इत्थं - अशा प्रकारे - सुतीव्रेण ध्यानेन - अत्यंत अव्यंग व नैष्ठिक ध्यानाच्या साह्याने - मनः युंजतः योगिनः - मन युक्त करणार्‍या योग्याचे - आशु - लवकरच - द्रव्यज्ञानक्रियाभ्रमः - पदार्थ, ज्ञान व कर्म यासंबंधी भ्रम असतो तो - निर्वाणं संयास्यति - निखालस शांत होतो. ॥ ४६ ॥

अध्याय चौदावा समाप्त

GO TOP