|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय १२ वा - अन्वयार्थ
सत्संगाचा महिमा व कार्मत्यागाचा विधि - हि सर्वसंगापहः सत्संगः - प्रसिद्ध आहे की सर्व संगांचा नाश करणारा संतसंग - यथा मां अवरुंधे - जसा मला वश करतो - न योगः न सांख्यं धर्मः च एव - तसा योग, सांख्य वा धर्मही करीत नाही - न स्वाध्यायः तपः त्यागः - तसेच स्वाध्याय वा तपाचरण वा त्यागही करीत नाही - न इष्टापूर्तं न दक्षिणा मां रोधयति - इष्टापूर्त वा दानही मला वश करीत नाही - व्रतानि यज्ञः छंदांसि तीर्थानि - तसेच व्रते, यज्ञ, मंत्र तीर्थे - नियमाः यमाः अपि न रोधयंति - यम, नियम हेही वश करीत नाहीत. ॥ १-२ ॥ अनघ - हे निष्पाप उद्धवा - सत्संगेन हि - संतांचा समागम झाला म्हणूनच - दैतेयाः, यातुधनाः, मृगाः खगाः - दैत्य, राक्षस, वन्यपशु, पक्षी - गंधर्वाप्सरसः, नागाः सिद्धाः चारणगुह्यकाः विद्याधराः - गंधर्व-अप्सरा,, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक, विद्याधर - मनुष्येषु वैश्याः, शूद्राः, स्त्रियः अंत्यजाः, बहवः - मनुष्यांमध्ये वैश्य, शूद्र, स्त्रिया, अतिशूद्र, सारांश हजारो - रजस्तमः प्रकृतयः - रजोगुणी व तमोगुणी प्राणी - तस्मिन् तस्मिन् युगे - त्या त्या प्रत्येक युगात - मत्पदं प्राप्ताः - माझ्या पदाला पोचलेले आहेत - त्वाष्ट्रकायाधवादयः वृषपर्वा, - वृत्रासुर, प्रल्हादप्रभृति, वृषपर्वा, - बलिः, बाणः मयः च विभीषणः - बलि, बाण, मय आणि बिभीषण - सुग्रीव, हनुमान्, ऋक्षः गजः - सुग्रीव, मारुती, जांबुवंत, गजेंद्र - गृध्र, वणिक्पथः, व्याधः - जटायु, तुलाधार, व्याध - कुब्जा, व्रजे गोप्यः, यज्ञपत्न्यः तथा अपरे अपि - कुब्जा, गोकुळातील गोपी, यज्ञपत्न्या व इतरही अनेक सत्संगानेच मला प्राप्त करू शकले. ॥ ३-६ ॥ ते अधीतश्रुतिगणाः न - हे वर सांगितलेले मनुष्यादि जीव श्रुतीचे अध्ययन केलेले नव्हते - उपासितमहत्तमाः न - मोठमोठ्या शास्त्रज्ञ गुरुंची अथवा इंद्रचंद्रादि देवांची उपासना केलेलेही नव्हते - अव्रतात्प्ततपसः - ज्यांनी व्रताचरण अथवा उग्र तपश्चर्याही केली आहे असेही नव्हते - सत्संगात् मां उपागताः - संतांच्या संगतीमुळेच माझ्या पदाला प्राप्त झाले. ॥ ७ ॥ गोप्यः गावः नगाः मृगाः - गोपी, गाई, वृक्ष, पशु - ये अन्ये मूढधियः नागाः सिद्धाः - जे इतरही मंदबुद्धि लोक व नाग, सिद्ध इत्यादि - केवलेन हि भावेन - केवळ शुद्ध भावाने मात्र - मां अंजसा ईयुः - सहज लीलेने मला प्राप्त झाले. ॥ ८ ॥ योगेन सांख्येन - योगाने वा सांख्यशास्त्राच्य अज्ञानाने - दानव्रततपोध्वरैः - दान, व्रत, तप, यज्ञ यांच्या योगे - व्याख्या स्वाध्याय संन्यासैः - प्रवचने, स्वाध्या, संन्यासप्रभृति साधनांनी - यत्नवान अपि यं न प्राप्नुयात् - मोठा प्रयत्न करूनही माझी प्राप्ती व्हावयाची नाही. ॥ ९ ॥ रामेण सार्धं - बलरामासह - मथुरां श्वाफल्किना प्रणीते - मला श्वाफल्कि म्हणजे अक्रूराने मथुरेला नेले त्यावेळी - विगाढभावेन मयि - अंतःकरणात बद्धमूल झालेल्या भक्तीने माझ्या ठायी - अनुरक्तचित्ताः - ज्यांचे चित्त, मन अनुरक्त झाले होते अशा - वियोगतीव्राधयः - माझ्या वियोगामुळे ज्यांचे दुःख तीव्र झाले होते अशा गोपीस - सुखाय मे अन्यं न ददृशु - सुख देणारा माझ्याहून दुसरा कोणी दिसेनासा झाला. ॥ १० ॥ अंग - हे उद्धवा - वृंदावनगोचरेण - वृंदावनात राहणारा - प्रेष्ठतमेन - गोपींस अत्यंत प्रियकर झालेला जो मी - मया एव - त्या माझ्यासह मात्र - ताः तोः क्षपाः याभिः क्षणार्द्धवत् नीताः - ज्या ज्या स्मरणीय रात्री ज्या गोपींनी क्षणार्धात घालविल्या - तासां पुनः मया हीनाः ताः - मी नव्हतो म्हणून त्या रात्री - कल्पसमाः बभूवुः - कल्पासारख्या दीर्घ वाटल्या. ॥ ११ ॥ यथा मुनयः - ज्याप्रमाणे मुनींना - समाधौ नामरूपे न - समाधीमध्ये नामरूपे कळत नाहीत - अब्धितोये प्रविष्टाः नद्यः इव - समुद्रात शिरलेल्या नद्यांस नामरूप राहात नाही त्याप्रमाणे - मयि अनुषंगबद्धधियः ताः - माझ्यावरच ज्यांचे चित्त प्रेमाने बद्ध होते अशा त्या गोपी - इदं स्वं आत्मानं तथा अदः - आपला देह हा किंवा इतर याचे भान - न अविदन् - विसरत्या झाल्या. ॥ १२ ॥ अस्वरूपाविदः - माझे परमस्वरूप ठाऊक नसलेल्या - मत्कामाः अबलाः - ज्यांची कामबुद्धि मत्संबंधी उत्कट झाली होती अशा त्या अबला स्त्रिया - मां रमणं जारं - मी त्यांचा रमण अथवा उपपति असे समजल्या तरी - शतसहस्रशः हजारो प्रकारच्या - संगात् - माझ्या संगतीने - परमं ब्रह्म प्रापुः - परमश्रेष्ठ ब्रह्म प्राप्त करून घेत्या झाल्या - ॥ १३ ॥ उद्धव - हे उद्धवा - तस्मात् चोदनां प्रतिचोदनां - म्हणून विधिनिषेध सांगणार्या - प्रवृत्तं च निवृत्तिं च - प्रवृत्ति-निवृत्तीची चर्चा करणार्या - श्रोतव्यं श्रुतं एव च - ऐकलेल्या व ऐकावयाच्या सर्व श्रुति - त्वं उत्सृज्य - यांचा त्याग करून - सर्वदेहिनां आत्मानं मां एकं एव - सर्व जीवांचा आत्मा जो मी, त्या मला एकट्याला - सर्वात्मभावेन तन मन धनाने - शरणं याहि - शरण ये - मया हि अकुतोभयः स्याः - माझ्या साह्याने तुला कशाचीही भिती राहणार नाही. ॥ १४-१५ ॥ योगेश्वरेश्वर - हे योश्वरांच्या ईश्वरा - तव वाचं श्रृण्वतः मे - तुझे भाषण लक्ष देऊन ऐकणारा जो मी त्या माझ्या - आत्मस्थः संशयः न निवर्तते - अंतःकरणांतील संशय नाहीसा होत नाही - येन मनः भ्राम्यति - तो फिरून फिरून उद्भवतो म्हणून मन भ्रमित होत आहे. ॥ १६ ॥ सः एषः जीवः - तोच हा जडास चेतविणारा जीव होय - प्राणेन घोषेण गुहां प्रविष्टः - नाद आणि प्राण घेऊन त्याने गुहेमध्ये प्रवेश केला - मनोमयं सूक्ष्मं रूपं उपेत्य - मनोमय सूक्ष्म स्वरूप धारण करतो - विवरःप्रसूतिः - विवरात, शरीराच्या अंतर्भागात प्रकट होतो. ॥ १७ ॥ यथा अनलः खे उष्मा - ज्याप्रमाणे अग्नि आकाशामध्ये केवळ ऊष्मा नामक अव्यक्त स्वरूपाने असून - अनिलबंधुः - वायुसख्याचे साह्य करणारा तो अग्नि - बलेन अधिमत्यमानः - जोराने लाकडावर लाकडे घासली असत - दारुणि अणुः प्रजातः - लाकडात सूक्ष्म ठिणगीचे स्वरूप घेतो - हविषा समिद्ध्यते - आहुति टाकल्यानंतर आपले ज्वालारूप प्रकट करतो - तथा हि एव - त्यप्रमाणेच - इयं वाणी मे व्यक्तिः - ही वाणी माझे दृश्य स्वरूप घेते. ॥ १८ ॥ एवं - याप्रमाणे - गदिः - भाषण - कर्म - हस्तेंद्रियाची वृत्ति - गतिः - पायांची वृत्ति - विसर्गः - विसर्जनाची वृत्ति - घ्राणः, रसः दृक्, स्पर्श, श्रुतिः च - नासिका, जिव्हा, नेत्र, स्पर्श, कर्णप्रभृति ज्ञानेंद्रियांची वृत्ति - संकल्पविज्ञानं - मनोवृत्ति व बुद्धिवृत्ति - अथ अभिमानः - अहंकारवृत्ति - सूत्रं - हिरण्यगर्भरूपी प्रधानाची वृत्ति - रजःसत्त्वतमोविकारः - सत्त्वादि गुणरूप अधिदैवादिकांची वृत्ति ॥ १९ ॥ यद्वत् - ज्याप्रमाणे - योनिं प्रतिपद्य बीजानि - चांगले क्षेत्र मिळाले म्हणजे एकच बीज अनेकामध्ये उत्क्रांत होते - अव्यक्तः आद्यः एकः - अव्यक्त, सनातन अद्वितीय असा - सः अयं जीवः - तो हा जीव - वयसा - कालाने - अब्जयोनिः - कमलोद्भव - त्रिवृत् - गुणत्रयासन्निध आला म्हणून ब्रह्मांडरूपी दृश्य कमल उत्पन्न करता झाला - विश्लिष्टशक्तिः बहुधा एव भाति हि - गुणोपाधींनी अनेक शक्ति धारण करून ’नाना’ आहे असा दिसला. ॥ २० ॥ यथा पटः तंतुवितानसंस्थः - ज्याप्रमाणे पट तंतूंमध्ये घटित असतो - अशेषं इदं - हे निःशेष अंतर्बाह्य विश्व - यस्मिन् ओतं प्रोतं - ज्या या जीवस्वरूपात ओतप्रोत भरले आहे - य एषः संसारतरुः - हे विश्व हाच संसारवृक्ष होय - पुराणः - हा वृक्ष पुरातन असून - कर्मात्मकः - कर्म हेच याचे स्वरूप आहे - पुष्पफले - इहलोकींचे व स्वर्गांचे भोगरूपी पदार्थांस - प्रसूते - जन्म देतो. ॥ २१ ॥ अस्य द्वे बीजे - याचीं बीजे दोन, पाप व पुण्य - शतमूलः - याची वासनारूपी मुळे हजारो - त्रिनालः - सत्त्वादि तीन गुण ही या वृक्षाची कांडे - पंचस्कंधः - पंचभूते ह्याच पाच फांध्या - पंचरसप्रसूति - शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पाच रस - दशैकशाखः - दहा इंद्रिये व एक मन अशा अकरा फांद्या - द्विसुपर्णनीडः - दोन पक्षांची घरटी - त्रिवल्कलः - वात, पित्त, कफ ही तीन त्वचा म्हणजे साली - द्विफलः - सुख आणि दुःख हीच दोन याची फळे - अर्कं प्रविष्टः - सूर्यमंडलापर्यंत उंच आहे. ॥ २२ ॥ ग्रामेचराः गृधः अस्य एकं फलं अदंति - गावात फिरणारी ससारस्थ गिधाडे म्हणजे वासनामय जीव या वृक्षाचे एक फळ, म्हणजे दुःख उपभोगतात - अरण्यवासाः हंसाः च एकं - अरण्यवासी परमहंस संन्यासी एक फळ, म्हणजे नित्य सुख उपभोगतात - यः एकं मायामयं इज्यैः बहुरूपं वेद - ज्याला एकच परब्रह्म मायेमुळे गुरुसाह्याने अनेकसे दिसते - सः वेदं वेद - त्यालाच वेद समजले. ॥ २३ ॥ एवं - याप्रकारे - गुरूपासनया - गुरूची उपासना - एकभक्त्या - एकाग्रभक्ति - शितेन विद्याकुठारेण - आणि तीक्ष्ण कुठाररूपी आत्मविद्या यांच्या मदतीने - जीवाशयं - जीवाचा सूक्ष्म शरीररूपी गाभा - विवृश्च्य - कापून - आत्मानं धीरः - व आत्मस्वरूपाची सावधानपणे - अप्रमत्तः संपद्य च - इंद्रियजयपूर्वक प्राप्ति करून घेऊन - अथ - मग - अस्त्रं त्यज - विद्यारूपी अस्त्र टाकून दे. ॥ २४ ॥ अध्याय बारावा समाप्त |