श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ११ वा - अन्वयार्थ

बद्ध,मुक्त आणि भक्तांची लक्षणे -

बद्धः मुक्तः इति व्याख्या - आत्मा बद्ध आहे, मुक्त आहे हे म्हणणे - मे गुणतः - माझ्या स्वाधीन असणार्‍या गुणांच्या उपाधीमुळे आहे - न वस्तुतः - खर्‍या दृष्टीने पाहता ते तसे नाही. - गुणस्य - सत्त्वादि गुण - मायामूलत्वात् - मायाजनित असल्यामुळे - मे न बंधनं - मला कोणतेही बंधन नाही - न मोक्षः - तसेच मला मोक्षही नाही. ॥ १ ॥

यथा स्वप्नः - ज्याप्रमाणे स्वप्न - शोकमोहौ सुखं-दुःखं - शोक, मोह, सुख, दुःख - देहोत्पत्ति च - व देहाचे जन्म ही सर्व - मायया - मायेने उत्पन्न केलेली आहेत - संसृति आत्मनः ख्यातिः - संसार हा आत्म्यावर आरोपित आहे - न तु वास्तवी - वस्तुतः आत्म्याला संसार नाहीच. ॥ २ ॥

उद्धव - हे उद्धवा - मे मायया विनिर्मिते - माझ्याच मायेने निर्माण केलेल्या - विद्या अविद्ये मा आद्ये तनू - विद्या व अविद्या या दोन्ही माझ्या अनादि शरीरभूत शक्ति आहेत - शरीरिणां बंधमोक्षकरी विद्धि - देहधार्‍यास बद्ध-मुक्त करणार्‍या जाण. ॥ ३ ॥

महामते ! - हे सुबुद्ध उद्धवा - एकस्य एव मम अंशस्य जीवस्य - माझाच एक अंश असणार्‍या ह्या जीवाला - अस्य अविद्यया - त्याच्याच अविद्येमुळे - अनादि बंधः - संसार असतो - तथा च - आणि त्याचप्रमाणे - विद्यया इतरः - विद्येने मोक्षही असतो. ॥ ४ ॥

अथ ते - आता यानंतर मी तुला - बद्धस्य मुक्तस्य वैलक्षण्यं वदामि - बद्ध व मुक्त यांचे वैलक्षण्य सांगतो - तात - हे वत्सा, उद्धवा - विरुद्धधर्मिणोः - या बंधमोक्षाचे धर्म परस्पर विलक्षण आहेत - एक धर्मिणि स्थितयोः - एकाच धर्मीमध्ये, म्हणजे जीवामध्ये ते राहतात. ॥ ५ ॥

एतौ सुपर्णौ - जीव व शिव हे दोन्ही पक्षी - सदृशौ सखायौ - एकासारखे एक, परस्पर स्नेही असूनही - एतौ यदृच्छया - यदृच्छेने हे दोघेही एकाच झाडावर यदृच्छेने म्हणजे अनिर्वचनीय मायेच्या सामर्थ्याने - कृतनीडौ च वृक्षे - एकाच शरीरूप वृक्षावर घरटे करून राहिले आहेत - तयोः एकः पिप्पलान्नं खादति - त्यांतील एकजण त्या अश्वत्थ वृक्शाचे फळरूपी अन्न खातो - अन्यः निरन्नः अपि बलेन भूयान् - दुसरा काही खात नाही, तथापि बलाने श्रेष्ठ आहे. ॥ ६ ॥

अपिप्पलादः विद्वान् सः - फल न खाणारा तो विद्वान् - आत्मानं अन्यं च वेद - आपण कोण आणि तो दुसरा फल खाणारा कोण हे जाणतो - पिप्पलादः तु न - - पण फळ खाणार्‍याला हे काही समजत नाही. - यः अविद्यया युक् - जो अविद्येच्या स्वाधीन असतो - सः तु नित्य बद्धः - तो नित्यबद्धः असतो - तु - परंतु - यः विद्यामयः स तु मित्यमुक्तः - जो विद्वान असतो, तो नित्यमुक्त असतो. ॥ ७ ॥

विद्वान् देहस्थः अपै न देहस्थः - विद्वान देहात राहूनही देहात राहात नाही - यथा स्वप्नात् उत्थितः - ज्याप्रमाणे स्वप्नातून उठलेला पुरुष स्वप्नदेहात असूनही आपण वस्तुतः तेथे नव्हतो हे जाणतो - कुमतिः - जो मंदबुद्धि अथवा अज्ञानी म्हणजे संसारी असतो तो - अदेहस्थः अपि देहस्थः - वस्तुतः देहात नसूनही आपण देहात राहतो अशी त्याला भ्रांती असते - स्वप्नदृक् यथा - ज्याप्रमाणे स्वप्न पाहणारा आपण त्या स्वप्नदेहात आहो असे मानतो. ॥ ८ ॥

तु - परंतु - इंद्रियैः इंद्रियार्थेषु - ज्ञानेंद्रियांच्या द्वारे जे जे इंद्रियविषय घेतले जातात - गुणैः अपि गुणेषु गृह्यमाणेषु - म्हणजे वस्तुतः सत्त्वरजतमो गुणांकरवी जो पदार्थांच्या रूपरसादि गुणांचे ग्रहण होते, त्या विषयांचे व परिणामी सुखदुःखांचे ठिकाणी - विद्वान् - आत्मजिज्ञासू शाहाण्या पुरुषाने - न अहं कुर्यात् - ममत्वाचा अथवा अहंभावाचा अभिनिवेश करू नये. - यः अविक्रियः - कारण जो जीव आहे तो वस्तुतः अक्रिय, निर्विकार आहे. ॥ ९ ॥

अस्मिन् दैवाधीने शरीरे - दैवाच्या म्हणजे पूर्वकर्माच्या स्वाधीन असणार्‍या या शरीरात - वर्तमानः अबुधः - राहणारा अज्ञानी जीव - गुणभाव्येन कर्मणा - इंद्रियांकडून घडत असलेल्या कर्मामुळे - तत्र - त्या शरीरात - अहं कर्ता अस्मि इति - मीच ती कर्मे करणारा अशा अभिमानाने - निबद्ध्यते - बद्ध होऊन राहतो. ॥ १० ॥

एवं विरक्तः - वर सांगितलेल्याप्रमाणे विरक्त ज्ञानी - शयने आसनाटनमज्जने - निजणे, बसणे, फिरणे, पोहणे यामध्ये - दर्शन स्पर्शन घ्राण भोजन श्रवणादिषु - पाहणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे, ऐकणे इत्यादि ज्ञानकर्मेंद्रियांच्या विषयांत व व्यापारात - ॥ ११ ॥

तथा न बध्यते - अज्ञानी मनुष्याप्रमाने आसक्त होत नाही - प्रकृतिस्थः अपि - प्रकृतीत म्हणजे देहात राहूनही - तत्र तत्र गुणान् आदयन् - त्या त्या इंद्रियांस त्यां त्यांच्या विषयांचे खाद्य देऊनही - विद्वान् असंसक्तः - विद्वान अनासक्त राहतो - यथा खं सविता अनिलः - जसे आकाश, सूर्य व अग्नि हे विषयात राहूनही निर्विकार असतात. ॥ १२ ॥

असंगशितया वैशारद्या ईक्षया - निःसंगतेमुळे शित, म्हणजे तीक्ष्ण झालेल्या स्वच्छ व निर्मळ जनदृष्टीने - छिन्नसंशयः - ज्याचे संशय फिटले आहेत असा विद्वान - स्वप्नात् प्रतिबुद्धः इव - नानात्व दाखविणार्‍या स्वप्नातून जागा झालेल्या पुरुषासारखा - नात्वात् विनिवर्तते - नानात्वापासून मागे फिरतो. ॥ १३ ॥

यस्य प्राणेंद्रियमनोधियां वृत्तयः - ज्याच्या प्राणवृत्ति, इंद्रियांच्या वृत्ति, मनाच्या व बुद्धीच्या वृत्ति - वीतसंकल्पाः स्युः - संकल्पशून्य झाल्या - सः देहस्थः अपि - तो देहात राहणारा असला तरी - तद्‌गुणैः - देहाच्या सुखदुःखादि गुणांपासून - विनिर्मुक्तः हि - मुक्तच असतो. ॥ १४ ॥

हिंस्त्रैः - व्याघ्र, सर्प, कीटकादिकांनी किंवा दुष्टांनी - यस्य आत्मा - ज्याच्या शरीराला - हिंस्यते - त्रास दिला वा खिजविले - यदृच्छया येने किंचित् अर्चते वा - किंवा कोणी सहजगत्या त्याची पूजा केली तरी - बुधः तत्र न क्वचित् व्यतिक्रियते - विद्वान् पुरुष काडीमात्रही विचलित होत नाही. ॥ १५ ॥

साधु असाधु क्र्वतः - आपले बरे वाईट करणार्‍या - वा वादतः - किंवा निंदा स्तुति करणार्‍या लोकांस - गुणदोषाभ्यां वर्जितः - गुणदोषशून्य असल्यामुळे - समदृक् मुनिः - समदृष्टी ठेवणारा जीवन्मुक्त - न स्तुवीत न निन्देत् - स्तवीत नाही वा निंदितही नाही. ॥ १६ ॥

साधु असाधु वा - बरे अथवा वाईट - न कुर्यात्, न वदेत् न ध्यायेत् - काहीच करू नये, बोलू नये किंवा चिंतूही नये. - आत्मारमः मुनिः - आत्मस्वरूपात स्वस्थ असलेल्या जीवन्मुक्ताने - अनया वृत्त्या - निःसंगवृत्ति ठेऊन - जडवत् विचरेत् - निर्जीव वस्तूप्रमाणे वागावे. ॥ १७ ॥

शब्दब्रह्मणि निष्णातः - श्रुतिमध्ये पट्टीचा विद्वान होऊन पांडित्य संपादन केलेला पुरुष - परे ब्रह्मणि न निष्णायात् - जर परब्रह्माला सर्व पारखा राहिला तर - तस्य श्रमः श्रमफलः - त्याच्या श्रमाचे, कष्टाने मिळविलेल्या वेदान्तज्ञानाचे फल श्रमच असून ते - अधेनुं रक्षतः इव - भाकड गाईला दुधाकरिता बाळगणार्‍या पुरुषाच्या श्रमासारखे फुकट होत. ॥ १८ ॥

अंग - हे उद्धवा - दुग्धदोहां गां - जिचे सर्व दूध काढून झाले आहे अशी म्हातारी वा भाकड गाय - असतीं च भार्यां - किंवा दुर्वृत्त पत्‍नी - पराधीनं देह - अथवा परस्वाधीन झालेले शरीर - असत्प्रजां च - किंवा वाईट चालीची मुले - अतीर्थीकृतं तु वित्तं - पवित्र कार्यात खर्च केला नाही असे धन - मया हीनां वाचं - माझे स्मरण न करणारी वाणी - यः रक्षति - या सर्वांचे जो रक्षण करतो, म्हणजे ममत्व असते - सः दुःखदुःखी - तो उत्तरोत्तर दुःखीच होतो. ॥ १९ ॥

अंग - हे उद्धवा - अस्य स्थिति उद्‌भव प्राणनिरोधं - या दृश्य विश्वाची स्थिति उत्पत्ति व प्राणनिरोध म्हणजे संहार करणारे - मे पावनं कर्म - माझे पापमोचक कर्म - लीलावतारोप्सितजन्म वा - अथवा लीलेने घेतलेल्या अवतारांपैकी जगाला आवडणारे रामकृष्णादि जन्म - यस्यां न स्यात् - ज्या वाणीत नाहीत - तां वंध्यां गिरं - असली निष्पळ वाणी - धीरः न बिभृयात् - बुद्धिवंत सज्जनाने क्षणभर सुद्धा धारण करू नये. ॥ २० ॥

एवं आत्मनि नानात्वभ्रमं - याप्रमाणे आत्मस्वरूपात ननात्व म्हणजे भेद आनेह्त अशी भ्रांति - जिज्ञासया अपोह्य - ज्ञानाच्या लालसेने नाहीशी करून - सर्वगे मयि - सर्वगामी जो मी परमेश्वर, त्या माझ्यामध्ये - विरजं मनः अर्प्य - शुद्ध झालेले चित्त अर्पण करून - उपारमेत - ज्ञानी मुमुक्षुने निवृत्त व्हावे, म्हणजेच समाक कर्मांपासून अलिप्त रहावे. ॥ २१ ॥

ब्रह्मणि मनः निश्चलं धारयितुं - माझ्या म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी आपले मन निश्चलतेने ठेवण्यास - यदि अनीशः - जर समर्थ नसशील - पयि सर्वाणि कर्माणि - तर तुला जी काय कार्ये करावयाची असतील ती - निरपेक्षः समाचर - कसलीही अपेक्षा न ठेवतां सगळी माझ्याठायी अर्पण कर. ॥ २२ ॥

श्रद्धालुः - श्रद्धापूर्ण होऊन - सुभद्राः लोकपावनीः मे कथाः - सुमंगल व लोकांचा उद्धार करणार्‍या अशा माझ्या कथा - शृण्वन्, गायन्, अनुस्मरन् - ऐकत रहा, गात रहा, त्यांचे वारंवार स्मरण कर - कर्म जन्म च - माझी चरित्रे व माझे अवतार - मुहुः अभिनयन् - यांचे अभिनयद्वारा प्रदर्शन कर. ॥ २३ ॥

उद्धव - उद्धवा - मदर्थे धर्मकामार्थान् - माझ्यासाठी (परमेश्वरासाठी) धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांचे विहित कर्में - आचरन् - आचरणारा - मदपाश्रयः - मला शरण येऊन माझा आश्रय करणारा - सनातने मयि - नित्य असणारा जो मी अखंड परमेश्वर त्या माझ्या ठिकाणे - निश्चलां भकिं लभते - अव्यभिचारी, दृढ अशा भक्तीचा ठेवा संपादन करतो. ॥ २४ ॥

मयि सत्संगलब्धया भक्त्या - साधूंच्या संगतीने माझ्या ठिकाणी जडलेल्या भक्तीने - सः मां उपासिता - तो माझी एकनिष्ठ उपासना करतो - सद्‌भिः दर्शितं मे पदं - संतांनी दाखविलेले माझे पद, स्थान - सः अंजसा विन्दते वै - तो अत्यंत सुलभ रीतीने निःसंशय प्राप्त करून घेतो. ॥ २५ ॥

उत्तमश्लोक प्रभो - उत्तम कीर्ति असणर्‍या प्रभो ! - कीदृग्विधः साधूह् तव मतः - (उद्धव विचारतो) तुला कोणत्या प्रकारचा साधु मान्य आहे - सद्‌भिः आदृता - संतांनी आदरलेली - कीदृशी भक्तिः - कशाप्रकारची भक्तिची - त्वयि उपयुज्येत - तुझ्या ठिकाणी योजना करावी. ॥ २६ ॥

पुरुषाध्यक्ष लोकाध्यक्ष जगत्प्रभो - हे पुरुषोत्तमा, हे देवांच्या देवा, हे जगन्नियंत्या - प्रणताय - तुला अखंड नमस्कार करणार्‍या - अनुरक्ताय - तुझ्यवर अखंड प्रेम करणार्‍या - प्रपन्नाय च - आणि सर्वथा शरण आलेल्या - मे एतत् कथ्यतां - तुला मान्य साधु कोण व तुला मान्य भक्ति कशी हे सर्व मला सांग. ॥ २७ ॥

त्वं ब्रह्म - तू ब्रह्म आहेस - परमं व्योम - अत्यंत शुद्ध आकाशाप्रमाणे निर्लेप व सर्वव्यापी आहेस - प्रकृतेः परः पुरुषः - प्रकृतीच्या फार पलीकडे असून तिचा नियंता असणारा उत्तम पुरुष आहेस - भगवन् - हे भगवंता - स्वेच्छोपात्तपृथग्वपुः - स्वेच्छेने मात्र अथवा भक्तांच्या जगत्कल्याणकारी इच्छेने मात्र पृथक म्हणजे व्यक्तिरूप धारण करून, परिच्छिन्न होऊन - अवतीर्णः असि - तू अवतार धारण केला आहेस. ॥ २८ ॥

कृपालुः - कृपावंत - सर्वदेहिनां अकृतद्रोहः - कोणत्याही जीवाचा द्रोह न करणारा किंवा कोणीही ज्याचा द्वष करीत नाही असा - तितिक्षुः - सहनशील - सत्यसारः - सत्याचे मात्र सर्वथा ग्रहण करणारा - अनवद्यात्मा - शुद्ध चित्ताचा - समः - सर्वांस समतेने वागविणारा, समदृष्टि - सर्वोपकारकः - सर्वांवर यथोचित उपकार करणरा ॥ २९ ॥

कामैः अहतधीः - विषयवासनांमुळे ज्याची बुद्धि मलीन झाली नाही - दान्तः - इंद्रियांचा जेता - मृदुः शुचिः - मृदु आणि सदाचारी, अंतर्बाह्य शुद्ध असणारा - अकिंचनः - परिग्रह, संपत्ति, संसारपाश वगैरे नसणरा - अनीहः - निरीच्छ किंवा निष्कर्मी - मितभुक् - अल्पाहारी, मिळेल त्यांत संतुष्ट - शांतः - मनोजेता - स्थिर - अचंचल - मच्छरणः - मलाच शरण आलेला - मुनिः - माझे ध्यान करणारा ॥ ३० ॥

अप्रमतः - सावध, दक्ष - गभीरात्मा - गंभीर मनाचा - धृतिमान् - धैर्यशील व बुद्धिवंत - जितषड्गुणः - कामक्रोधादि विकार जिंकलेला - अमानी - निरभिमानी - मानदः - मान्यांस मान देणारा - कल्पः - दयाघन - मैत्रः - सर्वांचा मित्र - कारुणिकः - हृदयात करुणा असणारा - कविः - ज्ञानी ॥ ३१ ॥

मया अपि आदिष्टान् - मीच स्वतः सांगितलेले - एवं गुणान् दोषान् - अशा गुणदोषांनी व्याप्त असलेले - स्वकान् धर्मान् आज्ञाय - आपले वेदोक्त धर्म जाणून - सर्वान् सन्त्यज्य - आणि ते सर्व टाकून देऊन - यः मां भजेत - जो मझी भक्ति करतो - सः सत्तमः - तोच उत्तमोत्तम भक्त होय. ॥ ३२ ॥

यावान् यः यादृशः च अस्मि - मी परमेश्वर अमर्याद सर्वात्मक व सच्चिदानंदादिरूप आहे - तं मां ज्ञात्वा अथ अज्ञात्वा - त्या मला जाणून वा अजाणताही - ये अनन्यभावेन भजन्ति - जे अनन्य भावाने माझी आराधना करतात - ते मे भक्ततमाः मताः वै - ते माझे उत्तम भक्त होत हे प्रसिद्ध आहे. ॥ ३३ ॥

उद्धव - हे उद्धवा - मल्लिंग मद्‌भक्तजनदर्शन - माझ्या शालिग्रामादि प्रतिमा व माझे भक्त यांचे दर्शन - स्पर्शनार्चनं - त्यांना स्पर्श करणे व आलिंगन देणे व पूजादिसत्कार करणे - परिचर्या - सेवा करणे - स्तुतिः - स्तोत्रे म्हणणे - प्रह्वगुणकर्मानुकीर्तनं - नम्र भाव ठेऊन माझ्या व भक्तांच्या गुणांचे संकीर्तन करणे - ॥ ३४ ॥

मत्कथाश्रवने श्रद्धा - माझ्या कथा श्रद्धेने ऐकणे - मदनुध्यानं - माझ्या स्वरूपाचे ध्यान करणे - सर्वलाभोपहरणं - जे काय मिळेल ते मला समर्पण करणे - दास्येन आत्मनिवेदनं - दासवृत्तीने आपला आत्मा अर्पण करणे ॥ ३५ ॥

मज्जन्मकर्मकथनं - माझ्या जन्मांच्या व लीलांच्या कथा सांगणे - मम पर्वानुमोदनं - माझ्या जयंत्यादि उत्सवांस अनुमोदन देणे - गीतताण्डववादित्रगोष्ठीभिः - गायन, नर्तन, वादन, चर्च यांच्या साह्याने - मद्‌गृहोत्सवः - माझ्या देवळात उत्सव करणे - ॥ ३६ ॥

सर्ववार्षिकपर्वसु - सर्व वार्षिक पर्वकाळी - यात्रा - तीर्थयात्रा करणे - बलिविधानं च - गंधपुष्पादि व नैवेद्यादि अर्पिण्याचा विधि करणे - वैदिकी तांत्रिकी दीक्षा - वेदोक्त व तंत्रोक्त दीक्षा घेऊन तत्प्रणीत - मदीयव्रतधारणं - मत्संबंधी व्रते आचरणे. ॥ ३७ ॥

मम अर्चास्थापने श्रद्धा - माझी मूर्ति स्थापण्याचे कामी श्रद्धा - उद्यानोपवनाक्रीडपुरमन्दिरकर्मणि - देवालयाजवळ पुष्पवाटिका, फळाच्या बागा, विहाराच्या जागा, नगरे वसविणे, मंदिरे बंधणे या अनेक कार्यांत - स्वतः संहृत्य च उद्यमः - स्वतः तसेच सहकारी घेऊनही उद्योग करतात. ॥ ३८ ॥

संमार्जनोपलेपाभ्यां - झाडसारवणांनी - सेकमण्डलवर्तनैः - सडा घालून, स्वस्तिके काढून व सर्वत्र रांगोळ्या घालून - यत् मह्यं गृहशुश्रूषणं - जे माझ्या देवालयाच्या सेवेमध्ये - अमायया दासवत् - निष्कपटी दासाप्रमाणे राबतात. ॥ ३९ ॥

अमानित्वं अदंभित्वं - निरभिमान, दंभरहित - कृतस्य अपरिकीर्तनं - आपण केले त्याची वाच्यता न करता - मे निवेदितं - मला अर्पिलेल्या वस्तूंच्या - दीपावलोकं अपि - दिव्याच्या प्रकाशाचा सुद्धा - न उपयुञ्जात् - स्वकार्याकरिता उपयोग न करता - ॥ ४० ॥

यत् यत् लोके इष्टतमं - लोकव्यवहारात उत्तम मानलेले - यत् च आत्मनः अतिप्रियं - व जे स्वतःस अत्यंत आवडते - तत् तत् मह्यं निवेदयेत् - ते सर्व मला अर्पितात - तत् आनंत्यात कल्पते - ते अनंत फळाला प्राप्त होतात. ॥ ४१ ॥

भद्र - उद्धवा - सूर्यः अग्निः ब्राह्मणः - सूर्य अग्नि ब्राह्मण - गावः वैष्णवः - गाई विष्णुभक्त - खं मरुत् जलं भूः - आकाश वायु, जल, भूमि - आत्मा सर्वभूतानि - आत्मा व सकल भूते - मे पूजापदानि - माझी पूजा करण्याची स्थाने आहेत - ॥ ४२ ॥

अंग - उद्धवा - सूर्ये तु त्रय्या विद्यया - सूर्याचे ठिकाणी तीन्ही वेदांतील मंत्रांनी - अग्नौ हविषा - अग्नीमध्ये आहुतीच्या द्वारे - विप्राग्र्ये तु आतिथ्येन - श्रेष्ठ ब्राह्मणांचे आदरातिथ्य करून - गुषु यवसादिना - गाईस तृणाचा घास अथवा गोग्रास देऊन - मां यजेत - माझी पूजा करावी. ॥ ४३ ॥

वैष्णवे बंधुसत्कृत्या - हृदयाकाशाचे ठिकाणी एकनिष्ठ ध्यानाने - वायौ - वायूवर मुख्य प्राणदृष्टि करून - तोये तोयपुरस्कृतैः द्रव्यैः - जलामध्ये जलासहित तीळ तांदूळ समर्पून - स्थंडिले मंत्रहृदयैः भोगैः - भूमीवर केलेल्या स्थंडिलात रसस्यमंत्रपूर्वक भोगद्रव्य अर्पून - आत्मनि आत्मानं - स्वस्वरूपामध्ये स्वस्वरूप पाहून - सर्वभूतेषु समत्वेन - सर्वभूतावर समदृष्टि ठेऊन - मां क्षेत्रज्ञं जयेत - माझी क्षेत्रज्ञाची पूजा करावी. ॥ ४४-४५ ॥

इति एषु धिष्ण्येषु - अशा रीतीने या अकरा स्थानांचे ठिकाणी - संखचक्र गदांबुजैः युक्तं - शंक, चक्र, गदा, पद्म यांनी युक्त असलेले - चतुर्भुजं शांतं मद्‌रूपं ध्यायन् - चतुर्भुज, शांत अशा माझ्या स्वरूपाचे ध्यान करून - समाहितः अर्चेत् - समाधानवृत्तीने माझी पूजा करावी. ॥ ४६ ॥

इष्टापूर्तेन मां एवं - इष्टापूर्त इत्यादि साधनांनी माझे - यः समाहितः यजेत - जो समाधानवृत्तीने यज्ञरूपी आराधना करतो - मयि सद्‌भक्तिं लभते - माझ्या ठिकाणी सद्‌भक्ति प्राप्त करून घेतो. - साधुसेवया मत्स्मृतिः - साधूंची सेवा केली असता माझे स्मरण करतो. ॥ ४७ ॥

उद्धव - उद्धवा - प्रायेण सत्संगेन - बहुधा साधूंची संगती झाली असता - भक्तियोगेन विना - जो भक्तियोग साधतो त्याच्याशिवाय - सध्र्यक् उपायः न विद्यते - दुसरा योग्य उपाय नाही - हि - कारण - सतां अहं प्रायणं - साधूंची मी उत्कृष्ट आधार आहे. ॥ ४८ ॥

अथ - यानंतर - अतः यदुनंदन - म्हणून उद्धवा - एतत् परमं गुह्य श्रृणु - हे अति गुह्य ऐक - सुगोप्यं अपि वक्ष्यामि - हे रहस्य उघड करू नये असे आहे, तरी ते मी तुला सांगतो - त्वं मे भृत्यः सुहृत् सखा - तू माझा भक्त सूज्ञ असून मित्रही आहेस. ॥ ४९ ॥

अध्याय अकरावा समाप्त

GO TOP