|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय ६ वा - अन्वयार्थ
अवधूतोपाख्यान - पृथ्वी ते कबूतर या आठ गुरुंची कथा - महाभाग - हे श्रेष्ठ भाग्यवंता - मां - मला - यत् - जे - आत्थ - म्हणालास - तत् - ते - मे चिकीर्षितं एव - करण्याचा माझा संकल्पच झाला आहे - ब्रह्मा भव: लोकपाला: - ब्रह्मदेव, शंकर व इंद्रवरुणप्रभृति लोकपाल - मे - माझा - स्वर्वासं अभिकाङ्क्षिण: - यापुढे स्वर्गलोकीच वास असावा अशी इच्छा आतुरतेने करतात ॥७-१॥ अत्र - या भूलोकी - मया - मी या अवतारी - अशेषत: देवकार्यं निष्पादितं हि - देवांचे सर्व कार्य नि:शेषतेने पार पाडलेच आहे - यदर्थं - ज्या ह्या कार्यासाठीच - ब्रह्मणा अर्थित: - ब्रह्मदेवाने विनंती केल्यावरून - अहं - मी - अंशेन अवतीर्ण: - माझ्या पूर्ण स्वरूपाच्या अंशाने मात्र हा अवतार घेतला होता ॥७-२॥ कुलं - आमचे यादवकुलही - शापनिर्दग्धं वै - ब्राह्मणशापाने वस्तुत: जळून गेल्यासारखेच आहे - अन्योन्यविग्रहात् (च) - आणि परस्परांमधे भांडभांडून - नङ्क्ष्यति - नष्ट होऊन जाणार आहे - च - आणि - एतां पुरीं - ही नगरी - सप्तमे अह्नि - सातव्या दिवशी - समुद्र: प्लावयिष्यति - समुद्र बुडवून टाकील ॥७-३॥ साधो - हे साधुपुरुषा उद्धवा - यर्हि - जेव्हा - अयं लोक: - हा भूलोक - मया त्यक्त: - मी सोडून जाईन - एव अचिरात् - तेव्हा लागलीच - नष्टमङल: भविष्यति - त्याचे सौभग्य नष्ट होईल - कलिना अपि निराकृत: - कलियुगातील भांडणांनि हा लोक व्यापून जाईल ॥७-४॥ मया त्यक्ते महीतले - मी हा पृथ्वीलोक सोडून गेल्यावर - त्वया - त्वा - इह - येथे - न वस्तव्यं एव - मुळीच राहू नयेस - भद्र - हे महाभागा - कलौ युगे - कलियुगात - जन: - सर्व लोक - अधर्मरुचि: भविष्यति - अधार्मिक होतील ॥७-५॥ त्वं तु स्वजनबन्धुषु - तू तर आपल्या कुलबंधु बांधवांच्या संबंधाने - सर्वं स्नेहं - सर्व प्रकारचे प्रेम - परित्यज्य - टाकून देऊन - मयि - मी जो परमेश्वर त्याचे ठिकाणी - मन: सम्यक् आवेश्य - आपल्या मनाला उत्तमरीतीने एकनिष्ठ ठेऊन - आणि माझे स्वरूप मनामध्ये बिंबवून समदृक् - सर्वत्र समबुद्धि होत्साता - गां विचरस्व - पृथ्वीवर संचार करत रहा ॥७-६॥ मनसा वाचा - मनाने, वाणीने - चक्षुर्भ्यां श्रवणादिभि: च - दोन्ही डोळ्यांनी व कर्णांदि इंद्रियांनी - यत् इदं गृह्यमाणं - जे जे काही हे घेतले जाते, विषय म्हणून स्वीकृत होते - मायामनोमयं नश्वरं विद्धि - मायेच्या राज्यातील मनाने म्हणजे कल्पनेने उत्पन्न झालेले, कल्पनामय म्हणून नश्वर आहे असे जाण ॥७-७॥ अयुक्तस्य पुंस: - परमेश्वराचे ठिकाणी एकनिष्ठ नसणार्या पुरुषाला - नानार्थ: भ्रम: - भेद सर्वत्र आहे असा जो भ्रम असतो - स: गुणदोषभाक् - तो गुणदोषांनी युक्त असतो. - कर्माकर्मविकर्मेति - हे वेदोक्त कर्म, हे उक्त कर्माचे अनाचरण, हे निषिद्ध कर्म या प्रकारची - गुणदोष धिय: भिदा - गुणदोषयुक्त दृष्टी असणार्या पुरुषाला भेदबुद्धि असते ॥७-८॥ तस्मात् - म्हणून - युक्तेन्द्रियग्राम: युक्तचित्त: - आपला विषयग्राहक इंद्रियगण आणि आपले चित्त युक्त म्हणजे परमेश्वराचे ठिकाणी एकाग्र करून - इदं विततं जगत् - हे विस्तीर्ण असलेले दृश्य विश्व - आत्मनि ईक्षस्व - आपल्या आत्मस्वरूपात आहे असे पहा - आत्मानं मयि अधिश्वरे - आपला विश्वव्यापक आत्मा, मी जो सर्वप्रभु परमेश्वर श्रीकृष्ण त्यामधे आहे असे पहाण्यास शीक. ॥७-९॥ ज्ञानविज्ञानसंयुक्त: - शास्त्रजन्य ज्ञान व आत्मानुभवजन्य विज्ञान यांनी युक्त होत्साता - शरीरिणां आत्मभूत: - सर्व चराचर भूतांचा आत्मा मी आहे असे जाणून सिद्ध झालास म्हणजे - आत्मानुभवतुष्टात्मा - आत्मसाक्षात्काराने तुला उत्तम प्रकारचे समाधान होईल - अन्तरायै: न विहन्यसे - तुला कोणत्याही विघ्नांची घातकी बाधा होणार नाही ॥७-१०॥ यथा अर्भक: - ज्याप्रमाणे एखादे साधे मूल - उभयातीत: - गुणबुद्धि व दोषबुद्धि या उभय बुद्धींच्या पलीकडे असणारे - निषेधात् - निषिद्धाचरणापासून - दोषबुद्ध्या - दोषबुद्धीने - न निवर्तते - निवृत्त होत नाही - च - आणि - विहितं - शास्त्रोक्त आचरण - गुणबुद्ध्या - गुणांच्या बुद्धीने - न करोति - करीत नाही ॥७-११॥ सर्वभूतसुहृत् - सर्वांचे कल्याण इच्छिणारा मित्र - शान्त: - शांत - ज्ञानविज्ञाननिश्चय: - ज्ञानविज्ञानांमुळे नि:संदेह असणारा - मदात्मकं विश्वं पश्यन् - हे सर्व विश्व आत्मस्वरूप होय असे जाणत होत्साता - पुन: न विपद्येत वै - पुन: पुन: भवसागरात गटांगळ्या केव्हाही कोठेही खात नाही ॥७-१२॥ नृप - राजा - भगवता - श्रीकृष्ण भगवानाने - इति आदिष्ट: - याप्रमाणे उपदेश केल्यानंतर - तत्वजिज्ञासु: - मूळ तत्व समजून घेण्याची इच्छा करणारा - महाभगवत: उद्धव: - तो भागवतश्रेष्ठ उद्धव - प्रणिपत्य - वंदन करून - अच्युतं - श्रीकृष्णाला - आह - म्हणाला ॥७-१३॥ योगेश - योगेश्वरा - योगाविन्न्यास - योगरहस्याचे निधाना - योगात्मन् - योगाचे स्वरूप असणार्या - योगसम्भव - योगजनका - नि:श्रेयसाय - मला मोक्ष मिळावा म्हणून - संन्यासलक्षण: त्याग: - सर्वस्वत्याग हे ज्याचे स्वरूप आहे असा संन्यास नामक त्याग - मे प्रोक्त: - मला सांगितलास ॥७-१४॥ भूमन् - विश्वव्यापक श्रेष्ठ देवा - विषयात्मभि: - विषयभोगांच्या वासनांनी पूर्ण भरले आहे मन ज्यांचे अशांकडून - कामानां अयं त्याग: - वासनांचा सांगितलेला हा त्याग - दुष्कर: - अति कठिण आहे - सर्वात्मन् - सर्वांचे नियमन करणार्या देवा - त्वयि - तुझ्या ठिकाणी - अभक्तै: - भक्ति मुळीच नसणार्यांस - सुतरां - अधिकच कठिण - इति मे मति: - असे मला वाटते ॥७-१५॥ सानुबन्धे - पुत्रमित्रादि परिवारासह - त्वन्मायया विरचितात्मनि - तुझ्या भ्रामक मायेने घडविलेल्या मनाने - मम अहं इति मूढमति: - हे दृश्य माझे, हा देहच मी अशी ज्याची मूर्खपणाची बुद्धी आहे असा - स: अहं - तो हा मी - विगाध: - या मोहात गढून गेलो आहे - भगवन् - भगवंता - भवता निगदितं तत् - त्वा उपदेशिलेला तो मार्ग - यथा - ज्याप्रकारे - अहं तु - मी ही - अञ्जसा साधयामि - सहज आक्रमून पार पाडू शकेन - भृत्यं अनुशाधि - तुझ्या या सेवकाला सांग ॥७-१६॥ सत्यस्य स्वदृश: - सत्यस्वरूपी व स्वयंप्रकाश असणार्या - आत्मन: - ते आत्मस्वरूपी तुझ्याहून - ईश - हे सर्वप्रभो देवा - अन्यं आत्मन: वक्तारं - आत्मस्वरूपाचे व्याख्यान करणारा दुसरा कोणी आहे असे - विबुधेषु अपि - देवांमध्ये सुद्धा - न अनुचक्षे - मला दिसत नाही - तव मायया - तुझ्याच मायेने - इमे सर्वे - हे सर्व - ब्रह्मादय: - ब्रह्मदेव प्रभृति देव - विमोहितधिय: - ज्यांची बुद्धी भ्रांत झाली आहे असे - तनुभृत: - देहधारी आहेत - बहि: अर्थभावा: - आत्मबाह्यच पदार्थ वास्तविक आहेत असे मानणारे आहेत ॥७-१७॥ तस्मात् - म्हणून - उ - हे भगवान - वृजिनाभितप्त: - संकटांनी अत्यंत भाजलेला - निर्विण्णधी: अहं- सर्वथा निराश झाली आहे ज्याची बुद्धी असा मी - अनवद्यं - परम शुद्ध - अनन्तपारं - आदि अंत नसणारा - सर्वज्ञं - सर्व जाणणारा - ईश्वरं - सर्वप्रभु - अकुण्ठविकुण्ठधिष्ण्यं - कालादिकांस अलंघ्य अशा वैकुंठात रहाणारा - नरसखं - नराचा, नर ऋषीचा किंवा अर्जुनाचा सखा - नारायणं भवन्तं - नारायण जो तू त्याला - शरणं प्रपद्ये ह - मी शरण येतो ॥७-१८॥ लोके - या दृश्य विश्वात - लोकतत्वविचक्षणा: मनुजा: - दृश्यांचे तत्व काय आहे याचे परीक्षण करण्यात कुशल असलेले मानव - प्रायेण - बहुत करून - अशुभाऽऽशयात् - अमंगल विषयांच्या मलीन वासनादिकांपासून - आत्मना एव - आपल्या स्वत:च्याच प्रयत्नांनी - आत्मानं - आपल्या स्वत:ला - समुद्धरन्ति ह - खात्रीने चांगल्या प्रकारे उद्धरतात ॥७-१९॥ विशेषत: - विशेष करून - पुरुषस्य - मानवी जीवाचा - आत्मा एव - आत्मा हाच - आत्मन: गुरु: - स्वत:चा गुरु असतो - यत् - कारण - असौ - हा स्वयंगुरु - प्रत्यक्षानुमानाभ्यां - प्रत्यक्ष व अनुमान या दोन प्रमाणांनी - श्रेय: - कल्याणमार्ग - अनुविन्दते - प्राप्त करून घेतो ॥७-२०॥ पुरुषत्वे च - सामर्थ्यशील जी मानवयोनी, तीत जन्म असतो म्हणून - सांख्ययोगविशारदा: धीरा: - सांख्य व योगशास्त्रात निपुण असलेले बुद्धिमंत जीव - मां - मला - आविस्तरां - अत्यंत स्पष्टपणे - सर्वशक्त्युपबृंहितं - सर्व प्रकारच्या सामर्थ्याने युक्त व अलंकृत आहे असा - प्रपश्यन्ति - पहातात - एकद्वित्रिचतुष्पाद - एक, दोन, तीन, चार पाय असणारी - बहुपाद: - अनेक पाय असणारी - तथा - त्याप्रमाणे - अपद: - मुळीच पाय नसणारी - बह्व्य: पुर: - अनेक शरीरे - सृष्टा: सन्ति - निर्माण केली किंवा झाली आहेत - तासां - त्यापैकी - पौरुषी - पुरुषाचे, मानवाचे शरीर - मे प्रिया - मला प्रिय आहे ॥७-२१, २२॥ अत्र - या शरीरात - युक्ता: - एकनिष्ठ विद्वान - अग्राह्यं ईश्वरं मां - मी व माझे या ग्राह्य वस्तूंहून निराळा ईश्वर अशा मला - गृह्यमाणै: गुणै: हेतुभि: - ज्ञानाचा विषय होण्यास योग्य जे बुद्धिप्रभृति जीवाचे गुण त्यांच्या द्वारा - लिङ्गै: - बुद्ध्यादि चिन्हांच्या सहाय्याने - अनुमानत: - अनुमानाने - अद्धा - साक्षात - मार्गयन्ति - शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. ॥७-२३॥ अत्र अपि - ह्याच विषयसंबंधाने - इमं पुरातनं इतिहासं - हा पूर्वकालीन इतिहास - अमिततेजस: अवधूतस्य - ज्याचे तेजाचे मोजमाप करता येणार नाही त्या अवधूताचा - यदो: - यदुराजाचा - संवादं - संवाद - उदाहरन्ति - उदाहरणादाखल सांगत असतात. ॥७-२४॥ अकुतोभयं चरन्त: - ज्याला कोठेही भय नाही अशा रीतीने संचार करणारा - कविं - ज्ञानी - तरुणं - तरुण - अवधूतं कञ्चित् द्विजं - दिगंबर अशा एका द्विजाला - निरीक्ष्य - पाहून - धर्मविद् यदु: - स्वधर्मज्ञानी यदुराजा - प्रपच्छ - विचारता झाला॥७-२५॥ ब्रह्मन् - हे महाब्राह्मणा - अकर्तु: - नैष्कर्म्यसिद्ध अकर्त्याची - इयं - ही - सुविशारदा बुद्धि: - सुनिपुण बुद्धी - कुत: - तुज तरुणाला कोठून प्राप्त झाली - यां आसाद्य - जी ही विलक्षण बुद्धी संपादून - भवान् विद्वान् - तू ब्रह्मवेत्ता - बालवत् - अर्भकाप्रमाणे - लोकं - ह्या लोकी - चरति - संचार करतोस ॥७-२६॥ प्राय: - सामान्यत: - धर्मार्थकामेषु - धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांमधे - विवित्सायां च - आणि आत्मज्ञान करून घेण्याच्या इच्छेमधे - मानवा: - सर्व लोक - आयुष: - दीर्घायुष्याच्या - यशस: - कीर्तीचा - श्रिय: - संपत्तीचा - हेतुना एव - यापैकी कोणता तरी हेतु सकामत: धारण करूनच - समीहन्ते - प्रवृत्त होत असतात ॥७-२७॥ तु - परंतु - त्वं - तू - कल्प: - कर्म संकल्पिण्यास समर्थ - कवि: - विद्वान्, बुद्धिमंत - दक्ष: - दक्ष - सुभग: - दैववान्, सुंदर - अमृतभाषण: - अमृतासारखी मधुर वाणी असणारा - न कर्ता - काही करत नाहीस - न किञ्चित् ईहसे - कसलीही इच्छा करत नाहीस - जडोन्मत्तपिशाचवत् - जड किंवा उन्मत्त पिशाचाप्रमाणे वागतोस ॥७-२८॥ कामलोभद्वाग्निना - काम आणि लोभ हाच कोणी वणवा, त्याच्या तापाने - दह्यमानेषु जनेषु - पोळून गेलेल्या लोकात राहूनही - न तप्यसे - त्या अग्नीच्या ज्वाळांनी तू भाजत नाहीस - गङ्गाऽभस्थ: द्विप: इव - गंगा नदीत डुंबणार्या गजाप्रमाणे - अग्निना मुक्त: - त्या अग्नीपासून तू मुक्त झाला आहेस ॥७-२९॥ ब्रह्मन् - हे ब्रह्मवेत्त्या - स्पर्शविहीनस्य - विषय टाकून असणारा - केवलात्मन: - आत्मरूपात रहाणार्या - भवत: आत्मनि आनन्दकारणं - तुझे आत्मरूपामध्येच महानंद अनुभवण्याचे कारण - पृच्छतां न: - विचारणारे जे आम्ही त्यांस - त्वं हि ब्रूहि - तूच सांग ॥७-३०॥ सुमेधसा - महाबुद्धिमंत - ब्रह्मण्येन - ब्रह्माविषयी पूज्य बुद्धी असणार्या - यदुना - यदुराजाने - एवं पृष्ट: - असा प्रश्न केला असता - सभाजित: महाभाग: - उत्तमोत्तम सत्कार झाला ज्याचा तो महातेजस्वी अवधूत - प्रश्रयावनतं नृपं आह - पूज्यबुद्धीमुळे नम्रवृत्ती राजाला सांगता झाला ॥७-३१॥ राजन् - हे राजा - बुद्ध्युपाश्रित: - बुद्धिसहाय्याने मात्र आदरपूर्वक स्वीकृत केलेले - मे - माझे - बहव: गुरव: सन्ति - अनेक गुरु आहेत - यत: - ज्या ह्या गुरूंपासून - बुद्धिं उपादाय - अनेक धडे घेऊन - मुक्त: इव अटामि - बंधनरहित होत्साता सर्व पृथ्वीवर मी संचार करतो - तान् शृणु - ते माझे गुरु कोण ते ऐक ॥७-३२॥ पृथ्वी, वायु:, आकाश:, आप:, अग्नि:, चन्द्रमा:, रवि:, कपोत:, अजगर:, सिन्धु:, पतङ्ग:, मधुकृत्, गज:, मधुहा, हरिण:, मीन:, पिङ्गला, कुरर:, अर्भक:, कुमारी, शरकृत्, सर्प:, ऊर्णनाभि:, सुपेशकृत् - पृथ्वी, वायु, आकाश, जल, अग्नि, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मधहर्ता, हरिण, मासा, पिंगला नामक वेश्या, कुरर, बाल, कन्या, बाण करणारा, साप, कोळी, आणि सुपेशकार हे २४ गुरु होत ॥७-३३, ३४॥ राजन् - हे राजा - एते - हे - मे आश्रिता: - मी आश्रय घेतलेले - चतुर्विंशति: गुरव: - चोवीस गुरु आहेत - एतेषां वृत्तिभि: - यातील प्रत्येकाचे वर्तन पाहून त्यांच्या द्वारा - इह - ह्या लोकी - आत्मन: - मला उपयोगी पडणार्या - शिक्षा: - वर्तनाचे शिक्षण, धडे - अन्वशिक्षं - शिकलो ॥७-३५॥ नहुषात्मज - नहुष राजाचा पुत्र ययाति, त्याच्या पुत्रा - यत: - ज्यापासून - यत् - जे - वा - अथवा - यथा - जसे - अनुशिक्षामि - शिक्षण घेतले आहे - तत् - ते - तथा - तसेच - पुरुषव्याघ्र - वाघासारख्या शूर असणार्या राजा - ते - तुला - कथयामि - सांगतो - निबोध - ते नीट समजून घे ॥७-३६॥ दैववशानुगै: भूतै: - ईश्वरसृष्टीतील ज्ञात व अज्ञात कार्यकारणादि नियमास म्हणजे दैवास वश असणार्या चराचर भूतांकरवी - आक्रम्यमाण: अपि - पछाडला जाऊन पीडित झाला तरी - तद्विद्वान धीर: - हे जाणणारा बुद्धिवंत - मार्गात् - ठरलेल्या मार्गापासून - न चलेत् - भ्रष्ट होता कामाचे नाही - क्षिते व्रतं - हे पृथ्वीचे क्षमाव्रत - अन्वशिक्षं - शिकलो. ॥ ३७ ॥ यथा - ज्याप्रकारे - ज्ञानं - विवेकयुक्त ज्ञान - न नश्येत - नाहीसे होणार नाही - वाङ्मन: - वाणी व मन - न अवकीर्येत - कल्याणमार्ग सोडणार नाहीत - प्राणवृत्त्या एव - प्राणांचे संरक्षण मात्र होईल त्यापासूनच - मुनि: संतुष्येत् एव - मुनीने संतोष मानून घ्यावाच - न इंद्रियप्रियै: - इंद्रियास प्रिय करण्यासाठी विषयसेवन करू नये ॥७-३९॥ नानाधर्मेषु विषयेषु - सुखदु:खादि गुणधर्म असणार्या विषयांमध्ये - आविशन् योगी - संचार करणारा जो योगी त्याने - वायुवत् - वायुप्रमाणे - सर्वत: गुणदोषव्यपेतात्मा - सर्वथा गुणदोषांपासून अलिप्त राहून - न विषज्जेत - विषयांत आसक्त होऊ नये ॥७-४०॥ इह - पृथ्वीवर - पार्थिवेषु देहेषु - पार्थिव शरीरात - - प्रविष्त: - प्रवेश केलेला - तद्गुणाश्रय: - त्या त्या शारीर गुणांचा आश्रय असणारा - योगी - एकनिष्ठ ज्ञानयोगी - आत्मदृक् - आत्मद्रष्टा योगी - गुणै: न युज्यते - त्या त्या पार्थीव वस्तूंच्या गुणधर्मांनी लिप्त होत नाही - वायु: इव गन्धै: - सर्वगामी वायु पदार्थाच्या गंधानेही जसा लिप्त होत नाही ॥४१॥ अन्तर्हित: - प्रत्येक पदार्थात असून - च - आणि - स्थिरजङ्गमेषु - चराचर वस्तूंमधे - समन्वयेन ब्रह्मात्मभावेन - आत्मा हाच ब्रह्म आहे व तो सर्वत्र समन्वित आहे अशा भावनेने - व्याप्त्या (अपि) - आपण सर्वव्यापी असलो तरी - आत्मन: - आपला - असङ्गं - असंगपणा - अव्यवच्छेदं - आपला एकजिनसीपणा - विततस्य नभस्त्वं - सर्वगामी व सर्वव्यापी आकाशाप्रमाणे - मुनि: भावयेत् - निर्मळ आहेत असे मुनीने चिंताचे ॥७-४२॥ वायुना ईरितै: मेघाद्यै: - वायूने गती दिलेल्या मेघादिकांनी - नभ: - आकाश तद्वत् - त्याप्रमाणे - कालसृष्टै: - कालाने उत्पन्न केलेल्या - गुणै: - गुणांनी - तेजोऽबन्नमयै: भावै: - तेज, जल, अन्न यांनी पूर्ण असलेल्या शरीर घटक पदार्थांनी - पुमान् - आत्मा - न स्पृश्यते - स्पृष्ट होत नाही ॥७-४३॥ अपां - जलाच्या - ईक्षोपस्पर्शकीर्तनै: - दर्शन, स्पर्श आणि पठण या साधनांनी - प्रकृतित: - स्वभावत:च - स्वच्छ: स्निग्ध: माधुर्य: - निर्मळ, नितळ व गोड - तीर्थभू: - तीर्थाप्रमाणे पवित्र असणारा - मुनि: - एकनिष्ठ योगी - नृणां मित्र: - लोकांचा मित्र होत्साता - पुनाति - त्यास पवित्र करतो ॥७-४४॥ तेजस्वी तपसा दीप्त: - सतेज, प्रतापाने दैदीप्यमान - दुर्धर्षोदरभाजन: - सामान्यत: दुराराध्य असून उदर हेच भोजनपात्र करणारा - सर्वभक्ष: अपि - जे येईल ते खाणारा असला तरी - युक्तात्मा - नैष्ठिक म्हणजे व्रतस्थ मुनी - अग्निवत् - अग्नीप्रमाणेच - मलं न आदत्ते - मळाचा स्वीकार करत नाही ॥७-४५॥ क्वचित् छन्न: - केव्हा झाकलेला, अप्रकट - क्वचित् स्पष्ट: - केव्हा प्रगट असणारा - श्रेय: इच्छतां - कल्याणेच्छूंनी - उपास्य: - उपासिलेला जो अग्नि त्याप्रमाणेच - सर्वत्र भुङ्क्ते - सर्वदा सर्व ठिकाणी प्राप्त झालेले अन्न भक्षण करतो - दातॄणां प्रागुत्तराशुभं दहन् - अन्नदात्यांची भूतकालीन व भविष्यकालीन पापे दग्ध करतो ॥७-४६॥ एधसि प्रविष्ट: अग्नि: - इंधनामध्ये, लाकडामध्ये प्रविष्ट झालेला अग्नि - तत्तत्सरूप: ईयते - त्या त्या सर्पणाचा आकार घेतो - इव - त्याप्रमाणे - विभु: - सर्वेश्वर परमात्मा - सदसल्लक्षणं - सत् व असत् आहे स्वरूप ज्याचे असे - स्वमायया सृष्टं इदम् - आपल्याच मायेने उत्पन्न झालेले हे दृश्य विश्व त्यात प्रवेश करून तत्स्वरूप धारण करतो. ॥७-४७॥ अव्यक्तवर्त्मना कालेन - ज्याचा ओघ स्पष्ट नाही अशा कालाने उत्पन्न होणारे - विसर्गाद्या: स्मशानान्ता: भावा: - जन्मादिपासून तो श्मशानात जाईपर्यंतच्या सर्व अवस्था - देहस्य - देहाच्याच असतात - न आत्मन: - आत्म्याला जन्ममरणादि अवस्था नाहीत - चंद्रस्य कलानां इव - चंद्रकला कमी जास्त होतात त्याप्रमाणे ॥७-४८॥ ओघवेगेन कालेन - नदीप्रवाहाप्रमाणे सदैव वाहत असणार्या कालसामर्थ्याने - आत्मन: भूतानां - जीवांच्या देहांचे - प्रभवाऽप्ययौ - वृद्धि व क्षय हे भाव - नित्यौ अपि - दरक्षणी चाललेले असतात तरी - न दृश्यते हि - दृष्टीला गोचर होतच नाहीत - यथा - जसे अग्ने: अर्चिषां अग्नीच्या ज्वालांचे ॥७-४९॥ योगी - योगयुक्त पुरुष - गुणै: गुणान् उपादत्ते - इंद्रियद्वारा गुणांचा म्हणजे विषयांचा स्वीकार करतो - यथाकालं विमुञ्चति - यथाकाळी त्यांचा त्याग करतो - तेषु न युज्यते - त्या त्या विषयात आसक्त होत नाही - गोभि: गा: - आपल्या गो म्हणजे किरण त्यांनी जले - गोपति: इव - आकर्षण करणारा सूर्य जलाशी संसक्त होत नाही त्याप्रमाणे ॥७-५०॥ च - आणि - आत्मा - जीवात्मा व प्रत्यगात्मा - स्वे अवस्थित: - स्वरूपात असतांना - भेदेन न बुध्यते - भिन्न आहे. वेगळा आहे असा ज्ञात होत नाही - तद्गत: व्यक्तिस्थ: - उपाधीमध्ये शिरून व्यक्तीमध्ये भिन्न भिन्न दिसणारा साहंकार जीव - स्थूलमतिभि: लक्ष्यते - मंदमति जीवास निरनिराळासा प्रामाणिकपणे वाटते - अर्कवत् - जलप्रवाहात सूर्य प्रतिबिंबरूपाने निरनिराळा दिसतो त्याप्रमाणे ॥७-५१॥ क्व अपि - कोठेही - केनचित् - कोणाशी सुद्धा - अतिस्नेह: - अतिरिक्त स्नेह - वा - अथवा - प्रसंग: - जास्त समागम - न कर्तव्य: - करू नये - कुर्वन् - फाजील प्रेम व समागम करणारा - दीनधी: - मंदगती पुरुष - कपोत: इव कपोताप्रमाणे सन्तापं विन्देत - त्रास मात्र प्राप्त करून घेतो ॥७-५२॥ अरण्ये - अरण्यातील - वनस्पतौ - एका वृक्षावर - कृतनीड: कश्चित् कपोत: - आपले घरटे बांधले आहे असा कोणी एक कपोत - कपोत्या भार्यया सार्द्धं - आपली भार्या कपोती हिच्यासह - कतिचित् समा: - कित्येक वर्षे - उवास - राहिला होता ॥७-५३॥ स्नेहगुणितहृदयौ - प्रेमाच्या रज्जूंनी ज्यांची हृदये घट्ट बांधली गेली आहेत असे ते - गृहधर्मिणौ कपोतौ - गृहस्थाश्रमी कपोत जोडपे - दृष्टिं दृष्ट्या - एकमेकांच्या दृष्टीने - अङ्गं अङ्गेन - अंगावयवांनी - बुद्धिं बुद्ध्या - अंत:करणाने अंत:करण - बबन्धतु: - याप्रमाणे परस्परांस बांधते झाले ॥७-५४॥ शय्याऽऽसनाऽटनस्थानवार्ताक्रीडाशनादिकं - निजणे, बसणे, फिरणे, रहाणे, आलाप, खेळणे, खाणे इत्यादी सर्व व्यवहार - मिथुनीभूय - दोघे एकत्र राहूनच करीत - वनराजिषु - आणि वनांच्या रायांमध्ये - विस्रब्धौ - नि:शंक - चेरतु: - संचार करीत ॥७-५५॥ राजन् - यदुराजा - तर्पयन्ती - शृंगारचेष्टांनी -------- - अनुकंपिता: - प्रेमपूर्ण दयेने वागवलेली - सा - ती कपोती - यं यं वाञ्छति - ज्या ज्या पदार्थाची इच्छा करी - तं तं कामं - तो तो इष्ट पदार्थ - कृच्छ्रेण अपि - कितीही श्रम पडले तरी - अजितेन्द्रिय: समनयत् - तो आत्मसंयमी कपोत संपादन करून तिला देई ॥७-५६॥ काले आगते - योग्य समय आला तेव्हा - प्रथमं - पहिल्यांदाच - गर्भं गृह्णती - गर्भ धरण करणारी - कपोती स्वपत्यु: सन्निधौ सती - आपल्या नवर्या जवळ असणारी कपोती - नीडे - घरट्यात - अण्डानि सुषुवे - अंडी घालती झाली ॥५७॥ दुर्विभाव्याभि: - अतर्क्य अशा - हरे: शक्तिभि: - परमेश्वराच्या शक्तिसामर्थ्याने - तेषु - त्या अंड्यांमध्ये - कोमलाङ्गतनूरूहा: - कोमल अंगे व पंख आहेत ज्यांचे असे - रचिताऽवयवा: - सर्वांगपरिपूर्ण असे बाल पक्षी - काले - योग्य वेळ येताच - व्यजायन्त - जन्मास आले ॥७-५८॥ तासां कूजितं शृण्वन्तौ - त्या बालकांचे मधुर कूजन ऐकणार्या - कलभाषितै: निर्वृतौ - त्यांच्या मधुर अस्पष्ट शब्दांनी आनंदलेल्या - प्रीतौ - समाधान झालेल्या - पुत्रवत्सलौ दम्पती - त्या पुत्रप्रेमी जोडप्याने - प्रजा: पुपुषतु: - आपल्या मुलांचे लालनपोषण केले ॥७-५९॥ तासां अदीनानां - त्या सौभाग्यशाली व आनंदी बालकांचे - सुस्पर्शै: पतत्रै: - मऊ मऊ पंख - मुग्धचेष्टितै: कूजितै: - लाडकेपणाच्या लीला व किलबिलस्वरूपी आलाप - प्रत्युद्गमै: - हळू हळू येणे जाणे इत्यादि चेष्टांनी - पितरौ - ती दोघे आईबापे - मुदं आपतु: - हर्षभरित झाली ॥७-६०॥ विष्णुमायया विमोहितौ - हरिमायेने मोहित झाल्यामुळे - दीनधियौ - मंदबुद्धि - अन्योन्यं - एकमेकांशी - स्नेहानुबद्धहृदयौ - प्रेमाने बद्ध झालेली ती कपोत-कपोती - प्रजा: शिशून् - आपली लह्न बालके - पुपुषतु: - धारण पोषणाने पाळीत होती ॥७-६१॥ एकदा - एक दिवस - तौ कुटुम्बिनौ - ते नरमादीचे जोडपे - तासां अर्थिनौ - त्या पिल्लांना भक्ष्य आणण्यास - जग्मतु: - बाहेर गेले - तस्मिन् कानने - त्या अरण्यात - अर्थिनौ - भक्ष्य संपादणारे जोडपे - चिरं - पुष्कळ काळपर्यंत - परित: चेरतु: - खाद्य मिळावे म्हणून इकडे तिकडे भटकत राहिले ॥७-६२॥ कश्चित् वनेचर: लुब्धक: - कोणी वनचर पारधी - यदृच्छात: तान् - त्या पिल्लांना यदृच्छेने - स्वालयाऽन्तिके चरत: दृष्ट्वा - आपल्या घरट्याजवळ बागडतांना पाहून - जालं आतत्य - जाळे पसरता झाला - जगृहे - त्यांना त्याने पकडले ॥७-६३॥ प्रजापोषे सदा उत्सुकौ - आपल्या मुलांचे पोषण करण्याच्या कामी नेहेमी तत्पर असणारे - गतौ - बाहेर गेलेले - कपोत: कपोती च - ते कपोताचे जोडपे - पोषणं आदाय - भक्ष्य घेऊन - स्वनीडं उपजग्मतु: - आपल्या घरट्याजवळ प्राप्त झाले ॥७-६४॥ स्वात्मजान् बालकान् जालसंवृतान् क्रोशत: वीक्ष्य - आपल्या पोटची बालके जाळ्यात अडकलेली असून ती ओरडत आहेत असे पाहून - भृशं दु:खिता क्रोशन्ती - दु:खाने विलाप करणारी - कपोती - ती कपोती - तान् अभ्यधावत् - त्या बालकांकडे तडक धावून गेली ॥७-६५॥ अजमायया - हरीच्या मायेने - असकृत्स्नेहगुणिता दीनचित्ता सा - नित्य वाढत जाणार्या प्रेमाने मूढ झालेली ती कपोती - शिचा बद्धान् पश्यन्ती अपस्मृति: - जाळ्यात अडकून गेलेल्या बालकांना पाहूनच घाबरल्यामुळे चांगले वाईट विसरली - स्वयं च अबद्ध्यत - आणि स्वत: जाळ्यात पडून स्वत:स बांधून घेतले ॥७-६६॥ च - आणि - आत्मन: अपि अधिकान् प्रियान् आत्मजान् - आपल्या स्वत:च्या प्राणांहूनही प्रिय असणारी जी लाडकी बालके ती - आत्मसमां भार्यां - आपल्या बरोबरीची गृहधर्मचारिणी - बद्धान् - बद्ध झाली - कपोत: अतिदु:खित: दीन: - कपोत अतिशय दु:खी दीन अनाथ झाला - च - आणि - विललाप - शोक करू लागला. ॥७-६७॥ अल्पपुण्यस्य दुर्मते: मे - फारच थोडे पुण्य गाठी असणारा दुष्टबुद्धि जो मी त्या माझे - अपायं अहो पश्यत - दुर्दैवाने ओढवलेले संकट पहा हो - अतृप्तस्य, अकृतार्थस्य - माझ्या वासना पूर्ण नाही हो झाल्या - (मे) त्रैवर्गिक: गृह: हत: - आणि इतक्यात धर्म, अर्थ व काम साधून देणार्या माझ्या गृहस्थाश्रमाचा नाश झाला हो ॥७-६८॥ यस्य मे - ज्या माझी - अनुकूला, अनुरूपा व पतिदेवता (भार्या) - माझ्या मर्जीने वागणारी, मलाच योग्य असणारी आणि पति हेच मुख्य दैवत असे मानणारी माझी ही भार्या - शून्ये गृहे मां सन्त्यज्य - शून्य घरात मला टाकून देऊन - साधुभि: पुत्रै: - आनंद देणार्या सात्विक पुत्रांसह - स्व: याति - स्वर्गाला चालली आहे ॥७-६९॥ स: अहं - तो मी - मृतदार: मृतप्रज: दीन: - ज्याची प्रिय पत्नी व लाडकी बालके गेल्यामुळे दीन झालो आहे असा - शून्ये गृहे किमर्थं जिजीविषे - गृहिणीशून्य व बालकशून्य घरात राहून जगण्याची इच्छा कशाला धरू - वा विधुर: दु:खजीवित: - किंवा जगलो तर विधुर दशेत सगळा जन्म दु:खात काढू ॥७-७०॥ शिग्भि: तथा एव आवृतान् - जाळ्याने पूर्वीप्रमाणेच वेष्टिल्यामुळे पकडली गेलेली - मृत्युग्रस्तान् - मृत्युमुखी पडलेली - विचेष्टत: - तरीही धडपड करणारी - तान् - ती मुले व पत्नी यास - पश्यन् अपि - पाहून सुद्धा - कृपण: अबुध: - दीन झाल्यामुळे विवेकभ्रष्ट झालेला कपोत - स्वयं च शिक्षु अपतत् - आपल्या स्वत:लाही त्या जाळ्यामध्ये अडकवून घेता झाला ॥७-७१॥ गृहमेधिनं तं कपोतं - त्या गृहस्थाश्रमी कपोताला - कपोतीं कपोतकान् च - तसेच कपोती व कपोतबालके यांना - लब्ध्वा - संपादन करून, पकडून - सिद्धार्थ: क्रूर: लुब्धक: - पुष्कळ पारध मिळाल्यामुळे कृतकार्य झालेला तो निर्दय पारधी - गृहं प्रययौ - स्वगृही चालता झाला ॥७-७२॥ एवं - याचप्रमाणे - द्वन्द्वराम: अशान्तात्मा कृपण: - सुखदु:खात गढल्यामुळे समाधान व उदार बुद्धी नसणारा - कुटुम्बी - गृहस्थ - कुटुम्बं पुष्णन् - कुटुंबाचे, बायकामुलांचे धारण पोषण करीत असतांनाच - पतत्रिवत् - त्या कपोतांप्रमाणे सानुबन्ध: अवसीदति - सर्व कुटुंबासह नाश पावतो ॥७-७३॥ मानुषं लोकं प्राप्य - मनुष्ययोनीमधे जन्म प्राप्त होणे म्हणजे - मुक्तिद्वारं अपावृतं - मुक्तीचा दरवाजाच उघडला, असे होणे होय - य: - जो मनुष्य - खगवत् गृहेषु सक्त: - त्या कपोताप्रमाणेच गृहकार्यांतच गुंग होऊन रहातो - तं - त्याला - आरूढच्युतं विदु: - तो मोक्षाच्या दारापर्यंत पोहोचून तेथून खाली पडतो म्हणून आरूढच्युत म्हणतात. ॥७-७४॥ सातवा अध्याय समाप्त |