|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय ३ रा - अन्वयार्थ
माया, माया ओलांडण्याचे उपाय, ब्रह्म आणि कर्मयोगाचे निरूपण - भगवंत - हे ज्ञानिश्रेष्ठहो ! - परस्य ईशस्य विष्णोः - सर्वांचे कारण व सर्वांतर्यामी अशा श्रीविष्णूची - मायिनाम् अपि - मायावी अशा ब्रह्मदेवादिकांनाहि - मोहिनीं मायां - मोहित करणारी माया - वेदितुं इच्छामि - जाणण्याची इच्छा करतो - नः ब्रुवन्तु - आम्हाला ती सांगावी - संसारतापनिरस्तप्तः - संसारसंबंधी तापांनी अत्यंत तप्त झालेला - मर्त्यः - मरणधर्मी असा - तत्तापभेषजम् - त्या संसारसंबंधी तापांचे औषध असे - हरिकथामृतम् - हरिकथामृतरूप - युष्मद्वचः जुषन् - आपले भाषण सेवन करणारा - न अनुतृप्ये - तृप्त होत नाही. ॥ १-२ ॥ महाभुज - हे आजानुबाहो ! - स्वमात्रात्मप्रसिद्धये - आपली उपासना करणार्या जीवांना उत्तम सिद्धि प्राप्त व्हावी याकरिता - भूतात्मा - सर्वांचा कारणभूत असा - आद्यः - आदिपुरुष - एभिः महाभूतैः - पंचमहाभूतांच्या योगे - उच्चावचानि भूतानि ससर्ज - लहानमोठी शरीरे उत्पन्न करता झाला. ॥ ३ ॥ एवं पंचधातुभिः - याप्रकारे पंचमहाभूतांच्या योगे - सृष्टानि भूतानि - उत्पन्न केलेल्या भूतांत - प्रविष्टः - अंतर्यामी रूपाने प्रविष्ठ झालेला भगवान् - आत्मानं - आपल्याला - एकधा दशधा - एक व दहा प्रकारे - विभजन् सन् - विभागणारा होऊन् - गुणान् जुषते - विषयांचे सेवन करतो. ॥ ४ ॥ सः प्रभुः - तो जीव - आत्मप्रद्योतितैः - अंतर्यामी आत्म्याने प्रकाशित केलेल्या - गुणांनी गुणान् भूजानः - इंद्रियांनी विषयांना भोगणारा - इदं सृष्टः - उत्पन्न झालेल्या या शरीराला - आत्मानं मन्यमानः - आत्मा मानणारा - इह सज्जते - शरीरादिकांचे ठिकाणी आसक्त होतो. ॥ ५ ॥ कर्मभिः समिनित्तानि कर्माणि कुर्वन् - कर्मेंद्रियांनी वासनायुक्त कर्मे करणारा, - तत्त कर्मफलं सुखेतरं गृह्णन् - त्या त्या कर्माचे सुखदुःखात्मक फल ग्रहण करणारा, - अयं देहभृत् - हा देहधारी जीव - इह भ्रमति - या जन्ममरणरूप संसारात भ्रमण पावतो. ॥ ६ ॥ इत्थं बव्ह अभद्रवहाः - अकलाण व ताप देणार्या - कर्मगतीः गच्छन् - कर्ममूलक योनीस जाणारा - पुमान् अवशः - जीव परतंत्र, कर्माच्या अधीन झालेला - आभूतसंप्लवात् - भूतांचा, जगाचा प्रलय होईपर्यंत - सर्गप्रलयौ अश्नुते - जन्ममृत्यूचे सेवन करतो. ॥ ७ ॥ धातूपप्लवे आसन्ने सति - पंचमहाभूतांच्या नाशाचे कारण प्राप्त झाले असतां - अनादिनिधनः कालः द्रव्यगुणात्मकं - ज्याला आदि व अंत नाहीत असा काल स्थूल-सूक्ष्मभूतात्मक - व्यक्तं अव्यक्ताय - कार्यरूप जगाला अव्यक्त अशा ईश्वररूपामध्ये घेऊन जाण्याकरता - अपकर्षति हि - आकर्षित करतोच. ॥ ८ ॥ भुवि शतवर्षा - या पृथ्वीवर शंभर वर्षे - अत्युल्बणा हि - अगदी महाभयंकर - अनावृष्टिः भविष्यति - आवर्षण होईल - तत्कालोपचितोष्णार्क - जांची उष्णता तत्काळ वाढली आहे असा सूर्य - त्रीन् लोकान् प्रतपिष्यति - स्वर्ग, मृत्यु व पाताळ या तिन्ही लोकांना तापवील. ॥ ९ ॥ पातालतलं आरभ्य - पाताळापासून आरंभ करून - जगत् दहन् सन् - जगाला जाळीत - वायुना ईरितः ऊर्ध्वशिखः - वायूच्या प्रेरणेने ज्याच्या ज्वाला वर जातात त्याप्रमाणे - संकर्षणमुखानलः विष्वक् वर्धते - शेषाच्या मुखातील अग्नि चोहोकडे पसरतो. ॥ १० ॥ सांवर्तकः मेघगणः - प्रलय करणारा मेघांचा समुदाय - हस्तिहस्ताभिः धाराभिः - हत्तीच्या सोंडांसारख्या प्रचंड धारांनी - शतं समाः - शंभर वर्षे - वर्षति स्म - वृष्टि करतो. - विराट् सलीले लीयते - ब्रह्मांड त्या पाण्यात लीन होते. ॥ ११ ॥ नृप ! - हे राजा ! - ततः वैराजः पुरुष - त्यानंतर ब्रह्मांडशरीरी विराट पुरुष - विराजं उत्सृज्य - आपल्या ब्रह्मांडरूप शरीराला सोडून - निरिंधनः अग्नि इव - ज्यात काष्टे नाहीत अशा अग्निप्रमाणे - सूक्ष्मं अव्यक्तं विशते - कोणत्याही प्रकारे व्यक्त म्हणजे प्रकट न होणार्या सूक्षब्रह्मांत प्रविष्ट होतो. ॥ १२ ॥ वायूना हृतगंधा भूः - वायूने जिचा मुख्य गुण गंध आहे तोच हरण केला आहे ती पृथ्वी - सलिलत्वाय कल्पते - उदकरूपास पावते. - तद् हृतरसं सलिलं - त्या वायूनेच ज्याचा रस हा गुण आहे असे ते जल - ज्योतिष्ट्वाय उपकल्पते - तेजोरूपास प्राप्त होते. ॥ १३ ॥ ज्योतिः तु प्रलयकालीनेन तमसा - तेज तर प्रलयकाळच्या तमाने - हृतरूपं सत् - ज्योतीच्या रूप या गुणाचे हरण करून ते - वायौ प्रलीयते - वायूच्या ठिकाणी लीन होते. - वायुः अवकाशेन - आकाशाने वायूचा - हृतस्पर्शः नभसि लीयते - स्पर्श हा गुण हरण केला आणि तो आकाशात लीन झाला. ॥ १४ ॥ नभः कालात्मना - कालात्मा परमेश्वराने आकाशाचा - हृतगुणं आत्मनि लीयते - हरीचा शब्द गुण हरण करीत तो तामस अहंकारामध्ये लीन झाला. - नृप ! - हे राजा ! - इंद्रियाणि बुद्धिः च - इंद्रिये आणि बुद्धिः - राजसं अहंकारं प्रविशति हि - राजस अहंकाराप्रत प्रविष्ठ होतातच - वैकारिकैः सह मनः - इंद्रियांच्या देवतांसह मन - अहं स्वगुणैः सह - अहंकार आपल्या कार्यभूत सत्त्वादि गुणांसह - आत्मनि लीयते - महत्तत्त्वामध्ये लीन होते. ॥ १५ ॥ सर्गस्थित्यंतकारिणी - उत्पत्ति-स्थिति-लय करणारी - भगवतः - भगवंताची - एषा त्रिवर्णा माया - ही त्रिगुणात्मिका माया - अस्माभिः वर्णिता - आम्ही सांगितली. - भूयः किं श्रोतुं इच्छसि - आता आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे. ॥ १६ ॥ महर्षे ! - हे महामुने ! - अकृतात्मभिः - ज्याचे अंतकरण स्वाधीन झालेले नाही अशा पुरुषांना - एतां दुस्तरां - तरून जाण्यास कठीण अशा या - ऐश्वरीं मायां - ईशरी मायेला - स्थूलधियः - ज्यांची स्थूल, म्हणजे शरीराच्या ठिकाणी धी म्हणजे अहंबुद्धी आहे अशांना - यथा अंजः तरंति - ज्यायोगे सहज तरून जातील - इदं उच्यताम् - ते सांगावे. ॥ १७ ॥ दुःखहत्यै सुखाय च - दुःखाच्या नाशाकरिता व सुखाच्या प्राप्तीकरिता - कर्माणि आरंभमाणानां - कर्मे वा उद्योग आरंभणार्या - मिथुनीचरणां नृणां च - व दांपत्य जीवन अनुसरणार्या मनुष्यांना - पाकविपर्यासं पश्येत् - फलाचा विपर्यास म्हणजे विचारांच्या उलट फलप्राप्ती होते ती पहावी. ॥ १८ ॥ नित्यार्दितेन दुर्लभेन - निरंतर दुःखच देणार्या व मिळण्यास कठीण अशा - आत्ममृत्युना - आपल्या मृत्युरूप - वित्तेन साधितैः - द्रव्याने मिळविलेल्या - चलैः गृहापत्याप्तपशुभिः - चंचल अशा गृह, अपत्य, आप्त, पशु यांत - का प्रीतिः - काय सुख आहे बरे ! ॥ १९ ॥ एवं - याप्रमाणे - यथा मंडलवर्तिनां - जसे मांडलिक राजांमध्ये - सतुल्यातिशयध्वंसं - ज्यांत तुल्य अशा सुखसंपत्तिवंतांशी स्पर्धा असल्यामुळे त्यापासून होणार्या दुःखदायक - कर्मनिमित्तम् - कर्मांनी संपादिलेला - परं लोकं - स्वर्गादि परलोक देखील - नश्वरं विंद्यात् - विनाशी जाणावा. ॥ २० ॥ तस्मात् - म्हणून - उत्तमं श्रेयः - सर्वोत्कृष्ट कल्याण - जिज्ञासुः - जाणण्याची इच्छा करणारा पुरुष - शाब्दे - वेदाख्य - परे च - व साक्षात्काररूप - ब्रह्मणि निष्णाते - ब्रह्मामध्ये निष्णात म्हणजे परिपूर्ण - उपशमाश्रयं च - परम शांतीचे घरच अशा - गुरुं प्रपद्येत - सद्गुरूला शरण जावो. ॥ २१ ॥ तत्र गुर्वात्मदैवतः सन् - तेथे ज्याचा आत्मा व दैवत गुरुच आहे असे होऊन - अमायया अनुवृत्त्या - निष्कपट अशा सेवेने - भागवतान् धर्मान् शिक्षेत् - भगवंतांनी स्वमुखाने सांगितलेले आत्मप्राप्तीचे उपाय असे धर्म शिको. - यैः आत्मा - ज्यांचे योगे आत्मरूप असा - आत्मदः च हरिः तुष्येत् - व भक्तांना आत्मस्वरूप देणारा असा हरि संतुष्ट होतो. ॥ २२ ॥ आदौ - सर्वप्रथम - सर्वतः - सर्व म्हणजे स्त्री, पुत्र, धन, देह इत्यादिचे ठिकाणी - मनसः असंगं - मनाची अनासक्ति (वैराग्य) - साधुषु संगं च - व साधूंचा सहवास - भूतेषु च - आणि सर्व भूतांचे ठिकाणी - यथोचितम् - ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार - दयां मैत्रीं प्रश्रयं अद्धा - दया, मैत्री, नम्रता असावी. ॥ २३ ॥ शौचं तपः तितिक्षां च - व प्रत्यक्ष अंतर्बाह्य पवित्रता, स्वधर्माचरण व क्षमा - मौनं स्वाध्यायं आर्जवम् - व्यर्थ भाषण न करणे, वेदाध्ययन व मनाचा सरळपणा - ब्रह्मचर्यं अहिंसांच - ब्रह्मचर्य व कोणचाही द्वेष न करणे - समत्वं द्वंद्वसंज्ञयोः - लाभ-हानि, सुख-दुःख इत्यादि द्वंद्व संज्ञा असलेल्यांचे ठिकाणी समत्वबुद्धी असणे ॥ २४ ॥ सर्वत्र आत्मेश्वरान्वीक्षां - सर्वत्र सत्य-ज्ञानरूपाने आत्मा व नियामक रूपाने ईश्वर भरून राहिला आहे असे पाहणे - कैवल्यं - एकांतवास - अनिकेततां - गृहधनादिकांचे ठिकाणी अभिमान त्याग - विविक्तचीरवसनं - यथा तथा वस्त्र किंवा वल्कले परिधान करणे - येनकेनचित् संतोषः - कशानेही संतोष असणे - ॥ २५ ॥ भागवते शास्त्रे श्रद्धां - भगवत्प्रतिपादक शास्त्राविषयी विश्वास - अन्यत्र च अपि अनिंदांहि - आणि इतर शात्रांविषयी सुद्धा अगदी अनिंदा - मनोवाक् कर्मदंडं च - आणि मन, वाणी व कर्म यांचे नियमन - सत्यं शमदमौ अपि - सत्य, मनोनिग्रह व इंद्रियांचा निग्रह करणे - ॥ २६ ॥ हरेः अद्भुतकर्मणः - ज्याची कर्में विलक्षण आहेत अशा श्रीहरीच्या - जन्मकर्मगुणानां - अवतारातील, चरित्रांचे व गुणांचे - श्रवणं कीर्तनं ध्यानं - श्रवण, कीर्तन, ध्यान-चिंतन - तदर्थे च - आणि त्याच्या म्हणजे भगवम्तांच्या प्रीत्यर्थच - अखिलचेष्टितम् - सर्व कर्मांचे आचरण भगवंतासाथीच करणे ॥ २७ ॥ इष्टं दत्तं तपः जप्तं - यज्ञादिक वैदिक कर्मे, दानादिक स्मार्त कर्मे, तपश्चर्या, जप, - वृत्तं यत् च - सदाचरण आणि जे - आत्मनः प्रियं - आपणाला प्रिय अशा - दारान् सुतान् गृहान् - स्त्री, पुत्र घर इत्यादि - प्राणान् परस्मै यत् निवेदनम् - प्राण व परमेश्वराला प्रिय अशी सेवा समर्पण करणे - ॥ २८ ॥ एवं कृष्णात्मनाथेषु - कृष्ण हाच ज्यांचा आत्मा, स्वामी अशा - मनुष्येषु - मनुष्यांचे ठिकाणी - सौहृदं कर्तुं च - स्नेह करण्याला आणि - उभयत्र च विशेषतः नृषु - स्थावर जंगम प्राण्यांचे, त्यांत विशेषतः मनुष्यांचे ठिकाणी - तत्रापि साधुषु - त्यांतही स्वधर्मांचे ठिकाणी - ततोऽपि महत्सु - त्यापेक्षाही भगवद्भक्तांचे ठिकाणी - परिचर्यां कर्तुं शिक्षेत् - सेवाशुश्रूषा करण्याला शिकावे. ॥ २९ ॥ पावनं भगवद्यशः - पवित्र भगवंतांचे यश - परस्परानुकथनं - परस्परांनी केलेले वर्णन - आत्मनः मिथः रतिः - मनाने परस्परांत रमणे - या मिथः तुष्टिः - जो परस्पर संतोष - या मिथः निवृत्तिः - आणि परस्पर सर्व दुःखांतून निवृत्त होऊन शांतिचा अनुभव घेणे - ॥ ३० ॥ अघौघहरं - पापसमूह नष्ट करणार्या - हरिं स्मरंतः - श्रीहरीला स्मरणारे - मिथः स्मारयंतः च - परस्पर आणि स्मरण करविणारे - भक्त्या उत्पुलकां तनुं बिभ्रति - भगवंताच्या प्रेमलक्षणा भक्तीने रोमांचित शरीर बनतात. ॥ ३१ ॥ अलौकिकाः - लोकविलक्षण - अच्युतचिंतया - भगवत् चिंतनाने - क्वचित् रुदंति - केव्हा रडतात - क्वचित् हसंति - केव्हां हसतात - क्वचित् नंदंति - कधी आनंद पावतात - क्वचित् वदंति - केव्हा बोलतात - क्वचित् नृत्यंति - कधी नाचतात - अजं गायंति - जन्मरहित परमात्म्याचे गुण गातात - अनुशीलयंति - त्यांच्या लीलांचे अनुकरण करतात - परं एत्य निर्वृताः संतः - परमेश्वराला प्राप्त होऊन सुखी होत - तूष्णीं भवंति - स्वस्थ होतात. ॥ ३२ ॥ इति भागवतान् धर्मान् - पूर्वोक्त भागवत धर्मांना - शिक्षन् पुरुषः - शिकणारा मनुष्य - तदुत्थ भक्त्या - भागवतधर्मांच्या आचरणाने उत्पन्न झालेल्या भक्तीने - नारायणःपरः सन् - भगवंताच्याच ठिकाणी तत्पर होत - दुस्तरां अपि मायां - तरून जाण्यास कठीण अशाही मायेला - अंजः तरति - सहज तरून जातो. ॥ ३३ ॥ नारायणाभिधानस्य - नारायणनामक - परमात्मनः ब्रह्मणः निष्ठां - परमात्म ब्रह्माचे स्वरूप - नः वक्तुं अर्हथ - आम्हांला सांगण्याला योग्य आहा - हि - ज्या अर्थी - यूयं ब्रह्मवित्तमाः - आपण ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहा. ॥ ३४ ॥ नरेंद्र ! - हे राजा ! - अस्य जगतः - या जगाच्या - स्थित्युद्भवप्रलयहेतुः - उत्पत्ति, स्थिती, संहारांना कारण - परं स्वयं अहेतुः - पण स्वतःला काहीच कारण नाही अशा - यत् स्वप्नजागरसुषुप्तिषु - स्वप्न, जागृति, निद्रांमध्ये सतत असणारे - संजीवितानि - चैतन्यशक्ति दिलेली अशी - देहेंद्रियासुहृदयानि चरंति - देह, इंद्रिये, प्राण, मन आपापला व्यवहार करतात - तत् ते एकमेव परं तत्त्वं अवेहि - ते एकच श्रेष्ठ तत्त्व जाण. ॥ ३५ ॥ यथा स्वाः अर्चिषः अनलं (न प्रकाशयति न दहति) - ज्याप्रमाणे अग्नीच्या अंशभूत ठिणग्या अग्नीला (प्रकाशत नाहीत वा जाळत नाहीत - ततः मनः एतद् न विशति - त्याप्रमाणे मनाला ब्रह्मांत गति नाही - उत वाक् चक्षु आत्मा - तसेच वाणी, नेत्र वा बुद्धि - प्राणेंद्रियाणि च - व प्राण आणि इंद्रिये - शब्दः अपि बोधकनिषेधतया - वा वेदही ’नेति नेति’ म्हणत बोध करून देणार्या साधनांचा निषेध करून - आत्ममूलं सत् अर्थोक्तं आह - आत्म्याविषयी प्रमाण असूनही तात्पर्य सांगावे अशा रीतीने सांगतो. - यद् ऋते निषेधसिद्धिः न भवति - या ब्रह्म्याव्यतिरिक्त निषेधाची सिद्धीच होत नाही. ॥ ३६ ॥ आदौ एकं - प्रथमारंभी एकच ब्रह्म असते - तदेव सत्त्वं रजः तमः इति त्रिवृत् प्रवदंति - त्यालाच सत्त्वरजतमात्मक त्रिगुणप्रधान म्हणतात - तदेव सूत्रं, महान्, अहं जीवं इति प्रवदंति - त्यालाच सूत्र, महान, अहंरूपी जीव असे म्हणतात - ज्ञानक्रियाफलरूपतया - ज्ञान, क्रिया, अर्थ, फल या निरनिराळ्या रूपांनी - उरुशक्ति - अत्यंत शक्तिशाली - ब्रह्मएव भाति - ब्रह्मच प्रकाशत आहे - यत् सत् असत् च तयोः परं - जे स्थूल व सूक्ष्म व त्यांचे श्रेष्ठ कारण आहे. ॥ ३७ ॥ असौ आत्मा न जजान - हा आत्मा जन्मला नाही - न मरिष्यति - मरणार नाही - न एधते - पुष्टही होत नाही - न क्षीयते - वा क्षीणही होत नाही. - हि व्यभिचारिणां - कारण आपले रूप सोडून जन्ममरणादि विकार पावणार्या सर्व दृश्यादृश्य पदार्थांना - सवनवित् - जाणणारा काळ - सर्वत्र शश्वत् - सर्व ठिकाणी नित्य - अनपायि - अजरामर - उपलब्धिमात्रं - ज्ञानरूप, सच्चित्रूप - तत् सत् एव - ते सत्च - बलेन - इंद्रियांच्या बळाने - विकल्पितं - अनेक प्रकारे कल्पिलेले असे भासते - यथा एकः प्राणः - जसा प्राण एकच असून निरनिराळ्या ठिकाणी असतो. ॥ ३८ ॥ अंडेषु पेशिषु तरुषु - अंड्यात, पेशींत, वृक्षात - अविनिश्चितेषु योनिषु - अविनिश्चित् योनीत - तत्र तत्र प्राणः - तेथे तेथे प्राण - जीवं उपधावति हि - जीवानुसरण करून विद्यमान असतोच - यत् इंद्रियगणे सन्ने - जेव्हा इंद्रिये लीन झालेली असतात - अहमि च प्रसुप्ते - अहंवृत्ति निद्रावश झालेली असते - आशयं ऋते कूटस्थ आत्मा - उपाधिशून्य निर्लेप आत्मा - नः तदनुस्मृतिः - आम्हाला त्या आत्म्याचे स्मरण राहात नाही. ॥ ३९ ॥ यर्हि - जर - अब्जनाभचरण एषणया - ज्याच्या नाभीमध्ये कमल आहे अशा श्रीविष्णूच्या चरणांची इच्छा करणार्या - उरुभक्त्या - एकनिष्ठ भक्तीच्या साह्याने - यर्हि चेतोमलानि - जेव्हा अंतःकरणातील मळ - विधमेत् - दूर होईल तेव्हा - यथा सवितृप्रकाशः विशुद्धे - ज्याप्रमाणे शुद्ध दृष्टीस् सूर्यप्रकाशाची प्रतीती येते - तस्मिन् आत्मतत्त्वं - त्याप्रमाणे त्या शुद्ध अंतःकरणामध्ये आत्मस्वरूप - साक्षात् उपलभ्यते - प्रत्यक्ष प्रगट होते. ॥ ४० ॥ येन संस्कृतः - ज्या कर्मयोगाने शुद्धचित्त झालेला पुरुष - इह कर्माणि विधूय - यालोकी कर्मे टाकून (म्हणजेच फलाचा त्याज करून) - परं नैष्कर्म्यं - श्रेष्ठ अशा नैष्कर्म्यस्थितीला - आशु विन्दते - चटकन प्राप्त होतो - नः कर्मयोगं वदत - त्या कर्मयोगाचा आम्हाला उपदेश करा, ॥ ४१ ॥ पूर्वं पितुः अंतिके - पूर्वी माझा पिता समक्ष असता - एवं प्रश्नं - या प्रकारचाच प्रश्न - ऋषीन् अपृच्छम् - मी ऋषींना विचारला होता - ब्रह्मणः पुत्राः - पण ब्रह्मदेवाचे सनकादि पुत्र - न अब्रुवन् - त्यासंबंधात कांहीच बोलले नाहींत. - तत्र कारणं उच्यताम् - त्याचे काय कारण असावे बरे ? ॥ ४२ ॥ कर्म अकर्म विकर्न - विहित कर्म, निषिद्ध कर व विहित कर्म न करणे - इति वेदवादः - हा विषय वेदवचनांनी कळणारा आहे - लौकिकः न - लौकिक वचनांनी कळण्यासारखा नाही. - वेदस्य च - आणि वेदांना - ईश्वरात्मत्वात् - ईश्वराने आत्मरूप सांगण्यासाठी स्वस्फूर्तीने उत्पन्न केलेले असल्यामुळे - तत्र - त्या कर्म-अकर्म-विकर्म निर्णय संबंधी - सूरयः अपि मुह्यंति - शहाणे लोकही मोह पावतात (स्तंभित होतात). ॥ ४३ ॥ परोक्षवादः - एका प्रकाराने असलेला अर्थ गुप्त राखण्यसाठी वरवर दुसर्या प्रकाराने सांगणारा - अयं वेदः - हा वेद - यथा बालानां अगदं तथा - जसे बालकांना मिठाईची लालूच दाखवून कडू औषध दिले जाते त्याप्रमाणे - अनुशासनं यथा स्यात् तथा - अज्ञांना कर्मफलाचे प्रलोभन दाखवून - कर्ममोक्षाय कर्माणि विधाते हि - कर्मबंधन तुटण्यासाठी वेद कर्मच करवितो. ॥ ४४ ॥ अजितेंद्रियः - इंद्रिये स्वाधीन नसलेला - तु यः स्वयं अज्ञा सन् - पण जो स्वतः अज्ञानी असूनही - वेदोक्तं न आचरेत् - जर वेदांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणार नाही - सः विकर्मणा अधर्मेण - मग तो अधर्माने वागणारा अर्थात् विहित कर्मे न करणारा असा, - मृत्युः मृत्युं उपैति हि - मृत्युमागून मृत्यूलाच प्राप्त होतो. ॥ ४५ ॥ निःसंगः सन् - आणि आसक्तिरहित होत्साता - ईश्वरे अर्पितं (यथा स्यात्) - जसे होईल तसे पण ईश्वरार्पित भावाने - वेदोक्तं एव कुर्वाणः - वेदाज्ञेनुसार कर्मे करणारा - नैष्कर्म्यां सिधिं लभते - नैष्कर्म्यरूप सिद्धि प्राप्त करऊन घेतो. - फलश्रुतिः तु रोचनार्था - वेदातील स्वर्गादिप्राप्तिरूप फलकथन तर गोडी लागावी यासाठी आहे. ॥ ४६ ॥ यः परमात्मनः - जो परब्रह्मर्तूपी आपल्या जीवात्म्याचा - हृदयग्रंथिं - अहंकाररूप बंध - आशु निर्जिहीर्षुः - त्वरित तोडू इच्छिणार्या पुरुषाने - वैदिकेन तंत्रोक्तेन च विधिना - वैदिक आणि तांत्रिक विधीने - केशवं देवं उपचरेत् - केशव भगवंताची पूजा करावी. ॥ ४७ ॥ आचार्यात् लब्धानुग्रहः - ज्याने आपल्या सद्गुरुकडून मंत्र घेतला आहे - तेन च संदर्शितागमः - आणि त्या गुरुने पूजादिप्रकार विधि दाखविला आहे अशा पुरुषाने - आत्मनः अभिमतया मूर्त्या - आपल्याला इष्ट असणार्या मूर्तीच्या द्वारे - महापुरुषं अभ्यर्चेत् - परमेश्वराची पूजा करावी. ॥ ४८ ॥ प्राणसंयमनादिभिः - प्राणायामादि साधनांनी - पिण्डं संशोध्य - शरीर सुद्ध करून - शुचिः संमुखं आसीनः - शुचिर्भूत पूजकाने ईश्वरसंमुख बसावे - संन्यासकृतरक्षः - न्यास करून स्वतःला सुरक्षित करून घ्यावे - हरिं अर्चयेत् - आणि हरिपूजा करावी. ॥ ४९ ॥ द्रव्यक्षित्यात्मलिंगानि - पूजाद्रव्ये, भूमि आपण स्वतः व मूर्ति यांना - निष्पाद्य - प्रोक्षणाने शुद्ध करून - आसनं च प्रोक्ष्य - आणि आसन प्रोक्षण करून - अथ सन्निधाप्य - ती जवळ ठेऊन - समाहितः सन् - अंतःकरण स्थिर करून - हृदादिभिः कृतन्यासः - हृदयादिकांचा षडंग न्यास करून - मूल मंत्रेण च - व मूळमंत्रांनी - यथालब्धोपचारकैः - यथालब्ध उपचारांनी - अर्चादौ - मूर्तीचे ठिकाणी - हृदये च अपि - व हृदयाचे ठिकाणीही - अर्चयेत् - पूजा करावी. ॥ ५०-५१ ॥ सांगोपांगां - हृदयादिक अंगे व सुदर्शनादिक उपांगे यांसह - सपार्षदां च - व नंदादि पार्षदांसह - तां तां मूर्तिं - त्या त्या रामकृष्णादि मूर्तींची - स्वमंत्रतः - मूलमंत्राने - पाद्यार्ध्याचमनीयाद्यैः - पाद्य, अर्घ्य, आचमनीय, इत्यादि - स्नानवासोविभूषणैः - अभिषेक, वस्त्रे, अलंकार - गंधमाल्यक्षतस्त्रग्भिः - गंध, फुले, अक्षता, माळा - धूपदीपोपहारकैः - धूप, दीप, नैवेद्य इत्यादि उपचारांनी - सांगं विधिवत् संपूज्य - यथासांग यथाविधि पूजा करून - स्तवैः स्तुत्वा च - व स्तोत्रपाठांनी स्तुति करून - हरिं नमेत् - श्रीहरिमूर्तीला नमस्कार करावा. ॥ ५२-५३ ॥ आत्मानं तन्मयं ध्यायन् - आपण स्वतः हरिस्वरूप आहोत असे ध्यान करीत - हरेः मूर्तिं संपूजयेत् - हरीच्या मूर्तीची पूजा करावी - शिरसा शेषां आधाय - मस्तकावर निर्माल्य धारण करून - सत्कृतम् - पूजिलेल्या - स्वधाम्नि उद्वास्य - क्रमाने हृदयामध्ये व करंड्यामध्ये स्थापना करावी. ॥ ५४ ॥ एवं अग्नि अर्क तोयादौ - अग्नि, सूर्य, जल इत्यादिकांचे ठिकाणी - अतिथौ - अतिथीचे ठिकाणी - हृदये च - आणि हृदयाचे ठिकाणी - यः ईश्वरं आत्मानं यजति - जो ईश परमात्म्याचे पूजन करतो - सः अचिरात् मुच्यते हि - तो लवकरच खात्रीने मुक्त होतो. ॥ ५५ ॥ अध्याय तिसरा समाप्त |