|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ११ वा - अध्याय २ रा - अन्वयार्थ
श्रीनारदांचे वसुदेवांकडे जाणे आणि त्यांना राजा जनक व नऊ योगीश्वरांचा संवाद ऐकविणे - कुरूद्वह - हे कुरुनरेंद्रा - गोविंदभुजगुप्तायां द्वारवत्यां - श्रीकृष्णाच्या भुजबलाने सुरक्षित अशा द्वारकेत - कृष्णोपासनलालसः नारदः - कृष्णाची भक्ति करण्याची लालसा असलेले नारदमुनि - अभीक्ष्णं अवात्सीत् - पुनः पुनः येऊन राहात असत ॥ १ ॥ हे राजन् ! - हे परीक्षिता ! - अमरोत्तमैः - श्रेष्ठ श्रेष्ठ देवांनी - उपास्यं - उपासना करण्यास योग्य - मुकुंदचरणांबजं - वच्चरणकमल - कः इंद्रियवान् - इंद्रिये असलेला असा कोणता पुरुष - सर्वतोमृत्युः - सर्वत्र मृत्यु ज्याच्या भोवती आ पसरून उभा राहिला आहे - नः भजेत नु ? - उपास्य दैवज्ञ करणार नाही ? ॥ २ ॥ एकदा तु - एके वेळी तर - गृहागतं अर्चितं सुखं आसीनं - आपल्या घरी आलेल्या आणि पूजा स्विकारून सुखाने आसनावर बसलेल्या - देवर्षिं - त्या देवर्षि नारदाला - अभिवाद्य - नमस्कार करून - वसुदेवः - वसुदेव - इदं अब्रवीत् - असे म्हणाला ॥ ३ ॥ भगवन् ! - हे ऋषिवर्य ! - भवतः यात्रा - आपले पर्यटन - सर्वदेहिनां स्वस्तये अस्ति - सर्व जीवांच्या कल्याणासाठी आहे - यथा पित्रो अपय्त्यानां - ज्याप्र्माणे मातापितरांचे मुलांच्या किंवा - उत्तमश्लोकवर्त्मनां - पुण्यश्लोक व परमेश्वराच्या प्राप्तीचे मार्गदर्शक अशा साधूंचे - कृपणानां स्वस्तये अस्ति - दीनांच्या कल्याणसाठीच असते. ॥ ४ ॥ हि - कारण - देवचरितं - देवतांचे आचरण - भूतानां - जीवांच्या - सुखाय च दुःखाय च - सुखाला व दुःखालाही - अच्युतात्मना - ज्यांचा आत्मा अच्युताचे ठिकाणी आहे अशा - त्वादृशां - आपल्यासारख्या - साधूनां - साधूंचे ठिकाणी - केवलं सुखायैव - केवळ सुखासाठीच असते. ॥ ५ ॥ ये देवान् यथा भजंति - जे देवांना असे भजतात - तान् - त्यांना - छाया इव - छायेप्रमाणेच - कर्मसचिवा - कर्मच ज्यांना साहाय्य असे - देवाः अपि - देव सुद्धा - तथा एव - त्याप्रमाणेच - परंतु साधवः दीनवत्सला - पण साधु मान्त्र दीनदयाळू आहेत. ॥ ६ ॥ ब्रह्मन् - हे महर्षे - तथा अपि भागवतान् धर्मान् तव पृच्छामः - आपण दीनवत्सल व दया करणारे असल्याने, तुम्हाला आम्ही ’भागवत धर्माबद्दल प्रश्न करतो - यान् श्रद्धया श्रुत्वा - जे धर्म श्रद्धापुरःसर ऐकले असता - मर्त्यः सर्वतः भयात् मुच्यते - मर्त्यः मानव सर्व भयांपासून मुक्त होतो. ॥ ७ ॥ देवमायया मोहितः भुवि - मी परमेश्वरी मायेने मुग्ध झालो होतो म्हणून मृत्युलोकी - अहं पुरा प्रजार्थः - पूर्वी मी पुत्रप्राप्तीची इच्छा केली - मुक्तिदं अनंत अपूजयं किल - आणि त्या मोक्ष प्रदान करणार्या अनंता पूजा केली खरी - न तु मोक्षाय - पण ती पूजा मोक्षासाठी नाही केली. ॥ ८ ॥ विश्वतोभयात् विचित्रव्यसनात् - सर्वत्र व सर्वदा भयप्रद असणार्या संसारातील नानाप्रकारच्या संकटांपासून - अंजसा एव - थोड्याश्याच श्रमाने - अद्धा - प्रत्यक्ष - भवद्भिः यथा मुच्येमहि - आपल्या उपदेशामुळे आम्ही मुक्त होऊ - तथा - असा - सुव्रत नः शाधि - हे सुव्रत नारदा, आम्हाला उपदेश करा. ॥ ९ ॥ राजन् ! - हे परीक्षित राजा ! - धीमता वसुदेवेन - बुद्धिमान वसुदेवाने - एवं कृतप्रश्नः - या प्रमाणे केलेला प्रश्न ऐकून - प्रीतः - नारद मुनि प्रसन्न झाले - हरेः गुणैः - परमेश्वर हरीच्या गुणांचे - संस्मारितः - स्मरण झाल्यामुळे हर्षित झालेले नारदमुनि - तं आह - वसुदेवाला म्हणाले - ॥ १० ॥ सात्वतर्षभ - हे यदुकुलश्रेष्ठा ! - यत् विश्वभावनान् भागवतान् धर्मान् - ही जी विश्वाचे कल्याण करणारी पवित्र भागवत धर्माची - त्वं पृच्छसे - तू जी पृच्छा केलीस - एतत् भवता - ते तुझे हे कृत्य - सम्यक् व्यवसितम् - फारच चांगले आहे. ॥ ११ ॥ सद्धर्मः - भागवतधर्म - श्रुतः अनुपठितः - ऐकला वा पठण केला - ध्यातः आदृतः - अथवा त्याचे चिंतन केले वा आदराने स्विकार केला - वा अनुमोदितः - किंवा अंतःकरणपूर्वक त्याला संमति दिली तर - देवविश्वद्रुहः अपि हि - देव आणि विश्व यांचा जे द्रोह करणारे त्यांस सुद्धा - सद्य पुनाति - तत्काळ पवित्रता देतो. ॥ १२ ॥ परमकल्याणः - अतिश्रेष्ठ मंगलधाम - पुण्यश्रवणकीर्तनः - ज्याचे श्रवण व कीर्तन पुण्यकारक आहे - भगवान नारायणः देवः - षडगुणैश्वर्यसंपन्न नारायण देवाची - अद्यः - आज - त्वया - तुझ्यामुळे - मम स्मारितः - मला आथवण करून दिली गेली आहे. ॥ १३ ॥ अत्र अपि इदं - आत मी जे सांगणार आहे तो - पुरातनं इतिहासं उदाहरन्ति - प्राचीन काळचा घडलेला इतिहास सांगत असतात तो - आर्षभाणां च महात्मनः - ऋषभ नामक जो विष्णूंचा अंश त्याचे पुत्र आणि - विदेहस्य संवादं - महात्मा विदेह राजा यांमधी संवाद होय ॥ १४ ॥ स्वायंभवस्य मनोः - स्वायंभुव मनूचा - यः प्रियव्रतः नाम सुतः - पुत्र प्रियव्रव - तस्य आग्नीध्रः - त्याचा पुत्र आग्नीध्र - ततो नाभिः - त्याचा पुत्र नाभि - तसुतः ऋषभः स्मृतः - आणि नाभीची पुत्र ऋषभ होय. ॥ १५ ॥ मोक्षधर्म विवक्षया - मोक्षधर्म कथन करण्याच्या इच्छेने - अवतीर्णं तं - अवतार घेणार्या ऋषभाला - वासुदेवांशं आहुः - वासुदेवाचा प्रत्यक्ष अवतारच म्हणत असत. - तस्य सुतशतः वदपारगं आसीत् - त्याचे शंभर पुत्र वेदपारंगत होते. ॥ १६ ॥ तेषां ज्येष्ठः भरतः वै - त्या शंभर पुत्रात भरत हा पहिला मुलगा - नारायणपरायणः महान् नारायण भक्त - यन्नात्मा - ज्याच्या नावाने - एतत् अद्भुतं वर्षं - हे जे अपूर्व खंड - भारतं इति विख्यातं - ते भरतखंड या नावाने प्रसिद्ध झाले. ॥ १७ ॥ भुक्तभोगां इमां त्यक्त्वा - सर्व भोगसुखांचा उपभोग अनुभवल्यानंतर ही पृथ्वी सोडून - सः तपसा हरिं उपासीनः निर्गतः - तो राजा भरत तपाचरणाने हरीची उपासना करण्यासाठी अरण्यात गेला - तत्पदवीं त्रिभिः जन्मभिः वै लेभे - आणि तीन जन्मांनी त्याला हरिपदाची प्राप्ति झाली. ॥ १८ ॥ तेषां नव - त्या ऋषभपुत्रांपैकी नऊ - नवद्वीपपतयः - नऊ द्वीपांचे (खंडांचे) अधिपती झाले - अस्य समंततः - सर्व भरतखंडभर - एकाशीति - एक्क्याऐंशी मुलगे - कर्मतंत्रप्रणेतारः द्विजातयः - कर्ममार्गाचे प्रणेते, कर्ममार्गाचा संप्रदाय सुरू करून चालविणारे ब्राह्मण झाले. ॥ १९ ॥ नव - बाकी राहिलेले नऊजण - महाभागाः - महापूज्यवंत - अर्थसंशिनः - श्रेष्ठ अर्थाचे उद्घाटन करणारे - श्रमणाः - तपस्वी, संन्यासी - वातरशना - वायूचे वेष्टन घालणारे म्हणजे दिगंबर - आत्मविद्याविशारदाः मुनयः अभवन् - आत्मविद्येमध्ये प्रवीण असे हे नऊ मुनि झाले. ॥ २० ॥ कविः, हरिः, अंतरिक्ष, प्रबुद्धः, पिप्पलायनः, आविर्होत्र, अथ द्रुमिलः, चमसः, करभाजनः - अशी त्या नऊ जणांची नावे होती. ॥ २१ ॥ सददात्मकं - सदात्मक व असदात्मक अस्णारे हे भगवद्रुपी विश्व ब्रह्मांड आत्मस्वरूपच आहे - आत्मनः अव्यतिरेकेण - आत्मव्यतिरिक्त नाही - भगवद्रूपं विश्वं पश्यन्तः एते वै - असे परमार्थतः विश्वब्रह्मच होय असे जाणणारे हे नऊ ब्रह्मवेत्ते - महीं व्यचरन् - पृथ्वीवर संचार करीत. ॥ २२ ॥ सुर-सिद्ध-साध्य, गंधर्व, यक्ष, नर-किन्नर, - गंधर्व, यक्ष, किन्नर इत्यादि - नागलोकान्, मुनि-चारण-भूतनाथ, विद्याधर, द्विज-गवां भुवनानि - देव, सिद्ध साध्यादि लोकांत व ऋषिचारणादिकांच्या स्थानांमध्ये - अव्याहतेषुगतयः मुक्ताः कामं चरन्ति - जे जीवन्मुक्त नऊ मुनि स्वेच्छेने हिंडत असत. ॥ २३ ॥ अजनाभे - या भारतबर्षात - महात्मनः निमेः - महात्मा निमिराजाचे - ऋषिभिः वितायमानं सत्रं - ऋषींनी चालविलेले जे सत्र तेथे - ते एकदा - ते नऊ मुनि एकेवेळी - यदृच्छया जग्मुः - स्वेच्छेने जाते झाले. ॥ २४ ॥ नृप - हे परीक्षित राजा, - सूर्यसंकाशान्, महाभागवतान् तान् दृष्ट्वा - सूर्याप्रमाणे देदीप्यमान असणारे ते महाभगवद्भक्त आलेले पाहून - यजमानः, अग्नयः, विप्राः सर्वे एव उपतस्थिरे - यजमान निमि राजा, अग्नि, ब्राह्मण सर्वजण सत्कारपूर्वक उठले ॥ २५ ॥ यथा अर्हतः आसनस्थान् - यथायोग्य आसनांवर विराजमान झालेल्या - तान् नारायणपरायणान् - नारायणपरायण आहेत - अभिप्रेत्य प्रीतः विदेहः - असे जाणून संतुष्ट झालेला विदेह जनक जो - संपूज्ययांचक्रे - त्यांची परमादराने पूजा करता झाला. ॥ २६ ॥ परमप्रीतः नृपः - अत्यंत संतुष्ट झालेला जनक राजा - प्रश्रयावनतः - पूज्य बुद्धीने नम्र होऊन - स्वरुचा रोचमानान् - स्वतःच्या तेजाने प्रकाशणार्या - ब्रह्मपुत्रोपमान् तान् नव - ब्रह्मपुत्र सनत्कुमारादि यांसारख्या त्या नऊजणांना - पत्रच्छ - विचारता झाला. ॥ २७ ॥ वः भगवतः मधुद्विषः - आम्ही आपणांस भगवान मधुसूदनाचे - साक्षात् पार्षदान् मन्ये - प्रत्यक्ष सेवक मानतो - हि - कारण - विष्णोः भूतानि - विष्णूची भक्ति करणारे लोक - लोकानां पावनाय - इतर लोकांच्या उद्धारासाठी - चरन्ति - फिरत असतात ॥ २८ ॥ देहिनां मानुषः देहः - देहधारी प्राण्यांचा मनुष्यदेह - क्षणभंगुरः दुर्लभः च - क्षणांत नष्ट होणारा व मिळण्यास कठीण असा आहे - तत्र अपि - त्यामध्येहि - वैकुंठप्रियदर्शनं दुर्लभं मन्ये - - श्री विष्णूचे प्रियकरांचे दर्शन दुर्लभ आहे असे मी मानतो ॥ २९ ॥ अतः अनघाः - म्हणून अहो मिष्पाप मुनिहो, - भवतः आत्यन्तिकं क्षेमं - तुम्हाला अविनाशी अशा कल्याणाबद्दल - पृच्छामः - विचारणात आहोत. - अस्मिन् संसारे - या संसारात - क्षणार्धः अपि - अर्धा क्षणहि घडलेला - सत्संगः नृणां शेवधिः - साधूंचा समागम मनुष्यांच्या कल्याणाचे भांडारच होय. ॥ ३० ॥ यदि नः श्रूयते क्षमं - जर आम्हाला ऐकण्यास योग्य असतील तर - भागवतान् धर्मान् ब्रूत - भगवद्भक्तांचे धर्म सांगा - यैः प्रसन्नः अजझ् - ज्यायोगे प्रसन्न झालेला परमेश्वर - प्रपन्नाय - शरणागताला - आत्मानं अपि दास्यति - स्वतःलाही अर्पण करील. ॥ ३१ ॥ वसुदेव, एवं निमिना पृष्टा - वसुदेवा, याप्रमाणे जनकाने विचारलेले - महत्तमाः ते - अत्यंत श्रेष्ठ असे ते मुनि - ससदस्य ऋत्विजं नृपं - सभासद व ऋत्विज यांसह बसलेल्या राजाचे - प्रतिपूज्य अब्रूवन - अभिनंदन करून म्हणाले ॥ ३२ ॥ अच्युतस्य पादांबुजोपासनं - श्रीविष्णुच्या चरणकमलांचे सेवन (सेवा) - अकुतश्चिद्भयं मन्ये - कोणतेही भय उत्पन्न करणारे नाही असे आम्ही मानतो - अत्र असदात्मभावात् - येथे पांचभौतिक मिथ्या वस्तूचे ठिकाणी अहंपणा ठेवल्यामुळे - नित्यं इद्वुग्नबुद्धेः भीः - नेहमी खिन्नबुद्धि झालेल्याची भिती - यत्र विश्वात्मना निवर्तते - जेथे परमेश्वराच्या ठिकाणी भक्ति केल्याने सर्बथा नाहीशी होते. ॥ ३३ ॥ हि - कारण - अविदुषां पुंसां - अज्ञानी पुरुषांना - अञ्जः आत्मलब्धये - सहज आत्मप्राप्ती व्हावी एवढ्यासाठी - वै ये उपायाः - खरोखर जे उपाय - भगवता प्रोक्ता - परमेश्वराने सांगितले आहेत - तान् भागवतान् विद्धी - तेच भगवद्भक्तांचे धर्म जाण ॥ ३४ ॥ राजन् - हे जनकराजा - यान् आस्थाय - ज्या धर्मांचा स्वीकार करून - नरः कर्हिचित् न प्रमाध्येत - मनुष्य कधीही गोंधळून जाणार नाही. - इह नेत्रे निमील्य - ह्या धर्मामध्ये अगदी डोळे मिटून - धावन् न स्खलेत् - धांवत असतांही अडखळणार नाही - वा न पतेत् - किंवा पडणार नाही. ॥ ३५ ॥ कायेन वाचा - देहाने वा वाणीने - मनसा वा इंद्रियैः - मनाने किंवा इंद्रियांनी - बुद्ध्या वा आत्मना - बुद्धीने किंवा अहंकाराने - अनुसृतस्वभावान् - अनुसरलेल्या प्रारब्धामुळे - यत् यत् करोति - जे काही करतो - ते सकलं - ते सर्व काही - तस्मै नारायणाय इति समर्पयेत् - श्रेष्ठ अशा परमेश्वराला याप्रमाणे अर्पण करावे. ॥ ३६ ॥ तन्मायया ईशात् अपेतस्य - परमेश्वराच्या मायेने परमेश्वराला पराङ्मुख झालेल्या पुरुषाला - विपर्ययः अस्मृतिः - विपरीतज्ञानपूर्वक विस्मरण होते - ततः द्वितीयाभिनिवेशतः - नंतर द्वैत मताला अनुसरल्यामुळे - भयं स्यात् - भिती उत्पन्न होते. - अतः गुरुदेवतात्मा बुधः - म्हणून सद्गुरूचे ठिकाणी देवताबुद्धि ठेवणार्या ज्ञानी पुरुषाने - एकया भक्त्या - अनन्य भावाने - तं ईशं आभजेत् - त्या परमेश्वराचे मोक्षप्राप्ति होईपर्यंत सेवन करावे. ॥ ३७ ॥ ध्यातुः धियाः - चिंतन करणार्याच्या बुद्धीने - यथा स्वप्नमनोरथो - ज्याप्रमाणे स्वप्न व मनोराज्ये केली जातात - तथा अविद्यमानः अपि - त्याप्रमाणे अस्तित्वात नसणाराही - द्वयः अवभाति - द्वैतरूपी संसार भासतो - तत् बुधः - म्हणून ज्ञानी पुरुषाने - कर्मसंकल्पविकल्पकं मनः - कर्माचा संकल्प व विकल्प करणारे मन - निरुन्धात् - ताब्यात ठेवावे - ततः अभयं स्यात - त्यायोगे भय नाहीसे होईल. ॥ ३८ ॥ लोके - या लोकी - रथांगपाणेः यानि सुभद्राणि - चक्रपाणी ईश्वराची जी कल्याणकारक - जन्मानि च कर्माणि - जन्मे (अवतार) आणि कर्मे - तानि शृण्वन् - त्यांचे श्रवण करून - विलज्ज - निर्लज्जपणे - तदर्थकानि गीतानि च नामानि - भगवंतांच्या चरित्रांनी ओथंबलेली गीते व नामसखीर्तन गाऊन - असंगः विचरेत् - सर्वसंग सोडून फिरत रहावे (वावरावे) ॥ ३९ ॥ एवंव्रतः - अशा तर्हेचे व्रतानुष्ठान करणारा - स्वप्रियनामकीर्त्या - स्वतःला प्रिय अशा परमेश्वराच्या नावाचे कीर्तन करून - जातानुरागः - ज्याच्या अंतःकरणात अधिक प्रेम उत्पन्न झाले आहे असा - द्रुतचित्तः - ज्याच्या चित्तात प्रेमाचा पाझर फुटला आहे असा - लोकबाह्यः - लोकविलक्षण पुरुष - उच्चैः हसति - मोठमोठ्याने हसतो - अथो रोदिति रौति गायति - नंतर रडतो, ओरडतो, गातो - उन्मादवत् नृत्यति - बेभान होऊन नाचू लागतो. ॥ ४० ॥ खं वायुं अग्निं सलिलं च महीं - आकाश, वायु, अग्नी, उदक आणि पृथ्वी - ज्योतींषि दिशः सत्त्वानि द्रुमाद्रिन् सत्त्वानि - नक्षत्रे, दिशा, वृक्षादिक, प्राणी - सरित् च समुद्रान् यत् किंच भूतं - नदी व समुद्र व जे जे काही दिसणारे आहे ते सर्व - हरेः शरीरं - परमेश्वराचे शरीर होय. - अतः अनन्यः तं प्रणमेत् - म्हणून अनन्यभक्तीने त्या भगवम्ताच्या मूर्तीला नमन करावे. ॥ ४१ ॥ भक्तिः परेशानुभवः - भक्ति भगवत्स्वरूपाचे स्फुरण - अन्यत्र विरक्तिः - परमेश्वराव्यतिरिक्त इतर वस्तूंचे ठिकाणी वैराग्य - एषः त्रिकः एककालः - ही त्रयी, एककालीच - प्रपद्यमानस्य - शरणागत भक्ताला - यथा अश्नतः तुष्टिः पुष्टिः क्षुदपायः - ज्याप्रमाणे जेवणार्याला संतोष, पुष्टता व भुकेची शांति ही - अनुघासं स्युः - प्रत्येक घासागणिक होतात. ॥ ४२ ॥ इति अनुवृत्त्या - याप्रमाणे अविश्रांतपणे - अच्युताङ्घ्रिं भजतः - परमेश्वराची चरणसेवा करणार्या भगवद्भक्ताला - भक्तिः विरक्तिः भगवत्प्रबोधः - भक्ति, वैराग्य व भगवत्स्वरूपाचे ज्ञान - भवन्ति वे - ही खरोखर प्राप्त होतात. - राजन् - हे राजा ! - ततः साक्षात् परां शांतिं उपैति - नंतर प्रत्यक्ष त्याला श्रेष्ठ शांति प्राप्त होते. ॥ ४३ ॥ अथ भागवतं ब्रूत - आता भगवद्भक्त कोणाला म्हणावे ते सांगा - यद्धर्मः नृणां यादृशः - त्याचा धर्म, मनुष्यांना कशा स्वरूपाचा दिसतो - यथा चरति यत् ब्रूते - ज्या रीतीने तो वागतो, तो जे बोलतो - यैः लिंगैः भगवत्प्रियः भवति च - आणि ज्या चिन्हांमुळे तो ग्भगवंताला प्रिय होतो. ॥ ४४ ॥ यः सर्वभूतेषु आत्मनः - जो सर्व प्राण्यांचे ठिकाणे आत्मरूप, - भगवद्भावं पश्येत् - भगवत्स्वरूपाला पाहतो - भगवति आत्मनि च भूतानि - व भगवत्स्वरूपी आत्म्याचे ठिकाणी सर्व प्राणिमात्रांना पाहतो - एषः भागवतोत्तमः - तो सर्व भगवद्भक्तांमध्ये श्रेष्ठ होय. ॥ ४५ ॥ ईश्वरे, तद् अधिनेषु - ईश्वराचे ठिकाणी, त्याच्या भक्तांचे ठिकाणी - बालिशेषु द्विषत्सु च - अज्ञानी जीवाचे ठिकाणी व शत्रूचे ठिकाणी - प्रेम मैत्री कृपा उपेक्षा - अनुक्रमे प्रेम, स्नेह, अनुग्रह व उपेक्षा - यः करोति स मध्यमः - जो करतो तो मध्यम भागवत होय. ॥ ४६ ॥ यः हरये एव - जो केवळ हरीची - अर्चायां पूजां श्रद्धया ईहते - प्रतिमाच ठेऊन हरिपूजा श्रद्धेने करू इच्छितो, श्रद्धेने करतो - तद्भक्तेषु अन्येषु च न - तो हरिभक्तांमध्ये किंवा इतरत्र हरि आहे असे समजून त्या ठिकाणी पूज्य भाव ठेवेत नाही - सः भक्तः प्राकृतः स्मृतः - तो भक्त प्राकृत, म्हणजे कनिष्ठ दर्जाचा असे समजतात. ॥ ४७ ॥ इंद्रियैः अर्थान् गृहित्वा अपि - प्रत्येक इंद्रियाने त्याच्या विषयाचे ग्रहण झाले तरी - इदं विष्णोः मायां पश्यन् - नेत्रादिकांचे रूपरसादि सर्व अर्थ विष्णूची मायाच आहे असे समजणारा - यः न द्वेष्टि न हृष्यति - जो भक्त उद्विग्न होत नाही की आनंदित होत नाही - सः भागवतोत्तमः वै - तो खरोखर भगवतोत्तम होय. ॥ ४८ ॥ हरेः स्मृत्या - हरीचे स्मरण अखंड असल्याने - देहेंद्रियप्राण मनोधियां - शरीर, मन, प्राण, मन व बुद्धी या सर्वांपासून उत्पन्न होणार्या - जन्माप्ययक्षुद्भयतर्षकृच्छ्रैः - या सर्वांच्या जन्म, मरणक्षुधा, भय व तृष्णा - संसारधर्मैः यः - या दुःखद संसारधर्मांनी - अविमुह्यमानः सः भागवतप्रधानः - जो मोहग्रस्त होत नाही तोच भागवतोत्तम होय. ॥ ४९ ॥ यस्य चेतसि - ज्याच्या अंतःकरणात - कामकर्मबीजानां संभवः न - काम आणि कर्म यांची बीजेच उत्पन्न होत नाहीत - वासुदेवैकनिलयः - जो वासुदेवाच्या मात्र ठिकाणी विश्रांतीचे स्थान संपादितो - स वै भागवतोत्तमः - तोच खरखर भागवतोत्तम होय. ॥ ५० ॥ यस्य अस्मिन् देहे - ज्याला या देहामध्ये - न जन्मकर्मभ्यां - जन्मानि आणि कर्मांनी तसेच - वर्णाश्रमजातिभिः - वर्ण आश्रम आणि जाति - अहंभावः सज्जते - यांनी अहंभाव, अहंकार स्पर्श करीत नाही - स वै हरेः प्रियः - तोच वस्तुतः हरीचा आवडता होतो. ॥ ५१ ॥ वित्तेषु आत्मनि वा - वित्तामध्ये भोग्य विषयांच्या संबंधाने - स्वः परः इति - हे माझे हे दुसर्याचे असा अथवा आत्मसंबंधाने ’हा माझा व हा परका’ - यस्य नि भिदा - असा भेदाभेद जो करीत नाही - सर्वभूतसमः - जो सर्व भूतांस समत्वाने पाहतो - शांतः - ज्याची वृत्ति सदैव शांत समाधानाची असते - सः वै भागवतोत्तमः - तोच खरा भागवतोत्तम होय. ॥ ५२ ॥ त्रिभुवनविभवहेतवे अपि - लोकत्रयस्वामित्वाच्यासाठी सुद्धा - लवनिमिषार्धं अपि - लवार्ध म्हणजे एका निमिषाचा १/१२० आणि निमिषार्ध म्हणजे डोळ्याची उघडझाप करण्यास लागणारा वेळ, त्याचा अर्ध. तात्पर्य - अत्यंत अल्प वेळही - अकुंठितस्मृतिः - अखंड, ज्याचे हरिस्मरण स्थिर आहे असा भक्त - अजितात्मसुरादिभिः विमृग्यात् - देवादिकांनीसुद्धा ज्या भगवंताच्या चरणकमलाचा शोध चालविला आहे - भगवत्पदारविंदात् यः न चलति - त्या हरिचरणापासून क्षणभरसुद्धा जो चळत नाही असा जो भक्त - सः वैष्ण्ववाग्रयः - तोच वैष्णवाग्रणी होय. ॥ ५३ ॥ भगवतः उरुविक्रमांघ्रिशाखा - भगवंताच्या अत्यंत कार्यक्षम असल्यामुळे पराक्रमी असलेल्याचरणांच्या अंगुलीला शोभायमान करणार्या - नखमणिचंद्रकया - नखरूपी रत्नांच्या चंद्रसदृश शीतल तेजाने - निरस्ततापे - ज्यांतील त्रिविधताप सर्वथा नाहीसे झाले आहेत अशा - उपसीदतां हृदि - भक्तांच्या हृदयात - पुनः कथं सः प्रभवति - पुनः कसा ताप उत्पन्न व्हावा ? - चंद्रे इव उदिते अर्कतापः - चंद्र उगवला असता जसा सूर्यताप निरस्त होऊन पुनः उत्पन्न होणे शक्यच नाही. ॥ ५४ ॥ अवशाऽभिहितः अपि - नकळता, अबुद्धिपूर्वक, सहजच हरिनाम घेतलेले पाहून मात्र - अघौघनाशः साक्षात् हरिः - पापप्रवाहांचा नाश करणारा प्रत्यक्ष हरि - प्रणयरशनया - प्रेमरूपी रज्जूनेज्याचे चरणकमलद्वय - धृतांघ्रिपद्मः - भक्तांच्या हृदयात डांबून टाकले आहेत असा - यस्य हृदयं न विसृजति - ज्या भक्ताचे हृदयातून जात नाही - स भागवतप्रधानः उक्तः भवति - तोच भक्त भागवतप्रधान, भक्तश्रेष्ठ होय असे म्हटले आहे. ॥ ५५ ॥ अध्याय दुसरा समाप्त |