श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८५ वा - अन्वयार्थ

श्रीभगवंतांचा वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश व देवकीच्या सहा पुत्रांना परत आणणे -

अथ - नंतर - एकदा - एके दिवशी - वसुदेवः - वसुदेव - (समीपे) प्राप्तौ कृतपादाभिवन्दनौ (च) - जवळ येऊन पायाला वंदन केले आहे ज्यांनी असे - आत्मजौ संकर्षणाच्युतौ - पुत्र जे बलराम व श्रीकृष्ण त्यांना - प्रीत्या अभिनन्द्य - प्रेमाने अभिनंदून - आह - म्हणाला. ॥१॥

सः - तो वसुदेव - पुत्रयोः धामसूचकं - बलराम व श्रीकृष्ण ह्यांचा प्रभाव सुचविणारे - मुनीनां वचःश्रुत्वा - ऋषींचे भाषण श्रवण करून - तद्वीर्यैः जातविश्रम्भः - त्यांच्या पराक्रमांनी उत्पन्न झालेली आहे श्रद्धा ज्यामध्ये असा - परिभाष्य अभ्यभाषत - स्तुती करून भाषण करिता झाला. ॥२॥

कृष्ण महायोगिन् कृष्ण - हे कृष्णा, हे महायोगी कृष्णा - सनातन संकर्षण - हे पुरातन बलरामा - यत् - जे - अस्य (जगतः) साक्षात् (कारणं) तौ परौ प्रधानपुरुषौ - ह्या त्रैलोक्याचे प्रत्यक्ष कारण श्रेष्ठ प्रधान पुरुष - (तत्) वां जाने - ते मी तुम्हाला समजतो. ॥३॥

यत्र - ज्या ठिकाणी - येन - ज्याच्याकडून व ज्याच्या सहाय्याने - यतः - ज्याच्यातून - यस्य - ज्याच्या संबंधाने - यस्मै - ज्याच्यासाठी - यत् - ज्याचे - यत् - जे - यथा - जशा रीतीने - यदा - ज्या वेळी - इदं (विश्वं) स्यात् - हे विश्व उत्पन्न होते - साक्षात् - प्रत्यक्ष - प्रधानपुरुषेश्वरः भवान् (एव) - प्रकृति व पुरुष या उभयतांचाहि नियन्ता असा जो तू तोच आहेस. ॥४॥

अधोक्षज - हे श्रीकृष्णा - आत्मन् - हे आत्मरूपा - एतत् आत्मसृष्टं नानाविधं विश्वं - हे स्वतः उत्पन्न केलेले नानाविध विश्व - (तस्मिन्) आत्मना अनुप्रविश्य - त्यामध्ये अंतर्यामीरूपाने प्रवेश करून - अजः (त्वम्) - जन्मरहित असा तू - प्राणः जीवः (च भूत्वा) - क्रियाशक्ति व ज्ञानशक्ति होऊन - बिभर्षि - धारण करितोस. ॥५॥

याः विश्वसृजां प्राणादीनां शक्तयः - ज्या जगदुत्पत्ति करणार्‍या प्राणादिकांच्या शक्ति - ताः - त्या - (प्राणादीनां) पारतंत्र्यात् - प्राणादिक परतंत्र असल्यामुळे - द्वयोः (प्राणेश्वरयोः) वैसादृश्यात् (च) - आणि प्राण व ईश्वर या दोघांमध्ये विसदृशपणा असल्यामुळे - परस्य (एव सन्ति) - ईश्वराच्याच होत - चेष्टताम् (एषां) चेष्टा एव - यांची हालचाल ही केवळ चेष्टाच आहे. ॥६॥

चंद्राग्न्यर्कर्क्षविद्युताम् - चंद्र, अग्नी, सूर्य, नक्षत्रे, वीज - कान्तिः तेजः प्रभा सत्ता - कान्ति, तेज, प्रकाश व अस्तित्व ही - भूभृतां यत् स्थैर्यम् - पर्वतांचा जो स्थिरपणा तो - भूमेः वृत्तिः गंधः - पृथ्वीचा धर्म गंध हा - अर्थतः भवान् एव - खरोखर तूच आहेस. ॥७॥

देव - ईश्वर - त्वम् (एव) - तूच - अपां तर्पणप्राणनम् - पाण्याचा तृप्त करण्याचा व जीवन देण्याचा धर्म - ताः तद्रसः च - ते जल व त्याचा धर्म जो चव तो - ईश्वर - हे ईश्वरा - ओजः - इंद्रियांचे बळ - सहः - मनाचे बळ - बलम् - शरीराचे बळ - चेष्टाः - हालचाल - वायोः गतिः - वायूमध्ये असलेले सर्व ठिकाणी जाण्याचे सामर्थ्य - (एतानि) तव (एव) - ही तुझीच होत. ॥८॥

दिशां अवकाशः - दिशांची पोकळी - दिशः खं आश्रयः स्फोटः - दिशा, आकाश व त्या आकाशाचा आश्रय असे स्फोट नामक ध्वनीचे सूक्ष्मस्वरूप - त्वम् असि - तूच आहेस - नादः ओंकारः - नाद ओंकार - आकृतीनां पृथक्कृतिः वर्णः - पदार्थांना निरनिराळी नावे देणारी अक्षरे - त्वम् (एव) - तूच आहेस. ॥९॥

इंद्रियाणां इंद्रियं - इंद्रियांची इंद्रियशक्ति - देवाः तदनुग्रहः च - आणि देव व त्यांचा अनुग्रह - त्वं तु - तुच आहेस - बुद्धेः अवबोधः - बुद्धीचे ज्ञानस्वरूप - जीवस्य (सती) अनुस्मृतिः - जीवाची नीट धोरण ठेवण्याची शक्ति - भवान् (एव) - तूच आहेस. ॥१०॥

भूतानां भूतादिः (त्वम्) असि - सर्व भूतांमध्ये आदिभूत जो तामस अहंकार तो तू आहेस - इंद्रियाणां तैजसः च - आणि इंद्रियांमधील तैजस नामक राजस अहंकार आहेस - विकल्पानां वैकारिकः - देवाचा सात्त्विक अहंकार तूच आहेस - अनुशायिनां प्रधानं - जीवांचे संसारकारण प्रधान. ॥११॥

इह नश्वरेषु भावेषु - ह्या लोकी नाशिवंत पदार्थामध्ये - (यत्) अनश्वरं - जे अविनाशी - तत् त्वं असि - ते तू आहेस - यथा - ज्याप्रमाणे - द्रव्यविकारेषु - द्रव्यापासून केलेल्या पदार्थात - द्रव्यमात्रं निरूपितं - मूळ द्रव्यच दिसून येते. ॥१२॥

सत्त्वं रजः तमः इति गुणाः - सत्त्व, रज व तम हे गुण - याः च तद्‌वृत्तयः - आणि जी त्या गुणांची कार्ये - अद्धा त्वयि परे ब्रह्मणि - प्रत्यक्ष तू जो परब्रह्म त्या तुझ्या ठिकाणी - योगमायया कल्पिताः - योगमायेने कल्पिल्या आहेत. ॥१३॥

तस्मात् अमी भावाः न सन्ति - म्हणून हे पदार्थ वस्तुतः नाहीतच - यर्हि त्वयि विकल्पिताः (तर्हि ते) सन्ति - जर तुझ्या ठिकाणी ते कल्पिले तर ते असतात - त्वं च - आणि तू - अमीषु विकारेषु (असि) - ह्या विकारांच्या ठिकाणी असतोस - अन्यदा - नाही तर - (त्वं) अव्यावहारिकः हि (असि) - तू काहीच व्यवहार न करणारा असाच खरोखर आहेस. ॥१४॥

एतस्मिन् गुणप्रवाहे - हा त्रिगुणाचा प्रवाह जो संसार त्यामध्ये - इह - ह्या लोकी - अखिलात्मनः सूक्ष्मां गतिं अबुधाः तु - परमेश्वराचे प्रपंचरहित असे सूक्ष्मस्वरूप न जाणणारे तर - अबोधेन - अज्ञानामुळे - कर्मभिः - कर्मांनी - संसरन्ति - जन्ममरणरूप संसारात पडतात. ॥१५॥

ईश्वर - हे श्रीकृष्णा - इह - ह्या लोकी - दुर्लभां - दुर्लभ - सुकल्पां - चांगल्या रीतीने बनविलेल्या - नृतां - मनुष्यदेहाला - यदृच्छया - स्वेच्छेने - प्राप्य - मिळवून - स्वार्थे प्रमत्तस्य मम - स्वार्थाविषयी असावध राहिलेल्या माझे - वयः - आयुष्य - त्वन्मायया गतं - तुझ्या मायेने व्यर्थ निघून गेले. ॥१६॥

देहे असौ अहं - देहाच्या ठिकाणी हा मी - अस्य च अन्वयादिषु - आणि ह्या देहाच्या पुत्रपौत्रादिकांच्या ठिकाणी - एते मम एव (इति) - हे माझेच अशा - स्नेहपाशैः - प्रेमपाशांनी - भवान् सर्वं इदं जगत् निबध्नाति - तू हे सर्व जग बांधून टाकितोस. ॥१७॥

युवां नः सुतौ न - तुम्ही दोघे आमचे मुलगे नव्हेत - साक्षात् प्रधानपुरुषेश्वरौ - प्रत्यक्ष प्रकृति व पुरुष ह्यांचेहि अधिपति आहा - भूभारक्षत्त्रक्षपणे - पृथ्वीला भारभूत जे राजे त्यांच्या नाशासाठी - अवतीर्णौ - अवतार घेतलेले आहा - तथा ह आत्थ - तसे तुम्ही सांगितलेहि आहे. ॥१८॥

आर्तबन्धो - हे पीडितांचे रक्षण करणार्‍या कृष्णा - तत् - म्हणून - अद्य - आज - आपन्नसंसृतिभयापहं ते पदारविन्दं - शरणागताचे संसारभय दूर करणार्‍या तुझ्या चरणकमलाला - अरणं गतः अस्मि - मी शरण गेलो आहे - यत् - ज्याच्या योगाने - मर्त्यात्मदृक् - मर्त्य शरीराच्या ठिकाणी आत्मा अशी बुद्धि ठेवणारा झालो - परे त्वयि (च) अपत्यबुद्धिः - व श्रेष्ठ अशा तुझ्या ठिकाणी पुत्रबुद्धी ठेवणारा झालो - (तेन) एतावता इंद्रियलालसेन अलं अलम् - त्या एवढया इंद्रियलोलुपतेचा संबंध अगदी पुरे झाला. ॥१९॥

अजः भवान् - जन्मरहित तू - निजधर्मगुप्त्यै अनुयुगं संजज्ञे इति - स्वधर्मरक्षणासाठी प्रत्येक युगात उत्पन्न होतो असे - सूतीगृहे ननु नौ जगाद - प्रसूतीगृहात खरोखर आम्हाला म्हणालास - नानातनूः विदधत् (त्वं) - अनेक शरीरे धारण करणारा तू - (ताः) गगनवत् जहासि - ती आकाशाप्रमाणे सोडून देतोस - उरुगाय - हे सर्वांनी गायिलेल्या श्रीकृष्णा - भूम्नः (तव) विभूतिमायां - सर्वव्यापी अशा तुझ्या ऐश्वर्ययुक्त योगमायेला - कः वेद - कोण जाणतो. ॥२०॥

इत्थं पितुः वाक्यं आकर्ण्य - याप्रमाणे पित्या वसुदेवाचे भाषण ऐकून - प्रश्रयानम्रः - सप्रेम नम्र झालेला - सात्वतर्षभः - यादवश्रेष्ठ - भगवान् - श्रीकृष्ण - प्रहसन् श्‍लक्ष्णया गिरा प्रत्याह - हसतहसत मृदुवाणीने म्हणाला. ॥२१॥

तात - अहो ताता - समवेतार्थं - अर्थाने भरलेले - एतत् वः वचः उपमन्महे - हे तुमचे भाषण आम्ही मान्य करितो - यत् - कारण - पुत्रान् नः समुद्दिश्य - पुत्र अशा आम्हाला उद्देशून - तत्त्वग्रामःउदाहृतः - तत्त्वसमूह उपदेशिला गेला. ॥२२॥

यदुश्रेष्ठ - हे यादवश्रेष्ठा वसुदेवा - अहं यूयं असौ आर्यः - मी, तुम्ही, हा बलराम - इमे द्वारकौकसः च - आणि हे द्वारकेत रहाणारे लोक - सचराचरं (जगत्) - स्थावरजंगमात्मक जग - सर्वे अपि - ही सगळी - (एवं) विमृश्याः - याप्रमाणे ब्रह्मच मानावी. ॥२३॥

आत्मा हि एकः - आत्मा हा खरोखर एक आहे - स्वयंज्योतिः नित्यः - स्वयंप्रकाश, अविनाशी - अन्यः - देहादिकांहून वेगळा - निर्गुणः - गुणविरहित असा - आत्मसृष्टैः गुणैः - आत्म्यापासून उत्पन्न झालेल्या गुणांनी - तत्कृतेषु भूतेषु बहुधा ईयते - त्यांनी निर्मिलेल्या भूतांमध्ये अनेक प्रकारांनी अनुभवास येतो. ॥२४॥

खं वायुःज्योतिः आपः भूः - आकाश, वायु, तेज, उदक व पृथ्वी ही भूते - तत्कृतेषु - त्यांच्यापासून झालेल्या पदार्थांमध्ये - यथाशयं नानात्वं (यान्ति) - उपाधींना अनुसरून अनेकपणाला प्राप्त होतात - असौ एकः अपि - हा आत्मा एक असताहि - आविस्तिरोऽल्पभूरि (नानात्वं) - प्रकट, गुप्त, लहान, मोठा, अशा अनेकपणाला - याति - प्राप्त होतो. ॥२५॥

राजन् - हे राजा - एवं - याप्रमाणे - भगवताउदाहृतः वसुदेवः - श्रीकृष्णाकडून बोलला गेलेला वसुदेव - (तत्) श्रुत्वा विनष्टनानाधीः - ते ऐकून ज्याची भेदबुद्धि नष्ट झाली आहे असा - प्रीतमनाः तूष्णीं अभूत् - प्रसन्न झाले आहे मन ज्याचे असा स्तब्ध राहिला. ॥२६॥

कुरुश्रेष्ठ - हे परीक्षिता - अथ तत्र - नंतर तेथे - सर्वदेवता देवकी - सर्व देवता आहेत जीमध्ये अशी देवकी - आत्मजाभ्यां आनीतं गुरोः पुत्रं श्रुत्वा - आपल्या दोघा पुत्रांनी आणिलेल्या सांदीपनी गुरूच्या पुत्राविषयी ऐकून - सुविस्मिता - अत्यंत आश्चर्यचकित झाली. ॥२७॥

कृष्णरामौ - बलराम व श्रीकृष्ण ह्यांना - कंसविहिंसितान् पुत्रान् समाश्राव्य - कंसाने मारिलेल्या आपल्या पुत्रांविषयी ऐकवून - (तान्) स्मरन्ती - त्या पुत्रांना स्मरणारी - वैक्लव्यात् अश्रुलोचना - दुःखाने अश्रु वहात आहेत जीच्या नेत्रांतून अशी - कृपणं प्राह - दीनपणाने बोलली. ॥२८ - अप्रमेयात्मन् रामराम - ज्याच्या स्वरूपाचे मोजमाप करिता येत नाही अशा मनाला आनंद देणार्‍या हे बलरामा - योगेश्वरेश्वर कृष्ण - मोठया योग्यांच्या अधिपते श्रीकृष्णा - अहं - मी - वां - तुम्हा दोघांना - विश्वसृजां ईश्वरौ आदिपूरुषौ वेद - प्रजापतीचे अधिपति व मूळ पुरुष असे जाणते. ॥२९॥

कालविध्वस्तसत्त्वानां उच्छास्त्रवर्तिना - ज्यांचे बळ काळाने नष्ट झाले आहे व जे अधर्माने वागणारे आहेत अशा - भूमेर्भारायमाणानां राज्ञां - पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांच्या - अद्य किल - आज खरोखर - मे - माझ्या ठिकाणी - अवतीर्णौ - तुम्ही दोघे अवतरला आहा. ॥३०॥

विश्वात्मन् - हे जगन्मूर्ते श्रीकृष्णा - अहं - मी - यस्य अंशांशांशभागेन विश्वोत्पत्तिलयोदयाः किल भवन्ति - ज्याच्या अंशाच्या अंशाच्याहि अंशाच्या विभागाने जगाची उत्पत्ति, स्थिति व संहार ही खरोखर होतात - तं त्वा अद्य गतिं गता - त्या तुला मी आज शरण आले आहे. ॥३१॥

गुरुणा - सांदीपनीने - चिरान्मृतसुतादाने - पुष्कळ काळापूर्वी मृत झालेल्या पुत्राला आणण्यासाठी - कालचोदितौ (युवाम्) - योग्य काळी प्रेरिलेले तुम्ही दोघे - गुरवे गुरुदक्षिणां (इति) - गुरूला गुरुदक्षिणा म्हणून - पितृस्थानात् आनिन्यथुः - यमलोकातून आणिते झालात. ॥३२॥

योगेश्वरेश्वरौ युवां - मोठया योग्यांचेहि अधिपति असे तुम्ही दोघे - तथा मे कामं कुरुतं - तशाच रीतीने माझी इच्छा पूर्ण करा - भोजराजहतान् - कंसाने मारिलेल्या - पुत्रान् - पुत्रांना - (युवाभ्यां) आहृतान् - तुम्ही परत आणिलेले - द्रष्टुं - पहाण्यास - कामये - इच्छिते. ॥३३॥

भारत - हे परीक्षित राजा - एवं मात्रा संचोदितौ रामः कृष्णः च - याप्रमाणे आईने प्रेरिलेले बलराम व श्रीकृष्ण - योगमायां उपाश्रितौ - योगमायेचा आश्रय करून - सुतलं संविविशतुः - सुतलामध्ये गेले. ॥३४॥

तस्मिन् - त्या सुतलात - प्रविष्टौ - शिरलेले - विश्वात्मदैवं - सर्व जगाचे दैवत असे - तथा सुतरां आत्मनः दैवं - तसेच विशेषेकरून आपले दैवत असे - (तौ) उपलभ्य - ते बलराम व कृष्ण पाहून - तद्दर्शना हृलादपरिप्लुताशयः - त्याच्या दर्शनाने झालेल्या आनंदाने भरून गेले आहे हृदय ज्याचे असा - दैत्यराट् - दैत्यांचा राजा बळी - सद्यः समुत्थाय - तत्काळ उठून - सान्वयः - आपल्या कुटुंबासह - ननाम - नमस्कार करिता झाला. ॥३५॥

सवृन्दः (सः) - परिवारासह बलिराजा - निविष्टयोः तयोः - प्रविष्ठ झालेल्या त्या दोघांसाठी - मुदा वरासनं समानीय - आनंदाने श्रेष्ठ आसन देऊन - तत्र तयोः महात्मनोः पादौ अवनिज्य - तेथे त्या महात्म्यांचे पाय धुऊन - तज्जलं दधार - ते उदक धारण करिता झाला - यत् अम्बु ह आब्रह्म (जगत्) पुनत् (वरीवर्ति) - जे उदक खरोखर ब्रह्मदेवापर्यंत सर्व जगाला पवित्र करीत शोभत आहे. ॥३६॥

सः - तो बलिराजा - विभूतिभिः - मोठमोठया ऐश्वर्ययुक्त अशा - महार्हवस्त्राभरणानुलेपनैः - मोठी मूल्यवान वस्त्रे, अलंकार, चंदनादि उटी यांनी - ताम्बूलदीपामृतभक्षणादिभिः - विडे, दीप, मधुर असे खाण्याचे पदार्थ इत्यादिकांनी - च स्वगोत्रवित्तात्मसमर्पणेन - आणि स्वतःचे कुल व द्रव्य यांसहित स्वतःला अर्पण करून - तौ समर्हयामास - त्या दोघांची पूजा करिता झाला. ॥३७॥

नृप - हे परीक्षित राजा - भगवत्पदाम्बुजं मुहुः बिभ्रत् सः इंद्रसेनः - श्रीकृष्णाच्या चरणकमळाला वारंवार धारण करणारा तो बलिराजा - प्रेमविभिन्नया धिया - प्रेमाने थबथबलेल्या हृदयाने - आनंदजलीकुलेक्षणः - आनंदाश्रूंनी ज्याचे डोळे भरून गेले आहेत असा - प्रहृष्टरोमा गद्‌गदाक्षरम् उवाच ह - रोमांच उत्पन्न झालेला अडखळत बोलला. ॥३८॥

बृहते अनन्ताय नमः - मोठया शेषस्वरूपी तुला नमस्कार असो - वेधसे कृष्णायः नमः - जगत् निर्माण करणार्‍या कृष्णाला नमस्कार असो - साङ्‌ख्ययोगवितानाय परमात्मने ब्रह्मणे (नमः) - सांख्य व योग ह्यांचा प्रसार करणार्‍या ब्रह्मस्वरूपी परमात्म्या तुला नमस्कार असो. ॥३९॥

भूतानां दुष्प्रापं च अपि हि - प्राण्याला मिळण्यास कठीण असेही खरोखर - वां दर्शनम् - तुम्हा दोघांचे दर्शन - (केषांचित्) अदुर्लभम् (भवति) - कित्येकांना सुलभ होते - यत् - कारण - रजस्तमःस्वभावानां नः - रज, तम या गुणांनी युक्त अशा आम्हाला - (युवां) यदृच्छया प्राप्तौ - तुम्ही सहजगत्या भेटला. ॥४०॥

दैत्यदानवगन्धर्वाः - दैत्य, दानव, गंधर्व - सिद्धविद्याधरचारणाः - सिद्ध, विद्याधर, चारण - यक्षरक्षःपिशाचाः (च) भूतप्रमथनायकाः च - यक्ष, राक्षस आणि पिशाच तसेच भूत व प्रमथ यांचे अधिपति - तादृशाः अन्ये च वयं च ते च - तशाचसारखे दुसरे व आम्ही आणि ते सर्व - विशुद्धसत्त्वधाम्नि शास्त्रशरीरिणी त्वयि - अत्यंत शुद्ध, सत्त्व गुणात्मक तेजोरूप अशा, व शास्त्र हेच शरीर आहे ज्याचे अशा तुझ्या ठिकाणी - अद्धा नित्यं निबद्धवैराः (आसन्) - नित्य बांधलेले आहे वैर ज्यांचे असे होते. ॥४१-४२॥

केचन उद्‌बद्धवैरेण भक्त्या - कित्येक उत्कटतेने बांधलेल्या वैराने केलेल्या भक्तीने - केचन कामतः (भक्त्या) - कित्येक कामवासनेने केलेल्या भक्तीने - यथा - जसे - संनिकृष्टाः - तुझ्याकडून जवळ ओढिले गेले - तथा - तसे - सत्त्वसंरब्धाः सुरादयाः न (संनिकृष्टाः) - सत्त्वगुणात्मक देव आदिकरूनहि जवळ ओढिले गेले नाहीत. ॥४३॥

योगेश्वरेश्वर - हे योग्यांच्या नियंत्या कृष्णा - योगेशाः अपि - मोठमोठे योगी सुद्धा - इदं इत्थं इति - हे असे आहे अशा रीतीने - प्रायः - बहुतकरून - तव योगमायां न विदन्ति - तुझ्या योगमायेला जाणत नाहीत - वयं कुतः (विद्मः) - आम्ही कोठून जाणणार ? ॥४४॥

तत् नः प्रसीद - म्हणून आमच्यावर प्रसन्न हो - निरपेक्षविमृग्ययुष्मत्पादारविन्दधिषणान्यगृहान्धकूपात् निष्क्रम्य - निरिच्छ भावनेने शोधण्यास योग्य असे तुमचे जे चरणकमलरूपी आश्रयस्थान त्याहून निराळ्या अशा क्षुद्र गृहरूपी अंधकारमय विहिरीतून बाहेर पडून - विश्वशरणाङ्‌घ्र्युपलब्धवृतिः - विश्वाचे रक्षण करणारे जे वृक्ष त्यांच्या तळापासून मिळविली आहे उपजीविका ज्याने असा - शांतः (सन्) - शांत झालेला असा - एकः - एकटा - उत - किंवा - सर्वसखैः (सह) - सर्वांचे मित्र अशा साधूंसह - चरामि - हिंडेन. ॥४५॥

ईशितव्येश प्रभो - सेवकस्वरूपी जीवांचा स्वामी अशा हे श्रीकृष्णा - अस्मान् शाधि - आम्हाला शिकव - नः निष्पापान् कुरु - आम्हाला निष्पाप कर - यत् श्रद्धया तिष्ठन् पुमान् - ज्यावर श्रद्धा ठेवून रहाणारा पुरुष - चोदनायाः विमुच्यते - धर्माज्ञेतून मुक्त होतो. ॥४६॥

प्रथमे अन्तरे - पहिल्या मन्वन्तरामध्ये - मरीचेः ऊर्णायां षट् पुत्राः आसन् - मरीचि ऋषीपासून ऊर्णेच्या ठिकाणी सहा पुत्र झाले - देवाः - देव - सुतां यभितुं उद्यतं कं - मुलीशी संभोग करण्यास उद्युक्त झालेल्या ब्रह्मदेवाला - वीक्ष्य जहसुः - पाहून हसू लागले. ॥४७॥

ते - ते देव - तेन अवद्यकर्मणा - त्या निंद्य कर्माने - आसुरीं योनिम् अगमन् - असुरयोनीला प्राप्त झाले - अधुना हिरण्यकशिपोः जाताः - तत्क्षणी हिरण्यकशिपूच्या पोटी जन्मास आले - योगमायया नीताः ते - योगमायेने तेथून नेलेले ते. ॥४८॥

राजन् - हे राजा - देवक्याः उदरे जाताः - देवकीच्या उदरी जन्मलेले - कंसविहिंसिताः - कंसाने मारून टाकिले - सा - ती देवकी - तान् स्वान् आत्मजान् शोचति - त्या स्वतःच्या पुत्रांविषयी शोक करीत आहे - इमे ते (तव) अन्तिके अध्यासते - ते हे पुत्र तुझ्या जवळ रहात आहेत.॥४९॥

मातृशोकापनुत्तये - मातेचा शोक दूर करण्यासाठी - एतान् इतः प्रणेष्यामः - ह्या पुत्रांना येथून नेणार आहो - ततः शापाद्विनिर्मुक्ताः - नंतर शापातून मुक्त झालेले - विज्वराः - पीडारहित असे - (देव) लोकं यास्यन्ति - देवलोकी जातील. ॥५०॥

स्मरोद्‌गीथः परिष्वङ्‌गः पतङ्‌ग क्षुद्रभृत् घृणी - स्मर, उद्‌गीथ, परिष्वंग, पतंग, क्षुद्रभृत, घृणी - इमे षट् - हे सहा - मत्प्रसादेन पुनः सद्‌गतिं यास्यन्ति - माझ्या प्रसादाने पुनः सद्‌गतीला जातील. ॥५१॥

इन्द्रसेनेन पूजितौ (तौ रामकृष्णौ) - बलिराजाने पूजिलेले ते बलराम व श्रीकृष्ण - इति उक्त्वा - असे बोलून - तान् पुत्रान् समादाय - त्या मुलांना घेऊन - पुनः द्वारवतीम् एत्य - पुनः द्वारकेत येऊन - मातुः अयच्छताम् - मातेला अर्पिते झाले. ॥५२॥

देवी - देवकी - तान् बालकान् दृष्टवा - त्या मुलांना पाहून - पुत्रस्नेहस्नुतस्तनी - पुत्रप्रेमामुळे जिच्या स्तनांतून दूध गळत आहे अशी - परिष्वज्य अङ्‌कं आरोप्य - आलिंगन देऊन व मांडीवर बसवून - अभीक्ष्णशः मूर्घ्नि अजिघ्रत् - वारंवार मस्तकाला हुंगिती झाली. ॥५३॥

यया सृष्टिः प्रवर्तते - ज्या मायेच्या योगे सृष्टि उत्पन्न होते - (तया) विष्णोः मायया मोहिता - त्या विष्णूच्या मायेने मोहित झालेली देवकी - सुतस्पर्शपरिप्लुता प्रीता - पुत्रांच्या स्पर्शाने आनंदाने भरून गेलेली अशी - स्तनं अपाययत् - स्तन पाजिती झाली. ॥५४॥

गदाभृतः पीतशेष तस्याः अमृतं पयः पीत्वा - गदाधारी श्रीकृष्णाने पिऊन उरलेल्या त्या देवकीच्या मधुर दुधाचे प्राशन करून - नारायणाङ्‌गसंस्पर्शप्रतिलब्धात्मदर्शनाः - नारायणाच्या शरीरस्पर्शाने झाले आहे स्वस्वरूपाचे दर्शन ज्यांना असे - ते - ते पुत्र - गोविन्दं देवकीं पितरं बलं नमस्कृत्य - श्रीकृष्ण, देवकी, वसुदेव व बलराम ह्यांना नमस्कार करून - सर्वभूतानां मिषतां - सर्व लोकांसमक्ष - दिवौकसां धाम ययुः - देवांच्या लोकाला गेले. ॥५५-५६॥

नृप - हे राजा - देवकी देवी - देवकी माता - तं मृतागमननिर्गमं दृष्टवा - त्या मृत पुत्रांचे येणे व पुनः जाणे हे पाहून - सुविस्मिता - आश्चर्यचकित झालेली - (तां) कृष्णस्य रचितां मायां मेने - ती कृष्णाने रचिलेली माया मानिती झाली. ॥५७॥

भारत - हे परीक्षित राजा - अनन्तवीर्यस्य परमात्मनः कृष्णस्य - अगणित पराक्रम करणार्‍या परमात्म्या श्रीकृष्णाची - एवंविधानि अनन्तानि अद्‌भुतानि वीर्याणि - अशा प्रकारची अगणित आश्चर्यकारक पराक्रमाची कृत्ये - सन्ति - आहेत. ॥५८॥

यः - जो कोणी - भगवतिकृतचित्तः - भगवंताच्या ठिकाणी ठेविले आहे अन्तःकरण ज्याने असा - व्यासपुत्रेः वर्णितं - व्यासपुत्र जे शुकाचार्य त्यांनी वर्णिलेले - जगदघभित् - जगातील पातकांचा नाश करणारे - तद्‌भक्तसत्कर्णपूरं - त्या भगवद्‌भक्तांचा कानात घालण्याचा उत्तम अलंकार असे - अमृतकीर्तेः मुरारेः इदं चरितं - अविनाशी आहे कीर्ती ज्याची अशा श्रीकृष्णाचे हे चरित्र - अलं अनुश्रृणोति श्रावयेत वा - मनःपूर्वक श्रवण करील किंवा ऐकवील - (सः) तत्क्षेमधाम याति - तो त्या परमेश्वराच्या कल्याणमय स्थानाला जाईल. ॥५९॥

पंचाऐंशीवा अध्याय समाप्त

GO TOP