श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ८४ वा - अन्वयार्थ

वसुदेवांचा यज्ञोत्सव -

अथ - नंतर - पृथा - कुंती - सुबलपुत्री याज्ञसेनी - गांधारी, द्रौपदी - माधवी - सुभद्रा - अथ - त्याचप्रमाणे - क्षितिपपत्‍न्यः - राजस्त्रिया - उत सर्वाः स्वगोप्यः - आणि कृष्णाची भक्ति करणार्‍या सर्व गोपी - अखिलात्मनि हरौ कृष्णे - सर्वांचा अंतर्यामी अशा श्रीकृष्णस्वरूप श्रीहरीच्या ठिकाणी - (तासाम् स्त्रीणाम्) प्रणयानुबन्धं अलं विसिस्म्युः - अश्रुबिंदूंनी व्याप्त झाले आहेत डोळे ज्यांचे अशा अत्यंत आश्चर्य करित्या झाल्या. ॥१॥

एवं - याप्रमाणे - स्त्रीभिः स्त्रीषु संभाषमाणासु - स्त्रियांशी स्त्रिया बोलत असता - नृभिः (च) नृषु (संभाषमाणेषु) - आणि पुरुष पुरुषांशी बोलत असता - मुनयः - ऋषि - कृष्णरामदिदृक्षया - कृष्ण व बलराम यांचे दर्शन घेण्याच्या इच्छेने - तत्र आययुः - तेथे आले. ॥२॥

द्वैपायनः नारदः च च्यवनः देवलः असितः - द्वैपायन, नारद आणि च्यवन, देवल, असित - विश्वामित्र शतानन्दः भरद्वाजः अथ गौतमः - विश्वामित्र, शतानन्द, भरद्वाज आणि गौतम ॥३॥

सशिष्यः भगवान् रामः - शिष्यांसह भगवान परशुराम - वसिष्ठः गालवः भृगुः - वसिष्ठ, गालव, भृगु - पुलस्त्यः कश्यपः अत्रिः च - पुलस्त्य, कश्यप व अत्रि - मार्कण्डेयः बृहस्पतिः - मार्कंडेय, बृहस्पति. ॥४॥

द्वितः त्रितः च एकतः - द्वित, त्रित व एकत - तथा च ब्रह्मपुत्रः अंगिराः - त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाचा पुत्र अंगिरा ऋषि - अगस्त्यः याज्ञवल्क्यः च - अगस्त्य आणि याज्ञवल्क्य - अपरे वामदेवादयः - दुसरे वामदेव आदि करून ऋषि. ॥५॥

प्रागासीना नृपादयः - पूर्वी तेथे असलेले राजे आदिकरून - पाण्डवाः कृष्णरामौ च - पांडव, तसेच श्रीकृष्ण व बलराम - विश्ववन्दितान् तान् दृष्टवा - सर्वांनी वंदिलेल्या त्या ऋषींना पाहून - सहसा उत्थाय - तत्काळ उठून - प्रणेमुः - नमस्कार करिते झाले. ॥६॥

सर्वे - सर्व - यथा - यथाविधि - तान् आनर्चुः - त्या ऋषींना पूजिते झाले - सहरामः अच्युतः - बलरामासह श्रीकृष्ण - स्वागतासनपाद्यार्घ्यमाल्यधूपानुलेपनैः - कुशल प्रश्न, बसायला आसन, पाय धुणे, अर्घ्य, पुष्पे, धूप व चंदन यांनी - अर्चयत् - पूजिता झाला. ॥७॥

धर्मगुप्तनुः भगवान् - धर्माला राखणारे आहे शरीर ज्याचे असा भगवान श्रीकृष्ण - सुखं आसीनान् (ऋषीन्) - सुखाने बसलेल्या ऋषींना - यतवाचः तस्य महतः सदसः अनुशृण्वतः - नियंत्रित आहे वाणी जीची अशी ती मोठी सभा ऐकत असता - उवाच - म्हणाला. ॥८॥

अहो वयं जन्मभृतः - अहो खरोखर आमचा जन्म आज सफल झाला - तत्फलम् (नः) कार्त्स्न्येन लब्धम् - त्या जन्माचे फळ आम्हाला पूर्ण मिळाले - यत् देवानाम् अपि दुष्प्रापं योगेश्वरदर्शनं (नः जातम्) - कारण देवानाहि दुर्लभ असे महायोग्याचे दर्शन आम्हाला घडले. ॥९॥

स्वल्पतपसां - थोडी आहे तपश्चर्या ज्यांची अशा - अर्चायां देवचक्षुषां - मूर्तीच्या ठिकाणी देवदृष्टि आहे ज्यांची अशा - नृणां - मनुष्यांना - योगेश्वराणाम् - योगेश्वर मुनींचे - दर्शनस्पर्शनप्रश्नप्रह्वपादार्चनादिकम् - दर्शन, स्पर्श, कुशल प्रश्न, नमस्कार व पायांची पूजा इत्यादि - किम् - कसे घडणार ? ॥१०॥

अम्मयानि तीर्थानि (दर्शनात्) न (पुनन्ति) हि - गंगादि जलमय तीर्थे दर्शन घेताक्षणीच पवित्र करीत नाहीत - मृच्छिलामयाः देवाः (दर्शनात् एव) न (पुनन्ति) - मातीचे व पाषाणाचे देव दर्शन घेताक्षणीच पवित्र करीत नाहीत - ते उरुकालेन पुनन्ति - ते पुष्कळ काळाने पवित्र करितात - साधवः दर्शनात् एव (पुनन्ति) - साधु दर्शन घेताक्षणीच पवित्र करितात. ॥११॥

अग्निः न - अग्नि नव्हे - सूर्यः न - सूर्य नव्हे - चंद्रतारकाः च न - चंद्र व नक्षत्रे नव्हेत - भूः न - पृथ्वी नव्हे - जलं खं श्वसनः (च) - उदक, आकाश व वायु - अथ वाक् मनः (च) - तसाच वाणी व मन - (एते) भेदकृतः - हे सर्व भेदबुद्धि उत्पन्न करणारे - उपासिताः (सन्तः) - उपासिले असता - अघं हरन्ति - पाप दूर करितात - विपश्चितः - ज्ञानी असे साधु - मुहूर्तसेवया (एव तत्) घ्नन्ति - थोडया सेवेनेच पाप दूर करितात. ॥१२॥

यस्य - ज्याची - त्रिधातुके कुणपे - वात, पित्त व कफ ह्या तीन धातूंनी निर्मिलेल्या शरीराच्या ठिकाणी - आत्मबुद्धिः (भवति) - हाच आत्मा अशी बुद्धि होते - कलत्रादिषु स्वधीः - स्त्रीपुत्रादिकांच्या ठिकाणी हेच स्वकीय अशी कल्पना होते - भौ‌मे - भूमीपासून होणार्‍या काष्ठपाषाण इत्यादि पदार्थाच्या ठिकाणी - इज्यधीः - याच देवता अशी बुद्धि असते - यत् - ज्याची - सलिले तीर्थबुद्धिः - उदकाच्या ठिकाणी हेच तीर्थ अशी बुद्धि होते - (किंतु) अभिज्ञेषु जनेषु (तीर्थबुद्धिः) कर्हिचित् न - पण ज्ञानी लोकांच्या ठिकाणी हे पवित्र आहेत अशी बुद्धि कधीही नाही - सः गोखरः एव - तो पशूंमध्ये गाढवासारखा होय. ॥१३॥

इत्थं - याप्रमाणे - अकुण्ठमेधसः भगवतः कृष्णस्य - अकुण्ठबुद्धीच्या भगवान श्रीकृष्णाचे - दुरन्वयं - समजण्यास कठीण असे - वचः निशम्य - भाषण श्रवण करून - विप्राः - ते ब्राह्मण - भ्रमद्धियः (भूत्वा) - घोटाळली आहे बुद्धि ज्यांची असे होऊन - तूष्णीम् आसन् - स्वस्थ राहिले. ॥१४॥

मुनयः - ऋषि - ईश्वरस्य ईशितव्यतां चिरं विमृश्य - नियन्ता असा जो श्रीकृष्ण त्याने स्वीकारिलेल्या ईश्वराधीनपणाविषयी बराच विचार केल्यावर - (अयं) जनसंग्रहः इति (निश्चित्य) - तो ईश्वराधीनपणा लोकहितास्तव होय असा निश्चय करून - स्मयंतः - हसत - तं जगद्‌गुरुं उचुः - त्या जगद्‌गुरु श्रीकृष्णाला म्हणाले. ॥१५॥

विश्वसृजाम् अधीश्वराः - प्रजापतीचे अधिपति असे - तत्त्वविदुत्तमाः वयं - ज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ असे आम्ही - यन्मायया विमोहिताः - ज्याच्या मायेने मोहित झालो - यत् - ज्या अर्थी - गूढः - गुप्त असा - ईहया - कर्माने - ईशितव्यायति - ईश्वराधीन झाल्यासारखा वागतो - अहो विचित्रं भगवद्विचेष्टितं - भगवंताचे आचरण किती आश्चर्यकारक आहे बरे. ॥१६॥

अनीहः (सः) - निरिच्छ असा तो ईश्वर - एकः (सन्) - एकच असून - यथा भूमिः हि भौ‍मेः बहुनामरूपिणी (तथा) - ज्याप्रमाणे पृथ्वी खरोखर एकच असून तिच्यापासून उत्पन्न झालेल्या अनेक पदार्थामुळे अनेक नावे व रूपे धारण करिते त्याप्रमाणे - एतत् - हे जग - आत्मना - स्वतःच - बहुधा - पुष्कळ प्रकाराने - सृजति - उत्पन्न करितो - अवति - रक्षितो - अत्ति - खाऊन टाकतो - (किन्तु) न बद्‌ध्यते - पण बद्ध होत नाही - अहो - अहो - विभूम्नः चरितं विडम्बनम् (अस्ति) - परमेश्वराचे चरित्र अनुकरणच होय. ॥१७॥

अथापि - तरी सुद्धा - वर्णाश्रमात्मा परः पुरुषः भवान् - चारहि वर्ण व आश्रम हे ज्याचे स्वरूप आहे असा श्रेष्ठ पुरुष तू - काले - योग्य काळी - स्वजनाभिगुप्तये - आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी - खलनिग्रहाय च - आणि दुष्टांच्या नाशासाठी - सत्त्वं बिभर्षि - सत्त्वगुण धारण करतोस - स्वलीलया सनातनं वेदपथं च (बिभर्षि) - आणि स्वतः लीलेने पुरातन वेदमार्गाला धारण करितोस. ॥१८॥

ब्रह्म ते शुक्लं हृदयम् - वेद म्हणजे तुझे निर्मळ हृदय आहे - यत्र - ज्या वेदांमध्ये - व्यक्तं - कार्यरूपी जग - अव्यक्तं - कारणरूपी प्रकृति - ततः परं च सत् - आणि त्या कार्यकारणांहून पलीकडे असणारे परब्रह्म - तपःस्वाध्यायसंयमैः उपलब्धं - तपश्चर्या, वेदाध्ययन व योग प्राप्त होणारे आहे. ॥१९॥

तस्मात् - म्हणून - ब्रह्मन् - हे ब्रह्मरूपी श्रीकृष्णा - शास्त्रयोनेः आत्मनः सद्धाम - शास्त्राचे उत्पत्तिकारण अशा तुज आत्मरूपी ईश्वराचे श्रेष्ठ प्राप्तिस्थान अशा - ब्रह्मकुलं - ब्राह्मणकुळाला - सभाजयसि - पूजितोस - तत् - त्या कारणास्तव - भवान् - आपण - ब्रह्मण्याग्रणीः (अस्ति) - ब्राह्मणांच्या हितकर्त्यामध्ये श्रेष्ठ आहा. ॥२०॥

सद्‌गत्या त्वया संगम्य - साधूंना गति देणार्‍या अशा तुझ्याशी ऐक्य पावून - अद्य नः जन्मसाफल्यं (जातम्) - आज आमच्या जन्माचे सार्थक झाले - विद्यायाः तपसः दृशः (साफल्यं) - विद्याध्ययनाचे, तपश्चर्येचे व ज्ञानदृष्टीचेहि सार्थक झाले - यत् - कारण - (त्वं) श्रेयसां परः अन्तः - तू कल्याणाची पराकाष्ठा आहेस. ॥२१॥

अकुण्ठमेधसे - ज्याची धारणाशक्ति कधीहि कुंठित होत नाही अशा - स्वयोगमायया छन्नमहिम्ने - आपल्या मायेने ज्याने आपले माहात्म्य झाकून टाकिले आहे अशा - परमात्मने - श्रेष्ठ आत्मरूपी अशा - तस्मै भगवते कृष्णाय नमः - त्या भगवान श्रीकृष्णाला नमस्कार असो. ॥२२॥

अमी भूपाः - हे राजे - एकारामाः वृष्णयः च - आणि एकाच ठिकाणी भोजनादि करणारे यादव - यं - ज्या कृष्णाला - मायाजवनिकाछन्नं आत्मानं - मायेच्या पडद्यामुळे आच्छादिलेल्या परमात्म्याला - कालं ईश्वरं - काळस्वरूपी परमेश्वर असे - न विदंति - जाणत नाहीत. ॥२३॥

यथा शयानः पुरुषः - जसा निजलेला पुरुष - गुणतत्त्वदृक् - स्वप्नातील पदार्थांना खर्‍या दृष्टीने पहाणारा - नाममात्रेन्द्रियाभातं आत्मानं - नावे, विषय, व इंद्रिये यांनी भासणार्‍या स्वतःला - रहितं परं न वेद - त्या नामादिकांनी विरहित अशा खर्‍या स्वरूपाने जाणत नाही. ॥२४॥

एवं - याप्रमाणे - स्मृत्युपप्लवात् - स्मृतीचा नाश झाल्यामुळे - नाममात्रेषु विषयेषु - केवळ नावानेच अस्तित्वात असणार्‍या विषयांच्या ठिकाणी - इन्द्रियेहया मायया - इंद्रियांची प्रवृत्ति करणार्‍या मायेने - विभ्रमच्चितः (भूत्वा) - भ्रम पावत आहे चित्त ज्याचे असा होऊन - त्वा न वेद - तुला जाणत नाही. ॥२५॥

अद्य तस्य ते - आज त्या तुझ्या - सुविपकयोगैः हृदिकृतं - अत्यंत पूर्णावस्थेला पोचलेल्या योगसाधनांनी हृदयांत साठविलेल्या - तीर्थास्पदं - गंगादि तीर्थांचे आश्रयस्थान अशा - अघौघमर्षं अंघ्रि ददृशिम - पातक समूहांचा नाश करणार्‍या चरणाला पाहिले आहे - उत्सिक्तभक्त्युपहताशयजीवकोशाः - वाढलेल्या भक्तीने नष्ट झाला आहे वासनारूपी प्राणमय कोश ज्यांचा असे पुरुष - भवद्‌गतिं आपुः - तुझ्या गतीला प्राप्त झाले - अथ भक्तान् अनुगृहाण - म्हणून भक्तांवर अनुग्रह कर. ॥२६॥

राजर्षे - हे परीक्षित राजा - मुनयः - ऋषि - इति - याप्रमाणे - दाशार्हं धृतराष्ट्रं युधिष्ठिरं अनुज्ञाप्य - श्रीकृष्ण, धृतराष्ट्र व धर्मराज यांचा निरोप घेऊन - स्वाश्रमान् गन्तुं मनः दधिरे - आपल्या आश्रमाला जाण्यासाठी मनात विचार करिते झाले. ॥२७॥

सुयन्त्रितः महायशाः वसुदेवः - उत्तम इंद्रियनिग्रह केलेला मोठा कीर्तिमान वसुदेव - तत् वीक्ष्य - ते पाहून - तान् उपव्रज्य - त्या ऋषीजवळ जाऊन - प्रणम्य - नमस्कार करून - (पादौ) उपसंगृह्य च - व पाय धरून - इदं बभाषे - याप्रमाणे बोलला. ॥२८॥

ऋषयः - हे ऋषि हो - सर्वदेवेभ्यः वः नमः - सर्व देव आहेत ज्यांच्या ठिकाणी अशा तुम्हाला नमस्कार असो - (मम वचः) श्रोतुम् अर्हथ - तुम्ही माझे म्हणणे ऐकून घेण्यास योग्य आहा - कर्मणा कर्मनिर्हारः यथा स्यात् - कर्मानेच कर्मफलांचा निरास जेणेकरून होईल - तत् नः उच्यतां - ते आम्हाला सांगा. ॥२९॥

विप्राः - ब्राह्मण हो - वसुदेवः - वसुदेव - बुभुत्सया - जाणण्याच्या इच्छेने - कृष्णं अर्भकं मत्वा - कृष्णाला मुलगा असे मानून - यत् आत्मनः श्रेयः नः पृच्छति - जे स्वतःच्या कल्याणाविषयी आम्हाला विचारीत आहे - इदं अतिचित्रं न - हे काही विशेष आश्चर्य करण्यासारखे नाही. ॥३०॥

अत्र येथे - मर्त्यानां - मनुष्यांचा - सन्निकर्षः - अतिनिकट संबंध - अनादरणकारणम् - अनादराला कारणीभूत होतो - शुद्धये - शुद्धिसाठी - गांगं (जलं) हित्वा - गंगोदक सोडून - तत्रत्यः (जनः) - गंगातीरी रहाणारा मनुष्य - अन्यांभः याति - दुसर्‍या उदकाकडे जातो. ॥३१॥

यस्य अनुभूतिः - ज्याचे ज्ञान - अस्य लयोत्पत्यादिना - ह्या विश्वाचा संहार, उत्पत्ति इत्यादिकांनी - कालेन - कालाकडून - स्वतः अन्यस्मात् च - स्वतः किंवा दुसर्‍या कारणामुळे - गुणतः च कुतश्चन - गुणांपासून आणि कोठूनहि - वै न रिष्यति - नाश पावत नाहीच. ॥३२॥

अन्यः - दुसरा पुरुष - क्लेशकर्म परिपाकगुणप्रवाहैः - क्लेशदायक कर्मे व त्यांचा जो सुखदुःखादि फलरूप परिणाम त्यांनी व सत्त्वादि गुणांच्या अखंड प्रवाहांनी - अव्याहतानुभवं - ज्याचे ज्ञान नष्ट झाले नाही अशा - तं अद्वितीयं ईश्वरं - त्या एकच एक अशा परमेश्वराला - मेघहिमोपरागैः उपगूढं सूर्यम् इव - ढग, धुके आणि ग्रहण यांनी आच्छादिलेल्या सूर्याप्रमाणे - प्राणादिभिः स्वविभवैः - प्राणादिक स्वतःच्या ऐश्वर्यांनी - उपगूढं मन्यते - आच्छादिलेला मानितो. ॥३३॥

राजन् - हे परीक्षित राजा - अथ मुनयः - नंतर सर्व ऋषि - सर्वेषां राज्ञां शृण्वताम् - सर्व राजे श्रवण करीत असता - तथा एव अच्युतरामयोः (शृण्वतोः) - त्याचप्रमाणे श्रीकृष्ण व बलराम श्रवण करीत असता - आनकदुन्दुभिं आभाष्य - वसुदेवाला उद्देशून - ऊचुः - बोलले. ॥३४॥

यत् - जे - श्रद्धया - श्रद्धेने - मखैः - यज्ञांनी - सर्वयज्ञेश्वरं विष्णुं यजेत् - सर्व यज्ञांचा अधिपति अशा विष्णूला पुजावे - एषः - हा - कर्मणा कर्मनिर्हारः साधुनिरूपितः - कर्माने कर्मफलाचा नाश करण्याचा उत्तम उपाय सांगितला आहे. ॥३५॥

कविभिः शास्त्रचक्षुषा - विद्वानांनी शास्त्ररूपी नेत्राने - अयं वै - हीच - चित्तस्य उपशमः - अन्तःकरणाची शांति - सुगमः योगः - सोपा सद्‌गति मिळण्याचा मार्ग - आत्ममुदावहः धर्मः च - आणि आत्म्याला आनंद देणारा धर्म - दर्शितः - दाखविला आहे. ॥३६॥

यत् - जे - श्रद्धया - श्रद्धेने - शुक्लेन - शुद्ध अशा - आप्तवित्तेन - मिळविलेल्या द्रव्याने - पुरूषः इज्येत - परमेश्वर पूजिला जातो - अयं पन्थाः - हा मार्ग - गृहमेधिनः द्विजातेः - गृहस्थाश्रमी द्विजाला - स्वस्त्ययनः (उक्तः) - कल्याणकारक म्हणून सांगितला आहे. ॥३७॥

देव - हे वसुदेवा - बुधः - ज्ञानी पुरुष - यज्ञदानैः वित्तैषणाम् - यज्ञांनी व दानांनी द्रव्यविषयक इच्छेला - गृहैः दारसुतैषणाम् - गृहांनी स्त्रीपुत्रविषयक इच्छेला - कालेन आत्मलोकैषणां - कालाने स्वर्गादि लोकांच्या इच्छेला - विसृजेत् - सोडून देवो - सर्वे धीराः - सर्व ज्ञानी पुरुष - ग्रामे त्यक्तैषणाः - गावात टाकिल्या आहेत सर्व इच्छा ज्यांनी असे - तपोवनं ययुः - तपोवनात गेले. ॥३८॥

प्रभो - हे वसुदेवा - द्विजः - द्विज - देवर्षिपितृणां त्रिभिः ऋणैः - देव, ऋषि व पितर ह्यांच्या तीन ऋणांनी - जातः - उत्पन्न झालेला असतो - तानि यज्ञाध्ययनपुत्रैः अनिस्तीर्य (संसारं) त्यजन् पतेत् - यज्ञ, वेदाध्ययन व पुत्रोत्पादन यांनी त्या तीन ऋणांतून मुक्त न होता जर संसाराचा त्याग करील तर अधोगतीला जाईल. ॥३९॥

महामते - हे महाबुद्धिमन्ता वसुदेवा - अद्य तु - आज तर - त्वं - तु - ऋषिपित्रोः द्वाभ्यां वै मुक्तः - ऋषि व पितर अशा दोन ऋणांतून खरोखर मुक्त झाला आहेस - यज्ञैः देवर्णम् उन्मुच्य - यज्ञांनी देवांचे ऋण फेडून - निऋणः अशरणः भव - फिटली आहेत ऋणे ज्याची असा घराविरहित हो. ॥४०॥

वसुदेव - हे वसुदेवा - भवान् नूनं - तू खरोखर - परमया भक्त्या - मोठया भक्तीने - जगताम् ईश्वरं हरिं प्रार्चः - जगांचा स्वामी अशा जगच्चालक भगवंताचे पूजन केलेस - यत् - ज्या अर्थी - सः वां पुत्रतां गतः - तो तुमच्या पुत्रपणाला प्राप्त झाला आहे. ॥४१॥

महामनाः वसुदेवः - थोर अन्तःकरणाचा वसुदेव - इति तद्वचनं श्रुत्वा - याप्रमाणे त्यांचे भाषण ऐकून - तान् ऋषीन् मूर्ध्ना आनम्य - त्या ऋषींना मस्तकाने नमस्कार करून - प्रसाद्य च - व प्रसन्न करून - ऋत्विजः वव्रे - ऋत्विज म्हणून वरिता झाला. ॥४२॥

राजन् - हे परीक्षित राजा - धर्मेण वृताः ते ऋषयः - धर्माने वरिलेले ते ऋषि - तस्मिन् क्षेत्रे - त्या ठिकाणी - उत्तमकल्पकैः मखैः - चांगल्या रीतीने साहित्य ज्यांत संपादिले आहे अशा यज्ञांनी - धार्मिकं एनं अयाजयन् - धर्माचरण करणार्‍या त्या वसुदेवाकडून यज्ञ करविते झाले. ॥४३॥

राजन् - हे परीक्षित राजा - तद्दीक्षायां प्रवृत्तायां - त्या यज्ञाची दीक्षा चालू असता - पुष्करस्रजः वृष्णयः - कमळांच्या माळा घातलेले यादव - स्नाताः सुवाससः सुष्ठ्‌वलंकृताः राजानः - स्नान केलेले, सुंदर वस्त्रे नेसलेले व उत्तम अलंकार धारण केलेले राजे - च - आणि - निष्ककण्ठयः सुवाससः - गळ्यात सुवर्णाचे अलंकार घातलेल्या व सुंदर वस्त्रे नेसलेल्या - तन्महिष्यः - त्या राजांच्या पटटराण्या - मुदिताः आलिप्ताः वस्तुपाणयः - आनंदित झालेल्या, उटी लाविलेल्या व हातांत साहित्य घेतलेल्या अशा - दीक्षाशालाम् उपाजग्मुः - यज्ञमंडपाजवळ आल्या. ॥४४-४५॥

मृदंगपटहशंखभेर्यानकादयः नेदुः - मृदंग, नगारे, शंख, चौघडे, ढोल इत्यादि वाजू लागले - नटनर्तक्यः ननृतुः - नट व नाचणार्‍या स्त्रिया नाचू लागल्या - सूतमागधाः तुष्टुवुः - सूत व स्तुतिपाठक स्तुति करू लागले - सुकण्ठयः गंधर्व्यः सहभर्तृकाः - सुंदर आवाज असलेल्या अप्सरा आपापल्या पतींसह - संगीतं जगुः - गाणी गाऊ लागल्या. ॥४६॥

ऋत्विजः - ऋत्विज - अष्टादशाभिः पत्‍नीभिः - अठरा स्त्रियांसह - उडुभिः सोमराजम् इव - रोहिण्यादि सत्तावीस नक्षत्रांसह चंद्राला अभिषेक करावा त्याप्रमाणे - अक्तं अभ्यक्तं (च) - नेत्रांत काजळ घातलेल्या व सर्वांगाला लोणी लाविलेल्या - तं - त्या वसुदेवाला - विधिवत् अभ्यषिंचन् - यथाशास्त्र अभिषेकिते झाले. ॥४७॥

दीक्षितः अजिनसंवृतः (सः) - यज्ञदीक्षा घेतलेला व मृगचर्म परिधान केलेला तो वसुदेव - दुकूलवलयैः हारनूपुरकुण्डलैः - रेशमी वस्त्रे व सुवर्णकंकणे आणि मोत्यांचे हार, पैंजणे व कुंडले यांनी युक्त अशा - स्वलंकृताभिः ताभिः - अलंकार धारण केलेल्या त्या स्त्रियांसह - विबभौ - चांगला शोभला. ॥४८॥

महाराज - हे परीक्षित राजा - रत्‍नकौशेयवाससः - रत्‍ने व रेशमी वस्त्रे धारण करणारे - तस्य ते ऋत्विजः - त्या वसुदेवाच्या यज्ञातील ते ऋत्विज - ससदस्याः - सभासदांसह - यथा वृत्रहणः अध्वरे - जसे इंद्राच्या यज्ञात तसे - विरेजुः - शोभले. ॥४९॥

तदा - त्यावेळी - स्वैः स्वैः बन्धुभिः स्वसुतैः दारैः अन्वितौ जीवेशौ - आपले बंधु, आपले पुत्र व स्त्रिया यांनी युक्त असे जीवांचे स्वामी - रामः च कृष्णः च - बलराम व श्रीकृष्ण - स्वाविभूतिभिः रेजतुः - आपापल्या ऐश्वर्यांनी शोभले - अग्निहोत्रादिलक्षणैः प्राकृतैः वैकृतैः (च) यज्ञैः - अग्निहोत्र इत्यादि लक्षणांनी युक्त अशा प्राकृत व वैकृत यज्ञांनी - द्रव्यज्ञानक्रियेश्वरं - पुरोडाशादि द्रव्य, मंत्रज्ञान व विधि यांचा अधिपति अशा यज्ञ नारायणाला - विधिना - शास्त्रोक्त विधीने - अनुयज्ञं ईजे - प्रत्येक यज्ञात पूजिता झाला. ॥५०-५१॥

अथ - नंतर - महाधनः सः - मोठा धनवान असा वसुदेव - काले - योग्य काळी - यथाम्नातं - शास्त्रात सांगितल्याप्रमाणे - गोभूकन्याः अलंकृत्य - गाई, पृथ्वी व कन्या ह्यांच्या अंगावर अलंकार घालून - स्वलंकृतेभ्यः ऋत्विग्भ्यः - अलंकार घातलेल्या ब्राह्मणांना - दक्षिणाः अददात् - दक्षिणा देता झाला. ॥५२॥

ते विप्राः महर्षयः - ते ज्ञानी महर्षि - पत्‍नीसंयाजावभृथ्यैः - पत्‍नीकडून जे संयाज नामक यज्ञांग कर्म केले जाते ते व अवभृथ स्नान यांनी - चरित्वा - अनुष्ठान करून - यजमानपुरःसराः - यजमान आहे पुढे चालणारा ज्यांच्या असे - रामह्लदे सस्नुः - रामडोहामध्ये स्नान करिते झाले. ॥५३॥

स्नातः स्वलंकृतः (सः) - स्नान केलेला व अलंकार घातलेला तो वसुदेव - बंदिभ्यः अलंकारवासांसि अदात् - स्तुतिपाठकांना अलंकार व वस्त्रे देता झाला - तथा स्त्रियः - त्याप्रमाणे स्त्रियांना - ततः - नंतर - आश्वभ्यः वर्णान् - कुत्र्यापासून उच्च वर्णाच्या लोकांपर्यंत सर्वांना - अन्नेन (अ) पूजयत - अन्न देऊन पूजिता झाला. ॥५४॥

भूयसा पारिबर्हेण - मोठया अहेरांनी - सदारान् ससुतान् बन्धून् - पत्‍नींसहित व पुत्रांसहित अशा बन्धूना - विदर्भकोसलकुरून् काशिकेकयसृञ्जयान् (च अपूजयत्) - आणि विदर्भ, कोसल, कुरु, काशि, केकय व सृंजय ह्यांना पूजिता झाला. ॥५५॥

सदस्यर्त्विक्सुरगणान् नृभूतपितृचारणान् (अपूजयत्) - सभासद, ऋत्विज, देवसंघ, मनुष्य, भूते, पितर, चारण ह्यांनाहि पूजिले - श्रीनिकेतं अनुज्ञाप्य - लक्ष्मीचे घर अशा श्रीकृष्णाची अनुज्ञा घेऊन - क्रतुं शंसंतः प्रययुः - यज्ञाची प्रशंसा करीत गेले. ॥५६॥

धृतराष्ट्रः अनुजः (च) - धृतराष्ट्र व त्याचा धाकटा भाऊ विदुर - पार्थाः भीष्मः द्रोणः - पांडव, भीष्म व द्रोण - पृथा - कुंती - यमौ - नकुल, सहदेव - नारदः भगवान् व्यासः (च) - नारद व भगवान व्यास - सुहृत्संबन्धिबान्धवाः - मित्र, संबंधी व बांधव. ॥५७॥

सौहृदाक्लिन्नचेतसः बन्धून् यदून् परिष्वज्य - प्रेमाने ज्यांच्या हृदयाला पाझर फुटला आहे अशा बांधव यादवांना आलिंगन देऊन - विरहकृच्छ्‌रेण स्वदेशान् ययुः - वियोगाने उत्पन्न होणार्‍या दुःखाने स्वदेशाला गेले. ॥५८॥

बृहत्या पूजया अर्चितः नंदः तु - मोठया मानाने पूजिलेला नंद तर - गोपालैः सह - गोपालांसह - बन्धुवत्सलः - बांधवांवर प्रेम करणारा असा - कृष्णरामोग्रसेनाद्यैः न्यवात्सीत् - कृष्ण, बलराम आणि उग्रसेन इत्यादिकांसह राहिला. ॥५९॥

सुहृद्‌वृतः वसुदेवः - मित्रांनी वेष्टिलेला वसुदेव - अञ्जसा मनोरथमहार्णवम् उत्तीर्य - सुलभपणे मनोरथरूपी महासागराला उतरून गेल्यामुळे - प्रीतमनाः - प्रसन्न झाले आहे अन्तःकरण ज्याचे असा - नंदं करे स्पृशन् आह - नंदाचा हात धरून त्याला म्हणाला. ॥६०॥

भ्रातः - हे भाऊ नंदा - यः स्नेहसंज्ञितः नृणां ईशकृतः पाशः - जो स्नेह नावाचा मनुष्यांचा परमेश्वराने निर्मिलेला पाश - तं - त्याला - अहं - मी - योगिनां शूराणाम् अपि - योगी व शूर अशा पुरुषांनाहि - दुस्त्यजं मन्ये - टाकण्यास कठीण मानितो. ॥६१॥

यत् - कारण - कृताज्ञेषु अस्मासु - केलेल्या उपकाराला न जाणणार्‍या आमच्या ठिकाणी - सत्तमैः (युष्माभिः) अर्पिता इयं मैत्री - अत्यंतात्यंत थोर अशा तुम्ही केलेली मैत्री - अप्रतिकल्पा - परत फेड होणारी नाही जीची - अफला अपि वा सती - किंवा जिचे काही फळहि नाही अशी असताहि - कर्हिचित् न निवर्तेत - कधीही फिटत नाही. ॥६२॥

भ्रातः - हे भाऊ नंदा - प्राक् - पूर्वी - अकल्पात् - सामर्थ्याच्या अभावामुळे - वः कुशलं नहि आचराम - तुमचे हित आम्ही केले नाही - अधुना च - आणि आता - श्रीमदान्धाक्षाः पुरः सतः न पश्याम - ऐश्वर्याच्या मदाने आंधळे झालेले असे पुढे असतानाहि तुम्हाला पहात नाही. ॥६३॥

मानद - हे मानदा - श्रेयस्कामस्य पुंसः राज्यश्रीः मा अभूत् - कल्याणेच्छु पुरुषाला राज्यैश्वर्य न मिळो - यया - ज्या राज्यैश्वर्याने - अंधदृक् - आंधळी आहे दृष्टी ज्याची असा - स्वजनान् उत बन्धन् वा न पश्यति - आपल्या आप्तांना किंवा बांधवांना पहात नाही ॥६४॥

एवं सौहृदशैथिल्यचित्तः आनकदुन्दुभिः - याप्रमाणे मित्रप्रेमाने ज्याचे अंतःकरण शिथिल झाले आहे असा वासुदेव - तत्कृतां मैत्रीं स्मरन् - त्या नंदाची मैत्री स्मरुन - अश्रुविलोचनः - अश्रूंनी भरले आहेत डोळे ज्याचे असा - रुरोद - रुदन करु लागला ॥६५॥

सख्युः गोविंदरामयोः (च) प्रेम्णा प्रियकृत् नंदः तु - मित्र वसुदेवाचे व बलराम आणि श्रीकृष्णाचे प्रेमाने प्रिय करणारा नंद तर - अद्य श्वः इति - आज उद्या करिता करिता - यदुभिः मानितः - यादवांनी मान दिलेला असा - त्रीन् मासान् अवसत् - तीन महिने राहिला. ॥६६॥

ततः कामैः पूर्यमाणः (नंदः) - नंतर इच्छित वस्तूंनी परिपूर्ण केलेला नंद - सव्रजः सहबान्धवः - गाईच्या कळपांसह व बांधवांसह - परार्ध्याभरणक्षौ‌मनानानर्घ्यपरिच्छदैः - अति मूल्यवान अलंकार, रेशमी वस्त्रे व अनेक मूल्यवान अहेर यांसह. ॥६७॥

वसुदेवोग्रसेनाभ्यां कृष्णोद्धवबलादिभिः - वसुदेव, उग्रसेन, कृष्ण, उद्धव, बलराम इत्यादिकांनी - दत्तं पारिबर्हम् आदाय - दिलेले आहेर घेऊन - यदुभिः यापितः (ततः) ययौ - यादवांकडून पाठवणी केलेला असा तेथून गेला. ॥६८॥

नंदः गोपाः च गोप्यः च - नंद, गोप व गोपी - गोविंदचरणाम्बुजे क्षिप्तं मनः - श्रीकृष्णाच्या चरणकमलांच्या ठिकाणी लाविलेल्या मनाला - पुनः हर्तुं - पुनः मागे आणण्यास - अनीशाः - असमर्थ अशी - मथुरां ययुः - मथुरेस गेली. ॥६९॥

कृष्णदेवताः वृष्णयः - श्रीकृष्ण आहे देव ज्यांचा असे यादव - बन्धुषु प्रयातेषु - बांधव निघून गेले असता - प्रावृषं आसन्नां वीक्ष्य - पावसाळा जवळ आलेला पाहून - पुनः द्वारवतीं ययुः - पुनः द्वारकेला गेले. ॥७०॥

तीर्थयात्रायां - तीर्थयात्रेमध्ये - यत् - जे - यदुदेवमहोत्सवं - वसुदेवाचा यज्ञमहोत्सव - सुहृत्संदर्शनादिकं (च) - व मित्रांच्या भेटी आदि - आसीत् - घडले - जनेभ्यः कथयांचक्रुः - लोकांना सांगते झाले. ॥७१॥

चौर्‍यायशींवा अध्याय समाप्त

GO TOP