श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७८ वा - अन्वयार्थ

दंतवक्त्र आणि विदूरथाचा उद्धार व तीर्थयात्रेमध्ये बलरामांच्या हातून सूताचा वध -

दुर्मतिः - दुर्बुद्धि दन्तवक्र - परलोकगतानां शिशुपालस्य शाल्वस्य पौंड्रकस्य च अपि - मृत झालेले जे शिशुपाल, शाल्व व पौंड्रक त्त्यांचे - पारोक्ष्य सौहृदं कुर्वन् (आसीत्) - परलोकसंबंधी मित्राला उचित असे कृत्य करणारा झाला - महाराज - हे परीक्षित राजा - एकः - एकटा - पद्‌भ्यां इमां प्रकम्पयन् - पायांनी ह्या पृथ्वीला कांपविणारा - संक्रुद्धः - रागावलेला - महासत्त्वः - मोठा बलाढय - पदातिः गदापाणिः व्यदृश्यत - पायाने चालणारा असा हातात गदा घेऊन रणांगणावर प्रकट झाला. ॥१-२॥

कृष्णः - श्रीकृष्ण - तथा आयान्तं तं आलोक्य - तशा रीतीने येणार्‍या त्या दंतववक्राला पाहून - गदां आदाय - गदा घेऊन - सत्वरः रथात् अवप्लुत्य - त्वरेने रथातून खाली उडी मारून - वेला सिन्धुम् इव प्रत्यधात् - किनारा जसा समुद्राला रोधितो त्याप्रमाणे रोधिता झाला. ॥३॥

दुर्मदः कारूषः - मदोन्मत्त दन्तवक्र - गदाम् उद्यम्य मुकुन्दं प्राह - गदा उचलून श्रीकृष्णाला म्हणाला - अद्य - आज - दिष्टया दिष्टया - मोठया सुदैवाने - भवान् मम दृष्टिपथं गतः - तू माझ्या दृष्टीस पडलास. ॥४॥

मंद कृष्ण - हे मंदबुद्धे श्रीकृष्णा - त्वं नः मातुलेयः - तू आमचा मामेभाऊ - (च) मित्रध्रुक् - आणि मित्रांशी वैर करणारा असा - मां जिघांससि - मला मारण्यास इच्छित आहेस - अतः - म्हणून - वज्रकल्पया गदया त्वां हनिष्ये - वज्रासारख्या गदेने तुला मारून टाकीन. ॥५॥

तर्हि - ह्यासाठी - अज्ञ - हे मूर्खा श्रीकृष्णा - मित्रवत्सलः - मित्रांवर प्रेम करणारा मी - यथा देहचरं व्याधिं (तथा) - ज्याप्रमाणे शरीरातील रोगाला मारावे त्याप्रमाणे - बंधुरूपं (त्वां) अरिं हत्वा - बंधूच्या स्वरूपाने आलेल्या शत्रु अशा तुला मारून - मित्राणां आनृण्यं उपैमि - मित्रांच्या ऋणापासून मुक्त होईन. ॥६॥

सः - तो दंतवक्र - तोत्रैः द्विपम् इव - अंकुशांनी जसे हत्तीला त्याप्रमाणे - एवं रूक्षैः वाक्यैः कृष्णं तुदन् - अशा रीतीच्या कठोर भाषणांनी श्रीकृष्णाला पीडा देऊन - गदया मूर्ध्नि अताडयत् - गदेने मस्तकावर प्रहार करिता झाला - सिंहवत् च व्यनदत् - व सिंहाप्रमाणे गर्जना करिता झाला. ॥७॥

यदूद्वहः - यदुकुलभूषण श्रीकृष्ण - आजौ - रणांगणावर - गदया अभिहतः अपि - गदेने ताडिला गेला असताहि - न चचाल - हलला नाही - कृष्णः अपि - श्रीकृष्ण सुद्धा - गुर्व्या कौ‌मोदक्या - जड अशा कौ‌मोदकी नावाच्या गदेने - तं स्तनान्तरे अहन् - त्या दंतवक्राला दोन स्तनांच्या मध्यभागी ताडिता झाला. ॥८॥

गदानिर्भिन्नहृदयः (सः) - गदेने ज्याचे वक्षस्थळ फुटुन गेले आहे असा तो दंतवक्र - मुखात् रुधिरं उद्वमन् - तोंडातून रक्त ओकत - केशबाह्वङ्‌घ्रीन् धरण्यां प्रसार्य - केस, बाहु व पाय भूमीवर पसरून - व्यसुः न्यपतत् - मृत होऊन पडला. ॥९॥

नृप - हे राजा परीक्षिता - यथा चैद्यवधे (तथा) - जसे शिशुपालाच्या वधावेळी त्याचप्रमाणे - सर्वभूतानां पश्यतां - सर्व लोक पहात असताना - ततः सूक्ष्मतरं अद्‌भुतं ज्योतिः - त्या दंतवक्राच्या शरीरातून निघालेले अत्यंत बारीक असे अद्‌भुत तेज - कृष्णं आविशत् - श्रीकृष्णाच्या शरीरात शिरले. ॥१०॥

तद्‌भ्राता विदूरथः तु भ्रातृशोकपरिप्लुतः - त्या दंतवक्राचा भाऊ विदूरथ तर भावाच्या मरणाने झालेल्या शोकाने युक्त होऊन - तज्जिघांसया - त्या श्रीकृष्णाला मारण्याच्या इच्छेने - असिचर्मभ्यां उच्छ्‌वसन् - तरवार व ढाल घेऊन दुःखाने श्वासोच्छ्‌वास टाकीत - (तत्र) आगच्छत् - तेथे आला. ॥११॥

राजेन्द्र - हे राजा - कृष्णः - श्रीकृष्ण - क्षुरनेमिना चक्रेण - वस्तर्‍याप्रमाणे तीक्ष्ण धारेच्या सुदर्शन चक्राने - आपततः तस्य - चाल करून येणार्‍या त्या विदूरथाचे - सकिरीटं सकुण्डलं च शिरः जहार - मुकुट व कुंडले यांसह मस्तक हरण करिता झाला. ॥१२॥

एवं सौभं शाल्वं च सहानुजं दंतवक्रं च हत्वा - याप्रमाणे सौभ, शाल्व आणि भावांसह दंतवक्र यांना मारून - (तथा अन्यान् अपि) दुर्विषहान् (हत्वा) - त्याप्रमाणे दुसर्‍याहि दुःसह दुष्ट राजांना मारून - अन्यैः सुरमानवैः ईडितः - इतर देव व मनुष्ये यांनी स्तविलेला. ॥१३॥

मुनिभिः सिद्धगन्धर्वैः विद्याधरमहोरगैः - ऋषि, सिद्ध, गंधर्व, विद्याधर व मोठमोठे नाग यांनी - अप्सरोभिः पितृगणैः यक्षैः किन्नरचारणैः - अप्सरा, पितर, यक्ष, किन्नर व चारण यांनी. ॥१४॥

उपगीयमानविजयः - गायिला जात आहे विजय ज्याचा असा - कुसुमैः अभिवर्षितः - ज्याच्यावर फुलांची वृष्टि केलेला - वृष्णिप्रवरैः वृतः च (कृष्णः) - व मोठमोठया यादवांनी वेष्टिलेला श्रीकृष्ण - अलंकृतां पुरीं विवेश - भूषविलेल्या द्वारका नगरीत शिरला. ॥१५॥

एवं - याप्रमाणे - योगेश्वरः जगदीश्वरः भगवान् सः कृष्णः जयति - योगांचा अधिपति व जगाचा नाथ असा तो भगवान श्रीकृष्ण विजय मिळवितो - (सः शत्रुभिः कदाचित्) निर्जितः इति पशुदृष्टीनां ईयते - शत्रूकडून तो केव्हा केव्हा जिंकिला गेला असा पशुतुल्य मूढ प्राण्यांना भासतो. ॥१६॥

रामः - बलराम - पाण्डवैः सह कुरूणां युद्धोद्यमं श्रुत्वा - पाण्डवांबरोबर युद्ध करण्याचा कौरवांचा उद्योग चालला आहे असे ऐकून - मध्यस्थः - कोणताहि पक्ष न स्वीकारता - तीर्थाभिषेकव्याजेन प्रययौ किल - तीर्थयात्रा करण्याच्या निमित्ताने निघून गेला असे म्हणतात. ॥१७॥

प्रभासे स्नात्वा - प्रभास तीर्थामध्ये स्नान करून - देवर्षिपितृमानवान् संतर्प्य - देव, ऋषि, पितर आणि मनुष्ये ह्यांना तृप्त करून - ब्राह्मणसंवृतः (सः) - ब्राह्मणांनी वेष्टिलेला तो बलराम - सरस्वतीं प्रतिस्रोतं ययौ - सरस्वती नदीच्या उलट दिशेने गेला. ॥१८॥

पृथूदकं बिन्दुसरः त्रितकूपं सुदर्शनं - पृथूदक, बिंदुसरोवर, त्रितकूप व सुदर्शन तीर्थ - विशालं ब्रह्मतीर्थं च चक्रं प्राचीं सरस्वतीम् - विशाल ब्रह्मतीर्थ, चक्रतीर्थ व प्राची सरस्वती. ॥१९॥

भारत - हे परीक्षित राजा - यमुनां अनु गंगां च अनु यानि एव (तीर्थानि आसन् तानि) - यमुनेच्या व गंगेच्या काठी जितकी म्हणून तीर्थे होती त्या सर्व तीर्थांच्या ठिकाणी जाऊन - यत्र ऋषयः सत्रं आसते - जेथे ऋषि यज्ञ करीत बसले होते - नैमिषं जगाम - नैमिषारण्यात गेला. ॥२०॥

दीर्घसत्त्रिणः मुनयः - पुष्कळ वर्षांच्या अवधीचे यज्ञ करणारे ऋषि - तम् आगतं अभिप्रेत्य - त्या बलरामाला आलेला जाणून - यथान्यायं अभिनन्द्य - यथाविधि त्याचे अभिनंदन करून - प्रणम्य उत्थाय च - नमस्कार करून व उठून उभे राहून - अर्चयन् - पूजिते झाले. ॥२१॥

सपरीवारः कृतासनपरिग्रहः - परिवारासह केला आहे आसनाचा स्वीकार ज्याने असा - अर्चितः - पूजिला गेलेला - सः - तो बलराम - आसीनं महर्षेः शिष्यं रोमहर्षणं ऐक्षत - आसनावर बसलेल्या व्यासशिष्य रोमहर्षणाला पाहता झाला. ॥२२॥

माधवः - बलराम - अप्रत्युत्थायिनं - उठून सत्कार न करणार्‍या - अकृतप्रह्वणाञ्जलिम् - हात जोडून नमस्कार न करणार्‍या - तान् विप्रान् अध्यासीनं च रोमहर्षणम् सूतं उद्वीक्ष्य - आणि त्या ब्राह्मणांच्याहून उंच अशा आसनावरच बसलेल्या रोमहर्षण नामक सूताला पाहून - चुकोप - रागावला. ॥२३॥

प्रतिलोमजः दुर्मतिः असौ - प्रतिलोम विवाहापासून उत्पन्न झालेला दुर्बुद्धि असा हा सूत - यस्मात् - ज्या अर्थी - इमान् विप्रान् - ह्या ब्राह्मणांना - तथैव धर्मपालान् अस्मान् - त्याप्रमाणे धर्मसंरक्षक अशा आम्हाला - अध्यास्ते - हीन करून उच्चस्थानी बसला आहे - (तस्मात्) वधम् अर्हति - त्या अर्थी हा वधाला योग्य आहे. ॥२४॥

भगवतः ऋषेः शिष्यः भूत्वा - भगवान महर्षि व्यासाचा शिष्य होऊन - बहूनि च सेतिहासपुराणानि धर्मशास्राणि सर्वशः अधीत्य - आणि पुष्कळ इतिहास व पुराणे यांसह धर्मशास्त्रांचे सर्व बाजूंनी अध्ययन करून - अदान्तस्य अविनीतस्य - उन्मत्त व अडाणी राहिलेल्या अशा - वृथापण्डितमानिनः - व्यर्थ स्वतःला पंडित म्हणवून घेणार्‍या - अजितात्मनः (अस्य) - इंद्रियनिग्रह न केलेल्या ह्या रोमहर्षणाच्या - एतानि धर्मशास्त्राध्ययनादीनि - धर्मशास्त्राचे अध्ययन आदिकरून गोष्टी - नटस्य इव - नाटकी पुरुषा प्रमाणे - न गुणाय भवन्ति स्म - उपयोगाच्या झालेल्या नाहीत. ॥२५-२६॥

अस्मिन् लोके मया एतदर्थः अवतारः कृतः - ह्या लोकी मी ह्यासाठीच अवतार घेतला आहे - धर्मध्वजिनः मे वध्याः - धार्मिकपणाचा आव आणणारे माझ्याकडून वधले जाण्यास योग्य आहेत - हि - कारण - ते अधिकाः पातकिनः - ते फार मोठे पातकी होत. ॥२७॥

भगवान् प्रभुः - भगवान बलराम - एतावत् उक्त्वा - याप्रमाणे बोलून - असद्वधात् निवृत्तः अपि - दुर्जनाचा वध करण्यापासून मागे वळला असूनहि - भावित्वात् - तसे घडणारेच असल्यामुळे - करस्थेन कुशाग्रेण - हातांतील दर्भाच्या टोकाने - तं अहनत् - त्या रोमहर्षण सूताला ताडिता झाला. ॥२८॥

हाहा इति वादिनः - हाहाकार करणारे - खिन्नमानसाः - खिन्न अन्तःकरण झालेले - सर्वे मुनयः - सर्व ऋषि - प्रभो - हे बलरामा - ते अधर्मः कृतः - तू अधर्म केला - (इति) संकर्षणं देवं ऊचुः - असे बलरामाला म्हणाले. ॥२९॥

यदुनंदन - हे बलरामा - अस्माभिः अस्य ब्रह्मासनं दत्तं - आम्ही याला ब्रह्मासन दिले आहे - यावत् च सत्रं समाप्यते - व जोपर्यंत यज्ञ समाप्त होतो आहे - तावत् आत्माक्लमं आयुः (दत्तं) - तितक्या अवधीत आम्ही शरीराला ज्यात क्लेश होणार नाहीत असे साधन व आयुष्य दिले - यथा अजानता - जसा अजाणत्या पुरुषाने - (तथा) एव - तसाच - त्वया ब्रह्मवधः आचरितः - तू ब्राह्मणाचा वध केला आहे - आम्नायः योगेश्वरस्य अपि भवतः न नियामकः - श्रुति योगाधिपति अशा तुम्हाला बंधनकारक नाहीत काय ? ॥३०-३१॥

लोकपावन - हे लोकांना पवित्र करणार्‍या बलरामा - ब्रह्महत्यायाः एतत् पावनं - ब्रह्महत्येचे हे प्रायश्चित्त - यदि भवान् अनन्यचोदितः चरिष्यति - जर तू दुसर्‍याने न सांगताच आचरिशील - (तर्हि) लोकसंग्रहः (स्यात्) - तर लोकांचे कल्याण केल्यासारखे होईल. ॥३२॥

लोकानुग्रहकाम्यया - लोकांचे कल्याण करण्याच्या इच्छेने - वधनिर्वेशं करिष्ये - ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त करीन - प्रथमे कल्पे यावान् नियमः (अस्ति) - पहिल्या प्रतीचा जो नियम असेल - सः तु विधीयतां - तो तर सांगावा. ॥३३॥

बत - खरोखर - एतस्य - ह्याचे - दीर्घं आयुः - जे मोठे आयुष्य - सत्त्वं इंद्रियम् च एव - बळ आणि इंद्रियसामर्थ्य सुद्धा - (इति) यत् आशासितं (स्यात्) - असे जे इच्छिलेले असेल - तत् ब्रूत - ते सांगा - (तत्) योगमायया साधये - ते योगमायेच्या योगे मी पूर्ण करीन. ॥३४॥

राम - हे बलरामा - तव अस्रस्य - तुझ्या अस्त्राचे - वीर्यस्य - पराक्रमाचे - मृत्योः - मृत्यूचे - अस्माकम् वचः च एव - आणि आमचे भाषणहि - यथा सत्यं भवेत् - ज्या योगे खरे होईल - तथा विधीयतां - तसे करावे. ॥३५॥

आत्मा वै पुत्रः उत्पन्नः - पुरुष आपणच खरोखर पुत्ररूपाने उत्पन्न झालेला असतो - इति वेदानुशासनम् - असे वेदाचे वचन आहे - तस्मात् अस्य (पुत्रः) - म्हणून ह्याचा पुत्र - आयुरिंद्रियसत्त्ववान् - आयुष्य इंद्रिय व बल यांनी युक्त असा - वक्ता भवेत् - मोठा बोलका होईल. ॥३६॥

अथ - ह्या नंतर - मुनिश्रेष्ठाः - श्रेष्ठ ऋषि हो - वः किं कामः - तुमची काय इच्छा आहे - ब्रूत - सांगा - अहं करवाणि - मी पूर्ण करीन - बुधाः - ज्ञानी ऋषि हो - अपचितिं तु अजानतः मे - उपकाराची फेड कशी करावी हे न जाणणार्‍या माझी - यथा (सा स्यात् तथा) चिन्त्यताम् - जेणेकरून ती फेड होईल असे विचार करून सांगावे. ॥३७॥

इल्वलस्य सुतः - इल्वलाचा पुत्र - बल्वलः नाम घोरः दानवः (अस्ति) - बल्वल नामक भयंकर दानव आहे - सः पर्वणि पर्वणि एत्य - तो प्रत्येक पर्वणीला येऊन - नः सत्त्रं दूषयति - आमचा यज्ञ दूषित करतो. ॥३८॥

दाशार्ह - हे बलरामा - पूयशोणितविण्मूत्रसुरामांसाभिवर्षिणम् - पू, रक्त, विष्ठा, मूत्र, मद्य व मांस यांचा पाऊस पाडणार्‍या - तं पापं - त्या पापी दानवाला - जहि - मार - तत् नः परं शुश्रूषणं (स्यात्) - ती आमची मोठी सेवा होईल. ॥३९॥

ततः च - आणि त्यानंतर - सुसमाहितः - पवित्र अन्तःकरणाने युक्त असा - भारतं वर्षं परीत्य - भरतखंडाला प्रदक्षिणा करून - द्वादश मासान् (कृच्छ्‌‍रं) चरित्वा - बारा महिने प्रायश्चित्त करून - तीर्थस्नायी (भव) - तीर्थात स्नान करणारा हो - इति विशुध्यसे - अशा रीतीने तू शुद्ध होशील. ॥४०॥

अठठयाहत्तरावा अध्याय समाप्त

GO TOP