श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७७ वा - अन्वयार्थ

शाल्वाचा उद्धार -

सः - तो प्रद्युम्न - सलिलं उपस्पृश्य - अंगावर उदक शिंपून - दंशितः - सज्ज झालेला - धृतकार्मुकः - घेतले आहे धनुष्य ज्याने असा - वीरस्य द्युमतः पार्श्वं मां नय - पराक्रमी द्युमानाजवळ मला ने - इति सारथिम् आह - असे सारथ्याला म्हणाला. ॥१॥

रुक्मिणीसुतः - रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न - स्वसैन्यानि विधमन्तं द्युमन्तं - आपल्या सैन्याचा नाश करणार्‍या द्युमानाला - प्रतिहत्य - उलट प्रहार करून - स्मयन् - मंदहास्य करीत - अष्टभिः नाराचैः - आठ बाणांनी - प्रत्यविध्यत् - ताडिता झाला. ॥२॥

चतुर्भिः चतुरः वाहान् - चार बाणांनी चार घोडयांना - एकेन सूतं - एका बाणाने सारथ्याला - द्वाभ्यां च - आणि दोन बाणांनी - धनुः केतुं च - धनुष्याला आणि ध्वजाला - अन्येन शरेण च शिरः वै अहनत् - आणि दुसर्‍या एका बाणाने शाल्वाच्या मस्तकाला ताडिता झाला. ॥३॥

गजसात्यकिसाम्बाद्याः - गज, सात्यकि, सांब आदिकरून वीर - सौभपतेः बलं जघ्नुः - शाल्वाच्या सैन्याला मारिते झाले - सर्वे सौभेयाः - सौभ विमानात असलेले सर्व लोक - संछिन्नकन्धराः - तुटल्या आहेत माना ज्यांच्या असे - समुद्रे पेतुः - समुद्रात पडले - एवं - याप्रमाणे - इतरेतरं निघ्नतां - एकमेकांना मारणार्‍या - यदूनां शाल्वानां - यादव व शाल्व यांचे - तुमुलं उल्बणं तत् युद्धं - घनघोर व भयंकर असे ते युद्ध - त्रिणवरात्रं अभूत् - सत्तावीस दिवसापर्यंत चालले. ॥४-५॥

धर्मसूनुना आहूतः कृष्णः - धर्मराजाने बोलावलेला श्रीकृष्ण - इंद्रप्रस्थं गतः - इंद्रप्रस्थाला गेला होता - अथ राजसूये निर्वृत्ते - मग राजसूय यज्ञ समाप्त झाला असता - शिशुपाले च संस्थिते - व शिशुपाल मरण पावला असता. ॥६॥

कुरुवृद्धान् अनुज्ञाप्य - ज्येष्ठ कौरवांची आज्ञा घेऊन - मुनीन् ससुतां पृथां च (अनुज्ञाप्य) - ऋषि व पुत्रांसह कुंती ह्यांची अनुज्ञा घेऊन - अतिघोराणि निमित्तानि पश्यन् - अत्यंत भयंकर दुश्चिन्हे पहात - द्वारवतीं ययौ - द्वारकेला गेला. ॥७॥

आह च - आणि म्हणाला - आर्यमिश्राभिसंगतः अहं - बलरामासह मी - इह आगतः - येथे आलो - चैद्यपक्षीयाः राजन्याः मम पुरीं नूनं हन्युः - शिशुपालाच्या पक्षांतील राजे खरोखर माझ्या द्वारकानगरीचा नाश करतील. ॥८॥

केशवः - श्रीकृष्ण - स्वानां तत् कदनं वीक्ष्य - स्वकीयांचा तो नाश पाहून - पुररक्षणं (रामे) निरूप्य - नगररक्षणाचे काम बलरामावर सोपवून - सौभं च शाल्वराजं च (वीक्ष्य) - सौभ विमान व शाल्वराजा ह्यांना पाहून - दारुकं प्राह - दारुकाला म्हणाला - सूत - हे दारुका - शाल्वस्य अन्तिकं मे रथं आशु वै प्रापय - शाल्वाच्या जवळ माझा रथ लवकर खरोखर ने - ते संभ्रमः न कर्तव्यः - तू धांदरटपणाने वागू नकोस - अयं सौभराट् मायावी - हा शाल्व मोठा कपटी आहे. ॥९-१०॥

इति उक्तः दारुकः - असे बोललेला दारुक - रथं आस्थाय चोदयामास - रथात बसून घोडे हाकिता झाला - स्वे परे च सर्वे - स्वकीय व शत्रुपक्षीय असे सर्व सैनिक - विशन्तं अरुणानुजं ददृशुः - आत शिरणार्‍या गरुडाला पहाते झाले. ॥११॥

हतप्रायबलेश्वरः शाल्वः च - व ज्याचे बहुतेक सेनापति मेले आहेत असा शाल्व - कृष्णं आलोक्य - श्रीकृष्णाला पाहून - मृधे - युद्धात - भीमरवां शक्तिं - भयंकर शब्द करणारी शक्ति - कृष्णसूताय प्राहरत् - श्रीकृष्णाचा सारथी जो दारुक त्यावर फेकिता झाला. ॥१२॥

शौरिः - श्रीकृष्ण - रहसा आपतन्तीं - वेगाने चालून येणार्‍या - महोल्काम् इव दिशः भासयन्तीं - मोठया जळक्या कोलतीप्रमाणे दिशांना प्रकाशित करणार्‍या - तां (शक्तिम्) - त्या शक्तीला - सायकैः नभसि शतधा अच्छिनत् - बाणांनी आकाशातच शंभर ठिकाणी तोडिता झाला. ॥१३॥

खे भ्रमत् सौभं च - आणि आकाशात फिरणारे सौभ विमान - षोडशभिः बाणैः विद्धा - सोळा बाणांनी विदीर्ण करून - शरसंदोहैः च - आणि बाणांच्या वर्षावांनी - सूर्यः रश्मिभिः खम् इव - सूर्य किरणांनी जसा आकाशाला व्यापितो त्याप्रमाणे - तं अविद्‌‍ध्यत् - त्या शाल्वाला ताडिता झाला. ॥१४॥

शाल्वः तु - शाल्व तर - शार्ङ्‌‍गधन्वनः शौरेः - शार्ङ्‌गधनुष्य धारण करणार्‍या श्रीकृष्णाचा - सशार्ङ‌‍गं सव्यं दोः - शार्ङ्‌गधनुष्यासह डावा हात - बिभेद - भेदिता झाला - (तदा कृष्णस्य) हस्तात् शार्ङ्‌ग न्यपतत् - त्यावेळी श्रीकृष्णाच्या हातांतून शार्ङ्‌ग धनुष्य खाली पडले - तत् अद्‌भुतम् आसीत् - ती गोष्ट आश्चर्य करण्यासारखी झाली. ॥१५॥

तत्र पश्यतां भूतानां - तेथे पहाणार्‍या प्राण्यांमध्ये - महान् हाहाकारः आसीत् - मोठा हाहाकार उडाला - सौभराट् उच्चैः निनद्य - शाल्व मोठयाने गर्जना करून - इदं जनार्दनम् आह - याप्रमाणे श्रीकृष्णाला म्हणाला. ॥१६॥

यत् - ज्याअर्थी - मूढ - हे मूर्खा - नः ईक्षतां - आम्ही पहात असता - सख्युः भ्रातुः (च) भार्या (त्वया) हृता - आमचा मित्र व तुझा आतेभाऊ अशा शिशुपालाची पत्‍नी तू हरण केली - त्वया - तुझ्याकडून - सभामध्ये - मयसभेत - प्रमत्तः सखा सः - असावध असा तो माझा मित्र शिशुपाल - व्यापादितः - मारिला गेला. ॥१७॥

अपराजितमानिनम् तं त्वा - मला कोणीही जिंकणार नाही असा अभिमान बाळगणार्‍या त्या तुला - अद्य - आज - यदि मम अग्रतः तिष्ठेः - जर माझ्या पुढे उभा राहिलास तर - निशितैः बाणैः - तीक्ष्ण बाणांनी - अपुनरावृत्तिं नयामि - मृत्यूप्रत नेईन. ॥१८॥

मन्द - हे मूर्खा शाल्वा - त्वं वृथा कत्थसे - तू व्यर्थ बडबड करीत आहेस - अन्तिके अन्तकम् न पश्यसि - जवळ आलेल्या मृत्यूला पहात नाहीस - शूराः पौरुषं दर्शयन्ति - शूर पुरुष पराक्रम करून दाखवितात - बहुभाषिणः न (दर्शयन्ति) स्म - पुष्कळ बडबड करणारे दाखवीत नाहीत. ॥१९॥

इति उक्त्वा - असे म्हणून - संरब्धः भगवान् - क्रोधाविष्ट श्रीकृष्ण - भीमवेगया गदया - भयंकर वेगाच्या गदेने - शाल्वं जत्रौ तताड - शाल्वाला खांद्याजवळ ताडिता झाला - सः - तो शाल्व राजा - असृक् वमन् चकम्पे - रक्त ओकत कापू लागला. ॥२०॥

गदायां सन्निवृत्तायां - गदा परत आली असता - शाल्वः तु अन्तरधीयत - शाल्व तर गुप्त झाला - ततः मुहूर्ते - नंतर दोन घटकांच्या अवधीत - पुरुषः आगत्य - एक पुरुष येऊन - देवक्या प्रहितः अस्मि इति - देवकीने पाठविलेला आहे असे म्हणून - शिरसा अच्युतं नत्वा - मस्तकाने श्रीकृष्णाला नमस्कार करून - रुदन् वचः प्राह - रडत रडत बोलू लागला. ॥२१॥

महाबाहो कृष्ण कृष्ण - हे आजानुबाहो, हे श्रीकृष्णा - पितृवत्सल - पित्यावर प्रेम करणार्‍या हे श्रीकृष्णा - शाल्वेन - शाल्वाने - ते पिता - तुझा पिता वसुदेव - यथा सौनिकेन पशुः (तथा) - जसा खाटिकाने पशु न्यावा तसा - बद्धा अपनीतः - बांधून दूर नेला. ॥२२॥

मानुषीं प्रकृतिं गतः कृष्णः - मनुष्यस्वभावाला प्राप्त झालेला श्रीकृष्ण - विप्रियं निशम्य - अप्रिय गोष्ट ऐकून - विमनस्कः घृणी - खिन्न व दयायुक्त झालेला - यथा प्राकृतः (तथा) - जसा साधारण पुरुष बोलतो त्याप्रमाणे - स्नेहात् बभाषे - प्रेमाने भाषण करिता झाला. ॥२३॥

सुरासुरैः अजेयं - देवदैत्यांना जिंकता न येणार्‍या - असंभ्रान्तं रामं जित्वा - सावधपणाने कार्य करणार्‍या बलरामाला जिंकून - अल्पीयसा शाल्वेन - अल्पबलाच्या शाल्वाने - मे पिता कथं नीतः - माझा पिता कसा नेला - विधिः बलवान् (अस्ति) - दैव बलवत्तर आहे. ॥२४॥

इति गोविन्दे ब्रुवाणे - असे श्रीकृष्ण बोलत असता - सः सौभराट् - तो सौभपति शाल्व - वसुदेवम् इव आनीय - वसुदेवासारखी एक वस्तु आणून - प्रत्युपस्थितः - प्राप्त झाला - कृष्णं च इदं उवाच - आणि श्रीकृष्णाला याप्रमाणे म्हणाला. ॥२५॥

बालिश - हे मूर्ख कृष्णा - यदर्थम् इह जीवसि - ज्याच्यासाठी तू जिवंत राहिला आहेस - (सः) एषः ते जनिता तातः (अस्ति) - तो तुला उत्पन्न करणारा तुझा पिता वसुदेव आहे - ते वीक्षतः अमुं वधिष्ये - तुझ्यासमक्ष ह्याला मारितो - (त्वम्) ईशः चेत् पाहि - तू समर्थ असशील तर रक्षण कर. ॥२६॥

मायावी (सः) - कपटी शाल्व - एवं निर्भर्त्स्य - याप्रमाणे निर्भर्त्सना करून - खड्‌गेन आनकदुन्दुभेः शिर उत्कृत्य - तरवारीने वसुदेवाचे मस्तक तोडून - आदाय - घेऊन - स्वस्थं सौभं समाविशत् - आकाशात असलेल्या सौभ विमानात जाऊन बसला. ॥२७॥

ततः - तेव्हा - स्वबोधः महानुभावः - आत्मज्ञानाने युक्त असा मोठा पराक्रमी श्रीकृष्ण - स्वजनानुषङ्‌गतः - आपल्या आप्तेष्टांच्या प्रेमामुळे - मुहूर्तम् - थोडा वेळ - प्रकृतौ उपप्लुत आस्ते - मनुष्यसभावात मग्न झाला - तत् - त्यानंतर - सः - तो श्रीकृष्ण - शाल्वप्रसृतां मयोदितां आसुरीं मायां अबुद्‌ध्यत् - शाल्वाने उत्पन्न केलेली मयासुराची ही आसुरी माया आहे असे जाणता झाला. ॥२८॥

प्रबुद्धः अच्युतः - ज्ञानी श्रीकृष्ण - तत्र आजौ - त्या युद्धामध्ये - दूतं - दूताला - न समपश्यत् - पहाता झाला नाही - पितुः कलेवरं न (अपश्यत्) - पित्याचे शरीर पहाता झाला नाही - यथा स्वाप्नं (तथा) - जसा स्वप्नातील देखावा तसा - अम्बरचारिणं सौभस्थं रिपुं आलोक्य - आकाशात संचार करणार्‍या सौभ विमानात बसलेल्या शत्रूला पाहून - निहन्तुं उद्यतः - मारण्यास उद्युक्त झाला. ॥२९॥

राजर्षे - हे परीक्षित राजा - के च ऋषयः न अन्विताः - कित्येक ऋषि पूर्वापरसंधानरहित असे - एवं वदन्ति - असे म्हणतात - उत - परंतु - यत् स्ववाचः विरुद्‌ध्येत - जी आपली भाषणे विरोधी ठरतील - (तत्) नूनं ते न स्मरन्ति - ती ते खरोखर स्मरत नाहीत. ॥३०॥

ये अज्ञसंभवाः - जे अज्ञानी लोकांच्या मनात उत्पन्न होणारे - शोकमोहौ स्नेहः वा भयं वा क्व - शोक, मोह, स्नेह किंवा भय हे विकार कोणीकडे - च - आणि - अखण्डितविज्ञानज्ञानैश्वर्यः तु अखण्डितः (सः) क्व - अव्याहत चालणारे आहे अनुभविक व शाब्दिक ज्ञानरूपी ऐश्वर्य ज्याचे असा अकुंठित गतीचा श्रीकृष्ण कोणीकडे. ॥३१॥

यत्पादसेवोर्जितया आत्मविद्यया - ज्याच्या चरणसेवेने वाढलेल्या आत्मज्ञानाने - अनाद्यात्मविपर्ययग्रहं हिन्वन्ति - अनादि अशा आत्म्याच्या विषयीच्या विपरीत कल्पनांचा नाश करितात - (च) आत्मीयं अनन्तं परं ऐश्वरं लभन्ते - आणि आत्मसंबंधी अविनाशी व श्रेष्ठ असे परमेश्वराचे पद मिळवितात - (तस्य) सद्‌गतेः कुतः नु मोहः - त्या साधूंचा आश्रय अशा श्रीकृष्णाला मोह कोठून असणार ? ॥३२॥

अमोघविक्रमः शौरिः - ज्याचा पराक्रम निष्फळ होत नाही असा श्रीकृष्ण - शस्त्रपूगैः ओजसा प्रहरन्तं तं शाल्वं - शस्त्रसमूहांनी वेगाने प्रहार करणार्‍या त्या शाल्वाला - शरैः विद्‌ध्वा - बाणांनी वेधून - शत्रोः वर्म धनुः शिरोमणिं (च) अच्छिनत् - शत्रूचे चिलखत, धनुष्य व मस्तकातील रत्‍न ही तोडिता झाला - सौभं च गदया रुरोज ह - सौभ विमान गदेने फोडिता झाला. ॥३३॥

कृष्णहस्तेरितया गदया - श्रीकृष्णाच्या हातून सुटलेल्या गदेने - सहस्रधा विचुर्णितं तत् - हजार ठिकाणी चूर्ण झालेले ते सौभ विमान - तोये पपात - पाण्यात पडले - तत् विसृज्य - ते विमान सोडून - भूतलं आस्थितः शाल्वः - भूमीवर उभा राहिलेला शाल्व - गदां उद्यम्य - गदा उचलून - द्रुतं अच्युतं अभ्यगात् - तत्काळ श्रीकृष्णाच्या अंगावर चालून गेला. ॥३४॥

अथ - तेव्हा - आधावतः तस्य - चालून येणार्‍या त्या शाल्वाचा - सगदं बाहुं - गदायुक्त हात - भल्लेन छिन्त्वा - भाल्याने तोडून - शाल्वस्य वधाय - शाल्वाच्या वधासाठी - लयार्कसन्निभं अद्‌भुतं रथाङ्‍गं बिभ्रत् (सः) - प्रलयकाळच्या सूर्याप्रमाणे प्रखर असे आश्चर्यकारक सुदर्शन चक्र धारण करणारा श्रीकृष्ण - सार्कः उदयाचलः इव बभौ - सूर्याने युक्त अशा उदयाचलाप्रमाणे शोभला. ॥३५॥

हरिः - श्रीकृष्ण - तेन एव - त्याच सुदर्शन चक्राने - पुरुमायिनः - पुष्कळ माया दाखविणार्‍या शाल्वाचे - सकुंडलं किरीटयुक्तं शिरः - कुंडले व मुकुट यांनी युक्त असे मस्तक - यथा पुरन्दरः वज्रेण वृत्रस्य (शिरः चिच्छेद तथा) - जसा इंद्र वज्राने वृत्रासुराचे मस्तक छेदिता झाला त्याप्रमाणे - जहार - हरण करिता झाला - तदा नृणां हा हा इति वचः बभूव - त्यावेळी लोकांमध्ये ‘ठीक झाले, ठीक झाले’ असा शब्द झाला. ॥३६॥

राजन् - हे परीक्षित राजा - गदया तस्मिन् पापे निपतिते - गदेने तो पापी शाल्व पडला असता - सौभे च हते - आणि सौभ नाश पावले असता - देवगणेरिताः दुन्दुभयः - देवांच्या संघांनी वाजविलेल्या दुंदुभी - दिवि नेदुः - आकाशात शब्द करू लागल्या - (तदा) सखीनां अपचिति कुर्वन् दन्तवक्रः - मित्रांच्या ऋणांची फेड करणारा दंतवक्र - रुषा अभ्यगात् - रागाने धावत आला. ॥३७॥

सत्त्याहत्तरावा अध्याय समाप्त

GO TOP