श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६३ वा - अन्वयार्थ

श्रीकृष्णांबरोबर बाणासुराचे युद्ध -

भारत - हे परीक्षित राजा - च - आणि - अनिरुद्धं अपश्यतां - अनिरुद्धाला न पहाणार्‍या - (तं) अनुशोचतां च - आणि त्याच्यासाठी शोक करणार्‍या - तद्‌बन्धूनां - त्याच्या बांधवांचे - वार्षिकाः चत्वारः मासाः - पावसाळ्याचे चार महिने - व्यतीयुः - निघून गेले. ॥१॥

कृष्णदेवताः वृष्णयः - श्रीकृष्णाला देवाप्रमाणे समजणारे यादव - बद्धस्य (तस्य) तत् कर्मवार्तां च - बांधलेल्या अनिरुद्धाचे ते कृत्य व त्याचे वर्तमान - नारदात् उपाकर्ण्य - नारदाकडून ऐकून - शोणितपुरं प्रययुः - शोणितपुराला गेले. ॥२॥

प्रद्युम्नः युयुधानः साम्बः गदः च - प्रद्युम्न, युयुधान, सांब व गद - अथ सारणः (च) नन्दोपनन्दभद्राद्याः रामकृष्णानुवर्तिनः (ययुः) - त्याचप्रमाणे सारण व नन्द, उपनन्द, भद्र इत्यादि बलराम व कृष्ण यांचे अनुयायी गेले. ॥३॥

सात्वतर्षभाः - यादवश्रेष्ठ - द्वादशभिः अक्षौहिणीभिः समेताः - बारा अक्षौहिणी सैन्याने युक्त असे - समन्तात् बाणनगरं सर्वतोदिशं रुरुधुः - सभोवार बाणासुराच्या नगराला सर्व बाजूंनी वेढिते झाले. ॥४॥

भज्यमानपुरोद्यानप्राकाराटटालगोपुरं प्रेक्षमाणः - मोडून जाणारी नगरातील उद्याने, मंदिरे, गच्च्या, वेशी यांना पहाणारा - रुषा आविष्टः (बाणः) तुल्यसैन्यः - क्रोधाविष्ठ झालेला बाणासुर यादवांच्या सैन्याइतके सैन्य आहे ज्याचे असा - अभिनिर्ययौ - बाहेर पडला. ॥५॥

भगवान् रुद्रः - भगवान शंकर - स्वसुतैः प्रमथैः वृतः - पुत्रांनी व प्रमथादि शिवगणांनी वेष्टिलेला असा - बाणार्थे - बाणासुरासाठी - नन्दिवृषभं आरुह्य - नंदिबैलावर बसून - रामकृष्णयोः युयुधे - बलराम व श्रीकृष्ण यांच्याशी युद्ध करू लागला. ॥६॥

राजन् - हे राजा - कृष्णशंकरयोः - श्रीकृष्ण व शंकर यांचे - प्रद्युम्नगुहयोः अपि - प्रद्युम्न व कार्तिकस्वामी यांचेहि - रोमहर्षणं तुमुलं अद्‌भुतं युद्धं आसीत् - अंगावर रोमांच आणणारे घनघोर व आश्चर्यजनक युद्ध झाले. ॥७॥

कुम्भाण्डकूपकर्णाभ्यां सह बलेन संयुगः - कुंभांड व कूपकर्ण यांच्याशी बलरामाचे युद्ध झाले - साम्बस्य बाणपुत्रेण - सांबाचे बाणपुत्राशी - सात्यकेः बाणेन सह - सात्यकीचे बाणासुराशी. ॥८॥

ब्रह्मादयः सुराधीशाः - ब्रह्मादिक मोठमोठे देव - मुनयः सिद्धचारणाः - मुनि, सिद्ध व चारण - गन्धर्वाप्सरसः यक्षाः - गंधर्व, अप्सरा व यक्ष - विमानैः दृष्टुं आगमन् - विमानातून युद्ध पहाण्यासाठी आले. ॥९॥

शौरिः - श्रीकृष्ण - शङ्करानुचरान् - शंकराचे सेवक अशा - भूतप्रमथगुह्यकान् - भूते, प्रमथ व गुह्यक यांना - डाकिनीः यातुधानाः - डाकिणी यातुधान - विनायकान् वेतालान् च - व विनायकासह वेताळांना - प्रेतमातृपिशाचान् च कूष्माण्डान् - प्रेत, मातृदेवता, पिशाचे व कूष्मांड यांना - ब्रह्मराक्षसान् - ब्रह्मराक्षसांना - शार्ङगधनुश्चुतैः तीक्ष्णाग्रैः शरैः - शार्ङग धनुष्यापासून सुटलेल्या बारीक टोकांच्या बाणांनी - द्रावयामास - पळवून लाविता झाला. ॥१०-११॥

पिनाकी - पिनाक धनुष्य धारण करणारा शंकर - पृथग्विधानि अस्त्राणि - निरनिराळ्या प्रकाराची अस्त्रे - शार्ङगिणे प्रायुङ्क्त - शार्ङग धनुष्य धारण करणार्‍या श्रीकृष्णावर सोडिता झाला - शार्ङगपाणिः - श्रीकृष्ण (विष्णु) - अविस्मितः - आश्चर्य न करिता - प्रत्यस्त्रैः (तानि) शमयामास - विरुद्ध अस्त्रे सोडून त्या अस्त्रांना शांत करिता झाला.॥१२॥

ब्रह्मास्त्रस्य च ब्रह्मास्त्रं - ब्रह्मास्त्राच्या परिहारार्थ ब्रह्मास्त्र - च वायव्यस्य पार्वतम् - व वायव्य अस्त्राविरुद्ध पर्वतास्त्र - च आग्नेयस्य पार्जन्यं - आणि अग्नि अस्त्राच्या विनाशार्थ पर्जन्यास्त्र - च पाशुपतस्य नैजं - आणि पाशुपतास्त्राच्या शमनार्थ स्वतःचे नारायणास्त्र. ॥१३॥

शौरिः तु - श्रीकृष्ण तर - जृम्भणास्त्रेण जृंभितं गिरिशं मोहयित्वा - जृम्भकास्त्राने जांभया देऊ लागलेल्या शंकराला मोहित करून - असिगदेषुभिः बाणस्य पृतनां जघान - तलवार, गदा व बाण यांनी बाणासुराच्या सेनेला मारिता झाला. ॥१४॥

स्कन्दः - कार्तिकस्वामी - समन्ततः - चारहि बाजूंनी - प्रद्युम्नबाणौघैः अर्द्यमानः - प्रद्युम्नाच्या अनेक बाणांनी पीडिला जाणारा - गात्रेभ्यः असृक् विमुञ्चन् - अंगापासून रक्त गाळीत - शिखिना रणात् अपाक्रमत् - मोरावरून युद्धभूमी पासून निघून गेला. ॥१५॥

कुम्भाण्डः कूपकर्णः च - कुंभांड आणि कूपकर्ण - मुसलार्दितौ पेततुः - बलरामाच्या मुसळाने पीडित होऊन जमिनीवर पडले - हतनाथानि तदनीकानि - ज्यांचा स्वामी मृत झाला आहे अशी कुंभांड व कूपकर्ण यांची सैन्ये - सर्वतः दुद्रुवुः - जिकडे तिकडे पळून गेली. ॥१६॥

रथी अत्यमर्षणः बाणः - रथात बसलेला असा अत्यंत क्रोधाविष्ट झालेला बाणासुर - स्वबलं विशीर्यमाणं दृष्ट्वा - आपले सैन्य अस्ताव्यस्त झालेले पाहून - सात्यकिं हित्वा - सात्यकीला सोडून - संख्ये कृष्णाम् एव अभ्यद्रवत् - युद्धभूमीवर श्रीकृष्णाकडेच धावत आला. ॥१७॥

रणदुर्मदः बाणः - युद्धांविषयी फार गर्विष्ठ झालेला बाण - युगपत् पंचशतानि वै धनूंषि आकृष्य - एकाच वेळी एकदम पाचशे धनुष्ये ओढून - एकैकस्मिन् द्वौ द्वौ शरौ संदधे - प्रत्येक धनुष्यावर दोन दोन बाण जोडिता झाला. ॥१८॥

भगवान् हरिः - भगवान श्रीकृष्ण - तानि धनूंषि युगपत् चिच्छेद - ती धनुष्ये एकदम तोडिता झाला - सारथिं रथं अश्वान् च हत्वा - सारथि, रथ व घोडे यांना मारून - शङ्खं अपूरयत् - शंख वाजविता झाला. ॥१९॥

कोटरा नाम तन्माता - कोटरा नावाची त्याची माता - नग्ना मुक्तशिरोरुहा - नग्न होऊन व केस मोकळे सोडून - पुत्रप्राणरिरक्षया - पुत्राच्या प्राणांचे रक्षण करण्याच्या इच्छेने - कृष्णस्य पुरः अवतस्थे - श्रीकृष्णाच्या पुढे उभी राहिली. ॥२०॥

ततः गदाग्रजः - नंतर श्रीकृष्ण - नग्नां अनिरीक्षन् - नग्न अशा कोटरेकडे न पहाता - तिर्यङ्‌मुखः (अभूत्) - बाजूला मुख वळविता झाला - तावत् च बाणः - आणि तेवढयाच अवधीत बाणासुर - विरथः छिन्नधन्वा - रथरहित व तुटले आहे धनुष्य ज्याचे असा - पुरं अविशत् - नगरात शिरला. ॥२१॥

त्रिशिराः त्रिपात् ज्वरः तु - तीन मस्तके व तीन पाय असलेला ज्वर तर - भूतगणे विद्राविते - भूतगण पळू लागला असता - दश दिशः दहन् इव - दाही दिशांना जाळीतच की काय - दाशार्हं अभ्यधावत - श्रीकृष्णावर धावला. ॥२२॥

अथ - नंतर - देवः नारायणः - दैदीप्यमान श्रीकृष्ण - तं दृष्ट्वा - त्या ज्वराला पाहून - (निजं) ज्वरं व्यसृजत् - आपला ज्वर सोडिता झाला - माहेश्वरः वैष्णवः च (इति) उभौ ज्वरौ (मिथः) युयुधाते - माहेश्वर व वैष्णव असे ते दोन ज्वर एकमेकांशी युद्ध करू लागले. ॥२३॥

वैष्णवेन बलार्दितः माहेश्वरः समाक्रंदन् - वैष्णवज्वराने बलात्काराने पीडिलेला माहेश्वर ज्वर आक्रोश करीत - अन्यत्र अभयं अलब्ध्वा - दुसरीकडे अभय न मिळाल्यामुळे - भीतः - भिऊन गेला - माहेश्वरः ज्वरः - तो माहेश्वर ज्वर - शरणार्थी प्रयताञ्जलिः - रक्षणाची इच्छा करणारा असा हात जोडून - हृषीकेशं तुष्टाव - श्रीकृष्णाची स्तुती करिता झाला. ॥२४॥

अनन्तशक्तिं - अगणित शक्तिमान - सर्वात्मानं - सर्वांचा आत्मा - केवलं ज्ञप्तिमात्रं - केवळ ज्ञानस्वरूप - विश्वोत्पत्तिस्थानसंरोधहेतुं - जगाची उत्पत्ति, स्थिती व संहार यांना कारणीभूत - यत् ब्रह्म तत् - जे ब्रह्म म्हणतात तत्स्वरूपी - ब्रह्मलिङगं प्रशान्तं - वेदांनी ज्याचे ज्ञान होते व जो शान्तस्वरूप - परेशं त्वां नमामि - असा जो तू परमेश्वर त्या तुला मी नमस्कार करतो. ॥२५॥

कालः दैवं कर्म जीवः स्वभावः द्रव्यं क्षेत्रं प्राणः आत्मा विकारः - काल, दैव, कर्म, जीव, स्वभाव, द्रव्य, शरीर, प्राण, आत्मा व विकार - तत्संघातः - त्या सर्वांचा समूह - बीजरोहप्रवाहः - बीज व अंकुर यांची परंपरा - एषा त्वन्माया - ही तुझी माया होय - तन्निषेधं (त्वां) प्रपद्ये - त्या मायेचा निषेध करणार्‍या तुला शरण आलो आहे. ॥२६॥

लीलया उपपन्नैः - लीलेने धारण केलेल्या - मानाभावैः एव - अनेक अवतारांनीच - लोकसेतून् देवान् साधून् बिभर्षि - लोकांचे धर्मरक्षण करणार्‍या देवांचे व साधूंचे तू पालन करतोस - हिंसया वर्तमानान् उन्मार्गान् हंसि - हिंसा करणार्‍या दुष्टांना तू मारतोस - भूमेः भारहाराय एतत् ते जन्म (अस्ति) - पृथ्वीचा भार दूर करण्याकरिता हा तुझा जन्म आहे. ॥२७॥

अहं - मी - ते शान्तोग्रेण अत्युल्बणेन ज्वरेण - तुझ्या शीतज्वरनामक अत्यंत प्रखर ज्वराने - दुःसहेन तेजसा - असह्य तेजामुळे - तप्तः (अस्मि) - संतप्त झालो आहे - आशानुबद्धाः - विषयेच्छा करणारे पुरुष - यावत् ते अङ्‌घ्रिमूलं नो सेवेरन् - जोपर्यंत तुझ्या चरणाचे सेवन करीत नाहीत - तावत् (तेषां) देहिनां (त्वत्तः) तापः - तोपर्यंत त्या पुरुषांना तुझ्यापासून ताप होतो. ॥२८॥

त्रिशिरः - हे माहेश्वर ज्वरा - ते प्रसन्नः अस्मि - मी तुझ्य़ावर प्रसन्न झालो आहे - मज्ज्वरात् ते भयं व्येतु - माझ्या वैष्णव ज्वरापासून तुला वाटणारे भय दूर होवो - यः नौ संवादं स्मरति - जो आपला उभयतांचा संवाद स्मरेल - तस्य त्वत् भयं न भवेत् - त्याला तुझ्यापासून भय नसो. ॥२९॥

इति उक्तः माहेश्वरः ज्वरः - अशा रीतीने बोलला गेलेला माहेश्वर ज्वर - अच्युतं आनम्य गतः - श्रीकृष्णाला नमस्कार करून निघून गेला - बाणः तु - बाणासुर तर - रथम् आरूढः - रथात बसलेला असा - जनार्दनं योत्स्यन् प्रागात् - श्रीकृष्णाशी युद्ध करण्यासाठी आला. ॥३०॥

नृप - हे राजा - ततः - नंतर - नानायुधधर असुरः - अनेक आयुधे धारण करणारा बाणासुर - परमक्रुद्धः - फार रागावून - बाहुसहस्त्रेण - हजार हातांनी - चक्रायुधे बाणान् मुमोच - श्रीकृष्णाच्या अंगावर बाण सोडिता झाला. ॥३१॥

भगवान् - श्रीकृष्ण - क्षुरनेमिना चक्रेण - ज्याची धार वस्तर्‍याप्रमाणे तीक्ष्ण आहे अशा सुदर्शन चक्राने - असकृत् अस्त्राणि अस्यतः तस्य - वारंवार अस्त्रे फेकणार्‍या त्या बाणासुराचे - बाहून् - हात - वनस्पतेः शाखाः इव - झाडाच्या फांद्यांप्रमाणे - चिच्छेद - तोडिता झाला. ॥३२॥

भक्तानुकम्पी भगवान् भवः - भक्तांवर प्रेम करणारा भगवान शंकर - बाणस्य बाहुषु छिद्यमानेषु - बाणाचे हात तोडले जात असता - चक्रायुधम् उपव्रज्य अभाषत - श्रीकृष्णाजवळ येऊन म्हणाला. ॥३३॥

त्वं हि ब्रह्म - तू खरोखर ब्रह्म आहेस - (त्वं हि) वाङ्‌मये ब्रह्मणि गूढं परं ज्योतिः - तूच शब्दाब्रह्मामध्ये गुप्ते रीतीने असणारे श्रेष्ठ तेज आहेस - अमलात्मानः - निर्मळ अन्तःकरणाचे साधु - यं - ज्याला - आकाशं इव केवलं - आकाशाप्रमाणे एकरूपी असा - पश्यन्ति - पहातात. ॥३४॥

यस्य (ते) नाभिः नभः - ज्या तुझी बेंबी म्हणजे आकाश होय - मुखं अग्निः - मुख म्हणके अग्नि - रेतः अम्बु - वीर्य हे उदक - शीर्षाद्यौः - मस्तक स्वर्ग - श्रुतिः आशाः - कान ह्या दिशा - अङ्‌घ्रिः उर्वी - पाय ही पृथ्वी - मन चंद्रः - मन हा चंद्र - दृक् अर्कः - दृष्टि हा सूर्य - आत्मा अहं - आत्मा हा मी शंकर - जठरं समुद्रः- उदर हा समुद्र - भुजेन्द्रः - बाहु हा इंद्र. ॥३५॥

यस्य रोमाणि ओषधयः - ज्याची रोमे (लव) ह्या औषधी - केशाः अम्बुवाहाः - केस हे मेघ - धिषणा विरिञ्चः - बुद्धी हा ब्रह्मदेव - विसर्गः प्रजापतिः - शिस्न हेच प्रजापति होय - यस्य हृदयं धर्मः - ज्याचे हृदय हा धर्म - सः वै भवान् लोककल्पः पुरुषः - तोच तू लोकांमध्ये कल्पिलेला विराट पुरुष आहेस. ॥३६॥

अकुण्ठधामन् - ज्याचे तेज कधीहि कुंठित होत नाही अशा हे श्रीकृष्णा - धर्मस्य गुप्त्यै - धर्माच्या रक्षणासाठी - जगतः भवाय - व जगाच्या उत्पत्तीसाठी - तव अयं अवतारः - तुझा हा अवतार होय - भवता अनुभाविताः च - आणि तुझ्याकडून रक्षिलेले - सर्वे वयं - आम्ही सर्व - सप्त भुवनानि विभावयामः - सात लोकांना रक्षितो. ॥३७॥

त्वं एकः आद्यः पुरुषः अद्वितीयः - तू एकटा, सर्वांचा आदि, सर्व शरीरात आत्मरूपाने रहाणारा व द्वैतभावरहित असा आहेस - तुर्यः स्वदृक् हेतुः अहेतुः ईशः - मोक्षरूपी, आत्मज्ञानसंपन्न, जगाला कारण असून अकर्ता, व जगच्चालक असा तू आहेस - अथापि - तरीसुद्धा - सर्वगुणप्रसिद्ध्यै - सर्व विषयांच्या प्रकाशनाकरिता - यथाविकारं - विकारानुरूप - स्वमायया प्रतीयसे - आपल्या मायेने प्रगट होतोस. ॥३८॥

भूमन् - हे सर्वव्यापका - यथा एव - ज्याप्रमाणेच - स्वया छायया पिहितः सूर्यः - आपल्या छायेने आच्छादिलेला सूर्य - छायां च रूपाणि च संचकास्ति - छायेला व रूपांना प्रकाशित करतो - एवं गुणेन अपिहितः - ह्याप्रमाणे गुणाने आच्छादिलेला - आत्मप्रदिपः त्वं - आत्मज्ञान संपन्न तू - गुणान् गुणिनः च प्रकाशयसि - गुणांना व गुणयुक्त पदार्थांना प्रकाशित करितोस. ॥३९॥

यन्मायामोहितधियः - ज्याच्या मायेने मोहित झाली आहे बुद्धि ज्यांची असे लोक - पुत्रदारगृहादिषु प्रसक्ता - पुत्र, स्त्रिया, घर इत्यादिकांच्या ठिकाणी आसक्त झालेले - वृजिनार्णवे उन्मज्जन्ति निमज्जन्ति (च) - पापाच्या समुद्रात बुडया मारतात व वर येतात. ॥४०॥

यः अजितेन्द्रियः - जो कामलंपट पुरुष - देवदत्तं इमं नृलोकं लब्ध्वा - देवाने दिलेल्या ह्या मनुष्यजन्माला मिळवून - त्वत्पादौ न आद्रियेत - तुझ्या चरणांच्या ठिकाणी आसक्त होत नाही - सः हि - तो खरोखर - शोच्यः आत्मवञ्चकः - कीव करण्यास पात्र असून स्वतःला फसवून घेणारा आहे. ॥४१॥

यः मर्त्यः - जो मनुष्य - आत्मानं प्रियं ईश्वरं त्वां - आत्मरूपी प्रिय परमेश्वर अशा तुला - विपर्ययेन्द्रियार्थार्थं - विरुद्ध अशा विषयसेवनासाठी - विसृजते - सोडून देतो - (सः) अमृतं त्यजन् विषम् अत्ति - तो अमृत टाकून विष खातो. ॥४२॥

अथ - आता - अहं ब्रह्मा विबुधाः अमलाशयाः मुनयः च - मी ब्रह्मदेव, देव आणि निर्मळ अंतःकरणाचे ऋषि - आत्मानं प्रेष्ठं ईश्वरं त्वां - आत्मस्वरूपी परम प्रिय परमेश्वर अशा तुला - सर्वात्मना प्रपन्नाः - सर्व प्रकारे शरण आलो आहो. ॥४३॥

जगत्स्थित्युदयान्तहेतुं - जगाची उत्पत्ति, स्थिति व प्रलय यांना कारणीभूत - समं प्रशान्तं सुहृत् आत्मदैवम् - समबुद्धी, शांत, सर्वांचा मित्र, सर्वान्तर्यामी ईश्वर - अनन्यम् एकं जगदात्मकेतं - एकरूपी, अद्वितीय, जगताचे आत्मरूपी निवासस्थान असा - देवं तं त्वा - प्रकाशमान देव जो तू त्या तुला - भवापवर्गाय भजाम - संसारबंधनापासून मुक्त होण्यासाठी आम्ही भजतो. ॥४४॥

देव - हे श्रीकृष्णा - अयं - हा बाणासुर - मम इष्टः - माझा प्रिय भक्त - दयितः अनुवर्ती (च अस्ति) - व आवडता सेवक आहे - मया अमुष्य अभयं दत्तं - मी ह्याला अभय दिले आहे - तत् - याकरिता - यथा हि ते दैत्यपतौ प्रसादः (आसीत्) - जशी तुझी प्रल्हादावर कृपा झाली होती - (तथा) भवतः प्रसादः संपाद्यताम् - तशी तुझी कृपा ह्याच्यावर व्हावी. ॥४५॥

भगवन् - हे शंकरा - त्वत् नः यत् आत्थ - तू जे मला सांगितलेस - (तत्) तव प्रियं करवाम - ते तुझे प्रिय आम्ही करू - यत् भवतः व्यवसितं - जे तुझे करण्याचे ठरले आहे - तत् मे साधु अनुमोदितम् - त्याविषयी माझे चांगले अनुमोदन आहे. ॥४६॥

अयं एषः वैरोचनिसुतः असुरः - तो हा बलिपुत्र बाणासुर - मम अपि अवध्यः - माझ्याकडूनहि वधिला जाण्यास योग्य नाही - तव अन्वयः मे वध्यः न - तुझ्या वंशातील कोणताहि पुरुष माझ्याकडून वधिला जाणार नाही - (इति) प्रह्‌लादाय वरः दत्तः - असा मी प्रल्हादाला वर दिला आहे. ॥४७॥

अस्य बाहवः - ह्या बाणासुराचे बाहु - दर्पोपशमनाय मया प्रवृक्णाः - गर्वपरिहारार्थ मी तोडिले - यत् च भुवः भारायितं - आणि जे पृथ्वीला भारभूत झाले होते - (तत्) च भूरि बलं सूदितं - ते पुष्कळसे सैन्य मारून टाकिले. ॥४८॥

अस्य शिष्टाः चत्वारः भुजाः - ह्या बाणासुराचे उरलेले चार हात - अजरामराः भविष्यन्ति - जरा व मृत्यू यांनी रहित होतील - नकुतश्चिद्‌भयः असुरः - ज्याला कोठूनहि भय नाही असा तो बाणासुर - भवतः पार्षदमुख्यः (भविता) - तुमचा मुख्य सेवक होईल. ॥४९॥

असुरः - बाणासुर - इति अभयं लब्ध्वा - याप्रमाणे अभय मिळवून - शिरसा कृष्णं प्रणम्य - मस्तकाने कृष्णाला नमस्कार करून - सवध्वा प्राद्युम्निं रथम् आरोप्य - ऊषेसह प्रद्युम्नपुत्र अनिरुद्धाला रथात बसवून - समुपानयत् - जवळ आणिता झाला. ॥५०॥

रुद्रानुमोदितः (सः) - शंकराने अनुमोदन दिलेला कृष्ण - अक्षौहिण्या परिवृतं - अक्षौहिणी सैन्याने वेष्टिलेल्या - सुवासः समलंकृतं - व उंची वस्त्रांनी शोभिवंत केलेल्या - सपत्‍नीकं (तं) - अशा त्या सपत्‍नीक अनिरुद्धाला - पुरस्कृत्य ययौ - पुढे करून गेला. ॥५१॥

पौरसुहृद्‌द्विजातिभिः अभ्युद्यतः (सः) - नागरिक लोक, मित्र व ब्राह्मण यांनी जयजयकार केलेला तो श्रीकृष्ण - सतोरणैः ध्वजैः समलङ्‌कृतां - तोरणे व पताका यांनी शोभविलेल्या - उक्षितमार्गचत्वरां - शिंपिले आहेत रस्ते व चव्हाटे जीतील अशा - स्वराजधानीं - आपल्या राजधानीत - शङखानकदुन्दुभिस्वनैः - शंख, तुतार्‍या, चौघडयांचे शब्द होत असता - विवेश - शिरला. ॥५२॥

यः - जो - एवं - याप्रमाणे - शंकरेण संयुगं कृष्णविजयं च - शंकराशी झालेले युद्ध व श्रीकृष्णाचा विजयही - प्रातः उत्थाय संस्मरेत् - सकाळी उठून स्मरेल - तस्य पराजयः न स्यात् - त्याचा पराजय होणार नाही. ॥५३॥

अध्याय त्रेसष्ठावा समाप्त

GO TOP