श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६२ वा - अन्वयार्थ

उषा - अनिरुद्ध मिलन -

महायोगिन् - हे महायोगी शुकाचार्या - यदूत्तमः - यादवश्रेष्ठ अनिरुद्ध - बाणस्य तनयां ऊषां उपयेमे - बाणाची कन्या जी ऊषा तिला वरिता झाला - तत्र - त्याठिकाणी - हरिशङ्‌करयोः - श्रीकृष्ण व शंकर यांचे - महत् घोरं युद्धं अभूत् - मोठे भयंकर युद्ध झाले - त्वं एतत् सर्वं समाख्यातुं अर्हसि - तू ते सर्व सांगण्याला योग्य आहेस. ॥१॥

बाणः - बाणासुर - महात्मनः बलेः - महात्म्या बलि राजाचा - पुत्रशतज्येष्ठः आसीत् - शंभर पुत्रांमध्ये श्रेष्ठ पुत्र होता - येन - ज्या बलिराजाकडून - वामनरूपाय हरये - वामनरूप धारण केलेल्या विष्णूला - मेदिनी अदायि - पृथ्वी दिली गेली. ॥२॥

बाणः तस्य औरसः सुतः - बाणासुर हा त्या बलिराजाचा औरस पुत्र - सदा शिवभक्तिरतः - नित्य शिवभक्ति करण्यात तत्पर - मान्यः वदान्यः धीमान् सत्यसंधः दृढवतः च - आणि मान देण्यास योग्य, दाता, बुद्धिमान, खरे बोलणारा व कोणतेहि व्रत नेटाने चालविणारा होता. ॥३॥

सः - तो बाणासुर - पुरा - पूर्वी - शोणिताख्ये रम्ये पुरे - शोणित नावाच्या रमणीय नगरामध्ये - राज्यं अकरोत् - राज्य करिता झाला - ते अमराः - ते देव - तस्य शम्भोः प्रसादेन - त्या बाणासुरावर शंकराची कृपा असल्यामुळे - किंकरा इव (आसन्) - सेवकाप्रमाणे होते - सहस्त्रबाहुः (सः) - हजार बाहु असलेला तो बाणासुर - वाद्येन - वाद्य वाजवून - ताण्डये मूडं अतोषयत् - तांडव नृत्यामध्ये शंकराला संतुष्ट करिता झाला. ॥४॥

सर्वभूतेशः शरण्यः भक्तवत्सलः भगवान् - सर्व प्राण्यांचा अधिपति, शरणगतांचे रक्षण करणारा, भक्तांवर प्रेम करणारा भगवान शंकर - (तं) वरेण छन्दयामास - त्याला वराने संतुष्ट करिता झाला - स तं पुराधिपं वव्रे - तो बाणासुर शंकराजवळ पुराचे आधिपत्य मागता झाला. ॥५॥

एकदा वीर्यदुर्मदः सः - एके दिवशी पराक्रमामुळे उन्मत्त झालेला तो बाणासुर - अर्कवर्णेन किरीटेन तत्पदाम्बुजं संस्पृशन् - सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा मुकुटाने त्या शंकराच्या चरणकमळाला स्पर्श करीत - पार्श्वस्थं गिरिशं आह - जवळच असणार्‍या शंकराला म्हणाला. ॥६॥

महादेव - हे शंकरा - अपूर्णकामानां पुंसां - ज्यांच्या इच्छा पूर्ण नाहीत अशा पुरुषांच्या - कामपूरामराङ्‌घ्रिपम् - इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष अशा - लोकानां गुरुं ईश्वरं त्वां नमस्ये - लोकांचा गुरु परमेश्वर अशा तुला मी नमस्कार करीत आहे. ॥७॥

त्वया मे दत्तं दोःसहस्त्रं - तू मला दिलेले हजार हात - परं भाराय अभवत् - अत्यंत ओझ्यासारखे झाले आहेत - त्वदृते - तुझ्याशिवाय - त्रिलोक्यां समं प्रतियोद्धारं - त्रैलोक्यात माझ्या तोडीचा प्रतिस्पर्धी योद्धा - न लभे - मला आढळत नाही. ॥८॥

आद्य - हे आदिपुरुषा - अहं - मी - कण्डूत्या निभृतैः दोर्भिः - कंडूने भरून गेलेल्या बाहूंनी - दिग्गजान् युयुत्सुः - दिग्गजांशी युद्ध करण्याची इच्छा करणारा - अद्रीन् चूर्णयन् अयाम् - पर्वतांचे चूर्ण करीत चाललो - (तदा) ते अपि भीताः प्रदुद्रुवुः - तेव्हा ते दिग्गजहि भिऊन पळत सुटले. ॥९॥

भगवान् - शंकर - तत् श्रुत्वा क्रुद्धः - ते ऐकून रागावला - अब्रवीत् च - आणि म्हणाला - मूढ - हे मूर्खा बाणासुरा - ते केतुः यदा भज्यते - तुझा ध्वज जेव्हा मोडून पडेल - मत्समेन ते त्वद्दर्पघ्नं संयुगं भवेत् - तुझे माझ्यासारख्याशी तुझ्य़ा गर्वाचा परिहार करणारे युद्ध होईल. ॥१०॥

नृप - हे राजा - कुमतिः कुधीः - दुष्टबुद्धि व वाईट विचार करणारा बाणासुर - इति उक्तः हृष्टः - याप्रमाणे सांगितल्यामुळे आनंदित झालेला असा - स्ववीर्यनशनं गिरिशादेशं प्रतीक्षन् - आपल्या पराक्रमाचा नाश करणार्‍या शंकराच्या आज्ञेची वाट पहात - स्वगृहं प्राविशत् - आपल्या घरी गेला. ॥११॥

तस्य ऊषा नाम दुहिता (आसीत्) - त्याला ऊषा नावाची कन्या होती - सा कन्या - ती कन्या - स्वप्ने - स्वप्नामध्ये - प्रागदृष्टश्रुतेन कान्तेन प्राद्युम्निना - पूर्वी न पाहिलेल्या व न ऐकिलेल्या सुंदर प्रद्युम्नपुत्र अनिरुद्धाबरोबर - रतिम् अलभत - रतिसुख मिळविती झाली. ॥१२॥

तत्र तं अपश्यन्ती सा - तेथे त्याला न पहाणारी ती ऊषा - कान्त क्व असि इति वादिनी - हे सुंदरा, तू कोठे आहेस असे बोलणारी - भृशं विह्वला व्रीडिता - अत्यंत विव्हल व लज्जित झालेली - सखीनां मध्ये - मैत्रिणींच्या मध्यभागी - उत्तस्थौ - उठून उभी राहिली. ॥१३॥

बाणस्य मन्त्री कुम्भाण्डः (आसीत्) - बाणासुराचा कुंभांड नावाचा मंत्री होता - तत्सुता चित्रलेखा च सखी - आणि त्या कुंभांडाची चित्रलेखा नावाची कन्या ऊषेची मैत्रीण होती - कौतूहलसमन्विता - जिज्ञासेने युक्त झालेली ती - ऊषां सखीम् अपृच्छत् - मैत्रीण जी ऊषा तिला विचारिती झाली. ॥१४॥

सुभ्रूः राजपुत्रि - हे सुंदर राजकन्ये - त्वं कं मृगयसे - तू कोणाला शोधीत आहेस - ते मनोरथः कीदृशः - तुझ्या मनातील हेतु काय आहे - अद्यापि ते हस्तग्राहं न उपलक्षये - अजून तुझे पाणिग्रहण करणारा मला कोणी आढळला नाही. ॥१५॥

श्यामः - कृष्णवर्णाचा - कमललोचनः - कमळाप्रमाणे नेत्र असणारा - पीतवासाः - पिवळे वस्त्र नेसलेला - बृहद्‌बाहुः - मोठे बाहु असलेला - योषितां हृदयंगमः - स्त्रियांच्या मनात भरणारा - क्वचित् नरः - कोणी पुरुष - स्वप्ने दृष्टः - स्वप्नात पाहिलेला. ॥१६॥

अधरं मधु पाययित्वा - अधरोष्ठमधु पाजून - स्पृहयतीं मां वृजिनार्णवेक्षिप्त्वा - त्याची इच्छा करणार्‍या मला दुःखसागरात लोटून - क्व अपि यातः - कोठेतरी निघून गेला - अहं तं कान्तं मृगये - त्या सुंदर पुरुषाला मी शोधत आहे. ॥१७॥

तं व्यसनम् अपिकर्षामि - तुझे दुःख मी दूर करते - यः ते मनाहर्ता - जो तुझ्या मनाचे हरण करणारा आहे - (सः) यदि त्रिलोक्यां भाव्यते - तो जर त्रैलोक्यात असणे संभवनीय असेल - (तर्हि) तं नरं अनिष्ये - तर मी त्याला घेऊन येईन - तम् आदिश - तो कोण आहे सांग. ॥१८॥

इति उक्त्वा - असे म्हणून - देवगन्धर्वसिद्धचारणपन्नगान् - देव, गंधर्व, सिद्ध, चारण, नाग यांची - दैत्यविद्याधरान् - दैत्य व विद्याधर यांची - यक्षान् च मनुजान् - आणि यक्ष व मनुष्य यांची - (सा) यथा (वत्) अलिखत् - ती हुबेहुब चित्रे काढिती झाली. ॥१९॥

सा च - आणि ती चित्रलेखा - मनुजेषु - मनुष्यांमध्ये - वृष्णीन् शूरम् आनकदुन्दुभिं - यादव, शूरसेन, वसुदेव यांची - रामकृष्णौ च प्रद्युम्नं - तशीच बलराम, श्रीकृष्ण, व प्रद्युम्न यांची - व्यलिखत् - चित्रे काढिती झाली - (तं) वीक्ष्य (सा) लज्जिता - त्या प्रद्युम्नाला पाहून ती ऊषा लाजली. ॥२०॥

महीपते - राजा - ऊषा विलिखितं अनिरुद्धं वीक्ष्य - ऊषा चित्रात काढिलेल्या अनिरुद्धाला पाहून - ह्लिया अवाङ्‌मुखी - लज्जेने खाली मुख करीत - असौ सः असौ - हाच तो हाच - इति स्मयमान प्राह - असे मंद हास्य करीत म्हणाली. ॥२१॥

राजन् - राजा - योगिनी चित्रलेखा - योगविद्या जाणणारी चित्रलेखा - तं कृष्णस्य पौत्रं आज्ञाय - तो श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध होय असे जाणून - विहायसा कृष्णपालितां द्वारकां ययौ - आकाशमार्गाने श्रीकृष्णाने रक्षिलेल्या द्वारकेला गेली. ॥२२॥

योगं आस्थिता (सा) - योगाचा अवलंब केलेली ती चित्रलेखा - तत्र - त्या द्वारकेत - सुपर्यङ्के सुप्तं प्राद्युम्निं - उंची पलंगावर निजलेल्या प्रद्युम्नपुत्र अनिरुद्धाला - गृहीत्वा - घेऊन - शोणितपुरम् (आनीय) - शोणितपुरामध्ये आणून - सख्यै प्रियम् अदर्शयत् - मैत्रीण जी ऊषा तिला प्रियकर दाखविती झाली. ॥२३॥

सा च - ती ऊषा - सुन्दरवरं तं विलोक्य मुदितानना - स्वरूपवानांमध्ये श्रेष्ठ अशा त्याला पाहून आनंदमुखी अशी - पुम्भिः दुष्प्रेक्ष्ये स्वगृहे - पुरुषांना पहाण्यास अशक्य अशा आपल्या घरामध्ये - प्राद्युम्निना समं रेमे - प्रद्युम्न पुत्र अनिरुद्धाबरोबर रममाण झाली. ॥२४॥

परार्ध्यवासःस्रग्गन्धधूपदीपासनादिभिः - श्रेष्ठ मूल्यवान उंची वस्त्रे, माळा, सुगंधी पदार्थ, धूप, दीप व आसन या योगे - पानभोजनभक्ष्यैः च - आणि पिण्याचे पदार्थ, सुग्रास भोजन व भक्ष्य पदार्थ या योगे - वाक्यैः शुश्रूषया अर्चितः - मधुर भाषणांनी नीट व्यवस्था राखण्याने तो अनिरुद्ध पूजिला गेला. ॥२५॥

कन्यापुरे गूढः - कन्येच्या महालामध्ये गुप्त रीतीने राहिलेला - शश्वत्‌प्रवृद्धस्नेहया तया ऊषया अपहृतेन्द्रियः सः - वारंवार जिचे प्रेम अत्यंत वाढत आहे अशा त्या ऊषेने ज्याची इन्द्रिये हिरावून घेतली आहेत असा अनिरुद्ध - अहर्गणान् न बुबुधे - दिवसांची संख्या जाणता झाला नाही. ॥२६॥

तथा यदुवीरेण भुज्यमानां - त्याप्रमाणे यदुश्रेष्ठ अनिरुद्धाने उपभोगिलेल्या - हतव्रतां - ब्रह्मचर्य व्रतापासून भ्रष्ट झालेल्या - आप्रीतां - सर्वप्रकारे प्रसन्न मुद्रेच्या - तां - त्या ऊषेला - दुखच्छदैः हेतुभिः लक्षयाञ्चक्रुः - आच्छादिता न येणार्‍या कारणांनी पहाते झाले.॥२७॥

राजन् - हे राजा - वयं - आम्ही - कन्यायाः कुलदूषणं - कन्येचे कुळाला बटटा लावणारे - ते दुहितुः विचेष्टितं - तुझ्या मुलीचे विरुद्ध आचरण - लक्षयामः - पहात आहोत - (इति) भटाः आवेदयाञ्चक्रुः - असे बाणासुराचे सैनिक त्याला निवेदन करिते झाले. ॥२८॥

प्रभो - हे राजा - अनपायिभिः अस्माभिः - सावधपणे कार्य करणार्‍या आम्ही - गुप्तायाः च पुम्भिः दुष्प्रेक्ष्यायाः कन्यायाः गृहे - रक्षिलेल्या व पुरुषांचे जिला दर्शनहि व्हावयाचे नाही अशा कन्येच्या घरात - दूषणं न विघ्नहे - दोषी कृत्य कसे घडले हे समजत नाही. ॥२९॥

ततः दुहितुः श्रुतदूषणः प्रव्यथितः बाणः - नंतर कन्येचे दोषयुक्त आचरण ऐकून दुःखी झालेला बाणासुर - त्वरितः कन्यकागारं प्राप्तः - ताबडतोब कन्येच्या मंदिरात गेला - यदूद्वहम् (च) अद्राक्षीत् - व यदुकुलोत्पन्न अनिरुद्धाला पहाता झाला. ॥३०॥

भुवनैकसुन्दरं - त्रैलोक्यात अत्यंत स्वरूपवान अशा - श्यामं पिशंगाम्बरम् - कृष्णवर्णाच्या व पिवळे वस्त्र धारण केलेल्या - अम्बुजेक्षणं बृहद्‌भुजं - कमळाप्रमाणे नेत्र व मोठे दंड असलेल्या - कुण्डलकुन्तलत्विषा च स्मितावलोकेन मण्डिताननं - कुण्डलांच्या व कुरळ केसांच्या कांतीने आणि मंदहास्ययुक्त अवलोकनाने ज्याच्या मुखाला शोभा आली आहे अशा - कामात्मजं तं (अद्राक्षीत्) - प्रद्युम्नपुत्र अनिरुद्धाला पहाता झाला. ॥३१॥

अभिनृम्णया प्रियया अक्षैः दीव्यन्तं - मंगल अशा प्रियपत्‍नी ऊषेसह फाशांनी खेळणार्‍या - मधुमल्लिकाश्रितां तदङगसङगस्तनकुङ्‌कुमस्रजं - मधुमालतीच्या फुलांनी तयार केलेल्या व त्या ऊषेच्या अवयवांना स्पृष्ट झाल्यामुळे जिच्या स्तनांवरील केशराची उटी जिला लागली आहे अशा पुष्पमाळेला - बाव्होः(मध्ये) दधानं - दोन्ही दंडांवर धारण करणार्‍या - तस्याः अग्रे आसीनं (तं) अवेक्ष्य - त्या ऊषेच्या समोर बसलेल्या अनिरुद्धाला पाहून - विस्मितः - आश्चर्यचकित झाला. ॥३२॥

सः माधवः - तो अनिरुद्ध - आततायिभिः भटैः अनीकैः वृत्तं - शस्रधारी योद्ध्यांनी व सैनिकांनी वेष्टिलेल्या - प्रविष्टं तं अवलोक्य - व आत शिरलेल्या त्या बाणासुराला पाहून - यथा जिघांसया दण्डधरः अन्तकः - ज्याप्रमाणे मारण्याच्या इच्छेने दंड धारण करणारा यमराज त्याप्रमाणे - मौर्वं परिघं उद्यम्य व्यवस्थितः - पोलादी खंडाची अर्गळा हातात घेऊन सज्ज झाला.॥३३॥

(सः) जिघृक्षया परितः प्रसर्पतः तान् - तो अनिरुद्ध, पकडण्याच्या इच्छेने इकडे तिकडे धावणार्‍या त्या बाणासुराच्या सैनिकांना - यथा सूकरयूथपः शुनः (तथा) - ज्याप्रमाणे डुकरांचा अधिपति कुत्र्यांना मारितो त्याप्रमाणे - अहनत् - मारिता झाला - हन्यमानाः ते - मारिले जाणारे ते योद्धे - भवनात् विनिर्गताः - ऊषेच्या घरातून बाहेर पडून - निर्भिन्नमूर्धोरुभुजाः - ज्यांची मस्तके, मांडया, व दंड मोडून गेले आहेत असे - प्रदुद्रुवुः - पळत सुटले. ॥३४॥

बलिनन्दनः - बलिराजाचा पुत्र असा - कुपितः बली (सः) - रागावलेला बलिष्ठ बाणासुर - स्वसैन्यं घ्नन्तं तं - आपल्या सैनिकांना मारणार्‍या त्या अनिरुद्धाला - नागपाशैः बबन्ध ह - नागपाशांनी खरोखर बांधिता झाला - ऊषा - ऊषा - बद्धं निशम्य - अनिरुद्धाला बांधले आहे असे ऐकून - शोकविषादविह्वला - शोक व खेद ह्यांनी विव्हळ झालेली - अश्रुकलाक्षी - अश्रूंनी भरले आहेत नेत्र जिचे अशी - भृशं अरौदिषीत् - रडू लागली. ॥३५॥

अध्याय बासष्ठावा समाप्त

GO TOP