|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ५९ वा - अन्वयार्थ
भौमासुराचा उद्धार आणि सोळा हजार एकशे राजकन्यांचा भगवंतांबरोबर विवाह - च - आणखी - येन ताः स्त्रियः निरुद्धाः - ज्याने त्या स्त्रिया बंदिगृहात ठेविल्या होत्या - (सः) भौमः - तो भौमासुर - भगवता यथा हतः - भगवान श्रीकृष्णाने कोणत्या प्रकारे मारिला - एतत् शार्ङगधन्वनः विक्रमं आचक्ष्व - हा श्रीकृष्णाचा पराक्रम सांगा. ॥१॥ हृतच्छत्रेण - हरिलेले आहे छत्र ज्याचे अशा - हृतकुण्डलबन्धुना - हरण केले गेले आहे अमरपर्वतावरील स्थान ज्याचे अशा - इन्द्रेण - इंद्राने - भौमचेष्टितं ज्ञापितः - नरकासुराचे कृत्य सांगितलेला असा श्रीकृष्ण - सभार्यः गरुडारुढः (भूत्वा) - पत्नीसह गरुडावर आरुढ होऊन - प्राग्ज्योतिषपुरं ययौ - प्राग्ज्योतिष देशाच्या नगराला गेला. ॥२॥ गिरिदुर्गैः - पर्वतावरील किल्ल्यांनी - शस्त्रदुर्गैः - शस्त्रांनी निर्मिलेल्या किल्ल्यांनी - सर्वतः (च) - व सर्व बाजूंनी - दृढैः घोरैः मुरपाशायुतैः आवृतं - बळकट व भयंकर अशा मुराच्या हजारो पाशांनी वेष्टिलेले - (च) जलाग्न्यनिलदुर्गमम् (आसीत्) - आणि उदक, अग्नि व वायु यांमुळे प्रवेश होण्यास कठीण असे होते. ॥३॥ (श्रीकृष्णः) गदया अद्रीन् निर्बिभेद - श्रीकृष्ण गदेने पर्वत फोडिता झाला - सायकैः शस्त्रदुर्गाणि - बाणांनी शस्त्रांचे किल्ले - चक्रेण अग्निं जलं वायुं - सुदर्शनचक्राने अग्नि, उदक व वायु यांना - तथा असिना मुरपाशान् - तसेच तरवारीने मुराच्या पाशांना. ॥४॥ गदाधरः - गदाधारी श्रीकृष्ण - शंखनादेन यन्त्राणि - शंखनादाने यंत्रे - मनस्विनां हृदयानि - तेजस्वी शत्रूंची हृदये - गुर्व्या गदया (च) प्राकारं - आणि जड अशा गदेने तटाच्या भिंती - निर्बिभेद - फोडिता झाला. ॥५॥ शयानः पञ्चशिराः मुरः दैत्यः - निजलेला पाच मस्तकांचा मुरनामक दैत्य - युगान्ताशनिभीषणं - प्रलयकालीन मेघगर्जनेप्रमाणे भयंकर असा - पाञ्चजन्यध्वनिं श्रुत्वा - पाञ्चजन्य शंखाचा शब्द ऐकून - जलात् उत्तस्थौ - खंदकाच्या उदकातून वर उठून उभा राहिला. ॥६॥ सुदुर्निरीक्षणः - ज्याकडे पहाणे अत्यंत कठीण आहे असा - युगान्तसूर्यानलरोचिः - प्रलयकालाच्या सूर्याप्रमाणे व अग्नीप्रमाणे आहे कांती ज्याची असा - उल्बणः - भयंकर - पञ्चभिः मुखैः त्रिलोकीं ग्रसन् इव (सः) - पाच तोंडांनी त्रैलोक्याला जणू ग्रासणारा असा तो मुर - त्रिशूलम् उद्यम्य - त्रिशूळ उगारून - यथा उरगः तार्क्ष्यसुतं (तथा) - जसा साप गरुडाकडे त्याप्रमाणे - (तं) अभ्यद्रवत् - त्या श्रीकृष्णावर चालून गेला. ॥७॥ सः - तो मुर - तरसा शूलं आविद्ध्य - वेगाने शूळ गरगर फिरवून - गरुत्मते निरस्य - गरुडावर फेकून - पञ्चभिः वक्त्रैः - पाच तोंडांनी - व्यनदत् - गर्जना करू लागला - (महान्) सः - मोठा तो ध्वनि - रोदसी - पृथ्वी व आकाश यांमधील अंतरिक्ष - सर्वदिशः अंबरं - सर्व दिशा व आकाश - आपूरयन् - भरणारा असा - अण्डकटाहं आवृणोत् - ब्रह्माण्डाला व्यापिता झाला. ॥८॥ तदा - त्यावेळी - त्रिशिखम् - त्रिशूळ - गरुत्मते - गरुडावर - वै आपतत् - खरोखर पडला - हरिः - श्रीकृष्ण - तं - त्या त्रिशूळाला - शराभ्यां - दोन बाणांनी - ओजसा वै त्रिधा अभिनत् - वेगाने तीन तुकडे करून पाडिता झाला - अपि तं च - आणि त्या मुरालाहि - शरैः मुखेषु - बाणांनी तोंडांवर - अताडयत् - ताडिता झाला - सः अपि - तो मुरसुद्धा - रुषा - रागाने - तस्मै - त्या श्रीकृष्णावर - गदां व्यमुञ्चत् - गदेला सोडिता झाला. ॥९॥ गदाग्रजः अजितः - गदाचा वडील बंधु श्रीकृष्ण - मृधे - युद्धात - गदया - गदेने - आपतन्तीं तां गदां - चाल करून येणार्या त्या गदेला - सहस्रधा निर्बिभिदे - हजार तुकडे करून फोडिता झाला - बाहून् उद्यम्य - हात वर करून - अभिधावतः (तस्य) शिरांसि - धावणार्या त्या मुराची मस्तके - चक्रेण लीलया जहार - सुदर्शनचक्राने लीलेने हरण करिता झाला. ॥१०॥ कृत्तशीर्षः (सः) - ज्याची मस्तके तुटून गेली आहेत असा तो मुर - इन्द्रतेजसा निकृत्तशृङगः अद्रिः इव - इंद्राच्या तेजस्वी वज्राने ज्याचे शिखर तोडिले आहे अशा पर्वताप्रमाणे - व्यसुः (भूत्वा) अंभसि पपात - मृत होऊन उदकात पडला - तस्य - त्याचे - पितुः वधातुराः सप्त आत्मजाः - पित्याच्या वधामुळे पीडित झालेले सात पुत्र - प्रतिक्रियामर्षजुषः (भूत्वा) समुद्यताः - प्रतिकार करण्यासाठी क्रोधयुक्त होऊन युद्धास सिद्ध झाले. ॥११॥ ताम्रः अन्तरिक्षः श्रवणः विभावसुः वसुः नभस्वान् सप्तमः च अरुणः - ताम्र, अंतरिक्ष, श्रवण, विभावसु, वसु, नभस्वान आणि सातवा अरुण - चमूपतिं पीठं पुरस्कृत्य - सेनापति पीठाला पुढे करून - मृधे - युद्धात - भौमप्रयुक्ताः - नरकासुराने प्रेरिलेले असे - धृतायुधाः - हातात आयुधे घेतलेले असे - निरगन् - बाहेर पडले. ॥१२॥ रुषा उल्बणाः - क्रोधाने वाढलेले ते - शरान् असीन् गदाः शक्त्यृष्टिशूलानि - बाण, तलवार, गदा, शक्ति, ऋष्टि व शूल इ. हत्यारे - आसाद्य - मिळवून - अजिते प्रायुज्जत - श्रीकृष्णावर सोडिते झाले - अमोघवीर्यः भगवान् - व्यर्थ न जाणारा आहे पराक्रम ज्याचा असा भगवान श्रीकृष्ण - स्वमार्गणैः - आपल्या बाणांनी - तच्छस्रकूटं तिलशः चकर्त ह - यांच्या शस्त्रसमूहाचे तिळाएवढे तुकडे करून सोडिता झाला. ॥१३॥ निकृत्तशीर्षोरुभुजाङ्घ्रिवर्मणा - तोडिली आहेत मस्तके, मांडया, दंड, पाय व कवचे ज्यांची अशा - पीठमुख्यान् तान् - पीठ आहे प्रमुख ज्यांमध्ये अशा सेनापतींना - यमक्षयं अनयत् - यमलोकी पाठविता झाला - अच्युतचक्रसायकैः - श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र व बाण यांनी - तथा निरस्तान् - त्याप्रमाणे ठार केलेले - स्वान् अनीकपान् निरीक्ष्य - आपले सेनापति पाहून - धरासुतः नरकः - भूमीचा पुत्र नरकासुर - दुर्मर्षणः (भूत्वा) - फार संतप्त होऊन - आस्रवन्मदैः पयोधिप्रभवैः गजैः - मद पाझरणार्या क्षीरसागरोत्पन्न हत्तीसह - निराक्रमत् - बाहेर पडला - यथा सूर्योपरिष्टात् सतडित्घनं - ज्याप्रमाणे सूर्यावरून विद्युलतेसह मेघ यावा - (तथा) गरुडोपरि स्थितं सभार्यं कृष्णं दृष्टवा - त्याप्रमाणे गरुडावर बसलेल्या पत्नीसह अशा श्रीकृष्णाला पाहून - सः तस्मै शतघ्नीं व्यसृजत् - तो त्याच्यावर शतघ्नी सोडिता झाला - च - आणि - सर्वे योधाः - सर्व योद्धे - (तं) युगपत् विव्यधुः स्म - श्रीकृष्णाला एकदम वेधिते झाले. ॥१४-१५॥ भगवान् गदाग्रजः - भगवान श्रीकृष्ण - विचित्रवाजैः निशितैः शिलीमुखैः - चित्रविचित्र पिसारे असणार्या तीक्ष्ण बाणांनी - तत् भौमसैन्यं - ते नरकासुराचे सैन्य - निकृत्तबाहूरुशिरोध्रविग्रहं - बाहु, मांडया, माना व शरीरे ही ज्यांची तुटून गेली आहेत असे - चकार - करिता झाला - तर्हि एव - त्याचवेळी - हताश्वकुंजरं (चकार) - घोडे व हत्ती ज्यांतील मेले आहेत असे करिता झाला.॥१६॥ कुरूद्वह - हे परीक्षित राजा - गजान् निघ्नता सुपर्णेन - हत्तींना मारणार्या गरुडाकडून - पक्षाभ्यां उह्यमानः - पंखांनी वाहिला जाणारा असा - हरिः - श्रीकृष्ण - योधैः प्रयुक्तानि यानि शस्त्रास्त्राणि - योद्ध्यांनी सोडिलेली जी शस्त्रास्त्रे - तानि एकैकशः त्रिभिः तीक्ष्णैः शरैः - ती प्रत्येकी तीन तीन तीक्ष्ण बाणांनी - अच्छिनत् - तोडिता झाला - गरुत्मता - गरुडाकडून - तुंडपक्षनखैः - चोच, पंख व नखे यांनी ताडिले जाणारे - गजाः - हत्ती - आर्ताः - पीडित होऊन - पुरम् एव आविशन् - नगरातच शिरले - नरकः - नरकासुर - गरुडेन अर्दितं विद्रावितं स्वकं सैन्यं दृष्टवा - गरुडाने पीडिलेले व पळवून लाविलेले स्वतःचे सैन्य पाहून - युधि अयुध्यत - युद्धभूमीवर युद्ध करू लागला. ॥१७-१९॥ ततः वज्रः प्रतिहतः - ज्या शक्तीने वज्र नाश पावले - (तया) शक्त्या - त्या शक्तीने - भौमः तं प्राहरत् - भूमिपुत्र नरकासुर गरुडावर प्रहार करिता झाला - मालाहतः द्विपः इव - माळेने ताडिलेला हत्ती त्याप्रमाणे - तया विद्धः (गरुडः) - त्या शक्तीने विद्ध झालेला गरुड - न अकंपत - हालला नाही. ॥२०॥ वितथोद्यमः भौमः - व्यर्थ आहे उद्योग ज्याचा असा भूमिपुत्र नरकासुर - अच्युतं हन्तुं - श्रीकृष्णाला मारण्याकरिता - शूलं आददे - शूळ घेता झाला - हरिः - श्रीकृष्ण - तद्विसर्गात् पूर्वं एव - त्या त्रिशूलाला सोडण्यापूर्वीच - गजस्थस्य - हत्तीवर बसलेल्या - नरकस्य शिरः - नरकासुराचे मस्तक - क्षुरनेमिना चक्रेण - वस्तर्याप्रमाणे धार आहे ज्याची अशा सुदर्शनचक्राने - अपाहरत् - हरिता झाला. ॥२१॥ सकुण्डलं चारुकिरीटभूषणं (तत्) - कुंडलासह सुंदर किरीट व अलंकार धारण केलेले ते मस्तक - समुज्ज्वलत् - चकाकत - पृथिव्यां पतितं बभौ - पृथ्वीवर पडलेले असे शोभले - ऋषयः सुरेश्वराः (च) - ऋषि व इंद्रादि देव - माल्यैः विकिरन्तः - फुलांची वृष्टि करणारे असे - हा हा इति - वाहवा, वाहवा असे - साधु इति - चांगले झाले असे म्हणून - मुकुंद ईडिरे - श्रीकृष्णाला स्तविते झाले. ॥२२॥ ततः च - आणि नंतर - भूः - पृथ्वी - कृष्णं उपेत्य - श्रीकृष्णाजवळ येऊन - प्रतप्तजाम्बूनदरत्नभास्वरे कुंडले - निर्मळ झगझगणारी अशी आणि सुवर्ण व रत्ने यांनी प्रकाशणारी दोन कुंडले - (च) सवैजयन्त्या वनमालया - आणि वैजयंतीसह वनमाळेने युक्त - प्राचेतसं छत्रं - वरुणाचे छत्र - अथो महामणिं - आणि महारत्न - अर्पयत् - अर्पिती झाली. ॥२३॥ राजन् - हे परीक्षित राजा - अथ - नंतर - देवी - पृथ्वी - प्राञ्जलिः - हात जोडलेली अशी - प्रणता - नमस्कार करून - भक्तिप्रवणया धिया प्रणता - भक्तीने नम्र अशा बुद्धीने नमस्कार करणारी - देववरार्चितं विश्वेशं - श्रेष्ठ देवांनी पूजिलेल्या जगत्पति श्रीकृष्णाला - अस्तोषीत् - स्तविती झाली. ॥२४॥ देवदेवेश - मोठमोठया देवांचा अधिपति अशा हे श्रीकृष्णा - शङखचक्रगदाधर - शंख, चक्र व गदा धारण करणार्या हे ईश्वरा - परमात्मन् - हे परमेश्वरा - ते नमः - तुला नमस्कार असो - भक्तेच्छोपात्तरूपाय ते नमः अस्तु - भक्तांच्या इच्छेप्रमाणे घेतली आहेत स्वरूपे ज्याने अशा तुला नमस्कार असो. ॥२५॥ पङ्कजनाभाय नमः - ज्याच्या नाभीच्या ठिकाणी कमळ आहे अशा तुला नमस्कार असो - पङकजमालिने नमः - कमळांच्या माळा धारण करणार्या तुला नमस्कार असो - पङकजाङ्घ्रये ते नमः - कमळाप्रमाणे पाय असणार्या तुला नमस्कार असो. ॥२६॥ वासुदेवाय विष्णवे - वसुदेवपुत्र व सर्वव्यापी - पुरुषाय आदिबीजाय - सर्वांच्या शरीरात आत्मरूपाने रहाणार्या व मूळबीजरूपी - पूर्णबोधाय भगवते तुभ्यं नमः - पूर्ण ज्ञानी असा जो तू भगवान त्या तुला नमस्कार असो - ते नमः - तुला पुनः नमस्कार असो. ॥२७॥ परावरात्मन् भूतात्मन् परमात्मन् - हे कार्यकारणस्वरूपा, हे कार्यस्वरूपा, हे प्राणिमात्रांच्या ठिकाणी आत्मरूपाने रहाणार्या परमात्म्या - अजाय अस्य जनयित्रे - स्वतः जन्मरहित असून ह्या जगाला उत्पन्न करणार्या - ब्रह्मणे अनन्तशक्तये - ब्रह्मस्वरूपी अनंत शक्तीच्या अशा - ते नमः अस्तु - तुला नमस्कार असो. ॥२८॥ प्रभो - हे श्रीकृष्णा - त्वं वै - तू खरोखर - सिसृक्षुः - सृष्टि उत्पन्न करण्याच्या इच्छेने - उत्कटं रजः बिभर्षि - बलवान असा रजोगुण धारण करितोस - असंवृतः - न झाकलेला असा उघड रीतीने - निरोधाय तमः (बिभर्षि) - प्रलय करण्याकरिता तमोगुणाला धारण करितोस - जगत्पते - हे जगन्नाथा - जगतः स्थानाय सत्त्वं (बिभर्षि) - जगाच्या रक्षणासाठी तू सत्त्वगुण स्वीकारितोस - परः भवान् - श्रेष्ठ असा तू - कालः प्रधानं पुरुषः (असि) - काल, प्रकृति व पुरुष असा आहेस. ॥२९॥ भगवन् - हे श्रीकृष्णा - अहं पयः ज्योतिः अनिलः नभः - मी पृथ्वी, उदक, तेज, वायु, आकाश - मात्राणि - पंचमहाभूतांची सूक्ष्म स्वरूपे - देवाः मनः इन्द्रियाणि - देव, मन, इंद्रिये - अथ कर्ता महान् - त्याचप्रमाणे अहंकार व महत्तत्व - इति अखिलं चराचरं - असे सर्व स्थावरजंगमात्मक विश्व - अयम् - हा - अद्वितीये त्वयि - एकरूपी तुझ्या ठिकाणी - भ्रमः (अस्ति) - भ्रम होय. ॥३०॥ प्रपन्नार्तिहर - शरण आलेल्यांची पीडा दूर करणार्या हे श्रीकृष्णा - तस्य अयं आत्मजः - त्या नरकासुराचा हा पुत्र - भीतः - भ्यालेला - तव पादपङ्कजं उपसादितः - तुझ्या चरणकमलाला शरण आला आहे - तत् एनं पालय - म्हणून ह्याचे रक्षण कर - अखिलकल्मषापहं (ते) हस्तपंकजं - सर्व पातकांचे क्षालन करणारे तुझे करकमल - अमुष्य शिरसि - ह्याच्या मस्तकावर ठेव. ॥३१॥ भक्तिनम्रया भूम्या - भक्तीने नम्र झालेल्या पृथ्वीने - इति वाग्भिः अर्थितः भगवान् - याप्रमाणे स्तुतीच्या वचनाने प्रार्थिलेला भगवान श्रीकृष्ण - अभयं दत्त्वा - अभय देऊन - सकलर्द्धिमत् भौमगृहं प्राविशत् - सर्व समृद्धीने युक्त अशा भूमिपुत्र नरकासुराच्या घरात शिरला. ॥३२॥ तत्र - तेथे - हरिः - श्रीकृष्ण - विक्रम्य - पराक्रम करून - भौमाहृतानां राजन्यकन्यानां षट्सहस्राधिकायुतं - भूमीपुत्र नरकासुराने हरण केलेल्या सोळा हजार राजकन्यांना - ददृशे - पहाता झाला. ॥३३॥ स्त्रियः - स्त्रिया - दैवोपसादितं - सुदैवाने प्राप्त झालेल्या - तं नरवीरं प्रविष्टं वीक्ष्य - त्या नगरात आलेल्या पुरुषश्रेष्ठाला पाहून - विमोहिताः - मोहित झालेल्या अशा - मनसा अभीष्टं पतिं वव्रिरे - मनाने इष्ट असा पति म्हणून वरित्या झाल्या. ॥३४॥ अयं मह्यं पतिः भूयात् - हा माझा पति होवो - धाता तत् अनुमोदतां - ब्रह्मदेव त्या गोष्टीला अनुमोदन देवो - इति सर्वाः - असे म्हणून सर्व स्त्रिया - कृष्णे पृथग्भावेन - कृष्णाच्या ठिकाणी भिन्नभिन्न रीतीने भावना ठेवून - हृदयं दधुः - अंतःकरण आसक्त करित्या झाल्या. ॥३५॥ कृष्णः - श्रीकृष्ण - सुमृष्टविरजोऽम्बराः ताः - सुंदर व निर्मळ वस्त्र नेसलेल्या त्या स्त्रिया - नरयानैः - पालखीतून - महाकोशान् रथान् महत् द्रविणं च - मोठमोठी कोठारे, रथ आणि मोठा द्रव्यनिधि - द्वारवतीं प्राहिणोत् - द्वारकेत पाठविता झाला. ॥३६॥ केशवः - श्रीकृष्ण - चतुर्दन्तान् तरस्विनः च पाण्डुरान् च - चार दातांचे वेगवान व शुभ्रवर्णाचे - चतुःषष्टिं ऐरावतकुलेभान् - चौसष्ट ऐरावतकुळात उत्पन्न झालेले हत्ती - प्रेषयामास - पाठवता झाला. ॥३७॥ सप्रियः (सः) - पत्नीसह तो श्रीकृष्ण - सुरेन्द्रभवनं गत्वा - इंद्रमंदिरी जाऊन - अदित्यै च कुण्डले दत्त्वा - आणि अदितीला कुंडले देऊन - च इंद्राण्या सह त्रिदशेन्द्रेण पूजितः - आणि इंद्राणीसह अशा देवेंद्राकडून पूजिला गेला. ॥३८॥ भार्यया नोदितः (सः) - भार्येने प्रेरणा केलेला तो - पारिजातं उत्पाटय - पारिजातक वृक्षाला उपटून - गरुत्मति आरोप्य - गरुडावर ठेवून - सेन्द्रान् विबुधान् निर्जित्य - इंद्रासह देवांना जिंकून - पुरं उपानयत् - द्वारका नगरीला आणिता झाला. ॥३९॥ (सः) सत्यभामायाः गृहोद्यानोपशोभनः स्थापितः - तो वृक्ष सत्यभामेच्या घराजवळील बगीच्याला शोभवील असा लाविला - तद्गन्धासवलम्पटाः भ्रमराः - त्या पारिजातक वृक्षाच्या सुगंधाला मोहित झालेले भुंगे - स्वर्गात् अन्वगुः - स्वर्गाहून त्याच्या मागोमाग आले. ॥४०॥ किरीटकोटिभिः - मुकुटाच्या टोकांनी - पादौ स्पृशन् - पायांना स्पर्श करून - आनम्य - नम्र होऊन - अर्थसाधनं अच्युतं ययाचे - कार्यसाधनाविषयी श्रीकृष्णाजवळ याचना करिता झाला - महान् (अपि) सिद्धार्थः - मोठाहि कार्यसिद्धि झालेला पुरुष - एतेन विगृह्यते - त्या योगाने युद्ध करितो - अहो च सुराणां तमः - कितीहो देवांचे हे अज्ञान - आढयतां धिक् - श्रीमंतीला धिक्कार असो. ॥४१॥ अथो - नंतर - अव्ययः भगवान् - अविनाशी श्रीकृष्ण - तावद्रूपधरः - तितकी स्वरूपे धारण करून - नानागारेषु - अनेक मंदिरांमध्ये - एकस्मिन् मुहूर्ते - एकाच मुहुर्तावर - यथा - यथाविधि - ताः स्त्रियाः उपयेमे - त्या स्त्रियांशी विवाह करिता झाला. ॥४२॥ अनपायी - अविनाशी - अतर्क्यकृत् - अलौकिक कृत्ये करणारा तो श्रीकृष्ण - निरस्तसाम्यातिशयेषु तासां गृहेषु अवस्थितः - न्यूनाधिक्यरहित अशा त्या स्त्रियांच्या मंदिरात वास्तव्य करून - निजकामसंप्लुतः - आत्मानंदात निमग्न झालेला असा - यथा इतरः (तथा) गार्हकमेधिकान् चरन् - जसा सामान्य पुरुष तसा गृहस्थधर्माचे आचरण करीत - रमाभिः रेमे - स्त्रियांसह रममाण झाला होता. ॥४३॥ ब्रह्मादयः अपि - ब्रह्मदेवादिक सुद्धा - यदीयां पदवीं न विदुः - ज्याच्या स्थानाला जाणत नाहीत - (तं) रमापतिं - त्या लक्ष्मीपतीला - इत्थं पतिं अवाप्य - याप्रमाणे पति म्हणून मिळवून - ताः स्त्रियः - त्या स्त्रिया - अनुरागहासावलोकनवसंगमजल्पलज्जाः - प्रेम व हास्य यांनी युक्त असे अवलोकन व त्याने युक्त अशी जी प्रथम भेट त्या वेळचे भाषण व ते करताना वाटणारी लज्जा यांनी युक्त होऊन - एधितया मुदा - वाढलेल्या आनंदाने - अविरतं भेजुः - नित्य सेवित्या झाल्या. ॥४४॥ दासीशताः अपि (ताः) - शेकडो दासी आहेत ज्यांच्यापाशी अशाहि त्या स्त्रिया - प्रत्युद्गमासनवरार्हणपादशौचतांबूलविश्रमणवीजनगन्धमाल्यैः - सामोरे जाणे, आसन, उत्तम पूजा, पाय धुवायला पाणी, विडा, श्रमपरिहारार्थ पंख्यांचा वारा, सुगंधी फुलांच्या माळा इत्यादि गोष्टींनी - केशप्रसारशयनस्नपनोपहार्यैः - केसांची रचना करणे, शय्या घालून देणे, स्नान घालणे व खाण्याचे पदार्थ देणे इत्यादि प्रकारांनी - विभोः दास्यं विदधुः स्म - श्रीकृष्णाची सेवा करित्या झाल्या. ॥४५॥ अध्याय एकोणसाठावा समाप्त |