|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ५८ वा - अन्वयार्थ
भगवान श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांच्या कथा - एकदा - एके दिवशी - श्रीमान् पुरुषोत्तमः - ऐश्वर्यशाली श्रीकृष्ण - युयुधानादिभिः वृतः - सात्यकी आदिकरून यादवांसह - प्रतीतान् पाण्डवान् द्रष्टुं - पुनः सापडलेल्या पांडवांना पहाण्याकरिता - इंद्रप्रस्थं गतः - इंद्रप्रस्थाला गेला. ॥१॥ वीराः पार्थाः - पराक्रमी पांडव - अखिलेश्वरं - सर्वांचा अधिपति अशा - तं मुकुन्दं दृष्टवा - त्या श्रीकृष्णाला पाहून - प्राणाः मुख्यम् (प्राणम्) आगतम् (दृष्टवा) इव - इंद्रिये प्राण परत आला असे पाहून उठावी त्याप्रमाणे - युगपत् उत्तस्थुः - एकाच वेळी उठून उभे राहिले. ॥२॥ वीराः - पराक्रमी पांडव - अच्युतं परिष्वज्य - श्रीकृष्णाला आलिंगन देऊन - अङगसङगहतैनसः - ज्याच्या शरीरस्पर्शाने पाप नष्ट झाले आहे अशा - सानुरागस्मितं तस्य वक्त्रं - प्रेमामुळे मंदहास्य करणार्या त्या श्रीकृष्णाच्या मुखाला - वीक्ष्य - पाहून - मुदं ययुः - आनंदित झाले. ॥३॥ युधिष्ठिरस्य भीमस्य (च) - धर्मराज व भीम यांच्या - पादाभिवंदनं कृत्वा - पायांना वंदन करून - फाल्गुनं परिरभ्य - अर्जुनाला आलिंगन देऊन - अथ च - आणि त्यानंतर - (सः) यमाभ्याम् अभिवन्दितः - तो नकुल व सहदेव ह्या दोघांनी वंदिला गेला.॥४॥ अनिन्दिता नवोढा कृष्णा - दोषरहित अशी नवीन लग्न झालेली द्रौपदी - किंचित् व्रीडिता - किंचित लज्जित होऊन - परमासने आसीनं कृष्णं - उत्तम आसनावर बसलेल्या कृष्णाजवळ - शनैः एत्य - हळू हळू येऊन - अभ्यवन्दत - वंदन करिती झाली. ॥५॥ तथैव च - आणि त्याचप्रमाणे - पार्थैः पूजितः - पांडवांनी पूजिलेला - अभिनन्दितः - अभिनंदन केलेला - सात्यकिः - सात्यकी - आसने निषसाद - आसनावर बसला - अन्ये च - आणि दुसरे - पूजिताः पर्युपासत - सत्कारिलेले असे आपापल्या आसनावर बसले. ॥६॥ पृथां समागत्य - कुंतीजवळ येऊन - कृताभिवादनः - केले आहे वंदन ज्याने असा - तया अतिहार्दार्द्रदृशा अभिरम्भितः - त्या कुंतीने अत्यंत प्रेमाने आर्द्र झालेल्या दृष्टीने आलिंगिलेला - परिपृष्टबांधवः - विचारपूस केली आहे ज्याची असा तो श्रीकृष्ण - तां पितृष्वसारं सहस्नुषां - सुनेसह असलेल्या त्या कुंती आत्तेला - कुशलं आपृष्टवान् - खुशाली विचारिता झाला. ॥७॥ प्रेमवैक्लव्यरुद्धकण्ठाश्रुलोचना - प्रेमामुळे प्राप्त झालेल्या दुःखाने कंठ रोधून गेल्यामुळे जिच्या नेत्रांतून अश्रू वहात आहेत अशी - तान् बहून् क्लेशान् स्मरन्ती - त्या पुष्कळ क्लेशांना स्मरणारी - क्लेशापायात्मदर्शनं तं - क्लेशांच्या निरसनार्थ स्वतः दर्शन देणार्या त्या श्रीकृष्णाला - आह - म्हणाली. ॥८॥ कृष्ण - हे श्रीकृष्णा - (यदा) ज्ञातीन् नः स्मृता त्वया - जेव्हा संबंधी अशा आमचे स्मरण करणार्या तुझ्याकडून - मे भ्राता - माझा भाऊ अक्रूर - प्रेषितः - पाठविला गेला - तदा एव - त्याच वेळी - नः कुशलं अभूत् - आमचे कुशल झाले - वयं ते सनाथा कृताः - आम्ही तुझ्याकडून सनाथ केले गेलो. ॥९॥ सुहृदात्मनः विश्वस्य - मित्रांवर प्रेम करणार्या सर्वस्वरूपी - ते स्वपरभ्रान्तिः न अस्ति - तुला आपपर असा भ्रम नाही - तथापि - तरीसुद्धा - हृदि स्थितः (त्वम्) - हृदयात राहिलेला असा तू - शश्वत् (त्वा) स्मरतां जनानाम् क्लेशान् हंसि - नित्य तुझे स्मरण करणार्यांचे क्लेश दूर करतोस. ॥१०॥ अधीश्वर - हे परमेश्वरा - नः किं श्रेयः आचरितं - आम्ही कोणते पुण्य केले होते - अहं न वेद - ते मला समजत नाही - यत् - कारण - योगेश्वराणां दुर्दर्शः (त्वं) - योगी लोकांनाहि ज्याचे दर्शन होणे कठीण असा तू - कुमेधसां नः दृष्टः (असि) - वाईट आहे बुद्धि ज्यांची अशा आमच्या दृष्टीस पडलास.॥११॥ राज्ञा अभ्यर्थितः सः विभुः - धर्मराजाने प्रार्थिलेला असा तो श्रीकृष्ण - इन्द्रप्रस्थौकसां नयनान्दं जनयन् - इंद्रप्रस्थात रहाणार्या लोकांच्या नेत्रांना आनंद देणारा - इति वै वार्षिकान् मासान् - याप्रमाणे खरोखर पावसाळ्याचे चार महिनेपर्यंत - सुखं (अवसत्) - सुखाने रहाता झाला. ॥१२॥ एकदा - एका प्रसंगी - परवीरहा विजयः - शत्रुपक्षीय वीरांना मारणारा विजयी अर्जुन - कृष्णेन साकं वानरध्वजं रथम् आरुह्य - श्रीकृष्णासह ज्याच्या ध्वजावर मारुती आहे अशा रथात बसून - गांडीवं धनुः - आणि गांडीव धनुष्य - अक्षयसायकौ तूणौ च - आणि ज्यातील बाण कधीहि कमी होत नाहीत असे दोन भाते - आदाय - घेऊन - सन्नद्धः (भूत्वा) - सज्ज होऊन - बहुव्यालमृगाकीर्णं गहनं वनं - पुष्कळ हिंस्त्र पशु व हरिण यांनी व्यापिलेल्या निबिड अरण्यात - विहर्तुं प्राविशत् - क्रीडा करण्याकरिता शिरला. ॥१३-१४॥ तत्र (सः) - तेथे तो अर्जुन - शरैः - बाणांनी - व्याघ्रान् सूकरान् महिषान् रुरून् - वाघ, वराह, रेडे व रुरु जातीचे हरिण ह्यांना - शरभान् गवयान् खड्गान् हरिणान् शशशल्लकान् - शरभ, गवे, गेंडे, हरिण, ससे व साळी यांना - अविद्धयत् - मारिता झाला. ॥१५॥ किंकराः - सेवक - मेध्यान् तान् पशून् - पवित्र अशा त्या मारलेल्या पशूंना - राज्ञे निन्युः - धर्मराजाकरिता नेते झाले - तृट्परीतः परिश्रांतः बीभत्सुः - तहानलेला व दमलेला असा अर्जुन - पर्वणि उपागते - पर्वणी आली असता - यमुनां अगात् - यमुनेवर गेला. ॥१६॥ महारथौ कृष्णौ - महारथी असे श्रीकृष्ण व अर्जुन - तत्र उपस्पृश्य - तेथे आचमनादि विधि करून - विशदं वारि पीत्वा - निर्मळ उदक प्राशन करून - चरन्तीं चारुदर्शनां कन्यां ददर्शतुः - तेथे हिंडणार्या सुंदर कन्येला पहाता झाला. ॥१७॥ सख्या प्रेषितः फाल्गुनः - श्रीकृष्णाने पाठविलेला अर्जुन - वरारोहां सुद्विजां रुचिराननां - सुस्वरूपी, सुंदर दातांची व सुंदर मुखाची अशा - तां प्रमदोत्तमां आसाद्य - त्या उत्तम स्त्रीजवळ जाऊन - पप्रच्छ - विचारिता झाला. ॥१८॥ सुश्रोणि शोभने - हे सुंदरी हे पवित्र स्त्रिये - त्वं का - तू कोण - कस्य असि - कोणाची आहेस - कुतःअसि - कोठून आलीस - किं चिकीर्षसि - काय करण्याची इच्छा करतेस - त्वां पतिम् इच्छन्तीं मन्ये - तू पतीची इच्छा करणारी आहेस असे मला वाटते - सर्वं कथय - सर्व सांग. ॥१९॥ देवस्य सवितुः दुहिता अहं - प्रकाशमान सूर्याची कन्या अशी मी - वरेण्यं वरदं विष्णुं पतिम् इच्छन्तीं - श्रेष्ठ वर देणार्या विष्णूला पति करण्याची इच्छा धरून - परमं तपः आस्थिता - श्रेष्ठ तप करीत राहिले आहे. ॥२०॥ वीर - हे पराक्रमी पुरुषा - श्रीनिकेतनं तम् ऋते - लक्ष्मीचे वसतिस्थान अशा श्रीकृष्णाशिवाय - अन्यं पतिं न वृणे - मी दुसर्याला पति म्हणून वरणार नाही - सः अनाथसंश्रयः भगवान् मुकुंदः - तो अनाथांचा आश्रम असा भगवान श्रीकृष्ण - मे तुष्यताम् - माझ्यावर संतुष्ट होवो. ॥२१॥ कालिन्दी इति समाख्याता (अहं) - कालिंदी ह्या नावाने प्रसिद्ध असलेली मी - यमुनाजले पित्रा निर्मिते भवने - यमुनेच्या उदकात पित्याने निर्मिलेल्या घरात - यावत् अच्युतदर्शनं - श्रीकृष्णाचे दर्शन होईपर्यंत - वसामि - रहात आहे. ॥२२॥ गुडाकेशः वासुदेवाय तथा अवदत् - अर्जुन श्रीकृष्णाला याप्रमाणे सांगता झाला - तद्विद्वान् सः अपि - ते जाणणारा तो श्रीकृष्णसुद्धा - तां रथम् आरोप्य धर्मराजम् उपागमत् - तिला रथात बसवून धर्मराजाजवळ आला.॥२३॥ यदा एव - ज्या वेळीच - कृष्णः (पांडवैः) संदिष्टः - श्रीकृष्ण पांडवांकडून प्रार्थिला गेला - पार्थानाम् - पांडवांसाठी - विश्वकर्मणा विचित्रं परमाद्भुतं नगरं कारयामास - विश्वकर्म्याकडून चित्रविचित्र व अत्यंत आश्चर्यजनक असे नगर बनविता झाला. ॥२४॥ भगवान् - श्रीकृष्ण - तत्र - तेथे - स्वानां प्रियचिकीर्षया - स्वकीयांचे प्रिय करण्याच्या इच्छेने - निवसन् (सन्) - रहात असता - अग्नये खाण्डवं दातुं - अग्नीला खांडववन देण्यासाठी - अर्जुनस्य सारथिः आस - अर्जुनाचा सारथी झाला. ॥२५॥ नृप - हे राजा - तुष्टः सः अग्निः - संतुष्ट झालेला तो अग्नि - धनुः - धनुष्य - श्वेतान् हयान् - पांढरे घोडे - रथं - रथ - अक्षयौ तूणौ - ज्यांतील बाण कधीहि संपत नाहीत असे दोन भाते - अस्त्रिभिः अभेद्यं वर्म च - आणि अस्त्रधारी शूर पुरुषांना विदीर्ण करता न येणारे चिलखत - अर्जुनाय अदात् - अर्जुनाला देता झाला. ॥२६॥ वह्नेः मोचितः मयः - अग्नीच्या तडाख्यातून सोडविलेला मयासुर - सख्ये सभां उपाहरत् - मित्र जो अर्जुन त्याच्यासाठी सभागृह रचिता झाला - यस्मिन् - जेथे - दुर्योधनस्य - दुर्योधनाला - जलस्थलदृशिभ्रमः आसीत् - पाणी व भूमी यासंबंधाने दृष्टिभ्रम झाला होता - तेन समनुज्ञातः - त्या अर्जुनाने आज्ञा दिलेला - सुहृद्भिः च अनुमोदितः - आणि मित्रांनी अनुमोदन दिलेला - सात्यकिप्रमुखैः वृतः सः - सात्यकि आदिकरून मुख्य यादवांनी वेष्टिलेला असा तो श्रीकृष्ण - भूयः द्वारकाम् आययौ - पुनः द्वारकेला आला. ॥२७-२८॥ अथ (सः) - नंतर तो श्रीकृष्ण - स्वानां परममङगलं परमानन्दं वितन्वन् - स्वकीयांना अत्यंत मंगलकारक आनंद देत - ऊर्जिते सुपुण्यर्त्वृक्षे मुहूर्ते - बलवान व पुण्यकारक ऋतु व नक्षत्र ज्यांत आहे अशा मुहूर्तावर - कालिन्दीं उपमेये - कालिंदीला वरिता झाला. ॥२९॥ दुर्योधनवशानुगौ आवन्त्यौ विंदानुविन्दौ - दुर्योधनाच्या स्वाधीन राहिलेले अवन्तिदेशाचे विंद व अनुविंद असे दोन राजे - कृष्णे सक्तांस्वभगिनीं - श्रीकृष्णाच्या ठिकाणी आसक्त असणार्या आपल्या बहिणीला - स्वयंवरे न्यषेधताम् - स्वयंवरामध्ये निषेधिते झाले. ॥३०॥ राजन् - हे राजा - कृष्णः - श्रीकृष्ण - राज्ञां प्रपश्यतां - राजांसमक्ष - पितृष्वसुः राजाधिदेव्याः तनयां मित्रविंदाम् - आत्या जी राजाधिदेवी तिची कन्या जी मित्रविंदा तिला - प्रसह्य हृतवान् - बलात्काराने हरण करिता झाला. ॥३१॥ नग्नजित् नाम - नग्नजित नावाचा - अतिधार्मिकः - अत्यंत धर्मिष्ठ असा - कौसल्यः राजा आसीत् - कोसल देशाचा राजा होता - नृप - हे परीक्षित राजा - तस्य सत्या नाग्नजिती देवी कन्या अभवत् - त्याची सत्या नावाची नाग्नजिती नावानेहि प्रसिद्ध अशी तेजस्वी कन्या होती. ॥३२॥ नृपाः - राजे - तीक्ष्णशृंगान् सुदुर्धर्षान् - तीक्ष्ण शिंगांच्या व जिंकण्यास कठीण अशा - वीरगन्धासहान् खलान् - वीरांचा गंधहि सहन न करणार्या व दांडग्या अशा - सप्त गोवृषान् - सात जातिवंत बैलांना - अजित्वा तां वोढुं न शेकुः - न जिंकल्यामुळे त्या नाग्नजितीला वरण्यास समर्थ झाले नाहीत. ॥३३॥ सात्वतां पतिः भगवान् - यादवाधिपति श्रीकृष्ण - वृषजिल्लभ्यां तां श्रुत्वा - बैलांना जिंकणार्यालाच मिळणार्या नाग्नजितीविषयी ऐकून - महता सैन्येन वृतः - मोठया सैन्यासह - कौसल्यपुरं जगाम - अयोध्येला गेला. ॥३४॥ कोसलपतिः सः - अयोध्यापति तो नग्नजित - प्रीतः सन् - प्रसन्न होऊन - प्रत्युत्थानासनादिभिः - उठून उभे रहाणे, बसावयाला आसन देणे इत्यादिकांनी - गुरुणा अर्हणेन अपि - श्रेष्ठ पूजासाहित्याने सुद्धा - (तं) पूजयन् - त्या श्रीकृष्णाला पूजिणारा असा - (तेन) प्रतिनंदितः - त्या श्रीकृष्णाकडून अभिनंदन केला गेला. ॥३५॥ नरेंद्रकन्या - राजकन्या नाग्नजिती - अभिमतं रमापतिं समागतं वीक्ष्य - आवडणार्या अशा लक्ष्मीपती श्रीकृष्णाला आलेला पाहून - (तं) चकमे - त्यास वरण्यास इच्छिती झाली - यदि मे व्रतैः ईश्वरः धृतः - जर मी व्रतांनी परमेश्वर पूजिला असेल - (तर्हि) अयं मे पतिः भूयात् - तर हा कृष्ण माझा पती होवो - अमलाः आशिषः सत्याः करोतु - शुभ आशीर्वाद खरे करो. ॥३६॥ श्रीः - लक्ष्मी - अब्जजः - ब्रह्मदेव - लोकपालैः सह सः गिरिशः - लोकपालांसह तो शंकर - यत्पादपङ्कजरजः - ज्याच्या चरणकमळाचे पराग - शिरसा बिभर्ति - मस्तकाने धारण करितो - सः भगवान् ईशः - तो भगवान परमेश्वर - स्वकृतसेतुपरीप्सया - आपण केलेल्या धर्ममर्यादांचे रक्षण करण्याच्या इच्छेने - लीलातनूः काले दधत् - क्रीडा करण्यासाठी योग्य काळी शरीर धारण करणारा असा - मम केन तुष्येत् - माझ्यावर कशाने संतुष्ट होईल. ॥३७॥ अर्चितं पुनः (नग्नजित्) इति आह - पूजिलेल्या श्रीकृष्णाला पुनः नग्नजित याप्रमाणे म्हणाला - नारायण जगत्पते - हे नारायणा, हे जगन्नाथा - अल्पकः (अहं) - क्षुद्र असा मी - आत्मानंदेन पूर्णस्य (ते) - स्वतःच्या आनंदाने पूर्ण असलेल्या तुझे - किं करवाणि - काय काम करू बरे ॥३८॥ कुरुनंदन - हे कुरुकुलाला आनंद देणार्या परीक्षिता - कृतासनपरिग्रहः हृष्टः भवान् - आसनावर बसलेला व आनंदित झालेला भगवान श्रीकृष्ण - मेघगंभीरया वाचा सस्मितं तं आह - मेघाप्रमाणे गंभीर अशा वाणीने मंदहास्य करीत त्या नग्नजित राजाला म्हणाला. ॥३९॥ नरेन्द्र - हे नग्नजित राजा - कविभिः निजधर्मवर्तिनः राजन्यबन्धोः याञ्चा विगर्हिता - विद्वान लोकांनी स्वधर्माने वागणार्या क्षत्रियांना याचना ही निंद्य मानिली आहे - तथापि - तरीसुद्धा - सौहृदेच्छया - मैत्रीच्या इच्छेने - तव - तुझ्याजवळ - त्वदियां कन्यां याचे - तुझी कन्या मी मागतो - वयं शुल्कदाः नहि - आम्ही द्रव्य देणारे नव्हे ॥४०॥ नाथ - महाराज - इह - ह्याठिकाणी - ते अभ्यधिकः - तुझ्याहून अधिक - अन्यः कः कन्यावरः ईप्सितः (स्यात्) - दुसरा कोणता बरे कन्येला वर असणार - गुणैकधाम्नः यस्य अङगे - गुणांचे एकच स्थान अशा ज्याच्या शरीरावर - अनपायिनी श्रीः वसति - अविनाशी लक्ष्मी रहाते. ॥४१॥ सात्वतर्षभ - हे यादवश्रेष्ठा कृष्णा - किंतु - परंतु - कन्यावरपरीप्सया - कन्येला योग्य वर मिळविण्याच्या इच्छेने - पुंसां वीर्यपरीक्षार्थं - पुरुषांच्या पराक्रमाची परीक्षा करण्याकरिता - अस्माभिः पूर्वं समयः कृतः - आम्ही पूर्वी पण केला आहे. ॥४२॥ वीर - हे शूरा - दुर्दान्ताः दुरवग्रहाः - अत्यंत दांडगे व धरण्यास कठीण असे - एते सप्त गोवृषाः - हे सात माजलेले बैल आहेत - सुबहवः नृपात्मजाः - पुष्कळ राजे - एतैः भिन्नगात्राः भग्नाः - ह्या बैलांकडून छिन्न अवयवाचे होऊन पराभव पावले.॥४३॥ यदुनंदन श्रियः पते - हे यदुकुळाला आनंद देणार्या लक्ष्मीपते श्रीकृष्णा - यदि त्वया एव इमे निगृहीताः स्युः - जर तुझ्याकडूनच हे बैल धरिले गेले - भवान् - तू - मे दुहितुः वरः अभिमतः (स्यात्) - माझ्या कन्येला पती म्हणून मान्य होशील.॥४४॥ प्रभुः - श्रीकृष्ण - एवं समयम् आकर्ण्य - असा पण ऐकून - परिकरं बद्ध्वा - कंबर बांधून - आत्मानं सप्तधा कृत्वा - स्वतः सात रूपे घेऊन - लीलया एव तान् न्यगृह्णात् - लीलेनेच त्या सात बैलांना धरिता झाला. ॥४५॥ शौरिः - श्रीकृष्ण - भग्नदर्पान् हतौजसाः तान् - गर्वरहित व निर्बळ झालेल्या त्या बैलांना - दामभिः बद्ध्वा - दाव्यांनी बांधून - यथा बालः दारुमयान् - जसा बालक लाकडांच्या बाहुल्यांना - तथा - त्याप्रमाणे - बद्धान् (तान्) लीलया व्यकर्षत् - बांधलेल्या त्या बैलांना लीलेने ओढिता झाला. ॥४६॥ ततः प्रीतः राजा - नंतर प्रसन्न झालेला नग्नजित राजा - विस्मितः (भूत्वा) कृष्णाय सुता ददौ - आश्चर्ययुक्त होऊन श्रीकृष्णाला कन्या देता झाला - भगवान् प्रभुः - भगवान श्रीकृष्ण - सदृशीं तां - योग्य अशा त्या नाग्नजितीला - विधिवत्प्रत्यगृह्णात् - यथाविधि स्वीकारिता झाला. ॥४७॥ राजपत्न्यः च - आणि राजस्त्रिया - दुहितुः प्रियं कृष्णं पतिं लब्ध्वा - कन्येला आवडता श्रीकृष्ण पति मिळवून - परमानन्दं लेभिरे - अत्यंत आनंद मिळवित्या झाल्या - परमोत्सवः च जातः - आणि मोठा उत्सव झाला. ॥४८॥ शङखभेर्यानकाः नेदुः - शंख, भेरी, चौघडे वाजू लागले - गीतवाद्यद्विजाशिषः (नेदुः) - गायन, वाद्ये व ब्राह्मणांचे आशीर्वाद यांचा ध्वनी झाला - नराः नार्यः च - पुरुष व स्त्रिया - प्रमुदिताः भूत्वा - आनंदित होऊन - सुवासः स्रगलंकृताः - सुंदर वस्त्रे, माळा यांनी सुशोभित झाल्या. ॥४९॥ विभुः - समर्थ असा नग्नजित राजा - दशधेनुसहस्राणि - दहा हजार गाई - निष्कग्रीवसुवाससां - ज्यांच्या गळ्यांत सुवर्णाचे अलंकार आहेत व ज्या सुंदर वस्त्र नेसल्या आहेत अशा - युवतीनां त्रिसाहस्रं - तीन हजार तरुण दासी - पारिबर्हं अदात् - आंदण म्हणून देता झाला. ॥५०॥ नवनागसहस्राणि - नऊ हजार हत्ती - नागात् शतगुणान् रथान् - हत्तींच्या शतपटीने रथ - रथात् शतगुणान् अश्वान् - रथांच्या शतपटीने घोडे - अश्वात् शतगुणान् नरान् - घोडयाच्या शतपटीने सेवक - पारिबर्हं अदात् - आंदण म्हणून देता झाला. ॥५१॥ प्रेमप्रक्लिन्नहृदयः कोसलः - प्रेमाने ज्याचे हृदय भिजून गेले आहे असा अयोध्यापति नग्नजित राजा - महत्या सेनया वृतौ दंपती - मोठया सेनेने वेष्टिलेल्या पतिपत्नीच्या जोडप्याला - रथं आरोप्य - रथात बसवून - यापयामास - पाठविता झाला. ॥५२॥ पुरा - पूर्वी - यदुभिः गोवृषैः च - यादवांनी आणि उन्मत्त बैलांनी - भग्नवीर्याः - ज्याचे वीर्य नष्ट केले आहे असे - सुदुर्मर्षाः - दुसर्याचा उत्कर्ष मुळीच सहन न करणारे - भूपाः - राजे - एतत् श्रुत्वा - हे ऐकून - कन्यकां नयन्तं (कृष्णम्) - कन्येला नेणार्या श्रीकृष्णाला - पथि रुरुधुः - मार्गात अडविते झाले. ॥५३॥ बंधुप्रियकृत् गांडीवी अर्जुनः - बंधूचे प्रिय करणारा व गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन - शरव्रातान् अस्यतः तान् - बाणांचे समूह सोडणार्या त्या राजांना - सिंहः क्षुद्रमृगान् इव - सिंह जसा क्षुद्र पशूंना पळवून लावतो त्याप्रमाणे - कालयामास - पळवून लाविता झाला. ॥५४॥ यदूनाम् ऋषभः भगवान देवकीसुतः - यादवश्रेष्ठ असा भगवान देवकीपुत्र श्रीकृष्ण - पारिबर्हं उपागृह्य - आंदण दिलेले पदार्थ घेऊन - द्वारकां एत्य - द्वारकेला येऊन - सत्या (सह) रेमे - सत्येशी रममाण झाला. ॥५५॥ कृष्णः - श्रीकृष्ण - संतर्दनादिभिः भ्रातृभिः दत्तां - संतर्दनादिक भावांनी दिलेल्या - कैकेयीं - केकय राजाच्या कन्येला - (च) पितृष्वसुः श्रुतकीर्तेः सुतां भद्रां - आणि आत्या जी श्रुतकीर्ति तिच्या भद्रानामक कन्येला - उपयेमे - वरिता झाला. ॥५६॥ च - आणि - एकः सः - एकटा तो श्रीकृष्ण - सुपर्णः सुधाम् इव - गरुड जसा अमृताला हरण करितो त्याप्रमाणे - लक्षणैः युतां - लक्षणांनी युक्त अशा - मद्राधिपतेः सुतां लक्ष्मणां - मद्र राजाची कन्या जी लक्ष्मणा तिला - स्वयंवरे जहार - स्वयंवरामध्ये हरण करिता झाला. ॥५७॥ कृष्णस्य - श्रीकृष्णाच्या - भौमं हत्वा तन्निरोधात् आहृताः - भूमिपुत्र नरकासुराला मारून त्याच्या बंदीतून सोडवून आणलेल्या - चारुदर्शनाः - सुंदर स्वरूपाच्या - अन्याः च एवंविधा सहस्रशः भार्याः - दुसर्याहि अशा हजारो पत्न्या - आसन् - होत्या. ॥५८॥ अध्याय अठ्ठावन्नावा समाप्त |