श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५६ वा - अन्वयार्थ

स्यमंतक मण्याची कथा, जांबवती आणि सत्यभामा ह्यांच्याशी श्रीकृष्णांचा विवाह -

कृतकिल्बिषः सत्राजितः - ज्याने अपराध केला आहे असा सत्राजित - स्वयम् उद्यम्य - स्वतः उद्योग करून - स्वतनयां - आपल्या कन्येला - स्यमन्तकेन मणिना (सह) - स्यमंतक नावाच्या मण्यासह - कृष्णाय दत्तवान् - श्रीकृष्णाला देता झाला ॥१॥

ब्रह्मन् - हे शुकाचार्य - सत्राजितः - सत्राजित - कृष्णस्य किं किल्बिषं अकरोत् - श्रीकृष्णाचा कोणता अपराध करिता झाला - तस्य स्यमन्तकः कुतः (प्राप्तः) - त्याला स्यमंतक मणी कोठून मिळाला - (तेन) सुता हरेः कस्मात् दत्ता - त्याने मुलगी श्रीकृष्णाला काय कारणास्तव दिली ॥२॥

सूर्यः - सूर्य - भक्तस्य सत्राजितः - भक्त जो सत्राजित त्याचा - परमः सखा आसीत् - श्रेष्ठ मित्र होता - तुष्टः सूर्यः - संतुष्ट झालेला सूर्य - प्रीतः - प्रसन्न होऊन - तस्मै - त्या सत्राजिताला - स्यमन्तकं मणिं प्रादात् - स्यमन्तक मणी देता झाला ॥३॥

राजन् - हे परीक्षित राजा - यथा रविः तथा - जसा सूर्य त्याप्रमाणे - भ्राजमानः सः - प्रकाशणारा तो सत्राजित - तं मणिं कण्ठे बिभ्रन् - तो स्यमंतक मणी गळ्यात धारण करणारा - तस्य तेजसा नोपलक्षितः - त्या मण्याच्या तेजामुळे ओळखता न आलेला असा - द्वारकां प्रविष्टः - द्वारकेत शिरला ॥४॥

तस्य तेजसा मुष्टदृष्टयः जनाः - तेजाने ज्यांची दृष्टी दिपून गेली आहे असे लोक - दूरात् तं विलोक्य - दुरूनच त्या सत्राजिताला पाहून - सूर्यशंकिताः - हा सूर्य आहे असे वाटणारे - अक्षैः दीव्यते भगवते - फाशांनी खेळणार्‍या श्रीकृष्णाला - शशंसुः - सांगते झाले ॥५॥

शंखचक्रगदाधर नारायण - हे शंख, चक्र व गदा धारण करणार्‍या श्रीकृष्णा - दामोदर अरविन्दाक्ष यदुनंदन गोविंद - हे दामोदरा कमलनयना, हे यदुनंदना गोविंदा - ते नमः अस्तु - तुला नमस्कार असो ॥६॥

जगत्पते - हे जगन्नाथा श्रीकृष्णा - त्वां दिदृक्षुः - तुला पहाण्याची इच्छा करणारा - तिग्मगुः एषः सविता - तीक्ष्ण किरण असणारा हा सूर्य - गभस्तिचक्रेण नृणां चक्षूंषि मुष्णन् - किरणसमुहाने मनुष्यांचे डोळे दिपवीत - आयाति - येत आहे ॥७॥

प्रभो - हे समर्थ श्रीकृष्णा - ननु - खरोखर - विबुधर्षभाः - श्रेष्ठ देव - त्रिलोक्यां - त्रैलोक्यात - ते मार्गं अन्विच्छन्ति - तुझ्या मार्गाचा शोध करितात - अजः - सूर्य - अद्य - आज - त्वां यदुषु गूढं ज्ञात्वा - तू यदुकुळात गुप्तरीतीने रहात आहेस असे जाणून - आयाति - येत आहे ॥८॥

अंबुजलोचनः (सः) - कमलनेत्र श्रीकृष्ण - बालवचनं निशम्य - अज्ञानी लोकांचे भाषण ऐकून - प्रहस्य - किंचित हसून - असौ मणीना ज्वलन् सत्राजित् (अस्ति) - हा स्यमन्तक मण्याने प्रकाशणारा सत्राजित होय - देवः रविः न - प्रकाशणारा सूर्य नव्हे - (इति) आह - असे म्हणाला ॥९॥

सत्राजित् - सत्राजित - विप्रैः कृतकौतुकमङ्गलं - ब्राह्मणांकडून ज्यात मंगलोत्सव करविले आहेत अशा - श्रीमत् स्वगृहं प्रविश्य - आपल्या शोभायमान घरात शिरून - देवसदने मणिं न्यवेशयत् - देवघरात स्यमंतक मणी स्थापिता झाला ॥१०॥

प्रभो - हे परीक्षित राजा - सः - तो मणी - दिनेदिने - प्रतिदिवशी - अष्टौ स्वर्णभारान् सृजती - आठ भार सुवर्ण बाहेर टाकितो - यत्र मणीः अभ्यर्चितः आस्ते - जेथे मणी पूजिला जातो - तत्र - तेथे - अशुभाः - अकल्याण करणारे - दुर्भिक्षमार्यरिष्टानि सर्पाधिव्याधयः (च) - दुष्काळ, महामारी, अपशकुन, साप, चिंता व रोग - न सन्ति - होत नाहीत - मायिनः न सन्ति - कपटी लोक असत नाहीत ॥११॥

क्व अपि - एकदा - शौरिणा यदुराजाय मणिं याचितः सः - श्रीकृष्णाने उग्रसेनाकरिता मण्याची याचना केलेला तो सत्राजित - अर्थकामुकः (सन्) - द्रव्याची इच्छा करणारा असल्यामुळे - याञ्चाभङ्गम् अतर्कयत् - याचनेच्या भंगाचा विचार न करिता - न एव प्रादात् - देता झाला नाही ॥१२॥

एकदा - एके दिवशी - प्रसेनः - प्रसेन - महाप्रभं तं मणिं - तो मोठा तेजस्वी मणी - कंठे प्रतिमुच्य - गळ्यात घालून - हयं आरुह्य - घोड्यावर बसून - वने मृगयां व्यचरत् - अरण्यात जाऊन मृगया करिता झाला ॥१३॥

केसरी - सिंह - सहयं प्रसेनं हत्वा - घोड्यासह प्रसेनाला मारून - मणीं आच्छिद्य - मणी हरण करून - गिरिं विशन् - पर्वताच्या गुहेत शिरत असता - मणीम् इच्छता जाम्बवता - मण्याची इच्छा करणार्‍या जांबवानाने - निहतः - मारून टाकिला ॥१४॥

सः अपि - तो जांबवान सुद्धा - बिले - गुहेत - (तं) कुमारस्य मणीं क्रीडनकं चक्रे - त्या मण्याला मुलाचे खेळणे करिता झाला - भ्राता सत्राजित् - भाऊ सत्राजित - भ्रातरं अपश्यन् - भाऊ जो प्रसेन त्याला न पाहून - पर्यतप्यत - दुःखी झाला ॥१५॥

मणीग्रीवः वनं गतः मम भ्राता - स्यमंतकमणी गळ्यात आहे ज्याच्या असा अरण्यात नेलेला माझा भाऊ - प्रायः कृष्णेन निहतः - बहुतकरून श्रीकृष्णाने मारिला असावा - इति श्रुत्वा - असे ऐकून - जनाः कर्णेकर्णे अजपन् - लोक आपापसात, कानांशी कुजबुजू लागले ॥१६॥

भगवान् - श्रीकृष्ण - तत् उपश्रुत्य - ते ऐकून - आत्मनि लिप्तं दुर्यशः मार्ष्टुं - आपल्यावर लादलेली दुष्कीर्ति दूर करण्याकरिता - नागरैः प्रसेनपदवीम् अन्वपद्यत - द्वारकावासी जनांसह प्रसेनाच्या मार्गाला अनुसरता झाला ॥१७॥

जनाः - लोक - वने - अरण्यात - प्रसेनं अश्वं च - प्रसेनाला व घोड्याला - केसरिणा हतं - सिंहाने मारिले - वीक्ष्य - पाहून - तं च - त्या सिंहाला सुद्धा - अद्रिपृष्ठे - पर्वताच्या पृष्ठभागावर - ऋक्षेण निहतं - एका अस्वलाने मारिलेला - ददृशुः - पहाते झाले ॥१८॥

एकः भगवान् - एकटा श्रीकृष्ण - प्रजाः बहिः अवस्थाप्य - द्वारकावासी जनांना बाहेर ठेवून - अन्धेन तमसा आवृतं - गाढ अंधकाराने वेष्टिलेल्या - भीमं - भयंकर अशा - ऋक्षराजबिलं - अस्वलांचा राजा जो जांबवान त्याच्या बिळात - विवेश - शिरला ॥१९॥

तत्र - तेथे - बालक्रीडनकं कृतं - लहान बालकाचे खेळणे केलेल्या - मणिश्रेष्ठं दृष्ट्वा - त्या श्रेष्ठ स्यमंतक मण्याला पाहून - हर्तुं कृतमतिः (सः) - तो हरण करण्याचा निश्चय केलेला तो श्रीकृष्ण - तस्मिन् अर्भकान्तिके अवतस्थे - त्या बालकाच्या जवळच उभा राहिला ॥२०॥

धात्री - दाई - अपूर्वं तं नरं दृष्ट्वा - पूर्वी कधीहि न पाहिलेल्या अशा त्या मनुष्याला पाहून - भीतवत् चुक्रोश - भ्याल्याप्रमाणे ओरडू लागली - तत् श्रुत्वा - ते ओरडणे ऐकून - बलिनां वरः जाम्बवान् - बलिष्ठांमध्ये श्रेष्ठ असा जांबवान - क्रुद्धः अभ्यद्रवत् - रागावून धावत आला ॥२१॥

सः वै - तो जांबवान खरोखर - कुपितः - रागावलेला - (तं) पुरुषं प्राकृतं मत्वा - त्या कृष्णाला सामान्य पुरुष मानून - नानुभाववित् - त्याचा पराक्रम न जाणणारा असा - आत्मनः स्वामिना तेन भगवता - आपला अधिपति अशा त्या श्रीकृष्णाबरोबर - युयुधे - युद्ध करिता झाला ॥२२॥

विजिगीषतोः उभयोः - जिंकण्याची इच्छा करणार्‍या उभयतांचे - क्रव्यार्थे (युद्धमानयोः) श्येनयोः इव - मांसासाठी लढणार्‍या दोन ससाण्यांप्रमाणे - आयुधाश्मद्रुमैः दोर्भिः - शस्त्रास्त्रे, दगड, वृक्ष यांनी व बाहूंनी - सुतुमुलं द्वंदयुद्धं (अभवत्) - घनघोर द्वंद्वयुद्ध झाले ॥२३॥

वज्रनिष्पेषपरुषैः - व्रजाच्या प्रहाराप्रमाणे कठीण अशा - इतरेतरमुष्टिभिः - एकमेकांच्या मुठींनी - भूतं तत् - झालेले ते युद्ध - अविश्रमं अहर्निशं अष्टाविंशाहं - विश्रांति न घेता अहोरात्र अठ्ठावीस दिवसपर्यंत चाललेले - आसीत् - होते ॥२४॥

कृष्णमुष्टिविनिष्पाता निष्पिष्टांगोरुबन्धनः - श्रीकृष्णाच्या मुष्टिप्रहाराने चूर्ण झाले आहेत अवयवांचे सांधे ज्याच्या असा - क्षीणसत्त्वः स्विन्नगात्रः - ज्याचे बळ नष्ट झाले आहे आणि ज्याचे अवयव घामाने भिजले आहेत असा - (सः) अतीव विस्मितः तं आह - तो जांबवान अत्यंत आश्चर्यचकित होऊन त्या श्रीकृष्णाला म्हणाला ॥२५॥

त्वां - तुला - सर्वभूतानां प्राणः - सर्व प्राणिमात्रांचा प्राण - ओजः सहः बलं - इंद्रियांची शक्ति, मानसिक शक्ति व शारीरिक शक्ति - विष्णुं - विष्णु - पुराणपुरुषं - अनादि श्रेष्ठ पुरुष - प्रभविष्णुं अधीश्वरं जाने - उत्पत्तिकर्ता व श्रेष्ठ अधिपति असे मी जाणतो ॥२६॥

त्वं हि - तू खरोखर - विश्वसृजां स्त्रष्टा - प्रजापतीचा उत्पादक - यत् च अपि सृज्यानां सत् - जे काही उत्पन्न केलेल्या जगाचे उपादान कारण - कलयतां कालः - प्रेरणा करणार्‍यांमध्ये कालस्वरूपी - वरः ईशः - श्रेष्ठ परमेश्वर - तथा आत्मनां आत्मा (असि) - त्याचप्रमाणे आत्म्यांचाहि आत्मा आहेस ॥२७॥

यस्य (तव) - ज्या तुझ्या - ईषदुत्कलितरोषकटाक्षमोक्षैः - किंचित वाढलेल्या क्रोधाने फेकलेल्या कटाक्षांनी - क्षुभितनक्रतिमिङ्गिलः अब्धिः - क्षुब्ध झाले आहेत जलचर, सुसरी व मासे ज्यातील असा समुद्र - वर्त्म अदिशत् - मार्ग करून देता झाला - स्वयशः सेतुः कृतः - आपली कीर्तिच असा पूल बांधिला - लंका च उज्ज्वलिता - आणि लंका जाळून टाकिली - इषुक्षतानि रक्षःशिरांसि - बाणांनी तोडिलेली रावणाची मस्तके - भुवि पेतुः - पृथ्वीवर पडली ॥२८॥

महाराज - हे परीक्षित राजा - भगवान् देवकीसुतः अच्युतः - देवकीचा पुत्र भगवान श्रीकृष्ण - इति विज्ञातविज्ञानम् ऋक्षराजानं - याप्रमाणे ज्याला सर्वप्रकारचे ज्ञान झाले आहे अशा अस्वलांचा राजा जो जांबवान त्याला - व्याजहार - म्हणाला ॥२९॥

अरविंदाक्षः - कमलनेत्र श्रीकृष्ण - शंकरेण पाणिना - कल्याणकारी अशा हाताने - भक्तं तं अभिमृश्य - भक्त अशा त्या जांबवानाला स्पर्श करून - परया कृपया - मोठ्या कृपेने - प्रेमगंभीरया गिरा (आह) - प्रेमाने ओथंबलेल्या शब्दांनी म्हणाला ॥३०॥

ऋक्षपते - जांबवाना - वयं - आम्ही - मणीहेतोः - स्यमंतक मण्यासाठी - अमुना मणिना आत्मनः मिथ्याभिशापं प्रमृजन् - ह्या मण्याच्या योगाने स्वतःचा खोटा आरोप नष्ट करण्यासाठी - इह बिलं प्राप्तः - या गुहेत आलो ॥३१॥

इत्युक्तः सः - असे बोलला गेलेला तो जांबवान - स्वां दुहितरं कन्यां जांबवतीं - आपली सुंदर अविवाहित मुलगी जी जांबवती तिला - मुदा - आनंदाने - कृष्णाय अर्हणार्थं - श्रीकृष्णाचा सत्कार करण्यासाठी - मनीना उपजहार ह - स्यमंतक मण्यासह भेट म्हणून अर्पिता झाला ॥३२॥

जनाः - द्वारकादासी जन - बिलं प्रविष्टस्य शौरेः - बिळात शिरलेल्या श्रीकृष्णाचे - निर्गमं अदृष्ट्वा - बाहेर येणे न पाहिल्यामुळे - द्वादशाहानि प्रतीक्ष्य - बारा दिवसापर्यंत वाट पाहून - दुःखिताः स्वपुरं ययुः - दुःखित असे आपल्या नगराला परत गेले ॥३३॥

देवकी देवी रुक्मिणी आनकदुन्दुभिः सुहृदः ज्ञातयः - देवी देवकी, रुक्मिणी, वसुदेव, मित्र, संबंधी, बांधव - बिलात् अनिर्गतं कृष्णं निशम्य - बिळातून श्रीकृष्ण बाहेर आला नाही असे ऐकून - अशोचन् - शोक करिते झाले. ॥३४॥

दुःखिताः ते द्वारकौकसः - दुःखी झालेले ते द्वारकावासी जन - सत्राजितं शपन्तः - सत्राजिताला दोष देऊन - कृष्णोपलब्धये - श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी - महामायां दुर्गां - महामाया नावाच्या दुर्गेला - उपतस्थुः - प्रार्थिते झाले. ॥३५॥

तेषां देव्युपस्थानात् तु - त्या लोकांनी केलेल्या देवीच्या उपासनेमुळे तर - प्रत्यादिष्टाशिषा - मिळालेल्या आशीर्वादाने - सिद्धार्थः सः हरिः - परिपूर्ण आहेत मनोरथ ज्याचे असा तो श्रीकृष्ण - सदारः हर्षयन् प्रादुर्बभूव - स्त्रीसह आनंद देणारा असा प्रगट झाला. ॥३६॥

मृत्वा पुनः आगतम् इव - मरून पुनः परत आल्याप्रमाणे - पत्‍न्या सह मणिग्रीवं हृषीकेशं उपलभ्य - स्त्रीसह गळ्यात स्यमंतकमणी धारण करणार्‍या श्रीकृष्णाला आलेला पाहून - सर्वे जातमहोत्सवाः (आसन्) - सर्व लोक आनंदित झाले. ॥३७॥

भगवान् - श्रीकृष्ण - सभायां सत्राजितं समाहूय - सभेत सत्राजिताला बोलावून - राजसन्निधौ च (मणेः) प्राप्तिं आख्याय - आणि राजासमक्ष स्यमंतकमणी मिळाल्याचे वृत्त सांगून - तस्मै मणिं न्यवेदयत् - त्या सत्राजिताला स्यमंतकमणी अर्पिता झाला. ॥३८॥

ततः च - आणि त्यानंतर - सः अतीव्रीडितः अवाङ्‌मुख - तो सत्राजित अत्यंत लज्जित होऊन व खाली मान घालून - रत्‍नं गृहीत्वा - मणी घेऊन - स्वेन पाप्मना अनुतप्यमानः - आपल्या पापाने पश्चात्ताप पावलेला असा - भवनम् अगमत् - आपल्या घरी परत गेला. ॥३९॥

बलवद्विग्रहाकुलः सः - मोठयांबरोबर कलह केल्यामुळे व्याकुळ झालेला तो सत्राजित - तत् एव अघम् अनुध्यायन् - त्याच पातकासारखा विचार करीत - आत्मरजः कथं मृजामि - स्वतःचे पाप कसे नाहीसे करू - वा अच्युतः कथं प्रसीदेत - किंवा श्रीकृष्ण कसा प्रसन्न होईल ? ॥४०॥

किं कृत्वा मह्यं साधु स्यात् - काय केले असता माझे कल्याण होईल - यथा वा - किंवा ज्यायोगे - अदीर्घदर्शनं क्षुद्रं मूढं द्रविणलोलुपं (मां) जनः न शपेत् - अल्पदृष्टीच्या क्षुद्र, मूर्ख व द्रव्याविषयी लुब्ध झालेल्या मला लोक शाप देणार नाहीत. ॥४१॥

दुहितरं स्त्रीरत्‍नं - माझी जी मुलगी सुंदर सत्यभामा ती - रत्‍नम् च एव - आणि स्यमंतक मणी सुद्धा - तस्मै दास्ये - त्या श्रीकृष्णाला मी देईन - अयं समीचीनः उपायः - हा उत्तम उपाय होय - अन्यथा च तस्य शान्तिः न - दुसर्‍या कोणत्याहि प्रकारे त्याची शांति होणार नाही. ॥४२॥

एवं बुद्ध्या व्यवसितः सताजित् - याप्रमाणे बुद्धीने निश्चय केलेला सत्राजित - शुभां स्वसुतां मणीं च - आपली सुंदर मुलगी व मणी - स्वयं उद्यम्य - स्वतः हातात घेऊन - कृष्णाय उपजहार ह - श्रीकृष्णाला देता झाला. ॥४३॥

भगवान् - श्रीकृष्ण - बहुभिः याचितां - पुष्कळांनी याचिलेल्या - शीलरूपौदार्यगुणान्वितां - स्वभाव, सौंदर्य, उदारता व गुण ह्यांनी युक्त अशा - तां सत्यभामां - त्या सत्यभामेला - यथाविधि उपयेमे - यथाशास्त्र वरिता झाला. ॥४४॥

नृप - हे परीक्षित राजा - भगवान् आह - श्रीकृष्ण म्हणाला - वयं मणीं न प्रतीच्छामः - आम्ही मण्यांचा स्वीकार करीत नाही - देवभक्तस्य तव (एव) आस्तां - देवांचा भक्त अशा तुझ्याजवळच तो असो - वयं च फलभागिनः (समः) - आणि आम्ही फळाचा उपभोग घेणारे आहो. ॥४५॥

अध्याय छपन्नावा समाप्त

GO TOP