|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ५५ वा - अन्वयार्थ
प्रद्युन्माचा जन्म आणि शंबरासुराचा वध - वासुदेवांशः कामः तु - ईश्वरांश असा मदन तर - प्राक् रुद्रमन्युना दग्धः - पूर्वी शंकराच्या क्रोधाने दग्ध झाला होता - भूयः - पुनः - देहोपपत्तये - देहप्राप्तीसाठी - तम् एव प्रत्यपद्यत - त्याचाच आश्रय करिता झाला ॥१॥ सः एव - तोच मदन - प्रद्युम्नः इति विख्यातः - प्रद्युम्न या नावाने प्रसिद्ध असा - सर्वतः पितुः अनवमः - सर्वप्रकारे पित्याहून उणा नाही असा - कृष्णवीर्यसमुद्भवः - श्रीकृष्णाच्या वीर्यापासून उत्पन्न झालेला - वैदर्भ्यां जातः - रुक्मिणीच्या ठिकाणी उत्पन्न झाला ॥२॥ कामरूपी सः शम्बरः - इच्छेप्रमाणे अनेक रूपे घेणारा तो शंबरासुर - तं आत्मनः शत्रुं विदित्वा - त्याला आपला शत्रु जाणून - अनिर्दशम् तोकं हृत्वा - दहा दिवस न झालेल्या अशा बालकाला हरण करून - उदन्वति प्रास्य - समुद्रात टाकून - गृहम् अगात् - घरी गेला ॥३॥ बलवान् मीनः तं निर्जगार - बळकट असा एक मोठा मासा त्या प्रद्युम्नाला गिळता झाला - सः अपि - तो मोठा मासा - अपरैः सह - दुसर्या माशांसह - महता जालेन वृतः - मोठ्या जाळ्याने वेष्टिलेला असा - मत्स्यजीविभिः गृहीतः - माशांवर उपजीविका करणार्या कोळ्यांकडून धरिला गेला ॥४॥ कैवर्ताः - कोळी - शम्बराय - शंबरासुराला - उपायनं - भेट म्हणून - तं उपाजह्रुः - तो मासा अर्पण करिते झाले - सूदाः - आचारी - अद्भुतं (तं) महानसं नीत्वा - आश्चर्यकारक अशा त्या माशाला स्वयंपाकघरात नेऊन - स्वधितिना अवद्यन् - तीक्ष्ण शस्त्राने चिरिते झाले ॥५॥ तदुदरे बालं दृष्ट्वा - त्या माशाच्या उदरात बालकाला पाहून - मायावत्यै न्यवेदयन् - मायावतीला अर्पिते झाले - नारदः - नारद मुनि - शङ्कितचेतसः तस्याः - शंकायुक्त अंतःकरणाच्या त्या मायावतीला - बालस्य तत्त्वं उत्पत्तिं मत्स्योदरनिवेशनम् - बालकाचे मूळ स्वरूप, त्याची उत्पत्ति व त्याचा माशाच्या उदरात झालेला प्रवेश - इति सर्वं - असे सर्व - अकथयत् - सांगता झाला ॥६॥ सा च वै - ती मायावतीसुद्धा खरोखर - रतिः नाम यशस्विनी कामस्य पत्नी - रति नावाची मदनाची साध्वी स्त्री असून - निर्दग्धदेहस्य पत्युः - ज्याचा देह जळून गेला आहे असा पति जो मदन त्या मदनाच्या - देहोत्पत्तिं प्रतीक्षती - शरीरोत्पत्तीची वाट पहात होती ॥७॥ तदा - त्यावेळी - सूपौदनसाधने निरूपिता सा - शंबरासुराने स्वयंपाकाच्या साहित्यावर नियोजिलेली ती मायावती - शिशुं कामदेवं बुद्ध्वा - बालकाला मदन असे मानून - अर्भके स्नेहं चक्रे - बालकावर प्रेम करिती झाली ॥८॥ च - आणि - नातिदीर्घेण कालेन - थोड्याच कालावधीत - रुढयौवनः सः कार्ष्णिः - तारुण्यावस्थेत प्राप्त झालेला तो कृष्णपुत्र प्रद्युम्न - वीक्षन्तीनां नारीणां - अवलोकन करणार्या स्त्रियांना - विभ्रमं जनयामास - मोह उत्पन्न करिता झाला ॥९॥ अङ्ग - हे राजा - सा रतिः - ती रति - पद्मदलायतेक्षणं - कमलपत्राप्रमाणे दीर्घ नेत्र असणार्या - प्रलम्बबाहुं - आजानुबाहू - नरलोकसुंदरम् - मनुष्यलोकातील सौंदर्याचा पुतळा अशा - तं पतिं - त्या पति प्रद्युम्नाला - सव्रीडहासोत्तभितभ्रुवा ईक्षती - लज्जायुक्त हास्याने वर चढविलेल्या वक्र भ्रुकुटीने अवलोकन करणारी अशी - प्रीत्या सौरतैः उपतस्थे - प्रेमाने सुरतक्रीडेने सेविती झाली ॥१०॥ भगवान् कार्ष्णिः ताम् आह - भगवान प्रद्युम्न त्या रतीला म्हणाला - मातः - हे आई - ते मतिः अन्यथा (जाता) - तुझी बुद्धि विपरीत झाली - (त्वं) मातृभावम् अतिक्रम्य - तू मातृधर्माचे उल्लंघन करून - यथा कामिनी (तथा) वर्तसे - पत्नीप्रमाणे वागत आहेस ॥११॥ नारायणसुतः भवान् - श्रीकृष्णाचा पुत्र तू - शम्बरेण गृहात् आहृतः - शम्बरासुराने घरातून हरण करून आणिलेला आहेस - प्रभो - हे समर्था - भगवान् कामः (अस्ति) - तू मदन आहेस - अहं ते अधिकृता पत्नी रतिः (अस्मि) - मी तुझी नियोजिलेली पत्नी रति आहे ॥१२॥ प्रभो - हे समर्था - एषः शम्बरः असुरः - हा शंबरासुर - आनिर्दशं त्वा - दहा दिवसापूर्वीचा बालक अशा तुला - सिन्धौ आक्षिपत् - समुद्रात फेकिता झाला - मत्स्यः (त्वा) अग्रसत् - मासा तुला गिळता झाला - भवान् तदुदरात् इतः प्राप्तः - तू त्या माशाच्या उदरातून इकडे आलास. ॥१३॥ च - आणि - त्वं - तू - मोहनादिभिः मायाभिः - मोहित करणे इत्यादि मायांच्या योगाने - मायाशतविदं - शंभर माया जाणणार्या - दुर्धर्षं दुर्जयं - निर्बळ करण्यास व जिंकण्यास कठीण - आत्मनः शत्रुं - व स्वतःचा शत्रू अशा - तम् इमं जहि - त्या ह्या शंबरासुराला मार. ॥१४॥ पुत्रस्नेहाकुला दीना - पुत्र प्रेमामुळे व्याकुळ व दीन अशी - ते माता - तुझी आई - गतप्रजा कुररी इव - जिची प्रजा नष्ट झाली आहे अशा कुररी पक्षिणीप्रमाणे - (च) विवत्सा गौः इव - आणि वासरू जिचे मृत झाले आहे अशा गाईप्रमाणे - आतुरा - दुःखी अशी - परिशोचति - रुदन करीत आहे. ॥१५॥ मायावती - मायावती - एवं प्रभाष्य - असे म्हणून - महात्मने प्रद्युम्नाय - महात्म्या प्रद्युम्नाला - सर्व मायाविनाशिनीं महामायां विद्यां ददौ - सर्व मायांचा नाश करणारी महामायानामक विद्या देती झाली. ॥१६॥ च सः - आणि तो प्रद्युम्न - शम्बरम् अभ्येत्य - शंबरासुराजवळ येऊन - अविषह्यैः आक्षेपैः - असह्य अशा निंदावाचक शब्दांनी - तम् क्षिपन् - त्याची निंदा करीत - कलिं संजनयन् - कलह उत्पन्न करीत - संयुगाय समाह्वयत् - युद्धाकरिता बोलाविता झाला. ॥१७॥ दुर्वचोभिः अधिक्षिप्तः - दुष्ट भाषणांनी धिक्कारिलेला - (च) अमर्षात् ताम्रलोचनः - आणि क्रोधामुळे लाल झाले आहेत डोळे ज्याचे असा - सः - तो शंबरासुर - पदा हतः उरगः इव - पायाने लाथाडलेल्या सापाप्रमाणे - गदापाणिः निश्चक्राम - हाती गदा घेऊन बाहेर पडला. ॥१८॥ तरसा गदाम् आविध्य - वेगाने गदा गरगर फिरवून - महात्मने प्रद्युम्नाय प्रक्षिप्य - महात्म्या प्रद्युम्नाच्या अंगावर फेकून - वज्रनिष्पेषनिष्ठुरं - वज्राच्या आघाताप्रमाणे कठोर अशी - नादं व्यनदत् - गर्जना करिता झाला. ॥१९॥ नृप - हे राजा - भगवान् प्रद्युम्नः - भगवान प्रद्युम्न - आपतन्ती तां गदां - चालून येणार्या त्या गदेला - (स्वया) गदया - आपल्या गदेने - अपास्य - झुगारून देऊन - क्रुद्धः - रागावलेला असा - शत्रवे स्वगदा प्राहिणोत् - शत्रूच्या अंगावर आपली गदा फेकिता झाला. ॥२०॥ सः असुरः च - आणि तो शंबरासुर - मयदर्शितां - मयासुराने दर्शविलेल्या - दैतेयीं मायां समाश्रित्य - दैत्यांच्या मायेचा आश्रय घेऊन - वैहायसः - आकाशमार्गाने संचार करणारा असा - कार्ष्णौ - कृष्णपुत्र प्रद्युम्नावर - अस्त्रमयं वर्षं मुमुचे - अस्त्रांचा पाऊस पाडिता झाला. ॥२१॥ महारथः रौक्मिणेयः - महारथी रुक्मिणीपुत्र प्रद्युम्न - अस्त्रवर्षेण बाध्यमानः - अस्त्रांच्या वृष्टीने पीडिलेला असा - सर्वमायोपमर्दिनीं - सर्व मायांचा नाश करणार्या - सत्त्वात्मिकां महाविद्यां (प्रायुङ्क्त) - सत्त्वगुणी महाविद्येला प्रेरिता झाला. ॥२२॥ ततः दैत्यः - नंतर शंबरासुर - गौह्यकगान्धर्वपैशाचोरगराक्षसीः शतशः (मायाः) - यक्ष, गंधर्व, पिशाच, सर्प व राक्षस यांच्या शेकडो माया - प्रायुङ्क्त - प्रेरिता झाला - सः कार्ष्णिः - तो कृष्णपुत्र प्रद्युम्न - ताः व्यधमयत् - त्या माया फुंकून नष्ट करिता झाला. ॥२३॥ निशातं असिं उद्यम्य - तीक्ष्ण तलवार घेऊन - सकिरीटं सकुण्डलं - मुकुट व कुंडले यांसहित - ताम्रश्मश्रु शम्बरस्य शिरः - तांबडी दाढीमिशी असलेले शम्बरासुराचे मस्तक - कायात् ओजसा अहरत् - धडापासून वेगाने हरिता झाला. ॥२४॥ स्तुवद्भिः दिविजैः - स्तुति करणार्या देवांनी - कुसुमोत्करैः आकीर्यमाणः सः - पुष्पगुच्छांनी व्यापून टाकिलेला तो प्रद्युम्न - अम्बरचारिण्या भार्यया - आकाशातून संचार करणार्या रतीकडून - विहायसा पुरं नीतः - आकाशमार्गाने द्वारकानगरीत नेला गेला. ॥२५॥ राजन् - हे परीक्षित राजा - सः - तो प्रद्युम्न - पत्न्या सह - रतीनामक पत्नीसह - गगनात् - आकाशमार्गाने - विद्युता बलाहकः इव - विजेसह गेलेल्या मेघाप्रमाणे - ललनाशतसङ्कुलं - शंभर स्त्रियांनी व्यापिलेल्या - अन्तःपुरवरं - श्रेष्ठ अंतःपुरात - विवेश - शिरला. ॥२६॥ जलदश्यामं - मेघाप्रमाणे कृष्णवर्णाच्या - पीतकौशेयवाससं - पिवळे रेशमी वस्त्र नेसलेल्या - प्रलम्बबाहुं - लांब बाहूंच्या - ताम्राक्षं - तांबड्या डोळ्यांच्या - सुस्मितं रुचिराननम् - सुंदर हास्य करणार्या व सुंदर मुखाच्या - तं दृष्टवा - त्या प्रद्युम्नाला पाहून. ॥२७॥ स्त्रियः - श्रीकृष्णाच्या स्त्रिया - नीलवक्रालकादिभिः - काळे कुरळे केस इत्यादिकांनी - स्वलंकृतमुखाम्भोजं - सुशोभित केले आहे मुखकमळ ज्याचे अशा - (तं) कृष्णं मत्वा - त्या प्रद्युम्नाला श्रीकृष्ण असे समजून - ह्लीताः - लज्जित झालेल्या अशा - तत्र तत्र निलिल्युः ह - त्या त्या ठिकाणीच लपून राहिल्या. ॥२८॥ योषितः - स्त्रिया - ईषत् वैलक्षण्येन - थोडयाशा विरुद्ध लक्षणावरून - सस्त्रीरत्नं (तं) शनैः अवधार्य - स्त्रीसह आलेल्या त्या प्रद्युम्नाला हळूहळू ओळखून - प्रमुदिताः सुविस्मिताः - आनंदित व आश्चर्यचकित झालेल्या अशा - (तम्) उपजग्मुः - त्या प्रद्युम्नाजवळ गेल्या. ॥२९॥ अथ - नंतर - तत्र - तेथे - असितापाङगी वल्गुभाषिणी वैदर्भी - काळेभोर नेत्रकटाक्ष फेकणारी व मधुर भाषण करणारी रुक्मिणी - स्नेहस्नुतपयोधरा - पुत्रप्रेमामुळे जिच्या स्तनांतून दूध पाझरत आहे अशी - नष्टं स्वसुतं अस्मरत् - नष्ट झालेल्या आपल्या पुत्राला आठविती झाली. ॥३०॥ अयं नरवैदूर्यः - हा श्रेष्ठ पुरुष - कः नु - कोण बरे असावा - वा - किंवा - कमलेक्षणः (अयं) - कमळाप्रमाणे नेत्र असणारा हा - कस्य - कोणाचा - वा कया जठरे धृतः - किंवा कोणत्या स्त्रीने ह्याला आपल्या उदरात धारण केले असावे - वा अनेन इयं का लब्धा - किंवा ह्याने ही कोण स्त्री मिळविली आहे बरे ? ॥३१॥ च - आणि - मम अपि यः आत्मजः - माझाहि जो पुत्र - सूतिकागृहात् नीतः नष्टः - बाळंतिणीच्या खोलीतून नेल्यामुळे नष्ट झाला होता - (सः) यदि कुत्रचित् जीवति - तो जर कोठेहि जिवंत असेल - (तर्हि) एतत्तुल्यवयोरूपः (भाव्यः) - तर ह्या पुरुषाएवढयाच वयाचा व अशाच स्वरूपाचा असावा. ॥३२॥ अनेन तु - ह्या पुरुषाने तर - आकृत्या अवयवैः गत्या - आकृतीने, अवयवानी व गतीने - स्वरहासावलोकनैः - भाषणाने, हास्याने व पहाण्याने - शार्ङगधन्वनः सारुप्यं - श्रीकृष्णाचा सारखेपणा - कथं संप्राप्तः - कसा बरे मिळविला. ॥३३॥ या - किंवा - यः अर्भकः - जो बालक - मे गर्भे धृतः - मी गर्भामध्ये धारण केला - सः एव नूनं भवेत् - तोच हा खरोखर असावा - अमुष्मिन् (मे) अधिका प्रीतिः (उत्पन्ना) - ह्याच्या ठिकाणी माझे मोठे प्रेम उद्भवले आहे - मे वामः भुजः स्फुरति - माझा डावा बाहू थरथरत आहे. ॥३४॥ वैदर्भ्यां एवं मीमांसमानायां - रुक्मिणी याप्रमाणे तर्क करीत असता - उत्तमश्लोकः देवकीसुतः - श्रेष्ठकीर्ति मिळविलेला देवकीपुत्र श्रीकृष्ण - देवक्यानकदुन्दुभ्यां (सह) - देवकी व वसुदेव यांसह - आगमत् - आला. ॥३५॥ भगवान् जनार्दनः - भगवान श्रीकृष्ण - विज्ञातार्थः अपि - सर्व वृत्त माहीत असताहि - तूष्णीम् आस - स्वस्थ राहिला - नारदः - नारद - शम्बराहरणादिकं सर्वं अकथयत् - शंबरासुराने हरण करून नेल्यापासूनचे सर्व वर्तमान सांगता झाला. ॥३६॥ कृष्णान्तःपुरयोषितः - श्रीकृष्णाच्या अंतःपुरातील स्त्रिया - तत् महत् आश्चर्यं श्रुत्वा - ते मोठे आश्चर्यकारक वर्तमान ऐकून - मृतं आगतम् इव - जणू मरून आलेल्याप्रमाणे - बहून् अब्दान् नष्टं (पुत्रं) - पुष्कळ वर्षे नष्ट झालेल्या पुत्राला उद्देशून - अभ्यनन्दन् - अभिनंदन करित्या झाल्या. ॥३७॥ देवकी वसुदेवः च - देवकी व वसुदेव - कृष्णरामौ - श्रीकृष्ण व बलराम - रुक्मिणी च - आणि रुक्मिणी - तथा स्त्रियः - त्याप्रमाणे दुसर्या श्रीकृष्णाच्या स्त्रिया - तौ दम्पती परिष्वज्य - त्या प्रद्युम्न व मायावती या दांपत्याला आलिंगन देऊन - मुदं ययुः - आनंदित झाल्या. ॥३८॥ द्वारकौकसः - द्वारकावासी जन - नष्टप्रद्युम्नं आयातम् आकर्ण्य - नष्ट झालेला प्रद्युम्न परत आला असे ऐकून - अहो - काय हो - मृतः बालः दिष्टया आयातः इव - मेलेला बालकच जणू देवाने परत आला - इति ह अब्रुवन् - असे खरोखर म्हणाले. ॥३९॥ पितृसरूपनिजेशभावाः तन्मातरः - पित्यासारखे रूप असल्यामुळे हाच आपला पति अशी भावना ठेवणार्या त्या प्रद्युम्नाच्या माता - रहरूढभावाः - एकान्तविषयक प्रेम उत्पन्न झाले आहे ज्यांच्यात अशा होत्सात्या - यत् - ज्या कारणास्तव - यं वै मुहुः अभजन् - ज्या प्रद्युम्नाला खरोखर वारंवार सेवित्या झाल्या - तत् खलु - ते खरोखर - रमास्पदबिंबबिंबे स्मरे कामे अक्षिविषये (भूते) - लक्ष्मीचे निवासस्थान जो श्रीकृष्ण त्याच्या मूर्तीचे प्रतिबिंब असा जो प्रद्युम्नरूपी मदन तो प्रत्यक्ष दृष्टीस पडला असता - चित्रं न - आश्चर्य नव्हे - उत अन्यनार्यः किम् - मग इतर स्त्रियांची गोष्ट कशाला ? ॥४०॥ अध्याय पंचावन्नावा समाप्त |