श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५० वा - अन्वयार्थ

जरासंधाशी युद्ध आणि द्वारकेची निर्मिती -

भरतर्षभ - हे भरतश्रेष्ठा परीक्षित राजा - अस्तिः प्राप्तिः च (इति) - अस्ति व प्राप्ति अशा - कंसस्य महिष्यौ (आस्ताम्) - कंसाच्या दोन पट्टराण्या होत्या - भर्तरि मृते (सति) - पति मरण पावला असता - दुःखार्ते (ते) - दुःखाने व्याकुळ झालेल्या त्या दोघी - पितुः गृहान् ईयतुः स्म - पित्याच्या घरी गेल्या. ॥१॥

दुःखिते (ते) - दुःखित झालेल्या त्या दोघी - पित्रे मगधराजाय जरासंधाय - पिता जो मगध देशाचा राजा जरासंध त्याला - सर्वम् आत्मवैधव्यकारणम् - स्वतःच्या वैधव्याचे सर्व कारण - वेदयांचक्रतुः - सांगत्या झाल्या. ॥२॥

नृप - हे राजा - सः - तो जरासंध - तत् अप्रियम् आकर्ण्य - ती दुःखकारक वार्ता ऐकून - शोकामर्षयुतः - शोक व क्रोध ह्यांनी युक्त होऊन - महीं अयादवीं कर्तुं - पृथ्वी यादवरहित करण्यासाठी - परमम् उद्यमम् चक्रे - मोठा उद्योग करिता झाला. ॥३॥

विंशत्या तिसृभिः च अपि - वीस आणखी तीन मिळून तेवीस - अक्षौहिणीभिः - अक्षौहिणी सैन्याने - संवृतः (सः) - युक्त असा तो जरासंध - सर्वतः दिशम् - सर्व बाजूंनी - यदुराजधानीं मथुरां न्यरुणत् - यादवांची राजधानीची नगरी जी मथुरा तिला वेढिता झाला. ॥४॥

उद्वेलं सागरम् इव - अमर्याद वाढलेल्या समुद्राप्रमाणे - तद्‌बलं - त्या जरासंधाचे सैन्य - तेन संरुद्धं स्वपुरं - त्या सैन्याने वेढिलेली आपली मथुरा नगरी - भयाकुलं स्वजनं च - आणि भयाने व्याप्त अशा बांधवांना - निरीक्ष्य - पाहून. ॥५॥

कृष्णः - श्रीकृष्ण - कारणमानुषः भगवान् हरिः - कारणाने मनुष्यावतार घेणारा भगवान श्रीहरि - तद्देशकालानुगुणं - त्या स्थलाला व कालाला अनुरूप असे - स्वावतारप्रयोजनम् - आपल्या अवताराचे कारण - चिन्तयामास - मनात आणिता झाला. ॥६॥

वश्यानां सर्वभूभुजां - स्वाधीन असणार्‍या सर्व राजांचे - समाहितं - एकत्र जमलेले - एतत् भुविभारं - हे पृथ्वीला भारभूत असे - मागधेन समानीतं बलं - जरासंधाने आणिलेले सैन्य - हनिष्यामि हि - खरोखर मी मारून टाकितो. ॥७॥

भटाश्वरथकुञ्जरैः (युतं) - पायदळ, घोडेस्वार, रथी व हत्ती यांवर बसून युद्ध करणारे अशा चार प्रकारच्या वीरांनी युक्त - अक्षौहिणीभिः संख्यातं - अक्षौहिणीनीच मोजता येणारे - बलं हन्तव्यं - सैन्य मारावे - मागधः तु - जरासंध मात्र - न हन्तव्यः - मारू नये - (सः) भूयः बलोद्यमं कर्ता - तो पुनः सैन्य जमविण्याचा उद्योग करील. ॥८॥

एतदर्थः - हाच आहे उद्देश ज्याचा असा - अयं मे अवतारः - हा माझा अवतार - भूभारहरणाय - पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी - साधूनां संरक्षणाय - साधूंच्या रक्षणाकरिता - अन्येषां च वधाय - आणि साधूंहून दुसर्‍यांच्या दुष्टांच्या नाशाकरिता - कृतः - केला आहे. ॥९॥

मया - माझ्याकडून - अन्यः अपि देहः - दुसराहि देह - धर्मरक्षायै - धर्माचे रक्षण करण्याकरिता - क्वचित् काले प्रभवतः - कधी कधी प्रसंगवशात उत्पन्न होणार्‍या - अधर्मस्य विरामाय अपि - अधर्माच्या नाशाकरिताहि - संभ्रियते - धारण केला जातो - गोविन्दे एवं ध्यायति (सति) - श्रीकृष्ण ह्याप्रमाणे चिंतन करीत असता - सूर्यवर्चसौ ससूतौ सपरिच्छदौ - सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि सारथ्यासह व युद्धसामुग्रीसह असलेले - रथौ आकाशात् सद्यः उपस्थितौ - दोन रथ आकाशातून तत्काळ प्राप्त झाले.॥१०-११॥

हृषीकेशः - श्रीकृष्ण - यदृच्छया (आगतानि) - आपोआप आलेली - पुराणानि दिव्यानि तानि आयुधानि - अति प्राचीन व तेजस्वी अशी ती शस्त्रे - दृष्ट्वा - पाहून - अथ च - नंतर - संकर्षणं अब्रवीत् - बलरामास म्हणाला. ॥१२॥

प्रभो आर्य - हे समर्थ बंधो - त्वावतां यदूनां - तूच आहेस रक्षणकर्ता ज्यांचा अशा यादवांवर - प्राप्तं व्यसनं पश्य - आलेले संकट पहा - एषः ते रथः आयातः - हा तुझा रथ आला आहे - दयितानि आयुधानि च आयातानि - आणि प्रिय आयुधेहि आली आहेत. ॥१३॥

ईश - हे समर्था - यानं आस्थाय एतत् जहि - रथात बसून हे सैन्य ठार कर - स्वान् व्यसनात् समुद्धर - आपल्या लोकांना संकटांतून मुक्त कर - हि - कारण - एतदर्थं - ह्याकरिताच - साधूनां शर्मकृत् - साधूंचे कल्याण करणारा - नौ जन्म (अस्ति) - आमचा जन्म आहे. ॥१४॥

त्रयोविंशत्यनीकाख्यं - तेवीस अक्षौहिणी सैन्य हे आहे नाव ज्याचे असा - भूमेः भारं अपाकुरु - पृथ्वीचा भार दूर कर - एवं संमन्त्र्य - अशी मसलत करून - स्वायुधाढयौ अल्पीयसा बलेन (च) वृतौ - सुंदर आयुधांनी शोभणारे व थोडया सैन्याने युक्त असे - दाशार्हौ - दाशार्ह कुळात उत्पन्न झालेले ते श्रीकृष्ण व बलराम - दंशितौ रथिनौ (च) - अंगात चिलखते घालून व रथात बसून - पुरात् निर्जग्मतुः - नगरीतून बाहेर पडले - दारुकसारथिः हरिः - दारुक आहे सारथी ज्याचा असा श्रीकृष्ण - विनिर्गत्य - बाहेर पडून - शंखं दध्मौ - शंख वाजविता झाला. ॥१५-१६॥

ततः - त्यामुळे - परसैन्यानां हृदि - शत्रुसैन्यांच्या हृदयामध्ये - वित्रासवेपथुः अभूत् - भीतीने कंप सुटला - मागधः - जरासंध - तौ वीक्ष्य आह - त्या दोघा रामकृष्णांना पाहून म्हणाला - हे पुरुषाधम कृष्ण - हे अधम पुरुषा कृष्णा. ॥१७॥

बन्धुहन् - हे बंधुहत्या करणार्‍या - एकेन बालेन त्वया (सह) - एकटया बालक अशा तुझ्याबरोबर - लज्जया - लाजेमुळे - योद्धुं न इच्छामि - मी युद्ध करू इच्छित नाही - मन्द - हे अज्ञानी मुला - गुप्तेन त्वया न योत्स्ये हि - लपून रहाणार्‍या अशा तुझ्याबरोबर मी युद्ध करणार नाही - याहि - तू परत जा - राम - हे बलरामा - यदि तव श्रद्धा - जर तुझी इच्छा असेल तर - धैर्यम् उद्वह युद्‌ध्यस्व (च) - धैर्य धर आणि युद्ध कर - मच्छरैः छिन्नं देहं हित्वा स्वः याहि - माझ्या बाणांनी विदीर्ण झालेला देह टाकून स्वर्गाला जा - वा - किंवा - मां जहि - मला मार. ॥१९॥

राजन् - हे जरासंध राजा - शूराः वै न विकत्थन्ते- शूर कधीहि बडबड करीत नाहीत - पौरुषम् एव दर्शयन्ति - पराक्रमच दाखवितात - मुमूर्षतः आतुरस्य (ते) वचः न गृह्‌णिमः - मरण्याची इच्छा करणार्‍या आसन्नमरण अशा तुझे भाषण आम्ही स्वीकारीत नाही. ॥२०॥

जरासुतः - जरासंध - वायुः अभ्ररेणुभिः सूर्यानलौ इव - जसा वायु मेघांनी व धुळीने सूर्य व अग्नि यांना अनुक्रमे आच्छादितो त्याप्रमाणे - ससैन्ययानध्वजवाजिसारथी - सैन्य, रथ, ध्वज, घोडे व सारथी यांनी युक्त असलेल्या - तौ माधवौ - त्या दोघा रामकृष्णांना - बलीयसा महाबलौघेन - बलवान अशा मोठया सैन्याच्या समूहाने - अभिसृत्य आवृणोत् - चाल करून आच्छादिता झाला. ॥२१॥

पुराट्टालकहर्म्यगोपुरं समाश्रिताः स्त्रियः - नगरातील राजमार्ग, पेठा, गच्च्या, वेशी ह्याठिकाणी जमलेल्या स्त्रिया - सुपर्णतालध्वजचिह्नितौ - गरुड व ताड ही ज्यांच्या ध्वजांवर चिन्हे आहेत असे - हरिरामयोः रथौः - श्रीकृष्ण व बलराम ह्यांचे दोन रथ - मृधे अलक्षयन्त्यः - युद्धभूमीवर न पहाणार्‍या अशा - शुचार्दिताः संमुमुहुः - शोकाकुल होऊन मूर्च्छित पडल्या. ॥२२॥

सुरासुरार्चितं स्वसैन्यं - देव व दैत्य या दोघांनीहि पूजिलेले असे आपले सैन्य - परानीकपयोमुचां - शत्रुसैन्यरूपी मेघांच्या - शिलीमुखात्युल्बणवर्षपीडितम् आलोक्य - बाणरूपी तीक्ष्ण पर्जन्याने पीडिलेले पाहून - हरिः - श्रीकृष्ण - शरासनोत्तमम् शार्ङगं - श्रेष्ठ असे शार्ङगंधनुष्य - मुहुः व्यस्फूर्जयत् - पुनः पुनः वाजविता झाला. ॥२३॥

अथ - नंतर - यद्वत् अलातचक्रम् - ज्याप्रमाणे गरगर फिरणारे पेटलेले कोलीत त्याप्रमाणे - निषङगात् गृह्‌णन् - भात्यातून घेऊन - शरान् (धनुषि) संदधत् - बाण धनुष्याला जोडीत - विकृष्य - जोराने ओढून - शितबाणपूगान् मुञ्चन् - तीक्ष्ण बाणांचे समूह सोडणारा असा - रथान् कुञ्जरवाजिपत्तीन् - रथ, हत्ती, घोडे व पायदळ ह्यांना - निरन्तरं निघ्नन् - एकसारखे मारीत - करिणः निर्भिन्नकुम्भाः - हत्तींची गण्डस्थले भग्न होऊन - अश्वाः अनेकशः शरवृक्णकन्धराः - घोडे पुष्कळप्रकारे ज्यांच्या माना बाणांनी तुटून गेल्या आहेत असे - रथाः - रथ - हताश्वध्वजसूतनायकाः - घोडे, ध्वज, सारथी व अधिपति हे ज्यांतील नष्ट झाले आहेत असे - पदातयः - पायदळ - छिन्नभुजोरुकन्धराः - ज्यांचे बाहु, मांडया व माना विदीर्ण झाल्या आहेत असे - निपेतुः - पडले. ॥२४-२५॥

संछिद्यमानद्विपदेभवाजिनाम् - तोडल्या जाणार्‍या मनुष्यांच्या, हत्तींच्या व घोडयांच्या - अङगप्रसूताः - अवयवांपासून उत्पन्न झालेल्या - भुजाहयाः - बाहु हेच ज्यांतील सर्प आहेत अशा - पुरुषशीर्षकच्छपाः - मनुष्याची मस्तके हेच आहेत कासव ज्यांमध्ये अशा - हतद्विपद्वीपहयग्रहाकुलाः - मारलेले हत्ती हीच बेटे व मारलेले घोडे ह्याच सुसरी ज्यांत आहेत अशा - शतशः असृगापगाः (प्रवर्तिताः) - शेकडो रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. ॥२६॥

करोरुमीनाः - हात व मांडया ह्याच आहेत मासे ज्यांमध्ये अशा - नरकेशशैवलाः - मनुष्यांचे केस हेच आहे शेवाळ ज्यांमध्ये अशा - धनुस्तरङगायुधगुल्मसंकुलाः - धनुष्ये ह्याच लाटा व आयुधे हीच झुडपे ह्यांनी युक्त अशा - अच्छूरिकावर्तभयानकाः - ढाली हेच भोवरे त्यामुळे भयंकर दिसणार्‍या - महामणिप्रवेकाभरणाश्मशर्कराः - मोठमोठया रत्‍नांचे उत्तमोत्तम अलंकार हेच आहेत पाषाण व वाळू ज्यांमध्ये अशा - असृगापगाः प्रवर्तिताः - रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. ॥२७॥

भीरुभयावहाः - भित्र्यांना भय वाटण्याजोग्या - मनस्विनां परस्परं हर्षकरीः असृगापगाः - थोर मनाच्या लोकांना परस्पर आनंद देणार्‍या रक्ताच्या नद्या - मुसलेन दुर्मदान् अरीन् विनिघ्नता - मुसळाने मदोन्मत्त शत्रूंना मारणार्‍या - अपरिमेयतेजसा संकर्षणेन - अगणित पराक्रम करणार्‍या बलरामाने - मृधे प्रवर्तिताः - युद्धभूमीवर सुरु केल्या. ॥२८॥

अङग - हे राजा - अर्णवदुर्गभैरवं - समुद्राप्रमाणे ओलांडून जाण्यास कठीण व भयंकर - दुरन्तपारं - ज्याचा अंत लागणे कठीण आहे असे - मगधेन्द्रपालितं तत् बलं - जरासंधाने रक्षिलेले सैन्य - (ताभ्यां) क्षयं प्रणीतं - त्या दोघा रामकृष्णांनी नाशाप्रत नेले - तत् - ते कृत्य - जगदीशयोः वसुदेवपुत्रयोः - जगाचे स्वामी अशा वसुदेवपुत्र रामकृष्णांचे - परं विक्रीडितम् - अगदी लीलेचे खेळणेच होय. ॥२९॥

अनन्तगुणः यः - अनंत आहेत गुण ज्याचे असा जो श्रीकृष्ण - स्वलीलया - स्वतःच्या क्रीडेने - भुवनत्रयस्य स्थित्युद्‌भवान्तं - त्रैलोक्याची उत्पत्ति, स्थिति व लय - समीहते - करण्यास इच्छितो - तस्य परपक्षनिग्रहः चित्रं न - त्याने शत्रुपक्षाचा पराजय केला हे आश्चर्य नाही - तथापि - तरीहि - मर्त्यानुविधस्य (तस्य) वर्ण्यते - मनुष्यासारखे आचरण करणार्‍या त्या श्रीकृष्णाचे चरित्र वर्णिले जात आहे. ॥३०॥

रामः - बलराम - हतानीकावशिष्टासुं - ज्याचे सर्व सैन्य नष्ट झाले असून प्राण मात्र अवशिष्ट राहिले आहेत असा - महाबलं विरथं जरासन्धं - मोठया बलाढय व रथविरहित झालेल्या जरासंधाला - सिंहः सिंहम् इव - सिंह जसा सिंहाला पकडतो त्याप्रमाणे - ओजसा जग्राह - पराक्रमाने पकडता झाला. ॥३१॥

तेन वारुणमानुषैः पाशैः बध्यमानं - त्या बलरामाकडून वरुणपाश व मनुष्यपाश यांनी बांधल्या जाणार्‍या - हतारातिं - मारिले आहेत शत्रु ज्याने अशा - तं दृष्टवा - त्या जरासंधाला पाहून - गोविन्दः - श्रीकृष्ण - कार्यचिकीर्षया वारयामास - कार्य करण्याच्या इच्छेने बलरामाला निवारिता झाला. ॥३२॥

लोकनाथाभ्यां मुक्तः - लोकाधिपति अशा रामकृष्णांनी सोडिलेला - व्रीडितः - लज्जित झालेला - वीरसंमतः - वीरांमध्ये पूज्य असा - सः - तो जरासंध - तपसे कृतसंकल्पः - तपश्चर्या करण्याविषयी केला आहे विचार ज्याने असा - पथि - मार्गात - राजभिः वारितः - राजेलोकांकडून निवारिला गेला. ॥३३॥

पवित्रार्थपदैः वाक्यैः - धर्मशास्त्रानुरूप अर्थ दाखविणारे शब्द आहेत ज्यात अशा वाक्यांनी - प्राकृतैः नयनैः अपि - लौकिक न्याय व नीतिशास्त्राचे नियम ह्यांनीहि - यदुभिः (कृतः) अयं ते पराभवः - यादवांनी केलेला हा तुझा पराभव - स्वकर्मबन्धप्राप्तः - तुझ्या पूर्वकर्मरूपी बंधनामुळे प्राप्त झाला आहे. ॥३४॥

तदा - त्यावेळी - सर्वानीकेषु हतेषु - सर्व सैन्य मारले गेले असता - बार्हद्रथः नृपः - जरासंध राजा - भगवता उपेक्षितः - भगवान श्रीकृष्णाने उपेक्षिलेला असा - दुर्मनाः - खिन्न आहे मन ज्याचे असा - मगधान् ययौ - मगध देशाला गेला. ॥३५॥

अक्षतबलः - ज्याचे सैन्य नष्ट झाले नाही असा - निस्तीर्णारिबलार्णवः - व शत्रुसैन्यरूपी समुद्राचे ज्याने उल्लंघन केले आहे असा - मुकुन्दः अपि - श्रीकृष्णसुद्धा - त्रिदशैः अनुमोदितः - देवांकडून अनुमोदन दिला गेला - कुसुमैः (च) विकीर्यमाणः (अभूत्) - आणि पुष्पवृष्टि केला गेला ॥३६॥

विज्वरैः - पीडारहित झालेल्या - मुदितात्मभिः - आनंदित आहे अंतःकरण ज्यांचे अशा - माथुरैः - मथुरेतील लोकांनी - सुतमागधबन्दिभिः (सह) - पौराणिक, गायक व स्तुतिपाठक लोकांसह - उपसंगम्य - एकत्र जमून - उपगीयमानविजयः - ज्याचा पराक्रम गायिला आहे असा - सः स्वगरं ययौ - तो श्रीकृष्ण आपल्या नगराला गेला. ॥३७॥

प्रभौ पुरं प्रविशति - श्रीकृष्ण मथुरेत शिरत असता - शंखदुन्दुभयः - शंख, आणि दुंदुभि - भेरीतूर्याणि - नगारे व तुतार्‍या - वीणावेणुमृदङ्‌गानि - वीणा, पावे व मृदंग - अनेकशः नेदुः - वारंवार वाजू लागले. ॥३८॥

सिक्तमार्गां - जिच्यातील रस्ते शिंपिलेले आहे अशा - हृष्टजनां - जीतील लोक आनंदित झाले आहेत अशा - पताकाभिः अलंकृतां - पताकांनी सजविलेल्या - ब्रह्मघोषेण निर्घुष्टां - वेदघोषाने दुमदुमून गेलेल्या - कौतुकाबद्धतोरणां - मंगलार्थ बांधली आहेत तोरणे जीत अशा. ॥३९॥

नारीभिः माल्यदध्यक्षताङ्‌कुरैः निचीयमानः - स्त्रियांकडून दही, अक्षता व दूर्वांकुर यांनी पूजिलेला - प्रीत्युत्कलितलोचनैः - प्रेमाने प्रफुल्लित झालेल्या नेत्रांनी - सस्नेहं - प्रेमपूर्वक - निरीक्ष्यमाणः - पाहिला गेलेला - प्रभुः - श्रीकृष्ण - आयोधनगतं - युद्धभूमीवर पडलेले - वीरभूषणं - वीरांचे भूषणरूप - अनन्तम् - अपरिमित असे - तत् सर्वं आहृतं वित्तं - ते सर्व आणलेले द्रव्य - यदुराजाय प्रादिशत् - यादवाधिपति उग्रसेनाला देता झाला. ॥४०-४१॥

एवं - याप्रमाणे - तावत्यक्षौहिणीबलः - तितकेच तेवीस अक्षौहिणी सैन्य असलेला - मागधः राजा - मगधदेशाचा राजा जरासंध - कृष्णपालितैः यदुभिः - श्रीकृष्णाने रक्षिलेल्या यादवांबरोबर - सप्तदशकृत्वः - सतरावेळा - युयुधे - युद्ध करिता झाला. ॥४२॥

वृष्णयः - यादव - कृष्णतेजसा - श्रीकृष्णाच्या तेजामुळे - तत् सर्वं बलं अक्षिण्वन् - ते सर्व जरासंधाचे सैन्य क्षीण करिते झाले - स्वेषु अनीकेषु हतेषु - स्वतःचे सैन्य मारले गेले असता - नृपः - जरासंध - अरिभिः त्यक्तः अयात् - शत्रूंनी सोडून दिला असता निघून गेला. ॥४३॥

अष्टादशमसंग्रामे आगामिनि - अठरावा युद्धकाळ प्राप्त झाला असता - तदन्तरा - त्या अवकाशात - नारदप्रेषितः वीरः यवनः - नारदाने पाठविलेला पराक्रमी कालयवन - प्रत्यदृश्यत - दिसला. ॥४४॥

नृलोके च अप्रतिद्वन्द्वः - मनुष्यलोकी ज्याला प्रतिस्पर्धी कोणी नव्हता असा तो कालयवन - वृष्णीन् आत्मसंमतान् श्रुत्वा - यादव आपल्या बरोबरीचे आहेत असे ऐकून - मथुरां एत्य - मथुरेत येऊन - तिसृभिः म्लेच्छकोटिभिः रुरोध - तीन कोटी म्लेच्छांकडून वेढिता झाला. ॥४५॥

संकर्षणसहायवान् कृष्णः - बलरामाचे सहाय्य असलेला श्रीकृष्ण - तं दृष्ट्वा - त्या कालयवनाला पाहून - अचिन्तयत् - विचार करिता झाला - यदूनां हि उभयतः महत् वृजिनं प्राप्तम् - यादवांवर खरोखर दोन्ही बाजूंनी मोठेच संकट प्राप्त झाले. ॥४६॥

अयं महाबलः यवनः - हा मोठा बलाढय कालयवन - अद्यतावत् अस्मान् निरुन्धे - आज तर आम्हांला वेढित आहे - मागधः अपि - जरासंध सुद्धा - अद्य वा श्वो वा परश्वो वा - आज किंवा उद्या अथवा परवा - आगमिष्यति - येईल. ॥४७॥

अस्य आवयोः युद्ध्यतोः - त्याच्याबरोबर आपण उभयता युद्ध करीत असताना - यदि - जर - बली जरासुतः आगन्ता - बलाढय जरासंध येईल - (बन्धून्) वधिष्यति - बंधूंना मारील - अथवा स्वपुरं नेष्यते - किंवा आपल्या नगराला नेईल. ॥४८॥

तस्मात् - म्हणून - अद्य - आज - द्विपददुर्गमम् दुर्गं विधास्यामः - मनुष्यांना जाण्यास कठीण असा किल्ला बांधू - तत्र (च) ज्ञातीन् समाधाय - आणि तेथे ज्ञातिबांधवांना ठेवून - यवनं घातयामहे - कालयवनाला मारून टाक. ॥४९॥

भगवान् - श्रीकृष्ण - इति संमन्त्र्य - असा विचार ठरवून - द्वादशयोजनं कृत्स्नाद्‌भुतं दुर्गं नगरं - बारा योजने विस्ताराचे अत्यंत आश्चर्यकारक आणि किल्ल्याप्रमाणे दुर्गम असे नगर - अन्तःसमुद्रे अचीकरत् - समुद्रामध्ये रचिता झाला. ॥५०॥

यत्र हि - जेथे खरोखर - शिल्पनैपुणं त्वाष्ट्रं विज्ञानं - कलाकौशल्यासंबंधी त्वष्टयाचे विशेष ज्ञान - रथ्याचत्त्वरवीथीभिः - रस्ते, चव्हाटे व पेठा यांनी - यथावास्तुविनिर्मितम् - जागच्या जागी पद्धतशीर घरे बांधिलेले - दृश्यते - दिसत होते. ॥५१॥

सुरद्रुमलतोद्यानविचित्रोपवनान्वितम् - कल्पवृक्ष व कल्पलता ज्यांत आहेत अशी क्रीडास्थाने व चित्रविचित्र बागा ह्यांनी युक्त - दिविस्पृग्भिः हेमशृङगैः स्फाटिकाट्टालगोपुरैः - आकाशापर्यंत उंच गेलेल्या सुवर्णाच्या शिखरांनी युक्त असलेल्या स्फटिकाच्या गच्च्या व वेशी ह्यांनी - निर्मितम् - निर्मिलेले. ॥५२॥

राजतारकुटैः कोष्ठैः अलंकृतैः हेमकुम्भैः - पितळ व चांदी ह्यांनी निर्मिलेल्या कोठारांनी व भूषविलेल्या सुवर्णाच्या घटांनी - रक्तकूटैः गृहैः - पद्मरागमण्यांची शिखरे असलेल्या घरांनी - हैमैः महामारकतस्थलैः - सुवर्णाच्या व उंची पाचूच्या भूमींनी. ॥५३॥

वास्तोष्पतीनां गृहैः - देवालयांनी - च वलभीभिः निर्मितम् - आणि उच्च स्थाने ह्यांनी निर्मिलेले - चातुर्वर्णजनाकीर्णम् - चारहि वर्णाच्या लोकांनी गजबजलेले - वसुदेवगृहोल्लसत् - वसुदेवाच्या मंदिराने शोभणारे. ॥५४॥

महेन्द्रः - इंद्र - हरेः - श्रीकृष्णाकरिता - सुधर्मां च पारिजातं च - सुधर्मा नावाची सभा व पारिजातक वृक्ष - प्राहिणोत् - पाठविता झाला - यत्र - जेथे - अवस्थितः मर्त्यः - असलेला मनुष्य - मर्त्यधर्मैः न युज्यते - मान्वधर्मांनी युक्त होत नाही. ॥५५॥

नृप - हे राजा - वरुणः - वरुण - श्यामैककर्णान् मनोजवान् शुक्लान् हयान् - नीलवर्णाचा एकच कान असणार्‍या व मनोवेगाने धावणार्‍या शुभ्र घोडयांना - (च) लोकपालः निधिपतिः - आणि लोकपाल कुबेर - निजोदयान् अष्टौ कोशान् - स्वतःचा उदय करणार्‍या आठ निधींना - यत् यत् (च) - तसेच आणखी जे जे काही - आधिपत्यं - राजाला शोभणारे - भगवता स्वसिद्धये दत्तं - परमेश्वराने स्वकार्यसिद्ध्यर्थ दिले होते - (तत्) सर्वं - ते सर्व - हरौ भूमिगते - भगवंताने पृथ्वीवर अवतार घेतला असता - प्रत्यर्पयामासुः - परत अर्पिते झाले. ॥५६-५७॥

तत्र - त्या नगरीमध्ये - सर्वजनं योगप्रभावेण नीत्वा - मथुरेतील सर्व लोकांना योगसामर्थ्याने नेऊन - प्रजापालेन रामेण समनुमन्त्रितः हरिः कृष्णः - प्रजारक्षक बलरामाशी ज्याने मसलत केली आहे असा हरि श्रीकृष्ण - पद्ममाली निरायुधः - कमळाची माळ धारण करणारा व ज्याच्याजवळ शस्त्र नाही असा - पुरात् निर्जगाम - मथुरा नगरीच्या वेशीतून बाहेर पडला. ॥५८॥

अध्याय पन्नासावा समाप्त

GO TOP