|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ५१ वा - अन्वयार्थ
कालयवनाचे भस्म व मुचुकुंदाची कथा - उज्जिहानं उडुपं इव विनिष्क्रान्तं - वर येणार्या चंद्राप्रमाणे बाहेर पडणार्या - दर्शनीयतमं श्यामं - अत्यंत सुंदर व कृष्णवर्ण अशा - पीतकौशेयवाससं - पिवळे रेशमी वस्त्र नेसलेल्या - तं विलोक्य - त्या श्रीकृष्णाला पाहून - श्रीवत्सवक्षसं - ज्याच्या वक्षस्थलाच्या ठिकाणी श्रीवत्सलांछन शोभत आहे अशा - भ्राजत्कौस्तुभामुक्तकन्धरम् - चकाकणार्या कौस्तुभ मण्याने शोभिवंत झाला आहे कंठ ज्याचा अशा - पृथुदीर्घचतुर्बाहुं - लठठ व लांब आहेत चार हात ज्याला अशा - नवकञ्जारुणेक्षणम् - नवीन कमळाप्रमाणे आहेत डोळे ज्याचे अशा - नित्यप्रमुदितं - नेहमी आनंदित राहणार्या - श्रीमत्सुकपोलं - शोभायमान आहेत चांगले गाल ज्याचे अशा - शुचिस्मितम् - शुभ्र आहे मंदहास्य ज्याचे अशा - स्फुरन्मकरकुण्डलं मुखारविन्दं बिभ्राणम् - ज्याच्या कानांत मकराकार कुंडले शोभत आहेत अशा मुखकमळाला धारण करणार्या - तं विलोक्य - त्या श्रीकृष्णाला पाहून. ॥१-३॥ अयं हि - हाच - पुमान् - पुरुष - श्रीवत्सलांछनः चतुर्भुजः अरविन्दाक्षः वनमाली अतिसुंदरः - श्रीवत्सलांछन धारण करणारा, चार हात असणारा, कमळासारखे नेत्र असलेला, वनमाला धारण करणारा आणि अत्यंत सुंदर असा - वासुदेवः इति - वसुदेवपुत्र श्रीकृष्ण होय असे. ॥४॥ नारदप्रोक्तैः लक्षणैः - नारदाने सांगितलेल्या लक्षणांवरून - अन्यः भवितुं न अर्हति - दुसरा असणे शक्य नाही - निरायुधः पद्भ्यां चलन् - आयुधरहित असा पायानेच चालत आहे - अनेन - ह्या कृष्णाबरोबर - निरायुधः (अहं) योत्स्ये - मीहि आयुधरहित असाच युद्ध करीन. ॥५॥ यवनः - कालयवन - एवं निश्चित्य - असा निश्चय करून - पराङ्मुखं प्राद्रवन्तं - पाठ करून पळत सुटलेल्या - योगिनां दुरापम् अपि - योग्यांना मिळविण्यास कठीण अशाहि - तं जिघृक्षुः - त्या श्रीकृष्णाला धरण्याची इच्छा करणारा - अन्वधावत् - मागून धावू लागला. ॥६॥ पदेपदे - पावलोपावली - आत्मानं हस्तप्राप्तम् इव दर्शयता - स्वतःला हातात सापडल्यासारखे दाखविणार्या - अनेन हरिणा - त्या श्रीकृष्णाने - सः यवनेशः - तो कालयवन - दूरं अद्रिकन्दरं नीतः - लांब पर्वताच्या गुहेपर्यंत नेला. ॥७॥ अहताशुभः - ज्याचे पाप नष्ट झाले नाही असा - यदुकुले जातस्य तव पलायनं उचितं न - यदुकुळात उत्पन्न झालेल्या तुला पळून जाणे योग्य नाही - इति (तं) क्षिपन् - अशी त्या श्रीकृष्णाची निंदा करीत - अनुगतः - त्याच्या मागून धावू लागला - (परंतु) एनं न प्राप - परंतु ह्या श्रीकृष्णाला पकडू शकला नाही. ॥८॥ भगवान् - श्रीकृष्ण - एवं क्षिप्तः अपि - याप्रमाणे निंदिला असताहि - गिरिकन्दरम् - पर्वताच्या गुहेत - प्राविशत् - शिरला - तत्र प्रविष्टः सः अपि - तेथे शिरलेला तो कालयवनहि - अन्यं शयानं नरं ददृशे - दुसर्या निजलेल्या मनुष्याला पाहता झाला. ॥९॥ ननु - खरोखर - असौ - हा श्रीकृष्ण - मां दूरं आनीय - मला इतक्या लांबपर्यंत आणून - इह साधुवत् शेते - येथे साधुपुरुषाप्रमाणे निजला आहे - इति - असे म्हणून - मूढः - मूर्ख कालयवन - तं अच्युतं मत्वा पदा समताडयत् - त्याला कृष्ण समजून पायाने ताडिता झाला.॥१०॥ चिरं सुप्तः सः - पुष्कळ काळपर्यंत निजलेला तो पुरुष - उत्थाय - उठून - शनैः लोचने उन्मील्य - हळूच डोळे उघडून - पार्श्वे दिशः विलोकयन् - आजूबाजूला दिशांकडे पहात असता - अवस्थितं तं अद्राक्षीत् - उभ्या असलेल्या त्या कालयवनाला पाहता झाला. ॥११॥ भारत - हे परीक्षित राजा - तावत् - तितक्यात - रुष्टस्य तस्य दृष्टिपातेन - रागावलेल्या त्या पुरुषाच्या अवलोकनाने - देहजेन अग्निना दग्धः - शरीरापासून उत्पन्न झालेल्या अग्नीमुळे जळून गेलेला असा - सः - तो कालयवन - क्षणात् भस्मसात् अभवत् - क्षणामध्ये भस्म झाला. ॥१२॥ ब्रह्मन् - हे शुकाचार्य - यवनार्दनः सः पुमान् कः नाम - कालयवनास मारणारा तो पुरुष कोण होता बरे - कस्य च एव - तो कोणाचा कोण व त्याचे काय सामर्थ्य होते - कस्मात् गुहां गतः शिश्ये - कशासाठी गुहेत जाऊन निजला होता - किं तेजः - त्याचे तेज तरी किती होते. ॥१३॥ सः - तो - इक्ष्वाकुकुले - इक्ष्वाकुवंशामध्ये - महान् - मोठा - मांधातृतनयः - मांधात्याचा मुलगा - मुचुकुन्दः ख्यातः - मुचुकुंद ह्या नावाने प्रसिद्ध असा - ब्रह्मण्यः सत्यसंगरः - ब्राह्मणांचे कल्याण करणारा आणि खर्या मार्गाने युद्ध करणारा असा - जातः - उत्पन्न झाला. ॥१४॥ सः - तो मुचुकुंद - असुरेभ्यः परित्रस्तैः इंद्राद्यैः सुरगणैः - दैत्यांनी पीडिलेल्या इंद्रादि देवगणांनी - आत्मरक्षणे याचितः - स्वतःच्या रक्षणासाठी प्रार्थिला असता - सः - तो मुचुकुंद - तद्रक्षां चिरं अकरोत् - त्यांचे रक्षण पुष्कळ काळपर्यंत करिता झाला. ॥१५॥ अथ - नंतर - ते - ते देव - गुहं स्वःपालं लब्ध्वा - कार्तिकस्वामीला स्वर्गरक्षक असा मिळवून - मुचुकुन्दम् अब्रुवन् - मुचुकुंदाला म्हणाले - राजन् - हे राजा - भवान् - तू - नः परिपालनात् कृच्छ्रात् - आम्हाला रक्षण करण्याच्या श्रमापासून - विरमतां - थांबावे. ॥१६॥ वीर - हे पराक्रमी मुचुकुंदा - नरलोके - मनुष्यलोकातील - निहतकण्टकं राज्यं परित्यज्य - शत्रुरहित झालेले राज्य सोडून - अस्मान् पालयतः ते - आमचे रक्षण करणार्या तुझ्याकडून - सर्वे कामाः उज्झिताः - सर्व इच्छा टाकिल्या गेल्या आहेत. ॥१७॥ भवतः - तुझ्या - महिष्यः सुताः - स्त्रिया व पुत्र - ज्ञातयः अमात्यमन्त्रिणः - जातभाई, प्रधान व सल्लागारमंडळ - च तुल्यकालीयाः प्रजाः - आणि त्या काळात असणार्या प्रजा - कालिताः अधुना न सन्ति - कालाधीन झालेल्या सांप्रत अस्तित्वात नाहीत. ॥१८॥ बलिनां बलीयान् - बलिष्ठांमध्ये बळकट असा - अव्ययः - अविनाशी - भगवान ईश्वरः कालः - परमेश्वररूपी भगवान काळ - क्रीडन् - क्रीडा करीत - पशुपालः यथा पशून् - पशुसंरक्षक जसा पशूंना तसा - प्रजाः कालयते - प्रजांना आपल्याकडे पळवून आणितो. ॥१९॥ अद्य - आज - नः - आमच्यापासून - कैवल्यम् ऋते - मोक्षाशिवाय - ते भद्रं वरं वृणीष्व - तुला कल्याणकारक असा वर मागून घे - अव्ययः भगवान् विष्णुः - अविनाशी भगवान विष्णु - एकः एव तस्य (मोक्षस्य) ईश्वरः - एकटाच त्या मोक्षाचा अधिपति आहे. ॥२०॥ एवम् उक्तः - याप्रमाणे बोलला गेलेला - महायशाः सः - मोठा यशस्वी असा तो मुचुकुंद - देवान् अभिवन्द्य - देवांना नमस्कार करून - गुहाविष्टः - गुहेत शिरून - देवदत्तया निद्रया - देवांनी दिलेल्या निद्रेच्या योगाने - अशयिष्ट वै - खरोखर झोप घेता झाला. ॥२१॥ अचेतनः यः तु - जो कोणी अज्ञानी पुरुष - स्वापं यातं त्वां - झोपी गेलेल्या तुला - मध्ये बोधयेत् - मध्येच जागा करील - सः - तो - त्वया दृष्टमात्रः तु - तुझ्या दृष्टीस पडताक्षणीच - तत्क्षणात् भस्मीभवतु - तत्काळ भस्म होवो. ॥२२॥ यवने भस्मसात् नीते - कालयवन भस्म झाला असता - सात्वतर्षभः भगवान् - यादवश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण - धीमते मुचुकुन्दाय - ज्ञानी मुचुकुंदाला - आत्मानं दर्शयामास - स्वतः दर्शन देता झाला. ॥२३॥ घनश्यामं पीतकौशेयवाससं - मेघाप्रमाणे कृष्णवर्णाच्या व पिवळे रेशमी वस्त्र धारण करणार्या - श्रीवत्सवक्षसं - ज्याच्या वक्षस्थलाच्या ठिकाणी श्रीवत्सलांछन शोभत आहे अशा - भ्राजत्कौस्तुभेन विराजितम् - दैदीप्यमान कौस्तुभाने शोभणार्या - तं आलोक्य - त्या श्रीकृष्णाला पाहून. ॥२४॥ चतुर्भुजं - चार बाहू असणार्या - वैजयन्त्या मालया च रोचमानं - व वैजयन्ती माळेने शोभणार्या - चारुप्रसन्नवदनं - सुंदर व प्रसन्न आहे मुख ज्याचे अशा - स्फुरन्मकरकुण्डलम् - ज्याच्या कानांत मकराकार तेजस्वी कुंडले आहेत अशा - नृलोकस्य प्रेक्षणीयं - मनुष्य लोकांमध्ये पाहण्यालायक अशा - सानुरागस्मितेक्षणम् - प्रेमपूर्वक मंद हास्ययुक्त आहे अवलोकन ज्याचे अशा - अपीच्यवयसं - नवीन सुंदर वयाच्या - मत्तमृगेन्द्रोदारविक्रमम् - मत्त सिंहाप्रमाणे मोठा आहे पराक्रम ज्याचा अशा.॥२५-२६॥ तस्य तेजसा धर्षितः - त्या श्रीकृष्णाच्या तेजाने दिपून गेलेला - महाबुद्धिः राजा - मोठा बुद्धिवान मुचुकुंद राजा - शंकितः - शंकायुक्त होऊन - तेजसा दुर्दर्शम् इव (तं) - तेजस्वीपणामुळे अजिंक्य अशा त्या श्रीकृष्णाला - शनकः पर्यपृच्छत् - हळूहळू विचारिता झाला. ॥२७॥ इह विपिने - ह्या अरण्यातील - गिरिगह्वरे - पर्वताच्या गुहेत - संप्राप्तः भवान् कः - प्राप्त झालेले आपण कोण आहा - पद्मपलाशाभ्यां पद्भ्यां - कमलपत्राप्रमाणे कोमल अशा पायांनी - उरुकण्टके (स्थाने) - पुष्कळ काटे असणार्या भूमीवर - विचरसि - तू हिंडत आहेस. ॥२८॥ तेजस्विनां तेजः किंस्वित् - तू तेजस्वी पुरुषांचे तेज आहेस काय - वा भगवान् विभावसुः सूर्यः - किंवा तेजस्वी भगवान सूर्य आहेस - सोमः वा महेन्द्रः - चंद्र किंवा स्वर्गाधिपति इंद्र आहेस - लोकपालः अपि वा परः (असि) - लोकपाल अथवा परमेश्वर आहेस. ॥२९॥ यत् - ज्याअर्थी - यथा प्रदीपः प्रभया तथा - जसा दिवा प्रकाशाने तसा - गुहाध्वान्तं बाधसे - गुहेतील अंधकार दूर करतोस - (तत्) त्वां - त्याअर्थी तुला - त्रयाणां देवदेवानां पुरुषर्षभं मन्ये - ब्रह्मादि तीनहि देवांमध्ये श्रेष्ठ असा पुरुषोत्तम असे मी मानितो. ॥३०॥ नरपुङगव - हे पुरुषश्रेष्ठा - अव्यलीकं शुश्रूषताम् अस्माकं - निष्कपटपणाने सेवा करणार्या आम्हाला - स्वजन्म कर्म गोत्रं वा - स्वतःचे जन्म, कर्म व कुल - यदि रोचते कथ्यतां - जर इच्छा असेल तर सांगावे. ॥३१॥ प्रभो पुरुषव्याघ्र - हे श्रेष्ठ पुरुषा - वयं तु ऐक्ष्वाकाः क्षत्रबन्धवः - आम्ही तर इक्ष्वाकुवंशात उत्पन्न झालेले क्षत्रिय आहोत - यौवनाश्वात्मजः मुचुकुन्दः इति प्रोक्तः - युवनाश्वाचा पुत्र जो मांधाता त्याचा मुलगा मुचुकुंद म्हणून प्रसिद्ध असा आहे. ॥३२॥ चिरप्रजागरश्रान्तः - पुष्कळ दिवसांच्या जागरणाने दमून गेलेला असा - निद्रयापहतेन्द्रियः - झोपेमुळे ज्याची इन्द्रिये शिथिल झाली आहेत असा - अस्मिन् विजने कामं शये - ह्या एकांत प्रदेशात स्वस्थ झोपलो होतो - अधुना केन अपि उत्थापितः - आताच कोणाकडून तरी उठविला गेलो. ॥३३॥ सः अपि - तो सुद्धा - नूनं - खरोखर - आत्मीयेन एव पाप्मना - स्वतःच्याच पापाने - भस्मीकृतः - भस्म केला गेला - अनंतरं - त्यानंतर - अमित्रशातनः श्रीमान् भवान् - शत्रूंचा नाश करणारा सर्वैश्वर्यसंपन्न असा तू - लक्षितः - दिसलास. ॥३४॥ महाभाग - हे भाग्यवंता - ते अविषह्येन तेजसा - तुझ्या असह्य तेजामुळे - भूरि द्रष्टुं न शक्नुमः - तुला पुष्कळ वेळ पहाण्यास आम्ही समर्थ नाही - हतौजसः (त्वं) - ज्याने दुसर्यांचे बळ नष्ट करून सोडिले आहे असा तू - देहिनां माननीयः असि - प्राण्यांनी मान देण्याजोगा आहेस. ॥३५॥ एवं राज्ञा संभाषितः - याप्रमाणे राजा मुचुकुंदाकडून बोलला गेलेला - भूतभावनः भगवान् - प्राण्यांचे रक्षण करणारा श्रीकृष्ण - प्रहसन् - किंचित हसून - मेघनादगभीरया वाण्या प्रत्याह - मेघाप्रमाणे गंभीर असलेल्या वाणीने प्रत्युत्तर देता झाला. ॥३६॥ अङग - हे राजा - मे जन्मकर्माभिधानानि - माझे जन्म, कर्मे व नावे - सहस्त्रशः सन्ति - हजारो आहेत - मया अपि हि - माझ्याकडून सुद्धा खरोखर - अनन्तत्वात् - अगणित असल्यामुळे - (तानि) अनुसंख्यातुं न शक्यन्ते - ती मोजिली जाणे शक्य नाही. ॥३७॥ क्वचित् - एखादे प्रसंगी - उरुजन्मभिः - पुष्कळ जन्मांनी - (कश्चित्) पार्थिवानि रजांसि विममे - कोणी एखादा पृथ्वीचे परमाणु मोजील - गुणकर्माभिधानानि मे जन्मानि - गुण व कर्मे यांनी निरनिराळी नावे असणारे माझे जन्म - कर्हिचित् न - कधीहि मोजता येणार नाहीत. ॥३८॥ नृप - हे राजा - कालत्रयोपपन्नानि - तीनहि काळांनी प्राप्त झालेली - मे जन्मकर्माणि - माझे जन्म व कर्मे - अनुक्रमन्तः - क्रमाने वर्णन करणारे - परमर्षयः - मोठमोठे ऋषि - अन्तं न एव गच्छन्ति - त्यांच्या शेवटास जात नाहीत. ॥३९॥ अङग - हे राजा - तथापि - तरी सुद्धा - अद्यतनानि गदतः मम शृणुष्व - हल्लीची जन्मादि कर्मे सांगणार्या माझ्याकडून ती ऐक - पुरा अहं - पूर्वी मी - धर्मगुप्तये - धर्मरक्षणासाठी - च - आणि - भूमेः भारायमाणानां - आणि पृथ्वीला भारभूत झालेल्या - असुराणां क्षयाय - दैत्यांच्या नाशासाठी - विरिंचेन विज्ञापितः - ब्रह्मदेवाने प्रार्थिला असता - यदुकुले - यदुवंशात - आनकदुन्दुभेः गृहे - वसुदेवाच्या घरी - अवतीर्णः - उत्पन्न झालो - हि - त्यामुळे - वसुदेवसुतं मां - वसुदेवपुत्र अशा मला - वासुदेव इति वदन्ति - वासुदेव असे म्हणतात. ॥४०-४१॥ राजन् - हे मुचुकुंद राजा - कालनेमिः कंसः हतः - कालनेमि दैत्य हाच जो कंस तो मारिला गेला - च सद्द्विषः प्रलंबाद्याः हता - आणि साधूंचा द्वेष करणारे प्रलंबादिकहि मारिले गेले - च अयं यवनः - आणि हा कालयवन - ते तिग्मचक्षुषा दग्धः - तुझ्या तीक्ष्ण नेत्राने भस्म झाला ॥४२॥ सः अहं - तो मी - तव अनुग्रहार्थं - तुझ्यावर कृपा करण्यासाठी - एतां गुहां - ह्या गुहेत - उपागतः - आलो आहे - पूर्वं - पूर्वी - भक्तवत्सलः अहं - भक्तांवर प्रेम करणारा मी - त्वया - तुझ्याकडून - प्रचुरं प्रार्थितः - पुष्कळ प्रार्थिला गेलो होतो ॥४३॥ राजर्षे - हे राजर्षे - वरान् वृणीष्व - वर माग - ते सर्वान् कामान् ददामि - तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन - मां प्रपन्नः कश्चित् जनः - मला शरण आलेला कोणीही मनुष्य - भूयः शोचितुं न अर्हति - पुनः दुःखात पडण्यास योग्य नाही ॥४४॥ इति उक्तः मुदा अन्वितः मुचुकुन्दः - असे बोलला गेलेला व आनंदाने युक्त झालेला मुचुकुंद - गर्गवाक्यम् अनुस्मरन् - गर्गमुनींचे भाषण आठवून - तं नारायणं देवं ज्ञात्वा - त्याला भगवान विष्णु असे जाणून - प्रणम्य आह - नमस्कार करून म्हणाला ॥४५॥ ईश - हे ईश्वरा - त्वदीयया मायया विमोहितः - तुझ्या मायेने मोहित झालेला - अनर्थदृक् अयं जनः - संसारावर दृष्टि ठेवणारे हे लोक - त्वां न भजति - तुझे सेवन करीत नाहीत - वञ्चितः योषित् पुरुषः च - संसारात फसलेले स्त्रीपुरुष - दुःखप्रभवेषु गृहेषु - दुःखोत्पादक अशा घरांच्या ठिकाणी - सुखाय - सुखासाठी - सज्जते - आसक्ती ठेवितात. ॥४६॥ अनघ - हे निष्पाप राजा - जनः अत्र - प्राणी ह्या लोकी - अव्यङ्गम् दुर्लभं मानुषं (जन्म) - सर्वावयवसंपन्न असा दुर्लभ मनुष्य जन्म - कथंचित् - कसाबसा - अयत्नतः लब्ध्वा - सहज मिळवून - असन्मतिः - दुष्टबुद्धि होऊन - यथा गृहान्धकूपे पतितः पशुः (तथा) - पशूप्रमाणे गृहरूपी अंधकारमय खोल विहिरीत पडून - (भगवतः) पादारविन्दं न भजति - भगवंताच्या चरणकमलाला सेवीत नाही. ॥४७॥ अजित - हे श्रीकृष्णा - राज्यश्रिया उन्नद्धमदस्य - राज्यैश्वर्याने वाढलेला आहे मद ज्याचा अशा - मर्त्यात्मबुद्धेः - देहालाच आत्मा समजणार्या - दुरन्तचिन्तया (मायया) - जिचे चिन्तन करणे कठीण आहे अशा मायेने - सुतदारकोशभूषु - पुत्र, स्त्रिया, द्रव्यभांडार व राज्य ह्यांच्या ठिकाणी - आसज्जमानस्य - आसक्त होणार्या - भूपतेः मम - राजा अशा माझा - एषः कालः निष्फलः गतः - हा काळ फुकट गेला. ॥४८॥ घटकुडयसंनिभे अस्मिन् कलेवरे - मातीचे भांडे किंवा मातीची भिंत ह्यासारख्या शरीरामध्ये - नरदेवः इति निरूढमानः - राजा म्हणून निवास करणारा - सुदुर्मदः अहं - मदोन्मत्त असा मी - रथेभाश्वपदात्यनीकपैः वृतः - रथ, हत्ती, घोडेस्वार व पायदळ ह्या चतुरंगसैन्याने वेष्टिलेला - त्वा अगणयन् - तुला न जुमानता - गां पर्यटन् (अस्मि) - पृथ्वीवर भटकत आहे. ॥४९॥ इति कृत्यचिन्तया प्रवृद्धलोभं - अशा कार्यविषयक चिंतनाने ज्याचा लोभ वाढला आहे अशा - विषयेषु लालसं - विषयांच्या ठिकाणी आसक्ति ठेवणार्या - उच्चैः प्रमत्तं - अत्यंत मदोन्मत्त झालेल्या - अप्रमत्तः - सावधपणाने वागणारा - अन्तकः त्वं - कालस्वरूपी तू - क्षुल्लेलिहानः अहिः आखुम् इव - क्षुधित होऊन जिभा चाटणारा सर्प जसा उंदराजवळ तसा - सहसा अभिपद्यते - एकाएकी प्राप्त होतोस. ॥५०॥ (यः) कलेवरः - जो देह - पुरा - पूर्वी - नरदेवसंज्ञितः - राजा हे नाव असलेला - हेमपरिष्कृतैः रथैः - सुवर्णानी भूषविलेल्या रथात बसून - वा मतङगजैः - किंवा हत्तीवर बसून - चरन् (आसीत्) - संचार करीत असे - सः एव - तोच देह - ते दुरत्ययेन कालेन - तुझ्या अविनाशी काळाने - विट्कृमिभस्मसंज्ञितः (भवति) - किडे, विष्ठा व भस्म ह्या नावाला प्राप्त होतो.॥५१॥ ईश - हे श्रीकृष्णा - दिक्चक्रं निर्जित्य - दिग्मंडळ जिंकून - अभूतविग्रहः - विग्रह झालेला असा - वरासनस्थः - उच्चासनावर बसलेला - समराजवन्दितः - बरोबरीच्या राजांनी वंदिलेला - मैथुन्यसुखेषु - स्त्रीसंभोगाचे सुख ज्यात आहे अशा - गृहेषु - घरांच्या ठिकाणी - पुरुषः - प्राणी - योषितां क्रीडामृगः नीयते - स्त्रियांचा खेळण्याचा पशुच असा बनविला जातो.॥५२॥ तपस्सु निष्ठितः - तपश्चर्या करणारा - निवृत्तभोगः - जितेंद्रिय - तदपेक्षया ददत् - भोगेच्छेनेच दानधर्म करणारा - पुनः च अहं स्वराट् भूयेयम् - पुनः आणखी मी इंद्र होईन - इति प्रवृद्धतर्षः - अशी ज्याची इच्छा वाढली आहे असा - कर्माणि करोति - कर्मे करितो - सुखाय न कल्पते - पण सुख मिळण्यास समर्थ होत नाही. ॥५३॥ अच्युत - हे श्रीकृष्णा - यदा - जेव्हा - भ्रमतः जनस्य - भ्रमण करणार्या प्राण्याचा - भवापवर्गः - संसारबंधनापासून मोक्ष - भवेत् - होईल - तर्हि एव - तेव्हाच - सत्समागमः (स्यात्) - साधूंची संगति प्राप्त होईल - यर्हि सत्संगमः (भवति) - जेव्हा साधूंचा समागम होतो - तदा एव - त्याच वेळी - सद्गतौ परावरेशे त्वयि - साधूंना सद्गति देणार्या सर्वश्रेष्ठ अशा तुझ्या ठिकाणी - मतिः जायते - बुद्धि उत्पन्न होते. ॥५४॥ ईश - हे श्रीकृष्णा - यः - जो - वनं विविक्षद्भिः - अरण्यात जाण्याची इच्छा करणार्या - अखण्डभूमिपैः - पुष्कळ काळपर्यंत अविछिन्न राज्य करणार्या - साधुभिः - जनकासारख्या साधूंकडून - एकचर्यया - एकांत भक्तीच्या योगे - प्रार्थ्यते - प्रार्थिला जातो - (सः) राज्यानुबन्धापगमः - असा तो राज्यसंबंधाचा विरह हा - ते यदृच्छया कृतः मम अनुग्रहः (अस्ति) - तू सहजगत्या केलेला माझ्यावरील उपकार होय - (इति) मन्ये - असे मी मानितो. ॥५५॥ विभो हरे - हे समर्थ श्रीकृष्णा - अकिंचनप्रार्थ्यतमाम् - श्रेष्ठ सत्पुरुषांनी अत्यंत प्रार्थना केल्या जाणार्या - तव पादसेवनात् - तुझ्या पादसेवेहून - अहं अन्यं वरं न कामये - मी दुसरा वर इच्छित नाही - हि - कारण - कः आर्यः - कोणता जाणता पुरुष - अपवर्गदं त्वां आराध्य - मोक्ष देणार्या तुझी आराधना करून - आत्मबंधनं वरं वृणीत - आत्म्याला बंधन करणारा वर मागून घेईल. ॥५६॥ ईश - हे श्रीकृष्णा - रजस्तमःसत्त्वगुणानुबन्धनाः - रजोगुण, तमोगुण व सत्त्वगुण ह्यांना अनुसरणारे - आशिषः सर्वतः विसृज्य - भोग सर्वस्वी सोडून - निरञ्जनं निर्गुणं अद्वयं - निष्कलंक, निर्गुण व द्वैतरहित - ज्ञप्तिमात्रं परं पुरुषं त्वां - केवळ ज्ञानस्वरूपी श्रेष्ठ पुरुष अशा तुला - अहं व्रजामि - मी शरण आलो आहे. ॥५७॥ शरणद परात्मन् ईश - हे शरण आलेल्यांना आश्रय देणार्या परमात्म्या श्रीकृष्णा - इह - येथे - वृजिनार्तः - पापाने पीडिलेला - अनुतापैः चिरं तप्यमानः - पश्चात्तापाने नेहमी संतप्त होणारा - अवितृषषडमित्रः - ज्यांची इच्छा नष्ट झाली नाही व जे कामक्रोधादि सहा शत्रु आहेत ज्याला असा - कथंचित् अलब्धशांतिः - ज्याला कोणत्याहि उपायाने शांति मिळाली नाही असा - अभयं अमृतं अशोकं - निर्भय मृत्यूला नष्ट करणार्या व शोकाचा नाश करणार्या - त्वत्पदाब्जं - तुझ्या चरणकमळाला - समुपेतः (अस्मि) - प्राप्त झालो आहे - आपन्नं मा पाहि - शरण आलेल्या अशा माझे रक्षण कर. ॥५८॥ सार्वभौम महाराज - हे सार्वभौम मुचुकुन्दराजा - ते मतिः - तुझी बुद्धि - विमला च ऊर्जिता (अस्ति) - निष्पाप व प्रौढ आहे - यतः - कारण - वरैः प्रलोभितस्य अपि (सा) - वरांनी लोभविलेल्याहि तुझी ती बुद्धि - कामैः न विहता - वासनांनी नाश पावली नाही. ॥५९॥ त्वं यत् वरैः प्रलोभितः - तुला जो मी वरांचा लोभ दाखविला - तत् अप्रमादाय विद्धि - तो तुझ्या हातून असल्या चुका घडू नयेत म्हणून होय असे जाण - मयि एकभक्तानां धीः - माझ्या ठिकाणी एकनिष्ठ भक्ति करणार्यांची बुद्धि - आशीर्भिः क्वचित् न भिद्यते - भोगांच्या इच्छांनी कधीहि मोह पावत नाही. ॥६०॥ राजन् - हे मुचुकुन्दा - प्राणायामादिभिः मनः युञ्जानानां अभक्तानां (तत्) - प्राणायामादि अष्टांग योगांनी मन ताब्यात ठेवणार्या परंतु माझी भक्ति न करणार्या योग्यांचे ते मन - अक्षीणवासनं पुनरुत्थितं दृश्यते - ज्याच्या वासना नष्ट झाल्या नाहीत असे पुनः विषयांकडे उठून धावणारे असे दिसते. ॥६१॥ मयि आवेशितमानसः (त्वं) - माझ्या ठिकाणी ठेविले आहे मन ज्याने असा तू - कामं महीं विचरस्व - यथेच्छ पृथ्वीवर हिंड - तुभ्यं - तुझी - मयि एव - माझेच ठिकाणी - अनपायिनी भक्तिः नित्यदा अस्तु - अविनाशी भक्ति नेहमी असो. ॥६२॥ क्षात्रधर्मस्थितः - क्षत्रियधर्माने वागून - मृगयादिभिः जन्तून् न्यवधीः - मृगयादिकांनी तू प्राण्यांचा वध केलास - तत् - म्हणून - तपसा समाहितः (भूत्वा) - तपश्चर्येने स्वस्थ अंतःकरणाचा होऊन - मदुपाश्रितः अघं जहि - माझा आश्रय करून पापाचा नाश कर. ॥६३॥ राजन् - हे राजा - अनन्तरे जन्मनि - पुढील जन्मी - सर्वभूतसुहृत्तमः - सर्व प्राण्याचा श्रेष्ठ मित्र असा - द्विजवरः भूत्वा - श्रेष्ठ ब्राह्मण होऊन - त्वं केवलं माम् उपेष्यसि वै - तू अद्वितीय व मुख्य अशा माझ्या ठिकाणी खरोखर प्राप्त होशील. ॥६४॥ अध्याय एकावन्नावा समाप्त |