श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४८ वा - अन्वयार्थ

भगवंतांचे कुब्जा अणि अक्रूराच्या घरी जाणे -

अथ सर्वात्मा - नंतर सर्वांच्या ठिकाणी आत्मरूपाने रहाणारा सर्वदर्शनः भगवान् विज्ञाय - सर्वसाक्षी श्रीकृष्ण मनातील अभिप्राय जाणून कामतप्तायाः - कामवासनेने संतप्त झालेल्या सैरन्ध्रयाः प्रियं इच्छन् - दासी कुब्जेचे प्रिय करण्याची इच्छा करणारा महार्होपस्करैः आढयं - मोठमोठया मौल्यवान भोग्य पदार्थांनी समृद्ध अशा कामोपायोपबृंहितं - कामोद्दीपक उपायांनी श्रृंगारिलेल्या मुक्तादामपताकाभिः - मोत्यांच्या माळा, पताका, वितानशयनासनैः सुरभिभिः - छत, शय्या, आसन, सुगंधी पदार्थ, धूपैः दीपैः च - धूप, दीप स्रग्गन्धैः अपि मंडितं - व सुगंधी फुलांच्या माळा यांनी शोभणार्‍या गृहं ययौ - घरी गेला. ॥१-२॥

सा - ती कुब्जा गृहं आयान्तं तं अवेक्ष्य - घरी आलेल्या त्या श्रीकृष्णाला पाहून जातसंभ्रमा - धांदल उडालेली आहे जिची अशी सद्यः आसनात् उत्थाय - तत्काळ आसनावरून उठून सखीभिः यथा उपसंगम्य - सख्यांसह योग्य रीतीने सामोरी जाऊन अच्युतं सदासनादिभिः हि - श्रीकृष्णाला चांगले आसन इत्यादि देऊन त्याचा सभाजयामास - सत्कार करिती झाली. ॥३॥

तथा च - आणि त्याचप्रमाणे तया साधु अभिपूजितः - तिने चांगल्या रीतीने सत्कारलेला उद्धवः आसनं अभिमृश्य - उद्धव आसनाला स्पर्श करून उर्व्यां न्यषीदत् - भूमीवर बसला कृष्णः अपि लोकोचरितानि अनुव्रतः - कृष्णसुद्धा लोकाचाराला अनुसरून महाधनं - महामौल्यवान शयनं तूर्णं विवेश - अशा शयनमंदिरात लवकर गेला.॥४॥

मज्जनालेपदुकूलभूषण - स्नान, उटी, सुंदर वस्त्र, अलंकार, स्रग्गंधतांबूल - पुष्पमाळा, चंदन, तांबूल सुधासवादिभिः - व अमृततुल्य मद्य इत्यादिकांनी प्रसाधितात्मा सा - जिचे अंतःकरण प्रसन्न झाले आहे अशी ती माधवं सव्रीडलीलोत्स्मित - श्रीकृष्णाजवळ लज्जायुक्त कामक्रीडेने मंदहास्यपूर्ण विभ्रमेक्षितैः उपससार - असे विलासयुक्त कटाक्ष फेकीत प्राप्त झाली. ॥५॥

नवसङगमह्लिया - नवीन समागमाची विशङ्‌कितां कान्तां आहूय - भीति वाटत असलेल्या सुस्वरूपी सैरन्ध्रीला हाक मारून कङकणभूषिते करे प्रगृह्य - कंकणांनी शोभणारा तिचा हात धरून शय्यां अधिवेश्य - शय्येवर बसवून अनुलेपार्पणपुण्यलेशया - उटी अर्पण केल्याच्या अल्प पुण्याच्या प्रभावामुळे रामया रेमे - त्या सुंदरीसह रममाण झाला. ॥६॥

सा - ती सैरन्ध्री अनंतचरणेन - श्रीकृष्णाच्या चरणाने अनङ्गतप्तकुचयोः उरसः - कामसंतप्त स्तनांच्या, वक्षस्थलाच्या तथा च अक्ष्णोः रुजः मृजन्ति - तशाच नेत्रांच्या पीडा दूर करीत (श्रीकृष्णचरणं) जिघ्रन्ती - श्रीकृष्णाच्या चरणाचा सुवास घेत स्तनान्तरगतं - आपल्या दोन स्तनांच्या मध्यभागी आलेल्या आनन्दमूर्तिं कान्तं - आनंदाची मूर्ति अशा रमणीय श्रीकृष्णाला दोर्भ्यां परिरभ्य - दोन्ही हातांनी आलिंगन देऊन अतिदीर्घतापं अजहात् - पुष्कळ दिवसांचा ताप नाहीसा करिती झाली. ॥७॥

अहो - अहो दुर्भगा सा - दुर्दैवी ती सैरन्ध्री एवं अङगरागार्पणेन - याप्रमाणे उटी अर्पण करून कैवल्यनाथं दुष्प्राप्यं तं ईश्वरं प्राप्य - मोक्षाधिपति दुर्मिळ अशा परमेश्वराला मिळवून इदं अयाचत - हे मागती झाली. ॥८॥

अम्बुरुहेक्षण प्रेष्ठ - हे कमलनेत्रा प्रियतमा श्रीकृष्णा कतिचित् दिनानि इह उष्यतां - कित्येक दिवस आपण येथे रहावे मया रमस्व - माझ्यासह क्रीडा कर ते सङगं त्यक्तुं न उत्सहे - तुझा समागम मी सोडू शकत नाही. ॥९॥

मानदः सर्वेशः - मान देणारा सर्वेश्वर श्रीकृष्ण तस्यै कामवरं दत्त्वा - त्या सैरन्ध्रीला इष्ट वर देऊन च मानयित्वा - आणि तिला मान देऊन उद्धवेन सह अर्चितं - उद्धवासह पूज्य अशा स्वधाम अगमत् - स्वस्थानाला निघून गेला. ॥१०॥

यः दुराराध्यं - जो आराधण्यास कठीण सर्वेश्वरेश्वरं - व सर्वश्रेष्ठ पुरुषांचा अधिपति विष्णुं आराध्य - अशा श्रीकृष्णाची आराधना करून मनोग्राह्यं वृणीते - मनाला आवडणार्‍या विषयसुखाची याचना करितो असत्त्वात् असौ - तो अत्यंत तुच्छ अशा विषयांची इच्छा केल्यामुळे कुमनीषी - दुर्बुद्धीच होय. ॥११॥

सहरामोद्धवः प्रभुः कृष्णः - बलराम व उद्धव ह्यांसह प्रभू श्रीकृष्ण किंचित् चिकीर्षयन् - काही एक कार्य करण्यासाठी अक्रूरप्रियकाम्यया - अक्रूराचे प्रिय करण्याच्या इच्छेने अक्रूरभवनं प्रागात् - अक्रूराच्या घरी गेला. ॥१२॥

सः तान् नरवरश्रेष्ठान् - तो अक्रूर त्या मनुष्यश्रेष्ठ अशा स्वबान्धवान् - आपल्या बांधवांना आरात् वीक्ष्य प्रमुदितः - दुरूनच पाहून आनंदित झालेला असा प्रत्युत्थाय परिष्वज्य अभिनंद्य च - उठून, आलिंगन देऊन व अभिनंदन करून कृष्णं च रामं ननाम - कृष्ण व बलराम ह्यांना नमस्कार करिता झाला तैः अपि अभिवादितः सः - त्या कृष्णादिकांनीहि नमस्कार केलेला तो अक्रूर कृतासनपरिग्रहान् - आसनांवर बसलेल्या त्या तिघांची विधिवत् पूजयामास - यथाविधि पूजा करिता झाला. ॥१३-१४॥

नृप - हे राजा शिरसा पादवनेजनीः आपः धारयन् - मस्तकाने पादप्रक्षालनाचे उदक धारण करून अर्हणेन दिव्यैः अम्बरैः - अर्ध्यादि पूजासाहित्याने दिव्य वस्त्रांनी गन्धस्रग्भूषणोत्तमैः अर्चित्वा - व चंदन माळा व श्रेष्ठ अलंकार यांनी पूजा करून शिरसा आनम्य - मस्तकाने नमस्कार करून अङकगतौ पादौ मृजन् - श्रीकृष्णाचे पाय मांडीवर घेऊन चुरीत प्रश्रयावनतः अक्रूरः - नम्रतापूर्वक लीन होऊन अक्रूर कृष्णरामौ अभाषत - श्रीकृष्ण व बलराम ह्याजपाशी बोलू लागला. ॥१५-१६॥

भवद्‌भ्‌यां सानुगः कंसः हतः - तुम्ही दोघांनी सेवकांसह कंसाचा वध केला वां इदं कुलं - तुम्ही हे कुळ दुरन्तात् कृच्छ्‌रात् उद्‌धृतं - अपार संकटापासून मुक्त केले दिष्टया समेधितं च - आणि सुदैवाने त्याचा उत्कर्षहि केला. ॥१७॥

युवां प्रधानपुरुषौ - तुम्ही दोघे श्रेष्ठ पुरुष असून जगद्धेतू - जगाच्या उत्पत्यादिकांना कारण आहा जगन्मयौ - आणि सर्व जगाला व्यापून रहाणारे आहा भवद्‍भ्यां विना - तुमच्याशिवाय दुसरे परं किंचित् न अस्ति - जगाला कोणतेहि कारण अपरं च न - अगर कार्य असू शकत नाही. ॥१८॥

ब्रह्मन् - हे श्रीकृष्णा स्वशक्तिभिः आत्मसृष्टं - आपल्या शक्तींनी स्वतः उत्पन्न केलेल्या इदं विश्वं अन्वाविश्य - ह्या सृष्टिमध्ये प्रवेश करून भवान् श्रुतप्रत्यक्षगोचरं - तू ऐकिल्या जाणार्‍या व प्रत्यक्ष दिसणार्‍या वस्तूंनी दिसणारा बहुधा ईयते - असा अनेक प्रकारचा भासतोस. ॥१९॥

यथा हि मह्यादयः योनिषु - ज्याप्रमाणे खरोखर पृथिव्यादि पदार्थ चराचरेषु भूतेषु - आपल्या स्थावरजंगमात्मक कार्यामध्ये नाना भान्ति - अनेकप्रकारचे असे भासतात एवं केवलः - त्याप्रमाणे एक आत्मतन्तरः आत्मा भवान् - स्वतंत्र आत्मरूपाने सर्वत्र रहाणारा तू आत्मयोनिषु - स्वतः निर्मिलेल्या मनुष्यपश्वादि अनेक शरीरांमध्ये बहुधा विभाति - अनेक प्रकारांनी भासतोस. ॥२०॥

रजस्तमःसत्त्वगुणैः - रजोगुण, तमोगुण व सत्त्वगुण स्वशक्तिभिः - अशा ज्या तुझ्या तीन शक्ति विश्वं सृजसि पासि अथो लुम्पसि - त्यांनी जगाची उत्पत्ति, रक्षण आणि संहार करितोस सद्‌गुणकर्मभिः वा न बध्यसे - परंतु त्याच्या गुणांनी किंवा कर्मांनी बद्ध होत नाहीस ज्ञानात्मनः ते - आणि ज्ञानरूपी अशा तुला बन्धहेतुः क्व च - बन्धनाचे कारण कोठून असणार ? ॥२१॥

देहाद्युपधिः आत्मनः - देहादि उपाधि आत्म्याला अनिरूपितत्वात् साक्षात् - वस्तुतः नसल्यामुळे प्रत्यक्ष भवः (च) मिथः न स्यात् - त्याला संसार व भेदभाव नाही अतः तव - म्हणून आत्मरूपी तुला बन्धः न (च) मोक्षः एव न स्यातां - बंध व मोक्ष मुळीच नाहीत त्वयि निकामः - तुझे ठिकाणी ते आहेत असे समजणे म्हणजे नः अविवेकः - हा आमचा अविचार होय. ॥२२॥

त्वया जगतः हिताय - तू जगाच्या कल्याणासाठी उदितः अयं पुराणः वेदपथः - उत्पन्न केलेला हा प्राचीन वेदमार्ग असद्भिः पाखण्डपथैः - दुष्ट अशा पाखंडमार्गी लोकांनी यदा यदा बाध्येत - जेव्हा जेव्हा पीडिला जातो तदा भवान् सत्त्वगुणं बिभर्ति - तू तेव्हा सत्त्वगुण धारण करितोस. ॥२३॥

प्रभो - हे श्रीकृष्णा सः त्वं अद्य इह - तो तू आज येथे सुरेतरांशराज्ञां - दैत्यांच्या अंशापासून जन्मलेल्या राजांचे अक्षौहिणीशतवधेन - शंभर अक्षौहिणी सैन्य मारून भूमेः भारं अपनेतुं - पृथ्वीचा भार दूर करण्याकरिता अमुष्य कुलस्य च यशः वितन्वन् - आणि ह्या यदुकुलाची कीर्ति वाढविणारा वसुदेवगृहेस्वांशेन - वसुदेवाच्या घरी स्वतःच्या अंशाने अवतीर्णः असि - अवतरला आहेस. ॥२४॥

अधोक्षज ईश - हे जितेंद्रिय ईश्वरा अद्य नः वसतयः खलु - आज आमची घरे खरोखर भूरिभागाः (जाताः) - अत्यंत भाग्यवंत झाली आहेत यः सर्वदेवपितृ - जो सर्व देव, पितर, भूतनृदेवमूर्तिः - भूते, मनुष्य व वेद ह्यांची मूर्ति होय यत्पादशौचसलिलं - ज्याच्या पादप्रक्षालनाचे उदक त्रिजगत् पुनाति - त्रैलोक्याला पवित्र करिते सः जगद्‌गुरुः त्वं - तो जगत्पति तू याः प्रविष्टः - ज्या घरामध्ये आलास. ॥२५॥

कः पण्डितः - कोणता ज्ञानी पुरुष भक्तप्रियात् ऋतगिरः - भक्तांवर प्रेम करणार्‍या, खरे बोलणार्‍या, सुहृदः कृतज्ञान त्वत् अपरं - मित्र व परोपकारी अशा तुझ्याहून दुसर्‍याला शरणं समीयात् - शरण जाईल सर्वान् सुहृदः - सर्व भक्तांना अभिकामान् - इष्ट वस्तु यस्य उपचयापचयौ न (तं) - ज्याची क्षय व वृद्धि होत नाही आत्मानम् अपि - असा तो आत्मासुद्धा (भवान्) ददाति - तू अर्पण करतोस. ॥२६॥

जनार्दन - हे श्रीकृष्णा योगेश्वरैः (च) सुरेशैः अपि - योग्यांना व श्रेष्ठ देवांना ज्याची दुरापगतिः भवान् - गति समजत नाही असा तू इह नः प्रतीतः - येथे आम्हाला दिसलास दिष्टया - ही मोठी सुदैवाची गोष्ट होय नः सुतकलत्रधनाप्तगेह - आम्हाला पुत्र, स्त्री, धन, संबंधी, घर, देहादिमोहरशनां - शरीर इत्यादिकांच्या भवदीयमायां - मोहाने बांधणारी अशी तुझी माया आशु छिन्धि - लवकर तोडून टाक. ॥२७॥

भक्तेन इति अर्चितः - भक्त अक्रूराने अशा रीतीने पूजिलेला च संस्तुतः भगवान् - आणि स्तविलेला श्रीकृष्ण अक्रूरं गीर्भिः संमोहयन् इव - अक्रूराला शब्दानी मोह पाडीतच की काय प्राह - म्हणाला. ॥२८॥

त्वं नः गुरुः - तू आमचा गुरु च पितृव्यः - आणि चुलता नित्यदा श्लाघ्यः च बन्धुः - नेहमी स्तुत्य व आप्त आहेस वयं तु - आम्ही तर रक्ष्याः च पोष्याः - तुझ्याकडून रक्षिले व पोषिले जाण्यास योग्य आहो (वयं) हि वः - खरोखर आम्ही तुमच्या अनुकम्प्याः प्रजाः - दयेस पात्र अशा प्रजा आहो. ॥२९॥

श्रेयस्कामैः नृभिः - कल्याणेच्छु पुरुषांनी भवद्विधाः अर्हसत्तमाः - आपल्यासारखे पूजा करण्यास अत्यंत योग्य असे महाभागाः - महाभाग्यशील भगवद्भक्त नित्यं निषेव्याः - सेवा करण्यास योग्य होत देवाः स्वार्थाः (सन्ति) - देव हे स्वार्थसाधू आहेत, साधवः न - साधु तसे नव्हेत. ॥३०॥

अम्मयानि तीर्थानि - जलमय तीर्थे (दर्शनात् एव) (न पुनन्ति) - दर्शनमात्रेकरून पवित्र करीत नाहीत शिलामयाः देवाः - पाषाणाचे देव (दर्शनात् एव) न (पुनन्ति) - दर्शनमात्रेकरून पवित्र करीत नाहीत ते उरुकालेन पुनन्ति - ते पुष्कळ काळाने पवित्र करितात साधवः दर्शनात् एव - साधु दर्शनमात्रेकरूनच पुनन्ति - पवित्र करितात. ॥३१॥

सः भवान् वै - तो तू खरोखर नः सुहृदां श्रेयान् - आमच्या हितकर्त्यामध्ये कल्याणप्रद आहेस श्रेयः चिकीर्षया - कल्याण करण्याच्या इच्छेने पाण्डवानां जिज्ञासार्थं (च) - व पांडवांचा समाचार घेण्यासाठी त्वं गजाह्वयं गच्छ - तू हस्तिनापुरला जा. ॥३२॥

पितरि उपरते - पिता पंडू मृत झाला असता मात्रा सह दुःखिताः - मातेसह दुःखित झालेले राज्ञा स्वपुरं आनीताः - राजा धृतराष्ट्राने आपल्या नगरामध्ये आणिलेले बालाः वसन्ते - धर्मादि लहान असतानाच तेथे रहातात इति शुश्रुम - असे आम्ही ऐकिले आहे. ॥३३॥

दीनधीः अन्धदृक् - क्षुद्र बुद्धीचा व आंधळा व दुष्पुत्रवशगः - दुष्ट पुत्रांच्या स्वाधीन झालेला राजा अंबिकापुत्रः - अंबिकेचा पुत्र धृतराष्ट्र राजा तेषु भ्रातृपुत्रेषु नूनं - त्या भावाच्या मुलांच्या ठिकाणी खरोखर समः न वर्तते - समबुद्धीने वागत नाही. ॥३४॥

गच्छ - जा अधुना तद्‌वृत्तं - आणि सांप्रतच्या त्याच्या साधु वा असाधु जानीहि - चांगल्या वाईट वागणुकीचा शोध कर तत् - ते विज्ञाय - जाणून सुहृदां शं यथा भवेत् - बांधवांचे कल्याण ज्यायोगे होईल (तथा) विधास्यामः - तशी व्यवस्था आपण करू. ॥३५॥

भगवान् हरिः ईश्वरः - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न परमेश्वर श्रीकृष्ण इति अक्रूरं समादिश्य - असे अक्रूराला सांगून संकर्षणोद्धवाभ्यां (सह) - बलराम व उद्धव ह्यांसह ततः स्वभवनं वै ययौ - तेथून आपल्या घरीच गेला. ॥३६॥

अध्याय अठ्ठेचाळिसावा समाप्त

GO TOP