|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४७ वा - अन्वयार्थ
उद्धव व गोपिंचा संवाद आणि भ्रमरगीत - शुचिस्मिताः सर्वाः व्रजस्त्रियः - प्रसन्न व हास्ययुक्त अशा सर्व गोपस्त्रिया प्रलंबबाहुं नवकञ्जलोचनं - आजानुबाहू व प्रफुल्लित कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या पीताम्बरं - पिवळे वस्त्र नेसलेल्या पुष्करमालिनं - व गळ्यात कमळाच्या माळा घातलेल्या लसन्मुखारविन्दं - तेजःपुंज कमळाप्रमाणे शोभणारे ज्याचे मुखकमळ आहे अशा मणिमृष्टकुण्डलं - व रत्नांची उज्ज्वलित आहेत कुंडले ज्यांची अशा तं कृष्णानुचरं वीक्ष्य - त्या श्रीकृष्णाच्या सेवकाला पाहून अच्युतवेषभूषणः - श्रीकृष्णाप्रमाणे वेष भूषणे धारण करणारा अपीच्यदर्शनः अयं कः - व सुंदर आहे रूप ज्याचे असा हा कोण कस्य कुतः - कोणाचा व कोठून आला च उत्सुकाः - असे जाणण्याविषयी उत्कंठित झालेल्या उत्तमश्लोकपदाम्बुजाश्रयं - श्रीकृष्णाच्या चरणकमलाचा आश्रय केलेल्या तं परिवव्रुः स्म - त्या उद्धवाच्या सभोवती एकत्र जमल्या ॥१-२॥ प्रश्रयेण अवनताः (ताः) - नम्रतापूर्वक लीन झालेल्या त्या गोपी सव्रीडहासेक्षणसूनृतादिभिः - लज्जायुक्त हास्य, कटाक्ष, मधुर भाषण इत्यादि उपचारांनी सुसत्कृतं आसने उपविष्टं तं - अत्यंत सत्कारलेल्या व आसनावर बसलेल्या त्या उद्धवाला रमापतेः सन्देशहरं विज्ञाय - श्रीकृष्णाचा निरोप घेऊन आलेला असे जाणून रहसि अपृच्छन् - एकांतात विचारत्या झाल्या ॥३॥ त्वां यदुपतेः पार्षदं - तू श्रीकृष्णाचा सेवक असून समुपागतं जानीमः - येथे आला आहेस हे आम्ही जाणतो (अस्माकं) भर्त्रा - आमचा स्वामी जो श्रीकृष्ण भवान् पित्रोः - त्याने तुला आईबापांचे प्रियचिकीर्षया - प्रिय करण्यासाठी पाठविले आहे ॥४॥ अन्यथा - तसे नसेल तर गोव्रजे तस्य स्मरणीयं - गोकुळात त्याला आठवण होण्यासारखे दुसरे काही न चक्ष्महे - आम्हाला दिसत नाही बन्धूनां स्नेहानुबन्धः - आप्तजनांचा स्नेहसंबंध मुनेः अपि सुदुस्त्यजः - ऋषीलाही टाकण्यास कठीण आहे ॥५॥ अन्येषु मैत्री अर्थकृता - इतरांवर केलेले प्रेम स्वार्थासाठीच असते यद्वत् पुंभिः स्त्रीषु कृता (मैत्री) - ज्याप्रमाणे पुरुषांनी स्त्रियांवर केलेले प्रेम षट्पदैः सुमनः सु इव च - भ्रमरांनी फुलांवर केलेल्या प्रेमासारखेच यावत् अर्थविडम्बनम् - जोपर्यंत स्वार्थ साधावयाचा आहे (तावत् एव) - तोपर्यंतच होय ॥६॥ गणिकाः निः स्वं - वेश्या दरिद्री पुरुषाला प्रजाः अकल्पं नृपतिं - प्रजा अशक्त राजाला अधीतवेदाः आचार्यं - वेदाध्ययन केलेले शिष्य गुरूला ऋत्विजः दत्तदक्षिणं - ऋत्विज ज्याची दक्षिणा देऊन झाली अशा यजमानाला (त्यजति) - सोडून देतो. ॥७॥ खगाः वीतफलं वृक्षं - पक्षी फलरहित झाडाला अतिथयः भुक्त्वा गृहं - अतिथि भोजनोत्तर यजमानाच्या गृहाला मृगाः दग्धं अरण्यं - हरिण जळलेल्या अरण्याला त्यजन्ति - टाकतात तथा जारः रतां स्त्रियं - त्याप्रमाणे जार प्रेम करणार्या स्त्रीचा भुक्त्वा (त्यजति) - उपभोग घेतल्यानंतर तिला टाकितो ॥८॥ कृष्णदूते उद्धवे व्रजं याते - श्रीकृष्णाचा सेवक उद्धव गोकुळात आला असता इति गोविन्दे - याप्रमाणे श्रीकृष्णाच्या ठिकाणी गतवाक्कायमानसाः - वाणी, शरीर व अंतःकरण आसक्त झाले आहे व त्यामुळे त्यक्तलौकिकाः - लोकव्यवहार सोडून दिलेल्या अशा कैशोर बाल्ययोः यानि (कृतानि) - किशोर अवस्थेत व बाल्यावस्थेत जी केलेली होती तानि तस्य प्रियकर्माणि - ती त्यांची आवडीची कृत्ये संस्मृत्य संस्मृत्य गायन्त्यः - आठवून आठवून गाणार्या गतह्रियः च - आणि लज्जारहित झालेल्या गोप्यः रुदत्यः हि - गोपी खरोखर रुदन करु लागल्या ॥९-१०॥ कृष्णसंगमं ध्यायन्ती काचित् - श्रीकृष्णाच्या समागमाचे चिंतन करणारी एक गोपी मधुकरं दृष्ट्वा - भ्रमराला पाहून (तं) प्रियप्रस्थापितं दूतं कल्पयित्वा - तो पतीने पाठविलेला दूत आहे असे मानून इदं अब्रवीत् - असे म्हणाली ॥११॥ कितवबन्धो मधुप - हे कपटी अशा कृष्णाच्या मित्रा भ्रमरा सपत्न्याः कुचविलुलित - माझ्या सवतीच्या स्तनांवर लोळणार्या मालाकुङ्कमश्मश्रुभिः - व केसरांनी युक्त अशा तोंडावरील केसांनी नः अङ्घ्रि मा स्पृश - आमच्या चरणाला स्पर्श करू नकोस मधुपतिः तन्मानिनीनां प्रसादं वहतु - श्रीकृष्ण त्या मानवती स्त्रियांचाच प्रसाद मिळवो यस्य त्वं ईदृक् - ज्याचा तू अशाप्रकारचा दूत आहेस यदुसदसि विडम्ब्यं - जे श्रीकृष्णकृत्य यादवसभेत थट्टेलाच पात्र होत असते. ॥१२॥ भवादृक् (यः) - तुझ्यासारखाच जो कृष्ण सुमनसः इव - पुष्पांप्रमाणे मोहिनीं स्वां अधरसुधां - मोह पाडणारे आपले अधरामृत अस्मान् सकृत् पाययित्वा - आम्हाला एकदा पाजून सद्यः तत्यजे - तत्काळ सोडून देता झाला पद्मा अपि तु - लक्ष्मीसुद्धा तर तत्पादपद्मं कथं हि परिचरति - त्याच्या चरणकमळाला कशी खरोखर सेविते बत (सा) - खरोखर ती उत्तमश्लोकजल्पैः - पुण्यकीर्ति अशा श्रीकृष्णाच्या गोड शब्दांनी ह्रतचेताः (स्यात्) - मोहित झाले आहे चित्त जिचे अशी असावी ॥१३॥ षडङ्घ्रे - हे भ्रमरा त्वं इह - तू तेथे अगृहाणां नः अग्रतः - घरदार नसणार्या आमच्या पुढे पुराणं यदूनां अधिपतिं - पुराणपुरुष अशा यादवाधिपति श्रीकृष्णाचे किं बहु गायसि - काय म्हणून तेच ते गायन करीत आहेस तत्प्रसङ्गः विजयसखसखीनां - त्याचे चरित्र श्रीकृष्णाच्या प्रिय मैत्रिणीच्या अग्रतः गीयतां - समोर गावे क्षपितकुचरुजः - नष्ट केली आहे स्तनांची पीडा ज्यांची अशा (तस्य) ईष्टाः स्त्रियः - त्याच्या प्रिय स्त्रिया ते इष्टं कल्पयन्ति - तुझे इच्छित पुरवितील ॥१४॥ दिवि भुवि च रसायां - स्वर्गात, भूलोकी व पाताळात याः स्त्रियः स्युः - ज्या स्त्रिया असतील ताः काः कपटरुचिरहास - त्यापैकी कोणत्या कपटाने सुंदर हास्य करून भ्रूविसृजृम्भस्य - वाकड्या भिवयांनी कटाक्ष फेकणार्या कृष्णाला तत् दुरापाः - दुर्मिळ झाल्या आहेत यस्य चरणरजः भूतिः उपास्ते - ज्याच्या चरणधूळीचे लक्ष्मी सेवन करीते तत्र वयं काः - तेथे आमची कथा काय अपि च कृपणपक्षे हि - पण खरोखर जो दीनांचा पक्ष स्वीकारतो त्याला उत्तम श्लोकशब्दः - पुण्यश्लोक ही पदवी जुळते ॥१५॥ शिरसि (कृतं) पादं विसृज - मस्तकावरील पाय काढ अहं - मी मुकुन्दात् अभ्येत्य - श्रीक्रुष्णाजवळ येऊन दौत्यैः चाटुकारैः - दूतांच्या गोड गोड भाषणांनी अनुनयविदुषः ते - प्रार्थना करण्याच्या कामी निष्णात अशा तुला वेद्मि - जाणते अकृतचेताः यः - चंचल मनाचा जो स्वकृते इह - ज्यासाठी ह्या लोकी विसृष्टापत्यपत्यन्यलोका - मुले, पति व परलोक ह्यांना सोडणार्या (नः) व्यसृजत् - आम्हाला सोडिता झाला अस्मिन् किं नु संधेयं - ह्यावर कसे बरे प्रेम करावे ॥१६॥ अलुब्धधर्मा यः मृगयुः इव - ज्याविषयी लोभ नाही असा जो पारध्याप्रमाणे कपीन्द्र विव्यधे - वानराधिपति वालीला मारता झाला स्त्रीजितः कामयानां स्त्रियं - स्त्रीलंपट होऊन कामातुर अशा स्त्रिला विरूपां अकृत - विरूप करिता झाला बलिम् अपि - बलिराजालाही ध्वाङ्क्षवत् बलिं अत्वा - कावळ्याप्रमाणे बळी भक्षून अवेष्टयत् - बांधून टाकिता झाला तत् असितसख्यै अलं - म्हणून तशा त्या कृष्णाची मैत्री पुरे झाली तत्कथार्थः - मात्र त्याच्या कथांचा विषय आम्हाला दुस्त्यजः - टाकता येणे कठीण आहे ॥१७॥ यदनुचरितलीला - ज्या कृष्णाच्या चरित्रलीलारूपी कर्णपीयुषविप्रुट्सकृददन - अमृताचे बिंदु कर्णद्वारा एकदा प्राशन केल्यामुळे विधूतद्वन्द्वधर्माः - ज्यांचे रागद्वेषादि धर्म पार नाहीसे झाले आहेत असे विनष्टाः - हताश झालेले बहवः दीनाः विहंगाः - पुष्कळ दीन पक्षी इह सपदि - ह्या गोकुळात तत्काळ दीनं गृहकुटुम्बं उत्सृज्य - दीन अशा घरातील परिवाराला सोडून भिक्षुचर्यां चरन्ति - भिक्षा मागत फिरतात ॥१८॥ हरिण्यः कुलिकरुतम् इव - हरिणी जशा व्याधाचे गाणे ऐकून त्याप्रमाणे वयम् - आम्ही अज्ञाः कृष्णवध्वः - अडाणी अशा कृष्णाच्या दासी जिह्मव्याह्रतम् ऋतम् - लबाड कृष्णाच्या भाषणावर खर्याप्रमाणे श्रद्दधानाः - श्रद्धा ठेवणार्या तन्नखस्पर्श - त्या कृष्णाच्या नखाच्या स्पर्शामुळे तीव्रस्मररुजः - उत्पन्न झालेला जो तीव्र कामविकार त्याचे दुःख एतत् असकृत् ददृशुः - सांप्रत एकसारखे पहात आहो उपमंत्रिन् - हे दूता अन्यवार्ता भण्यताम् - दुसरे काही वर्तमान सांगावे ॥१९॥ प्रियसख - हे प्रियकराच्या मित्रा प्रेयसा प्रेषितः - प्रिय श्रीकृष्णाने पाठविलेला तू पुनः आगाः किं - पुनः आलास काय अङ्ग - हे भ्रमरा मे माननीयः असि - तू मला पूज्य वाटतोस किं अनुरुन्धे - तुला काय मागावयाचे आहे वरय - माग सौम्य - हे शांतचित्ता भ्रमरा इह अस्मान् - तू आम्हाला दुस्त्यजद्वन्द्वपार्श्वं - ज्यांचा संबंध तोडण्यास कठीण आहे अशा श्रीकृष्णाजवळ कथं नयसि - कशाला नेतोस (यस्य) उरसि - ज्या श्रीकृष्णाच्या वक्षस्थलावार वधूः श्री - त्याची स्त्री लक्ष्मी साकं सततं आस्ते - नित्य चिकटून राहिली आहे ॥२०॥ बत सौम्य - बरे तर हे भ्रमरा आर्यपुत्रः मधुपुर्यां - श्रीकृष्ण मधुपुरीत अधुना आस्ते अपि - हल्ली आहे काय ? सः पितृगेहान् बन्धून् - तो पित्याच्या घराची, बांधवांची गोपान् च स्मरति - व गोपांची आठवण करतो काय ? सः क्वचित् किंकरीणां नः - तो आम्हा दासींच्याविषयी कथाः गृणीते अपि - काही गोष्टी करितो काय (सः) अगुरुसुगंधं - तो धूपादि सुगंधी पदार्थांप्रमाणे भुजं मूर्ध्नि - सुवासिक असा आपला हात आमच्या मस्तकांवर कदा नु अधास्यत् - केव्हा बरे ठेवील ? ॥२१॥ अथ उद्धवः - नंतर उद्धव एवं निशम्य - याप्रमाणे ऐकून कृष्णदर्शनलालसाः गोपीः - कृष्णाला पहाण्याविषयी उत्कंठित झालेल्या गोपींना प्रियसंदेशैः सांत्वयन् - श्रीकृष्णाचे निरोप सांगून शांत करीत इदं अभाषत - हे म्हणाला. ॥२२॥ अहो यूयं पूर्णार्थाः स्म - गोपींनो, तुम्ही कृतार्थ आहा यासां मनः - ज्याचे मन भगवति वासुदेवे - भगवान वासुदेवाच्या ठिकाणी इति अर्पितं - अशा रीतीने लागून राहिले आहे भवत्यः लोकपूजिताः - तुम्ही लोकमान्य झालेल्या आहा. ॥२३॥ हि - कारण विविधैः दानव्रततपो - अनेक प्रकारचे दान, व्रत, तप, होमजपस्वाध्यायसंयमैः - होम, जप, वेदाध्ययन व इंद्रियनिग्रह यांनी च अन्यैः श्रेयोभिः - आणि पुण्यकारक दुसर्या कृत्यांनी कृष्णे भक्तिः साध्यते - कृष्णाच्या ठिकाणी भक्ति उत्पन्न होते. ॥२४॥ भवतीभिः - तुम्ही उत्तमश्लोके भगवति - श्रेष्ठ कीर्ति अशा भगवंताचे ठिकाणी मुनीनाम् अपिदुर्लभा - ऋषींनासुद्धा दुर्लभ अशी अनुत्तमा भक्तिः प्रवार्तिता - श्रेष्ठ भक्ति स्थापित केली (एतत्) दिष्टया - ही मोठया सुदैवाची गोष्ट होय. ॥२५॥ यूयं - तुम्ही पुत्रान् पतीन् देहान् - पुत्र, पति, देह, स्वजनान् भवनानि च हित्वा - आप्त आणि घरदार ह्यांना टाकून कृष्णाख्यं - श्रीकृष्ण नावाच्या परं पुरुषं यत् अवृणीत - श्रेष्ठ पुरुषाला ज्याअर्थी वरित्या झाल्यात तत् दिष्टया - त्याअर्थी तुम्ही दैववान आहात. ॥२६॥ महाभागाः - अहो भाग्यवंत गोपींनो भवतीनां - तुमचा भगवति अधोक्षजे - भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी विरहेण सर्वात्मभावः अधिकृतः - विरहामुळे अखंड भाव जडला आहे (तेन) मे महान् अनुग्रहः कृतः - त्यामुळे माझ्यावर मोठा अनुग्रहच झाला आहे.॥२७॥ भद्राः - गोपींनो भवतीनां सुखावहः प्रियसन्देशः श्रूयतां - तुम्हाला सुख देणारा प्रियकराचा निरोप ऐका भर्तुः रहस्करः अहं - तुमच्या प्रिय स्वामीचा एकांतभक्त मी यं आदाय आगतः - जो निरोप घेऊन आलो आहे. ॥२८॥ भवतीनां मे वियोगः - तुमचा माझ्याशी वियोग सर्वात्मना क्वचित् नहि - मी सर्वत्र आत्मरूपाने रहात असल्यामुळे कधीच होत नाही यथा भूतेषु खं वाय्वग्निः जलं मही - ज्याप्रमाणे भूतांमध्ये आकाश, वायु, अग्नि, उदक व पृथ्वी (एतानि) भूतानि - ही भूते तथा च अहं - तसाच मी मनः प्राणभूतेन्द्रियः - मन, प्राण, भूते, इंद्रिये, गुणाश्रयः - व सत्त्वादि गुण ह्यांना व्यापून राहिलो आहे. ॥२९॥ आत्ममायानुभावेन - स्वतःच्या मायेच्या सामर्थ्याने भूतेन्द्रियगुणात्मना आत्मना - भूते, इंद्रिये व सत्त्वादि गुण ह्यांचा अंगीकार करून स्वतः आत्मनि एव आत्मानं सृजे - मी स्वतःच्या ठिकाणी स्वतःला उत्पन्न करितो अनुपालये हन्मि च - रक्षण करितो व संहार करितो. ॥३०॥ ज्ञानमयः शुद्धः व्यतिरिक्तः - ज्ञानमूर्ति, शुद्ध, निर्विकार अगुणान्वयः आत्मा - व निर्गुण असा आत्मा मायावृत्तिभिः - मायेच्या सत्त्वादि गुणांच्या कार्यांनी सुषुप्तिस्वप्नजाग्रद्भिः - व निद्रा, स्वप्न, जागृति या तीन अवस्थांनी ईयते - प्रत्ययास येतो. ॥३१॥ उत्थितः (पुमान्) - निजून उठलेला पुरुष येन मृषा स्वप्नवत् - ज्याअर्थी खोटया स्वप्नाप्रमाणे इन्द्रियार्थान् ध्यायेत - इंद्रियाच्या विषयाचे ध्यान करितो इन्द्रियाणि (च) प्रत्यपद्यत - इंद्रियांकडे धाव घेतो तत् विनिद्रः - त्याअर्थी आळस सोडून (तानि) निरुन्ध्यात् - त्या इंद्रियांचा निग्रह करावा. ॥३२॥ मनीषिणां - मनोनिग्रह करणार्यांचे समाम्नायः योगः साङ्ख्यं त्यागः - वेद, योग, सांख्य, संन्यास, तपः दमः - तप, इंद्रियनिग्रह सत्यं (इति विविधाः मार्गाः) - व सत्य इत्यादिक विविध मार्ग समुद्रान्ताः आपगाः इव - समुद्राला जाऊन मिळणार्या नद्यांप्रमाणे एतदन्तः - यालाच जाऊन मिळणारे आहेत. ॥३३॥ भवतीनां वै प्रियं अहं - तुम्हाला प्रिय असा मी दृशां दूरे वर्ते - तुमच्या दृष्टीपासून दूर राहतो यत् तत् तु - असे जे आहे ते तर मदनुध्यानकाम्यया - माझे चिंतन करण्याच्या इच्छेने मनसः सन्निकर्षार्थं - मनाला जवळ ओढून घेण्याकरिताच आहे. ॥३४॥ स्त्रीणां मनः - स्त्रियांचे अंतःकरण दूरचरे प्रेष्ठे आविश्य - दूर गेलेल्या प्रियतमाच्या ठिकाणी यथा वर्तते - जसे आसक्त होते तथा - तसे अक्षगोचरे सन्निकृष्टे - जवळ डोळ्यांसमोर राहणार्या प्रियतमाच्या ठिकाणी चेतः नः - अंतःकरण तितके आसक्त होत नाही. ॥३५॥ विमुक्ताशेषवृत्ति यत् - सर्वस्वी सोडल्या आहेत निरनिराळ्या वृत्ति ज्याने असे जे मन तत् कृत्स्नं मनः - ते संपूर्ण मन मयि आवेश्य - माझ्या ठिकाणी ठेवून नित्यं मा अनुस्मरन्त्यः - नेहमी माझे चिंतन करणार्या तुम्ही अचिरात् मां उपैष्यथ - लवकरच माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हाल. ॥३६॥ कल्याण्यः - अहो भाग्यवंत गोपींनो या रात्र्यां - ज्या गोपी रात्री अस्मिन् वने क्रीडता मया - ह्या वनात क्रीडा करणार्या माझ्यासह अलब्धरासाः व्रजे आस्थिताः - रासक्रीडेचा लाभ न होता गोकुळातच राहिल्या (ताः) मद्वीर्यचिन्तया - त्या गोपी माझ्या पराक्रमाच्या चिंतनामुळे मा आपुः - मला प्राप्त झाल्या. ॥३७॥ ताः व्रजयोषितः - त्या गोपी एवं प्रियतमादिष्टं आकर्ण्य - याप्रमाणे अत्यंत प्रिय अशा श्रीकृष्णाचा निरोप ऐकून तत्संदेशागतस्मृतीः - त्याच्या निरोपाच्या श्रवणाने ज्यांना आठवण झाली आहे प्रीताः - व त्यामुळे आनंदित झालेल्या अशा उद्धवं ऊचुः - उद्धवाला म्हणाल्या. ॥३८॥ यदूनां अहितः अघकृत् - यादवांचा शत्रू पापी कंस सानुगः कंसः दिष्टया हतः - सेवकांसह मारिला गेला हे सुदैवच होय (च) दिष्टया अच्युतः - आणि दैवानेच श्रीकृष्ण लब्धसर्वार्थैः आप्तैः - पूर्ण मनोरथ अशा बांधवांसह कुशली आस्ते - खुशाल आहे. ॥३९॥ सौम्य - हे उद्धवा स्निग्धसव्रीडहासोदारेक्षणार्चितः - प्रेमळ, लज्जायुक्त मंद हास्यामुळे गंभीर झालेले कटाक्षपात यांनी पूजिलेला गदाग्रजः - श्रीकृष्ण नः प्रीतिम् - आम्हावर करण्याजोगी प्रीति पुरयोषितां करोति कच्चित् - नगरातील स्त्रियांवर करतो काय ? ॥४०॥ रतिविशेषज्ञः - कामशास्त्र जाणणारा वरयोषितां प्रियः च (सः) - व सुंदर स्त्रियांना आवडणारा श्रीकृष्ण तद्वाक्यैः विभ्रमैः च अनुभाजितः - त्याच्या भाषणांनी व विलासांनी सत्कारिलेला कथं न अनुबध्येत - कसा त्यांच्या प्रेमाने बांधला जाणार नाही. ॥४१॥ साधो - हे सच्छील उद्धवा गोविन्दः - श्रीकृष्ण पुरस्त्रिणां गोष्ठीमध्ये - नगरस्त्रियांच्या समाजामध्ये स्वैरकथान्तरे प्रस्तुते - स्वच्छंदाने चालणार्या गोष्टी सांगत असता ग्राम्याः नः - गावंढळ अशा आम्हाला क्वचित् स्मरति अपि - एखादे वेळी तरी स्मरतो काय ॥४२॥ कुमुदकुन्दशशाङकरम्ये - कुमुद, कुंद, इत्यादि फुलांनी व चंद्रप्रकाशांनी शोभणार्या वृन्दावने - वृंदावनातील क्वणच्चरणनूपुररासगोष्ठयां - शब्द करणार्या पायांतील पैंजणांनी शोभणार्या रासक्रीडेमध्ये अस्माभिः प्रियाभिः - त्याला प्रिय असणार्या आम्हाकडून ईडितमनोज्ञकथः - वर्णिलेल्या आहेत सुंदर कथा ज्याच्या असा सः - तो श्रीकृष्ण तदा यासु रेमे - त्यावेळी ज्यामध्ये क्रीडा करिता झाला ताः निशाः - त्या रात्री कदाचित् स्मरति किम् - एखादे वेळी तरी आठवतो काय ॥४३॥ दाशार्हः - श्रीकृष्ण स्वकृतया - स्वतः उत्पन्न केलेल्या शुचा तप्ताः नः - विरहजन्य शोकाने संतप्त झालेल्या आम्हाला गात्रैः - अवयवांनी यथा इंद्रः अम्बुदैः वनं - जसा इंद्र मेघांनी अरण्याला तथा संजीवयन् - तशी टवटवी आणीत इह एष्याति अपि नु - येथे येईल काय हताहितः - ज्याने शत्रू मारिले आहेत असा प्राप्तराज्यः - राज्य मिळालेला सर्वसुहृद्वृतः - सर्व मित्रांनी वेष्टिलेला नरेन्द्रकन्याः उद्वाह्य प्रीतः - राजकन्यांशी विवाह लावून आनंदित झालेला कृष्णः - श्रीकृष्ण इह कस्मात् आयाति - येथे कशाला येईल ? ॥४४-४५॥ महात्मनः श्रीपतेः - गंभीर मनाचा, लक्ष्मीचा स्वामी आप्तकामस्य कृतात्मनः - व पूर्णकाम आणि कृतकृत्य अशा त्या श्रीकृष्णाचे वनौकोभिः अस्माभिः - वनात राहणार्या आमच्याशी वा अन्याभिः - किंवा दुसर्यांशी किं अर्थः क्रियेताः - काय कार्य करावयाचे आहे ? ॥४६॥ स्वैरिणी पिङगला अपि - यथेष्ट आचरण करणारी वेश्या पिंगला सुद्धा नैराश्यं हि परं सौख्यं - आशारहित होणे हेच श्रेष्ठ सुख होय (इति) आह - असे म्हणाली तथा अपि - तरीसुद्धा तत् जानतीनां नः - ते जाणणार्या आमची कृष्णे - कृष्णाविषयीची आशा दुरत्यया - आशा नाहीशी होणे कठीण आहे. ॥४७॥ उत्तमश्लोकसंविदं - पुण्यकीर्ति श्रीकृष्णाच्या कथा संत्यक्तुं कः उत्सहेत - टाकण्यास कोण बरे उत्सुक होईल अनिच्छतः अपि - इच्छा न करणार्याहि यस्य अंगात् - ज्या श्रीकृष्णाच्या शरीरापासून श्रीः क्वचित् न च्यवते - लक्ष्मी कधीहि दूर होत नाही. ॥४८॥ प्रभो - हे उद्धवा सङकर्षणसहायेन कृष्णेन - बलराम ज्यास सहाय्य करणारा आहे अशा श्रीकृष्णाने आचरिताः इमे - उपभोगिलेले हे सरिच्छैलवनोद्देशाः - नद्या, पर्वत व वनप्रदेश गावः वेणुरवाः च - गाई आणि मुरलीचे शब्द नंदगोपसुतं - श्रीकृष्णाचे पुनः पुनः स्मारयन्ति - वारंवार खरोखर स्मरण करवितात श्रीनिकेतैः - लक्ष्मीचे निवासस्थान तत्पदकैः - अशा त्याच्या ठिकाणी उमटलेल्या पावलांमुळे (तं) विस्मर्तुं - त्याला विसरून जाणे न एव शक्रुमः - आम्हाला शक्यच नाही.॥४९-५०॥ ललितया गत्या - सुंदर चालीने उदारहासलीलावलोकनैः - उत्कृष्ट हास्ययुक्त लीलाकटाक्षांनी माध्व्या गिरा - मधुर भाषणाने च हृतधियः - ज्यांची बुद्धी हरण करून गेली आहे अशा आम्ही तं कथं विस्मरामहे - त्याला कशा विसरून जाऊ ? ॥५१॥ हे नाथ - हे नाथा हे रमानाथ - हे लक्ष्मीपते व्रजनाथ - हे गोकुलपालका आर्तिनाशक - हे दुःखहारका गोविंद - हे श्रीकृष्णा मग्नं गोकुलं - बुडून गेलेल्या ह्या गोकुळाला वृजिनार्णवात् उद्धर - दुःखसागरापासून बाहेर काढ. ॥५२॥ ततः श्रीकृष्णसंदेशैः - नंतर श्रीकृष्णाच्या निरोपांनी व्यपेतविरहज्वराः ताः - ज्यांचा वियोगजन्य ताप दूर झाला आहे अशा त्या गोपी अधोक्षजं आत्मानं ज्ञात्वा - श्रीकृष्ण आपल्या अंतर्यामी आहे असे ओळखून उद्धवं - उद्धवाला पूजयाञ्चक्रुः - पूजित्या झाल्या. ॥५३॥ गोपीनां शुचः विनुदन् - गोपींचा शोक दूर करीत (उद्धवः) कतिचित् मासान् उवास - उद्धव कित्येक महिने राहता झाला कृष्णलीलाकथा गायन् - श्रीकृष्णाच्या लीलांच्या कथा गात गोकुलं रमयामास - गोकुळाला रमविता झाला. ॥५४॥ सः उद्धवः - तो उद्धव यावन्ति अहानि - जितके दिवस नन्दस्य व्रजे अवात्सीत् - नन्दाच्या गोकुळात राहिला तावन्ति अहानि - तितके दिवस कृष्णस्य वार्तया - श्रीकृष्णांच्या कथांनी व्रजौकसाम् क्षणप्रायाणि आसन् - गोकुळातील लोकांना क्षणासारखे झाले. ॥५५॥ हरिदासः - भगवद्भक्त उद्धव सरिद्वनगिरिद्रोणीः - नद्या, अरण्ये, पर्वत, व गुहा ह्यांना कुसुमितान् द्रुमान् (च) - आणि फुललेल्या वृक्षांना वीक्षन् - पहात व्रजौकसां कृष्णं - गोकुळवासी लोकांना श्रीकृष्णाची संस्मरयन् रेमे - आठवण देत आनंदविता झाला. ॥५६॥ उद्धवः - उद्धव गोपीनां एवमादि - गोपींची अशाप्रकारची कृष्णावेशात्मविक्लवं - श्रीकृष्णाविषयीच्या तन्मयतेमुळे झालेली मनाची विव्हळ दृष्ट्वा - अवस्था पाहून परमप्रीतः - अत्यंत संतुष्ट झालेला असा ताः नमस्यन् - त्या गोपींना नमस्कार करून इदं जगौ - असे म्हणाला. ॥५७॥ एताः गोपवध्वः - ह्या गोपी निखिलात्मनि गोविन्दे एव - सर्वत्र आत्मरूपाने रहाणार्या श्रीकृष्णाच्या ठिकाणीसुद्धा रूढभावाः - भक्ति उत्पन्न झाली आहे ज्यांना अशा आहेत यत् - जे कृष्णरूप भुवि परं तनुभृतः - पृथ्वीवर श्रेष्ठ शरीर धारण करणारे भवभियः मुनयः - व संसाराची भीति बाळगणारे मुनि वयं च - आणि आम्ही वाच्छन्ति - जे इच्छितो अनन्तकथारसस्य - भगवंताच्या चरित्राची गोडी लागलेल्या त्यांना ब्रह्मजन्मभिः किम् - ब्राह्मण जन्माचीच काय जरूरी आहे ? ॥५८॥ वनचरीः - अरण्यात फिरणार्या व्यभिचारदुष्टाः इमाः स्त्रियः क्व - व व्यभिचाराचा दोष घडलेल्या ह्या स्त्रिया कोठे च परमात्मनि श्रीकृष्णे - आणि परमेश्वर श्रीकृष्णाच्या ठिकाणी एषः रूढभावः क्व - उत्पन्न झालेली ही भक्ति कोठे ननु साक्षात् ईश्वरः - खरोखर प्रत्यक्ष श्रीकृष्ण अनुभजतः अविदुषः अपि - सेवा करणार्या अज्ञ जनांचेहि उपयुक्तः अगदराजः इव - उपयोगात आणिलेल्या उत्तम औषधाप्रमाणे श्रेयः तनोति - कल्याण करितो. ॥५९॥ अङग - अहो रासोत्सवे - रासक्रीडेच्यावेळी अस्य - ह्या श्रीकृष्णाच्या भुजदण्डगृहीतकण्ठलब्धाशिषां - बाहूंनी आलिंगन मिळालेल्या, ज्यांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत अशा व्रजबल्लवीनां यः प्रसादः - गोकुळांतील गोपींना जो प्रसाद उदगात् - मिळाला अयं - हा प्रसाद नितान्तरतेः श्रियः उ न - आसक्त असणार्या लक्ष्मीलाहि खरोखर मिळाला नाही च नलिनगन्धरुचां - आणि ज्यांच्या शरीराला कमळासारखा सुवास येत आहे स्वयोषितां - अशा देवस्त्रियांनाहि मिळाला नाही अन्याः कुतः - तर मग दुसर्यांना कसा मिळणार ? ॥६०॥ अहो - अहो वृंदावने - वृंदावनात आसां - ह्या चरणरेणुजुषां - भगवच्चरणाच्या धुळीला सेवन करणार्या गुल्मलतौषधीनाम् - झुडपे, वेली व वृक्ष ह्यांपैकी किमपि अहं स्याम् - कोणीतरी एक मी होईन काय याः - ज्या गोपी दुस्त्यजं - टाकण्यास कठीण अशा स्वजनं च आर्यपथं हित्वा - आप्तेष्टांना व सद्धर्माला टाकून श्रुतिभिः विमृग्यां - वेदांनी शोधिल्या जाणार्या मुकुन्दपदवीं भेजुः - श्रीकृष्णाच्या चरणाला सेवित्या झाल्या. ॥६१॥ यत् - जे चरणकमल श्रिया अजादिभिः - लक्ष्मीने, ब्रह्मादि देवांनी आप्तकामैः योगेश्वरैः अपि - तसेच पूर्णकाम अशा मोठमोठया योग्यांनीसुद्धा आत्मनि अर्चितं - अंतःकरणात पूजिलेले तत् - ते रासगोष्ठयां स्तनेषु न्यस्तं - रासक्रीडाप्रसंगी स्तनांवर ठेविलेले असे भगवतः कृष्णस्य चरणारविन्दं - भगवान श्रीकृष्णाचे चरणकमल परिरभ्य - आलिंगून याः - ज्या गोपी तापं विजहुः - दुःखमुक्त झाल्या. ॥६२॥ नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुं - नंदाच्या गोकुळातील गोपींच्या पायधुळीला अभीक्ष्णशः वन्दे - मी वारंवार नमन करितो यासां हरिकथोद्गीतं - ज्या गोपींचे भगवद्गुणविषयक गायन भुवनत्रयं पुनाति - त्रैलोक्याला पवित्र करते. ॥६३॥ अथ दाशार्हः - नंतर उद्धव गोपीः यशोदां नन्दं एव च अनुज्ञाप्य - गोपी, यशोदा, आणि नंद ह्यांची आज्ञा घेऊन गोपान् च आमन्त्र्य - आणि गोपांना विचारून यास्यन् रथं आरुरुहे - निघाला असता रथात चढला. ॥६४॥ नानोपायनपाणयः - अनेकप्रकारच्या भेटी ज्यांच्या हातात आहेत असे नन्दादयः - नंदादि गोप निर्गतं तम् आसाद्य - परत जाण्यास निघालेल्या त्या उद्धवाजवळ येऊन अनुरागेण अश्रुलोचनाः - प्रेमाने ज्यांच्या डोळ्यांतून अश्रू गळत आहेत प्रावोचन् - असे बोलू लागले. ॥६५॥ नः मनसः वृत्तयः - आमच्या मनोवृत्ति कृष्णपादाम्बुजाश्रयाः स्युः - श्रीकृष्णाच्या चरणकमळाचा आश्रय करणार्या होवोत वाचः - वाणी नाम्नां अभिधायिनीः (स्युः) - श्रीकृष्णाच्या नावाचा जप करणार्या होवोत कायः - शरीराने तत्प्रह्वणादिषु (स्यात्) - श्रीकृष्णाला वंदन करणे इत्यादि कार्यात आसक्त होवो. ॥६६॥ ईश्वरेच्छया - ईश्वराच्या इच्छेने कर्मभिः - अनेकप्रकारच्या कर्मांना यत्र क्व अपि - जेथे कोठेहि भ्राम्यमाणानां नः - फिरणार्या आमची मङगलाचरितैः दानैः - मंगलकारक कर्मांनी व दानांनी ईश्वरे कृष्णे - समर्थ अशा कृष्णाच्या ठिकाणी रतिः (स्यात्) - प्रीति उत्पन्न होवो. ॥६७॥ नराधिप - हे परिक्षित राजा गोपैः कृष्णभक्त्या - गोपांनी श्रीकृष्णाविषयीच्या भक्तिमुळे एवं सभाजितः - याप्रमाणे सत्कारिलेला उद्धवः - उद्धव कृष्णपालितां - श्रीकृष्णाने रक्षिलेल्या मथुरां पुनः आगच्छत् - मथुरेला परत आला. ॥६८॥ प्रणिपत्य - नमस्कार करून (सः) कृष्णाय व्रजौकसां - तो कृष्णाला गोकुळातील लोकांच्या भक्त्युद्रेकं आह - भक्तीचा थोरपणा सांगता झाला वसुदेवाय रामाय च - वसुदेवाला, बलरामाला राज्ञे - आणि उग्रसेन राजाला उपायनानि च अदात् - भेटी अर्पण करिता झाला. ॥६९॥ अध्याय सत्तेचाळिसावा समाप्त |