|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४३ वा - अन्वयार्थ
कुवलयापीडाचा उद्धार आणि आखाड्यात प्रवेश - परंतप - हे परीक्षित राजा - अथ - नंतर - कृष्णः च रामः च - श्रीकृष्ण व बलराम - कृतशौचौ - केला आहे शुद्ध होण्याचा विधि ज्यांनी असे - मल्लदुन्दुभिनिर्घोषं श्रुत्वा - मल्लांचा व नगार्यांचा गंभीर शब्द ऐकून - (रङगं) द्रष्टुं उपेयतुः - रंगभूमी पाहण्यासाठी आले. ॥१॥ कृष्णः - श्रीकृष्ण - रङगद्वारं समासाद्य - रङगभूमीच्या द्वाराजवळ आल्यावर - तस्मिन् अवस्थितं - तेथे असलेल्या - अम्बष्ठप्रचोदितं - माहुताने प्रेरणा केलेल्या - कुवलयापीडं नागं - कुवल्यापीड नावाच्या हत्तीला - अपश्यत् - पाहता झाला. ॥२॥ शौरिः - श्रीकृष्ण - परिकरं बद्धा - कंबरेभोवतीचे वस्त्र घट्ट बांधून - कुटिलालकान् समुह्य - कुरळे केश सावरून - मेघनादगभीरया - मेघासारख्या गंभीर अशा - वाचा - वाणीने - हस्तिपं उवाच - माहुताला म्हणाला. ॥३॥ अम्बष्ठ अम्बष्ठ - हे माहुता, हे माहुता - नौ मार्गं देहि - आम्हाला रस्ता दे - मा चिरम् - उशीर लावू नको - अपक्रम - बाजूला हो - नो चेत् - नाही तर - अद्य - आज - सकुञ्जरं त्वा - हत्तीसह तुला - यमसादनं नयामि - मी यमलोकाला नेईन. ॥४॥ एवं निर्भत्सितः कुपितः अम्बष्ठः - याप्रमाणे धिक्कारल्यामुळे रागावलेला माहुत - कालान्तकयमोपमं - सर्वांचा नाश करणार्या काळस्वरूपी यमासारख्या - कोपितं गजं - भयंकर रागावलेल्या हत्तीला - कृष्णाय चोदयामास - श्रीकृष्णाच्या अंगावर सोडिता झाला. ॥५॥ करीन्द्रः - तो श्रेष्ठ हत्ती - तरसा तम् अभिद्रुत्य - वेगाने त्या श्रीकृष्णावर धावत येऊन - करेण अग्रहीत् - सोंडेने धरिता झाला - करात् विगलितः सः - सोंडेतून निसटून गेलेला तो कृष्ण - अमुं निहत्य - त्या हत्तीला ताडण करून - अङ्घ्रिषु अलीयत् - त्याच्या पायांत लपून बसला. ॥६॥ तं अचक्षाणः - त्या श्रीकृष्णाला न पाहणारा - घ्राणदृष्टिः - नाक हेच आहे पाहण्याचे साधन ज्याचे अशा - संक्रुद्धः सः - रागावलेला तो हत्ती - पुष्करेण केशवं परामृशत् - सोंडेने श्रीकृष्णाला स्पर्श करता झाला - (तदा) सः प्रसह्य विनिर्गतः - त्यावेळी श्रीकृष्ण मोठया वेगाने निसटून गेला. ॥७॥ (सः) अतिबलं - तो श्रीकृष्ण अत्यंत बलाढय अशा - (तं) पुच्छे प्रगृह्य - त्या हत्तीची शेपटी घट्ट धरून - यथा सुपर्णः नागं लीलया इव - जसा गरुड सर्पाला खेळत नेतो त्याप्रमाणे - धनुषः पञ्चविंशतिं विचकर्ष - शंभर हात ओढिता झाला. ॥८॥ अच्युतः सः - तो श्रीकृष्ण - सव्यदक्षिणतः पर्यावर्तमानेन (तेन सह) - डाव्या व उजव्या बाजूंनी वळणार्या त्या हत्तीसह - बालकः भ्राम्यमाणेन गोवत्सेन इव - जसे लहान मूल फिरविल्या जाणार्या वासराबरोबर फिरते त्याप्रमाणे - बभ्राम - फिरू लागला. ॥९॥ ततः वारणम् अभिमुखम् अभ्येत्य - नंतर हत्तीसमोर येऊन - पाणिना आहत्य - हाताने ताडण करून - पदे पदे (तेन) स्पृश्यमानः - प्रतिपावलामागे त्या हत्तीकडून स्पर्शिला जाणारा कृष्ण - प्राद्रवन् - पळत पळत - (तं) पातयामास - हत्तीकडून पाडिता झाला. ॥१०॥ क्रीडया धावन् सः - लीलेने धावणारा तो श्रीकृष्ण - भूमौ पतित्वा सहसा उत्थितः - पृथ्वीवर पडून लगेच उठला - क्रुद्धः सः - रागावलेला तो हत्ती - पतितं तं मत्वा - श्रीकृष्णाला पडलेला असे मानून - दन्ताभ्यां क्षितिम् अहनत् - दोन्ही दातांनी जमिनीला ताडिता झाला. ॥११॥ कुञ्जरेन्द्रः - तो मोठा हत्ती - स्वविक्रमे प्रतिहते अत्यमर्षितः - आपला पराक्रम फुकट गेला असता फारच रागावलेला असा - महामात्रैः चोद्यमानः - माहुतांनी प्रेरिला जाणारा - रुषा कृष्णम् अभ्यद्रवत् - क्रोधाने श्रीकृष्णाच्या अंगावर धावला. ॥१२॥ मधुसूदनः भगवान् - मधु दैत्याला मारणारा भगवान श्रीकृष्ण - आपतन्तं तं आसाद्य - चाल करून येणार्या त्या हत्तीजवळ जाऊन - पाणिना हस्तं निगृह्य - हाताने सोंड घट्ट धरून - (तं) भूतले पातयामास - त्याला जमिनीवर पाडिता झाला. ॥१३॥ हरिः - श्रीकृष्ण - मृगेन्द्रः इव - सिंहाप्रमाणे - (तं) पदा लीलया आक्रम्य - त्या हत्तीवर सहज पाय देऊन - पतितस्य दन्तम् उत्पाटय - पडलेल्या त्याचे दात उपटून - तेन इभं हस्तिपान् च अहनत् - त्या दाताने हत्तीला व माहुताला ठार मारिता झाला. ॥१४॥ दन्तपाणिः (सः) - हातात हत्तीचा दात घेतलेला श्रीकृष्ण - मृतकं द्विपम् उत्सृज्य - मेलेल्या हत्तीला तेथेच टाकून - (रङगं) समाविशत् - रङगभूमीवर प्रविष्ट झाला - अंसन्यस्तविषाणः - खांद्यावर हस्तिदंत ठेवलेला - असृङ्मदबिंदुभिः अंकितः - रक्त व मदाचे बिंदु यांनी माखलेला - विरूढस्वेदकणिकावदनाम्बुरुहः - ज्याच्या मुखकमळावर घर्मबिंदु आले आहेत असा - बभौ - शोभला. ॥१५॥ राजन् - हे परीक्षित राजा - गजदन्तवरायुधौ - हस्तिदंतच आहे श्रेष्ठ आयुध ज्यांचे असे - कतिपयैः गोपैः वृतौ - कित्येक गोपांनी वेष्टिलेले - बलदेवजनार्दनौ - बलराम व श्रीकृष्ण - रङगं विविशतुः - रंगभूमीवर प्रविष्ट झाले. ॥१६॥ साग्रजः (सः) - बलरामासह श्रीकृष्ण - रङगं गतः - रंगभूमीवर आला असता - मल्लानाम् अशनिः (विदितः) - मल्लांना वज्र असा वाटला - नृणां नरवरः - सामान्य पुरुषांना श्रेष्ठ पुरुष वाटला - स्त्रीणां मूर्तिमान् स्मरः - स्त्रियांना मूर्तिमान मदन वाटला - गोपानां स्वजनः - गोपांना आपला आप्त वाटला - असतां क्षितिभुजां शास्ता - दुष्ट राजांना आपले शासन करणारा वाटला - स्वपित्रोः शिशुः - स्वतःच्या मातापित्यांना बालक वाटला - भोजपतेः मृत्यूः - कंसाला मृत्यु वाटला - अविदुषां विराट् - अडाणी माणसांना प्रचंड पुरुष वाटला - योगिनां परं तत्त्वं - योग्यांना श्रेष्ठ आत्मतत्त्व वाटला - वृष्णीनां परदेवता - यादवांना श्रेष्ठ देवता - इति विदितः - असा भासला. ॥१७॥ नृप - हे राजा - तदा - तेव्हा - मनस्वी अपि कंसः - मनोनिग्रही असा कंस देखील - कुवलयापीडं हतं दृष्ट्वा - कुवलयापीड नामक हत्तीला मारिलेले पाहून - तौ अपि दुर्जयौ (मत्वा) - व त्या दोघा रामकृष्णांना अजिंक्य समजून - भृशम् उद्विविजे - फार उद्विग्न झाला. ॥१८॥ विचित्रवेषाभरणस्रगम्बरौ - चित्रविचित्र वेष, अलंकार, पुष्पमाळा व वस्त्रे धारण करणारे - महाभुजौ - मोठमोठे आहेत दंड ज्यांचे असे - रङगगतौ तौ - रंगभूमीवर आलेले ते रामकृष्ण - यथा उत्तमवेषधारिणौ नटौ - उत्तम वेष घेतलेल्या नटाप्रमाणे - निरीक्षतां मनः प्रभया क्षिपन्तौ - पहाणार्यांचे मन स्वतःच्या कांतीने हरण करणारे असे - रेजतुः - शोभले. ॥१९॥ नृप - हे राजा - मञ्चस्थिताः नागरराष्ट्रकाः जनाः - उच्चासनावर बसलेले नगरातील व राष्ट्रातील लोक - उत्तमपूरुषौ तौ निरीक्ष्य - श्रेष्ठ पुरुष अशा त्या दोघा रामकृष्णांना पाहून - प्रहर्षवेगोत्कलितेक्षणाननाः - आनंदाच्या भराने प्रफुल्लित झाले आहेत नेत्र व मुखे ज्यांची असे - नयनैः तदाननं पपुः - नेत्रांनी त्यांचे मुख जणू पिते झाले - (परंतु) न तृप्ताः - परंतु तृप्त झाले नाहीत. ॥२०॥ चक्षुर्भ्यां पिबन्तः इव - जणू डोळ्यांनी प्राशन करणारे - जिह्वया लिहन्तः इव - जिभेने जणू चाटणारे - नासाभ्यां जिघ्रन्तः इव - नाकाने जणू त्याचा वास घेणारे - बाहुभिः श्लिष्यन्तः इव - जणू काय बाहूंनी आलिंगिणारे ॥२१॥ - ते वै - ते लोक खरोखर - यथा दृष्टं यथा श्रुतं - जसे पाहिले व जसे ऐकिले - (तथा) तद्रूपगुण - तशाच रीतीने त्या श्रीकृष्णाच्या व बलरामाच्या गुणांचे, - माधुर्यप्रागल्भ्यस्मारिताः इव - आणि गोड स्वरूपाचे व सामर्थ्याचे स्मरण झाल्याप्रमाणेच - परस्परं ऊचुः - आपसांत बोलू लागले. ॥२२॥ एतौ - हे दोघे बलराम व श्रीकृष्ण - इह वसुदेवस्य वेश्मनि - ह्या वसुदेवाच्या घरी - भगवतः हरेः नारायणस्य - भगवान श्रीविष्णूच्या - साक्षात् अंशेन - प्रत्यक्ष पूर्णांशाने - हि अवतीर्णौ - खरोखर अवतीर्ण झाले. ॥२३॥ एषः किल वै - हाच खरोखर श्रीकृष्ण - देवक्यां जातः - देवकीच्या ठिकाणी जन्मलेला - गोकुलं च नीतः - आणि गोकुळात नेला गेलेला - नन्दवेश्मनि - नंदाच्या घरी - एतं कालं - आतापर्यंत - गूढे वसन् - गुप्त रीतीने रहात - ववृधे - वाढला. ॥२४॥ अनेन - ह्या श्रीकृष्णाकडून - पूतना अन्तं नीता - पूतना नाशाप्रत नेली गेली - चक्रवातः दानवः च - आणि गरगर फिरणार्या वायूचे रूप घेतलेला दानव - अर्जुनौ - अर्जुन नावाचे दोन वृक्ष - गुह्यकः केशी - केशी नावाचा यक्ष - धेनुकः - धेनुकासुर - तद्विधाः अन्ये च - आणि तशाच सारखे दुसरे - अन्तं नीताः - मृत्यूप्रत नेले गेले ॥२५॥ एतेन - ह्या कृष्णाने - सपालाः गावः - गोपांसह गाई - दावाग्नेः परिमोचिताः - वणव्यातून सोडविल्या - कालियः सर्पः दमितः - कालिय नामक सर्प दमविला - इन्द्रः च विमदः कृतः - आणि इंद्र गर्वरहित केला गेला. ॥२६॥ अमुना - ह्या श्रीकृष्णाने - अद्रिः - गोवर्धन पर्वत - एकहस्तेन सप्ताहं धृतः - एका हाताने सात दिवस उचलून धरिला - गोकुलं च - आणि गोकुळ - वर्षवाताशनिभ्यः - पर्जन्य, वादळ व विजा यांपासून - परित्रातं - रक्षिले. ॥२७॥ अस्य - ह्या श्रीकृष्णाचे - मुदितहसितप्रेक्षणं - नेहमी आनंदित व हास्ययुक्त आहे अवलोकन ज्याचे असे - मुखं - मुख - प्रेक्षन्त्यः गोप्यः - पाहणार्या गोपी - मुदा - आनंदाने - विविधान् तापान् - अनेक प्रकारच्या तापापासून - अश्रमं तरन्ति स्म - सहज मुक्त होत असतात. ॥२८॥ अनेन - ह्या श्रीकृष्णाने - परिरक्षितः - रक्षिलेला - सुबहुविश्रुतः - व अत्यंत प्रसिद्धीला आलेला - अयं यदोः वंशः - हा यदूचा वंश - श्रियं यशः महत्त्वं च - लक्ष्मी कीर्ति आणि मोठेपणा - लप्स्यते - मिळवील - (इति) वदन्ति - असे लोक बोलतात. ॥२९॥ अयं च - हाच - अस्य अग्रजः - ह्या श्रीकृष्णाचा वडील भाऊ - कमललोचनः श्रीमान् रामः - कमलाप्रमाणे नेत्र असलेला सर्वैश्वर्यसंपन्न बलराम होय - येन प्रलम्बः निहतः - ज्याने प्रलम्ब मारिला - वत्सकः (निहतः) - वत्सासुर मारिला - ये (च) बकादयः (ते अपि निहताः) - आणि जे बकासुरादि दैत्य तेहि मारिले. ॥३०॥ एवं जनेषु ब्रुवाणेषु - याप्रमाणे लोक आपापसांत बोलत असता - तुर्येषु च निनदत्सु - आणि वाद्ये वाजू लागली असता - चाणूरः - चाणूर मल्ल - कृष्णरामौ समाभाष्य - श्रीकृष्ण व बलराम ह्यांना उद्देशून - वाक्यं अब्रवीत् - भाषण करिता झाला. ॥३१॥ हे नन्दसूनो हे राम - हे श्रीकृष्णा, हे बलरामा - भवन्तौ वीरसंमतौ नियुद्धकुशलौ (इति) श्रुत्वा - तुम्ही दोघे वीरांना मान्य व युद्ध करण्यात कुशल आहा असे ऐकून - (तत्) दिदृक्षुणा राज्ञा आहूतौ - ते तुमचे युद्धकौशल्य पाहण्याच्या इच्छेने कंसराजाकडून बोलाविले गेले आहा. ॥३२॥ मनसा कर्मणा वाचा - मनाने, कर्माने व वाणीने - राज्ञः प्रियं प्रकुर्वत्यः प्रजाः - राजाचे प्रिय करणार्या प्रजा - वै श्रैयः विन्दन्ति - खरोखर कल्याण मिळवितात - अतः अन्यथा (कुर्वत्यः) - ह्याहून उलट वर्तन करणार्या - विपरीतं (विन्दन्ति) - उलट फळ मिळवितात. ॥३३॥ यथा वत्सपालाः - जसे वासरे चरविणारे मुलगे - तथा गोपाः अपि - तसे मोठे गोपहि - प्रमुदितः (सन्तः) - आनंदित होणारे - नित्यं मल्लयुद्धेन वनेषु क्रीडन्तः - नेहमी कुस्त्या खेळून अरण्यात क्रीडा करीत - गाः चारयन्ति - गाई चारितात - (इति) स्फुटं - हे उघड दिसत आहे. ॥३४॥ तस्मात् - म्हणून - यूयं वयं च - तुम्ही आणि आम्ही - राज्ञः प्रियं करवामहे - कंसराजाचे प्रिय करू या - (तेन) भूतानि नः प्रसीदन्ति - त्यामुळे सर्व भूते आपल्यावर संतुष्ट होतील - (हि) नृपः सर्वभूतमयः (अस्ति) - कारण राजा हा सर्व भूतांचे स्वरूप असाच आहे. ॥३५॥ कृष्णः - श्रीकृष्ण - तत् देशकालोचितं वचः निशम्य - ते स्थळाला व प्रसंगाला योग्य असे भाषण ऐकून - च - आणि - आत्मनः अभीष्टं मन्यमानः - मल्लयुद्ध आपल्याला अत्यंत प्रिय आहे असे मानणारा - (तत्) अभिनंद्य - त्याचे अभिनंदन करून - अब्रवीत् - म्हणाला. ॥३६॥ वयं - आम्ही - अस्य भोजपतेः प्रजाः (स्मः) - या कंसराजाच्या प्रजा आहो - वनेचराः च अपि - आणि अरण्यात हिंडणारेहि आहो - नित्यं (तस्य) प्रियं करवामः - आम्ही त्याचे नित्य प्रिय करावे - तत् परम् अनुग्रहः - तोच आमच्यावर मोठा अनुग्रह होय. ॥३७॥ मल्ल - हे मल्ला चाणूरा - वयं बालाः - आम्ही लहान मुले आहोत - (यथा) अधर्मः सभासदः मा स्पृशेत् - जेणेकरून अधर्म सभेतील लोकांना स्पर्श करणार नाही - नियुद्धं (च) भवेत् - आणि मल्लयुद्धहि होईल - (तथा) तुल्यबलैः यथोचितं क्रीडिष्यामः - तशाप्रकारे योग्यतेनुसार समबल मल्लांशी क्रीडा करू. ॥३८॥ त्वं च बलः - तू आणि बलराम - बालः न किशोरः न - बाल नव्हे व लहान मुलेहि नव्हे - बलिनां वरः - तर बलवानात श्रेष्ठ आहा - येन (त्वया) - ज्या तू - सहस्रद्विपसत्त्वभृत् - हजार हत्तींचे सामर्थ्य असणारा - इभः - कुवलयापीड हत्ती - लीलया हतः - लीलेने मारिला. ॥३९॥ वार्ष्णेय - हे यादवकुलोत्पन्ना श्रीकृष्णा - तस्मात् - म्हणून - भवद्भ्यां - तुम्हा दोघांनी - बलिभिः योद्धव्यं - बलिष्ठ योद्ध्यांबरोबर मल्लयुद्ध करावे - अत्र वै अनयः न - ह्यात खरोखर अन्याय नाही - (त्वं) मयि विक्रम - तू माझ्याबरोबर पराक्रमाने मल्लयुद्ध कर - मुष्टिकः बलेन सह (विक्रमतु) - मुष्टिक हा बलरामाबरोबर मल्लयुद्ध करो. ॥४०॥ अध्याय त्रेचाळिसावा समाप्त |