|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४१ वा - अन्वयार्थ
श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश - भगवान् कृष्णः - भगवान श्रीकृष्ण - स्तुवतः तस्य - स्तुति करणार्या त्या अक्रूराला - आत्मनः वपुः - आपले शरीर - जले दर्शयित्वा - पाण्यात दाखवून - नटः नाटयम् इव - नाटकी पुरुष स्वीकारलेल्या वेषाप्रमाणे - भूयःसमाहरत् - पुनः गुप्त करिता झाला. ॥१॥ अपि च - आणखी - सः - तो अक्रूर - (तत्) अन्तर्हितं वीक्ष्य - ते रूप गुप्त झाले असे पाहून - सत्वरः जलात् उन्मज्य - लवकर पाण्यातून बाहेर येऊन - च आवश्यकं सर्वं कृत्वा - आणि आवश्यक असे सर्व विधि करून - विस्मितः रथम् आगमत् - आश्चर्यचकित होऊन रथाजवळ आला. ॥२॥ हृषीकेशः - श्रीकृष्ण - भूमौ वियति वा तोये - पृथ्वीवर, आकाशात किंवा पाण्यात - अद्भुतम् इव - आश्चर्य करण्यासारखे - दृष्टं किं - तू काही पाहिलेस काय - तथा त्वां लक्षयामहे - तशासारखा आम्ही तुला पाहतो - (इति) तम् अपृच्छत् - असे त्या अक्रूराला विचारिता झाला. ॥३॥ इह भूमौ - ह्या पृथ्वीतलावर - वियति जले वा - आकाशात किंवा उदकात - यावन्ति अद्भुतानि (सन्ति) - जितकी म्हणून आश्चर्ये आहेत - तानि विश्वात्मके त्वयि - तितकी सर्व जगद्रूपी अशा तुझ्या ठिकाणी - विपश्यतः मे - पाहणार्या माझ्याकडून - अदृष्टं किम् (अस्ति) - पाहिले गेले नाही असे काय बरे आहे. ॥४॥ ब्रह्मन् - हे ब्रह्मस्वरूपी श्रीकृष्णा - भूमौ वियति जले वा - पृथ्वीवरील, आकाशातील किंवा उदकातील - सर्वाणि अद्भुतानि - सर्व आश्चर्ये - यत्र (सन्ति) - ज्याठिकाणी आहेत - तं त्वा अनुपश्यतः - त्या तुला पाहणार्या - मे - माझ्याकडून - इह - येथे - किं अद्भुतं अदृष्टं - कोणते आश्चर्य पाहिले गेले नाही. ॥५॥ गांदिनीसुतः - गांदिनीचा पुत्र अक्रूर - इति उक्त्वा - असे बोलून - स्यन्दनं चोदयामास - रथ हाकिता झाला - च - आणि - दिनात्यये - संध्याकाळी - रामं कृष्णं च - राम व कृष्ण यांना - मथुराम् अनयत् - मथुरेत आणिता झाला. ॥६॥ राजन् - हे परीक्षित राजा - मार्गे - मार्गात - तत्रतत्र - त्या त्या ठिकाणी - उपसङगताः - जवळ येऊन जमलेले - ग्रामजनाः - गावातील लोक - वसुदेवसुतौ वीक्ष्य - वसुदेवाच्या त्या दोघा पुत्रांना पाहून - प्रीताः - आनंदित झालेले - दृष्टिं न च आददुः - तेथून आपली दृष्टि वळविते झाले नाहीत. ॥७॥ तावत् - तितक्यात - तत्र - तेथे - नन्दगोपादयः व्रजौकसः - नन्द, गोप इत्यादि गोकुळात राहणारे लोक - पुरोपवनम् आसाद्य - गावातील बागेत येऊन - प्रतीक्षन्तः - वाट पहात - अग्रतः - अगोदरच - अवतस्थिरे - बसले. ॥८॥ भगवान् जगदीश्वरः - भगवान श्रीकृष्ण - तान् समेत्य - त्यांच्याजवळ येऊन - पाणिना पाणिं गृहीत्वा - हातात हात घालून - प्रहसन् इव - हसल्याप्रमाणे दाखवून - प्रश्रितम् अक्रूरं आह - नम्र अशा अक्रूराला म्हणाला. ॥९॥ सहयानः भवान् - रथासह तू - अग्रे - अगोदर - पुरीं (गत्वा) गृहं प्रविशताम् - गावात जाऊन घरी जावे - वयं तु - आम्ही तर - इह - येथे - अवमुच्य - रथातून उतरून - अथ - नंतर - ततः - मागाहून - पुरीं द्रक्ष्यामहे - गाव पाहण्यास जाऊ. ॥१०॥ प्रभो नाथ - हे समर्था श्रीकृष्णा - अहं - मी - भवद्भ्यां रहितः - तुझ्या शिवाय - मथुरां न प्रवेक्ष्ये - मथुरेत शिरणार नाही - भक्तवत्सल - हे भक्तांवर प्रेम करणार्या श्रीकृष्णा - ते भक्तं मां - तुझा भक्त अशा मला - त्यक्तुं न अर्हसि - टाकण्यास योग्य नाहीस. ॥११॥ सुहृत्तम अधोक्षज - हे श्रेष्ठ श्रीकृष्णा - सहाग्रजः - बलरामासह - सगोपालैः सुहृद्भिः च (सह) - गोपाळांसह व मित्रांसह - आगच्छ - चल - याम - जाऊ या - नः गेहान् सनाथान् कुरु - आमची घरे सनाथ कर. ॥१२॥ यच्छौचेन - ज्याच्या पादोदकाने - पितरः - पितर - (च) साग्नयः सुराः - आणि अग्नीसह देव - अनुतृप्यन्ति - तृप्त होतात - (तस्य ते) पादरजसा - त्या तुझ्या पायाच्या धुळीने - गृहमेधिनां नः - गृहस्थाश्रमी अशा आमची - गृहान् - घरे - पुनीहि - पवित्र कर ॥१३॥ - महान् बलिः - महात्मा बलिराजा - (तव) अङ्घ्रियुगलं अवनिज्य - तुझे दोन चरण धुऊन - श्लोक्यः आसीत् - स्तुतीला पात्र झाला - च - आणि - अतुलं ऐश्वर्यं - निरुपम ऐश्वर्य - (तथा) एकान्तिनां तु या (गतिः) - त्याचप्रमाणे एकांत भक्तांना मिळणारी जी गति - (तां) गतिं - त्या गतीला - लेभे - मिळविता झाला. ॥१४॥ शर्वः - शंकर - याः शिरसा अधत्त - जे उदक मस्तकाने धरिता झाला - (याभिः) सगरात्मजाः - ज्या उदकाने सगरपुत्र - स्वः याताः - स्वर्गाला गेले - ताः - ते - (ते) अङ्घ्य्रवनेजन्यः शुचयः आपः - तुझे पाय धुण्याचे पवित्र उदक - त्रीन् लोकान् अपुनन् - त्रैलोक्याला पवित्र करते झाले. ॥१५॥ देवदेव जगन्नाथ - हे देवश्रेष्ठा जगन्नाथा - पुण्यश्रवणकीर्तन - ज्याचे श्रवण व कीर्तन पुण्यकारक आहे अशा हे कृष्णा - यदूत्तमोत्तमश्लोक - श्रेष्ठ यदुकुलामध्ये उत्कर्षाला पावली आहे कीर्ति ज्याची अशा हे श्रीकृष्णा - नारायण ते नमः अस्तु - हे नारायणा तुला नमस्कार असो. ॥१६॥ अहं - मी - आर्यसमन्वितः - बलरामासह - भवतः गेहं आयास्ये - तुझ्या घरी येईन - यदुचक्रद्रुहं हत्वा - यादवसंघाशी शत्रुत्व करणार्या कंसाला मारून - सुहृत्प्रियं वितरिष्ये - मित्रांचे प्रिय करीन. ॥१७॥ भगवता एवम् उक्तः - श्रीकृष्णाने याप्रमाणे बोलला गेलेला - सः अक्रूरः - तो अक्रूर - विमनाः इव (भूत्वा) - खिन्न झाल्यासारखा होऊन - पुरीं प्रविष्टः - मथुरेत शिरला - (च) कंसाय आवेद्य - आणि कंसाला सांगून - गृहं ययौ - घरी गेला. ॥१८॥ अथ - नंतर - अपराह्णे - दुपारी - भगवान् कृष्णः - भगवान श्रीकृष्ण - संकर्षणान्वितः - बलरामासह - गोपैः परिवारितः - गोपांनी वेष्टिलेला असा - मथुरां दिदृक्षुः - मथुरा पाहण्याच्या इच्छेने - प्राविशत् - आत शिरला. ॥१९॥ स्फाटिकतुङगगोपुरद्वारां - स्फटिकाच्या उंच वेशी व दरवाजे जिला आहेत अशा - बृहद्धेमकपाटतोरणां - मोठमोठी सुवर्णाची कवाडे व तोरणे जिथे आहेत अशा - ताम्रारकोष्ठां - तांब्यापितळेची कोठारे आहेत अशा - परिखादुरासदां - भोवतीच्या खंदकामुळे आत प्रवेश होण्यास कठीण अशा - उद्यानरम्योपवनोपशोभिताम् - उद्याने व रमणीय उपवने ह्यांनी शोभणार्या - तां ददर्श - त्या मथुरा नगरीला पाहता झाला. ॥२०॥ सौवर्णशृङगाटकहर्म्यनिष्कुटैः - सोन्याचे चव्हाटे, श्रीमंतांची घरे, व घराजवळील बागबगीचे यांनी - श्रेणीसभाभिः - शिल्पशास्त्रज्ञांच्या बसण्याच्या ठिकाणांनी - भुवनैः - घरांनी - उपस्कृतां - शोभणार्या - वैदूर्यवज्रामलनीलविद्रुमैः - वैडूर्यमणी, हिरे, निर्मळ नीलमणी व पोवळी यांनी - मुक्ताहरिद्भिः - मोती व पाचू ह्यांनी - वलभीषु - वळचणीच्या ठिकाणी - वेदिषु - ओटयांवर - उपस्कृतां - सुशोभित केलेली अशा. ॥२१॥ जुष्टेषु - सेविलेल्या - जालामुखरन्ध्रकुट्टिमेषु - खिडक्यांची छिद्रे व रत्नखचितभूमी त्या ठिकाणी - आविष्टपारावतबर्हिनादिताम् - बसलेल्या पारव्यांनी व मोरांनी गजबजून टाकिलेल्या - संसिक्तरथ्यापणमार्गचत्वरां - शिंपले आहेत राजमार्ग, पेठा व चव्हाटे जेथील अशा - प्रकीर्णमाल्याङ्कुरलाजतण्डुलाम् - जिकडेतिकडे पसरल्या आहेत फुलांच्या माळा, अंकुर, लाह्या व तांदूळ ज्याठिकाणी अशा. ॥२२॥ दधिचन्दनोक्षितैः आपूर्णकुम्भैः - दही व चंदनोदक यांनी शिंपिलेल्या पाण्यांनी भरलेल्या घटांनी - सपल्लवैः प्रसूनदीपावलिभिः - आंब्याचे डाहाळे, फुले व दिव्यांच्या रांगा यांनी - सपट्टिकैः सकेतुभिः - वस्त्रांसह शोभणार्या पताका व ध्वज यांनी - सवृन्तरम्भाक्रमुकैः - केळफुल आणि केळीचे घड व पोफळीची शिपटे ह्यांसह केळीच्या व सुपारीच्या झाडांनी - अलंकृतद्वारगृहां - शोभणारी आहेत घरांची द्वारे जिच्या अशा. ॥२३॥ नृप - हे राजा - नरदेववर्त्मनः - राजमार्गाने - तां संप्रविष्टौ - त्या मथुरेत शिरलेले - वयस्यैः वृतौ - व बरोबरीच्या मित्रांनी वेष्टिलेले - वसुदेवनन्दनौ - वसुदेवाचे पुत्र असे जे बलराम व श्रीकृष्ण यांना - द्रष्टुं - पाहण्याकरिता - पुरस्त्रियः - नगरातील स्त्रिया - त्वरिताः समीयुः - लवकर प्राप्त झाल्या - च - आणि - उत्सुकाः - उत्कंठित होऊन - हर्म्याणि आरुरुहुः - गच्चीवर चढल्या. ॥२४॥ काश्चित् - कित्येक - विपर्यग्धृतवस्त्रभूषणाः - उलट धारण केली आहेत वस्त्रे व भूषणे ज्यांनी अशा - अपराः च - आणि दुसर्या कित्येक - युगलेषु एकं विस्मृत्य - जोडींपैकी एक वस्त्र व अलंकार विसरून - कृतैकपत्रश्रवणैकनूपुराः - ज्यांनी एकाच कानात एक कुंडल घातले आहे व एकाच पायात एकच पैंजण घातला आहे अशा - च अपराः तु - आणि दुसर्या स्त्रिया तर - द्वितीयं लोचनं न अङ्क्त्वा - दुसर्या डोळ्यात काजळ न घालता. ॥२५॥ सोत्सवाः एकाः - उत्साहयुक्त कित्येक स्त्रिया - अश्नन्त्यः - भोजन करीत असता - तत् अपास्य - ते टाकून - अभ्यज्यमानाः - स्नान केले नाही ज्यांनी अशा - स्वपन्त्यः उत्थाय - निजल्या असता तशाच उठून - निःस्वनं निशम्य - शब्द ऐकून - मातरः - माता - पाययन्त्यः - दूध पाजता पाजता - अर्भं अपोह्य (निर्गताः) - मुलाला सोडून तशाच निघाल्या. ॥२६॥ मत्तद्विरेन्द्रविक्रमः - उन्मत्त गजेंद्राप्रमाणे ज्याचा पराक्रम आहे असा - श्रीरमणात्मना - व लक्ष्मीला रमविणारा असा - दृशां उत्सवं ददत् - नेत्रांना आनंद देणारा असा - अरविन्दलोचनः - कमळाप्रमाणे नेत्र असणारा श्रीकृष्ण - प्रगल्भलीलाहसितावलोकैः - प्रौढ लीलांनी केलेल्या हास्यपूर्वक अवलोकनांनी - तासां मनांसि जहार - त्या स्त्रियांची अंतःकरणे हरण करिता झाला. ॥२७॥ अरिंदम - हे शत्रुदमना परीक्षित राजा - मुहुःश्रुतं तं दृष्टवा - वारंवार ऐकिलेल्या त्याला पाहून - अनुद्रुतचेतसः - ज्यांचे अंतःकरण त्याचे मागे लागले आहे अशा - तत्प्रेक्षणोत्स्मितसुधोक्षणलब्धमानाः - त्याच्या पाहण्याने व स्मित हास्याने प्राप्त झालेल्या अमृतसिंचनाचा ज्यांना मान मिळाला आहे अशा - आत्मलब्धम् आनन्दमूर्तिं - अन्तःकरणात चिंतनाने प्राप्त झालेल्या आनन्दमूर्ति श्रीकृष्णाला - दृशा उपगुह्य - नेत्रांनी आलिंगन देऊन - हृष्यत्त्वचः - ज्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत अशा गोपी - अनन्तम् आधिं जहुः - अगणित अशा मनोव्यथांना टाकून देत्या झाल्या. ॥२८॥ प्रासादशिखरारूढाः - मोठमोठया राजवाडयाच्या गच्च्यांवर चढलेल्या - प्रीत्युत्फुल्लमुखाम्बुजाः - प्रीतीने प्रफुल्लित झाली आहेत मुखकमळे ज्यांची अशा - प्रमदाः - स्त्रिया - बलकेशवौ - बलराम व श्रीकृष्ण ह्यांच्यावर - सौमनस्यैः - फुलांच्या मुठींनी - अभ्यवर्षन् - वृष्टि करत्या झाल्या. ॥२९॥ प्रमुदिताः द्विजातयः - आनंदित झालेले ब्राह्मण - तत्र तत्र - त्या त्या ठिकाणी - सौदपात्रैः दध्यक्षतैः - जलपात्रासह आणलेले दही व अक्षता यांनी - स्रग्गन्धैः अभ्युपायनैः - आणि माळा व गंध यांनी तसेच आणलेल्या भेटीच्या पदार्थांनी - तौ आनर्चुः - त्या दोघा रामकृष्णांची पूजा करिते झाले. ॥३०॥ अहो - अहो - हि - खरोखर - याः - ज्या - नरलोकमहोत्सवौ एतौ - मनुष्यलोकाला मोठा आनंद देणार्या ह्या रामकृष्णांना - अनुपश्यन्ति - नित्य पाहतात - (ताः) गोप्यः - त्या गोपी - किं महत् तपः अचरन् - कोणते मोठे तप करित्या झाल्या - (इति) पौराः ऊचुः - असे मथुरेतील लोक आपापसांत बोलू लागले. ॥३१॥ गदाग्रजः - श्रीकृष्ण - कंचित् आयातं रंगकारं रजकं - कोणी एक आलेल्या रंगाचे काम करणार्या परिटाला - दृष्टवा - पाहून - अत्युत्तमानि धौतानि वासांसि - अतिशय उत्तम धुतलेली वस्त्रे - अयाचत - मागता झाला. ॥३२॥ अंग - हे परिटा - अर्हतोः आवयोः - योग्य अशा आम्हां दोघांना - समुचितानि वासांसि देहि - योग्य वस्त्रे दे - दातुः ते - देणार्या तुझे - परं श्रेयः भविष्यति - अत्यंत कल्याण होईल - अत्र संशयः न - त्यात संशय नाही. ॥३३॥ राज्ञः सुदुर्मदः भृत्य - राजाचा मदोन्मत्त सेवक असा - सः - तो परीट - सर्वतः परिपूर्णेन - ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत - भगवता याचितः - अशा श्रीकृष्णाने याचिला असता - रुषितः - रागावून - साक्षेपं - उद्धटपणे - प्राह - म्हणाला. ॥३४॥ उद्वृत्ताः - हे उनाड गोप हो - गिरिवनेचराः (यूयं) - पर्वतावर व अरण्यात हिंडणारे तुम्ही - ईदृशानि एव वासांसि - अशा तर्हेची वस्त्रे - नित्यं परिधत्त किम् - नेहमी धारण करिता काय - राजद्रव्याणि अभीप्सथ - राजाच्या वस्तूंची इच्छा करिता काय. ॥३५॥ बालिशाः - अरे मूर्ख मुलांनो - आशु यात - येथून लवकर जा - यदि जिजीविषा (स्यात्) - जर जगण्याची इच्छा असेल तर - एवं मा प्रार्थ्य - असे काही मागू नका - वै - खरोखर - राजकुलानि - राजाचे सेवक - दृप्तं - गर्विष्ठाला - बध्नन्ति घ्नन्ति लुम्पन्ति - बांधतात, मारतात व लुबाडतात. ॥३६॥ कुपितः देवकीसुतः - रागावलेला श्रीकृष्ण - एवं विकत्थमानस्य - याप्रमाणे बडबड करणार्या - रजकस्य शिरः - परिटाचे मस्तक - कराग्रेण - हाताच्या टिचकीने - कायात् अपाहरत् - शरीरापासून हरण करिता झाला. ॥३७॥ सर्वे तस्य अनुजीविनः - सर्व त्या परिटाचे सेवक - वासःकोशान् विसृज्य - वस्त्रांचे गठ्ठे टाकून - सर्वतः मार्गं दुद्रुवुः वै - जिकडे तिकडे रस्त्यात पळत सुटले - अच्युतः वासांसि जगृहे - श्रीकृष्ण वस्त्रे घेता झाला. ॥३८॥ कृष्णः तथा संकर्षणः - कृष्ण त्याचप्रमाणे बलराम - आत्मप्रिये वस्त्रे वसित्वा - स्वतःला आवडणारी दोन वस्त्रे धारण करून - कानिचित् भुवि विसृज्य - कित्येक जागच्या जागी टाकून - शेषाणि गोपेभ्यः आदत्त - बाकीची गोपांना देता झाला. ॥३९॥ ततः - त्यानंतर - वायकः तु - कोष्टी तर - प्रीतः - आनंदित होऊन - अनुरूपतः - योग्य रीतीने - विचित्रवर्णैः - चित्रविचित्र रंगाच्या - चैलेयैः - कापडाने केलेल्या - आकल्पैः - भूषणांनी - तयोः वेषम् अकल्पयत् - त्या दोघा रामकृष्णांना भूषविता झाला. ॥४०॥ पर्वणि स्वलङ्कृतौ बालगजौ इव - उत्सवप्रसंगी भूषविलेल्या दोन लहान हत्तींप्रमाणे - सितेतरौ कृष्णरामौ - शुभ्रवर्णाचा बलराम व कृष्णवर्णाचा श्रीकृष्ण - नानालक्षणवेषाभ्यां - अनेक प्रकारच्या लक्षणांनी व अलंकारयुक्त वेषांनी - विरेजतुः - शोभते झाले. ॥४१॥ प्रसन्नः भगवान् - प्रसन्न झालेला श्रीकृष्ण - तस्य आत्मनः सारूप्यं - त्याला स्वतःचा सारूप्यनामक मोक्ष - लोके च - आणि ह्या लोकी - बलैश्वर्यस्मृतीन्द्रिंयम् - बल, ऐश्वर्य, स्मरणशक्ति व इंद्रियकौशल्य - च परमां श्रियं - आणि अतुल संपत्ति - प्रादात् - देता झाला. ॥४२॥ ततः - नंतर - तौ - ते रामकृष्ण - सुदाम्नः मालाकारस्य भवनं - सुदामा नावाच्या माळ्याच्या घरी - जग्मतुः - गेले - सः (तौ) दृष्टवा - तो त्यांना पाहून - समुत्थाय - उठून - शिरसा भुवि ननाम - मस्तकाने पृथ्वीवर साष्टांग नमस्कार घालता झाला. ॥४३॥ अथ - नंतर - आसनं पाद्यं च आनीय - आसन आणि पाय धुण्यासाठी पाणी आणून - अर्हणादिभिः स्रक्ताम्बूलानुलेपनैः - पूजा साहित्य पूर्वक पुष्पमाळा, विडे व उटया ह्यांनी - सानुगयोः तयोः - अनुचर अशा गोपांसह रामकृष्णांची - पूजां चक्रे - पूजा करिता झाला. ॥४४॥ (सः) प्राह - तो माळी म्हणाला - प्रभो - हे समर्था श्रीकृष्णा - वाम् आगमनेन - तुमच्या आगमनाने - नः जन्म सार्थकं (जातं) - आमच्या जन्माचे सार्थक झाले - कुलं च पावितं - आणि कुल पवित्र झाले - पितृदेवर्षयः - पितर, देव व ऋषी - मह्यं तुष्टाः हि - माझ्यावर खरोखर संतुष्ट झाले. ॥४५॥ भवन्तौ किल - आपण खरोखर - विश्वस्य जगतः परं कारणं - संपूर्ण जगाचे मुख्य उत्पादक असून - इह - येथे - अंशेन - पूर्णांशाने - क्षेमाय च भवाय च - जगाच्या कल्याणाकरिता व उत्कर्षाकरिता - अवतीर्णौ - अवतीर्ण झाला आहा. ॥४६॥ सुहृदोः - मित्ररूपी - जगदात्मनोः - जगात आत्मरूपाने राहणार्या - सर्वभूतेषु समयोः - सर्व प्राण्यांचे ठिकाणी समबुद्धि ठेवणार्या - भजन्तम् अपि भजतोः - भक्ति करणार्या भक्तांचीही सेवा करणार्या - वां - तुम्हा दोघांच्या ठिकाणी - विषमा दृष्टिः नहि - अधिकउणी दृष्टी नाही. ॥४७॥ अहं वां किं करवाणि - मी आपले कोणते काम करावे - (इति) तौ (युवां) - अशी तुम्ही उभयतांनी - भृत्यं (मां) आज्ञापयतम् - सेवक अशा मला आज्ञा द्यावी - हि - कारण - भवद्भिः यत् नियुज्यते - आपण जी आज्ञा कराल - एषः पुंसः अत्यनुग्रहः - हा पुरुषांवर केलेला मोठा उपकार होय. ॥४८॥ राजेंद्र - हे राजा - प्रीतमानसः सुदामा - प्रसन्न अंतःकरण झालेला सुदामा - इति अभिप्रेत्य - असा आपला अभिप्राय व्यक्त करून - शस्तैः सुगन्धैः कुसुमैः विरचितां - योग्य सुवासिक फुलांनी तयार केलेल्या - मालाः ददौ - माळा देता झाला. ॥४९॥ ताभिः स्वलंकृतौ - त्या माळांनी भूषित केलेले - प्रीतौ वरदौ - प्रसन्न झालेले व वर देण्यास उद्युक्त झालेले - सहानुगौ कृष्णरामौ - गोपांसह श्रीकृष्ण व बलराम हे - प्रणताय प्रपन्नाय (तस्मै) - नम्र व शरण आलेल्या त्या माळ्याला - वरान् ददतुः - वर देते झाले. ॥५०॥ सः अपि - तो माळी सुद्धा - अखिलात्मनि तस्मिन् एव - सर्वांचा आत्मा अशा त्या श्रीकृष्णाच्या ठिकाणीच - अचलां भक्तिं - स्थिर भक्ति - तद्भक्तेषु च - आणि त्या परमेश्वराच्या भक्तांच्या ठिकाणी - सौहार्दं - मित्रासारखे प्रेम - भूतेषु परां दयां - आणि प्राणिमात्रांच्या ठिकाणी अत्यंत दया - वव्रे - अशी मागता झाला. ॥५१॥ इति - याप्रमाणे - वरं - वर - अन्वयवर्धिनीं श्रियं च - व वंशवर्धक संपत्ति - बलं आयुः यशः कांतिं च - आणि शक्ति, आयुष्य, कीर्ति व सौंदर्य - तस्मै दत्त्वा - त्याला देऊन - सहाग्रजः (सः) निर्जगाम - बलरामासह श्रीकृष्ण तेथून निघाला. ॥५२॥ अध्याय एकेचाळिसावा समाप्त |