|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४० वा - अन्वयार्थ
अक्रूराने केलेली भगवान श्रीकृष्णांची स्तुती - अहं - मी - अखिलहेतुहेतुं - सर्व कारणांचे कारण - पुरुषं - सर्वांच्या शरीरात वास्तव्य करणारा - आद्यं - सर्वांच्या आधी असणारा - अव्ययम् - अविनाशी - यन्नाभिजातात् - ज्याच्या नाभीपासून उत्पन्न झालेल्या - अरविन्दकोशात् - कमळाच्या कोशातून - ब्रह्मा आविरासीत् - ब्रह्मदेव प्रकट झाला - यतः एषः लोकः - ज्यापासून हा लोक - आविरासीत् - प्रकट झाला - (तं) नारायणं - त्या जलशायी अशा - त्वा - तुला - नतः अस्मि - नम्र झालो आहे. ॥१॥ भूः तोयम् - पृथ्वी, जल - अग्निः पवनः - अग्नि, वायु - खम् आदिः - आकाश, अहंकार - महान् अजादिः - महतत्व व प्रकृत्यादि - मनः इन्द्रियाणि - मन व इंद्रिये - सर्वेन्द्रियार्थाः - सर्व इंद्रियांचे शब्दादि विषय - सर्वे विबुधाः - सर्व देव - ये च जगतः - जी काही जगदुत्पत्तीला - हेतवः (ते सर्वे) - कारणीभूत साधने आहेत ती सर्व - ते अङगभूताः - तुझ्या शरीरापासून उत्पन्न झाली आहेत. ॥२॥ अनात्मतया गृहीताः एते अजादयः - आत्मज्ञानाच्या अभावाने पछाडलेले हे ब्रह्मादिक - आत्मनः ते स्वरूपं न विदुः - आत्मस्वरूपी तुझ्या स्वरूपाला जाणत नाही - हि - कारण - सः अजः - तो ब्रह्मदेव - अजायाः गुणैः अनुबद्धः - मायेच्या गुणांनी बद्ध झालेला - गुणात् परं ते स्वरूपं - गुणाहून पलीकडे असलेल्या तुझ्या स्वरूपाला - न वेद - जाणत नाही. ॥३॥ योगिनः साधवः - योगी असे सत्पुरुष - महापुरुषं - मोठा पुरुष अशा - साध्यात्मं साधिभूतं साधिदैवं च - अध्यात्मासह, अधिभूतासह व अधिदैवासह असणार्या अशा - ईश्वरं त्वां - ऐश्वर्यसंपन्न तुला - अद्धा - उत्तम रीतीने - यजन्ति - पूजितात. ॥४॥ केचित् वैतानिकाः द्विजाः - कित्येक यज्ञ करणारे ब्राह्मण - नानारूपामराख्यया - अनेक प्रकारची रूपे धारण करणार्या देवांच्या नावाने - त्रय्या विद्यया च - आणि तीन वेदांनी - विततैः यज्ञैः - विस्तृत झालेल्या यज्ञांनी - त्वां वै - तुलाच - यजन्ते - पूजितात. ॥५॥ एके ज्ञानिनः - कित्येक ज्ञानी पुरुष - अखिलकर्माणि संन्यस्य - सर्व कर्मांचा त्याग करून - उपशमं गताः - शांतीला प्राप्त झालेले असे - ज्ञान विग्रहं त्वा - ज्ञानमूर्ति अशा तुला - ज्ञानयज्ञेन - ज्ञानयज्ञाने - यजन्ति - पूजितात. ॥६॥ संस्कृतात्मनः - ज्यांचे मन संस्काराने युक्त झाले आहे असे - त्वन्मयाः - तुझ्याच ठिकाणी लीन झालेले - अन्ये ते - दुसरे ते कित्येक - बहुमूर्त्यैकमूर्तिकम् - अनेक रूपांमध्ये एकरूपाने राहणार्या - त्वां वै - तुलाच - अभिहितेन विधिना - शास्त्रोक्त पद्धतीने - यजन्ति - पूजितात. ॥७॥ भगवन् - हे श्रीकृष्णा - अन्ये - दुसरे - शिवरूपिणं त्वां एव - शिवस्वरूपी अशा तुलाच - ब्रह्वाचार्यविभेदेन - अनेक आचार्यांच्या भिन्नत्वामुळे - शिवोक्तेन मार्गेण - शंकरांनी सांगितलेल्या मार्गाने - समुपासते - सेवितात. ॥८॥ प्रभो - हे श्रीकृष्णा - अन्यदेवताभक्ताः अपि ये (सन्ति) - दुसर्या देवतांची उपासना करणारेहि जे आहेत - (ते) यदि अपि अन्यधियः - ते जरी दुसरीकडे चित्त ठेवणारे असले तरीही - सर्वे एव - सर्वच - सर्वदेवमयेश्वरं त्वां - सर्वदेवस्वरूपी तुला भगवंताला - यजन्ति - पूजितात. ॥९॥ प्रभो - हे श्रीकृष्णा - यथा अद्रिप्रभवाः नद्यः - जशा पर्वतापासून निघालेल्या नद्या - पर्जन्यपूरिताः - पर्जन्यामुळे तुडुंब भरून - सर्वतः अन्ततः सिन्धुं विशन्ति - सर्व बाजूंनी शेवटी समुद्राला मिळतात - तद्वत् - त्याचप्रमाणे - गतयः - धर्ममार्ग - त्वां (विशन्ति) - तुझ्यात प्रविष्ट होतात. ॥१०॥ सत्त्वं रजः तमः इति - सत्त्व, रज व तम असे हे - भवतः प्रकृतेः गुणाः (सन्ति) - तुझ्या मायेचे गुण होत - हि - आणि - तेषु - त्या गुणांच्या ठिकाणी - प्राकृताः - मायेपासून उत्पन्न झालेले - आब्रह्मस्थावरादयः - ब्रह्मदेवापासून तो वृक्षपाषाणापर्यंतचे सर्व पदार्थ - प्रोताः (सन्ति) - पूर्णरीतीने भरून राहिले आहेत. ॥११॥ तुभ्यं नमः - तुला नमस्कार असो - अविषक्तदृष्टये - ज्याची दृष्टी कोठेहि आसक्त होत नाही अशा - सर्वात्मने - सर्वांचा आत्मा अशा - च सर्वाधियां साक्षिणे - आणि सर्वांच्या बुद्धीचा साक्षी अशा - ते (नमः) अस्तु - तुला नमस्कार असो - अविद्यया कृतः - अज्ञानाने केलेला - अयं गुणप्रवाहः - हा गुणांचा ओघ - देवनृतिर्यगात्मसु - देव, मनुष्य व पशुपक्षी यांच्या आत्म्यांच्या ठिकाणी - प्रवर्तते - वेगाने वाहतो. ॥१२॥ अग्निः ते मुखं - अग्नि हा तुझे मुख होय - अङ्घ्रिः अवनिः - पाय ही पृथ्वी - ईक्षणं सूर्यः - डोळा हा सूर्य - नाभिः नमः - नाभिस्थान हे आकाश होय - अथो दिशः श्रुतिः - तसेच दिशा हे कर्ण होत - द्यौः कं - स्वर्ग हे मस्तक होय - सुरेंद्राः तव बाहवः - इंद्र हे तुझे हात होत - अर्णवाः कुक्षिः - समुद्र ही कुशी - मरुत् प्राणबलं प्रकल्पितम् - वायु हाच प्राणस्वरूप सामर्थ्य असे कल्पिले आहे.॥१३॥ परस्य ते - परमेश्वर अशा तुझे - रोमाणि - अंगावरील केस - वृक्षौषधयः - झाडे व औषधि होत - मेघा शिरोरुहाः - मेघ हे तुझे मस्तकावरील केस होत - अद्रयः अस्थिनखानि - पर्वत हे हाडे व नखे होत - निमेषणं रात्र्यहनी - तुझ्या डोळ्याची उघडझाप हीच अहोरात्र होय - प्रजापतिः तु (तव) मेढ्रः - ब्रह्मदेव तर तुझे शिस्न होय - वृष्टिः तव वीर्यं - पाऊस हा तुझे वीर्य - इष्यते - असे समजले जाते. ॥१४॥ अव्ययात्मन् - हे अविनाशी आत्मस्वरूपा श्रीकृष्णा - यथा जलौकसः जले - जसे मत्स्यादि जलचर उदकामध्ये - अपि वा - अथवा - मशकाः उदुम्बुरे संजिहते - बारीक किडे उंबराच्या फळांमध्ये चालतात - (तथा) मनोमये पुरुषे - तसेच मनोरूपी शरीरात वास्तव्य करणार्या - त्वयि - तुझ्या ठिकाणी - बहुजीवसंकुलाः - पुष्कळ जीवांनी व्याप्त असे - सपालाः लोकाः - लोकपालांसह लोक - प्रकल्पिताः - कल्पिले आहेत. ॥१५॥ इह - ह्या लोकी - क्रीडनार्थं - क्रीडा करण्याकरिता - यानि यानि रूपाणि - जी जी रूपे - बिभर्षि - धरतोस - तैः हि - त्यांनीच - आमृष्टशुचः - शोकरहित झालेले - लोकाः - लोक - मुदा ते यशः गायन्ति - आनंदाने तुझे यश गातात. ॥१६॥ प्रलयाब्धिचराय - प्रलयकाळच्या समुद्रात संचार करणार्या - कारणमत्स्याय नमः - जगदुत्पत्तीला कारणीभूत अशा मत्स्यावतार घेणार्या तुला नमस्कार असो - च मधुकैटभमृत्यवे - आणि मधुदैत्य व कैटभ दैत्य ह्यांचा मृत्यूच अशा - हयशीर्ष्णे तुभ्यं नमः - हयशीर्ष नावाने अवतार घेणार्या तुला नमस्कार असो.॥१७॥ मन्दरधारिणे - मंदरपर्वताला पाठीवर धारण करणार्या - बृहते अकूपाराय नमः - व मोठे कूर्मरूप धारण करणार्या तुला नमस्कार असो - क्षित्युद्धारविहाराय - पृथ्वीचा उद्धार करणे हीच आहे क्रीडा ज्याची अशा - सूकरमूर्तये (त्वां) - वराहस्वरूप घेणार्या तुला - नमः - नमस्कार असो. ॥१८॥ साधुलोकभयापह - हे सत्पुरुषांची भीति दूर करणार्या श्रीकृष्णा - अद्भुतसिंहाय ते नमः - आश्चर्यकारक सिंहरूप धारण करणार्या तुला नमस्कार असो - च - आणि - क्रान्तत्रिभुवनाय - ज्याने त्रैलोक्य पादाक्रान्त केले आहे अशा - वामनाय तुभ्यं - वामनावतारी तुला - नमः - नमस्कार असो. ॥१९॥ दृप्तक्षत्रवनच्छिदे - गर्विष्ठ क्षत्रियरूपी अरण्याला तोडणार्या - भृगूणां पतये नमः - भृगुश्रेष्ठ परशुराम अशा तुला नमस्कार असो - च - आणि - रावणान्तकराय - रावणाचा नाश करणार्या - रघुवर्याय ते नमः - रघुश्रेष्ठ अशा तुला नमस्कार असो. ॥२०॥ वासुदेवाय ते नमः - वसुदेवपुत्र अशा तुला नमस्कार असो - च - आणि - संकर्षणाय नमः - बलरामस्वरुपी तुला नमस्कार असो - प्रद्युम्नाय अनिरुद्धाय - प्रद्युन्म व अनिरुद्ध ह्या नावांनी अवतीर्ण होणार्या - सात्वतांपतये (ते) - यादवांचा अधिपति अशा तुला - नमः - नमस्कार असो ॥२१॥ दैत्यदानवमोहिने - दितिपुत्र व दनुपुत्र अशा दुष्टांना मोहित करणार्या - शुद्धाय बुद्धाय नमः - शुद्ध अशा ज्ञानस्वरुपी तुला नमस्कार असो - म्लेच्छप्रायक्षत्रहन्त्रे - म्लेच्छमय झालेल्या क्षत्रियांचा नाश करणार्या - कल्किरूपिणे ते नमः - कल्किस्वरूपाने अवतार घेणार्या तुला नमस्कार असो ॥२२॥ भगवन् - हे श्रीकृष्णा - अयं जीवलोकः - मृत्युलोकातील हा प्रत्येक प्राणी - तवमायया मोहितः (अस्ति) - तुझ्या मायेने मोहित झाला आहे - अहं मम इति असद्ग्राहः - मी, माझे अशाप्रकारचा जो मिथ्या अभिमान तो - कर्मवर्त्मसु भ्राम्यते - कर्ममार्गात प्राण्याला फिरवितो ॥२३॥ च - आणि - विभो - हे कृष्णा - मूढः अहं - मूर्ख असा मी - स्वप्नकल्पेषु - स्वप्नाप्रमाणे मिथ्या असलेल्या - आत्मात्मजागारदारार्थ - स्वतःचा देह, पुत्र, घर, स्त्री, द्रव्य - स्वजनादिषु - व आप्तेष्ट यांच्या ठिकाणी - सत्यधिया भ्रमामि - ती खरी आहेत असे मानून भटकतो ॥२४॥ अनित्यानात्मदुःखेषु - नित्य, आत्मरूप नव्हेत आणि दुःखमय आहेत अशा वस्तूंच्या ठिकाणी - विपर्ययमतिः अहं - उलटबुद्धी झालेला मी - द्वंद्वारामः - सुखदुःखादि द्वंद्वांच्या ठिकाणी रममाण होणारा - तमोविष्टः - अज्ञानाने वेष्टिलेला असा - आत्मनः प्रियं तु - स्वतःचे प्रिय तर - न हि जाने - जाणतच नाही ॥२५॥ अबुधः - अज्ञानी पुरुष - तदुद्भवैः प्रतिच्छनं - त्या उदकापासून उत्पन्न झालेल्या गवतांनी आच्छादिलेल्या - जलं हित्वा - उदकाला सोडून - यथा मृगतृष्णां अभ्येति - जसा मृगजळाकडे धाव घेतो - तद्वत् वै - त्याचप्रमाणे - अहं - मी - त्वा पराङ्गमुखः - तुला सोडून ॥२६॥ कृपणधीः अहं - कृपणबुद्धीचा मी - प्रमाथिभिः अक्षैः - क्षुब्ध झालेल्या डोळ्यांनी - इतस्ततः ह्रियमाणं - इकडे तिकडे हरण केल्या जाणार्या - कामकर्महतं मनः - सकामकर्मांनी दुर्बळ बनलेल्या मनाला - रोद्धुं न उत्सहे - रोधण्यास उत्सुक होत नाही ॥२७॥ ईश - हे श्रीकृष्णा - सः अहं - तो मी - असतां दुरापं तव अङ्घ्रि - दुष्टांना प्राप्त होण्यास कठीण अशा तुझ्या चरणाप्रत - उपगतः अस्मि - प्राप्त झालो आहे - तत् च अपि - आणि तो सुद्धा - भवदनुग्रहः (अस्ति) - तुझा उपकार होय - (इति) मन्ये - असे मी मानतो - अब्जनाभ - हे पद्मनाभा कृष्णा - सदुपासनया - संतांच्या सेवेने - (यदि) त्वयि मतिः स्यात् - जर तुझ्या ठिकाणी बुद्धि जडेल - पुंसः - पुरुषाला - संसरणापवर्गः भवेत् - संसारापासून मुक्ति प्राप्त होईल ॥२८॥ विज्ञानमात्राय - अनुभविक ज्ञान हेच आहे स्वरुप ज्याचे अशा - सर्वप्रत्ययहेतवे - सर्वज्ञानाला कारणीभूत - पुरुषेशप्रधानाय - पुरुषांच्या अधिपतींमध्ये मुख्य अशा - अनन्तशक्तये ब्रह्मणे नमः - अनन्त शक्तीच्या ब्रह्मरुपी तुला नमस्कार असो ॥२९॥ प्रभो हृषीकेश - इंद्रियांचा चालक अशा हे श्रीकृष्णा - सर्वभूतक्षयाय वासुदेवाय ते - सर्व प्राण्यांचा अन्त करणार्या वसुदेवपुत्र अशा तुला - नमः - नमस्कार असो - तुभ्यं च नमः - तुला पुनः नमस्कार असो - प्रपन्नं मां पाहि - शरणागत अशा माझे रक्षण कर ॥३०॥ अध्याय चाळिसावा समाप्त |