श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३० वा - अन्वयार्थ

श्रीकृष्णांच्या विरहात गोपींची अवस्था -

भगवति सहसा एव अन्तर्हिते (सति) - श्रीकृष्ण एकाएकीच गुप्त झाला असता - तं अचक्षाणाः व्रजाङ्‌गनाः - त्याला न पाहणार्‍या गोपी - यूथपं (अचक्षाणाः) करिण्यः इव - कळपाचा नायक अशा हत्तीला न पाहणार्‍या हत्तीणींप्रमाणे - अतप्यम् - दुःख पावल्या. ॥१॥

रमापतेः - लक्ष्मीपतीच्या - गत्या - चालण्याने - अनुरागस्मितविभ्रमेक्षितैः - प्रेमाने गालातल्या गालात हसणे व सभोवार पाहणे यांनी - मनोरमालापविहारविभ्रमैः - मनाला आनंद देणारी भाषणे, हावभाव व शृंगारचेष्टा यामुळे - आक्षिप्तचित्ताः - आकर्षिली आहेत अन्तःकरणे ज्यांची अशा - तदात्मिकाः (ताः) - तन्मय झालेल्या त्या गोपी - ताः ताः विचेष्टाः जगृहुः - त्या त्या चेष्टा करित्या झाल्या. ॥२॥

कृष्णविहारविभ्रमाः - श्रीकृष्णासारखे आहेत हावभाव व शृंगारचेष्टा ज्यांच्या अशा - तदात्मिकाः - तन्मय झालेल्या - प्रियस्य प्रियाः - प्रियकर अशा कृष्णाच्या आवडत्या अशा - (तस्य) गतिस्मितप्रेक्षणभाषणादिषु - त्यांचे चालणे, गालातल्या गालात हसणे, पाहणे, बोलणे - प्रतिरूढमूर्तयः - इत्यादिकांत मुरले आहेत देह ज्यांचे अशा - (ताः) अबलाः - त्या स्त्रिया - असौ अहं (एव अस्मि) - तो श्रीकृष्ण मीच आहे - इति न्यवेदिषुः - असे सांगत्या झाल्या. ॥३॥

संहताः - एकत्र जमलेल्या - अमुं एव उच्चैः गायन्त्यः - त्या श्रीकृष्णालाच मोठ्याने गाणार्‍या अशा - उन्मत्तकवत् - वेडयाप्रमाणे - वनात् वनं विचिक्युः - वनामागून वन शोधत्या झाल्या - आकाशवत् भूतेषु - आकाशाप्रमाणे प्राणिमात्राच्या ठिकाणी - अन्तरं बहिः सन्तं पुरुषम् - आत व बाहेर असणार्‍या अशा पुरुषाविषयी - वनस्पतीन् प्रपच्छ - वृक्षांना विचारत्या झाल्या. ॥४॥

अश्वत्थ प्लक्ष न्यग्रोघ - हे पिंपळा, हे पिंपरी, हे वडा - प्रेमहासावलोकनैः नः - प्रेम, हसणे व पाहणे यांच्या योगे आमचे - मनः हत्वा गतः नन्दसूनुः - मन हरण करून गेलेला नंदाचा पुत्र - वः कच्चित् दृष्टः - तुम्हाला कोठे दिसला काय? ॥५॥

कुरबकाशोक - हे तांबडे कोर्‍हाटे, हे अशोका, - नागपुन्नागचम्पकाः - हे नागचाफ्या, हे उंडीणी, हे सोनचाफ्या - मानिनीनाम् दर्पहर - मानी स्त्रियांचा गर्व हरण करणारे आहे - स्मितः - गालातल्या गालात हसणे ज्याचे - रामानुजः - असा बलरामाचा धाकटा भाऊ - इतः गतः कच्चित् - येथून गेला का ? ॥६॥

गोविन्दचरणप्रियै - गोविंदाचे चरण आहेत प्रिय जिला - तुलसि - अशा हे सुदैवी तुळशी - अलिकुलैः सह त्वा बिभ्रत् - भुंग्याच्या समुदायासह तुला धारण करणारा - ते अतिप्रियः अच्युतः - तुझा अत्यंत आवडता असा श्रीकृष्ण - दृष्टः कच्चित् - तू पाहिलास काय ? ॥७॥

मालति मल्लिके जाति यूथिके - हे मालती, हे मोगरी, हे जाई, हे जुई - करस्पर्शेण वः - हाताच्या स्पर्शाने तुम्हाला - प्रीतिं जनयन् यातः माधवः - आनंद उत्पन्न करीत गेलेला श्रीकृष्ण - वः अदर्शि कच्चित् - तुम्ही पाहिला असावा. ॥८॥

चूतप्रियालपनसासम - रायवळ आंबा, खिरणी, फणस, असाणा, - कोविदारजम्ब्बर्क - कांचन, जांभूळ, रुई, - बिल्वबकुलाम्र - बेल, बकुळ, आंबा, - कदम्बनीपाः - कळंब, व नील अशोक अशा वृक्षांनो - च - तसेच - परार्थभवकाः - दुसर्‍याच्या हितासाठी आहे जन्म असे - ये अन्ये यमुनोपकूलाः (ते) - जे दुसरे यमुनेच्या तीरावर असणारे वृक्ष ते - रहितात्मनां नः - शून्य अंतःकरणाच्या आम्हाला - कृष्णपदवींशंसन्तु - कृष्णाचा मार्ग सांगोत. ॥९॥

क्षिति - हे पृथ्वी - बत - खरोखर - ते किं तपः कृतम् - तू कोणते तप केलेस - केशवाङ्‌घ्रि - श्रीकृष्णाच्या पायाच्या - स्पर्शोत्सवोत्पुलकिताङगरुहैः - स्पर्शामुळे झालेल्या आनंदामुळे उभ्या राहिलेल्या रोमांचांनी - विभासि - तू शोभत आहेस - अपि (अयं ते उत्सवः केशवस्य) - मग काय हा तुझा आनंद श्रीकृष्णाच्या - अङ्‌घ्रिसंभवः (अस्ति) - पादस्पर्शामुळे उत्पन्न झालेला आहे - वा - किंवा - उरुविक्रमात् (अस्ति) - वामनावतारी विष्णूपासून आहे - आहो (स्वित्) - अथवा - वराहवपुषः - वराहरूपी श्रीविष्णूच्या - परिरम्भणे (जातः) - आलिंगनामुळे झालेला आहे. ॥१०॥

सखि एणपत्नि - हे सखि हरिणांगने - गात्रैः वः - अवयवांच्या योगाने तुमच्या - दृशां सुनिर्वृतिं तन्वन् - दृष्टीला अत्यंत संतोष देणारा - अच्युतः - श्रीकृष्ण - प्रियया सह अपि उपगतः - आवडत्या स्त्रीबरोबर येथून गेला काय - कुलपतेः - श्रीकृष्णाच्या - कान्ताङ्गसङग - कांतेच्या अंगसंगामुळे - कुचकुंकुमरञ्जितायाः - तिच्या स्तनांवरील केशराने रंगलेल्या - कुन्दस्रजः - कुंदपुष्पांच्या माळेचा - गन्धः - सुवास - इह वाति - येथे वाहत आहे. ॥११॥

किं वा - किंवा - तरवः - हे वृक्षांनो - गृहीतपद्मः - घेतलेले आहे कमळ ज्याने असा - मदान्धैः - मदाने अंध झालेल्या अशा - तुलसिकालिकुलैः - तुळशीवरील भुंग्यांच्या समुदायांनी - अन्वीयमानः - अनुसरलेला असा - रामानुजः - बळरामाचा धाकटा भाऊ - प्रियांसे बाहुं उपधाय - प्रियेच्या खांद्यावर हात ठेवून - इह चरन् - येथे फिरत असता - प्रणयावलोकैः - प्रेमळ अशा दृष्टीने - वः प्रणामं - तुमच्या नमस्काराचे - अभिनन्दति किम् - अभिनंदन करतो काय ? ॥१२॥

इमाः लताः पृच्छत - या लतांना तुम्ही विचारा - अहो - अहो - वनस्पतेः बाहून् आश्लिष्टाः अपि - झाडांच्या खांद्यांना बिलगलेल्या असताहि - नूनम् - बहुधा - तत्करजस्पृष्टाः - त्या श्रीकृष्णाच्या नखांनी स्पर्शिलेल्या अशा - उत्पुलकानि बिभ्रति - रोमांच धारण करीत आहेत. ॥१३॥

इति - याप्रमाणे - कृष्णान्वेषणकातराः - श्रीकृष्णाला शोधण्याच्या कामात व्याकुळ झालेल्या - तदात्मिकाः - तन्मय अशा - उन्मत्तवचः - वेडयाप्रमाणे भाषण करणार्‍या - गोप्यः - गोपी - भगवतः ताः ताः - श्रीकृष्णाच्या त्या त्या - लीलाः हि अनुचक्रुः - लीलांचे अनुकरण करत्या झाल्या. ॥१४॥

कृष्णायन्ती (गोपी) - कृष्णाप्रमाणे आचरण करणारी एक गोपी - पूतनायन्त्याः कस्याश्चित् - पूतनेप्रमाणे आचरण करणार्‍या कोण्या एका गोपीचा - स्तनं अपिबत् - स्तन पिती झाली - तोकायित्वा रुदती अन्या - लहान मुलाप्रमाणे होऊन रडणारी दुसरी गोपी - शकटायतीम् (गोपीम्) - शकटाप्रमाणे आचरण करणार्‍या गोपीला - पदा अहन् - पायाने मारिती झाली. ॥१५॥

एका दैत्यायित्वा - एक गोपी दैत्याप्रमाणे आचरण करून - कृष्णार्भभावनाम् - श्रीकृष्णाच्या बालपणाची भावना धारण करणार्‍या - अन्याम् - दुसर्‍या गोपीला - जहार - हरण करिती झाली - वा - आणि - घोषनिःस्वनैः - घागर्‍यांचा शब्द करून - अङघ्री कर्षन्ती - पाय ओढीत चालणारी - (अन्या) अपि - दुसरीहि एक गोपी - रिङगयामास - रांगती झाली. ॥१६॥

द्वे - दोन गोपी - कृष्णरामायिते (आस्ताम्) - कृष्ण-बलराम यांसारखे आचरण करणार्‍या झाल्या - तु - आणि - काश्चन - कित्येक गोपी - गोपायन्त्यः (आसन्) - गोपांप्रमाणे आचरण करणार्‍या झाल्या - तत्र च एका - आणि त्यांपैकी एक गोपी - वत्सायतीं हन्ति - वत्सासुराप्रमाणे आचरण करणार्‍या गोपीला मारले - अन्या तु - आणि दुसरी एक गोपी - बकायन्तीम् (हन्ति) - बकासुरासारखे आचरण करणार्‍या गोपीला मारले. ॥१७॥

यद्वत् कृष्णः - ज्याप्रमाणे कृष्ण - दूरगाः (गाः) आहूय - दूर गेलेल्या गाईंना हाका मारी - तद्वत् - त्याप्रमाणे हाका मारून - तम् अनुकुर्वतीम् - त्याचे अनुकरण करणार्‍या - वेणुं क्वणन्तीम् - मुरली वाजविणार्‍या - क्रीडन्तीम् (गोपीम्) - खेळणार्‍या अशा गोपीला - अन्याः - दुसर्‍या गोपी - साधु इति शंसन्ति - उत्तम असे म्हणून वाखाणत्या झाल्या. ॥१८॥

तन्मनाः (काचित्) - कृष्णमय झालेली कोणी एक गोपी - कस्यांचित् - कोण्या एका गोपीच्या ठिकाणी - स्वभुजं न्यस्य - आपला हात ठेवून - अनु चलन्ती (सती) - मागून चालत असता - अपरान् इति आह - दुसर्‍या गोपींना असे म्हणाली - अहं कृष्णः (अस्मि) - मी कृष्ण आहे - (मे) ललितां गतिं पश्यत - माझे सुंदर चालणे पहा. ॥१९॥

वातवर्षाभ्याम् - वारा व पाऊस या दोहोंना - मा भैष्ट - तुम्ही भिऊ नका - मया - मी त्यापासून - तत्राणं विहितं (अस्ति) - तुमचे संरक्षण केले आहे - इति उक्त्वा - असे म्हणून - यतन्ती - प्रयत्न करणारी एक गोपी - एकेन हस्तेन - एका हाताने - अम्बरं उन्निदधे - वस्त्र वर उचलून धरती झाली. ॥२०॥

नृप - हे राजा - एका - एक गोपी - अपरां पदा आक्रम्य - दुसर्‍या एका गोपीला पायाने दाबून - (तस्याः च) आरुह्य - आणि तिच्या मस्तकावर चढून - आह - म्हणाली - दुष्ट अहे - हे दुष्ट सर्पा - गच्छ - चालता हो - ननु - अरे - खलानां दण्डधृक् - दुष्टांच्या करिता दंड धारण करणारा असा - अहं जातः (अस्मि) - मी अवतरलेलो आहे. ॥२१॥

तत्र एका उवाच - त्यापैकी एक गोपी म्हणाली - हे गोपाः - गोप हो, - (एनं) उल्बणं दावाग्निं पश्यत - हा भयंकर वणवा पहा - आशु चक्षूंषि अपिदध्वम् - तुम्ही लवकर डोळे मिटा - अञ्जसा - अनायासाने - वः क्षेमं विधास्ये - मी तुमचे कल्याण करीन. ॥२२॥

तत्र अन्यथा - त्यापैकी दुसर्‍या एका गोपीने - स्रजा उलूखले बद्धा - माळेने उखळाच्या ठिकाणी बांधलेली - भीता - भ्यालेली - काचित् तन्वी - कोणी एक सुंदर स्त्री - सुदृक् आस्यं - सुंदर नेत्र आहेत ज्याच्या ठिकाणी - पिधाय - असे मुख झाकून - भीतिविडम्बनं भेजे - भयाचे अनुकरण करती झाली. ॥२३॥

एवम् - अशा प्रकारे - वृन्दावनलताः तरून् (च) - वृंदावनातील वेलींना व वृक्षांना - कृष्णं पृच्छमानाः (ताः) - कृष्णाविषयी प्रश्न करणार्‍या त्या गोपी - वनोद्देशे - वनातील एका जागी - परमात्मनः पदानि व्यचक्षत - श्रीकृष्णाची पाऊले पाहत्या झाल्या. ॥२४॥

व्यक्तम् - खरोखर - एतानि पदानि - ही पाउले - महात्मनः नन्दसूनोः (एव सन्ति) - महात्म्या नन्दपुत्राचीच आहेत - हि - कारण - ध्वजाम्भोज - ध्वज, कमळ, - वज्राङ्‌कुशयवादिभिः - वज्र, अंकुश, यव इत्यादिकांनी - लक्ष्यन्ते - चिन्हित दिसत आहेत. ॥२५॥

तैः तैः पदैः - त्या त्या पावलांच्या योगाने - तत्पदवीं - त्या श्रीकृष्णाचा - अन्विच्छन्त्यः (ताः) अबलाः - मार्ग शोधणार्‍या त्या स्त्रिया - अग्रतः - पुढे - तानि - ती पावले - वध्वाः पदैः - एका स्त्रीच्या पावलांनी - सुपृक्तानि विलोक्य - मिश्रित झालेली पाहून - आर्ताः (भूत्वा) - पीडित होऊन - समब्रुवन् - म्हणाल्या ॥२६॥

करिणा (सह) करेणोः यथा - हत्तीसह असणार्‍या हत्तिणींप्रमाणे - नन्दसूनुना (सह) यातायाः - नंदपुत्राच्याबरोबर गेलेल्या - च - आणि - (तेन) अंसन्यस्तप्रकोष्ठायाः - जिच्या खांद्यावर हात ठेवला आहे अशा - कस्याः एतानि - कोणत्या स्त्रीची - पदानि (सन्ति) - ही पाउले आहेत ॥२७॥

नूनम् - हिने - भगवान् हरिः ईश्वरः - भगवान श्रीकृष्ण परमात्मा - आराधितः - पूजिला आहे - यत् - कारण - प्रीतः गोविन्दः - प्रसन्न झालेला श्रीकृष्ण - नः विहाय - आम्हाला सोडून - याम् रहः अनयत् - जिला एकान्तस्थली घेऊन गेला ॥२८॥

अहो आल्यः - हे सख्यांनो - अमी गोविन्दाङ्घ्र्‌यब्ज रेणवः - हे श्रीकृष्णाच्या चरणरूपी कमलांतील रेणु - धन्याः - धन्य होत - अघनुत्तये - पापांच्या नाशासाठी - ब्रह्मा ईशः देवी रमा - ब्रह्मदेव, शंकर, व देवी लक्ष्मी ही - यान् - ज्यांना - मूर्ध्रि दधुः - मस्तकावर धारण करती झाली ॥२९॥

यत् - ज्याअर्थी - या एका - जी एकटी - गोपीनां (सर्वस्वं श्रीकृष्णं) - गोपींचे सर्वस्व अशा श्रीकृष्णाला - अपहृत्य - दूर नेऊन - रहः - एकांतित - अच्युताधरं भुङ्क्ते - श्रीकृष्णाच्या अधराचे सेवन करिते - तस्याः अमूनि पदानि - तिचीही पा-ले - नः - आम्हाला - उच्चैः क्षोभं कुर्वन्ति - अत्यंत क्रोध उत्पन्न करीत आहेत ॥३०॥

अत्र तस्याः पदानि न लक्ष्यन्ते - येथे तिची पाउले दिसत नाहीत - नूनम् - बहुधा - तृणाङकुरैः - गवतांच्या टोकांच्या योगाने - खिद्यत्सुजाताङ्‌घ्रियतलाम् - दुखावलेल्या व जिच्या पायाचे तळवे अत्यंत कोमल - (तां) प्रेयसीम् - अशा त्या आवडत्या स्त्रीला - प्रियः - प्रियकर कृष्ण - उन्निन्ये - उचलून घेता झाला. ॥३१॥

महात्मना (कृष्णेन) - उदार अन्तःकरणाच्या श्रीकृष्णाकडून - पुष्पहेतोः - फुलांच्या निमित्ताने - अत्र (सा) कान्ता - येथे ती स्त्री - अवरोपिता - खाली उतरिली गेली - (तेन) प्रेयसा - त्या प्रियकराने - प्रियार्थे - आवडत्या स्त्रीसाठी - अत्र - ह्या ठिकाणी - प्रसूनावचयः कृतः - फुलांचा ढीग केला - प्रपदाक्रमणे - ज्यातील चवडे उचललेले आहेत अशी - एते असकले पदे - ही अर्धी उमटलेली दोन पाउले - पश्यत - तुम्ही पहा. ॥३२॥

अत्र तु - येथे तर - (तेन) कामिना - त्या स्त्रीलंपटाने - (तस्याः) कामिन्याः - त्या सुंदर स्त्रीच्या - केशप्रसाधनं कृतम् - केसांची वेणी घातली - तानि (पुष्पाणि) - ती फुले - कान्तां चूडयता (तेन) - स्त्रीच्या वेणीत घालणार्‍या श्रीकृष्णाने - ध्रुवम् - खरोखर - अत्र उपविष्टम् - येथे बसण्याचे केले असावे. ॥३३॥

अखण्डितः - परिपूर्ण, - आत्मरतः - स्वतःच्या ठिकाणी रममाण होणारा - आत्मारामः च (सन्) अपि - व स्वसंतुष्ट असा असताहि - कामिनां दैन्यम् - कामी पुरुषांचे दुःख - च - आणि - स्त्रीणां दुरात्मताम् एव - स्त्रियांचा दुष्टपणा - दर्शयन् - प्रकट करीत - तया (सह) रेमे - त्या स्त्रीसह क्रीडा करिता झाला. ॥३४॥

इति - याप्रमाणे - एवं - अशाप्रकारचा - (भावं) दर्शयन्त्यः - मनोविकार प्रकट करणार्‍या अशा - ताः विचेतसः गोप्यः - त्या खिन्न अशा गोपी - चेरुः - हिंडत्या झाल्या - अन्याः स्त्रियः विहाय - दुसर्‍या सर्व स्त्रियांना सोडून - यां गोपीम् - ज्या गोपीला - कृष्णः वने अनयत् - श्रीकृष्ण वनात घेऊन गेला - सा च - ती गोपीहि - तदा - त्यावेळी - कामयानाः - प्रेम करणार्‍या - (इतराः) गोपीः हित्वा - इतर गोपींना सोडून - असौ प्रियः मां भजते - हा प्रियकर मला भजतो - इति - असे म्हणून - आत्मानं - स्वतःला - सर्वयोषितां - सर्व स्त्रियांत - वरिष्ठं मेने - श्रेष्ठ असे मानिती झाली. ॥३५-३६॥

ततः - म्हणून - दृप्ता (सा) - गर्विष्ठ अशी ती - वनोद्देशं गत्वा - वनातील एका भागात गेल्यावर - केशवम् अब्रवीत् - श्रीकृष्णाला म्हणाली - अहं चलितुं न पारये - मी चालण्यास समर्थ नाही - यत्र ते मनः - जेथे तुझे मन असेल - (तत्र) मा नय - तेथे मला उचलून घेऊन जा. ॥३७॥

एवं उक्तः - अशारीतीने बोलला गेलेला - कृष्णः - श्रीकृष्ण - स्कन्धे आरुह्यताम् - खांद्यावर बसावे - इति - असे - प्रियां आह - प्रियेला म्हणाला - च - आणि - ततः - नंतर - अन्तर्दधे - गुप्त झाला - सा वधूः - ती स्त्री - अन्वतप्यत - पश्चात्ताप पावली. ॥३८॥

हा - हाय हाय - नाथा - हे नाथा - रमण - हे रमणा - श्रेष्ठ - हे अत्यंत प्रियकरा - क्व असि - तू कोठे आहेस - महाभुज - हे महाबाहो - क्व असि - तू कोठे आहेस - सखे - हे सख्या - कृपणायाः ते दास्याः मे - तुझी अनाथ दासी अशा मला - (ते) संनिधिम् दर्शय - तुझे सान्निध्य दाखव. ॥३९॥

भगवतः मार्गं - श्रीकृष्णाचा मार्ग - अन्विच्छन्त्यः गोप्यः - शोधणार्‍या गोपी - अविदूरतः - जवळच - प्रियविश्लेषमोहिताम् - प्रियकराच्या वियोगाने मूढ झालेल्या - दुःखिताम् - कष्टी अशा - (स्वां) सखीम् - आपल्या मैत्रिणीला - ददृशुः - पाहत्या झाल्या. ॥४०॥

तया कथितं - तिने सांगितलेला वृत्तांत - माधवात् मानप्राप्तिम् - माधवापासून झालेला बहुमानाचा लाभ - च - आणि - (आत्मनः) दौरात्म्यात् - स्वतःच्या हट्टीपणामुळे - अवमानम् - झालेला अपमान - आकर्ण्य - ऐकून - परमं विस्मयं ययुः - अत्यंत आश्चर्याला प्राप्त झाल्या. ॥४१॥

ततः - नंतर - (ताः) स्त्रियः - त्या स्त्रिया - वनं आविशन् - वृंदावनात शिरल्या - यावत् चन्द्रज्योत्स्ना - जोपर्यंत चंद्राचा प्रकाश - विभाव्यते (तावत्) - होता तोपर्यंत - तमः प्रविष्टं आलक्ष्य - अंधकार शिरलेला पाहून - ततः - तेथून - निववृतुः - परतल्या. ॥४२॥

तन्मनस्काः - श्रीकृष्णाकडे लागले आहे मन ज्यांचे अशा - तदात्मिकाः - तन्मय अशा - तदालापाः - त्याच्याविषयी बोलणार्‍या - तद्विचेष्टाः - त्याच्याप्रमाणे आहेत हावभाव ज्यांचे अशा - तद्‌गुणान् एव गायन्त्यः - त्याचेच गुण गाणार्‍या - आत्मागाराणि न सस्मरुः - आपली घरे विसरल्या. ॥४३॥

तदागमनकांक्षिताः - त्याच्या आगमनाची वाट पाहणार्‍या - कृष्णभावनाः - श्रीकृष्णाच्या ठिकाणी आहे भाव ज्यांचा अशा - समवेताः (ताः) - एकत्र जमलेल्या त्या गोपी - पुनः कालिन्द्याः पुलिनं आगत्य - यमुनेच्या वाळवंटावर येऊन - कृष्णं जगुः - श्रीकृष्णाला गात्या झाल्या. ॥४४॥

अध्याय तिसावा समाप्त

GO TOP