|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २९ वा - अन्वयार्थ
रासलीलेचा प्रारंभ - शरदोत्फुल्लमल्लिकाः - शरदृतूमुळे ज्यात मोगरी उमलल्या आहेत - ताः रात्रीः वीक्ष्य - अशा त्या रात्री पाहून - योगमायां उपाश्रितः - योगमायेचा आश्रय केलेला - (सः) भगवान् अपि - तो श्रीकृष्ण सुद्धा - रन्तुं मनः चक्रे - क्रीडा करण्याचे मनात आणिता झाला. ॥१॥ तदा - तेव्हा - दीर्घदर्शनः प्रियः - फार दिवसांनी भेटलेला पति - प्रियायाः (मुखं) अरुणेन इव - पत्नीचे मुख केशराप्रमाणे तांबूस वर्णाचे तसे - प्राच्याः ककुभः मुखं - पूर्वदिशेचे मुख - शंतमैः करैः विलिम्पन् - सुखकारक अशा हातांनी (किरणांनी) व्याप्त करीत - चर्षणीनाम् शुचः मृजन् - लोकांचे दुःख नाहीसे करीत - सः उडुराजः - तो नक्षत्रांचा राजा चंद्र - उदगात् - उदय पावला. ॥२॥ अखण्डमण्डलं - पूर्ण आहे मंडल ज्याचे अशा - रमाननाभम् - लक्ष्मीच्या मुखाप्रमाणे आहे शोभा ज्याची अशा - नवकुंकुमारुणम् - ताज्या केशराप्रमाणे तांबूस वर्णाच्या - कुमुद्वन्तम् - चंद्राला - दृष्ट्वा - पाहून - च - आणि - तत्कोमलगोभिः अञ्जितम् - त्याच्या कोवळ्या किरणांनी युक्त असे - (तत्) वनम् - ते वृंदावन - वामदृशां मनोहरम् - सुंदर स्त्रियांचे मन हरण होईल अशारीतीने - कलम् - मधुर - जगौ - गाता झाला. ॥३॥ तत् अनङ्गवर्धनं गीतं निशम्य - ते कामवासना वाढविणारे असे गाणे ऐकून - कृष्णगृहीतमानसाः - श्रीकृष्णाने हरण केली आहेत मने ज्यांची अशा - अन्योन्यम् अलक्षितोद्यमाः - एकमेकींनी न पाहिलेला आहे उद्योग ज्यांचा अशा - जवलोलकुण्डलाः - चालण्याच्या वेगामुळे हालत आहेत कुंडले ज्यांची अशा - व्रजस्त्रियः - गोकुळवासी स्त्रिया - यत्र सः कान्तः (आसीत् तत्र) - जेथे तो प्रियकर कृष्ण होता तेथे - आजग्मुः - येत्या झाल्या ॥४॥ दुहन्त्याः काश्चित् - दूध काढणार्या कित्येक गोपी - समुत्सुकाः (सत्यः) - अत्यंत उत्सुक होत्सात्या - दोहं हित्वा - दूध काढण्याचे टाकून - अभिययुः - त्याजकडे गेल्या - अपराः (काश्चित्) - दुसर्या कित्येक स्त्रिया - पयः अधिश्रित्य - दूध, चुलीवर ठेवून - संयावं अनुद्वास्य (एवं) - सांजा न उतरताच - ययुः - निघून गेल्या ॥५॥ परिवेषयन्त्यः (काश्चित्) - वाढणार्या कित्येक स्त्रिया - तत् (परिवेषणं) हित्वा (ययुः) - ते वाढणे टाकून गेल्या - शिशून् पयः पाययन्त्यः (काश्चित्) - मुलांना दूध पाजणार्या कित्येक स्त्रिया - पतीन् शुश्रूषन्त्यः (काश्चित्) - पतींची सेवा करीत असलेल्या कित्येक स्त्रिया - (तां) हित्वा - त्या पतिसेवेला टाकून - अश्रन्त्यः काश्चित् - जेवीत असलेल्या कित्येक स्त्रिया - भोजनं अपास्य - जेवण टाकून ॥६॥ लिम्पन्त्यः (काश्चित्) - सारवीत असलेल्या कित्येक स्त्रिया - तत् हित्वा - ते सारवणे टाकून - प्रमृजन्त्यः अन्याः - झाडीत असलेल्या दुसर्या स्त्रिया - लोचने अन्यन्त्यः काः (चित्) - डोळ्यांत काजळ घालणार्या कित्येक स्त्रिया - काश्चित् व्यत्यस्तवस्त्राभरणाः - कित्येकांचे वस्त्रे व अलंकार विस्कळित अशा - कृष्णान्तिकं ययुः - श्रीकृष्णाच्या जवळ गेल्या ॥७॥ गोविंदापहृतात्मानः - श्रीकृष्णाने हरण केले आहे मन ज्यांचे अशा - मोहिताः - मूढ झालेल्या अशा - ताः - त्या स्त्रिया - पतिभिः पितृभिः भ्रातृबन्धुभिः (च) - पतींकडून, बापांकडून व भाऊबंदांकडून - वार्यमाणाः (अपि) - निवारण केल्या गेल्या असताहि - न न्यवर्तन्त - परतल्या नाहीत ॥८॥ अन्तर्गृहगताः - घराच्या आतल्या भागात गेलेल्या - अलब्धविनिर्गमाः - मिळाले नाही बाहेर पडण्यास ज्यांना अशा - काश्चित् गोप्यः - कित्येक गोपी - तद्भावनायुक्ताः - त्याजविषयीच्या भावनेने युक्त अशा - मीलितलोचनाः (भूत्वा) - मिटलेले आहेत डोळे ज्यांनी अशा होऊन - कृष्णं दध्युः - कृष्णाचे ध्यान करित्या झाल्या ॥९॥ दुःसहप्रेष्ठविरह - सहन करण्यास कठीण असा जो अत्यंत प्रियकराचा वियोग - तीव्रतापधुताशुभाः - त्याच्या भयंकर पीडेने दूर केले आहे पाप ज्यांचे अशा - ध्यानप्राप्ताच्युताश्लेष निवृत्त्या - ध्यानाने प्राप्त झालेल्या श्रीकृष्णाच्या आलिंगनाच्या सुखाने - क्षीणमङ्गलाः (जाता) - नष्ट झाले आहे पुण्य ज्याचे अशा झाल्या ॥१०॥ जारबुद्ध्या अपि - कृष्ण जार आहे अशा बुद्धीने सुद्धा - तम् एव परम् आत्मानम् सङ्गवाः - त्याच श्रेष्ठ अशा ईश्वराशी संगत झालेल्या अशा - प्रक्षीणबन्धनाः - नष्ट झाले आहे बंधन ज्यांचे अशा - ताः - त्या गोपी - सद्यः - लगेच - गुणमयम् देहम् - गुणकार्यमय देहाला - जहुः - टाकित्या झाल्या ॥११॥ मुने - हे शुकाचार्य - कृष्णं - श्रीकृष्णाला - परंकान्तम् - श्रेष्ठ असा पति - विदुः - मानीत होत्या - नतु ब्रह्मतया (विदुः) - ईश्वर स्वरुपाने जाणत नव्हत्या - गुणधियां तासाम् - त्रिगुणात्मक आहे बुद्धि ज्यांची अशा त्यांच्या - गुणप्रवाहोपरमः कथं (संजातः) - त्रिगुणांच्या प्रवाहाचा शेवट कसा झाला ॥१२॥ एतत् - हे - ते - तुला - पुरस्तात् - पूर्वी - उक्तं - सांगितले आहे - यथा - जेणेकरुन - हृषीकेशं द्विषन् अपि चैद्यः - श्रीकृष्णाचा द्वेष करणारा असाहि शिशुपाल - सिद्धिं गतः - मोक्षास गेला - उत अधोक्षजप्रियाः किम् - मग श्रीकृष्ण ज्यांचा प्रियकर अशा गोपी तर काय, ॥१३॥ नृप - हे राजा - अव्ययस्य - अविनाशी अशा - अप्रमेयस्य - ज्यांचे यथार्थ ज्ञान होणे कठीण अशा - निर्गुणस्य - गुणरहित अशा - गुणात्मनः - तीन गुण हाच आहे आत्मा ज्याचा अशा - भगवतः - ईश्वराचे - व्यक्तिः - प्रकट होणे - नृणां निःश्रेयसार्थाय (एव भवति) - मनुष्य़ांच्या मोक्षासाठीच असते ॥१४॥ कामं क्रोधं स्नेहं सौहृदं च - इच्छा, राग, प्रेम, ऐक्य आणि मैत्री - नित्यं हरौ एव विदधतः ते - नेहमी परमेश्वराच्याच ठिकाणी प्रेम ठेवणारे ते पुरुष - हि - खरोखर - तन्मयतां यान्ति - त्याच्या स्वरूपाला प्राप्त होतात ॥१५॥ च - आणि - अजे - जन्मरहित अशा - योगेश्वरेश्वरे - योगेश्वरांमध्येहि श्रेष्ठ अशा - भगवति कृष्णे - भगवान श्रीकृष्णाविषयी - भवता एवं विस्मयः न कार्यः - तुझ्याकडून असे आश्चर्य दर्शविले जाऊ नये ॥१६॥ ताः वज्रयोषितः - त्या गोकुळातील स्त्रिया - अन्तिकं आयाताः दृष्ट्वा - जवळ आलेल्या पाहून - वदतां श्रेष्ठः - वक्त्यांमध्ये श्रेष्ठ असा - वाचः पेशैः विमोहयन् - वाणीच्या सौंदर्याने मोहून टाकीत - अवदत् - म्हणाला ॥१७॥ महाभागाः - हे महाभाग्यशाली स्त्रियांनो - वः स्वागतम् (अस्तु) - तुमचे स्वागत असो - वः किम् प्रिय करवाणि - तुमची कोणती प्रिय गोष्ट मी करू - व्रजस्य अनामयं कश्चित् - गोकुळाचे कुशल आहे ना - आगमनकारणं ब्रूत - येण्याचे कारण सांगा ॥१८॥ सुमध्यमाः - हे सुंदर स्त्रियांनो - एषा रजनी - ही रात्र - घोररुपा - भयंकर आहे रूप जिचे अशी - महासत्त्वनिशेविता (अस्ति) - मोठमोठ्या प्राण्यांनी सेविलेली अशी आहे - व्रजं प्रतियात - तुम्ही गौळवाड्यांत परत जा - स्त्रीभिः इह न स्थेयम् - स्त्रियांनी येथे रहाणे योग्य नाही ॥१९॥ हि - कारण - (वः) अपश्यन्तः - तुम्हाला न पहाणारे - वः - तुमचे - मातरः पितरः भ्रातरः पतयः पुत्राः च - आई, बाप, भाऊ, पति आणि पुत्र - (वः) विचिन्वन्ति - तुम्हाला शोधतील - (एवं) बन्धुसाध्वसम् मा कृध्वं - असे बांधवांना कष्ट देऊ नका ॥२०॥ कुमुदितम् - तांबडया कमळांनी युक्त - राकेशकररञ्जितम् - पूर्णिमेच्या पूर्ण चंद्राच्या किरणांनी रंगविलेले - यमुनानिललीलैजन् - यमुनेवरील वार्याच्या योगाने डौलाने हालणार्या - तरुपल्लवशोभितम् - झाडांच्या पालवीमुळे शोभणारे असे - (एतत्) वनम - हे वृंदावन - (युष्माभिः) दृष्टम् - तुम्ही पाहिले. ॥२१॥ तत् - तर - सतीः - हे साध्वी स्त्रियांनो - गोष्ठं यात - तुम्ही गौळवाडयात जा - चिरं मा - वेळ लावू नका - पतीन् शुश्रूषध्वम् - पतींची सेवा करा - बालाः क्रन्दन्ति - मुले रडत असतील - वत्साः च (क्रन्दन्ति) - आणि वासरे हंबरत असतील - तान् पाययत - त्यांना पाजा - दुह्यत - दूध काढा. ॥२२॥ अथवा - पण बहुधा - मदभिस्नेहात् - माझ्यावरील निकट प्रेमामुळे - यन्त्रिताशयाः - जडले आहे मन ज्यांचे अशा - भवत्यः - तुम्ही - आगताः - आलेल्या आहा - वः - तुम्हाला - उपपन्नं (अस्ति) - योग्य आहे - हि - कारण - जन्तवः - सर्व प्राणी - मयि प्रीयन्ते - माझ्य़ाठिकाणी प्रेम करितात. ॥२३॥ भर्तुः - पतीची - अमायया - निष्कपटपणाने - शुश्रूषणम् - सेवा करणे - च - आणि - तद्बंधूनाम् कल्याणम् - त्याच्या भावांचे कल्याण करणे - च - आणि - अनुपोषम् - मुलाबाळांचे पोषण करणे - (अयं) हि स्त्रीणां परः धर्मः (अस्ति) - हाच स्त्रियांचा श्रेष्ठ असा धर्म होय.॥२४॥ लोकेप्सुभिः स्त्रीभिः - स्वर्गादि लोकांची इच्छा करणार्या स्त्रियांनी - दुःशीलः - वाईट आहे वर्तन ज्याचे असा - दुर्भगः - दुर्दैवी - वृद्धः - म्हातारा - जडः - मूर्ख - रोगी - रोगयुक्त - वा - अथवा - अधनः अपि - ज्याच्याजवळ द्रव्य नाही असा सुद्धा - पतिः - पति - अपातकी (चेत्) - जर निष्पाप असेल तर - न हातव्यः - टाकण्यास योग्य नाही. ॥२५॥ कुलस्त्रियाः - कुलीन स्त्रीचा - औपपत्यम् - जाराशी संबंध - अस्वर्ग्यम् - स्वर्गप्राप्तीस विघातक - अयशस्यम् - अपकीर्ति करणारा - फल्गु - क्षुद्र - कृच्छ्रम् - कष्टाचा - भयावहम् - धोक्याचा - च - आणि - सर्वत्र जुगुप्सितम् (अस्ति) - सर्वांनी निंदिलेला आहे. ॥२६॥ (मम) श्रवणात् - लीला ऐकण्यापासून - दर्शनात् - दर्शनापासून - ध्यानात् - ध्यानापासून - अनुकीर्तनात् - गुणवर्णनापासून - (यथा) मयि भावः (भवति) - जशी माझ्य़ाठायी भक्ति जडते - तथा संनिकर्षात् - तशी शरीरसंबंधापासून जडत नाही - ततः गृहान् प्रतियात - यास्तव तुम्ही घरी जा. ॥२७॥ इति - याप्रमाणे - विप्रियं गोविन्दभाषितम् आकर्ण्य - न आवडणारे असे कृष्णाचे भाषण ऐकून - विषण्णाः भग्नसंकल्पाः गोप्यः - दुःखित व भंगला आहे मनोरथ ज्यांचा अशा गोपी - दुरत्ययां - दूर होण्यास अत्यंत कठीण अशा - चिन्ताम् आपुः - काळजीप्रत प्राप्त झाल्या. ॥२८॥ उरुदुःखभराः (ताः) - मोठा आहे दुःखाचा भार ज्यांचा अशा त्या गोपी - शुचः श्वसनेन - शोकाच्या श्वासोच्छ्वासांमुळे - शुष्यद्बिम्बाधराणि - ज्यांचे ओठ सुकले आहेत - मुखानि अवकृत्वा - अशी आपली तोंडे खाली करून - चरणेन भुवं लिखन्त्यः - पायाने जमीन खरवडीत - उपात्तमषिभिः अस्रैः - मिसळलेले आहे काजळ ज्यांमध्ये अशा अश्रूंनी - कुचकुंकुमानि मृजन्त्यः - स्तनांवरील केशराच्या उटया धुवून टाकीत - तूष्णीं तस्थुः स्म - स्तब्ध राहिल्या. ॥२९॥ तदर्थविनिवर्तितसर्वकामाः - त्याच्यासाठी सोडलेल्या आहेत सर्व इच्छा ज्यांनी अशा - अनुरक्ताः (ताः) - प्रेमळ गोपी - रुदितोपहते नेत्रे विमृज्य - रडण्याने त्रासलेले डोळे पुसून - किंचित् संरम्भगद्गदगिरः - थोडयाशा व्यग्रतेमुळे अडखळत आहे वाणी ज्यांची अशा - प्रियेतरं इव - अप्रिय मनुष्याप्रमाणे - प्रतिभाषमाणं प्रेष्ठं कृष्णम् - उत्तर देणार्या अत्यंत आवडत्या श्रीकृष्णाला - अब्रुवत स्म - म्हणाल्या. ॥३०॥ विभो - हे श्रीकृष्णा - भवान् - तू - एवं नृशंसं गदितुं मा अर्हति - असे कठोर बोलण्यास योग्य नाहीस - दूरवग्रह - हे हट्टी श्रीकृष्णा - सर्वविषयान् संत्यज्य - सर्व प्रपंचसुखाला टाकून - (वयं) तव पादमूलं (आश्रिताः) - आम्ही तुझ्या चरणाचा आश्रय केला आहे - भक्ताः अस्मान् मा त्यज - भक्त अशा आम्हाला टाकू नको - देव - हे श्रीकृष्णा - यथा आदिपुरुषः - ज्याप्रमाणे श्रीविष्णु - मुमुक्षून् भजते (तथा) - मोक्षाची इच्छा करणार्यांना स्वीकारितो त्याप्रमाणे - (अस्मान्) भजस्व - तू आमचा स्वीकार कर. ॥३१॥ अङग - हे श्रीकृष्णा - धर्मविदा त्वया - धर्म जाणणार्या तुझ्याकडून - पत्यपत्य सुहृदाम् अनुवृत्तिः - पति, मुले व मित्र यांची सेवा - स्त्रीणां स्वधर्मः (अस्ति) - स्त्रियांचा स्वधर्म होय - इति यत् उक्तम् - असे जे सांगितले गेले - एतत् - हे - ईशे त्वयि उपदेशपदे (सति) - सर्वसमर्थ असा तू उपदेश करणार्याच्या स्थानी असता - एवम् अस्तु - असेच असो - तनुभृतां बन्धुः आत्मा भवान् - प्राणिमात्रांचा हितकर्ता व अंतर्यामी असा तू - (तेषां) प्रेष्ठः (अस्ति) - त्यांना अत्यंत प्रिय आहेस. ॥३२॥ आत्मन् - हे परमेश्वरा - कुशलाः - सुशिक्षित लोक - त्वयि (एव) रतिं कुर्वन्ति - तुझ्या ठिकाणीच प्रेम करितात - हि - कारण - नित्यप्रिये स्वे (सति) - निरंतर प्रिय असा आत्मा अस्तित्वात असता - आर्तिदैः - दुःख देणार्या अशा - पतिसुतादिभिः किम् - पति, पुत्र इत्यादिकांशी काय कर्तव्य आहे - तत् - तर - परमेश्वर - हे परमेश्वरा - नः प्रसीद - आम्हावर प्रसन्न हो - अरविन्दनेत्र - हे कमलनेत्रा श्रीकृष्णा - व्ययि चिरात् भृतां आशां - तुझ्या ठिकाणी फार काळापासून धारण केलेल्या आशेला - मा स्म छिन्द्याः - नकोच तोडू. ॥३३॥ यत् चित्तं गृहेषु सुखेन निर्विशति (स्म) - जे मन गृहकृत्यात सुखाने लागावयाचे - (तत्) उत भवता अपहृतम् - ते तर तुझ्याकडून हरण केले गेले - करौ अपि गृहकृत्ये (न चलतः) - हातहि गृहकृत्यात चालत नाहीत - पादौ - पाय - तव पादमूलात् - तुझ्या चरणापासून - पदं अपि न चलतः - एक पाऊलहि हालत नाहीत - अथ - मग - व्रजं कथं यामः - आम्ही गोकुळात कसे जावे - वा - अथवा - किं करवाम - काय करावे. ॥३४॥ अङग - हे कृष्णा - नः - आमच्या - हासावलोक - हास्यपूर्वक पाहण्याने - कलगीतजहृच्छयाग्निम् - व मधुर गाण्याने उत्पन्न झालेल्या मदनाग्नीला - त्वदधरामृतपूरकेण - तुझ्या अधरामृताच्या वृष्टीने - सिञ्च - तू भिजवून टाक - नो चेत् - नाही तर - सखे - हे सख्या श्रीकृष्णा - विरहजाग्नि - वियोगामुळे उत्पन्न झालेल्या अग्नीने - उपयुक्तदेहाः वयम् - खाल्लेला आहे देह ज्यांचा अशा आम्ही - ध्यानेन - चिंतनाने - ते पदयोः पदवीं याम - तुझ्या चरणांच्या स्थानाप्रत जाऊ. ॥३५॥ अम्बुजाक्ष - हे कमलनेत्रा श्रीकृष्णा - यर्हि - जेव्हा - क्वचित् - एकदा - रमायाः अपि दत्तक्षणं - लक्ष्मीला सुद्धा दिला आहे क्षणभर अवकाश ज्याने अशा - अरण्यजनप्रियस्य तव - अरण्यातील लोक आहेत प्रिय ज्याला अशा तुझ्या - पादतलं - पायाच्या तळव्याला - अस्प्राक्ष्म - आम्ही स्पर्श केला - तत्प्रभृति - तेव्हापासून - अङ्ग - हे श्रीकृष्णा - त्वया अभिरमिताः (वयं) - तुझ्याशी रममाण झालेल्या आम्ही - अन्यसमक्षं स्थातुं - दुसर्याच्या समोर उभ्या राहण्यास - न बत पारयामः - खरोखर समर्थ नाही ॥३६॥ यस्याः किल स्ववीक्षणकृते - खरोखर जिच्या आपल्याकडे होणार्या अवलोकनासाठी - अन्यसुरप्रयासः (अस्ति) - इतर देवांचा प्रयत्न असतो - (सा) लक्ष्मी - ती लक्ष्मी - वक्षसि पदं लब्ध्वा अपि - वक्षःस्थलावरील स्थान मिळवूनसुद्धा - यत् - जशी - तुलस्या - तुळशीसह - भृत्यजुष्टं - भक्तांनी सेविलेल्या अशा - पदाम्बुजरजः चकमे - चरणरुपी कमळांतील परागांची इच्छा करिती झाली - तद्वत् वयं च - तशाच आम्हीहि - तव पादरजः प्रपन्नाः (स्मः) - तुझ्या पायांच्या धुळीला शरण आलो आहोत ॥३७॥ तत् - तर - त्वदुपासनाशाः (वयं) - तुझी उपासना हीच आहे इच्छा ज्यांची अशा आम्ही - वसतीः विसृज्य ते अङ्घ्रिमूलं प्राप्ताः - घरे सोडून तुझ्या पायांशी आलो आहो - नः प्रसीद - आम्हांवर प्रसन्न हो - पुरुषभूषण - हे पुरुषोत्तमा - त्वत्सुंदरस्मितनिरीक्षण - तुझ्या सुंदर अशा हसण्याने व निरखून पहाण्याने - तीव्रकामतप्तात्मनाम् (नः) - तीव्र कामवासनामुळे तापलेली अंतःकरणे अशा आम्हाला - (ते) दास्यं देहि - तुझी सेवा दे ॥३८॥ कुण्डलश्रीगण्डस्थलाधरसुधं - कुंडलांमुळे शोभणारे गाल व अधरामृत आहे ज्यामध्ये असे - हसितावलोकं - हास्यपूर्वक आहे पहाणे ज्यामध्ये असे - ते अलकावृतमुखम् वीक्ष्य - तुझे केसांनी आच्छादिलेले मुख पाहून - च - आणि - दत्ताभयं - दिले आहे अभय जिने अशा - भुजदण्डयुगं - बाहूंच्या जोडीला - च - आणि - श्रियकरमणं वक्षः - लक्ष्मीचे एकटीचेच क्रीडास्थान अशा छातीला - विलोक्य - पाहून - (ते) दास्यः भवाम - आम्ही तुझ्या दासी व्हावे ॥३९॥ अङ्ग - हे श्रीकृष्णा - ते कलपदायतमूर्च्छितेन (गीतेन) - तुझ्या मधुर आलापांनी उंच सुरावर गायिलेल्या गाण्याने - च - आणि - गोद्विजद्रुममृगाः - गाई, पक्षी, वृक्ष, व पशु - यत् (निरीक्ष्य) - जे पाहून - पुलकानि अबिभ्रन् - रोमांच धारण करिते झाले - (तत्) इदं त्रैलोक्यसौभगं - ते हे तिन्ही लोकांत सुंदर असे - रूपं निरीक्ष्य - रूप पाहून - संमोहिता - मोहित झालेली अशी - का स्त्री - कोणती स्त्री - आर्यचरितात् न चलेत् - श्रेष्ठ अशा चरित्र्यापासून भ्रष्ट होणार नाही ॥४०॥ भवान् - तू - व्रजभयार्तिहरः - गोकुळाचे भय व दुःख हरण करणारा - अभिजातः - असा अवतीर्ण झाला आहेस - यथा (त्वं) सुरलोकगोप्ता - जसा तू स्वर्गाचे पालन करणारा - देवः आदिपुरुषः (असि) - असा भगवान विष्णु आहेस - तत् - तर - आर्तबन्धो - हे अनाथांच्या जिवलगा श्रीकृष्णा - नः किंकरीणां - दासी अशा आमच्या - तप्तस्तनेषुच शिरस्सु च - तापलेल्या स्तनांवर आणि मस्तकांवर - (तव) करपङ्कजं निधेहि - तुझे हस्तकमल ठेव ॥४१॥ योगेश्वरः - योगेश्वरांमध्ये श्रेष्ठ असा श्रीकृष्ण - आत्मारामः (सन्) अपि - स्वत:च्या ठिकाणी आहे संतोष ज्याचा असा असूनहि - तासां इति विक्लवितं श्रुत्वा - त्यांचे असे दीन भाषण ऐकून - सदयं प्रहस्य - दयेने हसून - गोपीः अरीरमत् - गोपींना रमविता झाला ॥४२॥ उदारचेष्टितः - मधुर आहेत हावभाव ज्याचे असा - उदारहासद्विजकुन्ददीधितिः - हसताना दंतरूपी कुंदांच्या कळ्यांचे उत्कृष्ट तेज असा - अच्युतः - श्रीकृष्ण - प्रियेक्षणोत्फुल्लमुखीभिः - प्रियकराच्या पहाण्यामुळे प्रफुल्लित मुखे झालेल्या - समेताभिः ताभिः - एकत्र जमलेल्या त्या गोपींच्या योगाने - उडुभिः वृतः ऐणाङ्कः इव - नक्षत्रांनी वेष्टिलेल्या चंद्राप्रमाणे - व्यराजत - शोभला ॥४३॥ वैजयन्तीं मालां बिभ्रत् - वैजयंती माळ धारण करणारा असा - उपगीयमानः उद्गायन् - स्तविला गेला असता मोठ्याने गाणारा असा - वनिताशतयूथपः (सः) - शेकडो स्त्रियांच्या समुदायाचा पुढारी असा तो श्रीकृष्ण - वनं मण्डयन् - वनाला भूषवीत - व्यचरत् - हिंडता झाला ॥४४॥ नद्याः - नदीच्या - हिमवालुकम् - थंड आहे वाळू ज्यावरील अशा - पुलिनं आविश्य - वाळवंटावर जाऊन - तत्तरलानन्दकुमुदामोदवायुना - सुखकारक व तांबड्या कमळांनी सुगंधित वार्याच्या योगाने - (सः) गोपीभिः रेमे - तो गोपींसह क्रीडा करता झाला ॥४५॥ बाहुप्रसारपरिरम्भ - हात पसरणे, आलिंगन देणे, - करालकोरुनीवीस्तन - हात, केंस, मांड्या, वस्त्रांच्या निर्या, स्तन, - आलभननर्मनखाग्रपातैः - यांना स्पर्श करणे, थट्टा करणे, नखांनी टोचणे यांनी - क्ष्वेल्या अवलोकहसितैः - थट्टेने पहाण्यांनी व हसण्यांनी - व्रजसुंदरीणां रतिपतिं उत्तम्भयन् - गोकुळातील सुंदर स्त्रियांच्या मदनाला उत्तेजित करीत - (सः) - तो श्रीकृष्ण - (ताः) रमयांचकार - त्यांना रमविता झाला ॥४६॥ एवं - अशा रीतीने - महात्मनः भगवतः कृष्णात् - महात्मा अशा भगवान श्रीकृष्णापासून - लब्धमानाः - मिळाला आहे बहुमान ज्यांना अशा - (ताः) मानिन्यः - त्या मानी गोपस्त्रिया - आत्मानं - स्वतःला - भुवि (विद्यमानानां) - पृथ्वीवरील सर्व - स्त्रीणाम् अभ्यधिकं मेनिरे - स्त्रियांच्यापेक्षा श्रेष्ठ मानत्या झाल्या ॥४७॥ तासां तत्सौभगमदं - त्यांचा तो सुदैवाविषयीचा अभिमान - (तं) मानं च वीक्ष्य - व तो मानीपणा पाहून - (तत्) प्रशमाय - त्यांच्या शांतीसाठी - (तासांच) अनुग्रहाय - आणि त्यांजवर कृपा करण्यासाठी - केशवः - श्रीकृष्ण - तत्र एव - तेथेच - अन्तरधीयत् - गुप्त झाला ॥४८॥ अध्याय एकोणतिसावा समाप्त |