|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २२ वा - अन्वयार्थ
वस्त्रहरण - हेमंते - हेमंत ऋतूतील - प्रथमे मासि - पहिल्या महिन्यात म्हणजे मार्गशीर्षात - नंदव्रजकुमारिकाः - नंदाच्या गोकुळातील मुली - हविष्यं भुंजानाः - हविष्यान्न भक्षण करीत - कात्यायन्यर्चनव्रतं चेरुः - कात्यायनीचे पूजनरूप व्रत करित्या झाल्या. ॥१॥ नृप - हे परीक्षित राजा - च - आणि - उदिते अरुणे - अरुणोदय झाला असता - कालिंद्याः अंभसि आप्लुत्य - कालिंदीच्या जलांत स्नान करून - जलांते - पाण्याजवळ - सैकतीं प्रतिकृतिं कृत्वा - वाळूची मूर्ती करून - देवीं - देवीला - आनर्चुः - पूजित्या झाल्या. ॥२॥ गंधैः सुरभिभिः माल्यैः - गंध व सुवासिक फुले - धूपदीपकैः बलिभिः (च) - धूप, दीप व नैवेद्य यांनी - उच्चावचैः उपहारैः च - व लहानमोठया अर्पण करण्यायोग्य वस्तूंनी - प्रवालफलतण्डुलैः - कोवळी पाने, फळे व तांदुळ यांनी ॥३॥ महामाये कात्यायनि - हे महामाये कात्यायनि - महायोगिनि अधीश्वरि - हे महासामर्थ्यवती श्रेष्ठ ईश्वरी - देवि - हे देवी - नंदगोपसुतं - नंदाचा मुलगा जो कृष्ण - मे पतिं कुरु - त्याला माझा पति कर - ते नमः - तुला नमस्कार असो - इति मंत्रं जपंत्यः - याप्रमाणे मंत्र जपणार्या - ताः कुमारिकाः - त्या कुमारिका. ॥४॥ एवं - याप्रमाणे - कृष्णचेतसः कुमार्यः - कृष्णाकडे चित्त आहे ज्यांचे अशा त्या मुली - मासं व्रतं चेरुः - महिनाभर व्रत करित्या झाल्या - नंदसुतः - नंदाचा मुलगा कृष्ण - पतिः भूयात् (इति उक्त्वा) - आमचा पति होवो असे म्हणून - भद्रकालीं समानर्चुः - भद्रकाली देवीची उत्तम पूजा करित्या झाल्या. ॥५॥ अन्वहं - प्रतिदिवशी - उषसि उत्थाय - पहाटे उठून - अन्योन्याबद्धबाहवः - एकमेकींचे धरिले आहेत हात ज्यांनी अशा त्या गोपकन्या - कालिन्द्यां स्नातुं यान्त्यः - यमुनेवर स्नानासाठी जात असता - स्वैः नामभिः - स्वतःच्या नावानी - कृष्णं उच्चैः जगुः - कृष्णाची उच्च स्वराने स्तुति करू लागल्या. ॥६॥ कदाचित् नद्यां आगत्य - एके दिवशी नदीवर आल्यावर - पूर्ववत् - पूर्वीप्रमाणे - तीरे वासांसि निक्षिप्य - नदीच्या तीरी नेसलेली वस्त्रे सोडून ठेऊन - कृष्णं गायंत्यः - कृष्णाची स्तुति गात - मुदा सलिले विजह्लुः - आनंदाने पाण्यात क्रीडा करू लागल्या. ॥७॥ योगेश्वरः - योगांचा अधिपति असा - भगवान् कृष्णः - भगवान श्रीकृष्ण - तत् अभिप्रेत्य - ते जाणून - वयस्यै वृतः - आपल्या सवंगडयासह - तत्कर्मसिद्धये - त्या मुलींच्या व्रताची सिद्धि करण्याकरिता - तत्र आगतः - त्याठिकाणी आला. ॥८॥ तासां वासांसि उपादाय - त्यांची वस्त्रे घेऊन - सत्वरः नीपं आरुह्य - त्वरेने कदंबाच्या झाडावर चढून - बालैः सह प्रहसन् - बालकांसह हसत - परिहासं उवाच ह - थट्टेने बोलता झाला. ॥९॥ अबलाः - मुलींनो - कामं अत्र आगत्य - खरोखर येथे येऊन - स्वं स्वं वासः प्रगृह्यतां - आपापले वस्त्र घ्यावे - सत्यं ब्रवाणि - मी खरे सांगतो - नो नर्म - थट्टा नाही - यत् यूयं व्रतकर्शिताः - कारण तुम्ही व्रताने कृश झाल्या आहात. ॥१०॥ वा - खरोखर - मया - माझ्याकडून - अनृतं उदितपूर्वं न - खोटे पूर्वी बोलले गेले नाही - तत् इमे विदुः - ते हे गोपबालक जाणत आहेत - सुमध्यमाः - हे सुंदर मुलींनो - एकैकशः (आगत्य) प्रतीच्छध्वं - तुम्ही एकएकटया येऊन वस्त्रे घ्या - उत सह एव - किंवा समागमे येऊन घ्या. ॥११॥ प्रेमपरिप्लुताः गोप्यः - प्रेमरसात निमग्न झालेल्या गोपी - तस्य तत् - त्याची ती - क्ष्वेलितं दृष्टवा - थट्टा पाहून - व्रीडिताः जातहासाः च - आणि लज्जित होऊन हसणार्या त्या - अन्योन्यं प्रेक्ष्य - एकमेकींकडे पाहून - न निर्ययुः - बाहेर पडल्या नाहीत. ॥१२॥ एवं ब्रुवति गोविंदे - याप्रमाणे श्रीकृष्ण म्हणाला असता - नर्मणा आक्षिप्तचेतसः - उपहासाने ज्यांचे अंतःकरण विरघळले आहे अशा - शीतोदे आकंठमग्नाः - थंड पाण्यात गळ्यापर्यंत बुडालेल्या - वेपमानाः तं अब्रुवन् - कापत कापत कृष्णाला म्हणाल्या. ॥१३॥ भो - हे कृष्णा - अनयं मा कृथाः - अन्याय करू नकोस - अंग - अरे - त्वां तु - तुला तर - व्रजश्लाघ्यं - गोकुळाला स्तुत्य असा - गोपसुतं - नंदाचा आवडता मुलगा - जानीमः - आम्ही जाणतो - वासांसि देहि - वस्त्रे दे - वयं वेपिताः (स्मः) - आम्ही कांपत आहो. ॥१४॥ श्यामसुंदर - हे श्यामवर्णाच्या रमणीयमूर्ते - (वयं) ते दास्यः - आम्ही तुझ्या दासी आहो - तव उदितं करवाम - तू सांगितलेले आम्ही करू - धर्मज्ञ वासांसि देहि - हे धर्म जाणणार्या कृष्णा, वस्त्रे दे - नो चेत् (ददासि तर्हि) - जर न देशील तर - राज्ञे ब्रुवामहे - आम्ही राजाला सांगू. ॥१५॥ शुचिस्मिताः - हे पवित्र हास्य करणार्या कुमारिकांनो - यदि भवत्यः मे दास्यः - जर तुम्ही माझ्या दासी आहात - वा मया उक्तं करिष्यथ - आणि मी जे सांगेन ते करणार्या आहात - अत्र आगत्य - ह्या ठिकाणी येऊन - स्ववासांसि प्रतीच्छध्वं - आपापली वस्त्रे घेऊन जा. ॥१६॥ ततः सर्वाः दारिकाः - तदनंतर सर्व कुमारिका - शीतवेपिताः शीतकार्षिकाः - थंडीने कापरे सुटलेल्या व थंडीने कृश झालेल्या - पाणिभ्यां योनिं आच्छाद्य - दोन्ही हातांनी गुह्यांगे झाकून - जलाशयात् प्रोत्तेरुः - डोहातून बाहेर उतरल्या. ॥१७॥ शुद्धभावप्रसादितः भगवान् - निर्मल भक्तीने प्रसन्न झालेला श्रीकृष्ण - आहताः वीक्ष्य - अक्षतयोनि अशा त्यांना पाहून - प्रीतः - संतुष्ट झालेला - स्कंधे वासांसि निधाय - खांद्यावर वस्त्रे ठेऊन - सस्मितं प्रोवाच - हसत म्हणाला. ॥१८॥ यत् यूयं धृतव्रताः (सत्यः) - ज्यापेक्षा तुम्ही व्रत आचरण करणार्या असून - विवस्त्राः अपः व्यगाहतः - नग्न होऊन पाण्यात स्नान केले - तत् उ एतत् - त्यापेक्षा खरोखर हे - देवहेलनं (जातम्) - खरोखर देवांचे विडंबन झाले आहे - अंहसः अपनुत्तये - या पापाच्या क्षालनाकरिता - मूर्ध्नि अंजलिं बद्ध्वाः - मस्तकावर हात जोडून - अधः नमः कृत्वा - खाली वाकून नमस्कार करून - वसनं प्रगृह्यतां - वस्त्रे घ्यावी. ॥१९॥ इति अच्युतेन अभिहितं - याप्रमाणे कृष्णाने सांगितलेले - विवस्त्राप्लवनं - नग्न होऊन स्नान करणे हे - व्रतच्युतिं मत्वा - व्रतापासून भ्रष्ट होणे आहे असे मानून - तत्पूर्तिकामाः - ते व्रत पूर्ण करण्याची इच्छा करणार्या त्या मुली - तदशेषकर्मणां - त्या व इतर सर्व कर्मांचा - साक्षात्कृतं - प्रत्यक्ष दिसणार्या श्रीकृष्णाला - नेमुः - नमस्कार करित्या झाल्या - यतः (सः) अवद्यमृक् (अस्ति) - कारण तो कृष्ण पापांचे क्षालन करणारा होय. ॥२०॥ ताः - त्यांना - तथा अवनताः दृष्टवा - ह्याप्रमाणे खाली वाकून नम्र झालेल्या असे पाहून - भगवान् देवकीसुतः - देवकीचा पुत्र भगवान श्रीकृष्ण - तेन तोषितः करुणः - त्या कृत्याने संतोषित झालेला व कृपायुक्त असा - ताभ्यः वासांसि प्रायच्छत् - त्यांना वस्त्रे देता झाला. ॥२१॥ दृढं प्रलब्धाः - अत्यंत फसवलेल्या - त्रपया च हापिताः - आणि लज्जेने निर्भर्त्सलेल्या - क्रीडनवत् च कारिताः - आणि खेळातील बाहुल्याप्रमाणे वागविलेल्या - च एव - शिवाय आणखी - वस्त्राणि अपहृतानि - वस्त्रे हरण केलेल्या - प्रियसंगनिर्वृताः - आणि प्रियकराच्या भेटीने आनंदित झालेल्या - अथ अपि ताः - अशाही त्या - अमुं न अभ्यसूयन् - ह्या श्रीकृष्णाचा मत्सर करित्या झाल्या नाहीत. ॥२२॥ प्रेष्ठसंगमसज्जिताः - अत्यंत प्रिय अशा श्रीकृष्णाच्या संगमासाठी सिद्ध असलेल्या - गृहीतचित्ताः - व त्याने आकर्षिले आहे चित्त ज्यांचे अशा त्या - तस्मिन् लज्जावितेक्षणाः - त्याच्याकडे लज्जायुक्त नेत्रांनी पाहणार्या अशा - वासांसि परिधाय - वस्त्रे नेसून - (तत्) नो चेलुः - तेथून हलल्या नाहीत. ॥२३॥ स्वपादस्पर्शकाम्यया - आपल्या चरणसेवेच्या इच्छेने - धृतव्रतानां तासां - धारण केले आहे ज्यांनी अशा त्या गोपींचा - संकल्पं विज्ञाय - मनातील विचार जाणून - भगवान् दामोदरः - भगवान श्रीकृष्ण - अबलाः आह - त्या स्त्रियांना म्हणाला. ॥२४॥ साध्व्यः - अहो चांगल्या मुलींनो - भवतीनां मदर्चनं संकल्पः - तुमचा माझी सेवा करण्याविषयीचा संकल्प - मया विदितः - मला समजला - अनुमोदितः (च) - आणि मला संमतही झाला - सः असौ - तो हा संकल्प - सत्यः भवितुं अर्हति - खरा होण्यास योग्य आहे. ॥२५॥ मयि - माझ्या ठिकाणी - आवेशितधियां कामः - लाविले आहे चित्त ज्यांनी अशा त्यांची इच्छा - कामाय न कल्पते - विषयभोगासाठी नसते - भर्जिता क्वथिता धाना - भाजलेले किंवा शिजवलेले धान्य - प्रायः बीजाय न इष्यते - बहुधा बियांसाठी उपयोगाला येत नाही. ॥२६॥ यत् उद्दिश्य - जे उद्देशून - सतीः - हे चांगल्या मुलींनो - इदं आर्यार्चनं व्रतम् - हे देवी कात्यायनीचे पूजन ज्यात आहे असे व्रत - भवत्यः चेरुः - तुम्ही आचरिले - अबलाः - मुलींनो - सिद्धाः (यूयम्) - सिद्ध मनोरथ झालेल्या अशा तुम्ही - व्रजं यात - गोकुळात जा - इमाः क्षपाः - ह्या पुढे येणार्या रात्रीच्या वेळी - मया रंस्यथ - माझ्या समागमे रममाण व्हाल. ॥२७॥ इति भगवता आदिष्टाः - याप्रमाणे श्रीकृष्णाने आज्ञा दिलेल्या - लब्ध कामाः कुमारिकाः - मनोरथ पूर्ण झालेल्या कुमारिका - तत्पदांभोजं ध्यायंत्यः - त्या श्रीकृष्णाच्या चरणकमलांचे ध्यान करीत - कृच्छ्रात् व्रजं निर्विविशुः - मोठया कष्टाने गोकुळात गेल्या. ॥२८॥ अथ - नंतर - गोपैः परिवृतः - गोपांनी वेष्टिलेला असा - सहाग्रजः देवकीसुतः भगवान् - वडील भावांसह देवकीचा मुलगा श्रीकृष्ण - गाः चारयन् - गाई चारीत - वृंदावनात् दूरं गतः - वृंदावनापासून दूर गेला. ॥२९॥ तिग्मे निदाघार्कातपे - प्रखर अशा उन्हाळ्यातील सूर्याच्या उन्हामध्ये - स्वाभिः छायाभिः - आपल्या छायांनी - आत्मनः आतपत्रायितान् - आपल्याला छत्रीप्रमाणे झालेल्या - द्रुमान् वीक्ष्य - वृक्षांना पाहून - व्रजौकसः आह - गोकुळवासी गोपबालकांना म्हणाला. ॥३०॥ हे स्तोककृष्ण - हे स्तोककृष्णा - हे अंशो - हे अंशा - श्रीदामन् सुबल अर्जुन - हे श्रीदाम्या, सुबला अर्जुना - विशाल ऋषभ तेजस्विन् - हे विशाला, ऋषभा, व तेजस्वी - देवप्रस्थ वरूथप - हे देवप्रस्था, हे वरूथपा. ॥३१॥ एतान् परार्थैकान्तजीविनः - ह्या केवळ दुसर्याकरिताच आहे जीवित ज्यांचे अशा - महाभागान् पश्यत - मोठया उदार वृक्षांना पहा - वातवर्षातपहिमान् सहन्तः - वारा, पाऊस, ऊन व थंडी ही सहन करीत - नः (तानि) वारयंति - आमच्यासाठी त्याचे निवारण करितात. ॥३२॥ अहो - हे गोपालांनो - एषां सर्वप्राण्युपजीवनं जन्म - यांचे सर्व प्राणिमात्रांची उपजीविका चालविणारे असे जीवित - वरं (अस्ति) - श्रेष्ठ होय - येषां अर्थिनः सुजनस्य (याचकाः) इव - ज्यांचे याचक साधूंच्या याचकांप्रमाणेच - विमुखाः न वै यांति - निराश होऊन केव्हाही जात नाहीत. ॥३३॥ पत्रपुष्पफलच्छायामूलवल्कलदारुभिः - पाने, फुले, फळे, सावली, मुळे, साली, काष्ठे यांनी - गंधनिर्यासभस्मास्थितोक्मैःच - तसेच सुगंध, डिंक, चूर्ण, बिया व कोवळे अंकुर यांनी - कामान् वितन्वते - सर्वांच्या इच्छा पूर्ण करितात. ॥३४॥ देहिषु - प्राणिमात्रांवर - प्राणैः अर्थैः - प्राणांनी व धनांनी - धिया वाचा (च) - बुद्धीने आणि वाणीने - सदा - निरंतर - श्रेयः एव आचरेत् - कल्याणच करावे - एतावत् - एवढे - देहिनां जन्मसाफल्ये - प्राण्यांच्या जन्माचे सार्थक होय. ॥३५॥ इति - असे म्हणून - प्रवालस्तबक - अंकुर, फुलांचे गुच्छ, - फलपुष्पदलोत्करैः - फळे, फुले, पाने यांच्या समूहाने युक्त अशा - नम्रशाखानां - वाकलेल्या आहेत फांद्या ज्यांच्या - तरूणां मध्येन - अशा वृक्षांच्या मधून - (कृष्णः) यमुनां गतः - श्रीकृष्ण यमुनेवर गेला. ॥३६॥ नृप - हे परीक्षित राजा - तत्र - त्याठिकाणी - गाः - गाईंना - सुमृष्टाः शिवाः शीतलाः - अत्यंत स्वच्छ, पथ्यकर व थंड असे - अपः पाययित्वा - पाणी पाजून - ततः - नंतर - स्वयं गोपाः चः - स्वतः आपण व गोप - स्वादु जलं - मधुर जल - कामं पपुः - यथेच्छ प्याले. ॥३७॥ नृपः - हे परीक्षित राजा - तस्याः उपवने - त्या यमुनेजवळच्या कुरणांत - पशून् कामं चारयंतः - गाईंना यथेच्छ चरविणारे गोप - क्षुघार्ताः (सन्तः) - भुकेने पीडित होत्साते - कृष्णरामौ उपागम्य - कृष्ण व बलराम यांच्या जवळ येऊन - इदं अब्रुवन् - असे बोलते झाले. ॥३८॥ अध्याय बाविसावा समाप्त |