|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १७ वा - अन्वयार्थ
कालियाची कथा आणि गोपांचा दावानलापासून बचाव - कालियः - कालिय नावाचा सर्प- नागालयं रमणकं - सर्पांचे निवासस्थान अशा रमणक द्वीपाला - कस्मात् तत्याज - का सोडिता झाला - एकेन तेन - एकट्या कालियाने - सुपर्णस्य - गरुडाचा - किंवा - कोणता - असमञ्जसं कृतम् - अपराध केला ॥१॥ महाबाहो - हे राजा - इह - येथे - उपहार्यैः सर्पजनैः - भक्ष्य असलेल्या अशा सर्पसमुदायाने - यः वानस्पत्यः बलिः - जो वृक्षाच्या तळाशीच द्यावयाचा बळी - तेषां बाधापरिहाराय - त्यांची बाधा होऊ नये म्हणून - मासि मासि - प्रत्येक महिन्याला - प्राक् निरूपितः - पूर्वी ठरविला होता ॥२॥ (तं) स्वं स्वं भागं - तो आपापला भाग - सर्वे नागाः - सर्व सर्प - पर्वणि पर्वणि - प्रत्येक अमावास्येला - आत्मनः गोपीथाय - स्वतःच्या रक्षणाकरिता - महात्मने सुपर्णाय - गरुडाला - प्रयच्छन्ति - देतात ॥३॥ तु - परंत - विषवीर्यमदाविष्टः - विषाच्या वीर्याने गर्विष्ठ झालेला - क्राद्रवेयः कालियः - कद्रुपुत्र कालिय - गरुडं कदर्थीकृत्य - गरुडाला तुच्छ मानून - तं बलिं - तो बलि - स्वयं बुभुजे - स्वतः खाता झाला ॥४॥ राजन् - हे परीक्षित राजा - तत् श्रुत्वा - ते ऐकून - भगवत्प्रियः महावेगः भगवान् - भगवंताला अत्यंत प्रिय व मोठा वेगवान असा गरुड - विजिघांसुः - मारण्याच्या इच्छेने - कालियं समुपाद्रवत् - कालियावर धावला ॥५॥ करालजिह्वोच्व्छसितोग्रलोचनः - भयंकर जिव्हा, भयंकर श्वासोच्व्छास व उग्र नेत्र असलेला - ददायुधः - दंतरुपी आयुध असलेला - विषायुधः - विष हेच आहे आयुध ज्याचे असा तो नाग - तरसा आपतन्तं सुपर्णं - वेगाने धावत येणार्या त्या गरुडावर - प्रत्यभ्ययात् - उलट धावत गेला - उच्छिरतनैकमस्तकः - अनेक फणा वर उभारुन - दद्भिः - दातांनी - (तं) व्यदशत् - त्याला चावला ॥६॥ प्रचंडवेगः - मोठा वेगवान - मधुसूदनासनः - विष्णूचे वाहन असा - उग्रविक्रमः - भयंकर आहे पराक्रम ज्याचा असा - सः तार्क्ष्यपुत्रः - तो गरुड - मन्युमान् - रागावून - हिरण्यरोचिषा सव्येन पक्षेण - सुवर्णाप्रमाणे कान्ती असलेल्या आपल्या उजव्या पंखाने - तं कद्रुसुतं निरस्य जघान - त्या कद्रुपुत्र कालियाचा धिःक्कार करुन त्याला ताडिता झाला ॥७॥ सुपर्णपक्षाभिहतः - गरुडाच्या पंखाने ताडिलेला - अतीव विह्वलः - फार पीडित झालेला - कालियः - कालिय सर्प - तदगम्यं दुरासदं कालिन्द्याः ह्रदं - गरुडास जाण्यास कठिण व इतरांनाहि दुरापास्त अशा यमुनेच्या डोहात - विवेश - शिरला ॥८॥ एकदा - एके दिवशी - तत्र - तेथे - क्षुधितः गरुडः - भुकेलेला गरुड - ईप्सितं भक्ष्यं जलचरं - इष्ट खाद्य अशा पाण्यांत हिंडणार्या मत्स्याला - प्रसह्य अहरत् - बलात्काराने नेता झाला - (तदा) सौभरिणा निवारितः - त्यावेळी सौभरीनामक ऋषीकडून तो गरुड निवारिला गेला ॥९॥ तत्रत्यक्षेमम् आचरन् सौभरिः - तेथील प्राण्यांचे कल्याण करणारा सौभरी - मीनपतौ हते - मत्स्याधिपती मारिला गेला असता - दीनान् सदुःखितान् मीनान् दृष्ट्वा - दीन व अत्यंत दुःख करणार्या मत्स्यांना पाहून - कृपया आह - दयाळूपणाने म्हणाला ॥१०॥ सः गरुडः - तो गरुड - यदि अत्र प्रविश्य - जर या डोहात शिरून - मत्स्यान् खादति - मासे खाईल - (तर्हि) सद्यः प्राणैः वियुज्येत - तर तत्काळ मरेल - अहम् एतत् सत्यं ब्रवीति - मी हे खरे बोलतो ॥११॥ कालियः तं (शापं) परं वेद - कालिय सर्प तो शाप चांगला जाणत होता - अन्यः कश्चन लेलिहः न - दुसरा कोणताही सर्प तो जाणत नव्हता - (अतः सः) गरुडात् भीतः तत्र अवात्सीत् - म्हणून तो गरुडाच्या भीतीने तेथे राहता झाला - च - आणि - कृष्णेन विवासितः - श्रीकृष्णाकडून काढून लाविला गेला ॥१२॥ ह्रदात् विनिष्क्रान्तं - डोहातून बाहेर येणार्या - दिव्यस्त्रग्गन्धवाससं - दिव्य फुलांच्या माळा, चंदन व सुंदर वस्त्र धारण केलेल्या - महामणिगणाकीर्णं - उंची मण्यांचे गुच्छ ज्याने धारण केले आहेत अशा - जाम्बूनदपरिष्कृतम् - सुवर्णांच्या अलंकारांनी सुशोभित झालेल्या - कृष्णं - श्रीकृष्णाला ॥१३॥ उपलभ्य - परत आलेला पाहून - लब्धप्राणाः असवः इव उत्थिताः - मिळाला आहे प्राण ज्यांना अशा इंद्रियांप्रमाणे उठलेले - प्रमोदनिभृतात्मानः - आनंदाने भरले आहे अंतःकरण ज्यांचे असे - सर्वे गोपाः - सर्व गोप - प्रीत्या अभिरेभिरे - प्रेमाने आलिंगन देते झाले ॥१४॥ कौरव - हे परीक्षित राजा - यशोदा रोहिणी नन्दः गोप्यः गोपाः च - यशोदा, रोहिणी, नंद, गोपी व गोप - लब्धेहाः - सावध झालेले - कृष्णं समेत्य - श्रीकृष्ण पुन्हा मिळाल्यामुळे - लब्धमनोरथाः - ज्यांचे सर्व मनोरथ सफल झाले आहेत असे - आसन् - झाले ॥१५॥ अस्य अनुभाववित् रामः - या श्रीकृष्णाचा पराक्रम जाणणारा बलराम - अच्युतं आलिङ्ग्य जहास - श्रीकृष्णाला आलिंगन देऊन हसू लागला - नगाः गावः वृषाः वत्साः (च) - वृक्ष, गाई, बैल व वासरे - परमां मुदं लेभिरे - अत्यंत आनंदाला मिळविते झाले ॥१६॥ सकलत्रकाः ते विप्राः गुरवः - कुटुंबासह ते ब्राह्मण गुरु - नन्दं समागत्य - नंदाजवळ येऊन - ऊचुः - म्हणाले - कालियग्रस्तः तव आत्मजः - कालियाने गिळलेला तुझा मुलगा - दिष्ट्या मुक्तः - सुदैवाने मुक्त झाला ॥१७॥ कृष्णनिर्मुक्तिहेतवे - कॄष्णाची सुटका झाली ह्यासाठी - द्विजातीनां दानं देहि - ब्राह्मणांना दान दे - राजन् - हे परीक्षित राजा - प्रीतमनाः नंदः - आनंदित झालेला नंद - तदा - त्यावेळी - गाः सुवर्णं (च तेभ्यः) आदिशत् - गाई व सुवर्ण त्यांना देता झाला॥१८॥ नष्टलब्धप्रजा - पुनः प्राप्त झाला आहे नष्ट झालेला पुत्र जिला अशी - महाभागा सती यशोदा अपि - मोठी भाग्यवती पतिव्रता यशोदा सुद्धा - (कृष्णं) परिष्वज्य - कृष्णाला आलिंगन देऊन - अङ्कं आरोप्य - मांडीवर घेऊन - मुहुः अश्रुकलां मुमोच - वारंवार अश्रुबिंदू ढाळिती झाली ॥१९॥ राजेंद्र - हे परीक्षित राजा - तत्र क्षुत्तृड्भ्यां कर्षिताः - त्या वेळी भुकेने, तहानेने आणि श्रमाने थकून गेलेल्या - व्रजौकसः गावः - गोकुळवासी लोक व गाई - कालिन्द्याः उपकूलतः - यमुनेच्या काठी रहाते झाले ॥२०॥ तदा - त्या वेळी - निशीथे - मध्यरात्री - शिचिवनोद्भूतः दावाग्निः - ग्रीष्म ऋतूंतील सुकलेल्या वनात उत्पन्न झालेला वणवा - सुप्तं व्रजं सर्वतः आवृत्य - निजलेल्या गोकुळाला सभोवार वेष्टून - प्रदग्धुम् उपचक्रमे - जाळण्याला आरंभ करिता झाला ॥२१॥ ततः उत्थाय - तेव्हा तेथून उठून - संभ्रान्ताःदह्यमानाः ते व्रजौकसः - घाबरलेले व वणव्याने जळणारे ते गोकुळनिवासी लोक - मायामनुजं ईश्वरं कृष्णं - मायेने मनुष्यरुप धारण करणार्या ऐश्वर्यवान अशा श्रीकृष्णाला - शरणं ययुः - शरण गेले ॥२२॥ कृष्ण - हे श्रीकृष्णा - हे महाभाग कृष्ण - हे महाभाग्यवंता श्रीकृष्णा - हे अमितविक्रम राम - हे अतुल पराक्रमी बलरामा - घोरतमः एषः वह्निः - अत्यंत भयंकर असा हा वणवा - तावकान् नः - तुझे अशा आम्हाला - हि ग्रसते - खरोखर गिळीत आहे ॥२३॥ प्रभो - हे समर्थ श्रीकृष्णा - स्वान् सुह्रदः नः - तुझे मित्र अशा आम्हाला - सुदुस्तरात् कालाग्नेः - तरून जाण्याला कठीण अशा काळस्वरुपी वणव्यापासून - पाहि - राख - अकुतोभयं त्वच्चरणं - निर्भय अशा तुझ्या पायाला - संत्यक्तुं न शक्रुमः - टाकण्यास आम्ही समर्थ नाही ॥२४॥ अनन्तशक्तिधृक् जगदीश्वरः अनन्तः - अगणित शक्ति धारण करणारा त्रैलोक्याधिपती श्रीकृष्ण - इत्थं स्वजनवैक्लव्यं निरीक्ष्य - याप्रमाणे आपल्या लोकांचे संकट पाहून - तं तीव्रं अग्निं अपिबत् - त्या भयंकर अशा वणव्याला पिता झाला॥२५॥ अध्याय सतरावा समाप्त |