|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १६ वा - अन्वयार्थ
कालियावर कृपा - विभुः कृष्णः - महासामर्थ्यवान कृष्ण - कृष्णां कृष्णाहिना दूषितां विलोक्य - यमुना नदीला कालिय सर्पाने दूषित केले आहे असे पाहून - तस्याः विशुद्धिं अन्विच्छन् - तिची शुद्धी करण्याची इच्छा करणारा - तं सर्पम् उदवासयात् - त्या सर्पाला बाहेर काढिता झाला. ॥१॥ विप्र - हे शुकाचार्या - भगवान् - श्रीकृष्ण - अगाधे अंतर्जले - अत्यंत खोल अशा जलामध्ये - अहिं कथं अगृह्णात् - कालिय सर्पाला कसा पकडिता झाला - सः वै - तो सर्प खरोखर - अजलचरः अपि - पाण्यात राहणारा नसूनही - अन्तर्जले बहुयुगावासं यथा आसीत् - जेणेकरून अनंतयुगेपर्यंत पाण्यात राहता झाला - तत् कथ्यताम् - ते सांगा. ॥२॥ ब्रह्मन् - हे शुकमने - स्वच्छंदवर्तिनः - आपल्या इच्छेनुरूप वागणारा - भूम्नः - व सर्वव्यापी अशा - तस्य भगवतः - त्या षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्णाचे - गोपालोदारचरितं - गोपालरूपी जे थोर चरित्र - अमृतं जुषन् - तेच कोणी अमृत अशा त्या अमृताला सेवणारा - कः तृप्येत - कोण तृप्त होईल. ॥३॥ कालिंद्याम् - यमुनेमध्ये - कालियस्य कश्चित् ह्रदः - कालियाचा एक डोह - विषाग्निना - विषरूप अग्नीने - श्रप्यमाणपयः आसीत् - कढत आहे पाणी ज्यातील असा होता - उपरिगाः खगाः - वरून जाणारे पक्षी - यस्मिन् पतंति स्म - ज्यात पडत असत. ॥४॥ विप्रुष्मता - पाण्याच्या कणांनी युक्त अशा - विषोदोर्मिमारुतेन - व विषारी पाण्याच्या लाटांवरून येणार्या वायूने - अभिमर्शिताः - झपाटलेले असे - यस्य तीरगा - ज्याच्या काठी राहणारे - स्थिरजंगमाः प्राणिनः - स्थावर व जंगम प्राणी - म्रियंते - मरत असत. ॥५॥ खलसंयमनावतारः कृष्णः - दुष्टांना शासन करण्याकरिता अवतीर्ण झालेला कृष्ण - चंडवेगविषवीर्यं तम् - तीव्र आहे वेग ज्याचा असे विष आहे पराक्रम ज्याचा अशा त्या कालियाला - तेन च दुष्टां नदीं - आणि त्याने दूषित केलेल्या नदीला - अवेक्ष्य - पाहून - गाढरशनः - घट्ट केला आहे कमरेचा पटटा ज्याने असा - अतितुङग कदंबं अधिरुह्य - अतिशय उंच अशा कळंबाच्या झाडावर चढून - आस्फोटय ततः विषोदे न्यपतत् - दंड ठोकून तेथून विषमय उदकात उडी टाकिता झाला. ॥६॥ सर्पह्रदः - तो कालियाचा डोह - पुरुषसारनिपातवेगसंक्षोभित - वीर्यवान अशा श्रीकृष्णाच्या उडीच्या वेगाने अत्यंत क्षुब्ध झालेल्या - उरगविषोच्छ्वसितांबुराशिः - सर्पाच्या विषामुळे उसळत आहे पाण्याचा लोंढा ज्यातील असा - विषकषायविभीषणोर्मिः - विषाने कडू झालेल्या भयंकर लाटा आहेत ज्यात असा - पर्यक् धावन् - चोहोकडे धावत - धनुःशतं वृतः (आसीत्) - शंभर धनुष्ये इतकी विस्तृत जागा व्यापणारा झाला - अनंतबलस्य - अनंत आहे पराक्रम ज्याचा - तत् किं आश्चर्यम् - अशा त्या श्रीकृष्णाला ते कसले आश्चर्य. ॥७॥ अङग - हे परीक्षित राजा - वरवारणविक्रमस्य - ऐरावतासारखा आहे पराक्रम ज्याचा - तस्य ह्रदे विहरतः - असा तो कृष्ण डोहात क्रीडा करीत असता - (तस्य) भुजदंडघूर्णवार्घोषं आश्रुत्य - त्याच्या दंडाच्या योगाने गरगर फिरणार्या पाण्याचा ध्वनी ऐकून - तत् स्वसदनाभिभवं निरीक्ष्य - तेणेकरून आपल्या स्थानाचा अपमान झालेला पाहून - तत् अमृष्यमाणः चक्षुःश्रवाः - ते सहन न करणारा तो कालिय सर्प - (कृष्णं) समसरत् - त्या कृष्णाजवळ येता झाला. ॥८॥ प्रेक्षणीयसुकुमारघनावदातं - पाहण्यायोग्य कोमल व मेघाप्रमाणे दैदीप्यमान अशा - श्रीवत्सपीतवसनं - श्रीवत्सचिन्हाने युक्त व पिवळे वस्त्र नेसलेल्या - स्मितसुंदरास्यं - हास्यामुळे शोभायमान आहे मुख ज्याचे - अप्रतिभयं क्रीडन्तं - अशा व निर्भयपणे क्रीडा करणार्या - कमलोदरांघ्रिं तं - कमळाच्या गाभ्याप्रमाणे कोमल आहेत चरण ज्याचे अशा त्या कृष्णाला - मर्मसु रुषा संदश्य - मर्माच्या ठिकाणी रागाने दंश करून - भुजया चछाद - आपल्या शरीराने वेढिता झाला. ॥९॥ तत्प्रियसखाः पशुपाः - त्याचे अत्यंत आवडते मित्र असे ते गोप - तं नागभोगपरिवीतं - त्याला नागाच्या शरीराने वेष्टिलेला व - अदृष्टचेष्टं आलोक्य - दिसत नाही हालचाल ज्याची असा पाहून - कृष्णे अर्पितात्म - कृष्णाच्या ठिकाणी अर्पिले आहेत आत्मा, - सुहृदर्थकलत्रकामाः - मित्रसंबंधी कर्तव्य व स्त्री आदिकरून मनोरथ ज्यांनी असे - भूशार्ताः दुःखानुशोकभय - अत्यंत पीडित होऊन दुःख, शोक व भय यांनी - मूढधियः निपेतुः - मोहित झाली आहे बुद्धी ज्याची असे भूमीवर पडले. ॥१०॥ गावः वृषाः वत्सतर्यः - गाई, बैल व वासरे - क्रंदमानाः सुदुःखिताः - हंबरडा फोडणारी व अत्यंत दुःखित झालेली अशी - कृष्णे न्यस्तेक्षणाः - कृष्णाच्या ठिकाणी लाविली आहे दृष्टि ज्यांनी अशा - भीताः - घाबरलेली - रुदंत्यः इव तस्थिरे - जणु रडतच उभी राहिली. ॥११॥ अथ व्रजे - इकडे गोकुळात - भुवि दिवि आत्मनि - पृथ्वीवर, आकाशात व शरीरात - आसन्नभयशंसिनः - थोडया वेळाने येणार्या भयाला सुचविणारे - अतिदारुणाः - अत्यंत भयंकर - त्रिविधाः महोत्पाताः उत्पेतुः - तीन प्रकारची मोठी दुश्चिन्हे उत्पन्न झाली. ॥१२॥ नंदपुरोगमाः गोपाः - नंदादिक सर्व गोप - भयोद्विग्नाः - भयाने व्याकुळ झालेले - रामेण विना - बलरामाशिवाय - गाः चारयितुं - गाई चारण्यास - गतं कृष्णं ज्ञात्वा - गेलेल्या कृष्णाला जाणून. ॥१३॥ अतद्विदः - त्या कृष्णाचा प्रभाव न जाणणारे, - तत्प्राणाः - त्याच्यावर ज्यांचा प्राण - तन्मनस्काः ते - व त्याच्या ठिकाणी सदैव मन असणारे ते गोप - तै दुर्निमित्तैः - त्या अनिष्टसूचक उत्पातांनी - निधनं प्राप्तं मत्वा - कृष्णाला मरण आले असे मानून - दुःखशोकभयःतुरा बभूवुः - दुःख, शोक व भय यांनी पीडित झाले. ॥१४॥ अंग - हे परीक्षित राजा - सर्वे आबालवृद्धवनिताः पशुवृत्तयः - सगळी मुले, म्हातारी माणसे, स्त्रिया यांसह ते गवळी - कृष्णदर्शनलालसाः दीनाः - कृष्णाच्या दर्शनाची इच्छा करणारे व दीन झालेले - गोकुलात् निर्जग्मुः - गोकुळातून बाहेर निघाले. ॥१५॥ अनुजस्य प्रभावज्ञः - आपल्या धाकटया भावाचा प्रभाव जाणणारा - सः माधवः - तो लक्ष्मीपती - भगवान् बलः - षड्गुणैश्वर्यसंपन्न बलराम - तथा - त्याप्रमाणे - तान् कातरान् वीक्ष्य - त्या भीतीग्रस्त झालेल्या लोकांना पाहून - प्रहस्य - हसून - किंचित् न उवाच - काहीसुद्धा बोलला नाही. ॥१६॥ ते - ते लोक - भगवैल्लक्षणः पदैः - कृष्णाच्या पावलाच्या खुणा आहेत ज्यांवर अशा उमटलेल्या पावलांनी - सूचितया पदव्या - सुचविलेल्या मार्गाने - दयितं कृष्णं अन्वेषमाणाः - आवडत्या कृष्णाला शोधीत - यमुनातटं जग्मुः - यमुनेच्या तीरी गेले. ॥१७॥ अंग - हे परीक्षित राजा - ते - नंदादिक गोप - तत्र तत्र मार्गे - त्या त्या मार्गात ठिकठिकाणी - गवां - गाईंच्या - अन्यपदांतरान्तरे - व इतरांच्या पावलांच्या मध्ये - विश्पतेः अब्जयवांकुशाशनि - कृष्णाची कमल, यव, अंकुश वज्र - ध्वजोपपन्नानि पदानि - व ध्वज इत्यादिक चिन्हे यांनी युक्त अशा उमटलेल्या पावलांना - निरीक्षमाणाः सत्वराः ययुः - सूक्ष्मपणे पाहात त्वरेने गेले. ॥१८॥ जलाशयांते अंतर्ह्रदे - त्या यमुनेच्या आतील डोहात - भुजगभोगपरीतं - सर्पाच्या देहाने वेष्टिलेल्या - निरीहं कृष्णं - व निश्चेष्ट असलेल्या कृष्णाला - आरात् उपलभ्य - दुरून पाहून - मूढधिषणान् गोपान् च - आणि ज्यांच्या मनाला भ्रम झाला आहे अशा गोपांना - पशून् च - तसेच गाईंना - संक्रंदतः - हंबरत असलेल्या - आर्ताः परमकश्मलं आपुः - पीडित झालेले अतिशय मोहाप्रत प्राप्त झाले.॥१९॥ भगवति अनंते - षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा कृष्णाच्या ठिकाणी - अनुरक्तमनसः गोप्यः - ज्यांचे चित्त आसक्त झाले आहे अशा गोपी - अहिना ग्रस्ते प्रियतमे - अत्यंत आवडता कृष्ण सर्पाने वेढिला गेला असता - भृशदुःखतप्ताः - अत्यंत दुःखाने तप्त झालेल्या - तत्सौहृदस्मितविलोकगिरः - त्याचे प्रेम, किंचित हास्ययुक्त पाहणे व बोलणे - स्मरंत्यः - ही आठवीत - प्रियव्यतिहृतं त्रिलोकं - आवडत्या कृष्णाने विरहित असे त्रैलोक्य - शून्यं ददृशुः - ओस पाहत्या झाल्या. ॥२०॥ तुल्यव्यथाः ताः - सारखे आहे दुःख ज्याचे अशा त्या गोपी - शुचः स्रवंत्यः - शोकाश्रू गाळीत - अपत्यं अनुप्रविष्टां - पुत्र जो कृष्ण त्याच्याशी एकरूप झालेल्या - कृष्णमातरं समनुगृह्य - यशोदेला बळकट धरून - ताः ताः प्रियव्रजकथाः - त्या त्या आवडत्या कृष्णाच्या गोकुळातील - कथयन्त्यः - गोष्टी सांगणार्या - कृष्णाने अर्पितदृशः - कृष्णाच्या तोंडाकडे ज्यांची दृष्टि लागून गेली आहे अशा - मृतकप्रतीकाः आसन् - मृतप्राय झाल्या. ॥२१॥ तं ह्रदं - त्या डोहात - कृष्णप्राणान् नंदादीन् - कृष्ण हाच ज्यांचा प्राण अशा नंदादिकांना - निविशतः वीक्ष्य - प्रवेश करण्यास उद्युक्त झालेले पाहून - सः कृष्णानुभाववित् - तो कृष्णाचा पराक्रम जाणणारा - भगवान् रामः - षड्गुणैश्वर्यसंपन्न बलराम - प्रत्यषेधत् - निषेध करिता झाला. ॥२२॥ इत्थं - याप्रमाणे - सस्त्रीकुमारम् - बायकामुलांसह - स्वकुलम् - आपले गोकुळ - अनन्यगतिम् निरीक्ष्य - दुसरा आधार नाही ज्याला असे पाहून - आत्महेतोः अतिदुःखितं च - आणि आपल्यासाठी फार दुःखी झालेले - आज्ञाय - जाणून - मर्त्यपदवीं अनुवर्तमानः - मनुष्याच्या व्यवहाराचे अनुकरण करणारा श्रीकृष्ण - मुहूर्तं स्थित्वा - घटकाभर तसाच राहून - उरगबंधात् उदतिष्ठत् - सापाच्या बंधनातून वर उठला. ॥२३॥ तत्प्रथ्यमानवपुषा - कृष्णाने फुगविलेल्या शरीराच्या योगाने - व्यथितात्मभोगः कुपितः भुजंगः - ज्याचे शरीर पीडित झाले आहे असा रागावलेला कालिय - कृष्णं मुक्त्वा - कृष्णाला सोडून - स्वफणान् उन्नमय्य - आपला फणा उभारून - श्वसन् - धापा टाकीत - श्वसनरंध्रविषांबरीश - ज्याच्या श्वासमार्गातून विष बाहेर पडत आहे असा - स्तब्धेक्षणोल्मुक मुखः - व अग्निकण ज्याच्या मुखातून बाहेर पडत आहेत असा - हरिम् ईक्षमाणः - कृष्णाकडे टक लावून पाहत - तस्थौ - राहिला. ॥२४॥ द्विशिखया जिह्वया - दुभागलेल्या जिभेने - द्वे सृक्किणी परिलेलिहानं - दोन्ही ओठ चाटणार्या - हि अतिकरालविषाग्निदृष्टिं - आणि अत्यंत भयंकर अशा विषरूप अग्नीप्रमाणे ज्याची दृष्टी झाली आहे अशा - तं अमुं (सर्पं) - त्या ह्या सर्पाला - सः अपि - तो कृष्णही - अवसरं प्रसमीक्षमाणः - संधीची वाट पाहणारा - क्रीडन् - खेळत - यथा खगेंद्रः (तथा) - ज्याप्रमाणे गरुड सापाभोवती फिरतो त्याप्रमाणे - परिससार - सभोवार फिरता झाला - बभ्राम - व फिरविता झाला. ॥२५॥ आद्यः - पुराणपुरुष कृष्ण - एवं परिभ्रमहतौजसं - याप्रमाणे सभोवार फिरण्याच्या योगानेच ज्याचा पराक्रम नष्ट झाला आहे अशा - समुन्नतांसं आनम्य - उचलले आहेत स्कंध ज्याने अशा त्या सर्पाला वाकवून - तत्पृथुशिरःसु अधिरूढः - त्या सर्पाच्या विशाल मस्तकावर चढलेला असा - तन्मूर्धरत्ननिकरस्पर्शाति - त्या सर्पाच्या मस्तकावरील रत्नसमूहांच्या स्पर्शामुळे - ताम्रपादांबुजः - अत्यंत लाल दिसत आहेत चरणकमल ज्याचे असा - अखिलकलादिगुरुः ननर्त - संपूर्ण कलांचा आद्यगुरु असा कृष्ण नाचता झाला. ॥२६॥ तदा - त्यावेळी - तं नर्तुं उद्यतं अवेक्ष्य - त्या कृष्णाला नाचण्याला उद्युक्त झालेला पाहून - तदीयगंधर्वसिद्धचारणदेववध्वः - त्या कृष्णाचे सेवक असे गंधर्व, सिद्ध, देवांचे भाट व देवस्त्रिया - मृदंगपणवानकवाद्यगीत - मृदंग, पावे व नगारे इत्यादि वाद्ये वाजवीत, गात, - पुष्पोपहारनुतिभिः - पुष्पांचे हार आणि स्तोत्रे यांसह - प्रीत्या सहसा उपसेदुः - प्रेमाने तत्काल प्राप्त झाल्या. ॥२७॥ अंग - हे परीक्षित राजा - खलदंडधरः - दुष्टांकरिता दंड धारण करणारा कृष्ण - शतैकशीर्ष्णः - शंभर फणांच्या - क्षीणायुषः - ज्याचे आयुष्य क्षीण झाले आहे अशा - भम्रतः - वाटोळ्या फिरणार्या त्या कालियाचे - यत् यत् शिरः - जे जे मस्तक - न नमते - नम्र होत नव्हते - तत् तत् - ते ते मस्तक - अंघ्रिपातैः ममर्द - पायाच्या प्रहाराने मर्दिता झाला - नागः - तो सर्प - आस्यतः नस्तः (च) - मुखापासून व नाकापासून - उल्बणं असृक् वमन् - पुष्कळ रक्त ओकत - परमकश्मलं आप - मोठया दुःखाला प्राप्त झाला. ॥२८॥ अक्षिभिः गरलं उद्वमतः - नेत्रांनी विष ओकणार्या - रुषा उच्चैः निःश्वसतः - रागाने मोठमोठे श्वासोच्छवास सोडणार्या - तस्य शिरःसु - त्या सर्पाच्या शिरांमध्ये - यत् यत् (शिरः) समुन्नमति - जे जे मस्तक वर उचलीत असे - तत् तत् पदा अनुनमयन् नृत्यन् - ते ते पायाने वाकविणारा व नृत्य करणारा श्रीकृष्ण - दमयांबभूव - जर्जर करिता झाला - इह - यावेळी - पुराणः पुमान् इव - पुराणपुरुष म्हणजे शेषशाई नारायणच जणू आहे असे समजून - गंधर्वादिभिः पुष्पैः प्रपूजितः - गंधर्वांकडून फुलांनी पूजिला गेला. ॥२९॥ नृप - हे परीक्षित राजा - तच्चित्रतांडवविरुग्ण - त्या कृष्णाच्या विचित्र तांडवनृत्याने ज्याची - फणातपत्रः - फणारूपी छत्रे जर्जर झाली आहेत असा - मुखैः उरु रक्तं वमन् - मुखांनी अतिशय रक्त ओकणारा - भग्नगात्रः - छिन्नभिन्न झाले आहे शरीर ज्याचे असा - चराचरगुरुं पुराणं पुरुषं - स्थावरजंगमांचा गुरु व पुराणपुरुष अशा - नारायणं स्मृत्वा - शेषशाईचे स्मरण करून - तं मनसा अरणं जगाम - त्याला मनाने शरण जाता झाला. ॥३०॥ गर्भजगतः कृष्णस्य - ज्याच्या उदरात सर्व ब्रह्मांडे आहेत अशा कृष्णाच्या - अतिभरावसन्नं - अत्यंत भाराने व्याकुळ झालेल्या - पार्ष्णिप्रहारपरिरुग्णफणातपत्रं - व पादतलाच्या प्रहाराने पीडित झाले आहे फणारूपी छत्र ज्याचे अशा - अहिं दृष्टवा - कालियाला पाहून - अमुष्य पत्न्यः - त्याच्या स्त्रिया - श्लथद्वसनभूषणकेशबंधाः आर्ताः - सैल झाली आहेत वस्त्रे, भूषणे व वेण्या ज्यांच्या अशा दुःखित झालेल्या - आद्यं उपसेदु - कृष्णाजवळ प्राप्त झाल्या. ॥३१॥ अथ पुरस्कृतार्भाः - नंतर पुढे केली आहेत मुले ज्यांनी अशा - कृतांजलिपुटाः ताः साध्व्यः - हात जोडलेल्या त्या पतिव्रता - सुविग्नमनसः - ज्यांची अंतःकरणे उद्विग्न झाली आहेत अशा - भर्तुः शमलस्य मोक्षेप्सवः - भर्त्याच्या पापाच्या नाशाची इच्छा करणार्या - तं शरणदं भूतपतिं - त्या सर्व प्राण्यांचा स्वामी अशा कृष्णाला - भूवि कायं निधाय - पृथ्वीवर शरीर टाकून - प्रणेमुः - नमस्कार करित्या झाल्या - शरणदं शरणं प्रपन्नाः - आणि आश्रयदात्या कृष्णाला शरण गेल्या. ॥३२॥ अस्मिन् कृतकिल्बिषे - ह्या पापकर्म करणार्या सर्पांच्या ठायी - दंडः हि न्याय्यः - शिक्षा खरोखर न्यायप्राप्त होय - तव अवतारः - तुझा अवतार - खलनिग्रहाय (अस्ति) - दुष्टांना शासन करण्याकरिता आहे - तुल्यदृष्टेः एव फलं अनुशंसन् (त्वं) - समानदृष्टीच्याच फळाची प्रशंसा करणारा असा तू - रिपोः सुतानां अपि - शत्रूचे व पुत्रांचेहि - दमं धत्से - दमन करितोस. ॥३३॥ अयं (दमः) - हे कालियाचे दमन - भवतः - तुझ्याकडून - नः अनुग्रहः हि कृतः - आम्हांवर अनुग्रहच खरोखर केला गेला आहे - ते असतां दंडः - तू दुष्टांना केलेली शिक्षा - खलु कल्मषापहः (अस्ति) - खरोखरच पापनाशक असते - यत् - ज्याअर्थी - अमुष्य देहिनः - ह्या देहधारी प्राण्याचे - दंदशूकत्वं - सर्पत्व - तत् - त्याअर्थी - ते क्रोधः अपि - तुझा याच्यावरील क्रोधही - अनुग्रहः एव संमतः - अनुग्रहच समजला पाहिजे. ॥३४॥ निरस्तमानेन मानदेन च अनेन - अहंकार टाकलेल्या व दुसर्याला मान देणार्या याने - पूर्वं - पूर्वी - किं तपः सुतप्तं - कोणती तपश्चर्या केली होती - अथवा सर्वजनानुकंपया - किंवा सर्व प्राण्यावरील कृपा या योगाने - (कः) धर्मः (आचरितः) - कोणता धर्म आचरिला होता - यतः सजीवः भवान् - ज्यामुळे सर्वांचे जीवन असा तू - तुष्यति - संतुष्ट झाला आहेस. ॥३५॥ देव - हे कृष्णा - अस्य - ह्या आमच्या पतीला - तव अंघ्रिरेणुस्पर्शाधिकारः - मिळालेला तुझ्या चरणरजाच्या स्पर्शाचा अधिकार - कस्य प्रभावः (अस्ति) - कशाचा प्रभाव आहे - न विद्महे - आम्ही जाणत नाही - यद्वाञ्छया - ज्या चरणकमलांच्या इच्छेने - ललना श्रीः - सुंदर अशी लक्ष्मी - सुचिरं धृतव्रता - चिरकालपर्यंत व्रत धारण करणारी अशी - कामान् विहाय - सर्व इच्छा सोडून - तपः आचरत् - तपश्चर्या करिती झाली. ॥३६॥ यत्पादरजःप्रपन्नाः - ज्या परमेश्वराच्या चरणरजाला प्राप्त झालेले - न नाकपृष्ठं (इच्छन्ति) - स्वर्गाची इच्छा करीत नाहीत - सार्वभौमं नच - सार्वभौम पद इच्छित नाहीत - पारमेष्ठयं न - ब्रह्मपदही इच्छित नाहीत - न रसाधिपत्यं - वरुणलोकही इच्छित नाहीत - न योगसिद्धीः - योगाभ्यासाने मिळणार्या सिद्धीची इच्छा करीत नाहीत - वा अपुनर्भवं वांछंति - किंवा मोक्षाचीही इच्छा करीत नाहीत. ॥३७॥ नाथ - हे स्वामी कृष्णा - तत् एषः अहीशः - या कारणास्तव हा सर्पराजा - तमोदनिः क्रोधवशः अपि - तमोगुणापासून जन्मलेला व क्रोधाच्या अधीन झालेला असाही - अन्यैः दुरापं - दुसर्यांना मोठया संकटाने मिळणार्या - (तव पादरजं) आप - अशा तुझ्या पादरजाला प्राप्त झाला - यत् इच्छतः - जे पादरज इच्छिणार्या - संसारचक्रे भ्रमतः शरीरिणः - संसारचक्रात भ्रमण करणार्या प्राण्याला - मोक्षविभवः समक्षः स्यात् - मोक्षैश्वर्य प्रत्यक्ष प्राप्त होते. ॥३८॥ भगवते पुरुषाय महात्मने - षड्गुणैश्वर्यसंपन्न पुराणपुरुष व उदार मनाचा अशा - भूतावासाय - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वास करणार्या - भूताय - व सर्वांच्या पूर्वीपासून असलेल्या - पराय परमात्मने - कारणरूप असूनही कारणातीत अशा - तुभ्यं नमः - तुला नमस्कार असो. ॥३९॥ च - आणि - ज्ञानविज्ञानविधये - जाणीव व चिच्छक्ति यांचा साठा अशा - अगुणाय अविकाराय ब्रह्मणे - निर्गुण, विकाररहित व ब्रह्मरूप अशा - अप्राकृताय अनंत शक्तये - प्रकृतीपासून भिन्न व अनंत शक्ति धारण करणारा अशा - ते नमः - तुला नमस्कार असो. ॥४०॥ कालाय कालनाभाय - कालस्वरूप व कालशक्तिला आश्रयभूत अशा - कालावयवसाक्षिणे - सृष्टयादि निरनिराळ्या विशिष्ट कालत्रयाचा साक्षीभूत अशा - विश्वाय तद्रुपद्रष्टे - विश्वरूप असून जगाला उपदेश देणार्या - तत्कर्त्रे विश्वहेतवे (ते नमः) - जगत्कर्ता व जगाला कारणीभूत अशा तुला नमस्कार असो. ॥४१॥ भूतमात्रेंद्रिय - सूक्ष्मभूते, इंद्रिये, - प्राणमनोबुद्ध्याशयात्मने - प्राण, मन, बुद्धी , चित्त इत्यादि आहे स्वरूप ज्याचे अशा - त्रिगुणेन अभिमानेन - त्रिगुणात्मक अभिमानाने - गूढस्वात्मानुभूतये - झाकून टाकिला आहे स्वतःचे अंशभूत जे जीव त्यांचा आत्मानुभव ज्याने अशा तुला. ॥४२॥ अनंताय सूक्ष्माय - ज्याचा अंत नाही व जो अत्यंत सूक्ष्म आहे अशा - कूटस्थाय विपश्चिते - अविकार्यस्वरूपी व सर्वज्ञ अशा - नानावादानुरोधाय - अनेक अस्तिनास्ति इत्यादि वादांना अनुसरणारा - वाच्यवाचकशक्तये (ते) नमः - व वाच्य आणि वाचक अशा भेदांनी भासणारा अशा तुला नमस्कार असो. ॥४३॥ प्रमाणमूलाय - नेत्र आदिकरून ज्ञानसाधनाचेही मूळ अशा - कवये - ज्ञानी अशा - शास्त्रयोनये - शास्त्रांचे उत्पत्तिस्थान अशा - प्रवृत्ताय निवृत्ताय - विधि व निषेध या रूपांनी भासणारा अशा - निगमाय (ते) नमोनमः - वेदस्वरूपी तुला नमस्कार असो. ॥४४॥ च रामाय वसुदेवसुताय - आणि संकर्षण व वसुदेवाचा मुलगा अशा - कृष्णाय नमः - कृष्णाला नमस्कार असो - सात्वतां पतये - उपासकांचा स्वामी - प्रद्युम्नाय अनिरुद्धाय - अशा प्रद्युम्न व अनिरुद्धस्वरूपी तुला - नमः - नमस्कार असो. ॥४५॥ गुणप्रदीपाय - अंतःकरणादि इंद्रियरूपी गुणांचे विकार त्यांना प्रकाशित करणार्या - गुणात्मच्छादनाय च - आणि त्याच गुणांनी आत्म्याला झाकून टाकणार्या - गुणवृत्युपलक्ष्याय गुणद्रष्ट्रे - चित्तादिक गुणांच्या विषयांनी दिसणार्या व गुणांना साक्षीभूत अशा - स्वसंविदे नमः - केवळ अनुभवानेच ज्याचे ज्ञान होऊ शकते अशा तुला नमस्कार असो. ॥४६॥ अव्याकृतविहाराय - ज्याचा महिमा अतर्क्य आहे अशा - सर्वव्याकृतसिद्धये - व सर्व कार्ये सिद्ध होण्यास कारणीभूत अशा - मौनशीलिने मुनये ते - मौन धारण करणे हा स्वभाव असणार्या मुनिस्वरूप अशा - हृषीकेश ते नमः अस्तु - हे इंद्रियाच्या स्वामी कृष्णा, तुला नमस्कार असो. ॥४७॥ परावरगतिज्ञाय सर्वाध्यक्षाय - स्थूल व सूक्ष्म गति जाणणार्या व सर्वांचा अधिष्ठाता अशा - अविश्वाय विश्वाय च - विश्वतैजसादि अवस्थाविरहित व विश्वाचा अधिष्ठाता अशा - तद्द्रष्ट्रे - आणि त्या विश्वतैजसादि अवस्थांचा साक्षी अशा - अस्य च - ह्या विश्वाचा भास व त्याचे निराकरण ही ज्या अविद्या व विद्या यांच्या योगाने होतात - हेतवे - त्या विद्या व अविद्या ह्यांचे कारण अशा - ते नमः - तुला नमस्कार असो. ॥४८॥ प्रभो - हे समर्था श्रीकृष्णा - अनीहः कालशक्तिधृक् - निरिच्छ व अनादि अशा कालशक्तीला धारण करणारा असा तू - गुणैः - सत्त्वादिक त्रिगुणांनी - अस्य - ह्या जगाची - जन्मस्थितिसंयमान् अकृत - उत्पत्ति, पालन व संहार हे करिता झालास - सतः - बीजरूपाने असलेल्या - तत्तत्स्वभावान् प्रतिबोधयन् - त्या त्या घोरादिक स्वभावांना जागृत करणारा - अमोघविहारः ईहसे - ज्याची क्रीडा निष्फळ नाही असा तू क्रीडा करितोस.॥४९॥ तस्य एव ते - अशाप्रकारची तुझीच - अमूः - ही - शान्ताः अशान्ताः उत मूढयोनयः - शान्त व क्रूर आणि अज्ञानी अशी - तनवः - स्वरूपे - त्रिलोक्यां (सन्ति) - त्रैलोक्यात आहेत - अधुना - सांप्रत - हि - खरोखर - सतां अवितुं स्थातुः - साधुंचे रक्षण करण्यासाठी प्रवृत्त झालेल्या - च - आणि - धर्मपरीप्सया इर्हतः - धर्माचे रक्षण करण्याच्या इच्छेने झटणार्या - ते तनवः - तुझी स्वरूपे - शान्ताः प्रियाः च (सन्ति) - शांत व प्रिय अशी आहेत. ॥५०॥ सकृत् - एकवार - भर्त्रा (त्वया) - स्वामी अशा तुझ्याकडून - स्वप्रजाकृतः अपराधः - तुझे मूलच अशा या कालियाने केलेला अपराध - सोढव्यः - सहन केला जावा - शांतात्मन् - हे शांत स्वभावाच्या भगवंता - त्वां अजानतः मूढस्य - तुला न जाणणार्या मूर्खाला - क्षंतुम् अर्हसि - क्षमा करण्यास तू योग्य आहेस. ॥५१॥ भगवन् अनुगृह्णीष्व - हे भगवंता कृपा कर - पन्नगः प्राणान् त्यजति - हा कालिय सर्प प्राण सोडीत आहे - साधुशोच्यानां नः स्त्रीणां - साधूंनाही ज्यांची करुणा यावी अशा आम्हा स्त्रियांचा - प्राणः पतिः (त्वया) प्रदीयताम् - प्राणच असा पति तू अर्पण कर. ॥५२॥ तव आज्ञया - तुझ्या आज्ञेने - ते किंकरिणां (नः यत्) अनुष्ठेयं (तत्) - तुझ्या दासी अशा आम्हांस जे करणे इष्ट आहे ते - विधेहि - सांग - यत् - कारण - श्रद्धया अनुतिष्ठन् - श्रद्धेने त्वत्प्रीत्यर्थ कर्म करणारा - सर्वतोभयात् - सर्व भयांपासून - वै मुच्यते - खरोखर मुक्त होतो. ॥५३॥ इत्थं - याप्रमाणे - नागपत्नीभिः अभिष्टुतः - नागपत्न्यांनी स्तविलेला - सः भगवान् - तो षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण - भग्नशिरसं मूर्च्छितं - ज्याची मस्तके छिन्न झाली आहेत अशा कालियाला - अङ्घ्रिकुटटनैः विससर्ज - पायांनी तुडविण्याचे थांबविता झाला. ॥५४॥ प्रतिलब्धेन्द्रियप्राणः - प्राप्त झाले आहे इंद्रियात चैतन्य ज्याच्या असा - शनकैः कृच्छ्रात् समुच्छ्वसन् - हळूहळू मोठया कष्टाने श्वासोच्छवास टाकणारा असा - दीनः (सः) कालियः - अत्यंत केविलवाणा असा तो कालिय - कृताञ्जलिः (सन्) - हात जोडलेला असा होऊन - हरिं कृष्णं प्राह - सर्वांच्या दुःखे हरण करणार्या कृष्णाला म्हणाला. ॥५५॥ नाथ - हे श्रीकृष्णा - वयं उत्पत्त्या सह - आम्ही जन्मतःच - खलाः तामसाः दीर्घमन्यवः (स्मः) - दुष्ट, तामसी व अति रागीट असे आहो - यत् - कारण - लोकानां असद्ग्रहः स्वभावः - प्राण्यांचा दुष्टबुद्धीरूप स्वभाव - दुस्त्यजः - टाकण्यास कठीण असतो. ॥५६॥ धातः - हे विश्वकर्त्या - गुणविसर्जनं - तीन गुणांमुळे नानाप्रकारे उत्पन्न होणारे - नानास्वभाव - विविध असे स्वभाव, - विर्यौजोयोनिबीजाशयाकृति - पराक्रम, तेज, जाति व बीजे, मने व आकृति आहेत ज्यात असे - इदं विश्वं - हे जग - त्वया सृष्टं - तू निर्माण केलेस. ॥५७॥ भगवन् - हे श्रीकृष्णा - तत्र च - त्यातही - वयम् सर्पाः - आम्ही सर्प - जात्युरुमन्यवः स्मः - जन्मतः अतिशय रागीट आहो - मोहिताः (वयं) - मोहित झालेले असे आम्ही - दुस्त्यजां त्वन्मायां - टाकण्यास कठीण अशा तुझ्या मायेला - स्वयं कथं त्यजामः - आपण होऊनच कसे टाकू. ॥५८॥ सर्वज्ञः जगदीश्वरः - सर्वज्ञ व जगाचा स्वामी असा - भगवान् - तूच - तत्र कारणम् अस्ति - याला कारण आहेस - नः - आम्हाला - अनुग्रहं निग्रहं वा - कृपा किंवा दंड - (यत्) मन्यसे - जे तुला वाटेल - तत् विधेहि - ते कर. ॥५९॥ इति कालियस्य वचः आकर्ण्य - हे कालीयाचे भाषण ऐकून - कार्यमानुषः भगवान् - कार्यांसाठी मनुष्य झालेला असा श्रीकृष्ण - प्राह - बोलला - सर्प - हे सर्पा - अत्र त्वया न स्थेयं - या ठिकाणी त्वा राहू नये - स्वज्ञात्यापत्यदाराढयः - आपले जातिबांधव, मुले व स्त्रिया यांसह - समुद्रं याहि - समुद्रात जा - मा चिरं - विलंब करू नको - नदी गोनृभिः भुज्यते - ही नदी गाई व मनुष्ये यांच्याकडून सेविली जात आहे. ॥६०॥ यः मर्त्यः - जो मनुष्य - एतत् तुभ्यं मदनुशासनं - हे तुला मी केलेले शासन - उभयोः संध्योः कीर्तयन् - दोन्ही संध्यांच्या वेळी वर्णन करीत - संस्मरेत् - स्मरण करेल - यष्मद्भयं न आप्नुयात् - तुमच्यापासून भीतीला प्राप्त होणार नाही. ॥६१॥ आस्मिन् मदाक्रीडे स्नात्वा - मी क्रीडा केलेल्या या जलात स्नान करून - यः जलैः देवादीन् तर्पयेत् - जो येथील उदकांनी देवादिकांचे तर्पण करील - च - आणि - उपोष्य मां स्मरन् अर्चेत् - उपाशी राहून माझे स्मरण करीत माझी पूजा करील - सर्वपापैः प्रमुच्यते - सर्व पापांपासून मुक्त होईल. ॥६२॥ रमणकं द्वीपं हित्वा - रमणक नावाचे द्वीप सोडून - यद्भयात् - ज्याच्या भयामुळे - एतत् हृदं (त्वं) उपाश्रितः - ह्या डोहाचा तू आश्रय केलास - सः सुपर्णः - तो गरुड - मत्पादलाञ्छितं त्वां - माझ्या चरणकमलांनी चिन्हीत अशा तुला - न अद्यात् - खाणार नाही. ॥६३॥ अद्भुतकर्मणा भगवता कृष्णेन - आश्चर्यकारक कृत्ये करणार्या भगवान श्रीकृष्णाने - एवं उक्तः (कालियः) - याप्रमाणे सांगितला गेलेला तो कालिय - नागपत्न्यः च - आणि त्याच्या स्त्रिया - तं मुदा सादरम् पूजयामास - त्याला आनंदाने आदरपूर्वक पूजित्या झाल्या. ॥६४॥ दिव्यांबरस्रग्मणिभिः - उत्तम वस्त्रे, माळा व रत्ने यांनी - परार्ध्यैः भूषणैः अपि - अत्यंत मूल्यवान अशा अलंकारांनीही - दिव्यगंधानुलेपनैः च - आणि उत्तम सुवासिक गंधांच्या उटयांनी - महत्या उत्पलमालया - तसेच मोठमोठया कमळांच्या माळांनी. ॥६५॥ जगन्नाथं पूजयित्वा - जगाचा स्वामी जो श्रीकृष्ण त्याला पूजून - गरुढध्वजं प्रसाद्य - गरुडवाहन अशा परमेश्वराला प्रसन्न करून - ततः प्रीतः - नंतर संतुष्ट झालेला असा - अभ्यनुज्ञातः (सः) - कृष्णाची आज्ञा घेतलेला तो सर्प - तं परिक्रम्य अभिवंद्य च - कृष्णाला प्रदक्षिणा करून व त्याला नमस्कार करून - सकलत्रसुहृत्पुत्रः - आपल्या स्त्रिया, इष्टमित्र व पुत्र यांसह - अब्धेः द्वीपं - समुद्रातील द्वीपामध्ये - जगाम ह - गेला. ॥६६॥ तदा - त्याच वेळेस - सा यमुना - ती यमुना नदी - क्रीडामानुषरूपिणः - लीलेने मनुष्यरूप धारण करणार्या - भगवतः अनुग्रहात् - भगवंताच्या कृपेने - अमृतजला - अमृताप्रमाणे आहे जल जिचे अशी - निर्विषा (च) अभवत् - व विषरहित अशी झाली. ॥६७॥ अध्याय सोळावा समाप्त |