श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय १४ वा - अन्वयार्थ

ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती -

ईडय - हे स्तुति करण्यास योग्य अशा श्रीकृष्णा - अभ्रवपुषे - मेघाप्रमाणे श्याम आहे शरीर ज्याचे अशा - तडिदम्बराय - विजेप्रमाणे तेजस्वी आहे वस्त्र ज्याचे अशा - गुंजावतंसपरिपिच्छिलसन्मुखाय - गुंजांचे तुरे व मोराची पिसे यांमुळे शोभत आहे मुख ज्याचे अशा - वन्यस्रजे - वनमाळा धारण करणार्‍या - कवलवेत्रविषाणवेणुलक्ष्मश्रिये - हातातील घास, वेताची काठी, शिंग, मुरली या चिन्हांनी शोभणार्‍या - मृदुपदे - कोमल आहेत पाय ज्याचे अशा - पशुपाङगजाय - गवळ्याचा पुत्र अशा - ते - तुला - नौ‌मि - मी नमस्कार करितो. ॥१॥

देव - हे श्रीकृष्णा - आन्तरेण मनसा - अंतर्मुख अशा मनाने - मदनुग्रहस्य - माझ्यावर कृपा करणार्‍या - स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य - स्वतःच्या इच्छेने धारण केलेल्या पण पंचमहाभूतांनी युक्त नसलेल्या अशा - अस्य (ते) वपुषः तु - या तुझ्या शरीराचे देखील - महि अव सितुम् - महात्म्य जाणण्यास - कः अपि - कोणीही - न ईशे - समर्थ होत नाही - साक्षात् - प्रत्यक्ष - आत्मसुखानुभूतेः तव एव - आत्मसुखाचा अनुभव घेण्यार्‍या अशा तुझेच - (मह्यवसितत्वे) किमुत (वक्तव्यम्) - माहात्म्य जाणण्याविषयी काय सांगावे. ॥२॥

ज्ञाने प्रयासं उदपास्य - ज्ञानाविषयींचे श्रम सोडून - स्थाने स्थिताः - एका जागी बसलेले - ये - जे - सन्मुखरितां भवदीयवार्ताम् - सज्जनांनी गायिलेली तुझी कथा - श्रुतिगतां (कृत्वा) - श्रवण करून - तनुवाङ्‌मनोभिः (त्वां) - शरीराने, वाणीने व मनाने तुला - नमन्तः एव जीवन्ति - नमस्कार करूनच आपले जीवित सफल करितात - तैः - त्यांनी - त्रैलोक्याम् - तिन्ही लोकांमध्ये - अजितः (त्वम्) अपि - अजिंक्य असलेला तू सुद्धा - प्रायशः जितः असि - बहुतेक जिंकल्यासारखाच आहेस. ॥३॥

विभो - हे श्रीकृष्णा - ये - जे - श्रेयःस्नुतिम् - कल्याणांचा झरा अशी - ते भक्तिं उदस्य - तुझी भक्ती टाकून - केवलबोधलब्धये (एव) क्लिश्यन्ति - फक्त ज्ञानप्राप्तीसाठी त्रास सोसतात - तेषाम् - त्यांचा - असौ - तो त्रास - यथा स्थूलतुषावघातिनाम् (तथा) - जाडया तुसाचे कांडण करणार्‍या लोकांचा प्रयास जसा तसा - क्लेशलः एव शिष्यते - दुःखरूपानेच शिल्लक राहतो - न अन्यत् - दुसरे काही नाही. ॥४॥

भूमन् अच्युत - हे विराटपुरुषा श्रीकृष्णा - पुरा - पूर्वी - इह - ह्या लोकी - त्वदर्पितेहाः - तुला अर्पिल्या आहेत इच्छा ज्यांनी असे - बहवः योगिनः अपि - पुष्कळ योगीसुद्धा - निजकर्मलब्धया - स्वतःच्या कर्मांनी मिळालेल्या - कथोपनीतया - कथांनी जवळ आणिलेल्या - भक्त्या एव - भक्तीच्याच योगाने - विबुध्य - ज्ञानप्राप्त करून - अञ्जः - तत्काळ - ते परां गतिम् - तुझ्या श्रेष्ठ अशा गतीला - प्रपेदिरे - प्राप्त झाले. ॥५॥

तथापि - तरी सुद्धा - भूमन् - हे विराटपुरुषा - अगुणस्य ते महिमा - ज्याच्या ठिकाणी गुण मुळीच नाहीत अशा तुझे माहात्म्य - अमलान्तरात्मभिः (भक्तैः) - निर्मळ आहे अंतःकरण ज्यांचे अशा भक्तांकडून - अविक्रियात् - ज्यामध्ये विकार नाहीत अशा - अरूपतः - ज्याला रूप नाही अशा - स्वानुभवात् - स्वतःच्या अनुभवाने - अनन्यबोध्यात्मतया हि - खरोखर एकाच रीतीने आहे ज्ञान ज्याचे अशा स्वरूपाने - विबोद्धुं अर्हति - जाणण्यास योग्य आहे - न च अन्यथा - दुसर्‍या कोणत्याही प्रकारे नाही. ॥६॥

(जगतः) हितावतीर्णस्य - जगाच्या कल्याणासाठी अवतरलेल्या - अस्य गुणात्मनः ते अपि - ह्या गुणांनी युक्त अशा तुझे तरी - गुणान् विमातुम् - गुण मोजण्यास - के ईशिरे - कोण समर्थ आहेत - यैः - ज्यांनी - सुकल्पैः - मोठमोठया युक्त्यांनी - कालेन - पुष्कळ काळाने - भूपांसवः - पृथ्वीचे कण - खे मीहिकाः - आकाशातील हिमकण - वा - किंवा - द्युभासः - सूर्याचे किरण - विमिता - मोजिले. ॥७॥

तत् - म्हणून - यः - जो - ते अनुकम्पाम् सुसमीक्षमाणः - तुझ्या दयेची वाट पाहणारा - आत्मकृतं विपाकं भुञ्जानः एव - आपण केलेल्या कर्माचे फळ भोगीत असताच - हद्वाग्वपुर्भिः - मनाने, वाणीने व शरीराने - ते नमः विदधन् - तुला नमस्कार करीत - जीवेत - आयुष्यक्रम चालवितो - सः - तो - मुक्तिपदे - मोक्षस्थानाविषयी - दायभाक् - वाटेकरी. ॥८॥

ईश - हे ईश्वरा - मे (एतत्) अनार्य पश्य - माझा हा क्षुद्रपणा पहा - हि - कारण - कियान् अहम् - कितीतरी अल्प असा मी - अर्चिः अग्नौ इव - ज्वाळा ज्याप्रमाणे अग्नीवर त्याप्रमाणे - अनन्ते - ज्याला अंत नाही अशा - आद्ये - सर्वांच्या आधी असणार्‍या अशा - परमात्मनि - श्रेष्ठ आत्मा अशा - मायिमायिनी - कपटी लोकांनाही मोहित करणार्‍या अशा - त्वयि अपि - तुझ्यावर देखील - मायां वितत्य - कपट पसरून - आत्मवैभवम् - आपले सामर्थ्य - ईक्षितुं ऐच्छम् - पाहण्याची इच्छा करिता झालो. ॥९॥

अतः - म्हणून - अच्युत - हे श्रीकृष्णा - रजोभुवः - रजोगुणापासून उत्पन्न झालेल्या - त्वदजानतः - तुला न जाणणार्‍या - पृथगीशमानिनः - स्वतंत्र राजेपणाचा अभिमान बाळगणार्‍या - अजा वलेपान्धतमोऽन्धचक्षुषः - जन्मरहित असल्याविषयींच्या गर्वांच्या धुंदीने आंधळे झाले आहेत नेत्र ज्याचे अशा - मे - मला - क्षमस्व - क्षमा कर - हि - कारण - मयि (एव रक्षितरि सति) - मी रक्षण करणारा असलो तरच - एषः नाथवान् (भवति) इति विचिन्त्य - हा सनाथ होणार आहे असा विचार करून - भवता - तुझ्याकडून - अहं अनुकम्प्यः (अस्मि) - मी दया केला जाण्यास योग्य आहे. ॥१०॥

तमोमहदहंखचराग्निवार्भू - प्रकृति, महतत्त्व, अहंकार, आकाश, वायू, तेज, उदक व पृथ्वी - संवेष्टिताण्ड - यांनी वेढिलेल्या ब्रह्मांडरूपी - घटसप्तवितस्तिकायः - घटाच्या ठिकाणी आहे सात वितींचा देह ज्याचा असा - अहं क्व - मी कोठे - च - आणि - ईदृग्विधाऽविगणिताण्ड - अशाप्रकारची अनंत ब्रह्मांडे हेच जे कोणी - पराणुचर्यावाताध्वरोमविवरस्य - परमाणू त्यांच्या आतबाहेर येण्याजाण्याच्या खिडक्याच जणु आहेत केसांनी छिद्रे ज्यांच्या अशा - ते - तुझे - महित्वम् - माहात्म्य कोठे. ॥११॥

अधोक्षज - हे श्रीकृष्णा - मातुः गर्भगतस्य (बालकस्य) - मातेच्या गर्भात असलेल्या बालकाचे - पादयोः उत्क्षेपणं - पायांचे वर उचलणे - आगसे कल्पते किम् - अपराध म्हणून समजले जाते काय - अस्तिनास्तिव्यपदेशभूषितम् (इदं विश्वं) - आहे व नाही या शब्दांनी भूषविलेले हे सर्व विश्व - तव कुक्षेः अनन्तः - तुझ्या कुशीच्या बाहेर - कियत् अपि अस्ति किम् - काहीतरी आहे काय. ॥१२॥

ईश्वर - हे श्रीकृष्णा - अजः तु - ब्रह्मदेव तर - जगत्त्रयान्तोदधिसंप्लवोदे - त्रैलोक्याच्या प्रलयकाळी एकत्र झालेल्या समुद्राच्या उदकामध्ये - नारायणस्य - भगवंताच्या - उदरनाभिनालात् - जठरातील नाभिस्थानाच्या कमळापासून - विनिर्गतः - निघाला - इति वाक् - ही वाणी - मृषा न वै - खोटी नव्हे - किंतु - पण - ईश्वरत्वं - ईश्वरत्वाला - न विनिर्गतः अस्मि - प्राप्त झालो नाही. ॥१३॥

त्वं - तू - नारायणः - नारायण - सर्वदेहिनाम् आत्मा - सर्व जीवांचा आत्मा - न हि असि - नाहीस काय - अधीशः - सर्वांचा स्वामी - अखिललोकसाक्षी - सर्व लोकांना प्रत्यक्ष पाहणारा - न हि असि - नाहीस काय - नरभूजलायनात् - नरापासून झालेले जे उदक ते आश्रयस्थान असल्यामुळे - नारायणः - नारायण - (तव एव) अंङगं - तुझीच मूर्ति होय - किन्तु तत् (अपि) सत्यं न - पण तेही खरे नव्हे - (तत्) तव माया एव - ती तुझी मायाच होय. ॥१४॥

भगवन् - हे श्रीकृष्णा - तव - तुझे - जगद्वपुः - जगताला आश्रयभूत असे शरीर - जलस्थं - पाण्यात राहणारे आहे - (इति) सत् चेत् (तर्हि) - हे जर खरे असेल तर - तदा एव - त्याचवेळी - मे किं न दृष्टं - माझ्या दृष्टीस का पडले नाही - वा - अथवा - तदा एव - तप केल्यानंतरच - हृदि - हृदयात - मे किम् सुदृष्टं - मला चांगल्या रीतीने कसे दिसले - पुनः सपदि - पुनः तत्काळ - किं नो व्यदर्शि - का बरे दिसत नाहीसे झाले. ॥१५॥

च - आणि - मायाधमन - हे मायाचालका श्रीकृष्णा - ते अत्र एव अवतारे - तुझ्या ह्याच अवतारामध्ये - बहिः स्फुटस्य - बाहेर स्पष्ट दिसणार्‍या - अस्य प्रपञ्चस्य - या संपूर्ण संसाराच्या - अन्तर्जठरे जनन्याः (दर्शनेन) - आपल्या पोटात मातेला दाखविण्याने - मायात्वमेव - मायावीपणाच - प्रकटीकृतं हि - खरोखर प्रकट केलेला आहे. ॥१६॥

यस्य तव कुक्षौ - ज्या तुझ्या उदरात - सात्मं इदं सर्वं - तुझ्यासह हे सर्व जग - यथा भाति - जसे दिसते - तथा - तसे - तत् इदं सर्वं इह अपि - ते हे सर्व येथेही - भाति - दिसते. ॥१७॥

त्वदृते - तुझ्याशिवाय करून - अस्य मायात्वं - ह्या जगाचे मायावीपण - ते - तू - मम - मला - अद्यैव - आजच - न आदर्शितम् किम् - दाखविले नाहीस काय - प्रथमं - पूर्वी - एकः असि - एकटाच होतास - ततः - नंतर - समस्ताः अपि - सर्वही - व्रजसुहलद्वत्साः - गोकुळातील मित्र व वासरे - अभूः - तू झालास - तावन्तः - तितक्याप्रकारे - तत् - तो - मया साकं - माझ्यासह - अखिलैः उपासिताः - सर्वांनी उपासिलेल्या - चतुर्भुजाः - चार हातांच्या मूर्ति झालास - तावन्ति एव - तितकीच - जगन्ति - जगते - त्वं अभूः - तू झालास - तत् - म्हणून - अमितं अद्वयं ब्रह्म - अनंत व द्वैतरहित असे ब्रह्म - शिष्यते - राहते. ॥१८॥

त्वत्पदवीम् अजानतां - तुझ्या स्थानाला न जाणणार्‍यांना - आत्मा एवं - सर्वव्यापी असा तू - आत्मना - स्वतंत्रपणे - अनात्मनि - प्रकृतिच्या ठिकाणी - मायां वितत्य - माया पसरून - भासि - भासतोस - सृष्टौ अहम् इव भासि - सृष्टि उत्पन्न करण्याच्या काळी मी जो ब्रह्मदेव त्याप्रमाणे भासतोस - जगतः विधाने त्वम् एव - जगाच्या रक्षणकाळी हा तू विष्णुस्वरूपी भासतोस - अन्ते त्रिनेत्रः इव (भासि) - जगाच्या नाशाच्या वेळी शंकराप्रमाणे. ॥१९॥

ईश प्रभो - हे समर्था देवा - विधातः - हे स्रुष्टिकर्त्या - सुरेषु ऋषिषु तथा एव नृषु अपि - देव, ऋषि तसेच मनुष्ये ह्यांच्या ठिकाणीही - यादःसु अपि - जलचरांच्या ठिकाणी सुद्धा - अजनस्य ते जन्म - जन्मरहित अशा तुझा जन्म - असतां दुर्मदनिग्रहाय - दुर्जनाचा उन्माद घालविण्याकरिता - च सदनुग्रहाय - आणि साधूंवर अनुग्रह करण्याकरिता. ॥२०॥

भूमन् योगेश्वर परात्मन् भगवन् - हे सर्वव्यापी श्रेष्ठा परमात्म्या श्रीकृष्णा - कथं भवतः ऊतिः - कशा तुझ्या लीला - क्व - कोठे - वा - अथवा - कति - कितीप्रकारच्या - वा - अथवा - कदा (भूताः) - कोणत्या वेळी झाल्या - इति - असे - कः वेत्ति - कोण जाणतो - त्रिलोक्याम् - त्रैलोक्यामध्ये - योगमायां विस्तारयन् क्रीडसि - योगमायेचा पसारा मांडून तू खेळतोस. ॥२१॥

तस्मात् - म्हणून - असत्स्वरूपं - मिथ्यारूपाने भासणारे - स्वप्नाभम् - स्वप्नाप्रमाणे अनुभवाला येणारे - अस्तधिषणं - नष्ट झाली आहे वृद्धि ज्यांत असे - पुरुदुःखदुःखम् - पुष्कळ दुःखाने भरलेले - इदं अशेषं जगत् - हे सर्व जग - नित्यसुखबोधतनौ - नित्य आनंद व ज्ञान हेच आहे स्वरूप ज्याचे अशा - अनन्ते - अंतरहित - त्वयि एव - तुझ्याठिकाणीच - मायातः - मायेपासून - उद्यत् अपि - उत्पन्न झालेले असताहि - सत् इव अवभाति - जणू खरे असे भासते. ॥२२॥

त्वं - तू - एकः - अद्वितीय - आत्मा - सर्वव्यापी - पुरुषः - शरीरात राहणारा - पुराणः - सर्वांच्या आधीपासून असणारा - सत्यः - सत्यस्वरूप - स्वयंज्योतिः - स्वयंप्रकाश - अनन्तः - अन्तरहित - आद्यः - श्रेष्ठ - नित्यः - नित्य - अक्षरः - अविनाशी - अजस्रमुखः - हजारो मुखांचा - निरञ्जनः - निष्कलंक - पूर्णः - परिपूर्ण - अद्वयः - द्वंद्वरहित - उपाधितः मुक्तः - त्रिगुणोपाधीपासून मुक्त - अमृतः - मोक्षरूप. ॥२३॥

ये - जे - गुर्वर्कलब्धोपनिषत्सुचक्षुषा - गुरुरूपी सूर्यापासून मिळालेल्या उपनिषद्रूपी ज्ञानाच्या दृष्टीने - सकलात्मनाम् अपि - सर्व जीवांच्याही - स्वात्मानं एवंविधं त्वाम् - अंतर्यामीस्वरूपी अशा प्रकारच्या तुला - आत्मात्मतया - अंतर्यामीस्वरूपाने - विचक्षते - पाहतात - ते - ते लोक - भवानृताम्बुधिं - संसाररूपी मिथ्या समुद्राला - तरन्ति इव - जणू तरलेच म्हणून समजावे. ॥२४॥

आत्मानम् एव - आत्म्यालाच - आत्मतया - आत्मस्वरूपाने - अविजानतां - न ओळखणार्‍यांचे - तेन एव जातं - त्यापासूनच झालेले - प्रपञ्चितं निखिलं तत् - पसरलेले सर्व जगत - ज्ञानेन च - ज्ञानानेच - भूयः अपि - पुनः हि - यथा रज्जवां अहेः भोगभवाभवौ (तथा) - जसे दोरीच्या ठिकाणी सर्पशरीराचा भ्रम व त्याचा निरास त्याप्रमाणे - प्रलीयते - नष्ट होते. ॥२५॥

भवबन्धमोक्षौ - संसारसंबन्ध व त्यापासून सुटका - द्वौ नाम - या दोन गोष्टी तर - अज्ञानसंज्ञौ (स्तः) - अज्ञान हे नाव आहे ज्यांना अशा होत - ऋतज्ञभावात् अन्तौ न (स्तः) - नित्यज्ञानरूपाहून निराळ्या अशा काही नव्हेत - केवले परे विचार्यमाणे - शुद्ध व श्रेष्ठ अशा वस्तूचा विचार केला असता - अजस्त्र चित्यात्मनि - अखंड अशा ज्ञानस्वरूपामध्ये - तरणौ अहनी इव - सूर्याच्या ठिकाणी दिवस रात्री प्रमाणे ॥२६॥

त्वां - तुला - पर आत्मानं - श्रेष्ठ आत्मा असे - च - आणि - परमात्मानम् एव - परमात्मा असेहि - मत्वा - मानून - पुनः आत्मा बहिः मृग्यः - फिरुन आत्म्याला बाहेर सर्वत्र शोधण्यास लागावे - अहो - कितीहो - अज्ञजनताज्ञता - अज्ञानी लोकांचे हे अज्ञान आहे ॥२७॥

अनन्त - हे श्रीकृष्णा - अतत् - तत् शब्दाने वाच्य जे ब्रह्म त्याहून वेगळ्या शरीराला - त्यजन्तः सन्तः - सोडणारे साधु - भवन्तं - तुला - अन्तर्भवे एव - शरीरामध्येच - मृगयन्ति हि - खरोखरच शोधितात - असन्तम् अपि अहिं अन्तरेण - नसणार्‍याहि सर्पाला निषेधिल्याशिवाय - सन्तः - सत्पुरुष - अन्ति (एव) सन्तं तं गुणं - जवळच सत्यस्वरूपाने असणार्‍या त्या दोरीला - यन्ति किम् उ - जाणतात काय ॥२८॥

देव - हे श्रीकृष्णा - अथ अपि - तरीसुद्धा - ते - तुझ्या - पदाम्बुजद्वय - दोन चरणकमलांच्या अल्पशाही - प्रसादलेशानुगृहीतः एव हि - प्रसादाने ज्याच्यावर अनुग्रह केला आहे असा भगवद्भक्तच खरोखर - भगवन्महिन्मः - भगवतांच्या माहात्म्याचे - तत्त्वं - तत्त्व - जानाति - जाणतो - चिरं विचिन्वन् अन्यः अपि - पुष्कळ शोधणारा दुसरा एकही - एव नच - जाणत नाही ॥२९॥

नाथ - श्रीकृष्णा - तत् - यास्तव - अत्र भवेत् - ह्या ब्रह्मजन्मामध्ये - वा - किंवा - वा तु - किंबहुना - तिरश्वाम् भवे - पश्वादि योनीमध्ये - सः भूरिभागः - ते मोठे भाग्य - मे अस्तु - मला प्राप्त होवो - येन - ज्यामुळे - अहं - मी - भवज्जनानां एक अपि भूत्वा - तुझ्या भक्तांपैकी कोणी तरी एक होऊन - तव पादपल्लवं निषेवे - तुझ्या चरणपल्लवाचे सेवन करीन ॥३०॥

अहो - अहो - व्रजगोरमण्यः अति धन्याः - गोकुळातील गाई व गोपी फारच दैवशाली - यासां स्तन्यामृतं - ज्यांच्या स्तनांतील दुग्धरूपी अमृत - वत्सतरात्मजात्मना ते - वासरे व गोपबालक ह्यांची रूपे घेणार्‍या तुझ्याकडून - अतीव मुदा पीतम् - मोठया आनंदाने प्याले गेले - अध्वराः - यज्ञ - अद्य अपि - अजूनही - यत्तृप्तये - ज्या तुझ्या तृप्तीसाठी - न च अलं (आसन्) - मुळीच समर्थ झाले नाहीत. ॥३१॥

अहो भाग्यं - केवढे हो हे भाग्य - अहो नंदगोपव्रजौकसां भाग्यं - अहो नंद, गोपाळ व गोकुळात राहणारे इतर लोक ह्यांचे केवढे भाग्य - परमानंदं - श्रेष्ठ आनंदमय - पूर्णं सनातनं ब्रह्म - पूर्ण त्रिकालाबाधित असे ब्रह्म - यन्मित्रं (अस्ति) - ज्यांचा मित्र आहे. ॥३२॥

अच्युत - हे श्रीकृष्णा - एषां तु - ह्या गोकुळवासी जनांच्या तर - भाग्यमहिमा - भाग्याचे माहात्म्य - तावत् आस्तां - क्षणभर राहो - शर्वादयः वयं एकादश एव - शंकरादि आम्ही अकरा सुद्धा - बत भूरिभागाः - खरोखर मोठेच भाग्यवान आहोत - हि - कारण - ह्रषीकचषकैः - इंद्रियरूपी भांड्यांनी - एतत् - हे - ते - तुझ्या - अङ्घ्र्युदजमध्वमृतासवं - चरणकमलांचा मकरन्द हेच कोणी मद उत्पन्न करणारे अमृत - असकृत् - वारंवार - पिबामः - पितो ॥३३॥

तत् - यास्तव - इह अटव्यां - या वृंदावन नामक अरण्यात - यत् किम् अपि जन्म - जो कोणताहि जन्म मिळेल तो - भूरिभाग्यम् - मोठ्या भाग्याचा होय - गोकुले अपि - विशेषतः गोकुळातील - कतमाङ्घ्रिजोऽभिषेकं (जन्म) - कोणाच्याहि चरणाच्या धुळीचे माखण ज्यात आहे असा जन्म - निखिलं यज्जीवितं तु - ज्या गोकुळवासीयांचे सर्व जीवितच - भगवान् मुकुन्दः - भगवान श्रीकृष्ण होय - यत्पदरजः - ज्याच्या पायाची धूळ - अद्य अपि तु - अजूनसुद्धा - श्रुतिमृग्यम् एव - वेदांकडूनहि शोधिलीच जात आहे ॥३४॥

उत - अथवा - देव - हे श्रीकृष्णा - भवान् - तू - घोषनिवासिनाम् एषाम् - गोकुळात रहाणार्‍या ह्यांना - कुत्र अपि - कोठेही - विश्वफलात् त्वत् अपरं - सर्वफलरुपी तुझ्याहून दुसरे - किं फलं राता - काय फळ देणार - इति अयत् नः चेतः - अशा रीतीने विचार करीत बसणारे आमचे अंतःकरण - मुह्यति - मोह पावते - देव - हे श्रीकृष्णा - पूतना अपि - पूतनासुद्धा - सकुला - कुळासह - सद्वेषात् इव - साधूचा वेष घेतल्यामुळेच - त्त्वाम् एव आपिता - तुलाच प्राप्त झाली - यद्धामार्थसुहृत्प्रियात्मतनयप्राणाशयाः - ज्यांचे स्थान, पदार्थ, मित्र, प्रियवस्तु, आत्मा, पुत्र, प्राण व इच्छा ही - त्वत्कृते - तुझ्यासाठी ॥३५॥

कृष्ण - हे श्रीकृष्णा - यावत् जनः ते (भक्ताः) न (भवन्ति) - जोपर्यंत लोक तुझे भक्त होत नाहीत - तावत् (एव) रागादयः स्तेनाः (भवन्ति) - तोपर्यंतच प्रेमादि विकार शत्रू होतात - तावत् (एव) गृहं कारागृहम् (भवति) - तोपर्यंतच घर हे तुरुंग होते - तावत् (एव) - तोपर्यंतच - मोहः - मोह - अङ्घ्रिनिगडः (भवति) - पायाला बंधनकारक होतो ॥३६॥

प्रभो - हे श्रीकृष्णा - निष्प्रपञ्चः (त्वं) अपि - प्रपंचरहित असा तू सुद्धा - भूतले - पृथ्वीवर - प्रपन्नजनतानन्दसंदोहं प्रथितुं - शरण आलेल्या लोकांच्या मोठ्या आनंदाला वाढविण्यासाठी - प्रपञ्चं - प्रपंचाला - विडम्बयसि - अनुसरतोस ॥३७॥

प्रभो - हे श्रीकृष्णा - जानन्तः एव जानन्तु - ज्ञानी पुरुषच जाणोत - बहूक्त्या किम् - फार सांगण्याची काय गरज आहे - तव वैभवं - तुझे माहात्म्य - मे - माझ्या - मनसः वपुषः वाचः - मनाचा, शरीराचा व वाणीचा - न गोचरः (भवति) - विषय होत नाही ॥३८॥

कृष्ण - हे कृष्णा - मां अनुजानीहि - मला आज्ञा दे - सर्वदृक् - सर्वत्र अवलोकन करणारा - त्वं - तू - सर्वं वेत्सि - सर्व जाणतोस - त्वम् एव - तूच - जगतां नाथः - त्रैलोक्याचा अधिपती आहेस - एतत् जगत् - हे जग - तव अर्पितम् - तुला अर्पिले आहे ॥३९॥

वृष्णिकुलपुष्करजोषदायिन् - यादवकुलरूपी कमळाला पुष्टि देणार्‍या - क्ष्मानिर्जरद्विजपशूदधिवृद्धिकारिन् - पृथ्वी, देव, ब्राह्मण, पशु हाच कोणी समुद्र त्याला भरती आणणार्‍या - उद्धर्मशार्वरहर - धर्मबाह्य वर्तन करणारे जे पाखंडी लोक तोच कोणी अंधकार त्याला दूर करणार्‍या - क्षितिराक्षसध्रुक् - पृथ्वीवरील राक्षसांशी द्रोह करणार्‍या - अर्कं अर्हन् - सूर्यापासून सर्वांना पूज्य अशा - भगवन् श्रीकृष्ण - हे षड्‌गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्णा - ते आकल्पं नमः - तुला कल्पांतापर्यंत नमस्कार असो. ॥४०॥

जगद्धाता - जगाला उत्पन्न करणारा ब्रह्मदेव - इति भूमानं अभिष्टूय - याप्रमाणे सर्वव्यापी श्रीकृष्णाची स्तुती करून - त्रिः परिक्रम्य - तीन प्रदक्षिणा घालून - पादयोः नत्वा - पाया पडून - अभीष्टं स्वधाम - इष्ट अशा स्वतःच्या स्थानाला - प्रत्यपद्यत - प्राप्त झाला. ॥४१॥

ततः - नंतर - भगवान् - श्रीकृष्ण - स्वभुवं अनुज्ञाप्य - ब्रह्मदेवाला अनुज्ञा देऊन - प्रागवस्थितान् वत्सान् - पूर्वीप्रमाणे राहिलेल्या वासरांना - यथापूर्वसखं स्वकं पुलिनं - पूर्वीप्रमाणे सर्व मित्र आहेत ज्यात अशा स्वतःच्या वाळवंटावर - आनिन्ये - आणिता झाला. ॥४२॥

राजन् - हे राजा - कृष्णमायाहताः अर्भकाः - श्रीकृष्णाच्या मायेने मोहित झालेले गोपबालक - आत्मनः प्राणेशं अन्तरा - आपल्या प्राणांचा अधिपति श्रीकृष्ण जवळ नसताना - एकस्मिन् अब्दे याते अपि - एक वर्ष गेले असताहि - क्षणार्धं मेनिरे - अर्धा क्षण मानिते झाले. ॥४३॥

इह - ह्या लोकी - मायामोहितचेतसः - मायेने मोहिली आहेत अंतःकरणे ज्यांची असे लोक - किं किं न विस्मरन्ति - काय काय विसरत नाहीत - यन्मोहितं सर्वं जगत् - ज्याच्या मायेने मोहित झालेले सर्व जग - अभीक्ष्णं विस्मृतात्मकं - वारंवार स्वतःला विसरून जाण्याच्या स्वभावाचे आहे. ॥४४॥

सुहृदः - मित्र - कृष्णं ऊचुः - कृष्णाला म्हणाले - अतिरंहसा ते स्वागतं - फारच वेगाने तुझे येणे झाले - (अस्माभिः) एकः अपि कवलः न अभोजि - आम्ही एकही घास खाल्ला नाही - एहि - ये - इतः साधु भुज्यताम् - येथे आपण चांगले भोजन करूया. ॥४५॥

ततः - नंतर - हृषीकेशः - श्रीकृष्ण - हसन् - हसून - अर्भकैः सह अभ्यवहृत्य - मुलांसह भोजन करून - आजगरं चर्म दर्शयन् - अजगराचे कातडे दाखवीत - वनात् व्रजं न्यवर्तत - अरण्यातून गोकुळाकडे परत फिरला. ॥४६॥

बर्हप्रसूननवधातुविचित्रिताङगः - मोरांची पिसे, फुले, ताजे खनिज रंग ह्यांनी चित्रविचित्र दिसणारे आहे शरीर ज्याचे असा - प्रोद्दामवेणुदलशृङगरवोत्सवाढयः - मोठा शब्द करणार्‍या वेताच्या काठया, शिंगे ह्यांच्या ध्वनीमुळे आनंदाने भरून गेलेला - अनुगगीत पवित्रकीर्तिः - अनुचरांनी गायिली आहे पवित्र कीर्ति ज्याची असा - गोपीदृगुत्सवदृशिः - गोपींच्या नेत्रांना आनंद देणारी आहे दृष्टी ज्यांची असा - श्रीकृष्णः - श्रीकृष्ण - वत्सान् गृणन् - वासरांना घेऊन - गोष्ठं प्रविवेश - गोकुळात शिरला. ॥४७॥

अद्य - आज - अनेन यशोदानंदसूनुना - हा यशोदेला आनंद देणारा पुत्र जो श्रीकृष्ण त्याने - महाव्यालः हतः - मोठा अजगर मारिला - च वयं अस्मात् अविताः - आणि आम्हाला त्यापासून वाचविले - इति बालाः व्रजे जगुः - असे गोपबालक गोकुळात सांगते झाले. ॥४८॥

ब्रह्मन् - हे मुने - परोद्भवे कृष्णे - दुसर्‍यापासून झालेल्या कृष्णाच्या ठिकाणी - गोपीनां - गोपींचे - इयान् प्रेमा - एवढे प्रेम - कथं भवेत् - कसे जडले - यः - जे - स्वोद्भवेषु अपि तोकेषु - आपल्या स्वतःच्याही मुलांवर - अभूतपूर्वः - पूर्वी कधी नव्हते - तत् कथ्यतां - ते सांगा. ॥४९॥

नृप - हे राजा - सर्वेषां अपि भूतानाम् - सर्वच प्राण्यांना - स्वात्मा एव वल्लभः (अस्ति) - आपला आत्माच प्रिय असतो - तद्वल्लभतया एव - त्या आत्म्याच्या आवडीमुळेच - अपत्यवित्ताद्याः इतरे - पुत्र, द्रव्य इत्यादि दुसर्‍या गोष्टी - हि (प्रियाः भवन्ति) - खरोखर प्रिय होतात. ॥५०॥

राजेंद्र - हे परीक्षित राजा - यथा - ज्याप्रमाणे - देहिनाम् - प्राण्यांचे - स्वस्वकात्मनि - आपापल्या शरीरावर - स्नेहः (अस्ति) - प्रेम असते - तथा तत् - तसे ते - ममतालम्बिपुत्रवित्तगृहादिषु न - आपलेपणावर अवलंबून राहणार्‍या पुत्र, द्रव्य, गृह इत्यादिकांच्या ठिकाणी नसते. ॥५१॥

राजन्यसत्तम - हे क्षत्रियश्रेष्ठा राजा - देहात्मवादिनां पुंसां अपि - देह हाच आत्मा असे म्हणणार्‍या पुरुषांना सुद्धा - देहः - देह - यथा प्रियतमः - जसा अधिक प्रिय वाटतो - तथा - तसा - तम् अनु ये (भवन्ति) - देहाच्या मागाहून जे होतात - (तेषां) पुत्रादिनां नहि - त्यांना पुत्रादिकांविषयी वाटत नाही. ॥५२॥

असौ देहः अपि - हा देह सुद्धा - ममताभाक् चेत् - जरी आपलेपणाचा भागीदार असला - तर्हि - तरी - आत्मवत्प्रियः न - आत्म्याइतका प्रिय नाही - यत् - कारण - अस्मिन् देहे जीर्यति अपि - हा देह जीर्ण होत असताहि - जीविताशा बलीयसी - जगण्याची आशा फारच बलवान असते. ॥५३॥

तस्मात् - म्हणून - सर्वेषाम् अपि देहिनाम् स्वात्मा - सर्वही प्राण्यांना आपापला आत्मा - प्रियतमः - फारच प्रिय असतो - एतत् - हे - चराचरं सकलं जगत् - स्थावरजंगमात्मक सर्व जग - तदर्थम् एव - त्या आत्म्यासाठीच होय. ॥५४॥

सः अपि - तो श्रीकृष्ण सुद्धा - अत्र - ह्या लोकी - जगद्धिताय - जगाच्या कल्याणाकरिता - मायया - मायेने - देही इव आभाति - देह धारण केल्यासारखा भासतो - एनं कृष्णं - त्या श्रीकृष्णाला - अखिलात्मनां आत्मानं - सर्वांच्या आत्म्यांचा आत्मा - (इति) त्वं अवेहि - असे तू जाण. ॥५५॥

अत्र - ह्या लोकी - वस्तुतः - वास्तविकरीतीने - कृष्णं - श्रीकृष्णाला - स्थास्नु चरिष्णु च अखिलं - स्थावर व जंगम सर्व असे - भगवद्‌रूपं - भगवत्स्वरूप असे - जानतां - जाणणार्‍या - तेषां इह अन्यत् किंचन वस्तु न - त्यांना ह्या लोकी दुसरी काहीही वस्तु नसते. ॥५६॥

सर्वेषाम् अपि वस्तूनां - सर्वही वस्तूंचा - भावार्थः - परमार्थ - स्थितः - कारणरूपी - भवति - असतो - तस्य अपि (भावार्थः) - त्या कारणाचेही परम कारण - भगवान् कृष्णः (अस्ति) - भगवान श्रीकृष्ण होय - अतद्वस्तु किम् - कृष्ण नाही अशी वस्तु कोणती - (तत्) रूप्यताम् - ते सांग. ॥५७॥

ये - जे - मुरारेः - श्रीकृष्णाच्या - पुण्ययशः महत्पदं पदपल्लवप्लवं - पवित्र आहे कीर्ति ज्याची अशा मोठे स्थान देणार्‍या चरणपल्लवरूपी नौकेचा - समाश्रिताः - आश्रय करितात - तेषां - त्यांना - भवाम्बुधिः - संसारसमुद्र - वत्सपदं (भवति) - वासरांच्या पायाने केलेल्या डबक्याप्रमाणे असतो - (तेषां) परं पदं (भवति) - त्यांना श्रेष्ठ पदाची प्राप्ती होते - यत् पदं - जे स्थान - विपदां पदं न (अस्ति) - विपत्तीचे स्थान नव्हे. ॥५८॥

इह - येथे - त्वया - तुझ्याकडून - यत् - जे - अहं - मी - पृष्टः - विचारला गेलो - (तत्) एतत् - ते हे - यत् - जे - कौ‌मारे - कुमारावस्थेत - हरिकृतं - श्रीकृष्णाने केले - तत् (गोपबालकैः) पौगण्डे परिकीर्तितम् - ते गोपबालकांनी त्याच्या पौगंडावस्थेत सांगितले. ॥५९॥

एतत् - हे - सुहृद्भिः - मित्रांसह - चरितं - अनुष्ठिलेले - मुरारेः - श्रीकृष्णाचे - अघार्दनं - अघासुरमर्दन - च शाद्वलजेमनं - व हिरव्या गवतावरील भोजन - व्यक्तेतरत् रूपं - अव्यक्त रूप - अजोर्वभीष्टवं - ब्रह्मदेवाने केलेली मोठी स्तुति - श्रृण्वन् - ऐकणारा - गृणन् (वा) नरः - किंवा गाणारा मनुष्य - अखिलार्थान् एति - सर्व पुरुषार्थांना प्राप्त होतो. ॥६०॥

एवं - याप्रमाणे - व्रजे - गोकुळात - निलायनैः सेतुबन्धैः - लपंडावांनी, पूल बांधण्यांनी - (च) मर्कटोत्प्लवनादिभिः कौ‌मारैः क्रीडाभिः - आणि माकडासारख्या उडया इत्यादि बालपणास योग्य अशा खेळांनी - (रामकृष्णौ) कौ‌मारम् जहतुः - बलराम व श्रीकृष्ण बालवय घालविते झाले. ॥६१॥

अध्याय चवदावा समाप्त

GO TOP