|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १३ वा - अन्वयार्थ
ब्रह्मदेवांचा मोह आणि त्याचा निरास - महाभाग - हे भाग्यवंता - भागवतोत्तम - भक्तांमध्ये श्रेष्ठ अशा परीक्षित राजा - त्वया साधु पृष्टं - तू फार चांगले विचारिलेस - यत् - कारण - मुहुः - वारंवार - ईशस्य कथां शृण्वन् अपि - श्रीकृष्णाची कथा ऐकत असताहि - (तां) नूतनयसि - तू ती नव्यासारखा करितोस ॥१॥ यदर्थवाणी श्रुतिचेतसाम् - परमेश्वराप्रीत्यर्थ लाविलेली आहेत वाणी, कान व मन ज्यांनी अशा - सारभृतां - सार घेणार्या - सताम् - साधूंचा - अपि - सुध्दा - अयं निसर्गः - हा स्वभाव - यत् - की - विटानां स्त्रियाः (वार्ताः) इव - जारांना स्त्रियांच्या गोष्टीप्रमाणे - अच्युतस्य वार्ता - भगवंताची कथा - प्रतिक्षणं - क्षणोक्षणी - नव्यवत् साधु (भवति) - नव्या प्रमाणे चांगली वाटते ॥२॥ राजन् - हे परीक्षित राजा - गुह्यम् अपि - गुप्त आहे तरीसुद्धा - ते वदामि - तुला सांगतो - अवहितः (भूत्वा) शृणुष्व - शांतपणाने ऐक - उत - कारण - गुरवः - गुरु - स्निग्धस्य शिष्यस्य - प्रिय अशा शिष्याला - गुह्यम् अपि ब्रूयुः - गुप्त असले तरी सांगतात ॥३॥ तथा - त्याप्रमाणे - भगवान् - श्रीकृष्ण - मृत्योः अघवदनात् - अघासुराच्या मुखातून - वत्सपालकान् रक्षित्वा - वासरे राखणार्या गवळ्यांचे रक्षण करून - सरित्पुलिनम् आनीय - यमुनानदीच्या वाळवंटात आणून - इदम् अब्रवीत् - असे म्हणाला ॥४॥ अहो वयस्याः - अहो मित्र हो - स्वकेलिसंपत् - आपल्या खेळाचे वैभव असे - मृदुलाच्छवालुकम् - मऊ व स्वच्छ आहे वाळू ज्यात असे - स्फुटत्सरो (ज) गन्धहृतालिपत्रक - फुलणार्या कमळांच्या सुगंधाने ओढून आणिलेल्या - ध्वनिप्रतिध्वानलसत् - भ्रमरांच्या व पक्ष्यांच्या शब्दांच्या ध्वनीने शोभणारे - द्रुमाकुलम् - वृक्षांनी गजबजलेले - पुलिनं - वाळवंट - अतिरम्यं - फार रमणीय आहे ॥५॥ अत्र - येथे - अस्मामिः भोक्तव्यं - आपण भोजन करावे - दिवा रूढं - दिवस पुष्कळ वर आला - (वयं) क्षुधार्दिताः - आपण भुकेने पीडिलेले आहो - वत्साः - वासरे - अपः पीत्वा - पाणी पीऊन - समीपे - जवळच - शनकैः - हळुहळू - तृणं चरन्तु - गवत खात फिरोत ॥६॥ तथेति - बरे आहे असे म्हणून - अर्भाः - ती मुले - वत्सान् पाययित्वा - वासरांना पाणी पाजून - शाद्वले अरुध्यं - हिरव्या गवतावर चरण्याकरिता सोडून - शिक्यानि मुक्त्वा - शिंकी सोडून - भगवता समं - श्रीकृष्णासह - मुदा - आनंदाने - बुभुजुः - भोजन करते झाले ॥७॥ विपिने - अरण्यात - कृष्णस्य - श्रीकृष्णाच्या - विष्वक् - सभोवार - पुरुराजिमंडलैः (आसीनाः) - मोठ्या मंडलाकार ओळींनी बसलेले - (श्रीकृष्णं) अभ्याननाः - श्रीकृष्णाकडे ज्यांची मुखे झाली आहेत असे - फुल्लदृशः - प्रफुल्लित आहेत दृष्टि ज्यांच्या असे - व्रजार्भकाः - गोकुळातील बालक - सह उपविष्टाः - जवळ जवळ बसलेले असे - यथा - ज्याप्रमाणे - अंभोरुहकर्णिकायाः छदाः - कमळातील गाभ्यातील पाकळ्या त्याप्रमाणे - विरेजुः - शोभले ॥८॥ केचित् - कित्येक - पुष्पैः - फुलांच्या योगाने - केचित् - कित्येक - दलैः पल्लवैः अङ्कुरैः फलैः - पाने, पालवी, वृक्षांकुर, फळे ह्यांच्या योगाने - शिग्भिः त्वग्भिः दृषद्भिः च - शिंकी, वृक्षांच्या साली व पाषाण यांच्या योगाने - कृतभाजनाः - केली आहेत, भोजनपात्रे ज्यांनी असे - बुभुजुः - भोजन करिते झाले ॥९॥ सहेश्वराः सर्वे - श्रीकृष्णासह सर्व गोपबालक - पृथक् - निरनिराळ्या रीतीने - स्वस्वभ्योज्यरुचिं - आपापल्या भोजनाची चव - मिथः दर्शयन्तः - एकमेकांना दाखवीत - हसन्तः - हसत - च हासयन्तः - आणि हासवीत - अभ्यवजह्रुः - भोजन करिते झाले ॥१०॥ जठरपटयोः - पोट व त्याभोवती गुंडाळलेले वस्त्र यांमध्ये - वेणुं - मुरली - वामे कक्षे - डाव्या काखेत - शृङगवेत्रे - शिंग व वेताची काठी - पाणौ च - आणि तळहातावर - मसृणकवलं - दहीभाताचा घास - अङ्गुलीषु - बोटात - तत्फलानि - त्या शिदोरीतील फळे - बिभ्रत् - धारण करणारा - बालकेलिः यज्ञभुक् - बालक्रीडा करणारा यज्ञभोक्ता श्रीकृष्ण - मध्ये तिष्ठन् - सर्व मुलांच्यामध्ये राहून - स्वपरिसुहृदः - आपल्या सभोवार बसलेल्या मित्रांना - स्वैः नर्मभिः - स्वतःच्या थटटेच्या भाषणांनी - हासयन् - हासवीत - स्वर्गे लोके मिषती - स्वर्गातील देव पहात असता - बभुजे - भोजन करिता झाला. ॥११॥ भारत - हे परीक्षित राजा - अच्युतात्मसु - श्रीकृष्णरूप बनलेले, - वत्सपेषु - वासरे राखणारे गोपबालक - एवं भुञ्जानेषु - याप्रमाणे भोजन करीत असता - तृणलोभिताः वत्साः तु - गवत खाण्यास लुब्ध झालेली वासरे तर - अत्नर्वने दूरं विविशुः - अरण्यामध्ये पुष्कळ दूर गेली. ॥१२॥ कृष्णः - श्रीकृष्ण - भीभयं - भयोत्पादक गोष्टींची भीति - अस्य - टाकून - भयसन्त्रस्नान् तान् दृष्ट्वा - भयाने पीडिलेल्या त्या गोपबालकांना पाहून - ऊचे - बोलला - मित्राणी - अहो मित्र हो - आशात् मा विरमत - भोजनापासून परावृत्त होऊ नका - अहम् - मी - इह - येथे - वत्सकान् आनेष्ये - वासरांना आणीन. ॥१३॥ पाणिकवलः - हातात आहे घास ज्याच्या असा - सः भगवान् कृष्णः - तो भगवान श्रीकृष्ण - इति उक्त्वा - असे बोलून - अद्रिदरीकुञ्जगह्वरेषु - पर्वत, दर्या, कडे, वेलींच्या जाळ्या व गुहा ह्या ठिकाणी - आत्मवत्सकान् - आपल्या वासरांना - विचिन्वन् - शोधीत - ययौ - गेला. ॥१४॥ कुरूद्वह - हे परीक्षित राजा - यः - जो - स्वे अवस्थितः - स्वर्गात राहणारा - पुरा - पूर्वी - अघासुरमोक्षणं दृष्टवा - अघासुरापासून गोपबालकांची केलेली सोडवणूक पाहून - परं विस्मयं प्राप्तः - अत्यंत आश्चर्याने थक्क झालेला - अम्भोजन्मजनिः - ब्रह्मदेव - तदन्तरगतः - ती संधि मिळालेला असा - मायार्भकस्य प्रभवतः ईशितुः - मायेने बालरूप घेतलेल्या सामर्थ्यवान श्रीकृष्णाचे - अन्यत् अपि - आणखीही - मंजुमहित्वं द्रष्टुं - सुंदर माहात्म्य पाहण्यासाठी - तद्वत्सान् - त्यांच्या वासरांना - च वत्सपान् - आणि वासरे राखणार्या गोपबालकांना - इतः अन्यत्र नीत्वा - येथून दुसरीकडे नेऊन - अन्तरधात् - गुप्त झाला. ॥१५॥ ततः - नंतर - कृष्णः - श्रीकृष्ण - वत्सान् अदृष्टवा - वासरांना न पाहिल्यामुळे - एत्य - परत येऊन - पुलिने - वाळवंटावर - वत्सपान् अपि च - वत्सरक्षक गोपबालकांनाही - उभौ अपि - वासरे व गोपबालक ह्या दोघांनाही - वने - अरण्यात - समंततः विचिकाय - सभोवार शोधिता झाला. ॥१६॥ विश्वजित् कृष्णः - जगज्जेता श्रीकृष्ण - वत्सान् पालान् च - वासरे व त्यांचे रक्षक ह्यांना - अन्तर्विपिने - अरण्यात - क्व अपि - कोठेही - अदृष्टवा - न पाहून - सर्वं विधिकृतं - हे सर्व ब्रह्मदेवाचे कृत्य - (इति) सहसा अवजगाम ह - असे एकाएकी जाणता झाला. ॥१७॥ ततः - नंतर - विश्वकृत् ईश्वरः कृष्णः - जगाचा उत्पादक असा सर्वैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण - तन्मातृणां च कस्य च - गोपबालकांच्या मातांना व ब्रह्मदेवाला - मुदं कर्तुम् - आनंद देण्यासाठी - आत्मानं - स्वतःला - उभयायितं - वासरे व गोपबालक या दोघांचे रूप घेतले आहे ज्याने असा - चक्रे - करिता झाला. ॥१८॥ सर्वस्वरूपः अजः - सर्व विश्व आहे रूप ज्याचे असा श्रीकृष्ण - यावद्वत्सप - ज्या प्रमाणात वासरे राखणारे गोपबालक - वत्सकाल्पकवपुः - व वासरे ह्यांची शरीरे होती त्या प्रमाणात लहान शरीर - यावत् - जितक्या प्रमाणात - कराङ्घ्र्यादिकं - त्यांचे हात, पाय होते त्या प्रमाणात ते आहेत ज्याला असे - यावद्यष्टिविषाण - जशा त्यांच्या काठया, शिंगे, - वेणुदलशिक् - मुरल्या, पाने, शिंकी होती तशी धारण करणारे - यावद्विभूषाम्बरं - ज्याप्रकारचे त्यांचे अलंकार व वस्त्रे होती त्याप्रकारची धारण करणारे - यावच्छीलगुण - जशी त्यांची स्वभाव, गुण, नाव, - अभिधाकृतिवयः - आकृति व वयोवस्था होती तशी आहे ज्याला असे - यावद्विहारादिकं - जसे त्यांचे क्रीडादि व्यवहार होते तसे असणारे - सर्वं विष्णुमयम् (इति) गिरः - सर्व जग विष्णूचे स्वरूप आहे या श्रुतिवचनाला - अङगवत् (कुर्वन) - सार्थ करीत - बभौ - शोभला. ॥१९॥ सर्वात्मा आत्मा - आत्मरूपाने सर्वत्र व्यापून राहणारा श्रीकृष्ण - स्वयं - स्वतः - आत्मवत्सपैः - आत्मरूपी गोपबालकांकडून - आत्मगोवत्सान् प्रतिवार्य - आत्मरूपी वासरांना परत वळवून - आत्मविहारैः च क्रीडन् - आणि आत्मरूपी खेळ खेळत - व्रजं प्राविशत् - गोकुळात शिरला. ॥२०॥ राजन् - हे परीक्षित राजा - सः - तो श्रीकृष्ण - तत्तदात्मा अभवत् - तसतसली गोपबालकांची स्वरूपे धारण करिता झाला - तत्तद्वत्सान् - त्यांच्या त्यांच्या वासरांना - तत्तद्गोष्ठे - त्या त्या गोठयात - पृथक् नीत्वा - निरनिराळी नेऊन - निवेश्य च - आणि स्थापित करून - तत् तत् सद्म - त्या त्या घरी - प्रविष्टवान् - राहता झाला. ॥२१॥ वेणुरवत्वरोत्थिताः - मुरलीच्या नादाने त्वरेने उठलेल्या - तन्मातरः - त्या गोपबालकांच्या माता - सुतान् उत्थाप्य - मुलांना वर उचलून घेऊन - दोर्भिः निर्भरम् परिरभ्य - बाहूंनी गाढ आलिंगन देऊन - परं ब्रह्म मत्वा - हेच परब्रह्म आहे असे मानून - स्नेहस्नुतस्तन्यपयः - प्रेमामुळे बाहेर गळणारे जे स्तनांतील दुग्ध हेच कोणी - सुधा सवं - अमृत असे अमृतरूपी आसव - अपाययन् - पाजित्या झाल्या. ॥२२॥ नृप - हे परीक्षित राजा - ततः - नंतर - माधवः - श्रीकृष्ण - उन्मर्दनमज्जलेपनालंकार - तैलाभ्यंगस्नान, चंदनादि उटी, अलंकार, - रक्षातिलकाशनादिभिः - अंगारादि रक्षाविधि, गंधादि तिलक व भोजन इत्यादिकांनी - संलालितः - लालन केलेला - स्वाचरितैः प्रहर्षयन् - आपल्या लीलांनी आनंद देणारा - यामयमेन - प्रहरांच्या नियमाप्रमाणे - सायंगतः - संध्याकाळी प्राप्त झाला. ॥२३॥ ततः - नंतर - गावः - गाई - सत्वरं गोष्ठं उपेत्य - लवकर गोठयात येऊन - हुंकारघौषैः - हंबरण्याच्या नादांनी - परिहूतसङगतान् - बोलाविल्यामुळे जवळ आलेल्या - स्वकान् स्वकान् - आपापल्या - वत्सतरान् - लहान वासरांना - मुहुः लिहन्त्यः - वारंवार चाटणार्या अशा - स्रवत् औधसं पयः - पान्हा फुटलेल्या ओटीतील दूध - अपाययन् - पाजित्या झाल्या. ॥२४॥ गोगोपीनां - गाई व गोपस्त्रिया यांचे - अस्मिन् - वत्स व गोपबालक ह्यांचे वेष घेणार्या श्रीकृष्णाच्या ठिकाणी - स्नेहर्धिकां विना - प्रेमाचा विशेष वगळून - पुरोवत् - पूर्वीप्रमाणे - सर्वा मातृता - सगळे मातृसंबंधी प्रेम - आसु अपि - ह्या गाई व गोपस्त्रिया ह्यांच्या ठिकाणीही - हरेः तोकता - श्रीकृष्णाचे बालपण - मायया विना - मायेला वगळून. ॥२५॥ व्रजौकसां - गोकुळवासी लोकांची - यथा कृष्णे तथा - जशी श्रीकृष्णावर तशी - स्वतोकेषु अपि - आपापल्या बालकांवरहि - स्नेहवल्ली - प्रेमाची वेल - आ अब्दं - एक वर्षपर्यंत - अन्वहम् - प्रतिदिवशी - शनैः - हळूहळू - निःसीम - अमर्याद - अपूर्ववत् - पूर्वी केव्हाही नव्हती अशी - ववृधे - वाढली. ॥२६॥ आत्मा वत्सपः सः - सर्वव्यापी वत्सरक्षक श्रीकृष्ण - आत्मना - स्वतः - वत्सपालमिषेण - वत्सरक्षक गोपबालकांच्या रूपाने - इत्थं आत्मानं पालयन् - याप्रमाणे वासरांची रूपे घेणार्या स्वतःला राखीत - वनगोष्ठयोः - अरण्यात व गोकुळात - वर्षं चिक्रीडे - एक वर्षपर्यंत क्रीडा करिता झाला. ॥२७॥ एकदा - एके दिवशी - सरामः अजः - बलरामासह श्रीकृष्ण - हायनीपूरणीषु पञ्चषासु त्रियामासु - वर्ष पुरे होण्यास पाच सहा रात्रीच उरल्या असताना - वत्सान् चारयन् - वासरे चरवीत - वनम् आविशत् - अरण्यांत शिरला. ॥२८॥ ततः - नंतर - गोवर्धनाद्रिशिरसि - गोवर्धन पर्वताच्या शिखरावर - तृणं चरन्त्यः गावः - गवत खात फिरणार्या गाई - उपव्रजं चरतः वत्सान् - गोकुळाच्या शेजारी चरणार्या वासरांना - विदूरात् ददृशुः - दुरून पाहत्या झाल्या. ॥२९॥ अथ - मग - (तान्) दृष्टवा - वासरांना पाहून - वत्सस्नेहवशः - त्या वासरांवरील प्रेमाच्या स्वाधीन झालेला - अस्मृतात्मा - स्वतःविषयी देहभान न उरलेला - अत्यात्मपदुर्गमार्गः - रक्षकांना न जुमानता क्लिष्ट मार्गाचा अवलंब केलेला - सः गोव्रजः - तो गाईंचा कळप - द्विपात् - मनुष्याप्रमाणे दोन पायांवर धावून - ककुद्ग्रीवः - वशिंडाकडे ज्यांची मान वळली आहे असा - उदास्यपुच्छः - वर केली आहे शेपटी ज्याने असा - आस्नुपायाः - ज्याच्या स्तनांतून जिकडून तिकडून दूध गळत आहे असा - हुंकृतैः - हंबरडा फोडून - जवेन - मोठया वेगाने - अगात् - प्राप्त झाला. ॥३०॥ च - आणि - वत्सवत्यः अपि गावः - नवी वासरे असलेल्याही गाई - (गोवर्धनस्य) अधः समेत्य - गोवर्धन पर्वताच्या खाली एकत्र जमून - अङगानि गिलन्त्यः इव - जणू वासरांची अंगे गिळीतच आहेत की काय अशा - वत्सान् लिहन्त्यः - वासरांना चाटीत - स्वौधसं फ्यः - आपल्या कासेतील दूध - अपाययन् - पाजित्या झाल्या. ॥३१॥ गोपाः - गोप - तद्रोधनायासमौघ्य - त्या गाईना आवरण्याच्या श्रमांच्या निरर्थकपणामुळे - लज्जोरुमन्युना - वाटलेल्या लाजेने वाढलेल्या क्रोधाने - दुर्गाध्वकृच्छतः - क्लिष्ट मार्ग मोठया कष्टाने ओलांडून - अभ्येत्य - जवळ येऊन - गोवत्सैः (सहितान्) - वासरांसह असणार्या - सुतान् ददृशुः - पुत्रांना पाहते झाले. ॥३२॥ तदीक्षणोत् - त्या पुत्रांच्या दर्शनाने वाढलेल्या - प्रेमरसाप्लुताशयाः - प्रेमरूपी रसात बुडाली आहेत अंतःकरणे ज्यांची असे - जातानुरागाः - उत्पन्न झाले आहे प्रेम ज्यांना असे - गतमन्यवः - गेला आहे राग ज्यांचा असे - ते - ते गोप - अर्भकान् उदुह्य - मुलांना उचलून घेऊन - दोर्भिः परिरभ्य - बाहूंनी आलिंगन देऊन - मूर्धनि घ्राणैः - मस्तकाच्या वास घेण्याने - परमां मुदं आपुः - अत्यंत आनंदाला प्राप्त झाले. ॥३३॥ ततः - नंतर - प्रवयसः - वृद्ध - स्तोकाश्लेषसुनिर्वृताः - पुत्रांच्या आलिंगनाने सुखी झालेले - तदनुस्मृत्युदश्रवः - त्या पुत्रांच्या वारंवार स्मरणाने ज्यांच्या नेत्रातून अश्रू पडत आहेत असे - गोपाः - गोप - शनैः - हळूहळू - कृच्छ्रात् - कष्टाने - अपगताः - दूर गेले. ॥३४॥ रामः - बलराम - मुक्तस्तनेषु - सोडिले आहे स्तनांतील दूध पिणे ज्यांनी - अपत्येषु - अशा जाणत्या वासरांच्या कळपाचे वाढलेले प्रेम - च - आणि - अनुक्षणं औत्कण्ठयं - क्षणोक्षणीचे औत्सुक्य - वीक्ष्य - पाहून - अहेतुवित् अपि - कारण माहीत नव्हते तरी - अचिन्तयत् - विचार करू लागला. ॥३५॥ अखिलात्मनि = सर्वत्र आत्मरूपाने पाहणार्या - वासुदेवे इव - श्रीकृष्णाच्या ठिकाणी जसे तसे - सात्मनः व्रजस्य - माझ्यासह ह्या गोकुळवासी जनांचे - तोकेषु - गोपबालकांच्या ठिकाणी - अद्भुतं अपूर्वं प्रेम - आश्चर्यजनक व विलक्षण प्रेम - वर्धते - वाढत आहे - किम् एतत् (स्यात्) - हे का असावे. ॥३६॥ का इयं (माया) - ही कोणती माया - कुतः आयाता - कोठून आली - दैवी वा नारी उत आसुरी - देवांची किंवा मनुष्यांची किंवा असुरांची - मे अपि विमोहिनी - मला सुद्धा मोहित करणारी - माया - माया - प्रायः - बहुतकरून - मे भर्तुः - माझ्या स्वामीची अर्थात श्रीकृष्णाची - अस्तु - असावी - अन्या न - दुसर्याची नव्हे. ॥३७॥ सः दाशार्हः - तो बलराम - इति संचिन्त्य - असा विचार करून - सर्वान् सवयसान् वत्सान् अपि - बरोबरीच्या सर्व बालकांना व वासरांना सुद्धा - वयुनेन चक्षुषा - ज्ञानदृष्टीने - वैकुण्ठम् - श्रीकृष्णरूपाने - आचष्ट - पाहता झाला. ॥३८॥ ईश - हे परमेश्वरा - एते - ही वासरे - ऋषयः - ऋषींचे अंश - न - नव्हेत - च - आणि - एते - हे गोपबालक - सुरेशः - देवांचे अंश - न - नव्हेत - भिदाश्रये अपि - भेदाचा आश्रय केलेल्या सर्वांत सुद्धा - त्वम् एव - तूच - भासि - भासतोस - सर्वं कथं (भूतं) - हे सर्व कसे झाले - पृथक् त्वं वद - उघड करून तू सांग - इति उक्तेन प्रभुणा - असे विचारलेल्या श्रीकृष्णाने - निगमात् (उक्तं) वृत्तं - संक्षेपाने सांगितलेले वृत्त - बलः अवैत् - बलराम जाणता झाला. ॥३९॥ तावत् - तितक्यात - आत्मभूः - ब्रह्मदेव - आत्ममानेन - आपल्या कालमानाप्रमाणे - त्रुटयनेहसा - एक चुटकी वाजविण्यास जेवढा वेळ लागतो तेवढया वेळाने - एत्य - येऊन - पुरोवत् अब्दं क्रीडन्तं - पूर्वीप्रमाणेच एक वर्षापर्यंत क्रीडा करणार्या - सकलं हरिम् - सर्व गोपबालक व वासरे ह्यांसह श्रीकृष्णाला - ददृशे - पाहता झाला. ॥४०॥ गोकुले - गोकुळात - यावन्तः - जितकी - सवत्साः बालाः - वासरांसह मुले - सर्वे एव हि - सर्वच जण - मे मायाशये शयानाः (सन्ति) - माझ्या मायाजाळात झोपलेले आहेत - अद्य अपि उत्थिताः न - अजून उठले नाहीत. ॥४१॥ अत्र - येथे - इतः - याहून - मन्मायामोहितेतरे - माझ्या मायेने मोहित झालेले नाहीत असे - तत्र - त्या गोकुळात - विष्णुना समं - श्रीकृष्णासह - तावन्तः एव - तितकेच - अब्दं क्रीडन्तः - एक वर्षपर्यंत खेळणारे - एते - हे गोपबालक - कुत्रत्याः (सन्ति) - कोठून आलेले असावे ॥४२॥ एवं - याप्रमाणे - एतेषु भेदेषु - हे दोन प्रकारचे भिन्न वत्स दिसत असता - सः आत्मभूः - तो ब्रह्मदेव - के सत्याः - कोणते खरे - कतरे न - कोणते खरे नाहीत - इति चिरं ध्यात्वा - असा पुष्कळ काल विचार करूनहि - कथंचन ज्ञातुं न ईष्टे - कशाहि रीतीने जाणण्यास समर्थ झाला नाही ॥४३॥ एवं - याप्रमाणे - विमोहं - स्वतः मोहरहित असून - विश्वमोहनं - जगाला मोहित करणार्या - विष्णुं - श्रीकृष्णाला - स्वयं मायया एव संमोहयन् - आपल्या मायेनेच मोहित करू पाहणारा - अजः अपि - ब्रह्मदेव सुद्धा - स्वयम् एव विमोहितः - स्वतःच मोहित झाला ॥४४॥ तम्यां - काळोख्या रात्री - नैहारं तमोवत् - धुक्यापासून होणार्या अंधकाराप्रमाणे - अहनि - दिवसा - खद्योतार्चिः इव - काजव्याच्या प्रकाशाप्रमाणे - महति युञ्जतः - महापुरुषाचे ठिकाणी उपयोजिणार्याची - इतरमाया - साधारण माया - आत्मनि - स्वतःच्या ठिकाणी असणार्या - ऐश्यं - सामर्थ्याला - निहन्ति - नष्ट करित्ये ॥४५॥ ताक्त् - तितक्यात - पश्यतः अजस्य - पहाणार्या ब्रह्मदेवाला - सर्वे वत्सपालाः - सर्व वत्सरक्षक गोपबालक - तत्क्षणात् - एकाएकी - घनश्यामाः - मेघाप्रमाणे कृष्णकांतीचे - पीतकौशेयवाससः - पिवळे रेशमी वस्त्र धारण करणारे असे - व्यदृश्यन्त - दिसले ॥४६॥ चतुर्भुजाः - चार हातांचे - शङ्खचक्रगदाराजीवपाणयः - शंख, चक्र, गदा व कमळ ज्यांच्या हातात आहे असे - किरीटिनः - किरीट घातलेले - कुण्डलिनः - कानात कुंडले असलेले - हारिणः - गळ्यात हार घातलेले - वनमालिनः - गळ्यात वनमाळा घातलेले ॥४७॥ श्रीवत्सांगददोरत्नकम्बु - श्रीवत्सलांछन बाहुभुषणे, गळ्यांत अनेक रत्ने, - कंकणपाणयः - व मनगटात ज्यांच्या कंकणे आहेत असे - नूपुरैः - पैजणांनी - कटकैः - कड्यांनी - कटिसूत्रांगुलीयकैः - कडेदोरे व अंगठ्या यांनी - भाताः - शोभणारे ॥४८॥ सर्वगात्रेषु - सर्व अवयवांच्या ठिकाणी - भूरिपुण्यवदर्पितैः - पुष्कळ पुण्य संपादन केलेल्या पुरुषांनी अर्पिलेल्या - कोमलैः - कोमल - तुलसीनवदामभिः - तुळशीच्या नव्या माळांनी - आंघ्रिमस्तकं - ज्यांचे पायापासून मस्तकापर्यंतचे - आपूर्णाः - सर्व शरीर भरून गेले आहे असे ॥४९॥ चंद्रिकाविशदस्मेरैः - चांदण्याप्रमाणे शुभ्र मंद हास्यांनी - सारुणापाङ्गवीक्षतैः - आरक्तवर्ण कटाक्षाने युक्त अशा अवलोकनांनी - स्वकार्थानां (पूरणाय) - आपल्या भक्तांचे मनोरथ पुरविण्याकरिता - रजः सत्वाभ्यां - रजोगुण व सत्त्वगुण यांनी - (अवतीर्णाः) - युक्त होऊन अवतरलेल्या - स्त्रष्टुपालकाः - सृष्ट्युत्पत्ति व सृष्टिरक्षण करणार्या - इव (द्योतमानाः) - परमेश्वराप्रमाणे शोभणारे ॥५०॥ नृत्यगीताद्यनेकार्हैः - नृत्य, गायन इत्यादि अनेक गोष्टी करण्यास योग्य अशा - आत्मादिस्तम्बपर्यन्तैः - परमेश्वरापासून तो तृणादिकापर्यंतच्या - मूर्तिमद्भिः चराचरैः - मूर्तिमंत स्थावर जंगम प्राण्यांनी - पृथक् पृथक् - निरनिराळ्या रीतीने - उपासिताः - सेविलेले ॥५१॥ अणिमाद्यैः महिमभिः - अणिमादि अष्टैश्वर्यांनी - अजाद्याभिः विभूतिभिः - ब्रह्मादि विभूतींनी - महदादिभिः - महतत्त्वादिक - चतुर्विंशतिभिः तत्त्वैः - चोवीस तत्त्वांनी - परीताः - वेढिलेले. ॥५२॥ स्वमहिध्वस्त महिभिः - भगवंताच्या माहात्म्याने ज्याचे महत्व नष्ट झाले आहे अशा - मूर्तिमद्भिः - मूर्तिमंत - कालस्वभावसंस्कार - काल, स्वभाव, संस्कार, - कामकर्मगुणादिभिः - कामना, कर्मे व गुण इत्यादिकांनी - उपासिताः - सेविलेले. ॥५३॥ सत्यज्ञानानन्तानंद - सत्य, ज्ञान, अनंत व आनंद - मात्रैकरसमूर्तयः - ह्यांनीच केवळ ज्यांच्या रसरूपी मूर्ती बनल्या आहेत असे - उपनिदृशाम् अपि - आत्मज्ञानी लोकांच्या दृष्टींनाही खरोखर - अस्पृष्टभूरिमाहात्म्याः हि - कळलेले नाही मोठे माहात्म्य ज्यांचे असे दिसले. ॥५४॥ अजः - ब्रह्मदेव - एवं - याप्रमाणे - अखिलान् - सर्वांना - परब्रह्मात्मनः - परमेश्वररूपी - सकृत् ददर्श - एकदाच पाहता झाला - यस्य - ज्या परमेश्वराच्या - भासा - तेजाने - सचराचरं इदं सर्वं - स्थावरजंगमात्मक हे संपूर्ण जग - विभाति - प्रकाशते. ॥५५॥ ततः - नंतर - अनिकुतुकोद्वत्य - अत्यंत कौतुकाने द्रुष्टि वळवून - स्तिमितैकादशेन्द्रियः अजः - ज्याची अकरा इंद्रिये स्तब्ध झाली आहेत असा ब्रह्मदेव - तद्धाम्ना - त्याच्या तेजाने - पूर्देव्यन्ति पुत्रिका इव - ग्रामदेवतेपुढे असणार्या पुतळीप्रमाणे - तूष्णीं अभूत् - स्तब्ध झाला. ॥५६॥ अतर्क्ये - ज्याविषयी तर्क करिता येत नाही असा - निजमहिमनि - अलौकिक माहात्म्य असणारा - स्वप्रमितिके - ज्याच्याजवळ स्वयंप्रकाश सुख आहे असा - अजातः - जन्मरहित - परत्र - मायेच्या पलीकडे असणारा - अतन्निरसनमुखब्रह्मकमितौ - ब्रह्ममुखाने अध्यात्मज्ञानाच्या योगेच ज्ञान होणारे आहे असा - इरेशे - वाक्पति ब्रह्मदेव - इति मुह्यति सति - अशा रीतीने मोहित झाला असता - वा - किंवा - इदं किम् इति - हे काय आहे असे म्हणून - द्रष्टुम् अपि अनीशे (सति) - पाहण्यासही असमर्थ झाला असता - परमः अजः - श्रेष्ठ श्रीकृष्ण - सपदि - तत्काळ - (तत्) ज्ञात्वा - ते जाणून - अजाजवनिकां - मायेच्या पडद्याला - चछाद - दूर करिता झाला. ॥५७॥ ततः - नंतर - अर्वाक्प्रतिलब्धाक्षः - बाह्यदृष्टीने अवलोकन करणारा - परेतवत् उत्थितः - मेलेला मनुष्य उठावा त्याप्रमाणे उठलेला - कः - ब्रह्मदेव - कृच्छ्रात् दृष्टिः उन्मील्य - कष्टाने डोळे उघडून - आत्मना सह - स्वतःसह - इदं - हे - आचष्ट वै - खरोखर पाहता झाला. ॥५८॥ सपदि एव - तत्काळच - दिशः अभितः पश्यन् - दिशांच्या सभोवार पाहून - पुरः स्थितं - पुढे असलेल्या - जनाजीव्यद्रुमाकीर्णं - लोकांच्या उपजीविकेचे साधनभूत जे वृक्ष त्यांनी वेष्टिलेल्या - समाप्रियम् - सभोवार पसरलेल्या आहेत प्रिय वस्तु जेथे अशा - वृंदावनं - वृंदावनाला - अपश्यत् - पाहता झाला. ॥५९॥ यत्र - जेथे - नैसर्गदुर्वैराः - स्वभावतःच वैर करणारे - नृमृगादयः - मनुष्य, मृग इत्यादिक - मित्राणि इव - मित्रांप्रमाणे - सह - एकत्र - आसन् - होते - अजितावास - श्रीकृष्णाच्या सहवासाने - द्रुतरुट्तर्षकादिकम् - पळून गेले आहेत रोग तृषा इत्यादि विकार ज्यांतून असे ॥६०॥ परमेष्ठी - ब्रह्मदेव - पुरा इव - पूर्वीप्रमाणे - तत्र - तेथे - पशुपवंशशिशुत्वनाट्यं उदवहत् - गोपवंशात बालरूपाने सोंग घेणार्या - अद्वयं - एक - परम् - श्रेष्ठ - अनन्तं - अन्तरहित - अगाधबोधं - अपरिमित ज्ञानसंपन्न - वत्सान् (च) सखीन् - वासरांना व सोबत्यांना - परितः विचिन्वन् - जिकडेतिकडे शोधणार्या - एकं - मुख्य - सपाणिकवलं - हातात आहे घास ज्याच्या अशा - ब्रह्म - ब्रह्मरुपी श्रीकृष्णाला - अचष्ट - पहाता झाला ॥६१॥ दृष्ट्वा - पाहून - निज धोरणतः - आपल्या वाहनावरून - त्वरेण - लवकर - अवतीर्य - उतरून - वपुः - शरीर - कनकदण्डम् इव - सोन्याच्या काठीप्रमाणे - पृथ्व्यां आनिपात्य - जमिनीवर पाडून - चतुर्मुकुटकोटीभिः - चार मुकुटांच्या टोकांनी - अङ्घ्रियुग्मं स्पृष्टवा - दोन चरणांना स्पर्श करून - नत्वा - नमस्कार करून - मुदश्रुसुजलैः - आनंदाश्रूंच्या उदकांनी - अभिषेकं अकृत - अभिषेक करिता झाला ॥६२॥ प्राग्दृष्टं महित्त्वं - पूर्वी पाहिलेले माहात्म्य - पुनःपुनः - वारंवार - स्मृत्वा स्मृत्वा - स्मरून स्मरून - उत्थाय उत्थाय - पुनःपुनः उठून - चिरस्य - पुष्कळकाळपर्यंत - कृष्णस्य पादयोः - श्रीकृष्णाच्या पायावर - पतन् आस्ते - पडून रहाता झाला ॥६३॥ अथ - नंतर - शनैः उत्थाय - हळूच उठून - लोचने विमृज्य - डोळे स्वच्छ करून - मुकुंदं उद्वीक्ष्य - श्रीकृष्णाकडे पाहून - कृताञ्जलिः - हात जोडून - प्रश्रयवान् - नम्र होऊन - समाहितः - समाधान पावलेला - सवेपथुः - कापतकापत - गद्गदया इलया - गद्गद अशा वाणीने - ऐलत - स्तुति करु लागला ॥६४॥ अध्याय तेरावा समाप्त |