|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय २४ वा - अन्वयार्थ
विदर्भाच्या वंशाचे वर्णन - विदर्भः - विदर्भ- तस्यां - त्या भोज्येच्या ठिकाणी- नाम्ना कुशक्रथौ पुत्रौ - कुश व क्रथ नावाचे दोन पुत्र- विदर्भकुलनन्दनं - आणि विदर्भवंशाला आनंद देणारा - तृतीयं (पुत्रं) रोमपादं - तिसरा रोमपाद नावाचा पुत्र- अजनयत् - उत्पन्न करिता झाला. ॥१॥ रोमपादसुतः बभ्रुः - रोमपादाचा पुत्र बभ्रु- बभ्रोः कृतिः अजायत - बभ्रूपासून कृति झाला- नृप - हे परीक्षित राजा- तत्सुतः उशिकः - त्याचा पुत्र उशिक- तस्मात् चेदिः - त्यापासून चेदि- (ततः) चैद्यादयः - नंतर चैद्यप्रमुख दुसरे उत्पन्न झाले. ॥२॥ क्रथस्य पुत्रः कुन्तिः अभूत् - क्रथाचा पुत्र कुन्तिनामक होता- तस्य धृष्टिः - त्याचा धृष्टि- अथ निर्वृतिः - त्याच्यापासून निर्वृति- ततः नाम्ना दशार्हः अभूत् - त्यापासून दशार्ह नावाचा पुत्र झाला- तस्यसुतः व्योमः - त्याचा पुत्र व्योम- ततः जीमूतः - त्यापासून जीमूत- तस्य विकृतिः - त्याचा पुत्र विकृति- यस्य सुतः भीमरथः - ज्याचा पुत्र भीमरथ- ततः नवरथः पुत्रः - त्यापासून नवरथ नावाचा पुत्र झाला- ततः दशरथः जातः - त्यापासून दशरथ झाला. ॥३-४॥ ततः शकुनिः - त्यापासून शकुनि- शकुनेः पुत्रः - शकुनीचा पुत्र- करम्भिः - करम्भि- तदात्मजः देवरातः - त्याचा पुत्र देवरात- ततः देवक्षत्रः - त्यापासून देवक्षत्र- तस्य मधुः - त्याचा मधु- कुरुवशात् अनुः - कुरुवशापासून अनु. ॥५॥ अनोः पुत्रः तु पुरुहोत्रः - अनूचा पुत्र तर पुरुहोत्र- तस्य आयुः - त्याचा आयु- ततः सात्वतः - त्यापासून सात्वत- भजमानः भजिः दिव्यः - भजमान, भजि, दिव्य, - वृष्णिः देवावृधः अंधकः - वृष्णि, देवावृध, अंधक- महाभोजः च - आणि महाभोज- इति सात्वतस्य सप्त पुत्राः - असे सात्वताचे सात पुत्र होते- मारिष - हे राजा- भजमानस्य निम्लोचिः - भजमानाला निम्लोचि, - किंकिणः च धृष्टिः एव - किंकिण आणि धृष्टि एवढेच- एकस्यां पत्न्यां आत्मजाः - एका स्त्रीच्या ठिकाणी पुत्र झाले- प्रभो - हे राजा- अन्यस्यां च शताजित् - आणि दुसर्या स्त्रीच्या ठिकाणी शताजित, - सहस्राजित् अयुताजित् च इति त्रयः सुताः - सहस्राजित अयुताजित असे तीन पुत्र झाले. ॥६-८॥ देवावृधसुतः बभ्रुः - देवावृधाचा पुत्र बभ्रु- तयोः अमू श्लोकौ पठन्ति - त्या दोघांविषयी हे दोन श्लोक म्हणतात- यथा एव दूरात् शृणुमः - जसे दूरच्या प्रदेशातून ऐकतो- तथा अंतिकात् संपश्यमः - तसे जवळही पाहतो. ॥९॥ बभ्रुः मनुष्याणां श्रेष्ठः आसीत् - बभ्रु हा मनुष्यांत श्रेष्ठ झाला- देवावृधः देवैः समः - देवावृध हा देवांसारखा झाला- षट्सहस्राणि च पञ्चषष्ठिः अष्ट च पुरुषाः - सहा हजार त्र्याहत्तर इतके पुरुष- ये - जे- बभ्रोः देवावृधात् अपि - बभ्रूच्या आणि देवावृधाच्याही उपदेशापासून- अमृतत्वं अनुप्राप्ताः - मोक्षाला मिळविते झाले- महाभोजाः अपि धर्मात्मा - महाभोजसुद्धा अत्यंत धर्मशील होता- तदन्वये भोजाः आसन् - त्याच्या वंशात भोज नावाचे राजे झाले. ॥१०-११॥ वृष्णैः सुमित्रः पुत्रः अभूत् - वृष्णीपासून सुमित्र नावाचा पुत्र झाला- परंतप - हे राजा- युधाजित् च अपि - आणि युधाजित सुद्धा- तस्य शिनिः अनमित्रः च - त्या युधाजिताला शिनि व अनमित्र असे दोन पुत्र झाले- अनमित्रतः निम्नः अभूत् - अनामित्रापासून निम्ननामक पुत्र झाला. ॥१२॥ निम्नस्य सत्राजितः - निम्नाला सत्राजित - प्रसेनः च (इति) सुतौ आसतुः - व प्रसेन असे दोन मुलगे होते- अनमित्रसुतः यः अन्यः शिनिः - अनमित्राचा जो दुसरा पुत्र शिनि- अथ तस्य सात्यकः - त्या शिनीचा पुत्र सात्यक हा होय. ॥१३॥ सात्यकिः युयुधानः - सात्यकाचा पुत्र युयुधान- तस्य जयः - त्याचा जय- ततः कुणिः - त्यापासून कुणि- (कुणेः) युगंधरः - कुणीपासून युगंधर- अनमित्रस्य अपरः पुत्रः वृष्णिः - अनमित्राचा दुसरा पुत्र वृष्णि- ततः श्वफल्कः चित्ररथः च - त्या वृष्णिपासून श्वफल्क आणि चित्ररथ- श्वफल्कतः च - आणि श्वफल्कापासून - गांदिन्यां विश्रुताः - गांदिनीच्या ठिकाणी प्रसिद्ध असे - अक्रूरप्रमुखाः द्वादश पुत्राः आसन् - अक्रूरादिक बारा पुत्र झाले. ॥१४-१५॥ आसङ्गः सारमेयः मृदुरः मृदुवित् - आसंग, सारमेय, मृदुर, मृदुवित, - गिरीः धर्मवृद्धः च सुकर्मा च - गिरी, धर्मवृद्ध आणि सुकर्मा आणि - क्षेत्रोपेक्षः च अरिमर्दनः - क्षेत्रोपेक्ष व अरिमर्दन. ॥१६॥ शत्रुघ्नः गन्धमादः च - शत्रुघ्न आणि गंधमाद व - प्रतिबाहुः च (इति) द्वादश - प्रतिबाहु असे बारा पुत्र होते- तेषां सुचीराख्या स्वसा आसीत् - त्यांची सुचीरा नावाची बहीण होती- देववान् च उपदेवः - देववान व उपदेव - (इति) द्वौ अपि अक्रूरसुतौ - हे दोनही अक्रूराचे पुत्र होत- च पृथः विदूरथाद्याः चित्ररथात्मजाः - आणि पृथु विदूरथ इत्यादि चित्ररथाचे पुत्र- वृष्णिनःनन्दनाः ख्याताः - वृष्णीचे पुत्र म्हणून प्रसिद्ध झाले- कुकुरः भजमान शुचिः - कुकुर, भजमान, शुचि - कम्बलबर्हिषः च (इति अंधकस्य पुत्राः) - आणि कंबलबर्हि हे अंधकाचे मुलगे होत- कुकुरस्य सुतः वह्निः - कुकुराचा पुत्र वह्नि- ततः तनयः विलोमा - त्यापासून विलोमानामक पुत्र झाला. ॥१७-१९॥ (ततः) कपोतरोमा जातः - त्या विलोम्याला कपोतरोमा झाला- तस्य अनुः - त्याचा पुत्र अनु- यस्य च सखा तुम्बुरुः - आणि ज्याचा मित्र तुंबरु- (तस्य) अन्धकः - त्या अनूचा पुत्र अंधक- (ततः) दुन्दुभि - त्या अंधकापासून दुन्दुभि- तस्य दरिद्योतः - त्याचा दरिद्योत- (ततः) पुनर्वसुः - त्यापासून पुनर्वसु. ॥२०॥ तस्य च आहुकः (पुत्रः) - त्याला आहुक नावाचा पुत्र - आहुकी कन्या च एव - व आहुकी नावाची कन्या एवढीच संतती होती- देवकः च उग्रसेनः च (इति) आहुकात्मजौ - देवक आणि उग्रसेन हे आहुकाचे पुत्र होत- देववान् उपदेवाः च सुदेवः - देववान, उपदेव, सुदेव आणि - देववर्धनः चत्वारः देवकात्मजाः - देववर्धन असे चार देवकाचे मुलगे- नृप - हे राजा- तेषां धृतदेवादयः - त्यांना धृतदेवा आदिकरून - सप्त स्वसारः आसन् - सात बहिणी होत्या- शान्तिदेवा उपदेवा च - शांतिदेवा, उपदेवा, - श्रीदेवा देवरक्षिता - श्रीदेवा, देवरक्षिता, - सहदेवा देवकी च - सहदेवा आणि देवकी अशा इतर सहा होत- वसुदेवः च ताः उवाह - आणि वासुदेवाने त्यांशी विवाह लाविला. ॥२१-२३॥ कंस सुनामा न्यग्रोधः - त्याचप्रमाणे कंस, सुनामा, न्यग्रोध, - कङ्कः तथा सुहूः अथ राष्ट्रपालः सृष्टि - कंक, शंकु तसाच सुहू, राष्ट्रपाल आणि सृष्टि - तुष्टिमान् च (इति) आग्रैसेनयः - व तुष्टिमान हे उग्रसेनाचे मुलगे होत. ॥२४॥ कंसा कंसवती कंकः - कंसा, कंसवती, कंका, - शूरभू राष्ट्रपालिका उग्रसेनदुहितरः - शूरभू आणि राष्ट्रपालिका या उग्रसेनाच्या मुली - वसुदेवानुजस्त्रियः - वसुदेवाच्या धाकटया भावाच्या पत्न्या होत्या. ॥२५॥ विदूरथात् शूरः आसीत् - विदूरथापासून शूरनामक पुत्र झाला- ततः भजमानः सुतः - त्या शूरापासून भजमान पुत्र झाला- (ततः) शिनिः - त्यापासून शिनि- तस्मात् स्वयं भोजः - त्यापासून स्वयंभोज- तत्सुतः हृदीकः मतः - त्याचा पुत्र हृदीक होय. ॥२६॥ देवबाहुः शतधनुः कृतवर्मा - त्या हृदीकाला देवबाहु, शतधनु, कृतवर्मा - (देवमीढः) इति तत्सुताः - व देवमीढ असे चार पुत्र झाले- देवमीढस्य शूरस्य - देवमीढपुत्र जो शूर त्याची - मारिषा नाम पत्नी अभूत् - मारिषा नावाची स्त्री होती. ॥२७॥ तस्यां सः अकल्मषान् - त्या मारिषेच्या ठिकाणी तो शूर निष्पाप - दश पुत्रान् जनयामास - असे दहा मुलगे उत्पन्न करिता झाला- वसुदेवं देवभागं देवश्रवसं आनकं - वसुदेव, देवभाग, देवश्रवस आनक. ॥२८॥ सृञ्जयं श्यामकं कंङ्कं - सृंजय, श्यामक, कंक, - शमीकं वत्सकं वृकं - शमीक, वत्सक व वृक- यस्य जन्मनि - ज्याच्या जन्माच्या वेळी - देवदुन्दुभयः आनकाः नेदुः - आनक नावाच्या देवांच्या दुंदुभि वाजल्या- हरेः स्थानं (तं) वसुदेवं - श्रीकृष्णाचे उत्पत्तीस्थान अशा त्या वसुदेवाला- आनकदुन्दुभिं वदन्ति - आनकदुंदुभि असे म्हणतात- पृथा च श्रुतदेवा च - पृथा, श्रुतदेवा, - श्रुतकीर्तिः च श्रुतश्रवाः च - श्रुतकीर्ति, श्रुतश्रवा व - राजाधिदेवी (एताः) पञ्च कन्यकः - राजाधिदेवी या पाच कन्या - एतेषां भगिन्यः - शूराच्या पुत्राच्या बहिणी होत- पिता शूरः अपुत्रस्य सख्युः - पिता शूर हा निपुत्रिक अशा - कुंतेः पृथा हि अदात् - कुंति नामक मित्राला पृथा देता झाला. ॥२९-३१॥ सा प्रतोषितात् दुर्वाससः - ती पृथा संतुष्ट झालेल्या दुर्वासापासून - देवहुतीं विद्यां आप - देवांना बोलावण्याची विद्या मिळविती झाली- तस्याः वीर्यपरीक्षार्थं - त्या विद्येच्या सामर्थ्याची परीक्षा पाहण्याकरिता - शुचिं रविं आजुहाव - पवित्र सूर्याला ती बोलाविती झाली. ॥३२॥ तदा एव वीक्ष्य - तत्क्षणीच आलेल्या सूर्याला पाहून - (सा) विस्मितमानसा (अभवत्) - ती पृथा आश्चर्यचकित झाली- देव प्रत्ययर्थं - हे सूर्या, विश्वास बसण्याकरिता - प्रयुक्ता (विद्या) - मी या विद्येचा उपयोग केला- याहि मे क्षमस्व - जा मला क्षमा करा- इति उवाच - असे म्हणाली. ॥३३॥ देवी - हे पृथे- (मम) दर्शनं अमोघं - माझे दर्शन फुकट जाणारे नाही- त्वयि च आत्मजं आधत्से - तुझ्या ठिकाणी पुत्राला स्थापू इच्छितो- सुमध्यमे - हे सुंदरी- यथा ते योनिः न दुष्येत - ज्यायोगे तुझी योनि दूषित होणार नाही- (तथा) अहं कर्ता - तसे मी करीन. ॥३४॥ इति - असे बोलून- सः सूर्यः - तो सूर्य- तस्यां गर्भं आघाय - तिच्या ठिकाणी गर्भाची स्थापना करून- दिवं गतः - स्वर्गी गेला- सद्यः द्वितीयः भास्करः इव - तत्काळ दुसरा सूर्यच की काय - कुमारः संजज्ञे - असा पुत्र उत्पन्न झाला. ॥३५॥ लोकस्य कृच्छ्रात् बिभ्यती - लोकांच्या निंदेला भिऊन- सा तं - ती त्या कुमाराला - नदीतोये अत्यजत् - नदीच्या पाण्यात सोडिती झाली- (तव) प्रपितामहः - तुझा पणजोबा - सत्यविक्रमः पांडुः - जो पराक्रमी पांडु - ता उवाहं वै - तिच्याशी विवाह लाविता झाला. ॥३६॥ कारूषः वृद्धशर्मा - करूषपुत्र वृद्धशर्मा - श्रुतदेवां समग्रहीत् - श्रुतदेवीशी विवाह लाविता झाला- यस्यां ऋषिशप्तः दितेः सुतः - जिच्या ठिकाणी ऋषींनी शापिलेला दितीचा पुत्र - दन्तवक्त्रः अभूत् - हिरण्यकशिपु दंतवक्त्र नावाने जन्मला. ॥३७॥ कैकेयः धृष्टकेतुः श्रुतकीर्ति अविंदत - कैकेयपुत्र धृष्टकेतु श्रुतकीर्तिला मिळविता झाला- तस्यां संतर्दनादयः - तिच्या ठिकाणी संतर्दन आदिकरून- पंच कैकेय सुताः आसन् - पाच पुत्र कैकेय नावाने प्रसिद्ध झाले. ॥ जयसेन राजाधिदेव्यां - जयसेन राजाधिदेवीच्या ठिकाणी - आवन्त्यौ अजनिष्ट ह - पुढे अवन्तिदेशाचे राजे झालेले असे दोन पुत्र झाले- चेदि राजा दमघोषः श्रुतश्रवसं अग्रहीत - चेदि देशाच्या दमघोषराजाने श्रुतश्रवेचा स्वीकार केला. ॥३९॥ तस्याः सुतः शिशुपालः - तिचा पुत्र शिशुपाल- तस्यसंभवः कथितः - त्याच्या उत्पत्तीची कथा सांगितली आहेच- देवभागस्य कंसायां - देवभागाला कंसा नामक स्त्रीच्या ठिकाणी - चित्रकेतुबृहद्वलौ (जातौ) - चित्रकेतु व बृहद्वल असे पुत्र झाले. ॥४०॥ देवश्रवसः कंसवत्यां - देवश्रवाला कंसावती स्त्रीच्या ठिकाणी - सुबीरः तथा इषुमान (जातः) - सुबीर तसाच इषुमान पुत्र झाला- आनकात् कंकायां - आनकापासून कंकेच्या ठिकाणी - सत्यजित् तथा पुरुजित् जातः - सत्यजित तसाच पुरुजित पुत्र झाला. ॥४१॥ सृञ्जयः च राष्ट्रपाल्यां - आणि सृंजय राष्ट्रपालीच्या ठिकाणी - वृषदुर्मर्षणादिकान् (अजनयत्) - वृष, दुर्मर्षण आदी करून पुत्र उत्पन्न करिता झाला- श्यामकः च शूरभूम्यां - आणि श्यामक शूरभूमीच्या ठिकाणी - हरिकेशहिरण्याक्षौ (जनयामास) - हरिकेश व हिरण्याक्ष असे दोन पुत्र उत्पन्न करिता झाला. ॥४२॥ तथा वत्सकः मिश्रकेश्यां - त्याचप्रमाणे वत्सक मिश्रकेशी नामक अप्सरेच्या- अप्सरसि वृकादीन् - ठिकाणी वृक आदि करून पुत्र उत्पन्न करिता झाला- वृकः दुर्वाक्ष्र्या तक्ष पुष्कर - वृक दुर्वाक्षीच्या ठिकाणी तक्ष, पुष्कर - शालादीन् आदधे - शाल आदी करून पुत्र उत्पन्न करिता झाला. ॥४३॥ शमीकात् तु सुदामिनी - शमीकापासून तर सुदामिनी - सुमित्रार्जुनपालादीन् (अशूत) - सुमित्र अर्जुनपाल इत्यादी पुत्र प्रसविती झाली- कङ्कःच कर्णिकायां वै - आणि कंक कर्णिकेच्या ठिकाणी - ऋतधामजयौ अपि - ऋतधाम व जय जसे पुत्र उत्पन्न करिता झाला. ॥४४॥ पौरवी रोहिणी भद्रा - पौरवी, रोहिणी, भद्रा, - मदिरा रोचना इला (इति) - मदिरा, रोचना, इला अशा - देवकी प्रमुखाः आनकदुन्दुभेःपत्न्यःआसन् - देवकी प्रमुख वसुदेवाच्या सात पत्न्या होत्या.॥४५ वसुदेवः तु रोहिण्यां - वसुदेव तर रोहिणीच्या ठिकाणी - बलं गदं सारणं दुर्मदं विपुलं - बल, गद, सारण, दुर्मद, विपुल, - ध्रुवं च कृतादीन्ं उद्पादयत् - ध्रुव आणि कृत आहे ज्येष्ठ ज्यात असे पुत्र उत्पन्न करिता झाला. ॥४६॥ सुभद्रः भद्रवाहः च दुर्मदः - सुभद्र, भद्रवाह, आणि दुर्मद - भद्रः एव च ऐते भूताद्याः - तसाच भूत आहे पहिला ज्यामध्ये असे - द्वादश तनयाः पौरव्याः अभवन् - बारा मुलगे पौरवीला झाले.॥४७॥ नंदोपनंदकृतकशूराद्याः - नंद, उपनंद, कृतक, शूर इत्यादि - मदिरात्मजाः - मदिरेचे मुलगे होत- कौशल्या तु एकं - कौशल्या तर कुलाला आनंद देणारा - केशिनं असूत - केशि नामक एकच पुत्र प्रसवली. ॥४८॥ अतः रोचनायां - पुढे रोचनेच्या ठिकाणी - हस्तहेमाङगदादयः जाताः - हस्त, हेमाङगद, इत्यादी पुत्र झाले- इलायां - इलेच्या ठिकाणी - उरुवल्कादीन् यदुमुख्यान् - ऊरुवल्क इत्यादी यदु ज्यात आहे असे पुत्र - (सः) अजीजनत् - वसुदेव उत्पन्न करिता झाला. ॥४९॥ आनकदुन्दुभेः धृतदेवायां - वसुदेवापासून धृतदेवीच्या ठिकाणी - एकः विपृष्ठः - विपृष्ठ नामक एक पुत्र झाला- राजन् - हे परीक्षित राजा- श्रमप्रतिश्रुतादयः शान्तिदेवात्मजाः - श्रम, प्रतिश्रुत इत्यादी शांतीदेवतेचे मुलगे होत. ॥५०॥ कल्पवर्षाद्याः दश राजानः उपदेवासुताः - कल्पवर्ष इत्यादी दहा राजे उपदेवेचे पुत्र होत- श्रीदेवायाः तु वसुहंससुवंशाद्याः - श्रीदेवीला तर वसु, हंस, सुवंश - षट् सुताः - इत्यादी सहा पुत्र झाले. ॥५१॥ देवरक्षितया च अत्र - आणि देवरक्षितेने वसुदेवापासून - गदादयः नव पुत्राः लब्धाः - गदादिक नऊ पुत्र मिळविले- वसुदेवः सहदेवया साक्षात् धर्मः - वसुदेव सुदेवेच्या योगे प्रत्यक्ष धर्माने उत्पन्न केलेल्या - वसून् इव पुरुविश्रुत मुख्यान् - वसूप्रमाणे पुरुविश्रुत इत्यादी - अष्टौ सुतान् आदधे - आठ पुत्र उत्पन्न करिता झाला. - वसुदेवः तु देवक्यां - वसुदेव तर देवकीच्या ठिकाणी - अष्ट पुत्रान् अजीजनत् - आठ पुत्र उत्पन्न करिता झाला. ॥५२-५३॥ उदारधीः - तो उदार बुद्धीचा वसुदेव- कीर्तिमन्तं सुषेणं - कीर्तिमान, सुषेण, - भद्रसेनम् ऋजुं संमर्दनं - भद्रसेन, ऋजु, संमर्दन - भद्रं अहीश्वरं संकर्षण आणि शेषावतार संकर्षण ह्यांना - च (अजीजनत्) - उत्पन्न करिता झाला. ॥५४॥ तयोः किल अष्टमः (पुत्रः) - त्यांचा आठवा पुत्र - स्वयम् एव हरिः आसीत् - म्हणून भगवान विष्णु होता- राजन् - हे राजा- (अनयोः च कन्या) - आणि यांचीच कन्या- तव महाभागा पितामही सुभद्रा - तुझी भाग्यशाली आजी सुभद्रा होय. ॥५५॥ यदा यदा इह - ज्या ज्या वेळी या पृथ्वीवर - धर्मस्य क्षयः पाप्यनःच वृद्धिः (भवति) - धर्माचा नाश व पापाची वृद्धी होते- तदा तु भगवान् ईशः - त्यावेळी तर भगवान - हरिः आत्मानं सृजते - समर्थ विष्णु स्वतःला उत्पन्न करितो. ॥५६॥ महीपते - हे राजा- अस्य ईशस्य परस्य द्रष्टुः - ह्या सर्वेश्वरसंपन्न श्रेष्ठ व ज्ञानी अशा ईश्वराला- आत्मनः जन्मनः - स्वतः जन्म घेण्यास - कर्मणः वा - किंवा कर्म करण्यास - आत्ममायां विना - स्वतःच्या मायेशिवाय - हेतुः नहि - दुसरे काहीही कारण नाही. ॥५७॥ यन्मायाचेष्टिते हि पुंसः - ज्याच्या मायेच्या खेळ खरोखरच मनुष्याच्या - स्थित्युत्पत्यप्ययाय - स्थिति, उत्पत्ति व संहार ह्याकरिता होय- अनुग्रहः च - आणि ज्याची कृपा- तन्निवृतेः - त्या जन्ममरणाची निवृत्ती होऊन- आत्मलाभाय - मोक्षप्राप्तीकरिता- इष्यते - इच्छिली जाते. ॥५८॥ अक्षौहिणीनां पतिभिः - अक्षौहिणींचे अधिपती - नृपलाखछ्नैः असुरैः - अशा राजचिन्हे धारण करणार्या दैत्यांनी- आक्रम्यमाणायाः भुवः - व्यापून टाकिल्या जाणार्या पृथ्वीचा- अभाराय कृतोद्यमः (अयं अस्ति) - भार दूर करण्याकरिता केलेला असा हा आहे. ॥५९॥ सहसंकर्षणः भगवान् मधुसूदनः - बळरामासह भगवान् श्रीविष्णु- सुरेश्वरैः मनसा अपि - इंद्रादिदेवांना मनाने सुद्धा - अपरिमेयानि कर्माणि - आकलन करता न येणारी कर्मे- चक्रे - करिता झाला. ॥६०॥ कलौ जनिष्यमाणानां - कलियुगात उत्पन्न होणार्या भक्तांवर - अनुग्रहाय - अनुग्रह करण्याकरिता- दुःखशोकतमोनुदं - दुःख, शोक व अज्ञान यांचा नाश करणारी - सुपुण्यं यशः व्यतनोत् - पुण्यकारक कीर्ति पसरविता झाला. ॥६१॥ श्रोत्राञ्जलिः - कान हीच ज्याची पाणी पिण्याची ओंजळ आहे असा भक्त- सत्कर्णपीयूषे - साधूंच्या कानांना अमृतच अशा- यशस्तीर्थवरे यस्मिन् सकृत् उपस्पृश्य - ज्या कीर्तिरूपी श्रेष्ठ तीर्थात आचमन करून- कर्मवासनां धुनुते - कर्मवासना नष्ट करितो. ॥६२॥ भोजवृष्णयन्धकमधुशूरसेनदशार्हकैः - भोज, वृष्णि, अंधक, मधु, शूरसेन, दशार्ह या राजांनी- कुरुसृंजयपाण्डुभिः - कुरु, सृंजय व पांडु यांनी- शश्वत् श्लाघनीये हितः - ज्याचे चरित्र नित्य स्तवण्याजोगे आहे. ॥६३॥ स्निग्धस्मितेक्षितोदारैः वाक्यैः - प्रेमळ व हास्ययुक्त कटाक्षांनी मनोहर झालेल्या भाषणांनी- विक्रमलीलया - पराक्रमीरूपी लीलांनी युक्त - सर्वाङ्गरम्यया (च) मूर्त्या - व सर्व अवयवांत मनोरम अशा मूर्तीने- नृलोकं रमयामास - मनुष्यलोकाला रमविता झाला. ॥६४॥ यस्य - ज्या परमेश्वराचे- मकरकुण्डलचारुकर्ण - मकराकार कुंडलांनी शोभणार्या कानांमुळे - भ्राजत्कपोलसुभगं - तेजस्वी झालेल्या गालांनी अधिक सुंदर दिसणारे, - सविलासहासं - विलासी हास्याने युक्त - नित्योत्सवम् आननं - व नित्य आनंद देणारे मुख - दृशिभिः पिबन्त्यः नार्यः च नराः - नेत्रांनी पिणार्या स्त्रिया आणि पुरुष - मुदिताः (अभवन्) न (ततृपुः) - आनंदित होत पण तृप्त होत नसत- निमेः च कुपिताः - आणि पापण्यांवर रागावत. ॥६५॥ जातः पुरुषः - अवतार घेताच परमेश्वर- पितृगृहात् व्रजं गयः - पित्याच्या घरातून गोकुळात गेला- एघितार्थः रिपून् हत्वा - पूर्ण केली आहेत कर्मे ज्याने असा तो ईश्वर शत्रूंना मारून- कृतोरुदारः - केल्या आहेत पुष्कळ स्त्रिया ज्याने असा- तेषु (दारेषु) सुतशतानि उत्पाद्य - त्या स्त्रियांच्या ठिकाणी शेकडो पुत्र उत्पन्न करून- जनेषु आत्मनिगमं प्रथयन् - लोकात अध्यात्मशास्त्राचा प्रसार करून- क्रतुभिः आत्मानं समीजे - यज्ञांनी स्वतःला पूजिता झाला. ॥६६॥ सः पृथ्व्याः गुरुभरं क्षपयन् - तो पृथ्वीचा मोठा भार नष्ट करणारा- कुरूणां अन्तःसमुत्थकलिना - कौरवांमध्ये आपापसात उत्पन्न झालेल्या कलहाने - युघि (समवेताः) भूपचम्वः - युद्धात जमलेल्या राजांच्या सैन्यांचा - दृष्टया विधूय - दृष्टिनेच नाश करून- विजये जयं उद्विघोष्य - अर्जुनाच्या जयाचा घोष करून- उद्धवाय परं प्रोच्य - उद्धवाला श्रेष्ठ ज्ञानाचा उपदेश करून- स्वधाम समगात् - निजधामाला गेला. ॥६७॥ नवमः स्कन्धः - अध्याय चोविसावा समाप्त |