श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १७ वा - अन्वयार्थ

क्ष्रत्रवृद्ध, रजी इत्यादी राजांच्या वंशांचे वर्णन -

यः पुरूरवसः पुत्रः आयुः - जो पुरूरव्याचा मुलगा आयु - तस्य नहुषः च क्षत्त्रवृद्धः रजी च वीर्यवान् रंभः अनेनाः इति सुताः अभवन् - त्याला नहुष आणि क्षत्रवृद्ध, रजी, वीर्यवान रंभ व आनेना असे मुलगे होते - राजेंद्र - हे राजा - क्षत्रवृधः अन्वयं शृणु - क्षत्रवृद्धाचा वंश ऐक - क्षत्रवृद्धसुतस्य सुहोत्रस्य - क्षत्रवृद्धाचा मुलगा जो सुहोत्र त्याला - काश्यः कुशः गृत्समदः इति - काश्य, कुश आणि गृत्समद असे - त्रयः आत्मजाः आसन् - तीन मुलगे होते - गृत्समदात् शुनकः अभूत् - गृत्समदापासून शुनक झाला - यस्य बह्लचप्रवरः मुनिः शौनकः (सुतः) आसीत् - ज्याला ऋग्वेद्यांमध्ये मुख्य असा शौनक मुनि हा पुत्र झाला. ॥१-३॥

काश्यस्य काशिः - काश्याचा मुलगा काशि होय - तत्पुत्रः राष्ट्रः - त्या काशीचा पुत्र राष्ट्र - (सः) दीर्घतमःपिता (आसीत्) - तो दीर्घतम्याचा बाप होय - दैर्घतमः आयुर्वेदप्रवर्तकः धन्वंतरिः - दीर्घतमाचा मुलगा आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरि होय. ॥४॥

(सः) यज्ञभुक् वासुदेवांशः स्मृतभात्रार्तिनाशनः (अस्ति) - तो धन्वंतरि यज्ञाचा भाग ग्रहण करणारा वासुदेवाचा अंश असून स्मरण केल्यानेच दुःखाचा नाश करणारा आहे - तत्पुत्रः केतुमान् - त्याचा पुत्र केतुमान - अस्य भीमरथः जज्ञे - त्याला भीमरथ झाला - ततः दिवोदासः (जज्ञे) - त्यापासून दिवोदास झाला - तस्मात् प्रतर्दनः इति स्मृतः द्युमान् - त्यापासून प्रतर्दन म्हणून प्रसिद्ध असलेला द्युमान झाला - सः एव शत्रुजित् वत्सः ऋतध्वजः इति ईरितः - तो द्युमानच शत्रुजित, वत्स, ऋतध्वज या नावानेही प्रसिद्ध आहे - तथा कुवलयाश्वः इति प्रोक्तः - तसेच कुवलयाश्व म्हणूनही त्याला म्हणत असत - ततः अलर्कादयः - त्या द्युमानापासून अलर्कादिक पुत्र झाले. ॥५-६॥

राजन् - हे राजा - षष्टिवर्षसहस्राणि षष्टिवर्षशतानि च - साठ हजार व साठशे वर्षे - अलर्कात् अपरः युवा - अलर्कावाचून दुसरा तरुण - मेदिनीं न बुभुजे - पृथ्वीचा उपभोग घेता झाला नाही. ॥७॥

अलर्कात् संततिः - अलर्कापासून संतति पुत्र झाला - तस्मात् सुनीथः - त्यापासून सुनीथ - अथ सुकेतनः धर्मकेतुसुतः - नंतर सुकेतन ज्याचा मुलगा धर्मकेतु नावाचा होता - तस्मात् सत्यकेतुः अजायत - त्यापासून सत्यकेतु झाला. ॥८॥

(तस्य) धृष्टकेतुः सुतः - त्या सत्यकेतुचा धृष्टकेतु हा मुलगा होय - तस्मात् क्षितीश्वरः सुकुमारः (अभवत्) - त्यापासून सुकुमार हा राजा झाला - (सुकुमारस्य वीतिहोत्रः) वीतिहोत्रस्य (च) भर्गः - सुकुमाराचा पुत्र वीतिहोत्र व त्याचा पुत्र भर्ग होय - अतः भार्गभूमि नृपः अभूत् - ह्या भर्गापासून भार्गभूमि राजा झाला. ॥९॥

इति इमे काशयः भूपा क्षत्रवृद्धान्वयायिनः - याप्रमाणे हे काशिनामक पुरुषाचे वंशज राजे क्षत्रवृद्धकुलाचे प्रवर्तक होत - रंभस्य रभसः पुत्रः - रंभाचा मुलगा रभस - च - आणि - (रभसस्य) गंभीरः - त्या रभसाचा गंभीर - ततः अक्रियः (अभवत्) - त्यापासून अक्रिय झाला - तस्य क्षेत्रे ब्रह्म जज्ञे - त्याच्या क्षेत्रात ब्रह्म अवतरले - अनेनसः वंशं शृणु - आता अनेनाचा वंश ऐक - (अनेनसः पुत्रः) शुद्धः - अनेनाचा पुत्र शुद्ध - ततः शुचि - त्यापासून शुचि - तस्मात् धर्मसारथिः त्रिककुत् - त्यापासून धर्माचा साह्यकारी असा त्रिककुत झाला. ॥१०-११॥

ततः शांतरयः जज्ञे - त्यापासून शांतरय झाला - सः आत्मवान् कृतकृत्यः (आसीत्) - तो आत्मज्ञानी असून कृतकृत्य होता - रजेः अमितौजसां पुत्राणां पंचशतानि आसन् - रजीला अतुल पराक्रमी असे पाचशे पुत्र झाले. ॥१२॥

देवैः अभ्यर्थितः - देवांनी प्रार्थना केलेला रजी - दैत्यान् हत्वा - दैत्यांना मारून - इंद्राय दिवं अददात् - इंद्राला स्वर्ग देता झाला - प्रह्लादाद्यरिशंकितः इंद्रः - प्रह्लाद आदिकरून शत्रूंना भ्यालेला इंद्र - रजेः चरणौ गृहीत्वा - रजीचे चरण धरून - तस्मै पुनः (स्वर्गं) दत्त्वा - त्याला पुनः स्वर्ग देऊन - आत्मानं अर्पयामास - आपले शरीरसुद्धा अर्पण करिता झाला - पितरि उपरते - पिता रजि मरण पावला असता - (रजेः) पुत्राः - रजीचे मुलगे - (स्वर्गं) याचमानाय महेंद्राय - स्वर्ग मागणार्‍या इंद्राला - त्रिविष्टपं नो ददुः - स्वर्ग देते झाले नाहीत - गुरुणा अग्नौ हूयमाने - गुरुने अग्नीमध्ये होम चालविला असता - यज्ञभागान् (च न) समाददुः - आणि यज्ञभागही देते झाले नाहीत - बलभिद् - इंद्र - मार्गात् भ्रंशितान् रजेः तनयान् अवधीत् - सन्मार्गापासून भ्रष्ट झालेल्या रजीच्या मुलांना मारिता झाला - कश्चित् न अवशेषितः - कोणीही शिल्लक ठेविला नाही - क्षात्रवृद्धात् कुशात् प्रतिः (अजायत्) - क्षात्रवृद्धाचा नातू जो कुश त्यापासून प्रति झाला - (तस्य) सञ्जयः तत्सुतः (च) जयः - त्या प्रतीचा पुत्र संजय व त्याचा मुलगा जय. ॥१३-१६॥

ततः कृतः (जातः) - त्या जयापासून कृत जन्मला - कृतस्य अपि (सुतः जज्ञे) - कृतालाही पुत्र झाला - (सः) हर्यवनःनृपः - तो हर्यवन नावाचा राजा झाला - ततः सहदेवः (जातः) - त्यापासून सहदेव झाला - (तस्य सुतः) हीनः - त्याचा पुत्र हीन - तत्सुतः तु जयसेनः - त्या हीनाचा मुलगा जयसेन होय. ॥१७॥

(जयसेनस्य) संस्कृतिः तस्य च जयः - जयसेनाचा पुत्र संस्कृति आणि त्या संस्कृतीचा जय - (सः) क्षत्रधर्मा महारथः (आसीत्) - हा जय क्षत्रियधर्माप्रमाणे वागणारा महावीर होता - (इमे) क्षत्रवृद्धान्वयाः भूपाः - हे क्षत्रवृद्धाच्या वंशातील राजे होत - नाहुषात् (जातं) वंशं च शृणु - आता नहुषापासून झालेला वंश ऐक. ॥१८॥

नवमः स्कन्धः - अध्याय सतरावा समाप्त

GO TOP