|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय १४ वा - अन्वयार्थ
चंद्रवंशाचे वर्णन - राजन् - हे राजा - अथ अतः - आता येथून - सोमस्य - चंद्राचा - पावनः वंश - पवित्र वंश - श्रूयताम् - ऐकिला जावा - यस्मिन् - ज्यामध्ये - ऐलादयः पुण्यकीर्तयः भूपाः कीर्त्यन्ते - ज्यांची कीर्ति पवित्र आहे असे पुरूरवा आदिकरून राजे वर्णिले आहेत. ॥१॥ सहस्रशिरसः पुंसः - सहस्र मस्तके असलेल्या आदिपुरुषांच्या - नाभिह्लदसरोरुहात् - नाभिरूप सरोवरातील कमळामधून - जातस्य धातुः - उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचा - सुतः अत्रिः - मुलगा अत्रि - गुणैः पितृसमः आसीत् - गुणांनी बापासारखा होता. ॥२॥ तस्य किल दृग्भ्यः अमृतमयः समः पुत्रः अभवत् - त्याच्या खरोखर नेत्रांपासूनच अमृतमय असा सोमनामक पुत्र झाला - ब्रह्मणा - ब्रह्मदेवाकडून - सः - तो - विप्रौषध्युडुगणानां - ब्राह्मण, औषधि व नक्षत्रसमूह यांचा - पतिः - स्वामी - कल्पितः - नेमिला गेला. ॥३॥ सः - तो सोम - भुरनत्रयं विजित्य - त्रिभुवनाला जिंकून - राजसूयेन अयजत् - राजसूय यज्ञ करिता झाला - दर्पात च - आणि गर्वामुळे - बृहस्पतेः तारां नाम पत्नीं - बृहस्पतीच्या तारा नावाच्या पत्नीला - बलात् अहरत् - बलात्काराने हरण करिता झाला. ॥४॥ यदा - ज्या वेळी - सः - तो सोम - देवगुरुणा - बृहस्पतीकडून - अभीक्ष्णशः याचितः (सन्) - वारंवार प्रार्थिला गेला असता - मदात् - गर्वाने - (तारां) न अत्यजत् - तारेला सोडिता झाला नाही - तत्कृते - त्याकरिता - सुरदानवविग्रहः - देवदानवांचे युद्ध - जज्ञे - झाले. ॥५॥ बृहस्पतेः द्वेषात् - बृहस्पतीच्या द्वेषामुळे - सासुरः शुक्रः - दैत्यांसह शुक्र - उडुपम् अग्रर्हात् - चंद्राचा पक्ष धरिता झाला - सर्वभूतगणावृतः हरः - सर्व भूतगणांनी युक्त असा शंकर - स्नेहात् - स्नेहास्तव - गुरुसुतं (अग्रहीत्) - गुरूचा पुत्र जो बृहस्पति त्याचा पक्ष धरिता झाला. ॥६॥ सर्वदेवगणोपेतः महेंद्रः - सर्वदेवगणांसह इंद्र - गुरुं अन्वयात् - गुरूला अनुसरला - (एवं) तारकामयः (अयं) समरः सुरासुरविनाशः अभूत् - याप्रमाणे तारेच्या प्राप्तीसाठी झालेले हे युद्ध अखेरीस देव व दैत्य यांच्या भयंकर प्राणहानीला कारण झाले. ॥७॥ अथ - नंतर - अंगिरसा निवेदितः विश्वकृत् - अंगिरस ऋषीने प्रार्थिलेला ब्रह्मदेव - सोमं निर्भर्त्स्य - सोमाची निर्भर्त्सना करून - तारां स्वभत्रें प्रायच्छत् - तारेला तिच्या पतीच्या स्वाधीन करिता झाला - पतिः - तिचा पति - (तां) अन्तर्वत्नीं अवैत् - ती गर्भिणी आहे असे जाणता झाला. ॥८॥ दुष्प्रज्ञे - हे दुर्बुद्धे - परैः आहितं (गर्भम्) - दुसर्यांनी स्थापिलेला गर्भ - मत्क्षेत्रात् - माझ्या क्षेत्रातून - आशु त्यज त्यज - लवकर टाक टाक - सति - हे साध्वि - सांतानिकः अहं - संतानाची इच्छा करणारा मी - त्वां (मम) स्त्रियं - तू जी माझी स्त्री तिला - भस्मसात् न कुर्यां - भस्मरूप करणार नाही. ॥९॥ व्रीडिता तारा - लज्जित झालेली तारा - कनकप्रभं कुमारं तत्याज - सुवर्णासारखी कान्ति असलेल्या मुलाला टाकिती झाली - आंगिरसः - बृहस्पति - कुमारे स्पृहां चक्रे - त्या बालकाची इच्छा करिता झाला - सोमः एव च (स्पृहां चक्रे) - आणि सोमही इच्छा करिता झाला. ॥१०॥ तस्मिन् - त्याठिकाणी - अयं मम (अस्ति) - हा माझा आहे - न तव - तुझा नव्हे - इति उच्चैः विवदमानयोः तयोः - असे ते दोघे मोठयाने ओरडून भांडत असता - देवाः ऋषयः (च तां) पप्रच्छुः - देव आणि ऋषि त्या तारेला विचारिते झाले - व्रीडिता तु सा - पण लज्जित झालेली ती तारा - न एव ऊचे - काहीच बोलली नाही. ॥११॥ अलीकलज्जया कुपितः - खोटया लज्जेने संतप्त झालेला - कुमारः - तो बालक - मातरं प्राह - आईला म्हणाला - असद्वृत्ते - हे वाईट आचरण करणारे - आत्मावद्यं किं न वोचसि - आपले निंद्य कर्म का सांगत नाहीस - मे आशु वद - मला लवकर सांग. ॥१२॥ ब्रह्मा च - आणि ब्रह्मदेव - तां रहः आहूय - त्या तारेला एकांती बोलावून - सांत्वयन् समप्राक्षीत् - धीर देत विचारिता झाला - (तदा सा) सोमस्य इति - तेव्हा ती तारा ‘सोमाचा’ असे - शनकैः आह - हळूच बोलली - तावत् सोमः - तेव्हा सोम - तं अग्रहीत् - त्या बालकाला घेता झाला. ॥१३॥ नृप - हे राजा - आत्मयोनिः - ब्रह्मदेव - गंभीरया बुद्ध्या - गंभीर बुद्धीने - तस्य - त्या मुलाचे - बुधः इति - बुध असे - अभिधां अकृत - नाव ठेविता झाला - येन पुत्रेण - ज्या पुत्राच्या योगाने - उडुराट् - चंद्र - मुदं प्राप - हर्ष पावला. ॥१४॥ ततः - त्यापासून - इलायां - इलेच्या ठिकाणी - यः (पूर्वं) उदाहृतः (सः) पुरूरवा जज्ञे - पूर्वी सांगितलेला पुरूरवा जन्मला - इन्द्रभुवने - इंद्रसभेत - सुरर्षिणा गयिमानान् - देवर्षि नारदाने वर्णन केलेले - तस्य - त्या पुरूरव्याचे - रूपगुणौदार्यशीलद्रविणविक्रमान् - रूप, गुण, औदार्य, सच्छिल, संपत्ती आणि पराक्रम - श्रुत्वा - ऐकून - स्मरशरार्दिता देवी उर्वशी - मदनाच्या बाणांनी पीडिलेली उर्वशीनामक अप्सरा - तदन्तिकं उपेयाय - त्याच्याजवळ आली. ॥१५ - १६॥ मित्रावरुणयोः शापात् - मित्र व वरुण यांच्या शापामुळे - नरलोकतां आपन्ना - मनुष्यलोकाप्रत प्राप्त झालेली - (सा) ललना - ती विलासिनी उर्वशी - (तं) पुरुषश्रेष्ठं (पुरूरवसं) - तो पुरुषश्रेष्ठ पुरूरवा - कंदर्पं इव रूपिणं (इति) निशम्य - मूर्तिमंत मदनच आहे असे ऐकून - धृतिं विष्टभ्य - धैर्य धरून - तदन्तिके उपतस्थे - त्याच्याजवळ आली. ॥१७॥ तां देवीं विलोक्य - त्या अप्सरेला पाहून - हर्षेण उत्फुल्ललोचनः - हर्षाने ज्याचे नेत्र प्रफुल्लित झाले आहेत असा - हृष्टतनूरुहः - हर्षाने उभे राहिले आहेत रोमांच ज्याच्या अंगावर असा - सः नृपतिः - तो राजा - श्लक्ष्णया वाचा - मधुरवाणीने - (तां) उवाच - तिला म्हणाला. ॥१८॥ वरारोहे - हे सुंदरी - ते स्वागतं (अस्तु) - तुझे स्वागत असो - (इतः) आस्यतां - येथे बैस - किं करवाम - आम्ही काय करावे - मया साकं - माझ्याबरोबर - संरमस्व - रममाण हो - नौ रतिः - आपली रतिक्रीडा - शाश्वतीः समाः (भवतु) - पुष्कळ वर्षे चालो. ॥१९॥ सुंदर - हे सुंदर पुरुषा - यदंगांतरं आसाद्य - ज्याच्या वक्षस्थळावर गेली असता - रिरंसया (मनः दृष्टिः वा) नच्यवते - रमण्याच्या इच्छेमुळे मन किंवा दृष्टि चळत नाही - (एतादृशि) त्वयि - अशाप्रकारच्या तुझ्या ठिकाणी - कस्याः मनः दृष्टिः च (न सज्जेत) - कोणत्या स्त्रीचे मन व दृष्टि ही आसक्त होणार नाहीत. ॥२०॥ मानद - मान देणार्या - राजन् - हे राजा - एतौ उरणकौ - हे दोन मेंढे - न्यासौ रक्षस्व - ठेव म्हणून राख - भवता साकं संरंस्ये - तुझ्याबरोबर मी रममाण होईन - (यः) श्लाघ्यः - जो प्रशंसनीय असेल - (सः एव) स्त्रीणां वरः स्मृतः - तोच स्त्रियांचा वर म्हटला आहे. ॥२१॥ वीर - हे वीरा - घृतं मे भक्ष्यं स्यात् - तूप हेच माझे खाणे असेल - त्वा - तुला - मैथुनात् अन्यत्र - मैथुनाशिवाय इतर वेळी - विवाससं न ईक्षे - मी नग्न बघणार नाही - महामनाः - थोर मनाचा तो पुरूरवा - तत् - ते - तथा इति - ठीक आहे असे म्हणून - प्रतिपेदे - मान्य करिता झाला. ॥२२॥ अहोनरमोलोकविमोहनं रूपं - काय हे नरांना मोहित करणारे रूप - अहो भावः - काय हे प्रेम - कः मनुजः - कोणता मनुष्य - स्वयं आगतां त्वां देवीं - स्वतः चालून आलेल्या अशा तुज अप्सरेला - न सेवेत - सेवणार नाही. ॥२३॥ सः पुरुषश्रेष्ठः - तो नरश्रेष्ठ पुरूरवा - यथार्हतः रमयंत्या - योग्यतेप्रमाणे रमविणार्या - तया - त्या अप्सरेसह - चैत्ररथादिषु सुरविहारेषु - चैत्ररथादिक देवांच्या क्रीडास्थानात - कामं रेमे - यथेच्छ रमता झाला. ॥२४॥ पद्मकिंजल्कगंधया - कमलाच्या केसराप्रमाणे सुगंधयुक्त अशा - तया देव्या - त्या अप्सरेसह - रममाणः (सः) - क्रीडा करणारा तो राजा - तन्मुखामोदमुदितः - तिच्या मुखाच्या सुगंधाने हर्षित झालेला - बहून् अहर्गणान् - पुष्कळ दिवस - मुमुदे - आनंद पावला. ॥२५॥ उर्वशी अपश्यन् इंद्रः - उर्वशीला न पाहणारा इंद्र - गंधर्वान् समनोदयत् - गंधर्वांना प्रेरणा करिता झाला - उर्वशीरहितं (इदम्) आस्थानं - उर्वशीशिवाय असलेले हे सभास्थान - (मह्यं) न अतिशोभते - मला नीटसे शोभत नाही. ॥२६॥ ते - ते गंधर्व - महारात्रे - मध्यरात्री - प्रत्युपस्थिते तमसि - गाढ अंधार पडला असता - उपेत्य - जाऊन - जायया उर्वश्या - पत्नी उर्वशीने - राजनि न्यस्तौ उरणौ - राजाजवळ ठेवलेले दोन मेंढे - जुह्लुः - हरण करिते झाले. ॥२७॥ नीयमानयोः पुत्रयोः - नेल्या जाणार्या कोकरांचे - आक्रंदनं निशम्य - ओरडणे ऐकून - देवी (आह) - अप्सरा म्हणाली - अहं - मी - वीरमानिना नपुंसा कुनाथेन - वीर म्हणविणार्या, नपुंसक व वाईट स्वामीकडून - हता अस्मि - ठार झाले. ॥२८॥ यद्विश्रंभात् - ज्याच्यावरील विश्वासामुळे - अहं नष्टा - मी बुडाले - दस्युभिः च हृतापत्या (अभवम्) - आणि चोरांनी पळविली आहेत मुले जिची अशी झाले - यः पुमान् (सन्) - जो पुरुष असता - दिवा निशि - दिवसा व रात्री - यथा नारी (तथा) - एखाद्या स्त्रीप्रमाणे - संत्रस्तः शेते - भिऊन झोप घेतो. ॥२९॥ इति - याप्रमाणे - वाक्सायकैः - वाग्बाणांनी - प्रतोत्रैः कुंजरः इव - अंकुशाने हत्ती जसा तसा - बद्धः (सः) - टोचिलेला राजा - निस्त्रिंशं आदाय - खड्ग घेऊन - निशि (रात्री) विवस्त्रः - नग्न - रुषा (गंधर्वान्) अभ्यद्रवत् - रागाने गंधर्वावर धावून गेला. ॥३०॥ तत्र उरणौ विसृज्य - त्या जागी दोन मेंढे सोडून - विद्युतः ते व्यद्योतन्त स्म - तेजस्वी असे ते गंधर्व चमकते झाले - सा - ती उर्वशी - मेषौ आदाय - दोन मेंढे घेऊन - आयांतं पतिं - येणार्या पतीला - नग्नं ऐक्षत - नग्नस्थितीत पाहती झाली. ॥३१॥ शयने जायां अपश्यन् - शयनस्थळी स्त्रीला न पाहणारा - ऐलः अपि - तो पुरूरवाही - विमनाः इव - मनात दुःखी झाल्यासारखा - तच्चित्तः - तिच्याकडे चित्त लागले आहे ज्याचे असा - विव्हलः (भूत्वा) - व्याकुळ होऊन - शोचन् - शोक करीत - उन्मत्तः इव - भ्रमिष्टासारखा - महीं बभ्राम - पृथ्वीवर भटकू लागला. ॥३२॥ सः पुरूरवाः - तो पुरूरवा - तां - त्या उर्वशीला - च प्रहृष्टवदनाः - आणि हास्यमुख अशा - तत्सखीः - तिच्या पांच मैत्रीणींना - कुरुक्षेत्रे सरस्वत्यां वीक्ष्य - कुरुक्षेत्रात सरस्वती नदीच्या तीरी पाहून - सूक्तं प्राह - सुंदर भाषण करता झाला. ॥३३॥ अहो जाये - हे स्त्रिये - तिष्ठ तिष्ठ - थांब थांब - मां अद्यापि अनिर्वृत्य - मला अजूनही सुखी न करता - घोरे - संकटात - त्यक्तुं न अर्हसि - सोडून जाण्यास योग्य नाहीस - वचांसि कृणवावहै - आपण दोघे गोष्टी बोलू. ॥३४॥ देवि - हे उर्वशी - त्वया दूर हृतः - तू दूरवर ओढून आणिलेला - अयं (मम) सुदेहः - हा माझा उत्तम देह - अत्र पतति - ह्याठिकाणी पडत आहे - वृकाः गृध्राः - लांडगे गिधाडे - एनं खादंति - ह्याला खात आहेत - तु तव अप्रसादस्य आस्पदं न - पण तुझ्या अवकृपेला मात्र पात्र नाही. ॥३५॥ त्वं मा मृथाः - तू मरू नकोस - पुरुषः असि - तू पुरुष आहेस - इमे वृकाः - हे लांडगे - त्वा मा स्म अद्युः - तुला न खावोत - यथा - जसे - वृकाणां वै (न) हृदयं - लांडग्यांना खरोखरच हृदय नसते - स्त्रीणां - स्त्रियांचे - क्व अपि - कोठेही - सख्य न वै - स्थिर असे सख्य नसते. ॥३६॥ स्त्रियः - स्त्रिया - हि - खरोखर - अकरुणाः क्रूराः दुर्मर्षाः प्रियसाहसाः (सन्ति) - निर्दय, क्रूर, दुःसह व मोठया साहसी असतात - विश्रब्धं पतिं - विश्वास ठेवणार्या पतीला - उत भ्रातरं अपि - किंवा भावालाही - अल्पार्थे अपि - थोडक्यासाठीसुद्धा - घ्नंति - मारतात, ॥३७॥ स्वैरवृत्तयः पुंश्चल्यः - स्वेच्छाचारी व्यभिचारिणी स्त्रिया - अज्ञेषु - मूर्ख लोकांवर - अलीकविश्रम्भं विधाय - खोटा विश्वास ठेवून - त्यक्तसौहृदाः - टाकिले आहे प्रेम ज्यांनी अशा - (नित्यं) नवं नवं अभीप्सन्त्य (सन्ति) - नित्य नवीन नवीन पुरुषाची इच्छा करणार्या असतात. ॥३८॥ ईश्वर - हे राजा - संवत्सरान्ते - संवत्सराच्या शेवटी - भगवान् एकरात्रं मया वत्स्यति हि - तू एक रात्र माझ्याबरोबर राहशील - च - आणि - भोः - हे राजा - ते - तुला - अपराणि अपत्यानि भविष्यंति - दुसरी मुले होतील. ॥३९॥ सः - तो पुरूरवा - देवीं अन्तर्वत्नीं उपालक्ष्य - उर्वशी गरोदर असलेली पाहून - पुरं प्रययौ - नगरास येता झाला - पुनः अब्दान्ते - पुनः वर्षाच्या शेवटी - तत्र - त्या चैत्ररथवनात - वीरमातरं उर्वशीं गतः - जिला वीर पुत्र झाला आहे अशा उर्वशीकडे गेला. ॥४०॥ (तां) उपलभ्य - ती भेटल्यामुळे - मुदा युक्तः - हर्षित झालेला - तया निशां समुवास - तिच्यासह एक रात्र राहिला - अथ - मग - उर्वशी - उर्वशी - एनं विरहातुरं कृपणं प्राह - त्या विरहाने दुःखित झालेल्या दीन पुरूरव्याला म्हणाली. ॥४१॥ इमान् गंधर्वान् उपधाव - ह्या गंधर्वांची प्रार्थना कर - (ते) तुभ्यं मां दास्यंति - ते मला तुजप्रत देतील - नृप - हे परीक्षित राजा - इति संस्तुवतः तस्य - याप्रमाणे स्तुती करणार्या त्या पुरूरव्यावर - तुष्टाः (गंधर्वा) - संतुष्ट झालेले गंधर्व - (तस्मै) अग्निस्थालीं ददुः - त्याला अग्निस्थाली देते झाले - तां उर्वशीं मन्यमानः सः - त्या अग्निस्थालीला उर्वशी असे मानणारा तो राजा - वने चरन् - अरण्यात फिरत असता - अबुध्यत - खरा प्रकार जाणता झाला. ॥४२॥ वने स्थालीं न्यस्य - अरण्यात स्थाली ठेवून - गृहान् गत्वा - घरी जाऊन - निशि आध्यायतः (तस्य) मनसि - रात्री त्या स्थालीचे ध्यान करणार्या त्या पुरूरव्याच्या मनात - त्रेतायां संप्रवृत्तायां त्रेतायुग चालू झाले असता - त्रयी अवर्तत - तीन वेद प्रकट झाले. ॥४३॥ स्थालीस्थानं गतः - स्थालीच्या जागी गेलेला - सः - तो राजा - शमीगर्भं आश्वत्यं विलक्ष्य - शमीपासून उत्पन्न झालेल्या अश्वत्थ वृक्षाला पाहून - तेन द्वे अरणी कृत्वा - त्या अश्वत्थापासून दोन अरणी करून - उर्वशी लोककाम्यया - उर्वशीचा लोक प्राप्त होण्याच्या इच्छेने - ममंथ - मंथन करिता झाला. ॥४४॥ अधरारणिं उर्वशीं - खालची अरणी उर्वशी - उत्तरां आत्मानं - वरची अरणी आपण - उभयोः मध्ये - दोहोमध्ये - यत् - जे - तत् - ते - प्रजननं - पुत्र - प्रभुः - पुरूरवा राजा - मंत्रतः ध्यायन् - वेदातील वर्णनाप्रमाणे मंत्रपूर्वक ध्यान करिता झाला. ॥४५॥ तस्य निर्मन्थनात् - त्याच्या मंथनापासून - जातवेदा विभावसुः जातः - ज्यापासून धन उत्पन्न झाले असा अग्नि उत्पन्न झाला - त्रिवृत् सः राज्ञा - तीन प्रकारचा तो अग्नि राजाने - त्रय्या विद्यया - तीन वेदरूप विद्येने - पुत्रत्वे कल्पितः - पुत्राच्या जागी कल्पिला. ॥४६॥ उर्वशीलोकं अन्विच्छन् - उर्वशीच्या लोकाची इच्छा करणारा तो पुरूरवा - तेन - त्या अग्नीच्या योगाने - यज्ञेशं अधोक्षजं - यज्ञाचा स्वामी व इंद्रियांना अगोचर अशा - सर्वदेवमयं भगवंतं हरिं - सर्वदेवरूप षड्गुणैश्वर्यसंपन्न परमेश्वराला - अयजत - आराधिता झाला. ॥४७॥ पुरा - पूर्वी - सर्ववाङ्मयः प्रणवः - सर्व वाणींचे बीज असा ओंकार - एकः एव वेदः आसीत् - हा एकच वेद होता - नारायणः (एकः) देवः आसीत् - नारायण हा एकच देव होता - एक अग्निः (आसीत्) - एकच अग्नि होता - वर्णः च (एक) एव (आसीत्) - आणि वर्णही एकच होता - अन्यः न - दुसरा नव्हता. ॥४८॥ नृप - हे राजा - त्रेतामुखे - त्रेतायुगाच्या प्रारंभी - पुरूरवसः एव - पुरूरव्यापासूनच - त्रयी आसीत् - तीन वेद उत्पन्न झाले - राजा - पुरूरवा राजा - प्रजया अग्निना - पुत्ररूप अग्नीच्या योगाने - गांधर्वं लोकं एयिवान् - गांधर्वलोकाला प्राप्त झाला. ॥४९॥ नवमः स्कन्धः - अध्याय चवदावा समाप्त |