श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १३ वा - अन्वयार्थ

निमीच्या वंशाचे वर्णन -

इक्ष्वाकुतनयः निमिः - इक्ष्वाकूचा मुलगा निमि- सत्रं आरभ्य - यज्ञाला आरंभ करून- वसिष्ठं ऋत्विजं अवृत - वसिष्ठाला ऋत्विज म्हणून वरता झाला- सः अपि आह - तो वसिष्ठही म्हणाला- भो - हे निमे- शक्रेण प्राक् वृतः अस्मि - मी इंद्राकडून पूर्वी वरिला गेलो आहे. ॥१॥

तं निर्वत्य - तो यज्ञ पूर्ण करून- आगमिष्यामि - येईन- तावत् मां प्रतिपालय - तोपर्यंत माझी वाट पाहा- गृहपतिः - यजमान निमि- तूष्णीं आसीत् - स्वस्थ राहिला- सः अपि - तो वसिष्ठही- इंद्रस्य मखं अकरोत् - इंद्राचा यज्ञ समाप्त करिता झाला. ॥२॥

आत्मवान् निमिः - आत्मज्ञानी निमि- इदं चलं (जीवितं) विद्वान् - हे जीवित क्षणभंगूर असे जाणणारा- यावता गुरुः न अगमत् - ज्याअर्थी गुरु आला नाही- तावत् - त्याअर्थी- अपरैः ऋत्विभिः - दुसर्‍या ऋत्विजांकडून- सत्रं आरभत - यज्ञाला आरंभ करिता झाला. ॥३॥

निर्वर्त्य आगतः गुरुः - इंद्राचा यज्ञ पूर्ण करून आलेला वसिष्ठ- शिष्यव्यतिक्रमं वीक्ष्य - शिष्याचा अपराध पाहून- अशपत् - शाप देता झाला- पंडितमानिनः निमेः - स्वतःला पंडित मानणार्‍या निमीचा- देहः पततात् - देह पडो. ॥४॥

निमिः - निमिराजा- अधर्मवर्तिने गुरवे - अधर्माने वागणार्‍या गुरुला- शापं प्रतिददौ - उलट शाप देता झाला- लोभात् धर्मं अजानतः - द्रव्यलोभामुळे धर्म न जाणणार्‍या- तव अपि - तुझाही- देहः पततात् - देह पडो. ॥५॥

इति - असे बोलून- अध्यात्मकोविदः निमिः - आत्मज्ञानात निष्णात असलेला निमि राजा- स्वं देहं उत्ससर्ज - स्वतःचा देह सोडिता झाला- प्रपितामहः (अपि) - वसिष्ठही- मित्रावरुणयोः - मित्रावरुणापासून- उर्वश्यां जज्ञे - उर्वशीच्या ठिकाणी उत्पन्न झाला. ॥६॥

अथ - मग- मुनिसत्तमाः - मोठे मोठे ऋषि- तद्देहं गन्धवस्तुषु निधाय - त्या निमीचा देह सुगंधी पदार्थांमध्ये ठेवून- सत्रयागे समाप्ते - सत्रयाग समाप्त झाला असता- समागतान् देवान् ऊचुः - आलेल्या देवांना म्हणाले. ॥७॥

यदि प्रभव प्रसन्नाः (तर्हि) - जर प्रभु प्रसन्न झाले असतील तर- अयं राज्ञः देहः - हा राजाचा देह- जिवतु - जीवंत होवो- तथा इति उक्ते - देवांनी बरे आहे असे म्हटले असता- निमिः प्राह - निमि म्हणाला- मे देहबंधनं - मला देहरूप बंधन- मा भूत् - न होवो. ॥८॥

वियोगभयकातराः मुनयः - वियोगाच्या भयाने भ्यालेले मुनि- यस्य योगं न वाञ्‌छन्ति - ज्या देहाचा संबंध इच्छित नाहीत- हरिमेधसः चरणांभोजं भजंति - प्रभूच्या चरणकमलांचे सेवन करितात. ॥९॥

अहं - मी- दुःखशोकभयावहं देहं - दुःख, शोक आणि भय याला कारणीभूत असा देह- न अवरुरुत्से - धारण करू इच्छित नाही- यतः यथा - कारण जसा- उदके मत्स्यानां (मृत्युः) - उदकात माशांचा मृत्यू तसा- अस्य - ह्या देहाला- सर्वत्र मृत्यूः (एव भवति) - सर्वच ठिकाणी मरण आहे. ॥१०॥

शरीरिणां लोचनेषु - देहधारी प्राण्यांच्या नेत्रांत- विदेहः - देहाशिवाय- कामं उष्यतां - यथेच्छ राहो- (सः) अध्यात्मसंस्थितः - तो अंतरात्म्याच्या ठिकाणी राहणारा- उन्मेषनिमेषाभ्यां लक्षितः (स्यात्) - डोळ्यांच्या उघडझापीच्या योगाने कळून येईल. ॥११॥

नृणां - मनुष्यांना- अराजकभयं - राजा नसल्यामुळे प्राप्त होणार्‍या भयाविषयी- मन्यमानाः महर्षयः - विचार करणारे मोठे ऋषि- निमेः देहं - निमिचा देह- ममंथुः स्म - मंथिते झाले- कुमारः समजायत - पुत्र उत्पन्न झाला. ॥१२॥

सः - तो पुत्र- (अनेन) जन्मना - अशा प्रकारच्या जन्मामुळे- जनकः (इति) - जनक या नावाने- (प्रसिद्धः) अभूत् - प्रसिद्ध झाला- विदेहजः तुः - आणि देह नसलेल्या पित्यापासून जन्मल्यामुळे- वैदेहः इति - वैदेह या नावाने प्रसिद्ध झाला- मथनात् जातः (इति) - मंथनाने झालेला म्हणून- मिथिलः - मिथिल नावाने प्रसिद्ध झाला- येन - ज्याने- मिथिला निर्मिता - मिथिला नगरी निर्माण केली. ॥१३॥

तस्मात् उदावसुः - त्यापासून उदावसु झाला- तस्य पुत्रः - त्याचा मुलगा- नंदिवर्धनः अभूत् - नंदिवर्धन नावाचा होता- महीपते - हे राजा- तस्य सुकेतुः - त्याचा सुकेतु- तस्य अपि - त्या सुकेतूचाही- देवरातः - देवरात पुत्र होता. ॥१४॥

तस्मात् - त्यापासून- बृहद्रथः (अभवत्) - बृहद्रथ झाला- तस्य (पुत्रः) - त्याचा पुत्र- महावीर्यः - महावीर्य- सुधृत्पिता - सुधृताचा पिता होय- सुधृतेः - सुधृताचा- वै धृष्टकेतुः - पुत्र धृष्टकेतु- (तस्य) हर्यश्वः - त्याचा हर्यश्व- अथ ततः - नंतर त्या हर्यश्वापासून- मरुः (अभवत्) - मरु झाला. ॥१५॥

मरोः - मरुपासून- प्रतीपकः (अभवत्) - प्रतीपक झाला- तस्मात् - त्यापासून- कृतिरथः जातः - कृतिरथ झाला- ततः - त्यापासून- देवमीढः (जातः) - देवमीढ झाला- तस्य सुतः - त्याचा पुत्र- विसृतः - विसृत- अथ - विसृतामागून- महाधृतिः - महाधृति झाला. ॥१६॥

ततः - त्यापासून- कृतिरातः - कृतिरात- तस्मात् - त्यापासून- महारोमा (आसीत्) - महारोमा झाला- अथ तत्सुतः - पुढे त्यांचा मुलगा- स्वर्णरोमा - स्वर्णरोमा- तस्य सुतः - त्याचा मुलगा- हृस्वरोमा व्यजायत - हृस्वरोमा नावाचा झाला. ॥१७॥

ततः - त्यापासून- सीरध्वजः जज्ञे - सीरध्वज उत्पन्न झाला- यज्ञार्थं - यज्ञांकरिता- महीं कर्षतः - पृथ्वी नांगरणार्‍या ह्याच्या- सीराग्रतः - नांगराच्या टोकापासून- सीता जाता - सीता उत्पन्न झाली- तस्मात् - म्हणून- (सः) सीरध्वजः स्मृतः - तो सीरध्वज या नावाने प्रसिद्ध झाला. ॥१८॥

तस्य पुत्रः - त्याचा मुलगा- कुशध्वजः - कुशध्वज- ततः - त्यापासून- धर्मध्वजः नृपः - धर्मध्वज राजा झाला- धर्मध्वजस्य - धर्मध्वजाला- कृतध्वजमितध्वजौ (इति) द्वौ पुत्रौ (आस्ताम्) - कृतध्वज व मितध्वज असे दोन पुत्र होते. ॥१९॥

कृतध्वजात् - कृतध्वजापासून- केशिध्वजः - केशिध्वज- मितध्वजात् तु - आणि मितध्वजापासून- खांडिक्यः (अभवत्) - खांडिक्य झाला- राजन् - हे राजा- कृतध्वजसुतः - कृतध्वजाचा मुलगा- आत्मविद्याविशारदः (आसीत्) - अध्यात्म ज्ञानांत निष्णात होता. ॥२०॥

कर्मत्वज्ञः खांडिक्यः - कर्ममार्गाचे तत्त्व जाणणारा खांडिक्य- केशिध्वजात् भीतः द्रुतः - केशिध्वजापासून भिऊन पळून गेला- तस्य पुत्रः - त्या केशिध्वजाचा मुलगा- भानुमान - भानुमान- तत्सुतः तु - आणि त्याचा मुलगा- शतद्युम्नः अभूत् - शतद्युम्न होता. ॥२१॥

तत्तनयः - त्याचा मुलगा- शुचिः - शुचि- तस्मात् - त्यापासून- सनद्वाजः - सनद्वाज- ततः सनद्वाजात् - त्या सनद्वाजापासून- ऊर्ध्वकेतुः अभवत् - ऊर्ध्वकेतु झाला- अथ - नंतर- पुरुजित्सुतः अजः (अभवत्) - पुरुजित आहे पुत्र ज्याचा असा अज झाला. ॥२२॥

(तस्य पुत्रः) अरिष्टनेमिः - त्याचा पुत्र अरिष्टनेमि- तस्य अपि - आणि त्या अरिष्टनेमीचा- श्रुतायुः - श्रुतायु- तत्सुपार्श्वकः - त्याचा सुपार्श्वक- ततः चित्ररथः - त्यापासून चित्ररथ- यस्य (सुतः) - ज्याचा पुत्र- मिथिलाधिपः क्षेमर्धिः - मिथिला नगरीचा राजा क्षेमधि. ॥२३॥

तस्मात् समरथः (अभवत्) - त्यापासून समरथ झाला- तस्य सुतः - त्याचा मुलगा- सत्यरथः - सत्यरथ- ततः - त्यापासून- उपगुरुः आसीत् - उपगुरु झाला- तस्मात् - त्यापासून- अग्निसंभवः उपगुप्तः (जातः) - अग्नीच्या योगे उपगुप्त झाला. ॥२४॥

अथ तत्पुत्रः - पुढे त्याचा मुलगा- वस्वनंतः - वस्वनंत- (तस्य युयुधः) - त्याचा युयुध- यत्सुभाषणः - ज्याचा पुत्र सुभाषण- (तस्य पुत्रः) श्रुतः - त्याचा पुत्र श्रुत- ततः जयः - त्यापासून जय- तस्मात् विजयः - त्यापासून विजय- अस्मात् ऋतः सुतः (जातः) - ह्या विजयापासून ऋत नावाचा पुत्र झाला. ॥२५॥

(तस्य) शुनकः - त्याचा शुनक- तत्सुतः वीतहव्यः जज्ञे - त्याला वीतहव्यनामक पुत्र झाला- ततः धृतिः - त्यापासून धृति- धृतेः (पुत्रः) - धृतीचा पुत्र- बहुलाश्वः - बहुलाश्व- तस्य - त्याचा- कृतिः - कृति- अस्य महावशी (जातः) - त्याला महावशी झाला. ॥२६॥

राजन् - हे राजा- एते वै - हे खरोखर- आत्मविद्याविशारदाः - आत्मविद्येत निष्णात असलेले- मैथिलाः - मिथिलानगरीचे राजे- योगेश्वरप्रसादेन - योगेश्वर याज्ञवल्क्याच्या प्रसादाने- गृहेषु अपि - गृहस्थाश्रमात राहूनही- द्वंद्वैः मुक्ताः - सुखदुःखादि द्वंद्वांपासून मुक्त झाले. ॥२७॥

नवमः स्कन्धः - अध्याय तेरावा समाप्त

GO TOP