|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय १२ वा - अन्वयार्थ
इक्ष्वाकुवंशाच्या अन्य राजांचे वर्णन - कुशस्य च (पुत्रः) - आणि कुशाचा पुत्र- अतिथिः - अतिथि- तस्मात् - त्यापासून- निषधः (अभवत्) - निषध झाला- तत्सुतः - त्या निषधाचा मुलगा- नभः - नभ होय- अथ - आता- तत्पुत्रः - त्या नभाचा मुलगा- पुण्डरीकः - पुण्डरीक- ततः - त्या पुण्डरीकापासून- क्षेमधन्वा अभवत् - क्षेमधन्वा झाला. ॥१॥ (क्षेमधन्वनः) देवानीकः - क्षेमधन्व्याचा देवानीक- ततः अनीहः - त्या देवानीकापासून अनीह- अथ - त्यानंतर- तत्सुतः - त्या अनीहाचा मुलगा- पारियात्रः - पारियात्र- ततः बलः - त्यापासून बल- (बलात्) स्थलः - त्या बलापासून स्थल- तस्मात् - त्या स्थलापासून- अर्कसंभवः - सूर्यापासून झालेला- वज्रनाभः - वज्रनाभ. ॥२॥ तत्सुतः खगणः - त्या वज्रनाभाचा खगण- तस्मात् च - आणि त्यापासून- विधृतिः सुतः अभवत् - विधृति नावाचा मुलगा झाला- ततः तु - त्यापासून तर- जैमिनेः शिष्यः - जैमिनिचा शिष्य- योगाचार्यः - योगमार्गाचा आचार्य असा- हिरण्यनाभः अभूत् - हिरण्यनाभ झाला. ॥३॥ यतः - ज्या हिरण्यनाभापासून- कौशल्यः शिष्यः याज्ञवल्क्यः ऋषिः - कोशल देशातील शिष्य याज्ञवल्क्य ऋषि- हृदयग्रंथिभेदकं - हृदयातील ग्रंथीचे भेदन करणार्या- महोदयं - मोठया सिद्धी आहेत ज्यात अशा- आध्यात्मं योगं अध्वगात् - अध्यात्मयोगाचा अभ्यास करिता झाला. ॥४॥ हिरण्यनाभस्य पुष्यः - हिरण्यनाभाचा पुत्र पुष्य- ततः ध्रुवसंधिः अभवत् - त्यापासून ध्रुवसंधि झाला- (तस्य) सुदर्शनः - त्याचा सुदर्शन- अथ (ततः) अग्निवर्णः - नंतर त्यापासून अग्निवर्ण- (ततः) शीघ्रः - त्यापासून शीघ्र- (तस्य च) सुतः मरुः - आणि त्याचा मुलगा मरु. ॥५॥ असौ - हा- योगसिद्धः - योगाची पूर्ण सिद्धी मिळवून- कलापग्रामं आस्थितः आस्ते - कलाप गावात राहिला आहे- यः च - आणि जो- कलेः अन्ते - कलीच्या शेवटी- नष्टं सूर्यवंशं - नष्ट झालेल्या सूर्यवंशाला- पुनः भावयिता - पुनः चालू करील. ॥६॥ तस्मात् प्रसुश्रुवः (अभवत्) - त्या मरुपासून प्रसुश्रुत झाला- तस्य संधिः - त्याचा मुलगा संधि- तस्य अपि अमर्षणः - त्याचाही अमर्षण होय- तत्सुतः महस्वान् - त्याचा मुलगा महस्वान- तस्मात् - त्या महस्वानापासून- विश्वसाव्हः अन्वजायत - विश्वसाव्ह पुत्र उत्पन्न झाला. ॥७॥ ततः प्रसेनजित् - त्यापासून प्रसेनजित- तस्मात् पुनः तक्षकः भविता - त्यापासून पुन्हा तक्षक होईल- ततः - त्यापासून- बृहद्वलः - बृहद्वल झाला- यः तु - जो तर- ते पित्रा - तुझ्या पित्याकडून- समरे हतः - युद्धात मारिला गेला. ॥८॥ एते हि - इतके तर- इक्ष्वाकुभूपालाः अतीताः - इक्ष्वाकुवंशातील राजे मागे झाले- अनागतान् शृपु - होऊन न गेलेले ऐक- बृहद्बलस्य पुत्रः - बृहद्वलाचा मुलगा- बृहद्रणः नाम भविता - बृहद्रण नावाचा होईल. ॥९॥ तस्य वत्सवृद्धः - त्याला वत्सवृद्ध- भविष्यति - होईल- ततः प्रतिव्योमः - त्यापासून प्रतिव्योम- (ततः) भानुः दिवाकः वाहिनीपतिः (भविष्यति) - त्यानंतर भानु, दिवाक आणि वाहिनीपति असे होतील. ॥१०॥ ततः सहदेवः - त्यानंतर सहदेव- वीरः बृहदश्वः - पराक्रमी बृहदश्व- अथ भानुमान् - नंतर भानुमान होईल- भानुमानः प्रतीकाश्वः - भानुमानाचा पुत्र प्रतीकाश्व होईल- अय तत्सुतः - नंतर त्याचा मुलगा- सुप्रतीकः - सुप्रतीक होईल. ॥११॥ अथ मरुदेवः भविता - नंतर मरुदेव होईल- सुनक्षत्रः - सुनक्षत्र- अथ पुष्करः - नंतर पुष्कर- तस्य अंतरिक्षः - त्या पुष्कराचा अंतरिक्ष- तत्पुत्रः सुतपाः - त्याचा पुत्र सुतपा- तत् अमित्रजित् - त्यापासून अमित्रजित होईल. ॥१२॥ तस्य अपि तु - त्याचा तर खरोखर- बृहद्राजः (पुत्रः भविता) - बृहद्राज पुत्र होईल- तस्मात् बर्हिः - त्यापासून बर्हि- (ततः) कृतंजयः - त्याचा कृतंजय- तस्य सुतःरणंजयः (भविता) - त्याचा पुत्र रणंजय होईल- ततः सञ्जयः भविता - त्याला संजय होईल. ॥१३॥ अथ तस्मात् शाक्यः - नंतर त्यापासून शाक्य- शुद्धोदः - त्याला शुद्धोद होईल- तत्सुतः लाङगलः स्मृतः - त्याचा पुत्र लाङगल म्हटला आहे- ततः प्रसेनजित् - त्यापासून प्रसेनजित- ततः तस्मात् - पुढे त्यापासून- क्षुद्रकः भविता - क्षुद्रक पुत्र होईल. ॥१४॥ तस्मात् रणकः भविता - त्यापासून रणक होईल- ततः सुरथः तनयः - त्यापासून सुरथ पुत्र होईल- निष्ठान्तः सुमित्रः नाम - त्याला वंशाची समाप्ति करणारा सुमित्र या नावाचा पुत्र होईल- एते बार्हब्दलान्वयाः - हे बार्हब्दलाचे वंशज झाले. ॥१५॥ अयं - हा- इक्ष्वाकूणां वंशः - इक्ष्वाकूचा वंश- सुमित्रांतः भविष्यति - सुमित्र आहे शेवटी ज्याच्या असा होईल- यतः - कारण- कलौ - कलियुगात- तं राजानं प्राप्य - तो राजा झाला असता- (अयं वंशः) वै संस्थां प्राप्स्यति - खरोखर तो वंश समाप्तीला जाईल. ॥१६॥ नवमः स्कन्धः - अध्याय बारावा समाप्त |