|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ६ वा - अन्वयार्थ
इक्ष्वाकू वंशाचे वर्नन, मान्धाता आणि सौभरी ऋषींची कथा - विरुपः केतुमान शभ्भुः त्रयः अम्वरीषसुताः (आसन्) - विरुप, केतुमान व शंभु हे तीन अंबरीषाचे मुलगे होत - विरुपात पृशदश्वः अभूत - विरुपापासून पृशदश्व झाला - -तत्पुत्रः तु रथीतरः (आसीत्) - आणि त्याचा पुत्र रथीतर होता. ॥ १ ॥ अप्रजस्यरथीतरस्य भार्यायां - निपुत्रिक रथीतराच्या भार्येच्या ठिकाणी - तन्तवे अभ्यर्थितःअंगिराः - संतानार्थ प्रार्थिलेला अंगिरा मुनि - ब्रम्ह्वर्चस्विनः सुतान जनयामास-- ब्रह्मतेजाने युक्त असे पुत्र उत्पन्न करिता झाला. ॥ २ ॥ ऐते वै (रथीतरस्य) क्षेत्रेप्रसूताः - हे रथीथराच्या पत्नीच्या ठिकाणी उत्पन्न झाले असून - पुनः तु आङ्गिरसाःस्मृताः - पुनः आणखी आंगिरस नावाने प्रसिद्ध झाले - क्षेत्रोपेताः द्विजातयःरथीतराणां प्रवराः (अभवन) - क्षात्र तेजाने युक्त असे हे ब्राह्मण रथीथरांमध्ये श्रेष्ठ झाले. ॥ ३ ॥ क्षुवतः मनो तु घ्राणतः इक्ष्वाकुः सुतः जज्ञे - मनु शिंकत असता त्याच्या नाकातून इक्ष्वाकु नावाचा पुत्र उत्पन्न झाला - तस्य पुत्रशतज्येष्ठाःबिकुक्षिनिमिदण्ड - त्याच्या शंभर पुत्रांमध्ये विकुक्षि, निमि व दडंक हे वडील होते. ॥ ४ ॥ नृप - हे राजा - तेषां - त्यापैकी - पज्चविंशतिः नृपाः - पंचवीस राजे - -आर्यावर्ते पुरस्तात (अभवत) - आर्यावर्त देशातील पूर्वेकडील प्रदेशात झाले - -पश्चात च (पंचविंशतिः) - आणि पश्चिमेकडील प्रदेशात पंचवीस झाले - त्रयःमध्ये - तीन मधल्या प्रदेशात - -परे (च) अन्यतः अभवन - आणि इतर उरलेल्याप्रदेशात झाले. ॥ ५ ॥ सः इक्ष्वाकुः - तो इक्ष्वाकु - विकुक्षे मेध्यं मासं आनीयतां - हे विकुक्षे पवित्र मांस आण - गच्छ मा चिरं - जा, उशीर करु नको - (इति) एकदा अष्टकाश्राद्धे सुतम आदिशत - अशी एकदा अष्टकाश्राद्ध प्रसंगी पुत्राला आज्ञादेता झाला. ॥ ६ ॥ सः वीरः - तो पराक्रमी विकुक्षि - तथा इति (उक्त्वा) - बरे आहेअसे म्हणून - वनं गत्वा - अरण्यात जाऊन - क्रियार्हणान मृगान हत्वा - श्राद्धकर्माला योग्य अशा पशूंना मारुन - श्रान्तः बुभुक्षितः (अतः) अपस्मृतिः च शशंआदत - दमलेला व भुकेलेला व म्हणून पित्याच्या आज्ञेचे स्मरण नाहिसे झालेल एक ससा खाऊन टाकिता झाला. ॥ ७ ॥ शेषं पित्रे निवेदयामास - बाकीचे पित्याला देता झाला - तेन च प्रोक्षणाय चोदितः गुरुः - आणि त्याने प्रोक्षणाकरिता सूचना दिलेला गुरु - तत एतत अकर्मकं दुष्टं (इति) आह - ते हे मांस कर्माला अयोग्य व दोषयुक्त आहे असे म्हणाला. ॥ ८ ॥ सः नृपः - तो इक्ष्वाकु राजा - गुरुणा अभिहितं तत पुत्रस्य कर्मज्ञात्वा - गुरुने सांगितलेले ते पुत्राचे कर्म जाणून - त्यक्तविधिं सुतं रुषा देशातनिःसारयामास - सदाचार सोडिलेल्या पुत्राला क्रोधाने आपल्या देशातून घालवून देताझाला. ॥ ९ ॥ सः तु जापकेन विप्रेण संवादं समाचरन (आसीत) - तो इक्ष्वाकु तर मंत्रोपदेश करणार्या गुरुबरोबर शास्त्रीय विषयावर संवाद करीत असे - तेन - त्यामुळे - -योगी (भूत्वा) - योगी होऊन - कलेवरं त्यक्त्वा - देह ठेविल्यावर - यत परं(तत) अवाप - जे श्रेष्ठ ब्रह्मतत्व त्याला प्राप्त झाला. ॥ १० ॥ पितरि उपरते - पिता मृतझाला असता - विकुक्षिः अभ्येत्य इमां पृथ्वीं शासत - विकुक्षि परत येऊन ह्या पृथ्वीचेराज्य करिता झाला - यज्ञैः हरिं इजे - यज्ञांनी विष्णूचे पुजन करिता झाला - शशाद इति विश्रुतः (अभवत) - शशाद नावाने प्रसिद्ध झाला. ॥ ११ ॥ तस्य सुतः पुरुज्जयः (आसीत्) - त्याचा पुत्र पुरंजय होता - (सः)इंद्रवाहः ईरितः आसीत् - तो इंद्रवाह नावाने संबोधला जात असे - ककुत्स्थः इति च अपि उक्तः - आणि ककुत्स्थ असेहित्याला म्हणत असत - कर्मभिः (प्राप्तानि) नामानि शृणु - क्रर्मानी मिळालेली नावे ऐका. ॥ १२ ॥ कृतान्ते देवानां दानवैः सह समरः आसीत - कृतयुगाच्या शेवटी देवांचे दानवांबरोबर युद्ध झाले - दैत्यपराजितैःदेवैः वीरः (पुरंजयः पार्ष्णिग्राहः) वृतः-- दैत्यांनी पराभव केलेल्या देवांनी पराक्रमी पुरंजय वीराला सहाय्यार्थ बोलाविले होते. ॥ १३ ॥ विश्वात्मनः प्रभोःदेवदेवस्य विष्णोः वचनात - विश्वस्वरुपी भगवान देवाधिदेव विष्णूच्या सांगण्यावरुन - वाहनत्वे वृतः इन्द्रः - वाहन होण्यासाठी सांगितलेला इंद्र - -तस्य वाहनत्वाय महावृषः बभूव - त्या पुरंजयाचे वाहन म्हणून मोठा वृषभ झाला. ॥ १४ ॥ स्तूयमानःयुयुत्सुः सः - स्तविलेला व युद्धाची इच्छा करणारा तो पुरंजय - -सन्नद्धः - चिलखत धारण केलेला - दिव्यं धनुः सितान विशिखान च आदाय-- दिव्य धनुष्य आणि तीक्ष्ण बाण घेऊन - (वृषभं) आरुह्य ककुदि स्थितः - वृषभावरचढून त्याच्या वशिंडावर बसला. ॥ १५ ॥ परात्मनःपुरुषस्य विष्णोः - परमात्मा अशा महापुरुष विष्णूच्या - तेजसा आप्यायितः - तेजाने वाढलेला - प्रतीच्या दिशि-- पश्चिम दिशेला - त्रिदशैः (सह) दैत्यांना पुरं व्यरुणत - देवांसह दैत्यांच्या नगरालावेढा घालिता झाला. ॥ १६ ॥ तस्य च तैः तुमुलं लोमहर्षणं प्रधनं अभूत - त्याचे दैत्यांसह घनघोर असे अंगावर रोमांच उठविणारे युद्ध झाले - ये मृघे अबिययुः - जे युद्धासाठी आले - (तान्) दैत्यान भल्लै; यमाय अनयत - त्या दैत्यांना भाले भोसकून यमलोकी पाठविता झाला. ॥ १७ ॥ हन्यमानाः दैत्याः - मारिले जाणारे दैत्य - तस्ययुगान्ताग्निम इव उल्बणं इषुपाताभिमुखं विसृज्य - त्या पुरुंजयाच्या प्रलयकालीनअग्नीप्रमाणे भयंकर अशा बाणाच्या मार्याचे तोंड सोडून - स्वं आलयं दुद्रुवुः - आपल्याघ्री निघून गेले. ॥ १८ ॥ सः राजर्षिः - तो राजर्षि पुरंजय - सश्रीक पुरं सर्वं धनं(च) जित्वा वज्रपाणये प्रायच्छत - ऐश्वर्यासह ते नगर आणि सर्व द्रव्य जिंकून इंद्राला परत देता झाला - इति नामभिः आहृतः - अशा रीतीने तो निरनिराळ्या नावांनी संबोधिला गेला. ॥ १९ ॥ पुरंजयस्य अनेनाः पुत्रःअभूत - पुरंजयाला अनेना नावाचा पुत्र झाला - त्तत्सुतः पृथुः - त्याचा पुत्र पृथु - ततःविश्वरन्धिः - त्यापासून विश्वरंधि - -(ततः) चन्द्रः - त्यापासून चंद्र - तत्सुतःच युवनाश्वः - आणि त्या चंद्राचा पुत्रयुवनाश्व. ॥ २० ॥ तत्त्सुतः शाबास्तः - त्याचा पुत्र शाबास्त - येन शाबास्ती पुरीनिर्ममे - ज्याने शाबास्ती नगरी बसविली - शाबास्तिः तु बृहदश्वः - शाबास्ताचा पुत्रबृहदश्व - ततः कुवलयाश्वकः (अभवत) - त्यापासून कुवलयाश्वक झाला. ॥ २१ ॥ यः बली - जो पराक्रमी कुवलायाश्वक - उतंकस्य प्रियार्थ - उतंकाचे प्रियकरण्याकरिता - सुतानां एकविंशत्या सहस्त्रैः वृतः - आपल्या एकवीस हजार पुत्रांनीवेष्टिलेला - धुंधुनामासुरं अहनत - धुंधुनामक दैत्याला मारिता झाला. ॥ २२ ॥ (ततः) धुंधुमारःइति ख्यातः - तेव्हापासून तो धुंधुमार ह्या नावाने प्रसिद्ध झाला - तेच सर्वे तत्त्सुताःच - आनि त्याचे ते सर्व पुत्र - धुंधोःमुखाग्निना जज्वलुः - धुंधुच्या मुखापासून निघालेल्या अग्नीने जळून गेले - त्रयःएव अवशेषिताः - फक्त तीनचशिल्लक राहिले. ॥ २३ ॥ दृढश्वः कपिलाश्वः भद्राश्वः च इति - ते दृढाश्व, कपिलाश्व आणि भद्राश्व हे होत - भारत - हे परीक्षित राजा - दृढाश्वपुत्रः हर्यश्वः - दृढाश्वाचा मुलगा हर्यश्व - तत्सुतः निकुंभः स्मृतः - त्याचा पुत्र निकुंभ होय. ॥ २४ ॥ निकुंभस्यबर्हणाश्वः - निकुंभाचा बर्हणाश्व - अथ कृशाश्वः - त्यानंतर कृशाश्व - अस्यसेनजित - ह्याचा सेनजित - तस्य युवनाश्वः अभवत - त्याला युवनाश्व झाला - सःअनपत्यः (सन) वनं गतः - तो निपुत्रिक असल्यामुळे अरण्यात गेला. ॥ २५ ॥ (सः) भार्याशतेन (सह) निर्विण्णः - तो शंभर स्त्रियांसह खिन्न झाला - -ते कृपालवः सुसमाहिताः ऋषयः - ते स्वस्थ चित्ताने असे दयाळू ऋषि - अस्य ऐद्रीं इष्टिंवर्तयांचक्रुः स्म - ह्या राजाकरिता इंद्र आहेत देवता ज्यात असा यज्ञ करिते झाले. ॥ २६ ॥ तृषितः राजा - तहानलेला तो राजा - निशि तत यज्ञसदनं प्रविष्टः - रात्री त्यायज्ञशाळेत शिरला - -तान विप्रान शयानान दृष्टवा - ते ब्राह्मण निजलेले पाहून - -मन्त्रजलं स्वयं पपौ - मंतरलेले पाणी स्वतः पिता झाला. ॥ २७ ॥ प्रभो - हे परीक्षित राजा - -अथ उत्थिताः ते - नंतर उठलेले ते ऋषि - कलशं व्युदकं निशाम्य - कलशजलहीन पाहून - -पप्रच्छुः - विचारिते झाले - इदं कस्य कर्म - हे कोणाचे काम - -पुंसवनं जलं केन पीतं - पुत्रोत्पादक जल कोणी प्याले. ॥ २८ ॥ अथ ईश्वरप्रहितेनराज्ञा पीतं विदित्वा - नंतर ईश्वराच्या प्रेरणेने राजाने उदक प्यालेले जाणून - अहो दैवबलंबलं - अहो दैवाचे बल हेच खरे सामर्थ्य होय - -(इति) ते ईश्वराय नमश्चकुः - असे म्हणून ते ऋषि ईश्वराला नमस्कार करिते झाले. ॥ २९ ॥ ततः काले उपावृत्ते - नंतर योग्यकाळ आला असता - युवनाश्वस्य दक्षिणं कुक्षिं निर्भिद्य चक्रवर्ती तनयः जजान ह-- युवनाश्व राजाची उजवी कूस फोडून सार्वभौम असा पुत्र उत्पन्न झाला. ॥ ३० ॥ अयंकुमारः कं धास्यति - हा पुत्र कोणाच्या अंगावर पिईल - स्तन्यं (उद्दिश्य) भृशंरोख्यते - युवानाश्व फार रडत आहे - -मां धाता - मला पिईल - वत्स मा रोदीः-- बाळ रडू नको - इति इंद्रः देशिनीं अदात - असे म्हणून इंद्र आपली तर्जनी (आंगठयाजवळील बोट) त्याच्या मुखात घालिता झाला. ॥ ३१ ॥ तस्य पिताविप्रदेवप्रसाधतः - त्याचा बाप ब्राह्मण व ह्याच्या प्रसादामुळे मेला नाही - अथ युवनाश्वः - नंतर युवनाश्व राजा - तत्र एव तपसा सिद्धिं अन्वगात - तेथेचतपश्चर्येने सिद्धि मिळविता झाला. ॥ ३२ ॥ अंग - हे राजा - इंद्र तस्य त्रसद्दस्युःइतिनाम वै विदधे - इंद्र त्याचे त्रसद्दस्यु असे नाव ठेविता झाला - हि - कारण - यस्मातरावणादयः दस्यत्रः उद्विग्नाः त्रसन्ति - ज्यामुळे रावणादि दुष्ट राक्षस व्याकुळ होऊन त्रास पावतात. ॥ ३३ ॥ अथ यौवनाश्वः माधांता चक्रवर्ती प्रभुः (भूत्वा) - नंतरयुवनाश्वाचा पुत्र मांधता सार्वभौम राजा होऊन - अच्युत तेजसा एकः सप्तद्वीपवतीमअवनी शशास - परमेश्वराच्या तेजाने एकटा सप्तद्वीपवती पृथ्वीचे राज्य करिता झाला. ॥ ३४ ॥ च - आणि - आत्मवित (सः) - आत्मज्ञानी असा तो मांधता - -भूरिदक्षिणैः क्रतुभिः - ज्यात पुष्क्ळ दक्षिणा दिली जाते अशा यज्ञांनी - सर्वदेवप्रयंसर्वात्मकं अतीन्द्रियं यज्ञं देवं ईजे - सर्वदेवस्वरुपी वसर्वात्मक आणि इंद्रियांना अगोचर अशा यज्ञस्वरुपी देवाला पूजिता झाला. ॥ ३५ ॥ द्रव्यं मन्त्रः विधिः यज्ञः यजमानः तथाऋत्विजः - द्रव्य, मंत्र, विधि, यज्ञ, यजमान तसेच ऋत्विज - धर्मः देशः च कालः च-- आणि धर्म, देश व काळ - एतत सर्वं यदात्मकं (अस्ति) - हे सर्व ज्या ईश्वराचेचस्वरुप आहे. ॥ ३६ ॥ यावत सूर्यः उदेति स्म - जेथून सूर्य उगवतो - -यावत चप्रतितिष्ठति - व जेथे अस्तास जातो - तत सर्व यौवनाश्वस्य मांधातुः क्षेत्रं उच्यते - तीसर्व युवनाश्वपुत्र मांधात्याची भूमी म्हटली आहे. ॥ ३७ ॥ नृपः - मांधाता राजा - -शशबिन्दोः दुहितरि बिन्दुमत्यां - शशबिंदूची कन्या जी बिंदुमती तिच्या ठिकाणी - -पुरुकुत्सं अंबरोषं च योगिनं मुचुकुन्दं च अधात - पुरुकुत्स, अंबरीष आणि योगीमुचुकुन्द यांना उत्पन्न करिता झाला - तेषां पज्चाशत स्वसारः सौभरिं पतिं वव्रिरे-- त्याच्या पन्नास बहिणी सौभरी ऋषीला पति म्हणून वरित्या झाल्या. ॥ ३८ ॥ यमुनान्तर्जलेमग्नः तप्यमानः परंतपः विप्रः - यमुनेच्या पाण्यात मग्न होऊन तपश्चर्या करणारा शत्रुतापनविप्र सौभरि - मैथुनधर्मिणः मीनराजस्य निर्वृतिं वीक्ष्य - मैथुन धर्माने वागणार्या मत्स्यराजाचे सुख पाहून - जातस्पृहः - लग्नाची इच्छा झालेला असा - नृपं एकां कन्यां अयाचत - मांधात्या जवळ एक कन्या याचिता झाला - सः अपि आह - तो राजा सुद्धा म्हणाला - ब्रह्मन स्वयंवरे कन्या कामं गृह्यतां - हे ब्राह्मणा स्वयंवरामध्ये कन्येचा खुशाल स्वीकार कर. ॥ ३९-४० ॥ सः प्रभुः - तो समर्थ सौभरि - -अयं जरठःवलीपलितः एजत्कः स्त्रीणाम असंमतः (स्यात) - हा वृद्ध वळ्या पडलेला केसपिकलेला,थर थर कापणारा स्त्रियांना अमान्य होईल - इति अप्रियं विचिन्त्य अहं(अनेन) प्रत्युदाह्रतः - असे वाईट मनात आणून मी नाकारिला गेलो - -तथा सुरस्त्रीणां अपि ईप्सितं - करिता देवस्त्रियांनाहि इष्ट - किं पुनः मनुजेंद्राणां (स्त्रीणां) - मग राजेलोकांच्या स्त्रियांची कथा काय - (इति) आत्मानंसाधयिष्ये - असे स्वतःचे स्वरुप बनविन - -(इति) प्रभुःव्यवसितः - असा तो निश्चयकरिता झाला. ॥ ४१-४२ ॥ क्षत्त्रा ऋद्धिमत कन्यान्तःपुरं मुनिः प्रवेशितः-- द्वारपालाकडून ऐश्वर्यसंपन्न अशा कन्यांच्या अंतःपुरात ऋषि नेला गेला - पच्जशताराजकन्याभिः च एकः वरः वृतः - आणि पन्नास राजकन्यांकडून एकटाच तो पति म्हणून वरिला गेला. ॥ ४३ ॥ तग्दतचेतसां तासां - त्या ऋषीवर ज्यांचे मन गेले आहे अशात्यांचे - सौह्रदं अपोह्य - परस्परांवरील प्रेम सुटून - तदर्थे - त्या मुनिस्तव - अयंमम अनु रुपः वः न - हा मला योग्य आहे तुम्हाला नव्हे - -इति भूयान कलिः अभूत् - असे मोठे भांडण लागले. ॥ ४४ ॥ बव्हचः सः - तो ऋग्वेदाचार्य सौभरि - -ताभिः - त्या स्त्रियांसह - -अपारणीयतपःश्रिया - - अपार तपःसंपत्तीने - -अनर्घ्यपरिच्छ्देषु - अमोल साहित्ये ज्यात आहेत अशा - स्वलंकृतस्त्रीपुरुषेषु - जेथे स्त्रिया व पुरुष उत्तम प्रकारे भूषित आहेत अशा - अनुगायदद्विजभृंग बन्दिषु गृहेषु-- पक्षी, भ्रमर व स्तुतिपाठक जेथे गायन करितात अशा घरांमध्ये - सौगन्धिककाननेषु-- सुगंधी कमळांचे समुदाय ज्यात आहेत अशा - नानोपवनामलाम्भःसरःसु - अनेकप्रकारच्या उपवनांतील निर्मळ उदकांच्या सरोवरांमध्ये - -महार्हशय्यासनवस्त्रभूषण्स्नानानुलेपाभ्यवहारमाल्यकैः - महामूल्य, शय्या, आसने, वस्त्रे, भूषणे, स्नान, उटया, उपहार व फुलांच्या माळा ह्यांनी - नित्यदा रेमे - नेहमी क्रीडा करू लागला. ॥ ४५-४६ ॥ यदगार्हस्थ्यं संवीक्ष्य- - ज्याच्या गृहस्थधर्माला पाहून - -विस्मितः - आश्चर्यचकित झालेला - सप्तद्वीपपतिः तु सार्वभौमश्रिया अन्वितं स्तम्भंअजाहत - आधिराज मांधाताहि सार्वभौम ऐश्वर्यामुळे झालेला गर्व सोडून देता झाला. ॥ ४७ ॥ एवं गृहेषु अभिरतः - याप्रमाणे गृहामध्ये आसक्त झालेला - विविधैः सुखैःच विषयान सेवमानः - आणि अनेक सुखांनी विषयांचे सेवन करणारा - सौभरिः-- सौभरि - आज्यस्तोकैः अनलः इव न अतुष्यत - घृतबिंदूंनी जसा अग्नि तसा संतुष्ट झाला नाही. ॥ ४८ ॥ कदाचित उपासीन; सः बृव्हटचाचार्यः - एकदा स्वस्थ विचारकरीत बसलेला तो ऋग्वेदी सौभरि - मीनसङ्गसमुत्थितं आत्मनः आत्मापह्र्व ददर्श - माशाच्या समागमामुळे उत्पन्न झालेला स्वतःचा लोप पहाता झाला. ॥ ४९ ॥ अहो - अहो - तपस्विनः सच्चरितव्रतस्य मे - तपस्वी व सदाचारसंपन्न अशा माझ्या - इमंविनाशं पश्यत - ह्या नाशाला पहा - यत - की - चिरं धृतं ब्रह्म - पुष्कळकाळपर्यंत धरिलेले ब्रह्मचर्य - -अन्तर्जले वारिचर प्रसंगात (मया) प्रच्यावितं -- पाण्यातील माशांचा सुखोपभोग पाहिल्यामुळे मजकडून घालविले गेले. ॥ ५० ॥ मुमुक्षुः - मोक्षेच्छू पुरुषाने - मिथुनव्रतिनां सग्ङं त्यजेत् - मिथुनधर्माने वागणार्यांची संगती सोडावी - सर्वात्मना इंद्रियाणि बहिः न विसृजेत - सर्व प्रकारे इंद्रियांना बाहेरसोडू नये - रहसि एकः चरन - एकांतात एकटा फिरत - अनन्ते ईशे चित्तं युज्जीत-- अनंत परंमेश्वरावर चित्त ठेवावे - -प्रसग्ङ (कर्तव्यः) चेत - संगती करावयाचीच असेल तर - तदव्रतिषु साधुषु कुर्यात - परमेश्वर हेच ज्याचे व्रत अशा साधूंच्या ठिकाणीकरावी. ॥ ५१ ॥ अथ - नंतर - एकः तपस्वी अहं - एकटा तपस्वी मी - -अंभसि-- उदकात - मत्स्यसंगात - माशाचा संग पाहून - पज्चाशता पंचसहस्त्रसर्गः आसम-- पन्नास स्त्रियांच्या सहाय्याने पाच हजार मुलगे उत्पन्न करणारा झालो - उत - आणि - -मायागुणैः ह्र्तमतिः विषये अर्थभावः (अहं) - मायेच्या गुणांनी ज्याची बुद्धी हरणकेली आहे व विषयांच्या ठिकाणीच पुरुषार्थाची दृष्टी ठेवणारा मी - उभयकृत्यमनोरथानांअंतं न व्रजामि - इहपर लोकासंबंधी इच्छांच्या शेवटाला जात नाही. ॥ ५२ ॥ एवं कालंगृहे वसन - ह्याप्रमाणे काही काळ गृहस्थाश्रम करणारा - विरक्तः (सौभरिः) न्यासंआस्थितः वनं जगाम - वैराग्य धारण केलेला सोभरि सर्व भोगांचा त्याग करुन अरण्यात गेला - पतिदेवताः तत्पत्न्यः अनुययुः - पतिव्रताधर्माने वागणार्या त्या स्त्रिया त्याच्या मागोमाग गेल्या. ॥ ५३ ॥ आत्मवान - ज्ञानी सौभरि - तत्र आत्मकर्षणं तीक्ष्णं तपःतप्त्वा - जेथे शरीराला कृश करणारे घोर तप करुन - अग्निभिःसहः एव - अग्निसहच - -आत्मानं परमात्मनि युयोज - आत्म्याला परमात्म्याच्या ठिकाणी योजिता झाला. ॥ ५४ ॥ महाराज - हे परीक्षित राजा - ताः - त्या स्त्रिया - स्वपत्युः आध्यात्मिकीं गतिंनिरीक्ष्य - आपल्या पतीचा आत्मस्वरुपी झालेला लय पाहून - तत्प्रभावेण - त्याऋषीच्या तपःसामर्थ्याने - अर्चिषः शान्तं अग्निं इव - ज्वाळा जशा शांत झालेल्याअग्नीला तशा - (पतिं) अन्वीयुः - पतीला अनुसरल्या. ॥ ५५ ॥ नवमः स्कन्धः - अध्याय सहावा समाप्त |