|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ५ वा - अन्वयार्थ
दुर्वासांची दुःखनिवृत्ती - एवं भगवता आदिष्टः - याप्रमाणे श्रीविष्णूने आज्ञापिलेले - चक्रतापितः दुःखितः दुर्वासाः - सुदर्शन चक्राने पीडिलेला दुःखी दुर्वास - अंबरीषं उपावृत्य - अंबरीष राजाकडे परत येऊन - तत्पादौ अग्रहीत - त्याचे पाय धरिता झाला. ॥ १ ॥ तस्य उद्यमनं वीक्ष्य - त्याचा उद्योग पाहून - पादस्पर्श विलज्जितः सः - ब्राह्मणाने आपल्या पायाला स्पर्श केल्यामुळे लाजलेला तो राजा - कृपया भृशं पीडितः - दयेने अत्यंत पीडिलेला - हरे तत अस्त्रं अस्तावीत - श्रीविष्णूच्या त्या सुदर्शनचक्राची स्तुति करिता झाला . ॥ २ ॥ त्वं अग्निः (असि) - तू अग्नी आहेस - त्वं भगवान सूर्यः - तू षड्गुणैश्वर्यसपंन्न सूर्य आहेस - त्वं ज्योतिषां पतिः सोमः - तू तेजांचा अधिपति सोम आहेस - त्वं आपः त्वं क्षितिः व्योम वायुः मात्राः इन्द्रियाणि च (असि) - तू उदक, पृथ्वी, आकाश , वायु , विषय आणि इन्द्रिय आहेस. ॥ ३ ॥ सहस्नार अच्युतप्रिय सुदर्शन - हजार आरांच्या व भगवंताला प्रिय अशा हे सुदर्शना - तुभ्यं नमः - तुला नमस्कार असो - सर्वास्त्रघातिन इडस्पते - सर्व अस्त्रांचा नाश करणार्या हे वेदरक्षका - -विप्राराय स्वस्ति भूयाः - ब्राह्मणाचे कल्याण होवो. ॥ ४ ॥ त्वं धर्मः (असि) - तू धर्म आहेस - त्वं ऋतं (च) सत्यं - तू मोक्ष व सत्य आहेस - त्वं अखिलयज्ञभुक यज्ञः - तू सर्व यज्ञांमध्ये हविर्भाग सेवन करणारा मूर्तिमान यज्ञ आहेस - त्वं सर्वात्मा लोकपालः - तू सर्वात्मरुपी लोकपाल आहेस - त्वं परमं पौरुषं तेजः - तू श्रेष्ठ पुरुषाचे तेज आहेस. ॥ ५ ॥ सुनाभ - हे सुदर्शना - अखिलधर्मसेतवे - सर्व धर्माचा अधार अशा - अधर्मशीलासुरधूमकेतवे - अधर्मशील दैत्यांना धूमकेतूप्रमाणे अनिष्ट वाटणार्या - त्रैलोक्यगोपाय - त्रैलोक्याचे रक्षण करणार्या - विशुद्ध्वर्चसे - शुद्ध तेजाच्या - मनोजवाय - मनाप्रमाणे वेग असणार्या - अभ्दुतकर्मणे (तुभ्यं) - आश्चर्यजनक कर्मे करणार्या तुला - नमः गृणे - मी नमस्कार करितो . ॥ ६ ॥ धर्ममयेन त्वत्तेजसा तमः संह्रतं - धर्मस्वरुपी तुझ्या तेजाने अंधःकार नाहीसा केला - -महात्मनां च प्रकाशः धृतः - आणि थोर पुरुषांना प्रकाश दिला - ते महिमा दुरुत्ययः - तुझा महिमा समजण्यास कठीण आहे - गिरां पते - हे वेदाच्यां स्वामी सुदर्शना - एतत सदसत परावरं (विश्वं) त्वद्रूपं (अस्ति) - हे व्यक्त आणि अव्यक्त, श्रेष्ठ व कनिष्ठ असे सर्व विश्व तुझे स्वरुप आहे . ॥ ७ ॥ अजित - हे अजिंक्यचक्रा - -यदा अनज्जनेन त्वं वै विसृष्टः (असि) - जेव्हा श्रीविष्णूकडून तू खरोखर सोडिला जातोस - (तदा) दैत्यदानवं बलं प्रविष्टः - त्या वेळी दैत्य व दानव यांच्या सैन्यात शिरलेला - प्रधने - युद्धात - बाहूदरोर्वङघ्रिशिरोधराणि अजस्रं वृक्णन - दंड, उदर, मांडया, पाय, मस्तक ही एकसारखी तोडणारा असा - विराजसे - शोभतोस. ॥ ८ ॥ जगत्तराण - हे जगद्रक्षक चक्रा - सर्वसहः - सर्व सहन करणारा - गदाभृता खलप्रहाणये निरुपितः - गदाधारी विष्णूकडून दुष्टांच्या नाशार्थ योजिला गेलेला - सः त्यं - तो तू - अस्मत्कुलदैवहेतवे - आमच्या कुळाच्या भाग्याकरिता - विप्रस्य भद्रं विदेहि - ब्राह्मणाचे कल्याण कर - तत हि नः अनुग्रहः (स्यात) - तोच खरोखर आमच्यावर अहुग्रह होईल. ॥ ९ ॥ नः कुलं विप्रदैवं चेत - जर आमचे कुळ ब्राह्मणांना मानणारे असेल - (तर्हि) द्विजः विज्वरः भवतु - तर हा ब्राह्मण पीडारहित होवो. ॥ १० ॥ एकः सर्वगुणाश्रयः भ्गवान - सर्व गुणांना एकच आता आश्रय असा ईश्वर - -सर्वभूतात्मभावेन नः यदि प्रीतः - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आत्मभावना ठेविल्याच्या योगाने आमच्यावर जर प्रसन्न झालाअसेल - (तर्हि) द्विजः विज्वरः भवतु - तर हा ब्राह्मण पीडारहित होवो. ॥ ११ ॥ राज्ञः इति संस्तुवतः - अंबरीष राजा याप्रमाणे स्तुति करीत असता - सर्वतः विप्रं प्रदहत विष्णुचक्रं सुदर्शनं - सर्वप्रकारे दुर्वासाला जाळणारे श्रीविष्णूचे सुदर्शन चक्र - राजयाज्चया अशाम्यत - राजाच्या प्रार्थनेवरुन शांत झाले . ॥ १२ ॥ ततः अस्त्राग्नितापेन मुक्तः स्वस्तिमान सः - नंतर सुदर्शनापासून निघणार्या अग्नीच्या तापापासून मुक्त झालेला व स्वस्थपणाला प्राप्त झालेला तो दुर्वास - तं उर्वीशं परमाशिषःयुज्जानः - त्या अंबरीष राजाला मोठमोठे आशीर्वाद देत - (तं) प्रशशंस - त्याची प्रशंसा करिता झाला . ॥ १३ ॥ अहो - कायहो - अद्य मे अन्न्त्दासानां महत्वं दृष्टं - आज मला भगवद्भभक्तांचे माहात्म्य दिसून आले - यत - ज्याअर्थी - राजन - हे राजा - कृतागसः अपि - अपराध करणारा सुद्धा - (त्वं) मंगलानि समीहसे - तू चांगले इच्छितोस. ॥ १४ ॥ महात्मनां साधूनां - महात्म्या सत्पुरुषांना - कः नु दुष्करः - कोणते बरे न करता येण्यासारखे आहे - वा दुस्त्यजः - किंवा न टाकता येण्यासारखे आहे - यैः सात्वतां ऋषभः भगवान हरिः संगृहीतः - ज्यांनी सत्पुरुषांत श्रेष्ठ असा भगवान श्रीविष्णु आपलासा करुन घेतला. ॥ १५ ॥ पुमान यन्नामश्रुतिमात्रेण निर्मलः भवति - पुरुष ज्याच्या नावाच्या केवळ श्रवणाने निष्पाप होतो - तीर्थपदः तस्य - पवित्र आहेत चरण ज्याचे अशा त्याच्या - दासानां किं वा (अप्राप्तं) अविशिष्यते - भक्तांना काय बरे न मिळालेले असे उरते. ॥ १६ ॥ राजन - हे राजा - अतिकरुणात्मना त्वया - अत्यंत दयाळू अशा तुझ्याकडून - अहं अनुगृहीतः - मी अनुग्रह केला गेलो - यत मदघं पृष्ठतः कृत्वा - ज्याअर्थी माझा अपराध पाठीकडे करुन - मे प्राणाः अभिरक्षिताः - माझे प्राण राखिले गेले. ॥ १७ ॥ (दुर्वाससः) प्रत्यागमनकांक्षया अकृताहारः राजा - दुर्वास परत येण्याची वाट पहाण्याने भोजन न केलेला अंबरीष राजा - चरणौ उपसंगृह्य - त्याचे दोन्ही पाय धरुन - (तं) प्रसाद्य समभोजयत - त्याला संतुष्ट करुन भोजन घालिता झाला. ॥ १८ ॥ आदृतं आनीतं आतिथ्यं सार्वकामिकं (अन्नं) अशित्वा - आदरपूर्वक आणिलेले असे अतिथिला योग्य आणि इच्छित पदार्थानी युक्त असे ते अन्न खाऊन - तृप्तात्मा सः सादरं भुज्यतां इति (तं) प्राह - तृप्त झालेला तो दुर्वास ‘तुम्ही भोजन करा’ असे त्या अंबरीष राजाला आदराने म्हणाला. ॥ १९ ॥ भागवतस्य तव दर्शनस्पर्शनालापैः आत्ममेधसा अतिथ्येन - भगवद्भक्त अशा तुझे दर्शन,सहवास व भाषण यांनी आणि आत्मरुपी बुद्धि जडविणार्या सत्काराने - वै प्रीतः अस्मि - खरोखर मी संतुष्ट झालो आहे - त्वया अनुगृहीतःअस्मि - तुझ्याकडून कृपा केला गेलो आहे. ॥ २० ॥ स्वः स्त्रियः एतत ते अवदातं कर्म मुहुः गायन्ति - अप्सरा या तुझ्या विशुद्ध कृत्याचे वारंवार गायन करतील - इयं च भूः (तव) -परमपुण्यां कीर्ति कीर्तयिष्यन्ति - आणि ही पृथ्वी तुझी अत्यंत पुण्यकारक कीर्ति वर्णील. ॥ २१ ॥ परितोषितःदुर्वासाः - संतुष्ट झालेल दुर्वास मुनि - राजानं एवं संकीर्त्य - अंबरीष राजाला याप्रमाणे सांगून - आमनत्र्य - त्याचा निरोप घेऊन - विहायसा अहैतुकं ब्रह्मलोकं ययौ - आकाश मार्गाने निष्काम कर्म करणार्यांना मिळणार्या ब्रह्मलोकाला गेला. ॥ २२ ॥ गतः मुनिः - गेलेला दुर्वास ऋषि - यावता न आगतः तावत संवत्सरः अत्यगात - जितका काळपर्यंत परत आला नव्हता तितक्या अवधीत एक वर्श लोटून गेले होते - तद्ददर्शनाकांक्षः राजा अब्भक्षः बभूव ह - त्याच्या भेटीची इच्छा करणारा अंबरीष राजा केवळ जल प्राशन करुन राहिला होता. ॥ २३ ॥ दुर्वाससि गते च - आणि दुर्वास गेला असता - सः अम्बरीषः - तो अंबरीष राजा - द्विजोपयोगातिपवित्रं (अन्नं) आहरत - ब्राह्मणाने सेविल्यामुळे अत्यंत पवित्र झालेले अन्न सेवन करिता झाला - ऋषेः विमोक्षं व्यसनं - मुनीची सुटका व त्यांचे संकट - बुदध्वा - जाणून - स्ववीर्यं परानुभावं मेने - आपले सामर्थ्य म्हणजे परमेश्वराचाच मोठा पराक्रम होय असे मानिता झाला. ॥ २४ ॥ एवं विधानेकगुणः सः राजा - ह्याप्रमाणे अनेक गुणांनी युक्त तो राजा - -परात्मनि ब्रह्मणि वासुदेवे - परमात्म्या ब्रह्मस्वरुपी वासुदेवाच्या ठिकाणी - -क्रियाकलापैः भक्तिं समुवाह - सर्व कर्मांचा समूह अर्पण करुन भक्ती करिता झाला - -यया आविरिंचान लोकान निरयान चकार - ज्या भक्तीने तो ब्रह्मलोकापासूनच्या सर्व लोकांना नरक समजता झाला. ॥ २५ ॥ अथ धीरः अम्बरीषः - नंतर धैर्यवान अंबरीष राजा - समानशीलेषु तनयेषु राज्यं विस्रुज्य - तुल्यस्वभावांच्या पुत्रांवर राज्यकारभार सोपवून - वनं विवेश - अरण्यात गेला - आत्मनि वासुदेवे मनः दधत - आत्मरुपी वासुदेवाच्या ठिकाणी मन ठेवणारा - ध्वस्तगुणप्रवाहः (बभूव) - नष्ट झाला आहे त्रिगुणांचा प्रवाह ज्याचा असा झाला. ॥ २६ ॥ अंबरीषस्य भूपतेः - अंबरीष राजाचे - -इति एतत पुण्यं आख्यानं - असे हे पवित्र चरित्र - -संकीर्तयन - गाणारा - अनुध्यायन - चिंतणारा - भगवतः भक्तः भवेत - भगवंताचा भक्त होईल. ॥ २७ ॥ नवमः स्कन्धः - अध्याय पाचवा समाप्त |