|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ७ वा - अन्वयार्थ
राजा त्रिशंकू आणि हरिश्चंद्राची कथा - मांधातुः पुत्रप्रवरः यः अंबरीषः प्रकीर्तितः - माघांत्याचा श्रेष्ठ पुत्र जो अंबरीष म्हणून सांगितला - (सः) पितामहेन (पुत्रत्वेन) प्रवृतः - तो आजोबाने मुलगा म्हणून निवडला - तत्सुतः यौवनाश्वः - त्याचा पुत्र यौवनाश्व - -तस्य हारीतः पुत्रः अभुत-- त्याला हारीत नावाचा पुत्र झाला - -इमे मांधातृप्रवराः (सन्ति) - हे सर्व मांधात्याच्या गोत्रातील श्रेष्ठ होत. ॥ १ ॥ उरगैः भ्रातृभिः या नर्मदा पुरुकुत्साय दत्ता - नागबंधूंनी जीआपली बहीण नर्मदा पुरुकुत्साला दिली - तया भुजगेन्द्रप्रयुक्तया (सः) रसातलंनीतः - तिच्याकडून सर्पराजाने प्रेरिल्यामुळे तो पाताळात नेला गेला . ॥ २ ॥ तत्रविष्णुशक्तिधृक (सः) - तेथे विष्णूच्या शक्तीने युक्त असा तो - वध्यान वै गन्धर्वानअवधीत - खरोखर मारण्यास योग्य अशा गंधर्वांना मारिता झाला - इदं स्मरतां सर्पातअभयं (भवेत) - हे स्मरण करणार्यांना सर्पापासून भय होणार नाही - (इति) (सः)नागात लब्धवरः (अभवत) - असा नागापासून त्याला वर मिळाला. ॥ ३ ॥ पौरुकुत्सः त्रसद्दस्युः - पुरुकुत्साचा पुत्र त्रसद्दस्यु - यः अनरण्यदेहकृत आसीत - जो अनरण्याच्या देहाला निर्माण करिता झाला - तत्सुतः हर्यश्वः - त्याचा पुत्र हर्यश्व - -तस्मात अरुणः - त्यापासून अरुण - -अथ त्रिबंधनः - नंतर त्रिबंधन. ॥ ४ ॥ तस्य त्रिशङ्कुः इति विश्रुतः सत्यव्रतः पुत्रः (आसीत) - - त्याला त्रिशंकु नावाने प्रसिद्धीला आलेला सत्यव्रत नामक पुत्र झाला - (सः) गुरोः शापात चाण्डालतां प्राप्तः (सन्) - तो गुरुच्या शापाने चांडाळाच्या स्थितीला पोचला असता - कौशिकतेजसा सशरीरंस्वर्गं गतः - विश्वामित्राच्या तपःसामर्थ्याने सदेह स्वर्गी गेला - दैवैः अवाक्शिराःपातितः - देवांकडून खाली डोके करुन पाडिला गेला - तेन एव बलात स्तंभितः-- त्या विश्वामित्रांकडूनच तपःसामर्थ्याने थांबवून धरिला गेला - (सः) अद्यापि दिविदृश्यते - तो अजूनहि आकाशात दिसतो. ॥ ५-६ ॥ त्रैश्रङ्कवः हरिश्चंद्रः - त्रिशंकुचा पुत्र हरिश्चंद्र - यन्निमित्तं पक्षिणोः विश्वामित्रवसिष्ठयोः - ज्यासाठी पक्ष्यांचे रुपघेतलेल्या विश्वामित्र व वसिष्ठ यांचे - -बहुवार्षिकं युद्धं अभूत - पुष्कळ वर्षे टिकणारे युद्ध झाले. ॥ ७ ॥ अनपत्यः विषण्णात्मा सः - निपुत्रिक व खिन्न अंतःकरण झालेला तो हरिश्चंद्र - -नारदस्य उपदेशतः वरुणं शरणं यातः - नारदाच्या सांगण्यावरुन वरुणाला शरण गेला - -प्रभो मे पुत्रः जायतां - हे वरुणा, मला पुत्र होवो. ॥ ८ ॥ महाराज - हेवरुणा - यदि वीरः (स्यात) - जर पराक्रमी पुत्र होईल - -(तर्हि) तेन एव त्वां यजे इति - तर त्यानेच तुझे यजन करीन - तथा वरुणेन (उक्तं) - बरे आहे असे वरुण म्हणाला - अस्य रोहितः पुत्रः जातः - ह्याला रोहित पुत्र झाला. ॥ ९ ॥ अंगसुतः हि जातः - हे हरिश्चंद्रा, तुला आता मुलगा झाला - -अनेन मां यजस्व - ह्याने माझे यजन कर - इति सः अब्रवीत - असे तो वरुण म्हणाला - -(हरिश्चंद्रः प्रत्यब्रवीत्) यदा पशुः निर्दशः स्यात् - हरिश्चंद्राने उत्तर दिले जेव्हा पशु दहा दिवस उलटून गेलेला होईल - अथ (सः) मेध्यः भवेत इति - तेव्हा तो यजन करण्यास योग्य होईल. ॥ १० ॥ निर्दशे आगत्य - दहा दिवस उलटून गेल्यावर येऊन - यजस्व इति (सः)आह - - यजन कर असे तो वरुण म्हणाला - -यत पशोः दन्ताः जायरेन - जेव्हा पशूलादात येतील - -अथ मेध्यः भवेत - तेव्हा तो यज्ञाला योग्य होईल - इति सः अब्रवीत-- असे तो हरिश्चंद्र म्हणाला. ॥ ११ ॥ दन्ताः जाताः - दात उत्पन्न झाले - यजस्व इतिसः प्रत्याह - यजन कर असे तो वरुण म्हणाला - अथसः अब्रवीत - तेव्हा तो हरिश्चंद्र म्हणाला - यदा अस्य दन्ताः पतन्ति - जेव्हा ह्याचे दात पडतील - अथ मेध्यः भवेत् इति - तेव्हा हा यज्ञाला योग्य होईल. ॥ १२ ॥ पशोः दन्ताः निपतिताः - पशूचे दातपडले - यजस्व इति (वरुणः) आह - यजन कर असे वरुण म्हणाला - -सःअब्रवीत - तो हरिश्चंद्र म्हणाला - यदा पशोः पुनः दन्ताः जायन्ते - जेव्हा पशूल पुनःदात उत्पन होतील - अथ पशुः शुचिः (भवति) - नंतर तो पशु शुद्ध होईल . ॥ १३ ॥ पुनः दताःजाताः - पुनःदात आले - (ततः) यजस्व इति स प्रत्याह - तेव्हा यजनकर असे तो वरुण म्हणाला - अथ सः अब्रवीत - मग तो हरिश्चंद्र म्हणाला - राजन- हे राजा वरुणा - राजन्यः पशुःयदा सान्नाहिकः (भवति) - राजकुळात उत्पन्न झालेला पशु जेव्हा चिलखत घालून युद्धाला योग्य होतो - अथ (सः) शुचिः(भवति) - - तेव्हा तो शुद्ध होतो. ॥ १४ ॥ इति- - याप्रमाणे - -पुत्रानुरागेण-- पुत्राच्या प्रेमामुळे - स्नेहयन्त्रितचेतसा तं तं कालं वज्चयता (राज्ञा) - प्रेमाने अंतःकरण बद्ध झाल्यामुळे ती ती वेळ टाळणार्या हरिश्चंद्र राजाने - उक्तःदेवःतं ऐक्षत- बोलला गेलेला वरुण देव त्या समयाची वाट पाहता झाला. ॥ १५ ॥ पितुः ततचिकीर्षितं कर्म अभिज्ञाय - बापाचे ते मनात योजिलेले कर्म जाणून - प्राणप्रेप्सुःरोहितः - प्राणरक्षणाची इच्छा करणारा रोहित - धनुष्पाणिः (भूत्वा) - हातात धनुष्य घेऊन - अरण्यं प्रत्यपद्यत - अरण्यात गेला. ॥ १६ ॥ वरुणग्रस्तं पितरं जातमहोदरंश्रुत्वा - वरुणाने ग्रासलेल्या पित्याला मोठे उदर झाले आहे असे ऐकुन - ग्रामम एयाय-- गावात येण्यास निघाला - इद्रं तं प्रत्यषेघत - इद्रं त्याचा निषेध करिता झाला. ॥ १७ ॥ तीर्थक्षेत्रनिषेवणैः पुण्यं भूमेः पर्यटनं शक्रः रोहिताय आदिसत - पवित्र स्थानाच्या दर्शनाने पुण्यकारक असे पृथ्वीपर्यटन कर असे इंद्र रोहिताला सांगता झाला - सः अपि अरण्ये समां अवसत - तो सुद्धा अरण्यात एक वर्ष राहिला. ॥ १८ ॥ एवं द्वितीयेतृतीये चतुर्थे तथा पज्चमे - याप्रमाणे दुसर्या, तिसर्या, चवथ्या तशाच पाचव्या वर्षी - वृत्रहा स्थविरः विप्रः भूत्वा - इंद्र वृद्ध ब्राह्मणाचे रुप घेऊन - अभ्येत्य अभ्येत्य आह - पुनः पुनः येऊन म्हणाला. ॥ १९ ॥ तत्र षष्ठं संवत्सरं चरित्वा पुरीं उपवज्रनरोहितः - तेथे सहाव्या वर्षी हिंडून नगरीला येणारा रोहित - अजीगर्तात मध्यमं सुतं अक्रीणात - अजीगर्तापासून मधला पुत्र विकत घेता झाला. ॥ २० ॥ शुनःशेपं पशुंपित्रे प्रदाय - शुनःशेपाला पशु म्हणून पित्याला देऊन - समवंदत - नमस्कार करिता झाला - ततः महायशाः हरिश्चंद्रः पुरुषमेघेन वरुणादीन देवान अयजत - नंतरहरिश्चंद्र नरयज्ञविधीने वरुणादि देवांची पूजा करिता झाला - (ततः च सः) मुक्तोदरः महत्कथः अभवत - आणि तेव्हापासून तो उदरव्यवस्थेपासून मुक्त होऊन मोठा किर्तीमान झाला - विश्वामित्रः तस्मिन होता अभवत - विश्वामित्र त्या यज्ञातील होता नावाचा ऋत्विज झाला - आत्मवान जमदग्निः च अध्वर्युः अभूत - आणि आत्मज्ञानी जमदग्नि अध्वर्यु झाला - वसिष्ठः ब्रह्मा (अभवत्) अयास्यः सामगः (अभवत्) - वसिष्ठ ब्रह्मा व अयास्य मुनि सम गाणारा उदगाता झाला - -इंद्रः तुष्टः (सन) तस्मै शातकौम्भमयं रथं ददौ - इंद्राने संतुष्ट होऊन त्या हरिश्चंद्राला सुवर्णाचा रथ दिला. ॥ २१-२२-२३ ॥ शुनःशेपस्य माहात्म्यं उपरिष्टात प्रचक्ष्यते - शुनःशेपाचे माहात्म्य पुढे सांगितले जाईल - -सभार्यस्य भूपतेः सत्यसारां धृतिं दृष्ट्वा भृशं प्रीतःविश्वामित्रः (तस्मै) अविहतांगतिं ददौ - सपत्नीक अशा राजा हरिश्चंद्राच्या खर्या धैर्याला पाहून अगदी संतुष्ट झालेला विश्वामित्र त्याला अविनाशी गती देता झाला - मनःपृथ्विव्यां - मन पृथ्वीचे ठिकाणी - -तां अद्भिः - त्या पृथ्वीला पाण्यानी - आपः तेजसा - पाणी तेजाने - -ततअनिलेन - ते तेज वायूने - -वायुं खे - वायूला आकाशात - -तत भूतादौ - तेआकाश भूतादिकांत - तं महात्मनि - त्या भूतादिकाला महत्तत्वामध्ये - -तस्मिनज्ञानकलां ध्यात्वा - त्या महत्तत्वामध्ये ज्ञानकलेचे ध्यान करुन - तयां अज्ञानंविनिर्दहन (सः) - त्या ज्ञानकलेने अज्ञान जाळून टाकणारा तो हरिश्चंद्र - -निर्वाण्सुखसंविदा तां हित्वा - मोक्षसुखाच्या साक्षात्काराने त्या ज्ञानकलेलाहि सोडून - -विध्वस्तबन्धनः - सर्व बंधनापासून मुक्त होऊन - अनिर्देश्याप्रतर्क्येण स्वेन भावेनतस्थौ - दाखविता न येणार्या व कल्पना करता न येणार्या अशा स्वस्वरुपी स्थिर झाला. ॥ २४-२७ ॥ नवमः स्कन्धः - अध्याय सातवा समाप्त |