|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय २४ वा - अन्वयार्थ
मत्स्यावताराची कथा - भगवन् - हे शुकाचार्य- अद्भुतकर्मणः हरेः - आश्चर्यकारक कर्म करणार्या विष्णूच्या- मायामत्स्यविडम्बनं - मायेच्या योगे मत्स्यरूप धारण - (यस्यां तां) आद्यां अवतारकथां - केल्याचे वृत्त ज्यात आहे असे श्रेष्ठ अवतारचरित्र- श्रोतुं इच्छामि - मी ऐकण्याची इच्छा करितो. ॥१॥ ईश्वरः - विष्णु- कर्मग्रस्तः इव - कर्मांनी ग्रासिलेल्या जीवाप्रमाणे- लोकजुगुप्सितं तमः प्रकृति - लोकांत निंद्य मानिलेले तमोगुणी - दुर्मर्षं मात्स्यं रूपं - आणि दुःसह असे माशाचे स्वरूप- यदर्थं अघात् - ज्याकरिता धारण करिता झाला. ॥२॥ भगवन् - हे शुकाचार्य- एतत् सर्वं - हे सगळे- सर्वलोकसुखावहं - सर्व लोकांना सुख देणारे - उत्तमश्लोकचरितं - भगवंताचे चरित्र- नः यथावत् - आम्हाला जसेच्या तसे - वक्तुं अर्हसि - सांगण्याला तू योग्य आहेस. ॥३॥ विष्णुरातेन इति उक्तः - परीक्षित राजाने याप्रमाणे प्रार्थिलेला - भगवान् बादरायणिः - सर्वगुणसंपन्न व्यासपुत्र शुकाचार्य- मत्स्यरूपेण यत् कृतं - माशाचे रूप घेऊन - (तत्) विष्णोः चरितं उवाच - विष्णूने जे केले ते विष्णुचे चरित्र सांगता झाला. ॥४॥ ईश्वरः - परमेश्वर- गोविप्रसुरसाधूनां छंदसां च अपि - गाई, ब्राह्मण, देव, साधु आणि वेद यांचेही- धर्मस्य अर्थस्य च एव - धर्म आणि अर्थ यांचेही - रक्षाम् इच्छन् - रक्षण करण्याची इच्छा करणारा- तनूः हि धत्ते - शरीरे खरोखर धारण करितो. ॥५॥ ईश्वरः वायुः इव - परमेश्वर वायूप्रमाणे - धियः गुणैः - बुद्धीच्या गुणांनी - उच्चावचेषु भूतेषु - लहान-मोठया प्राण्यांच्या ठिकाणी - चरन् (अपि) - संचार करीत असताही- निर्गुणत्वात् - निर्गुण असल्यामुळे - (स्वयं) उच्चावचत्वं न भजते - लहान-मोठेपणा स्वतः स्वीकारीत नाही. ॥६॥ नृप - हे राजा- अतीतकल्पान्ते - गेल्या कल्पाच्या शेवटी - ब्राह्मः नैमित्तिकः - ब्रह्मदेवाची रात्र आली असता - लयः आसीत् - त्या कारणास्तव प्रलय झाला- तत्र भूरादयः लोकाः - त्या प्रलयात पृथ्वी आदी करून सर्व लोक - समुद्रोपप्लुताः (आसन्) - समुद्रात बुडून गेले. ॥७॥ बली हयग्रीवः - बलिष्ठ हयग्रीव- कालेन आगतनिद्रस्य - योग्यकाळी निद्रित झालेल्या - शिशयिषोः धातुः मुखतः - व झोप घेउ इच्छिणार्या ब्रह्मदेवाच्या मुखातून- अन्तिके निसृतान् - जवळ बाहेर पडलेले - वेदान् अहरत् - वेद हरण करिता झाला. ॥८॥ भगवान् हरिः ईश्वरः - षड्गुणैश्वर्यसंपन्न परमेश्वर विष्णु- दानवेन्द्रस्य - दानवाधिपति - हयग्रीवस्य तत् चेष्टितं ज्ञात्वा - हयग्रीवाचे ते कृत्य जाणून- शफरीरूपं दधार - माशाचे रूप धरिता झाला. ॥९॥ तत्र - तेथे- नाम्ना सत्यव्रतः - सत्यव्रत नावाचा- नारायणपरः कश्चित् - भगवंताची भक्ति करणारा - महान् राजऋषिः - कोणी महात्मा राजर्षि- सः सलिलाशनः - केवळ उदक प्राशन करून - तपः अतप्यत् - तो तप करिता झाला. ॥१०॥ यः असौ (राजर्षिः) - हा जो राजर्षि होता- सः - तो- अस्मिन् महाकल्पे - ह्या चालू मोठया कल्पात - श्राद्धदेव इति ख्यातः - श्राद्धदेव या नावाने प्रसिद्ध असा- विवस्वतः तनयः (भूत्वा) - सूर्याचा पुत्र होऊन- हरिणा - परमेश्वराकडून - मनुत्वे अर्पितः - मनूच्या अधिकारावर योजिला गेला. ॥११॥ एकदा कृतमालायां - एके दिवशी कृतमालानामक नदीच्या तीरी - जलतर्पणं कुर्वतः - तर्पण करणार्या - तस्य अञ्जल्युदके - सत्यव्रताच्या ओंजळीतील पाण्यात- काचित् एका शफरी अभ्यपद्यत - कोणी एक शफरी जातीचा मासा आला. ॥१२॥ भारत - हे परीक्षित राजा- द्रविडेश्वरः सत्यव्रतः - द्रविड देशाचा अधिपति सत्यव्रत- तोयेनसह अञ्जलिगतां शफरीं - पाण्याबरोबर ओंजळीत आलेल्या शफरीला- नदीतोये उत्ससर्ज - नदीच्या पाण्यात टाकिता झाला. ॥१३॥ सा महाकारुणिकं - ती शफरी अत्यंत दयाळू अशा - तं नृपं अतिकरुणं आह - त्या राजाला करुणस्वराने म्हणाली- दीनवत्सल राजन् - दीनांवर प्रेम करणार्या हे सत्यव्रत राजा- ज्ञातिघातिभ्यः - जातभाईंना मारणार्या - यादोभ्यः भीतां दीनां मां - जलचरांपासून भ्यालेल्या दीन अशा मला- अस्मिन् सरेज्जले - ह्या नदीच्या उदकात - कथं विसृजसे - कसे टाकितोस ? ॥१४॥ आत्मनः अनुग्रहार्थ - आपल्यावर कृपा करण्याकरिता - प्रीत्या मत्स्यवपुर्धरं - प्रेमाने मत्स्यरूप धारण करणार्या - तं अजानन् सः - त्याला न जाणणारा तो- शफर्याः - त्या शफरीच्या - रक्षणार्थाय मनः दधे - रक्षणासाठी निश्चय करिता झाला. ॥१५॥ सः दयालुः महीपतिः - तो दयाळू राजा- तस्याः दीनतरं वाक्यम् आश्रुत्य - तिचे अत्यंत दीन भाषण ऐकून- एनां कलशाप्सुनिधाय - त्याला कमंडलूतील उदकात ठेवून- आश्रमं निन्ये - आश्रमाला नेता झाला. ॥१६॥ सा तु - ती शफरी तर- तत्र कमण्डलौ - त्या कमंडलूमध्ये- एकरात्रेण वर्धमाना - एका रात्रीत वाढणारी अशी- आत्मावकाशं अलब्ध्वा - स्वतःला जागा न मिळाल्यामुळे- महीपतिं इदं वै आह - राजाला हे खरोखर म्हणाली. ॥१७॥ अहं इह अस्मिन् कमण्डलौ - मी येथे ह्या कमंडलूत - कृच्छ्रं वस्तुं न उत्सहे - संकटाने राहण्यास इच्छित नाही - सुविपुलं ओकः कल्पय - अत्यंत विस्तीर्ण असे स्थान तयार कर- यत्र अहं सुखं निवसे - जेथे मी सुखाने राहीन. ॥१८॥ सः एनां ततः आदाय - तो राजा त्याला त्या कमंडलूतून काढून - औदंचनोदके न्यधात् - रांजणांतील पाण्यात ठेविता झाला- तत्र क्षिप्ता (सा) - त्यात ठेविलेली ती- मुहूर्तेन हस्तत्रयं अवर्धत - दोन घटकांत तीन हात वाढली. ॥१९॥ राजन् - हे राजा- एतत् उदञ्चनं - हा पाण्याचा रांजण- मे सुखं वस्तुं न अलं - मला सुखाने राहण्यास पुरेसा नाही- मह्यं पृथू पदं देहि - मला विस्तीर्ण स्थान दे- यत् अहं त्वा शरणं गता - कारण मी तुला शरण आले आहे. ॥२०॥ राजन् - हे परीक्षित राजा- राज्ञा ततः आदाय - राजाकडून तेथून काढून - सा सरोवरे क्षिप्ता - ती एका तलावात सोडिली गेली- सः अयं महामीनः - तो हा मोठा मासा- आत्मना तत् आवृत्य - आपल्या शरीराने त्या तलावात व्यापून- अन्ववर्धत - वाढू लागला. ॥२१॥ राजन् - हे राजा- सलीलौकसः मे - पाण्यात राहणार्या मला - एतत् उदकं स्वस्तये न (भवति) - हे उदक सुख देण्यास समर्थ नाही- अविदासिनि ह्लदे - पाणी कधी न आटणार्या डोहात - रक्षायोगेन मां निघेहि - रक्षणास उपाय करून मला ठेव. ॥२२॥ इति उक्तः सः - याप्रमाणे प्रार्थिलेला तो- मत्स्यं तत्र तत्र - माशाला एका मागून एक त्या त्या - अविदासिनि जलाशये अनयत् - न आटणार्या सरोवरात नेता झाला- संमितं तं झषं - त्या सरोवराएवढया वाढलेल्या त्या माशाला - समुद्रे प्राक्षिपत् - समुद्रात टाकिता झाला. ॥२३॥ क्षिप्यमाणः - समुद्रात टाकिला जाणारा - तं इदं आह - तो मासा त्या राजाला हे म्हणाला- वीर - हे पराक्रमी राजा- इह अतिबलाः - येथे अतिबलाढय - मकरादयः - सुसरी आदिकरून प्राणी - मां अदन्ति - मला खातात- इह मां उत्स्रष्टुं - येथे मला सोडणे - न अर्हसि - तुला योग्य नाही. ॥२४॥ एवं वल्गुभारतीं वदता - याप्रमाणे मधुर भाषण करणार्या - तेन विमोहितः (सः) - त्या माशाने मोहित केलेला तो- तं आह - त्या माशाला म्हणाला- मत्स्यरूपेण - माशाच्या रूपाने - अस्मान् मोहयन् - आम्हाला मोहित करणारे - भवान् कः - आपण कोण आहात ? ॥२५॥ अस्माभिः एवं वीर्यः - आम्ही अशाप्रकारचा पराक्रमी - जलचरः न दृष्टः - जलचर प्राणी पाहिला नाही- वा श्रुतः अपि (न) - किंवा ऐकिलाहि नाही- यः भवान् अह्ना - जो तू एका दिवसांत - योजनशतं - शंभर योजने विस्ताराचे - सरः अभिव्यानशे - सरोवर व्यापिता झालास. ॥२६॥ नूनं त्वं साक्षात् - खरोखर तू प्रत्यक्ष - भगवान् अव्ययः - षड्गुणैश्वर्यसंपन्न अविनाशी - नारायणः हरिः (असि) - जलशायी विष्णु आहेस- भूतानां अनुग्रहाय - प्राण्यांवर कृपा करण्याकरिता - जलौकसां रूपं धत्से - जलचराचे स्वरूप धरिले आहेस. ॥२७॥ पुरुषश्रेष्ठ - हे महापुरुषा- स्थित्युत्पत्त्यप्ययेश्वर - रक्षण, उत्पत्ति व संहार यांच्या नियंत्या- ते नमः - तुला नमस्कार असो- हि - खरोखर- विभो - हे परमेश्वरा- प्रसन्नानां भक्तानां नः - शरणागत भक्त अशा आमचा- (त्वं) मुख्यः आत्मगतिः (असि) - तू खरा अंतर्यामी व आश्रय आहेस. ॥२८॥ ते सर्वे लीलावताराः - लीलेने घेतलेले तुझे सर्व अवतार- भूतानां भूतिहेतवः (सन्ति) - प्राणिमात्रांच्या ऐश्वर्याला कारण होत- भवताः अदः रूपं यदर्थं धृतं - आपण हे स्वरूप ज्याकरिता धारण केले- (तत्) ज्ञातुम् इच्छामि - ते जाणण्यास मी इच्छितो. ॥२९॥ अरविंदाक्ष - हे कमलनेत्रा- सर्वसुहृत्प्रियात्मनः - सर्व प्राण्यांचा हितकर्ता व प्रिय आत्मा अशा - तेः पदोपसर्पणं - तुझ्या चरणाजवळ येणे- मृषा न भवेत् - फुकट जाणार नाही- यथा - जसे- इतरेषां पृथगात्मनां - जसे इतर देहाभिमान धरणार्यांच्या - सतां (भवति) - पायांजवळ जाणे व्यर्थ होते- यत् नः अद्भुतं - कारण तू खरोखर आम्हाला हे आश्चर्यजनक - वपुः हि अदीदृशः - स्वरूप दाखविलेस. ॥३०॥ इति ब्रुवाणं सत्यव्रतं नृपतिं - असे बोलणार्या सत्यव्रत राजाला- एकांतजनप्रियः - प्रिय आहेत एकनिष्ठ भक्त ज्याला असा- युगक्षये प्रलयार्णवे - प्रलयकाळी प्रलयसमुद्रात - विहर्तुकामः - विहार करण्याची इच्छा करणारा- मत्स्यवपुः जगत्पतिः - माशाचे शरीर धारण केलेला विष्णु- प्रियं चिकीर्षुः - प्रिय करण्याची इच्छा करणारा- अब्रवीत् - म्हणाला. ॥३१॥ अरिंदम - हे शत्रूदमना- अद्यतनात् उर्ध्व सप्तमे अहनि - आजपासून पुढे सातव्या दिवशी- अप्ययाम्भोधौ - प्रलयसमुद्रात - भूर्भुवादिकं एतत् - भूर्लोक, भुवर्लोक व स्वर्ग असे हे - त्रैलोक्यं निमंक्ष्यन्ति - त्रैलोक्य बुडून जाईल. ॥३२॥ वै संवर्ताम्भसि - खरोखर प्रलयोदकांत - त्रिलोक्यां लीयमानायां - त्रैलोक्य लीन होत असता- तदा मया ईरिता - त्यावेळी मी प्रेरिलेली - काचित् विशाला नौः - एक मोठी नौका- त्वाम् उपस्थास्यति - तुझ्याजवळ येईल. ॥३३॥ त्वं तावत् सर्वाः ओषधीः - तू तितक्यामध्ये सर्व औषधी- उच्चावचानि बीजानि च (आदाय) - आणि लहान-मोठी बीजे घेऊन- सप्तर्षिभिः परिवृतः - सप्तर्षींसह- सर्वसत्वोपबृंहितः - सर्व प्राण्यांनी वृद्धिंगत झालेला- बृहतीं नावम् आरुह्य - मोठया नौकेवर चढून- अविक्लवः - निर्भय असा- निरालोके - प्रकाशरहित अशा - एकार्णवे - एकच एक झालेल्या समुद्रामध्ये- ऋषीणाम् एव वर्चसा विचरिष्यसि - ऋषींच्याच तेजाने संचार करशील- बलीयसा समीरेण - मोठया वादळाने - दोधूयमानां तां नावं - हलणार्या त्या नौकेला- उपस्थितस्य मे शृङगे - जवळ आलेल्या माझ्या शिंगाला- महाहिना - मोठया सर्पाने- निबध्नीहि - बांध. ॥३४-३६॥ प्रभो - हे राजा- अहं ऋषिभिः साकं - मी ऋषींसह नौकेत - सहनावं त्वां - बसलेल्या तुला- उदन्वति विकर्षन् - समुद्रात ओढून- यावत् ब्राह्मी निशा (वर्तते तावत्) - जोपर्यंत ब्रह्मदेवाची रात्र असेल तोपर्यंत - विचरिष्यामि - संचार करीन. ॥३७॥ च मे अनुगृहीतं - आणि मी कृपा करून दिलेले- संप्रश्नैः हृदि विवृतं - केलेल्या प्रश्नामुळे मी तुला हृदयात प्रकाशित केलेले- परं ब्रह्म इति शब्दितं - परब्रह्म या नावाने प्रसिद्ध असे- मदीयं महिमानं वेत्स्यसि - माझे माहात्म्य जाणशील. ॥३८॥ हरिः राजानं इत्थं आदिश्य - श्रीविष्णू सत्यव्रत राजाला याप्रमाणे सांगून- अन्तरधीयत - गुप्त झाला- हृषीकेशः यं आदिशत् - विष्णूने जो सांगितला - तं कालं सः अन्ववैक्षत - त्या काळाची वाट पाहात बसला. ॥३९॥ राजर्षिः - सत्यव्रत राजा- प्राक्कूलान् दर्भान् आस्तीर्य - पूर्व दिशेकडे अग्रे केलेले दर्भ पसरून- मत्स्यरूपिणः - मत्स्यस्वरूपी - हरेः पादौ चिन्तयन् - विष्णुच्या पायांचे चिंतन करीत- प्रागुदङ्मुखः निषसाद - ईशान्य दिशेकडे तोंड करून बसला. ॥४०॥ ततः वर्षद्भिः - नंतर पाऊस पाडणार्या - महामेघैः वर्धमानः - मोठया मेघांमुळे वाढलेला- उद्वेलः समुद्रः - मर्यादा सोडून गेलेला समुद्र- सर्वतः महीं - सर्व ठिकाणी पृथ्वीला - प्लावयन् समदृश्यत - बुडवून टाकणारा असा दिसला. ॥४१॥ भगवदादेशं ध्यायन् - श्रीविष्णूच्या आज्ञेचे चिंतन करणारा सत्यव्रत- आगतां नावं ददृशे - आलेल्या नौकेला पाहता झाला- ओषधिवीरुधः आदाय - औषधी व वेली घेऊन- विप्रेन्द्रैः तां आरुरोह - श्रेष्ठ ब्राह्मणांसह त्या नौकेवर चढला. ॥४२॥ प्रीताः मुनयः तं ऊचुः - प्रसन्न झालेले ऋषी त्याला म्हणाले- राजन् - हे राजा- केशवं ध्यायस्व - श्रीविष्णूचे चिंतन कर- सः वै नः अस्मात् - तोच खरोखर आम्हाला - संकटात् अविता - या संकटांतून रक्षील- शं विधास्यति - कल्याण करील. ॥४३॥ ततः राज्ञा अनुध्यातः - नंतर राजाने ध्यायिलेला- सः नियुतयोजनः - तो दहा लक्ष योजने विस्तृत असा - एकशृङगधरः हैमः मत्स्यः - एक शिंगाचा सुवर्णाचा मासा - महर्णवे प्रादुरासीत् - मोठया समुद्रात प्रकट झाला. ॥४४॥ पुरा यथा हरिणा उक्तः - पूर्वी जसे विष्णूकडून उपदेशिला गेला- (तथा) अहिना वरत्रेण - त्याप्रमाणे सर्परूपी दोरखंडाने - तच्छृङगे नावं निवध्य - त्या माशाच्या शिंगाला नौका बांधून- तृष्टः मधुसूदनं तुष्टाव - स्वतः संतुष्ट झालेला श्रीविष्णूला स्तविता झाला. ॥४५॥ अनाद्यविद्योपहतात्मसंविदः - अनादि अज्ञानाने आत्मविषयक ज्ञान आच्छादून गेले आहे ज्याचे असे- तन्मूलसंसारोपरिश्रमतुराः - अज्ञानमूलक जो संसार त्याविषयीच्या श्रमाने पीडिलेले- इह यदृच्छया उपसृताः - ह्या संसारात ज्याच्या कृपेने आश्रय केलेले- यं आप्नुयुः - ज्याला मिळवितात- सः भवान् नः परमः - तो तू आमचा श्रेष्ठ - विमुक्तिदः गुरुः (असि) - मुक्तिदाता गुरु आहेस. ॥४६॥ निजकर्मबन्धनः - आपल्या कर्मांनी बांधून गेलेला - सः अयं अबुधः जनः - हा अज्ञ समाज- सुखेच्छया - सुखाच्या इच्छेने - असुखं कर्म समीहते - दुःखकारक कर्म करितो- पुमान् यत्सेवया - पुरुष ज्याच्या सेवेने - तां असन्मतिं विधुनोति - त्या दुष्ट बुद्धीला सोडितो- सः गुरुः नः - तो गुरु परमेश्वर आमची - हृदयग्रन्थिं भिन्द्यात् - हृदयरूपी गाठ तोडून टाको. ॥४७॥ अग्नेः रुद्ररोदनं इव - अग्नीच्यायोगे जसे सोने रूपे मळ टाकते तसा- पुमान् यत्सेवया - पुरुष ज्याच्या सेवेने - आत्मनः मलं विजह्यात् - आत्म्यावरील अज्ञानरुपी मळ टाकतो- निजवर्णं (च) भजेत - व स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त होतो- सः एषः अव्ययः ईशः - तो हा अविनाशी परमेश्वर - नः (गुरुः) भूतात् - आमचा गुरु होवो- (यतः) सः परमः गुरोः गुरुः (अस्ति) - ज्याअर्थी तो श्रेष्ठ गुरूचा गुरू होय. ॥४८॥ अन्ये देवाः गुरवः जनाः च - दुसरे देव, गुरू व लोक- समेताः - एकत्र जमलेले- स्वयं पुंसः - स्वतः पुरुषावर - यत्प्रसादायुतभागलेशं - ज्या तुझ्या प्रसादाच्या दहा हजाराव्या लेशाइतकाही - कर्तुं न प्रभवन्ति - अनुग्रह करण्यास समर्थ नाहीत- तं ईश्वरं त्वां शरणं प्रपद्ये - त्या तुला ईश्वराला मी शरण आलो आहे. ॥४९॥ अचक्षु यथा - नेत्रहीन पुरुष जसा - अन्धस्य अग्रणीः कृतः - आंधळ्याचा पुढारी करावा- तथा अविदुषः जनस्य अबुधः गुरुः - तसा अज्ञानी पुरुषाचा अज्ञानी गुरु होय- अर्कदृक् सर्वद्दशां - सूर्य हीच ज्याची दृष्टि आहे असा - समीक्षणः त्वं - व सर्व इंद्रियांचा प्रकाशक असा तू- स्वगतिं बुभुत्सतां - आत्मगति जाणण्याची इच्छा करणार्या - नः गुरुः वृतः (असि) - आमचा गुरु वरिला गेला आहेस. ॥५०॥ जनः जनस्य - लोक मनुष्याला - असतीं मतिं आदिशते - वाईट बुद्धि शिकवितो- यया दुरत्ययं - ज्यायोगे सुटून जाण्यास कठीण अशा - तमः प्रपद्येत - संसारांधकारात तो पडतो- त्वं तु अव्ययं - तू तर अविनाशी - अमोघं ज्ञानं (आदिशसि) - व खरे ज्ञान शिकवितोस- येन जनः निजं पदं - ज्यायोगे लोक आपल्या स्वरूपाला - अञ्जसा प्रपद्येत - तत्काळ प्राप्त होतो. ॥५१॥ त्वं सर्वलोकस्य सुहृत् (असि) - तू सर्व लोकांचा मित्र आहेस- (त्वं) प्रियेश्वरः - तू प्रिय करणारा स्वामी, - आत्मा गुरुः - आत्मा, गुरु, - ज्ञानं अभीष्टसिद्धिः (असि) - ज्ञान व इष्टसिद्धी देणारा आहेस- तथा अपि अंघधीः - तरी सुद्धा अंध बुद्धीचा - बद्धकामः लोकः हृदि सन्तं - कामी पुरुष हृदयात असणार्या - भवन्तं न जानाति - तुला जाणत नाही. ॥५२॥ अहं तं देववरं - मी त्या देवश्रेष्ठ - वरेण्यं ईशं त्वां - व सर्वोत्कृष्ट अशा सर्वैश्वर्यसंपन्न तुला - प्रतिबोधनाय प्रपद्ये - ज्ञानप्राप्तीकरिता शरण आलो आहे- भगवन् - हे ईश्वरा- अर्थदीपैः वचोभिः - अर्थाचे स्पष्टीकरण करणार्या भाषणांनी - हृदय्यान् ग्रन्थीन् छिन्धि - हृदयातील वासनारूप ग्रंथी तोडून टाक- स्वं ओकः विवृणु - आपले स्वरूप प्रगट कर. ॥५३॥ मत्स्यरूपी - माशाचे रूप घेतलेला - भगवान् आदिपुरुषः - सर्वैश्वर्यसंपन्न पुराणपुरुष विष्णु- महाम्भोधौ विहरन् - महासागरात खेळणारा असा- इति उक्तवन्तं नृपतिं - याप्रमाणे बोलणार्या सत्यव्रतराजाला- तत्त्वं अब्रवीत् - तत्त्वज्ञान सांगता झाला. ॥५४॥ सत्यव्रतस्य राजर्षेः - सत्यव्रतनामक राजर्षीला- साङ्ख्ययोगक्रियावतीं - सांख्य व योग ह्यांची कर्मे उपदेशिणारी - दिव्यां पुराणसंहितां - दिव्य पुराणसंहिता- अशेषतः - संपूर्ण गुप्त - आत्मगुह्यं च (आह) - आत्मज्ञान सांगता झाला. ॥५५॥ ऋषिभिः साकं - ऋषींसह- नावि आसीनः - नौकेत बसलेला सत्यव्रत- भगवता प्रोक्तं - भगवंताने सांगितलेले - असंशयं आत्मतत्त्वं - संशयरहित असे आत्मज्ञान- सनातनं ब्रह्म च - आणि अनादि ब्रह्मविषयक ज्ञान- अश्रौषीत् - श्रवण करिता झाला. ॥५६॥ सः हरिः - तो विष्णु- अतीतप्रलयापाये - गेल्या प्रलयाच्या शेवटी- उत्थिताय सवेधसे - जागा झालेल्या ब्रह्मदेवाला- हयग्रीवं असुरं हत्वा - हयग्रीव नामक दैत्याला मारून- वेदान् प्रत्याहरत् - वेद परत देता झाला. ॥५७॥ ज्ञानविज्ञानसंयुतः - ज्ञान व विज्ञान ह्यांनी युक्त - सः सयव्रतः राजा तु - तो सत्यव्रत राजा तर- विष्णोः प्रसादात् - विष्णूच्या प्रसादामुळे- अस्मिन् कल्पे - ह्या मात्स्यनामक कल्पामध्ये- वैवस्वतः मनुः आसीत् - वैवस्वत नावाचा मनु झाला. ॥५८॥ सत्यव्रतस्य राजर्षेः - सत्यव्रत राजर्षि - मायामत्स्यस्य - आणि मायेने मत्स्यावतार घेतलेला - शार्ङगिणः च संवादं - विष्णु यांमधील भाषण ज्यात आहे असे- महत् आख्यानं श्रुत्वा - मोठे चरित्र श्रवण करून- (नरः) किल्बिषात् मुच्येत - मनुष्य पापापासून मुक्त होईल. ॥५९॥ हरेः यः अयं अवतारः (तं) - विष्णुचा जो हा अवतार त्याला- (यः) नरः अन्वहं कीर्तयेत - जो मनुष्य रोज वर्णील- तस्य संकल्पाः सिद्ध्यन्ति - त्याचे संकल्प सिद्धीला जातील- सः परमां गतिं याति - तो श्रेष्ठ गतीला प्राप्त होईल. ॥६०॥ यः - जो- प्रलयपयसि सुप्तशक्तेः - प्रलयोदकामध्ये निजली आहे शक्ति ज्याची अशा - धातुः मुखेभ्य अपनीतं श्रुतिगणं - ब्रह्मदेवाच्या मुखांतून पळविलेले वेद- दितिजं हत्वा प्रत्युपादत्त - दैत्याला मारून परत आणिता झाला- सत्यव्रतानां (चं) ब्रह्म अकथयत् - आणि सत्यव्रतादिकांना ब्रह्मोपदेश करिता झाला- तं अखिलहेतुं - त्या सर्व जगाला कारणीभूत अशा - जिह्ममीनं - मायेने मत्स्यरूप घेणार्या - अहं नतः अस्मि - विष्णुला मी नमस्कार करितो. ॥६१॥ अष्टमः स्कन्धः - अध्याय चोविसावा समाप्त |