श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय २३ वा - अन्वयार्थ

बलीचे बंधनातून सुटून सुतल लोकात जाणे -

महानुभावः - मोठया योग्यतेचा - अखिलसाधुसंमतः - व सर्व सज्जनांना मान्य असा बलिराजा- बाष्पकुलाकुलेक्षणः - अश्रुबिंदूंनी नेत्र भरून गेले आहेत ज्याचे असा- बद्धांजलिः - हात जोडलेला- इति उक्तवन्तं पुरातनं पुरुषं - अशा रीतीने बोलणार्‍या पुराणपुरुष विष्णूला- भक्त्युग्दलः - भक्तीमुळे कंठ दाटून आला आहे ज्याचा असा- गग्ददया गिरा अब्रवीत् - अडखळणार्‍या शब्दांनी बोलला. ॥१॥

अहो प्रणामाय कृतः समुद्यमः - अहो नमस्कारासाठी केलेला प्रयत्न- प्रसन्नभक्तार्थविधौ समाहितः - शरणागत भक्तांचे कार्य साधण्याकरिता योजिला गेला- यत् - कारण- लोकपालैः अमरैः - लोकपाल देवांनी - अलब्धपूर्वः त्वदनुग्रहः - पूर्वी न मिळविलेली अशी तुझी कृपा- अपसदे असुरे - मी जो नीच दैत्य - (मयि) अर्पितः - त्याला दाखविली गेली. ॥२॥

मुक्तः - पाशातून सुटलेला - प्रीतः बलिः - व प्रसन्न अंतःकरण झालेला बलिराजा- इति उक्त्वा - याप्रमाणे बोलून- हरि सभवं - विष्णू व शंकर यांसह - ब्रह्माणं (च) आनम्य - ब्रह्मदेव यांना नमस्कार करून- ततः असुरैः सह - नंतर दैत्यांसह- सुतलं विवेश - सुतलामध्ये शिरला. ॥३॥

भगवान् - परमेश्वर- एवं इंद्राय - याप्रमाणे इंद्राला - त्रिविष्टपं प्रत्यानीय - स्वर्गाचे राज्य परत मिळवून देऊन- अदितेः कामं पूरयित्वा - अदितीची इच्छा पूर्ण करून- जगत् अशासत् - संपूर्ण जगाचे रक्षण करिता झाला. ॥४॥

भक्तिप्रवणः प्रह्लादः - भक्तीने नम्र झालेला प्रल्हाद- लब्धप्रसादं - प्रसाद मिळविलेल्या - वंशधरं पौत्रं बलिं - व वंशाला धारण करणार्‍या नातू बलिराजाला- निर्मुक्तं निशाम्य - वरुणपाशांतून मुक्त झालेला पाहून- इदम् अब्रवीत् - हे म्हणाला. ॥५॥

विरिञ्चः - ब्रह्मदेव- इमं ते प्रसादं न लभते - तुझा हा प्रसाद मिळवीत नाही- श्रीः न शर्वः न - लक्ष्मी व शंकर मिळवीत नाहीत, - किमतु अपरे - मग दुसर्‍यांची कथा काय- यत् - जो- विश्वाभिवंद्यैः अपि - जगाला वंदनीय अशा सत्पुरुषांनीही - वन्दिताङ्‌घ्रि (त्वं) - ज्याचे चरणकमल वंदिले आहेत असा तू- असुराणां नः - आम्हा दैत्यांचा- दुर्गपालः - दुर्गसंरक्षक- असि - झाला आहेस. ॥६॥

शरणद - हे शरणागताला आश्रय देणार्‍या ईश्वरा- ब्रह्मादयः - ब्रह्मादिदेव- यत्पादपद्ममकरन्दनिषेवणेन - ज्याच्या चरणकमळांतील रसाच्या सेवनाने - विभूतीः अश्नुते - ऐश्वर्याचा उपभोग घेतात- कुसृतयः - दुराचारी - खलयोनयः ते वयं - व दुष्कुळांत जन्मले गेले ते आम्ही- भवतः - तुम्ही आपल्या - दाक्षिण्यदृष्टिपदवीं - बहुमानपूर्वक कृपादृष्टीला योग्य - कस्मात् प्रणीताः - काय म्हणून केले. ॥७॥

अहो - अहो- अमितयोगमाया - आचिंत्य योगमायेच्या - लीलाविसृष्टभुवनस्य - क्रीडेने निर्मिले आहे जग ज्याने अशा- विशारदस्य सर्वात्मनः - निपुण, सर्वस्वरूपी - समदृशः तव - व समदृष्टि अशा तुझे- चित्रं ईहितम् - चरित्र विचित्र आहे- यत् - कारण- अविषमस्वभावः - सर्वांवर सारखी दृष्टी ठेवणारा - भक्तप्रियः (त्वम्) - व भक्तांना प्रिय असा तू- कल्पतरुस्वभावः (असि) - कल्पवृक्षासारख्या स्वभावाचा आहेस. ॥८॥

वत्स प्रह्लाद - हे बाळा प्रल्हाद- ते भद्रं (अस्तु) - तुझे कल्याण असो- स्वपौत्रेण - आपल्या नातवासह - मोदमानः सुतलालयं प्रयाहि - आनंदित होत्साता सुतलात जा- ज्ञातीनां सुखम् आवह - बांधवांना सुख दे. ॥९॥

तत्र गदापाणिं अवस्थितं मां - त्या सुतलात गदा हातात घेऊन राहिलेल्या मला- मद्दर्शनमहाह्लाद - माझ्या दर्शनामुळे झालेल्या आनंदाने - ध्वस्तकर्मनिबन्धनः (त्वं) - नष्ट झाली आहेत कर्माची बंधने ज्याची असा तू- नित्यं दृष्टासि - नित्य पाहशील. ॥१०॥

राजन् - हे परीक्षित राजा- अचलप्रज्ञः सर्वासुरचमूपतिः प्रह्लादः - निर्मळबुद्धीचा असा सर्व दैत्यसेनेचा अधिपति प्रल्हाद- बलिना सह कृतांज्जलिः - बलिराजासह हात जोडिलेला- भगवतः आज्ञां - परमेश्वराची आज्ञा - बाढं इति मूर्ध्नि आधाय - ‘बरे आहे’ असे म्हणून शिरसा ग्रहण करून- आदिपुरुषं परिक्रम्य - महाविष्णूला प्रदक्षिणा करून- प्रणतः तदनुज्ञातः च - नम्र झालेला व त्याची अनुज्ञा मिळालेला- महाबिलं प्रविवेश - सुतलामध्ये शिरला. ॥११-१२॥

राजन् - हे परीक्षित राजा- अथ हरिः नारायणः - नंतर भगवान विष्णु- अंतिके सदसि - जवळच सभेत - ब्रह्मवादिनां ऋत्विजां मध्ये - ब्रह्मवेत्त्या ऋत्विजांमध्ये - आसीनं उशनसं आह - बसलेल्या शुक्राचार्याला म्हणाला. ॥१३॥

ब्रह्मन् - हे शुक्राचार्या- कर्मवितन्वतः शिष्यस्य - यज्ञ करणार्‍या शिष्य बलिराजाचे- यत् छिद्रं (स्यात्) - जे न्यून असेल- तत् संतनु - ते भरून काढ- कर्मसु वैषम्यं - कर्मातील न्यून - ब्रह्मदृष्टं समं भवेत् - ब्राह्मणाने अवलोकन केले असता भरून निघेल. ॥१४॥

कर्मेश्वरः यज्ञेशः यज्ञपुरुषः भवान् - कर्माधिपति, यज्ञचालक व यज्ञमूर्ति असा तू- यस्यं सर्वभावेन पूजितः - ज्याकडून सर्व वस्तू अर्पण करून पूजिला गेलास- तत्कर्मवैषम्यं कुतः - त्याच्या कर्मात न्यूनता कशी असणार ? ॥१५॥

तवंनामसंकीर्तनं - तुझ्या नावाचे कीर्तन- मन्त्रतः तन्त्रतः - मन्त्र, तंत्र - देशकालार्ह वस्तुतः - व देशकालानुरूप वस्तू ह्यांमुळे होणारे- छिद्रं सर्वं निच्छिद्रं करोति - सर्व न्यून पूर्ण करिते. ॥१६॥

तथा अपि - तरीसुद्धा- भूमन् - हे महात्मा विष्णो- वदतः (ते) अनुशासनं करिष्यामि - सांगणार्‍या तुझी आज्ञा मी पाळीन- यत् तव् आज्ञानुपालनं - जे तुझ्या आज्ञेचे पालन- एतत् पुंसां परं श्रेयः (अस्ति) - हे पुरुषांना अत्यंत कल्याणप्रद होय. ॥१७॥

भगवान् उशनाः - सर्वगुणसंपन्न शुक्राचार्य- इति हरेः आज्ञां अभिनन्द्य - याप्रमाणे विष्णूच्या आज्ञेचे अभिनंदन करून- विप्रर्षिभिः सह बलेः - ब्रह्मर्षीसह बलिराजाच्या - यज्ञच्छिद्रं समाधत्त - यज्ञातील न्यूनता पूर्ण करिता झाला. ॥१८॥

राजन् - हे परीक्षित राजा- वामनः हरिः - वामनावतारी विष्णु- एवं बलेः महीं भिक्षित्वा - याप्रमाणे बलीजवळ पृथ्वीची याचना करून- परैः यत् हृतं त्रिदिवं - शत्रूंनी जो हरण केलेला स्वर्ग- (तं) भ्रात्रे महेन्द्राय ददौ - तो भाऊ जो इंद्र त्याला देता झाला. ॥१९॥

प्रजापतिपतिः ब्रह्मा - मरिच्यादि प्रजापतींचा अधिपति असा ब्रह्मदेव- देवर्षिपितृभूमिपैः - देव, ऋषि, पितर, राजे, ह्यांसह तसेच - दक्षभृग्वाङ्‌गिरोमुख्यैः - दक्ष, भृगु आणि अंगिरा हे ज्यात मुख्य आहेत अशांसह - कुमारेण भवेन च - आणि कार्तिकस्वामी व शंकर ह्यांसह- कश्यपस्य (च) अदितेः प्रीत्यै - कश्यपाच्या व अदितीच्या संतोषाकरिता - सर्वभूतभवाय च - आणि सर्व प्राण्यांच्या उत्कर्षाकरिता- वामनं लोकानां - वामनाला लोकांचा - लोकपालानां पतिम् अकरोत् - व लोकपालांचा अधिपति करिता झाला. ॥२०-२१॥

वेदानां सर्वदेवानां - वेद, सर्व देव, - धर्मस्य यशसः श्रियः - धर्म, कीर्ति व लक्ष्मी ह्यांचे- मङगलानां व्रतानां - मंगलकारक व्रते - स्वर्गापवर्गयोः - आणि स्वर्ग व मोक्ष - च कल्पं उपेन्द्रं - ह्यांचे रक्षण करण्यास समर्थ अशा उपेन्द्राला- सर्वविभूतये पतिं कल्पयाञ्चक्रे - सर्वांच्या कल्याणासाठी पति करता झाला- नृप - हे परीक्षित राजा- तदा सर्वाणि भूतानि - त्या वेळी सर्व प्राणी - भृशं मुमुदिरे - अत्यंत आनंदित झाले. ॥२२-२३॥

ततः च - त्यानंतरही- इंद्रः तु - इंद्र तर- ब्रह्मणा अनुमोदितः - ब्रह्मदेवाने अनुमोदन दिलेला- वामनं पुरस्कृत्य - वामनाचा सत्कार करून- देवयानेन - विमानातून- लोकपालैःसह दिवं निन्ये - लोकपालांसह स्वर्गी नेता झाला. ॥२४॥

उपेन्द्रभुजपालितः - वामनाच्या बाहुबलाच्यायोगे - परमया श्रिया जुष्टः - रक्षिलेला व श्रेष्ठ ऐश्वर्याने सेविलेला- गतसाध्वसः च - आणि निर्भय झालेला- इंद्रः - इंद्र- त्रिभुवनं प्राप्य मुमुदे - त्रैलोक्य मिळवून आनंदित झाला. ॥२५॥

नृप - हे परीक्षित राजा- ब्रह्मा शर्वः - ब्रह्मदेव, शंकर - कुमारः च भृग्वाद्याः मुनदः - कार्तिकस्वामी तसेच भृगु आदिकरून मुनि,- पितरः सर्वभूतानि - पितर व सर्व प्राणी- ये वैमानिकाः सिद्धाःच - आणि जे विमानात बसून जाणारे देव आणि सिद्ध- विष्णोः परमाद्‌भुतं - विष्णूचे अत्यंत आश्चर्यजनक - तत् सुमहत् कर्म - असे ते मोठे कृत्य- गायन्तः स्वानि धिषानि जग्मुः - गात गात आपापल्या स्थानी गेले- अदितिं च शशंसिरे - आणि अदितींची स्तुति करू लागले. ॥२६-२७॥

कुलनन्दन - कुरूकुलाला आनंद देणार्‍या हे परीक्षित राजा- श्रोतृणां अघमोचनं - श्रोत्यांच्या पापांचे नाश करणारे - उरुक्रमस्य एतत् सर्वं चरितं - महापराक्रमी वामनाचे हे सर्व चरित्र- मया भवतः आख्यातं - मी आपणाला सांगितले. ॥२८॥

यः उरुविक्रमतः - जो महापराक्रमी वामनाचे - महिम्नः - माहात्म्य - पारं गृणानः (स्यात्) - पूर्णपणे वर्णन करणारा असेल- सः मर्त्यः पार्थिवानि रजांसि विममे - तो मनुष्य पृथ्वीचे परमाणुही मोजील- जायमानः उत जातः - विद्यमान अथवा होऊन गेलेला मनुष्य - मर्त्यः (तस्य पारं) उपैति किम् - त्या माहात्म्याच्या अंताला पोहोचेल काय- इति मन्त्रदृक् ऋषिः - असे एका मंत्रद्रष्टया ऋषीने - यस्य पुरुषस्य आह - ज्या परमेश्वरासंबंधाने म्हटले आहे. ॥२९॥

यः अद्‌भुतकर्मणः - जो आश्चर्यकारक कृत्य करणार्‍या - देवदेवस्य हरेः - देवाधिदेव विष्णूच्या- इदं अवतारानुचरितं - ह्या अवतारातील चरित्राला- शृण्वन् (भवति) - ऐकणारा होतो- (सः) परांगतिं याति - तो श्रेष्ठ गतीला जातो. ॥३०॥

क्रियमाणे दैवे - आरंभिलेल्या देवसंबंधी, - पित्र्ये अथ मानुषे कर्मणि - पितृसंबंधी तशाच मनुष्यसंबंधी कर्मामध्ये- यत्र-यत्र इदं अनुकीर्त्येत - जेथे जेथे हे चरित्र वर्णन केले जाईल- तत्र तत्र - त्या त्या ठिकाणी- तत् तेषां - ते कर्म त्यांच्याकडून - सुकृतं विदुः - यथासांग केले गेले असे म्हणतात. ॥३१॥

अष्टमः स्कन्धः - अध्याय तेविसावा समाप्त

GO TOP