|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय २० वा - अन्वयार्थ
भगवान वामनांच्या विराट रूपाने दोनच पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापणे - राजन् - हे परीक्षित राजा - एवं कुलाचार्येण भाषितः - याप्रमाणे कुलोपाध्याय शुक्राचार्याने उपदेशिलेला, - अवहितः गृहपतिः बलिः - लक्ष देऊन ऐकणारा गृहस्थाश्रमी बलिराजा - क्षणं तूष्णीं भूत्वा - क्षणभर स्तब्ध होऊन - गुरुं - शुक्राचार्याला - उवाच - म्हणाला. ॥१॥ यः - जो - कर्हिचित् - कधीही - अर्थं कामं यशः वृत्तिं - अर्थ, काम, कीर्ति व उपजीविका ह्यांना - न बाधेत - बाध आणणार नाही - अयं गृहमेधिनां धर्मः (अस्ति) - हा गृहस्थाश्रमी पुरुषांचा धर्म होय - (इति) भगवता सत्यं प्रोक्तं - असे जे आपण सांगितले ते खरे आहे. ॥२॥ सः च प्राह्लादिः अहं - आणि तो प्रल्हादाच्या वंशात उत्पन्न झालेला मी - यथा कितवः - कपटी पुरुषाप्रमाणे - द्विजं ददामि इति प्रतिश्रुत्य - ब्राह्मणाला देतो म्हणून कबूल करून - वित्तलोभेन कथं प्रत्याचक्षे - द्रव्याच्या लोभाने उलट कसे बोलू . ॥३॥ इयं भूः - ही पृथ्वी - असत्यात् परः अधर्मः न हि - खोटे बोलण्यापलिकडे दुसरा अधर्म नाही - अलीकपरं नरं ऋते - खोटे बोलणारा मनुष्य वगळता - सर्वं ओढूं अलं मन्ये - सर्व सहन करणे मला शक्य आहे असे मानिते - इति ह उवाच - असे खरोखर म्हणाली. ॥४॥ अहं यथा विप्रप्रलंभनात् बिभेमि - मी जसा ब्राह्मणाला फसविण्याच्या क्रियेला भितो - (तथा) निरयात् न - तसा नरकाला भीत नाही - असुखार्णवात् अधन्यात् न - दुःखाचा सागर अशा दारिद्र्याला भीत नाही - स्थानच्यवनात् - स्थानापासून भ्रष्ट होण्याला भीत नाही - मृत्योः न - मृत्यूला भीत नाही. ॥५॥ अस्मिन् लोके - ह्या लोकी - यत् यत् धनादिकं - जो जो द्रव्यादिक पदार्थ - संपरेतं हास्यति - मेलेल्याला टाकणार - तेन विप्रः न तुष्येत् चेत् - त्या पदार्थाने जर ब्राह्मण संतुष्ट होणार नाही - (तर्हि) तस्य त्यागे निमित्तं किम् - तर त्या टाकण्याचे कारण काय. ॥६॥ दध्यङ्शिबिप्रभृतयः - दधीचि ऋषि, शिबिराजा इत्यादि - साधवः - साधु पुरुष - दुस्त्यजासुभिः भूतानां श्रेयः कुर्वन्ति - टाकण्यास कठीण अशा प्राणांनी प्राण्यांचे कल्याण करितात - धरादिषु (तु) कः विकल्पः - मग पृथ्वी इत्यादिकांविषयी विचार कसला. ॥७॥ ब्रह्मन् - हे शुक्राचार्या - यैः (युद्धे) अनिवर्तिभिः - युद्धात माघार न घेणार्या - दैत्येन्द्रैः इयं बुभुजे - ज्या दैत्याधिपतींनी ह्या पृथ्वीचा उपभोग घेतला - तेषां लोकान् कालः अग्रसीत् - त्यांना प्राप्त झालेले लोक काळाने गिळून टाकिले - भूवि अधिगतं यशः तु न - परंतु पृथ्वीवर मिळविलेले यश गिळून टाकिले नाही. ॥८॥ विप्रर्षे - हे ब्राह्मणश्रेष्ठा - युधि अनिवृत्ताः तनुत्यजः सुलभाः हि - युद्धात माघार न घेता देह टाकणारे खरोखर पुष्कळ आहेत - तीर्थे आयाते - सत्पात्र ब्राह्मण आला असता - ये श्रद्धया धनत्यजः (ते) तथा न - श्रद्धेने द्रव्यत्याग करणारे तसे नाहीत. ॥९॥ यत् अर्थिकामोपनयेन दुर्गतिः (भवति) - जी याचकांची इच्छा पूर्ण केल्यामुळे निर्धन स्थिति येते - तत् - ती गोष्ट - मनस्विनः कारुणिकस्य - उदार व दयाळू पुरुषाला - शोभनं (अस्ति) - शुभावह होय - भवादृशां ब्रह्मविदां - तुमच्यासारख्या ब्रह्मज्ञानी पुरुषांची - (कामोपनयनेन) कुतः पुनः - इच्छा पूर्ण केल्याने येणारे दारिद्र्य चांगले, हे काय पुनः सांगावयास पाहिजे - ततः अस्य बटोः वाञ्छितम् ददामि - म्हणून ह्या बटूने इच्छिलेले मी देतो. ॥१०॥ मुने - हे शुक्राचार्य - आम्नायविधानकोविदाः (भवन्तः) - वेदविधीमध्ये निष्णात असे आपण - यज्ञक्रतुभिः यं यजन्ति - यज्ञांनी व क्रतूंनी ज्याचे पूजन करिता - सः एव विष्णुः - तोच विष्णु - वरदः अस्तु - वर देणारा असो - वा परः (अस्तु) - किंवा शत्रु असो - अमुष्मै इप्सितां क्षितिं दास्यामि - ह्याला इच्छित भूमि मी देईन. ॥११॥ यत् अपि असौ - जरीही हा - अधर्मेण अनागसं मां बध्नीयात् - अधर्माने निरपराधी अशा मला बांधून टाकील - तथापि एनं भीतं ब्रह्मतनुं - तरी सुद्धा ह्याला भिऊन ब्रह्मशरीर धारण केलेल्या - रिपुं न हिंसिष्ये - शत्रूला मी मारणार नाही. ॥१२॥ एषः उत्तमश्लोकः - हा श्रेष्ठकीर्ति प्रभु - यत् यशः न जिहासति - जर कीर्ति घालवू इच्छित नसेल - (तर्हि) युद्धे मा हत्वा एनां हरेत् - तर युद्धात मला मारून हिला हरण करील - वा मया निहतः शयीत - किंवा मी मारला असता शयन करील. ॥१३॥ दैवप्रहितः गुरुः - दैवाने प्रेरिलेला गुरु शुक्राचार्य - एवं अश्रद्धितं - ह्याप्रमाणे विश्वास न ठेवणार्या, - अनादेशकरं - आज्ञा न पाळणार्या - सत्यसन्धं मनस्विनं शिष्यं - व आपली प्रतिज्ञा खरी करणार्या थोर मनाच्या शिष्याला - शशाप - शाप देता झाला. ॥१४॥ यः त्वं - जो तू - दृढं पण्डितमानी - आपण विद्वान आहो असा बळकट अभिमान बाळगणारा - अज्ञः स्तब्धः यच्छासनातिगः असि - मूर्ख व माझी आज्ञा मोडणारा आहेस - अस्मदुपेक्षया - आमची उपेक्षा केल्यामुळे - अचिरात् क्षियः भ्रश्यसे - लवकरच ऐश्वर्यापासून भ्रष्ट होशील. ॥१५॥ स्वगुरुणा एवं शप्तः - आपल्या गुरुने याप्रमाणे शाप दिलेला - महान् (सः) - महात्मा तो बलिराजा - सत्यात् न चलितः - सत्यापासून चळला नाही - वामनाय अर्चित्वा - वामनाची पूजा करून - उदकपूर्वम् एनां ददौ - जलदानपूर्वक भूमी देता झाला. ॥१६॥ तदा जालकमालिनी - त्यावेळी मोत्यांच्या जाळीची माळ धारण करणारी - विंध्यावलिः पत्नी - विंध्यावलिनामक पत्नी - आगत्य हैमं अवनेजन्यपांभृतं कलशं - येऊन पाय धुण्याच्या पाण्यांनी भरलेला सुवर्णाचा कलश - आनिन्ये - आणिती झाली. ॥१७॥ यजमानः - यजमान बलिराजा - मुदा - आनंदाने - स्वयं तस्य श्रीमत् पादयुगं अवनिज्य - स्वतः त्याचे शोभायमान दोन्ही पाय धुऊन - विश्वपावनीः तदपः - जगाला पवित्र करणारे ते उदक - मूर्ध्नि अवहत् - मस्तकावर धारण करिता झाला. ॥१८॥ तदा दिवि - त्यावेळी आकाशात - मुदान्विताः देवतागणाः - आनंदित देवतांचे समूह, - गंधर्वविद्याधरसिद्धचारणाः सर्वे अपि - गंधर्व, विद्याधर, सिद्ध व चारण हे सर्वही - तत्कर्म आर्जवं गृणन्तः - त्याचे कृत्य व सरळपणा प्रशंसिणारे - असुरेन्द्रं प्रसूनवर्षैः ववृषुः - दैत्यपति बलिराजावर पुष्पवृष्टि करिते झाले. ॥१९॥ सहस्रशः दुंदुभयः मुदुः नेदुः - हजारो दुंदुभि वारंवार वाजू लागल्या - गंधर्वकिंपुरुषकिन्नराः जगुः - गंधर्व, किंपुरुष व किन्नर गाऊ लागले - यत् विद्वान् (बलिः) - ज्ञानी बलिराजा - रिपवे जगत्त्रयं अदात् - जो शत्रूला त्रैलोक्य देता झाला - (तत्) मनस्विना - ते ह्या थोर पुरुषाने - अमेन सुदुष्करं कृतं - अत्यंत दुष्कर कृत्य केले. ॥२०॥ अनन्तस्य हरेः - ज्याच्या शक्तीचा अंत नाही अशा श्रीविष्णूचे - गुणत्रयात्मकं - तीन गुणांनी युक्त असे - अद्भुतं वामनं तत् रूपं - आश्चर्यजनक ते वामनस्वरूप - अवर्धत - वाढू लागले - यत् - ज्यात - भूः खं दिशः - पृथ्वी, आकाश, दिशा, - द्यौः विवराः पयोधयः - स्वर्ग, पाताळे व समुद्र - (च) तिर्यङ्नृदेवाः ऋषयः - आणि पशु, मनुष्य, देव व ऋषि - आसत - होते. ॥२१॥ सहर्त्विगाचार्यसदस्यः बलिः - ऋत्विज, आचार्य व सभासद ह्यांसह बलिराजा - महाविभूतेः तस्य गुणात्मके काये - मोठया ऐश्वर्यसंपन्न अशा त्याच्या त्रिगुणात्मक शरीरात - त्रिगुणं - तीन गुणांनी - भूतेन्द्रियार्थाशयजीवयुक्तं - व पंचमहाभूते, इंद्रिय, विषय, मन, बुद्धि व जीव ह्यांनी युक्त - एतत् विश्वं - असे हे विराटस्वरूपी जग - ददर्श - पाहता झाला. ॥२२॥ इन्द्रसेनः - इंद्राच्या सैन्याप्रमाणे ज्याचे सैन्य आहे असा बलिराजा - विश्वमूर्तेः पुरुषस्य अंघ्रितले रसां - विराटस्वरूपी परमेश्वराच्या तळपायावर रसातळ - अथ पादयोः महीं - त्याचप्रमाणे दोन पायांच्या ठिकाणी पृथ्वी - जङघयोः महीध्रान् - पोटर्यांवर पर्वत - जानुनि पतत्त्रिणः - गुडघ्यांवर पक्षी - ऊर्वोः मारुतं गणं अचष्ट - मांडयांवर वायुसंघ पाहता झाला. ॥२३॥ उरुक्रमस्य विभोः वाससि संध्या - महापराक्रमी विष्णूच्या वस्राच्या ठिकाणी संध्या - गुह्ये प्रजापतीन् - गुह्यस्थानाच्या ठिकाणी प्रजापतींना - जघने आत्ममुख्यान् - जघनभागी आपणा आहो प्रमुख ज्यामध्ये असे दैत्यसंघ - नाभ्यां नभः - नाभिस्थानी आकाश - कुक्षिषु सप्त सिंधून् - उदरामध्ये सात समुद्र - उरसि च - आणि वक्षस्थलाच्या ठिकाणी - क्रक्षमालां ऐक्षत् - नक्षत्रपंक्ती पाहता झाला. ॥२४॥ अङग - हे राजा - मुरारेः हृधि धर्मं - श्रीविष्णूच्या हृदयामध्ये धर्म - स्तनयोः च ऋतं सत्यं च - आणि स्तनांच्या ठिकाणी ऋत आणि सत्य - अथ मनसि च इन्दुं - त्याचप्रमाणे मनाच्या ठायी चंद्र - वक्षसि च - व वक्षस्थलाच्या ठिकाणी - अरविन्दहस्तां श्रियं - कमळ धारण करणारी लक्ष्मी - कण्ठे च सामानि - आणि कंठावर सामे - समस्तरेफान् च - आणि सगळे शब्द - भुजेषु च इंद्रप्रधानान् अमरान् - आणि भुजांच्या ठिकाणी इंद्रादि देव - तत्कर्णयोः ककुभः - त्याच्या कानांवर दिशा - मूर्ध्नि च द्यौः - व मस्तकी स्वर्ग - केशेषु च मेघान् - आणि केसांच्या ठिकाणी मेघ - नासिकायां श्वसनं - नाकांमध्ये वायू - अक्ष्णोः सूर्यं - नेत्रांच्या ठिकाणी सूर्य - वदने च वह्निं - आणि मुखांमध्ये अग्नि. ॥२५-२६॥ परस्य पुंसः वाण्यां छंदांसि - श्रेष्ठ परमेश्वराच्या वाणीचे ठिकाणी वेद - रसे च जलेशं - आणि जिव्हेवर वरुण - भ्रुवोः विधिं निषेधं च - भ्रुकुटीच्या ठिकाणी विधि व निषेध - पक्ष्मसु अहः रात्रिं च - पापण्यांच्या ठिकाणी दिवस व रात्र - ललाटे मन्युं - ललाटाचे ठिकाणी क्रोध - अधरे एव लोभं - अधरोष्ठावरच लोभ. ॥२७॥ नृप - हे राजा - स्पर्शे कामं - स्पर्शाच्या ठिकाणी काम - रेतसः अंभः - रेताच्या ठिकाणी उदक - पृष्ठे अधर्मं - पाठीवर अधर्म - क्रमणेषु यज्ञं - पावलाच्या ठिकाणी यज्ञ - छायासु मृत्युं - छायेचे ठिकाणी मृत्यू - हसिते मायां - हास्याच्या ठिकाणी माया - तनूरुहेषु च ओषधिजातयः - आणि केसांच्या ठिकाणी औषधिसमूह. ॥२८॥ वीरः - पराक्रमी बलिराजा - नाडीषु नदीः - नाडींच्या ठिकाणी नद्या - नखेषु शिलाः - नखांच्या ठिकाणी पाषाण - बुद्धौ अजं - बुद्धीत ब्रह्मदेवाला - प्राणेषु देवगणान् ऋषीन् - प्राणांच्या ठिकाणी देवसमुदाय व ऋषि - गात्रे स्थिरजङगमानि सर्वानि - शरीरात स्थावरजंगम सर्व प्राणी - ददर्श - पाहता झाला. ॥२९॥ अंग - हे राजा - सर्वे असुराः - सर्व दैत्य - सर्वात्मनि - विश्वरूपी परमेश्वराच्या - इदं भुवनं निरीक्ष्य - ठिकाणी हे जग पाहून - कश्मलम् आपुः - मूर्छित झाले - असह्यतेजः सुदर्शनं चक्रं - असह्य तेजाचे सुदर्शन चक्र - स्तनयित्नुघोषं शार्ङगं धनुः - मेघाप्रमाणे गर्जना करणारे शार्ङग धनुष्य - पर्जन्यघोषः पाश्चजन्यः - पावसाप्रमाणे गर्जना करणारा पांचजन्य शंख - तरस्विनी - वेगाने धावत जाणारी - कौमोदकी विष्णुगदा - कौमोदकी नावाची विष्णूची गदा - शतचंद्रयुक्तः - शंभर चांदक्यासह - विद्याधरः असि - विद्याधर नावाची तरवार - अध्ययसायकौ - ज्यांतील बाण कधीही नाहीसे होत नाहीत - तूणोत्तमौ - असे दोन उत्तम भाते. ॥३०-३१॥ सहलोकपालाः सुनंदमुख्याः च पार्षदमुख्याः - लोकपालांसह सुनंदप्रमुख मुख्य पार्षद - ईशं उपतस्थुः - ईश्वराची स्तुति करू लागले - राजन् - हे राजा - स्फुरत्किरीटांगद - चकाकणारी आहेत मुकुट, बाहुभूषणे - मीनकुण्डलः - व मत्स्याकार कुंडले समान - मधुस्रग्वनमालया वृतः - व भ्रमरांचीच माळ जीमध्ये झाली आहे अशा वनमालेने झाकलेला - भगवान् - परमेश्वर - श्रीवत्सरत्नोत्तममेखलाम्बरः - श्रीवत्स, कौस्तुभमणि, कमरपटटा आणि वस्र यांनी युक्त - रराज - शोभला - उरुक्रमः - पराक्रमी श्रीविष्णु - एकेन पदा - एका पावलाने - बलेः क्षितिः - बलिराजाचे राज्य अशी पृथ्वी - शरीरेण नभः - शरीराने आकाश - बाहुभिः च दिशः - व बाहूंनी दिशा - विचक्रमे - व्यापिता झाला. ॥३२-३३॥ द्वितीयं पदं क्रमतः - दुसरे पाऊल टाकणार्या - (तस्य) त्रिविष्टपं (व्याप्तं) - त्याने स्वर्ग व्यापिला - तृतीयाय - आणि तिसर्या - तदीयं अणु अपि न वै (अवशिष्टम्) - पावलासाठी ज्याचे बिंदुमात्रहि उरले नाही - अथो - त्यानंतर - उरुक्रमस्य अङ्घ्रिः - पराक्रमी वामनाचा पाय - उपरि उपरि - वरती वरती - महर्जनाभ्यां - महर्लोक, जनलोक - तपसः च परंगतः - व तपोलोक ह्यांच्या पलीकडे असणार्या सत्यलोकापर्यंत गेला. ॥३४॥ अष्टमः स्कन्धः - अध्याय विसावा समाप्त |