श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १३ वा - अन्वयार्थ

आगामी सात मन्वंतरांचे वर्णन -

श्राद्धदेवः इति श्रुतः - श्राद्धदेव या नावाने प्रसिद्ध असलेला - विवस्वतः पुत्रः - सूर्याचा मुलगा - सप्तमः मनुः (अस्ति) - सातवा मनु होय - यः वर्तमानः (अस्ति) - जो चालू आहे - तदपत्यानि मे शृणु - त्याची संतति माझ्यापासून ऐका. ॥१॥

इक्ष्वाकुः नभगः च एव धृष्टः - इक्ष्वाकु, आणि तसाच नभग, धृष्ट - शर्यातिः च एव नरिष्यन्तः नाभागः - आणि तसाच शर्याति, नरिष्यंत, आणि नाभाग - सप्तमः (च) दिष्टः उच्यते - आणि सातवा दिष्ट नावाने प्रसिद्ध आहे. ॥२॥

परतंप - हे शत्रुतापना परीक्षित राजा - करुषः च पृषध्रः च - करुष आणि पृषध्र आणि - दशमः वसुमान् स्मृतः - दहावा वसुमान वर्णिला आहे - वैवस्वतस्य मनोः - सूर्यपुत्र श्राद्धदेव मनूचे - एते दश पुत्राः (सन्ति) - हे दहा पुत्र होत ॥३॥

राजन् - हे परीक्षित राजा - आदित्याः वसवः रुद्राः - आदित्य, वसु, रुद्र, - विश्वेदेवाः मरुद्‌गणाः अश्विनौ ऋभवः - विश्वेदेव, मरुत्, अश्विनीकुमार व ऋभु - पुरंदरः तेषां इन्द्रः - पुरंदर हा देवांचा अधिपति होय. ॥४॥

कश्यपः अत्रिः वसिष्ठः - कश्यप, अत्रि, वसिष्ठ, - विश्वामित्रः अथ गौतमः जमदाग्निः भरद्वाजः - विश्वामित्र, त्याचप्रमाणे जमदग्नि आणि भरद्वाज - इति सप्त ऋषयः स्मृताः - असे सात ऋषि सांगितले आहेत. ॥५॥

अत्र अपि - ह्या मन्वंतरात सुद्धा - कश्यपात् अदितेः - कश्यपपासून अदितीच्या ठिकाणी - भगवज्जन्म अभूत् - भगवंताचा जन्म झाला - विष्णुः - विष्णु - आदित्यानां अवरजः - आदितिपुत्र अशा देवांचा धाकटा भाऊ - वामनरूपधृक् - बटुरूप घेणारा. ॥६॥

मया - मी - ते - तुला - सप्त मन्वन्तराणि - सात मन्वंतरे - संक्षेपतः उक्तानि - थोडक्यात सांगितली - अथच - तशीच आणखी - विष्णोःशक्त्या अन्वितानि - विष्णुच्या शक्तीने युक्त अशी - भविष्याणि - पुढे होणारी - वक्ष्यामि - सांगतो. ॥७॥

राजेंद्र - हे राजा - च - आणि - संज्ञा छाया च - संज्ञा व छाया - उभे विश्वकर्मसुते - दोन्ही विश्वकर्म्याच्या मुली - विवस्वतः द्वे जाये (आस्ताम्) - सूर्याच्या दोन पत्न्या होत्या - ये - ज्या - तव - तुला - प्राक् अभिहिते - पूर्वी सांगितल्या. ॥८॥

एके - कोणी - तृतीयां वडवां (वदन्ति) - तिसरी वडवा नावाची स्त्री सांगतात - तासां संज्ञासुताः यमः यमी च - त्यापैकी संज्ञेची मुले यम, यमी व - श्राद्धदेवः (इति) त्रयः - श्राद्धदेव अशी होती - छायायाः सुतान् शृणु - छायेची मुले ऐक. ॥९॥

सावर्णिः - सावर्णि नावाचा पुत्र - तपती कन्या - तपती नावाची कन्या - या संवरणस्य भार्या (अभवत्) - जी संवरणाची पत्नी झाली - तृतीयः शनैश्चरः - तिसरा शनैश्चर - अभूत् - झाला - वडवात्मजौ अश्विनौ - वडवेचे मुलगे अश्विनीकुमार होत. ॥१०॥

नृप - हे राजा - अष्टमे अन्तरे आयाते - आठवे मन्वंतर आले असता - सावर्णिः मनुः भविता - सावर्णि मनु होईल - निर्मोकविरजस्काद्याः - निर्मोक, विरजस्क इत्यादि - सावर्णितनयाः (भवितारः) - सावर्णीचे मुलगे होतील. ॥११॥

तत्र - त्या मन्वंतरात - सुतपसः विरजाः अमृतप्रभाः देवाः (भवितारः) - सुतपस, विरजस् व अमृतप्रभ हे देव होतील - विरोचनसुतः बलिः - विरोचनाचा पुत्र बलिराजा - तेषां इंद्रः - त्यांचा अधिपति - भविष्यति - होईल. ॥१२॥

यः - जो बलिराजा - पदत्रयं याचमानाय विष्णवे - तीन पावले भूमी मागणार्‍या विष्णुला - इमां दत्वा - ही पृथ्वी देऊन - राद्धं इंद्रपदं हित्वा - समृद्ध असे इंद्रपद सोडून - ततः सिद्धिं अवाप्स्यति - नंतर सिद्धीला पावेल. ॥१३॥

यः असौ - जो हा बलिराजा - भगवता बद्धः - भगवंताने बद्ध केलेला - पुनः - पुनः - प्रीतेन तेन - संतुष्ट झालेल्या त्या भगवंताकडून - स्वर्गात् अधिके सुतले - स्वर्गाहूनहि अधिक महत्त्वाच्या सुतल प्रदेशामध्ये - निवेशितः - स्थापिला गेलेला - अधुना - सांप्रत - स्वराट् इव - स्वर्गाच्या राजाप्रमाणे - आस्ते - राहतो. ॥१४॥

गालवः दीप्तिमान् रामः - गालव, दीप्तीमान्, परशुराम, - द्रोणपुत्रः कृपः तथा ऋष्यशृंगः (च) - अश्वत्थामा, कृपाचार्य त्याचप्रमाणे ऋष्यशृंग आणि - अस्मांक पिता भगवान् बादरायणः - आमचा पिता सर्वगुणसंपन्न व्यास - इमे सप्तऋषयः - हे सात ऋषि - तत्र भविष्यन्ति - त्या मन्वतरांत होतील - राजन् - हे राजा - इदानीं - हल्ली - स्वे स्वे आश्रममंडले - आपापल्या आश्रमांत - स्वयोगतः - स्वतःच्या योगसामर्थ्याने - आसते - राहतात. ॥१५-१६॥

देवगुह्यात् - देवगुह्यनामक पुरुषापासून - सरस्वत्यां - सरस्वतीच्या पोटी - सार्वभौ‌म इति - सार्वभौ‌म नावाचा - प्रभुः ईश्वरः - समर्थ परमेश्वर - पुरन्दरात् स्थानं हृत्वा - इंद्रापासून इंद्रपद हिरावून घेऊन - बलये दास्यति - बलिराजाला देईल. ॥१७॥

नृप - हे राजा - वरुणसंभवः दक्षसावर्णि - वरुणाचा पुत्र दक्षसावर्णि - नवमः मनुः (भविष्यति) - नववा मनु होईल. - भूतकेतुः दीप्तकेतुः इत्याद्याः - भूतकेतु, दीप्तकेतु इत्यादि - तत्सुताः (भविष्यंति) - त्याचे मुलगे होतील. ॥१८॥

पाराः मरीचिगर्भाद्याः देवाः - पार, मरीचिगर्भ देव होतील - अद्भुतः इंद्रः स्मृतः - अद्भुतनामक पुरुष इंद्र सांगितला आहे - ततः - नंतर - तत्र - त्या मन्वंतरात - द्युतिमत्प्रमुखाः ऋषयः - द्युतिमत् आदिकरून सप्तऋषि - भविष्यन्ति - होतील. ॥१९॥

आयुष्मतः अंबुधारायां - आयुष्मानाच्या अंबुधारानामक पत्नीच्या ठिकाणी - भगवत्कला ऋषभः भविता - ऋषभनामक भगवंताचा अंशावतार होईल - येन - ज्या ऋषभाने - संराद्धां त्रिलोकीं - मिळवून दिलेल्या त्रैलोक्याला - अद्भुतः - अद्भुतनामक इंद्र - भोक्ष्यते - उपभोगील. ॥२०॥

उपश्लोकसुतः महान् ब्रह्मसावर्णिः - उपश्लोकाचा मुलगा महात्मा ब्रह्मसावर्णि - दशमः (मनुः) - दहावा मनु - भूरिषेणाद्याः तत्सुताः - भूरिषेणादि त्याचे मुलगे - हविष्मत्प्रमुखाः द्विजाः - हविष्मान् आदिकरून सप्तर्षि होतील. ॥२१॥

तदा - त्यावेळी - हविष्मान् सुकृतिः सत्यः - हविष्मान्, सुकृति, सत्य, - जयः मूर्तिः (इति) द्विजाः - जय व मूर्ति असे ते ऋषि असतील - सुवासनविरुद्धाद्याः देवाः - सुवासन, विरुद्ध इत्यादि देव होतील - शंभुःसुरेश्वरः (भविष्यति) - शंभु हा इंद्र होईल. ॥२२॥

भगवान् - सर्वगुणसंपन्न - विभुः - समर्थ - विष्वक्सेनः - परमेश्वर - तु - तर - विश्वसृजः - विश्वसृजाच्या - गृहे - घरी - विषूच्यां - विषूचीच्या ठिकाणी - स्वांशेन जातः - आपल्या अंशाने उत्पन्न झालेला असा - शंभोः सख्यं करिष्यति - शंभुनामक इंद्राशी मैत्री करील. ॥२३॥

आत्मवान् - ज्ञानी - धर्मसावर्णिः - धर्मसावर्णि - एकादशमः - अकरावा - मनुः - मनु - वै (अस्ति) - खरोखर होय - अनागताः - अनागत संज्ञक - च - आणि - सत्यधर्मादयः - सत्यधर्म आदिकरून - दश तत्सुताः (भविष्यन्ति) - दहा त्याचे मुलगे होतील ॥२४॥

विहंगमाः कामगमाः निर्वाणरुचयः सुराः - विहंगम, कामगम व निर्वाणरुचि हे देव - च - आणि - वैधृतः तेषां इंद्रः (भविता) - वैधृत त्यांचा इंद्र होईल - अरुणादयः ऋषयः - अरुण आदिकरून ऋषि होतील. ॥२५॥

तत्र - त्या मन्वंतरात - धर्मसेतुः इति स्मृतः - धर्मसेतु नावाने ओळखला जाणारा - आर्यकस्य सुतः - आर्यकाचा पुत्र - वैधृतायां - वैधृता स्त्रीच्या ठिकाणी - हरेः अंशः - विष्णुचा अंशावतार म्हणून उत्पन्न होऊन - त्रिलोकीं धारयिष्यति - त्रैलोक्याचे रक्षण करील. ॥२६॥

राजन् - हे राजा - रुद्रसावर्णिः द्वादशमः मनुः - रुद्रसावर्णि बारावा मनु - भविता - होईल - देववान् उपदेवः - देववान्, उपदेव आणि - देवश्रेष्ठादयः च सुताः - देवश्रेष्ठ इत्यादि त्याचे पुत्र होतील. ॥२७॥

च - आणि - तत्र - त्या मन्वंतरात - हरितादयः - हरित आदिकरून - देवाः - देव - च - आणि - ऋतधामा इंद्रः - ऋतधामा इंद्र - च - आणि - तपोमूर्तिः तपस्वी - तपोमूर्ति तपस्वी तसेच - आग्नीध्रकादयः च ऋषयः - आग्नीध्रक आदिकरून ऋषि होतील. ॥२८॥

स्वधामाख्यः - स्वधाम नावाचा - हरेः अंशः - भगवंताचा अंश - विभुः - समर्थ - सत्यसहसः - सत्यसहसाच्या - सूनृतायाः सुतः (भूत्वा) - सुनृता स्त्रीचा पुत्र होऊन - तत् मनोः अन्तरं - त्या मन्वंतराला - साधयिष्यति - रक्षील. ॥२९॥

आत्मवान् - ज्ञानी - देवसावर्णिः - देवसावर्णि - त्रयोदशः मनुः - तेरावा मनु - भाव्यः - होईल - चित्रसेनविचित्राद्याः देवसावर्णिदेहजाः - चित्रसेन, विचित्र आदिकरून देवसावर्णिचे मुलगे होतील. ॥३०॥

सुकर्मसुत्रामसंज्ञाः देवाः - सुकर्म, सुत्राम आदिकरून देव - दिवस्पतिः इंद्रः - दिवस्पति हा इंद्र - तदा - त्यावेळी - निर्मोकतत्त्वदर्शाद्याः ऋषयः भविष्यन्ति - निर्मोक, तत्त्वदर्श इत्यादि सप्तर्षि होतील. ॥३१॥

योगेश्वरः - योगेश्वरनामक - हरेः अंशः - भगवंताचा अंश - देवहोत्रस्य तनयः - देवहोत्राचा पुत्र - दिवस्पतेः उपहर्ता - दिवस्पतीला इंद्राचे आधिपत्य मिळवून देणारा - बृहत्यां - बृहतीच्या पोटी - संभविष्यति - जन्मास येईल. ॥३२॥

वा - आणि त्याचप्रमाणे - इंद्रसावर्णिः - इंद्रसावर्णि - चतुर्दशमः मनुः - चौदावा मनु - एष्यति - होईल - उरुगंभीरबुद्‌ध्याद्याः - उरु, गंभीरबुद्धि इत्यादि - इंद्रसावर्णिवीर्यजाः - इंद्रसावर्णीचे पुत्र होतील. ॥३३॥

पवित्राः चाक्षुसाः देवाः - पवित्र व चाक्षुष नावाचे देव होतील - शुचिः इंद्रः भविष्यति - शुचि इंद्र होईल - अग्निः बाहुः शुचिः - अग्नि, बाहु, शुचि, - शुद्धः मागधाद्याः तपस्विनः - शुद्ध, मागध इत्यादि ऋषि होतील. ॥३४॥

महाराज - हे राजा - तदा - त्या मन्वंतरात - हरिः - विष्णु - सत्रायणस्य वितानायां - सत्रायणाच्या वितानानामक पत्नीच्या पोटी - तनयः बृहद्भानुः - पुत्ररूपाने बृहद्भानु नावाचा अवतार घेऊन - क्रियातन्तून् वितायिता - कर्मकांडातील यज्ञांचा विस्तार करील. ॥३५॥

राजन् - हे राजा - त्रिकालानुगतानि - तिन्ही काळात होणारी - चतुर्दश एतानि - ही चौदा मन्वंतरे - ते प्रोक्तानि - तुला सांगितली - एभिः मितः - ह्या चौदा मनूंनी योजिलेला - युगसाहस्रपर्ययः कल्पः (अस्ति) - जो हजार युगांचा काल तोच कल्प होय. ॥३६॥

अष्टमः स्कन्धः - अध्याय तेरावा समाप्त

GO TOP