श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १२ वा - अन्वयार्थ

मोहिनीरूपाने महादेवांना मोहिनी -

हरिः - विष्णु - योषिद्‌रूपेण - स्त्रीरूपाने - दानवान् - दैत्यांना - मोहयित्वा - मोहित करून - सुरगणान् - देवसमुदायांना - सोमं - अमृत - अपाययत् - पाजिता झाला. - इदं - हे - निशम्य - ऐकून - वृषध्वजः - बैल आहे चिन्ह ज्याचे असा - गिरिशः - शंकर - वृषं आरुह्य - बैलावर बसून - सर्वभूतगणैः - सर्व भूतगणांनी - वृतः - वेष्टिलेला - देव्यासह - पार्वतीसह - मधुसूदनः - श्रीविष्णु - यत्र - जेथे - आस्ते - राहतो - तत् रूपं - ते मोहिनीरूप - द्रष्टुं - पाहण्याकरिता - आययौ - आला. ॥१-२॥

भगवता - श्रीविष्णुने - सादरं - सत्कारपूर्वक - उमया - उमेसहित - सभाजितः - पूजिलेला - सः भवः - तो शंकर - सूपविष्टः - स्वस्थपणाने बसलेला असा - स्मयन् - मंद हास्य करीत - हरिं - श्रीविष्णूला - प्रतिपूज्य - प्रशंसून - इदं - हे - उवाच - म्हणाला. ॥३॥

देवदेव - हे देवांच्या देवा - जगद्‌व्यापिन् - जगाला व्यापून राहणार्‍या - जगदीश - त्रैलोक्याधिपते - जगन्मय - हे जगत्स्वरूपा ईश्वरा - त्वं - तू - सर्वेषाम् अपि - संपूर्णही - भावानां - पदार्थांचा - आत्मा - चालक - हेतुः - उत्पादक - ईश्वरः - स्वामी. ॥४॥

अस्य - ह्या जगाचे - आद्यन्तौ - आदि व अंत - मध्यं - मध्य - यतः - ज्यापासून - अव्ययस्य - अविनाशी अशा ज्या तुला - एतानि - आदि, मध्य व अंत ही - न (सन्ति) - नाहीत - यत् - जे - इदं - हे - बहिः - बाहेरचे भोग्यरूप - अन्यत् - दुसरे भोक्तृरूप - अहं - अहंकाररूप - तत् - ते - सत्यं - सत्यस्वरूप - चित् - चैतन्यरूप - ब्रह्म - ब्रह्म - भवान् - तू ॥५॥

श्रेयस्कामाः - कल्याणाची इच्छा करणारे - निराशिषः - निरिच्छ - मुनयः - ऋषि - उभयतः - इहपरलोकींच्या उपभोगावरील - सङगं - आसक्तीला - विसृज्य - सोडून - तव एव - तुझ्याच - चरणांभोजं - चरणकमलाची - समुपासते - चांगली उपासना करितात. ॥६॥

त्वं - तू - पूर्णं - पूर्ण - अमृतं - सुखरूप - अविकारं - विकाररहित - विगुणं - निर्गुण - विशोकं - शोकरहित - आनन्दमात्रं - केवळ आनन्दरूपी - अनन्यत् - ज्या व्यतिरिक्त जगात काही नाही असा - अन्यत् - सर्वांव्यतिरिक्त - ब्रह्म - ब्रह्मरूप - विश्वस्य - जगाची - उदयस्थितिसंयमानां - उत्पत्ति, स्थिती व संहार ह्यांना - हेतुः - कारणीभूत - च - आणि - तदपेक्षया - त्या जीवाच्या अपेक्षेमुळे - आत्मेश्वरः - जीवात्म्यांचा स्वामी - (स्वयं) अनपेक्षः - स्वतः कशाचीही अपेक्षा न करणारा. ॥७॥

त्वं - तू - एक एव - एकटाच - सत् - सद्रूप - असत् - असद्रूप - द्वयं - द्वैतरूपी - च - आणि - अद्वयं - अद्वैतरूपी - इह - येथे - कृताकृतं - कार्यरूपातील व मूळ रूपातील - स्वर्णम् इव - सुवर्णाप्रमाणे - वस्तुभेदः - मूळ तत्त्वांत भेद - न (अस्ति) - नाही - जनैः - लोकांनी - अज्ञानतः - अज्ञानाने - त्वयि - तुझ्याठिकाणी - विकल्पः - भेदभाव - विहितः - कल्पिला आहे - यस्मात् - कारण - निरुपाधिकस्य - उपाधिरहित अशा - गुणव्यतिकरः (अस्ति) - गुणसंबंधामुळेच भासणारी आहे. ॥८॥

केचित् - कित्येक लोक - त्वां - तुला - ब्रह्म - ब्रह्म असे - अवयन्ति - समजतात - उत - त्याचप्रमाणे - एके - काही लोक - धर्मं - धर्म असे - एके - दुसरे कोणी - सदसतोः परं - सताहून व असताहून पलीकडे असणारा - परेशं - परमेश्वर समर्थ असा - पुरुषं - सर्वांच्या हृदयात वास्तव्य करणारा. ॥९॥

अन्ये - दुसरे - त्वां - तुला - नवशक्तियुतं - नऊ शक्तींनी युक्त असा - परं (पुरुषं) - श्रेष्ठ पुरुष - केचित् - कोणी - अव्ययं - अविनाशी - आत्मतन्त्रं - स्वतंत्र - महापुरुषं - पुरुषोत्तम असे - अवयन्ति - मानितात - ईश - हे परमेश्वरा - अहं - मी - परायुः - पुष्कळ आयुष्य असणारा ब्रह्मदेव - मरीचिमुख्याः - मरीचिप्रमुख - ऋषयः - ऋषि - सत्त्वसर्गाः - सत्त्वगुणापासून उत्पन्न झालेले असून - यन्मायया - ज्याच्या मायेने - मुषितचेतसः - चोरिली आहेत अंतःकरणे ज्यांची असे - यद्विरचितं - ज्याने रचिलेल्या सृष्टिला - खलु - खरोखर - न जानन्ति - जाणत नाहीत - उत - मग - शश्वत् - नेहमी - अभद्रवृत्ताः - पापकर्म करणारे - दैत्यमर्त्यादयः - दैत्य व मानव - किम् (जानन्ति) - कसे जाणणार ? ॥१०॥

यथा - ज्याप्रमाणे - वायुः - वायु - चराचराख्यं - स्थावरजंगमात्मक सृष्टीत - च - आणि - खं - आकाशात - विशति - प्रवेश करितो - अवगमः - ज्ञानरूपी - सः - तो - त्वं - तू - समीहितं - स्वतः रचिलेले - अदः - हे जग - जगतः - जगाचे - स्थितिजन्मनाशं - रक्षण, उत्पादन व नाश - भूतेहितं - प्राण्यांचे इच्छित - च - आणि - भवबन्धमोक्षौ - संसारबंधन व मोक्ष हे दोन्ही - सर्वं - सर्व काही - तदात्मकतया - ईश्वरमय असल्यामुळे - अवरुंत्से - व्यापितोस. ॥११॥

मया - मी - गुणैः - गुणांनी - रममाणस्य - रममाण होणार्‍या - ते - तुझे - अवताराः - अवतार - दृष्टाः - पाहिले आहेत - सः - तो - अहं - मी - ते - तुझ्याकडून - यत् - जे - योषिद्वपुः - स्त्री शरीर - धृतं - धरिले गेले - तत् - ते - द्रष्टुं - पाहाण्यास - इच्छामि - इच्छितो. ॥१२॥

येन - ज्या रूपाने - दैत्याः - दैत्य - संमोहिताः - मोहित केले गेले - च - आणि - सुराः - देव - अमृतं - अमृत - पायिताः - पाजिले गेले - तत् दिदृक्षवः - ते पाहण्याची इच्छा करणारे - आयाताः - आलो आहो - हि - कारण - नः - आम्हांला - परं - फारच - कौतुहलं (अस्ति) - कौतुक वाटत आहे. ॥१३॥

शूलपाणिना - शंकराने - एवं - याप्रमाणे - अभ्यर्थितः - प्रार्थिलेला - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - विष्णुः - विष्णु - भावगंभीरं - गूढ विचार मनात येऊन गंभीरपणाने - प्रहस्य - हसून - गिरिशं - शंकराला - प्रत्यभाषत - म्हणाला. ॥१४॥

पीयूषभाजने (शत्रुहस्ते) गते - शत्रूंच्या हाती अमृतकलश लागला असता - सुरकार्याणि - देवकार्य - पश्यता - करणार्‍या - मया - माझ्याकडून - दैत्यानां - दैत्यांना - कौतुहलाय - आश्चर्य वाटण्याकरिता - योषिद्वेषः - स्त्रीवेष - कृतः - धारण केला. ॥१५॥

सुरसत्तम - हे देवश्रेष्ठा - अहं - मी - कामिनां - कामुक पुरुषांना - बहुमन्तव्यं - फारच आवडणारे - संकल्पप्रभवोदयं - कामोत्पादक - तत् - ते स्त्रीरूप - दिदृक्षोः - पाहण्याची इच्छा करणार्‍या - ते - तुला - दर्शयिष्यामि - दाखवितो. ॥१६॥

इति - याप्रमाणे - ब्रुवाणः - बोलणारा - भगवान् - विष्णु - तत्र एव - तेथेच - अन्तरधीयत - गुप्त झाला - सर्वतः - सभोवार - चक्षुः - डोळे - चारयन् - फिरविणारा - भवः - शंकर - उमयासह - पार्वतीसह - आस्ते - होता. ॥१७॥

ततः - नंतर - विचित्रपुष्पारुणपल्लवद्रुमे - चित्रविचित्र फुले आणि तांबूस पाने यांनी युक्त असे वृक्ष ज्यामध्ये आहेत अशा - उपवने - बागेत - कन्दुकलीलया - चेंडूचा खेळ - विक्रीडतीं - खेळणार्‍या - लसद्दुकूलपर्यस्तनितम्बमेखला - तेजस्वी रेशमी वस्त्राने वेष्टिलेल्या कंबरेवर जिने कमरपटटा धारण केला आहे अशा - वरस्त्रियं - सुंदर स्त्रीला - ददर्श - पाहता झाला. ॥१८॥

पदेपदे - प्रत्येक पावलाला - आवर्तनोद्वर्तनकम्पितस्तनप्रकृष्टहारोरुभरैः - वाकणे व उभे राहणे ह्यायोगे कंपयुक्त झालेल्या स्तनांनी व मोठया हारांच्या भारांनी - मध्यतः - कटिभागात - प्रभज्यमानां इव - मोडल्याप्रमाणे दिसणार्‍या - ततः ततः - त्या त्या ठिकाणाहून - चलत्पदप्रवालं - चंचल असे कोवळ्या पानासारखे पाऊल - नयन्तीं - उचलणार्‍या - दिक्षु - दाही दिशांमध्ये - भ्रमत्कंदुकचापलैः - फिरणार्‍या चेंडूच्या चपलतेमुळे - भृशं - अत्यंत - प्रोद्विग्नतारायतलोललोचनां - कावर्‍या-बावर्‍या बाहुल्या झाल्यामुळे चंचल झाले आहेत दीर्घ नेत्र जिचे अशा - स्वकर्णविभ्राजितकुंडलोल्लसत्कपोलनीलालकमण्डीताननां - आपल्या कानावर शोभणार्‍या कुंडलांनी अधिक सुशोभित झालेले गाल व काळेभोर केस यांच्यायोगे शोभणारे आहे मुख जिचे अशा ॥१९-२०॥

श्लथद्दुकूलं - शिथिल अशा रेशमी वस्त्राला - च - आणि - विच्युतां - सुटून गेलेल्या - कबरीं - वेणीला - वल्गुना - सुंदर - वामकरेण - डाव्या हाताने - सन्नह्यतीं - बांधणार्‍या - अन्यकरेण - दुसर्‍या हाताने - कन्दुकं - चेंडूला - विनिघ्नतीं - ताडन करणार्‍या - आत्ममायया - स्वतःच्या मायेने - जगत् - जगाला - विमोहयन्तीं - मोहित करणार्‍या अशा. ॥२१॥

देवः - शंकर - तां स्त्रियं - त्या स्त्रीला - वीक्ष्य - पाहून - इति - याप्रमाणे - कंदुकलीलया - चेंडूच्या खेळण्याने - ईषद्‌व्रीडास्फुटस्मितविसृष्टकटाक्षमुष्टः - किंचित लज्जेमुळे अस्पष्ट हास्यासह सोडिलेल्या कटाक्षाने चोरिला गेलेला - स्त्रीप्रेक्षणप्रतिसमीक्षणविह्‌वलात्मा - स्त्रीच्या अवलोकनाने ज्याचे चित्त फारच विव्हळ झाले आहे असा - आत्मानं - स्वतःला - अंतिके - जवळ असणार्‍या - उमां - पार्वतीला - च - आणि - स्वगणान् - आपल्या शैवगणांना - न वेद - जाणता झाला नाही. ॥२२॥

तस्याः - तिच्या - कराग्रात् - हातातून - सः - तो - कंदुकः - चेंडू - तु - तर - यदा - जेव्हा - विदूरं - लांब - गतः - जाऊन पडला - तं - त्या चेंडूच्या - अनुव्रजस्त्रियाः - मागून जाणार्‍या स्त्रीचे - ससूत्रं - कंबरपटटयासह - लघु वासः - पातळ झिरझिरीत वस्त्र - मारुतः - वायु - भवस्य देवस्य अनुपश्यतः - शंकरदेव पाहात असता - किल - खरोखर - अहरत् - हरण करिता झाला. ॥२३॥

भवः - शंकर - एवं - याप्रमाणे - रुचिरापाङ्गीं - सुंदर कटाक्ष फेकणार्‍या - दर्शनीयां - पाहण्यास योग्य अशा - मनोरमां - मनोहर - तां - त्या स्त्रीला - दृष्ट्‌वा - पाहून - विषज्जन्त्यां तस्यां - आकुंचित केलेल्या दृष्टीने आसक्ती दाखविणार्‍या त्या स्त्रीच्या ठिकाणी - किल - खरोखर - मनः - मन - चक्रे - ठेविता झाला. ॥२४॥

तया - तिने - अपहृतविज्ञानः - ज्याची विचारशक्ती हरण केली आहे असा - तत्कृतस्मरविह्वलः - उत्पन्न केलेल्या कामवासनेमुळे विव्हळ झालेला - गतह्लीः (भूत्वा) - निर्लज्ज होऊन - भवान्याः पश्यंत्याः अपि - पार्वती पाहात असताही - तत्पदं - तिच्याजवळ - ययौ - गेला. ॥२५॥

तं - त्या शंकराला - आयान्तं - येताना - आलोक्य - पाहून - भृशं - अत्यंत - व्रीडिता - लाजलेली - विवस्त्रा - नग्न - सा - ती स्त्री - वृक्षेषु - वृक्षांच्या आड - निलीयमाना - लपणारी - हसंती - हास्य करीत - अन्वतिष्ठत - उभी राहिली नाही. ॥२६॥

च - त्यानंतर - कामस्य - मदनाच्या - वशं - नियंत्रणात - नीतः - नेलेला - प्रमुषितेन्द्रियः - ज्याची इंद्रिये चोरली गेली आहेत असा - भगवान् - षड्‍गुणैश्वर्यसंपन्न - भवः - शंकर - यूथपः - हत्तीच्या कळपाचा नायक - करेणुम् इव - हत्तिणीकडे जातो तसा - तां अन्वगच्छत् - तिच्या मागोमाग गेला - सः - तो शंकर - अतिवेगेन - मोठया वेगाने - अनुव्रज्य - मागोमाग जाऊन - अनिच्छतीं - निष्काम अशा - स्त्रियं - त्या स्त्रीच्या - केशबंधे - वेणीला - गृहीत्वा - धरून - उपानीय - आणून - बाहुभ्यां - दोन भुजांनी - परिषस्वजे - आलिंगन देता झाला. ॥२७-२८॥

इतस्ततः - इकडेतिकडे - प्रसर्पन्ती - पळण्यासाठी धडपड करणारी - विप्रकीर्णशिरोरुहा - जिचे केस विस्कळित झाले आहेत अशी - सा - ती स्त्री - यथा - ज्याप्रमाणे - करिणा - हत्तीने - करिणी - हत्तीण - भगवता - शंकराकडून - उपगूढः - आलिंगिली गेली. ॥२९॥

अङग - हे परीक्षित राजा - पृथुश्रोणी - विशाल कटीची - देवविनिर्मिता - ईश्वराने निर्मिलेली - सा - ती - माया - मायिक स्त्री - सुरर्षभभुजान्तरात् - देवश्रेष्ठ शंकराच्या बाहूंच्या कचाटयांतून - आत्मानं - स्वतःला - मोचयित्वा - सोडवून घेऊन - प्राद्रवत् - पळाली. ॥३०॥

असौ - हा - रुद्रः - शंकर - वैरिणा कामेन - शत्रु अशा मदनाने - विनिर्जितः इव - जिंकिल्याप्रमाणे जणु - तस्य - त्या - अद्भुतकर्मणः - आश्चर्यजनक कृत्य करणार्‍या - विष्णोः - स्त्रीरूपी विष्णुच्या - पदवीं - मागोमाग - प्रत्यपद्यत - धावत सुटला. ॥३१॥

वासितां - ऋतूमती धेनूच्या - अनुधावतः - मागोमाग धावणार्‍या - यूथपस्य - कळपांचा नायक अशा - शुष्मिणः - पोळ सोडलेल्या बैलाच्या - इव - प्रमाणे - (तां स्त्रियं) अनुधावतः - त्या स्त्रीच्या मागोमाग धावत असता - अमोघरेतसः - ज्याचे वीर्य फुकट जावयाचे नाही अशा - तस्य - त्या शंकराचे - रेतः - वीर्य - चस्कंद - खाली पडले. ॥३२॥

महीपते - हे परीक्षित राजा - मह्यां - जमिनीवर - यत्र यत्र - ज्या ज्या ठिकाणी - महात्मनः तस्य - थोर मनाच्या त्या शंकराचे - रेतः - वीर्य - अपतत् - पडले - तानि - ती स्थाने - रूपस्य - चांदीच्या - च - आणि - हेम्नः - सोन्याच्या - क्षेत्राणि - खाणी - आसन् - झाल्या. ॥३३॥

सरित्सरस्सु - नद्या व सरोवरे या ठिकाणी - शैलेषु - पर्वतांच्या ठिकाणी - वनेषु - अरण्यांच्या ठिकाणी - च - आणि - उपवनेषु - बागबगीच्यात - यत्र - ज्या - क्वच - कोठेही - ऋषयः - ऋषि - आसन् - होते - तत्र - तेथे - हरः - शंकर - संनिहितः - गेला. ॥३४॥

नृपश्रेष्ठ - हे राजश्रेष्ठा - रेतसि स्कन्ने - वीर्य गळले असता - सः - तो शंकर - कश्मलात् - मोहापासून - संन्यवर्तत - माघारा फिरला - आत्मानं - स्वतःला - देवमायया - भगवंताच्या मायेने - जडीकृतं - वेडा बनविला असे - अपश्यत् - पाहाता झाला. ॥३५॥

अथ - नंतर - जगदात्मनः - जगाचा अंतर्यामी अशा - अपरिज्ञेयवीर्यस्य - ज्याचा पराक्रम जाणणे फारच कठीण आहे अशा - आत्मनः - परमेश्वराचे - अवगतमाहात्म्यः - जाणिले आहे माहात्म्य ज्याने असा - तत् - ते कर्म - उह - खरोखर - अद्भुतं - आश्चर्य करण्यासारखे - न मेने - मानिता झाला नाही. ॥३६॥

तं - त्या शंकराला - अविक्लबं - न गोंधळलेला - अव्रीडं - लज्जारहित असा - आलक्ष्य - पाहून - परमप्रीतः - अत्यंत प्रसन्न झालेला - मधुसूदनः - श्रीविष्णू - स्वां - स्वतःच्या - पौरुषीं - पुरुषरूपी - तनुं - शरीराला - बिभ्रत् - धारण करून - उवाच - म्हणाला. ॥३७॥

अङगविबुधश्रेष्ठ - हे देवश्रेष्ठा शंकरा - मे - माझ्या - स्त्रीरूपया - स्त्रीरूपी - मायया - मायेने - स्वैरं - यथेष्ठ - मोहितः अपि - मोहित झालेलाही - त्वं - तू - आत्मनः - स्वतःच्या योगे - स्वां - स्वतःच्या - निष्ठां - मूळस्थितीस - आस्थितः - प्राप्त झालास - (इति) यत् - हे जे घडले - (तत्) दिष्टया (एव) - ते मोठया सुदैवानेच होय. ॥३८॥

अकृतात्मभिः - अशुद्ध अंतःकरणाच्या लोकांना - दुस्तरां - तरून जाण्यास कठीण अशा - तान् तान् - त्या त्या - भावान् - पदार्थांना - विसृजतीं - निर्मिणार्‍या - मे मायां - माझ्या मायेला - त्वत् ऋते - तुझ्याशिवाय - कः नु - कोणता बरे - विषक्तः पुमान् - विषयासक्त पुरुष - अतितरेत् - तरून जाईल. ॥३९॥

कालेन - सृष्टयादिकांना निमित्तभूत अशा - मया - माझ्याकडून - कालरूपेण - कालस्वरूपाने - भागशः - भागाभागांनी - समेता - एकत्र आणिली गेलेली - सा - ती - इयं - ही - गुणमयी - त्रिगुणात्मिका - माया - माया - त्वां - तुला - न अभिभविष्यति - जिंकणार नाही. ॥४०॥

राजन् - हे राजा - श्रीवत्साङ्‌केन - श्रीवत्सलांछन धारण करणार्‍या - भगवता - श्रीविष्णुने - एवं - याप्रमाणे - सत्कृतः - सत्कारलेला शंकर - तं - त्या विष्णूला - आमंत्र्य - विचारून - परिक्रम्य - प्रदक्षिणा घालून - सगणः - आपल्या गणांसह - स्वालयं - आपल्या स्थानाला - ययौ - गेला. ॥४१॥

भारत - हे भरतकुलोत्पन्न राजा - अथ - नंतर - भगवान् - सर्वगुणसंपन्न - भवः - शंकर - ऋषिमुख्यानां शंसतां - मोठमोठे ऋषि प्रशंसा करीत असता - आत्मांशभूतां - स्वतःच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या - तां - त्या - मायां - मायेला उद्देशून - भवानीं - पार्वतीला - प्रीत्या - प्रेमाने - आचष्ट - म्हणाला. ॥४२॥

परदेवतायाः - श्रेष्ठ देवता अशा - अजस्य - जन्मरहित - परस्य - श्रेष्ठ - पुंसः - परमेश्वराची - मायां - माया - त्वं - तू - व्यपश्यः अपि - पाहिलीस काय ? - वशः - स्वतंत्र - कलानां - कलांचा - ऋषभः - अधिपती - अहं - मी - यथा - ज्या मायेने - विमुह्ये - मोहीत झालो - किम् उत अस्वतंत्राः अन्ये - मग परतंत्र असे जे दुसरे त्यांची काय कथा ? ॥४३॥

त्वं - तू - समासहस्रान्ते - हजार वर्षांच्या शेवटी - योगात् - योगामुळे - उपारतं - निद्रा घेणार्‍या - मां - मला - उपेत्य - प्राप्त होऊन - यं - ज्याविषयी - वै - खरोखर - अपृच्छः - विचारिलेस - सः - तो - एषः - हा - साक्षात् - प्रत्यक्ष - पुराणः - प्राचीन - पुरुषः (अस्ति) - पुरुष होय - यत्र - जेथे - कालः - काळ - न - नाही - वेदः - वेद - न विशते - प्रवेश करीत नाहीत. ॥४४॥

तात - बा परीक्षित राजा - ते - तुला - इति - याप्रमाणे - शार्ङगधन्वनः - शार्ङग धनुष्य धारण करणार्‍या परमेश्वराचा - विक्रमः - पराक्रम - अभिहितः - सांगितला - येन - ज्याने - सिंधोःनिर्मथने - समुद्राच्या मंथन काळी - पृष्ठे - पाठीवर - महाचलः - मोठा पर्वत - धृतः - धरिला. ॥४५॥

एतत् - हे चरित्र - मुहुः - वारंवार - कीर्तयतः - कथन करणार्‍या - अनुशृण्वतः - श्रवण करणार्‍या - समुद्यमः - सदुद्योग - जातु - कधीही - क्वचित् - कोठेही - न रिष्यते - भंग पावत नाही - यत् - कारण - उत्तमश्लोकगुणानुवर्णनं - भगवंताच्या गुणांचे वर्णन - समस्तसंसारपरिश्रमापहं - संपूर्ण संसारजन्य श्रमांचे निरसन करणारे आहे. ॥४६॥

यः - जो विष्णू - कपटयुवतिवेषः - कपटाने स्त्रीवेष घेतलेला - सुरारीन् मोहयन् - देवांच्या शत्रूंना मोहित करीत - असदविषयं - असत् पदार्थाला अगोचर अशा - भावगम्यं - भक्तीने मिळणार्‍या - अंघ्रिं - चरणांना - प्रपन्नान् - शरण आलेल्या - अमरवर्यान् - श्रेष्ठ देवांना - सिंधुमथ्यं - समुद्रमंथन करून काढिलेले - अमृतं - अमृत - आशयत् - पाजिता झाला - तं - त्या - उपसृतानां - शरण आलेल्यांच्या - कामपूरं - इच्छा पूर्ण करणार्‍या - अहं - मी - नतः - नम्र - अस्मि - आहे. ॥४७॥

अष्टमः स्कन्धः - अध्याय बारावा समाप्त

GO TOP