|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ११ वा - अन्वयार्थ
देवासुर संग्रामाची समाप्ती - अथो - नंतर - शक्रसमीरणादयः - इंद्र, वायु आदिकरून - सुराः - देव - परस्य पुंसः परया अनुकम्पया - श्रेष्ठ ईश्वराच्या अत्यंत कृपेने - प्रत्युपलब्धचेतसः - ज्यांची अंतःकरणे परत ठिकाणावर आली आहेत असे - पुरा - पूर्वी - रणे - युद्धात - यैः - ज्यांच्याकडून - अभिसंहताः - मारिले गेले - तान् तान् - त्यांना त्यांना - भृशं - अत्यंत - जघ्नुः - मारिते झाले. ॥१॥ संरब्धः - खवळलेला - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - पाकशासनः - इंद्र - यदा - जेव्हा - वैरोचनाय - बलिराजावर - वज्रं - वज्र - उदयच्छत् - उचलिता झाला - प्रजाः - प्रजा - हाहा इति - हा हा असा - चुक्रुशुः - आक्रोश करू लागल्या. ॥२॥ वज्रपाणिः - इंद्र - महामृधे - महायुद्धात - पुरः स्थितं - पुढे उभा असलेल्या - मनस्विनं - थोर मनाच्या - सुसंपन्नं - सर्व संपत्तीने युक्त - विचरंतं - संचार करणार्या - तं - त्या बलिराजाचा - तिरस्कृत्य - तिरस्कार करून - इदं - हे - आह - बोलला. ॥३॥ मूढ - हे मूर्खा - नटवत् - नाटक्याप्रमाणे - मायाभिः - मायांनी - मायेशान् - मायेचे अधिपति अशा - नः - आम्हांला - जिगीषसि - जिंकिण्यास इच्छितोस काय - नटः - सोंगाडया पुरुष - बद्धाक्षान् - डोळे बांधलेल्या - बालान् - लहान मुलांना - जित्वा - जिंकून - तद्धनं - त्यांच्या द्रव्याला - हरति - हरण करितो. ॥४॥ ये - जे - मायाभिः - कपटांनी - दिवं - स्वर्गावर - आरुरुक्षन्ति - चढू इच्छितात - च - आणि - उत्सिसृप्सन्ति - उल्लंघिण्याची इच्छा करितात - तान् - त्या - अज्ञान् - मूर्ख - पूर्वस्मात् - पूर्वीच्या - पदात् - स्थानापासून - अधः - खाली - विधुनोमि - ढकलितो. ॥५॥ मंदात्मन् - हे मंदबुद्धे - सः - तो - अहं - मी - अद्य - आज - शतपर्वणा - शंभर गाठीच्या - वज्रेण - वज्राने - दुर्मायिनः ते - अत्यंत कपटी अशा तुझे - शिरः - मस्तक - हरिष्ये - हरण करीन - ज्ञातिभिः सह - ज्ञातीसह - घटस्व - रक्षणाचा उद्योग कर. ॥६॥ सङ्ग्रामे - युद्धभूमीवर - वर्तमानानां - असणार्या - कालचोदितकर्मणां - कालाने प्रेरिली आहेत कर्मे ज्यांची अशा - सर्वेषां - सर्वांना - कीर्तिः - कीर्ति - जयः - विजय - अजयः - पराजय - मृत्यूः - मृत्यु - अनुक्रमात् - अनुक्रमाने - स्युः - प्राप्त होतात. ॥७॥ सूरयः - विद्वान - जनाः - लोक - तत् - त्या - इदं - ह्या - कालरशनं - कालरूपी पाशाला - पश्यन्ति - पाहतात - न हृष्यन्ति - आनंदित होत नाहीत - न शोचन्ति - शोक करीत नाहीत - तत्र - त्या बाबतीत - यूयं - तुम्ही - अपण्डिताः - अज्ञानी आहा. ॥८॥ वयं - आम्ही - तत्र - त्या जयापजयादिकांच्या बाबतीत - आत्मानं - स्वतःलाच - साधनं - कारणीभूत - मन्यमानानां - मानणार्या - साधुशोच्यानां - ज्यांच्याबद्दल साधूंना फार वाईट वाटते अशा - वः - तुमचे - मर्मताडनाः - मर्मभेदक असे - गिरः - शब्द - न गृह्णीमः - स्वीकारीत नाही. ॥९॥ वीरमर्दनः - वीरांना मारणारा - वीरः - पराक्रमी बलि - इति - याप्रमाणे - विभुं - इंद्राला - आक्षिप्य - निंदून - आक्षेपैः - निंदाजनक शब्दांनी - आहतं - ताडिलेल्या - पुनः - पुनः - आकर्णपूर्णैः - कानापर्यंत ओढून सोडिलेल्या - नाराचैः - बाणांनी - अहनत् - ताडिता झाला. ॥१०॥ तथ्यवादिना - सत्यभाषी - वैरिणा - शत्रूने - एवं - याप्रमाणे - निराकृतः - निर्भर्त्सना केलेला - देवः - इंद्र - तोत्राहतः द्विपः इव - अंकुशाने टोचिलेल्या हत्तीप्रमाणे - तदधिक्षेपं - त्याच्या निंदाजनक शब्दाला - न अमृष्यत् - सहन करिता झाला नाही. ॥११॥ परमर्दनः - शत्रुनाशक इंद्र - तस्मै - त्या बलिराजाकडे - अमोघं - फुकट न जाणारे - कुलिशं - वज्र - प्राहरत् - फेकिता झाला - छिन्नपक्षः अचलः इव - पंख तुटलेल्या पर्वताप्रमाणे - सयानः - वाहनासहित - भूमौ - पृथ्वीवर - न्यपतत् - पडला. ॥१२॥ बलिसखः - बलिराजाचा सहाय्यक - सुहृत् - मित्र - जंभः - जंभासुर - सखायं - मित्राला - पतितं - पडलेला - दृष्ट्वा - पाहून - हतस्य अपि - पडलेल्याही - सख्युः - मित्राचे - सौहृदं - मित्रकार्य - समाचरन् - आचरण करीत - अभ्ययात् - चाल करून गेला. ॥१३॥ सुमहाबलः - अत्यंत बलिष्ठ - सिंहवाहः - सिंहावर बसलेला - सः - तो जंभासुर - गदां - गदा - उद्यम्य - उचलून - रंहसा - वेगाने - आसाद्य - जवळ जाऊन - शक्रं - इंद्राला - गजं च - आणि ऐरावताला - जत्रौ - मानेवर - अताडयत् - ताडिता झाला. ॥१४॥ गदाप्रहारव्यथितः - गदेच्या प्रहाराने पीडिलेला - भृशं - अत्यंत - विह्वलितः - विव्हळ झालेला - गजः - हत्ती - जानुभ्यां - गुडघ्यांनी - धरणीं - जमिनीला - स्पृष्ट्वा - स्पर्श करून - परमं - मोठी - कश्मलं - मूर्च्छा - ययौ - पावला. ॥१५॥ ततः - नंतर - मातलिना - मातालिनामक सारथ्याकडून - दशशतैः हरिभिः - हजार घोडयांनी - वृतः - वेष्टिलेला - रथः - रथ - आनीतः - आणिला गेला - विभुः - इंद्र - द्विपं - गजाला - उत्सृज्य - सोडून - रथं - रथावर - आरुरुहे - चढला. ॥१६॥ तस्य यंतुः - त्या सारथ्याचे - तत् - ते - कर्म - कर्म - पूजयन् - प्रशंसिणारा - दानवसत्तमः - श्रेष्ठदैत्य जंभासुर - स्मयमानः - आश्चर्य करीत - मृधे - युद्धभूमीवर - ज्वलता शूलेन - पेटणार्या शूळाने - तं तु - त्या इंद्राला तर - अहनत् - ताडिता झाला. ॥१७॥ मातलिः - इंद्राचा सारथी - सत्त्वं - धैर्य - अवलम्ब्य - धरून - सुदुर्मषां - असह्य अशा - रुजं - पीडेला - सेहे - सहन करिता झाला - इंद्रः - इंद्र - संक्रुद्धः (सन्) - अत्यंत रागावून - वज्रेण - वज्राने - जंभस्य - जंभाचे - शिरः - मस्तक - अपाहरत् - तोडिता झाला. ॥१८॥ नमुचिः - नमुचि - बलः - बल - च - आणि - पाकः - पाक - तस्य - त्या जंभाचे - ज्ञातयः - संबंधी - नारदात् ऋषेः - नारद ऋषीपासून - जंभं - जंभ - हतं - मेला असे - श्रुत्वा - ऐकून - त्वरान्विताः - त्वरेने - तत्र - तेथे - आपेतुः - आले. ॥१९॥ परुषैः - कठोर - वचोभिः - भाषणांनी - इंद्रं - इंद्राला - अर्दयन्तः - पीडा देणारे - मेघाः धाराभिः पर्वतम् इव - मेघ (पावसाच्या) धारांनी जसे पर्वताला तसे - अस्य - ह्याच्या - मर्मसु - मर्मांवर - शरैः - बाणांनी - अवाकिरन् - वृष्टि करिते झाले. ॥२०॥ लघुहस्तवान् - कुशल हाताने युद्ध करणारा - बलः - बलदैत्य - आजौ - युद्धात - हर्यश्वस्य - इंद्राच्या - दशशतानि हरीन् - हजार घोडयांना - तावद्भिः - तितक्याच - शरैः - बाणांनी - युगपत् - एकदम - अर्दयामास - घायाळ करिता झाला. ॥२१॥ पाकः - पाकदैत्य - सकृत्संधानमोक्षेण - एकदमच जोडून सोडलेल्या - शताभ्यां (बाणैः) - दोनशे बाणांनी - मातलिं - इंद्राच्या सारथ्याला - च - आणि - सावयवं रथं - चाक, आसादि अवयवांसह रथ - पृथक् - वेगवेगळा - अर्दयामास - ताडिता झाला - रणे - युद्धभूमीवर - तत् - ते कृत्य - अद्भुतं - आश्चर्यजनक - अभूत् - झाले. ॥२२॥ सतोयः - जलाने भरलेल्या - तोयदः इव - मेघाप्रमाणे - संख्ये - युद्धांत - नमुचिः - नमुचि दैत्य - पञ्चदशभिः स्वर्णपुङ्खैः - पंधरा सुवर्णाच्या मुठी बसविलेले - महेषुभिः - मोठमोठया बाणांनी - आहत्य - ताडित करून - व्यनदत् - मोठयाने ओरडला. ॥२३॥ अंबुदाः - मेघ - प्रावृट्सूर्यम् इव - वर्षाऋतूतील सूर्याला जसे तसे - असुराः - दैत्य - सर्वतः - चोहोकडून - शरकूटेन - बाणसमूहाने - सरथसारथिं - रथ व सारथि यांसह - शक्रं - इंद्राला - छादयामा - आच्छादून टाकिते झाले. ॥२४॥ तं - त्या इंद्राला - अलक्षयन्तः - न पाहाणारे - अतीवविह्वलाः - अत्यंत विव्हळ झालेले - अनायकाः - अनाथ असे - शत्रुबलेन - शत्रुसैन्याने - निर्जिताः - जिंकिलेले - सहानुगाः - अनुचरांसह - देवगणाः - देवसमुदाय - यथा - ज्याप्रमाणे - अर्णवे - समुद्रात - भिन्ननवः - नौका फुटून गेलेले - वणिक्पथाः - व्यापारी - विचुक्रुशुः - आक्रोश करू लागले. ॥२५॥ ततः - नंतर - तुराषाट् - इंद्र - इषुबन्धपञ्जरात् - बाणाने तयार केलेल्या पिंजर्यांतून - साश्वरथध्वजाग्रणीः - घोडे, रथ, ध्वज व सारथी यांसह - विनिर्गतः - बाहेर निघाला - क्षपात्यये - रात्र संपल्यानंतर - सूर्यः इव - सूर्य जसा तसा - स्वतेजसा - आपल्या तेजाने - दिशः - सर्व दिशांना - खं - आकाशाला - च - आणि - पृथिवीं - पृथ्वीला - रोचयन् - प्रकाशित करणारा - बभौ - शोभला. ॥२६॥ वज्रधरः - इंद्र - देवः - देव - रणे - युद्धात - पृतनां - सेना - परैः - शत्रूंनी - अभ्यर्दितां - पीडिली असे - निरीक्ष्य - पाहून - रुषा - रागाने - रिपुं - शत्रूला - हन्तुं - मारण्याकरिता - वज्रं - वज्र - उदयच्छत् - उचलिता झाला. ॥२७॥ राजन् - हे परीक्षित राजा - सः - तो इंद्र - पश्यतां ज्ञातीनां - पाहणार्या आप्तेष्टांना - भयं - भीती - जनयन् - दाखवीत - अष्टधारेण तेन एव - आठ धारांच्या त्या वज्रानेच - बलपाकयोः - बल व पाक या दोन दैत्यांची - शिरसी - मस्तके - जहार - हरण करिता झाला. ॥२८॥ नृपते - हे परीक्षित राजा - तद्वधं - त्या दोघांचा नाश - दृष्ट्वा - पाहून - शोकामर्षरुषा - शोक, त्वेष व क्रोध ह्यांनी - अन्वितः - युक्त - नमुचिः - नमुचि दैत्य - इंद्रं - इंद्राला - जिघांसुः - मारण्याची इच्छा करणारा - परमोद्यमं - मोठा उद्योग - चकार - करिता झाला. ॥२९॥ क्रुद्धः - रागावलेला - सः - तो नमुचि दैत्य - अश्मसारमयं - पोलादी - घण्टावत् - घंटा लावलेला - हेमभूषणं - सोन्याने मढविलेला - शूलं - शूळ - प्रगृह्य - घेऊन - हतः असि - मेलास - इति - असे - वितर्जयन् - निर्भत्सनापूर्वक म्हणत - अभ्यद्रवत् - धावला - मृगराट् इव - सिंहाप्रमाणे - निनदन् - गर्जना करीत - देवराजाय - इंद्राच्या अंगावर - प्राहिणोत् - फेकता झाला. ॥३०॥ नृप - हे परीक्षित राजा - त्रिदशपतिः - देवांचा राजा - हरिः - इंद्र - रुषा - क्रोधाने - अन्वितः - युक्त झालेला - गगनतले - आकाशात - आपतत् - येणार्या - महाजवं - मोठया वेगवान - तत् - त्या शूळाला - सहस्रधा - हजार प्रकारांनी - इषुभिः - बाणांनी - विचिच्छिदे - तोडिता झाला - शिरः - मस्तक - हरन् - तोडणारा असा - कुलिशेन - वज्राने - तं - त्या नमुचि दैत्याला - कंधरे - मानेवर - आहनत् - प्रहार करिता झाला. ॥३१॥ सुरपतिना - इंद्राने - ओजसा - जोराने - यः - जे - ऊर्जितः - बलाढय - वज्रः - वज्र - ईरितः - फेकिले - सः - ते - तस्य - त्या नमुचि दैत्याच्या - त्वचम् अपि - कातडीलासुद्धा - न विभेदः - तोडू शकले नाही - तत् - ते - परम् - अत्यंत - अद्भुतं (आसित्) - आश्चर्य होय - हि - कारण - अतिवीर्यवृत्रभित् - अत्यंत पराक्रमी अशा वृत्रासुराला मारणारे - नमुचि शिरोघरत्वचा - नमुचि दैत्याच्या मानेच्या कातडीने - तिरस्कृतः - धिःकारिले. ॥३२॥ यतः - ज्याअर्थी - वज्रः - वज्र - प्रतिहतः - कुंठित झाले - तस्मात् - त्याअर्थी - इंद्रः - इंद्र - शत्रोः - शत्रूला - अबिभेत् - भ्याला - लोकविमोहनं - लोकाला मोहित करणारे - इदं - हे - दैवयोगेन - दैवयोगाने - किं भूतं - काय घडले. ॥३३॥ मे - मी - पूर्वं - पूर्वी - प्रजात्यये - प्रजांचा नाश होऊ लागला असता - येन - ज्या वज्राने - पतत्रैः - पंखांनी - पततां - उडणार्या - भारैः - जडपणामुळे - भुवि - पृथ्वीवर - निविशतां - बसणार्या - अद्रीणां - पर्वतांच्या - पक्षच्छेदः - पक्षांचा नाश - कृतः - केला. ॥३४॥ येन - ज्या वज्राने - सारमयं - अत्यंत कठीण - त्वाष्ट्रं - त्वष्टयाचे - तपः - तपच की काय असा - वृत्रः - वृत्रासुर - विपाटितः - फाडून टाकिला - च - आणि - बलोपेताः - बलिष्ठ असे - सर्वास्रैः - दुसर्या सर्व अस्रांनी - अक्षतत्वचः - ज्यांची कातडी फाटली नाही असे - अन्ये अपि - दुसरे सुद्धा. ॥३५॥ सः - ते - अयं - हे - अल्पके - क्षुद्र - असुरे - दैत्यावर - मया - मी - मुक्तः - सोडिलेले - वज्रः - वज्र - प्रतिहतः - कुंठित झाले - अहं - मी - ब्रह्मतेजः अपि - ब्राह्मणाचे तेज अशाही - अकारणं - निरुपयोगी झालेल्या - दंडं - दंडाप्रमाणे - तत् - त्या वज्राला - न आददे - घेणार नाही. ॥३६॥ इति - याप्रमाणे - विषीदन्तं - खेद करणार्या - शक्रं - इंद्राला - अशरीरिणी वाक् - आकाशवाणी - आह - म्हणाली - अयं - हा - दानवः - नमुचि दैत्य - शुष्कैः - सुकलेल्या पदार्थांनी - वधं - मारण्याला - न अर्हति - योग्य नाही - अथो - त्याचप्रमाणे - आर्द्रैः - ओल्या पदार्थांनी - न (हन्येत्) - मरणार नाही. ॥३७॥ यत् - ज्याअर्थी - मया - माझ्याकडून - अस्मै - ह्या नमुचि दैत्याला - आर्द्रशुष्कयोः - ओल्या व सुकलेल्या पदार्थाने - मृत्यूः - मृत्यू - न एव (भवेत्) - येणारच नाही - इति - असा - वरः - वर - दत्तः - दिला गेला आहे - अतः - त्याअर्थी - मघवन् - हे इंद्रा - ते - तुझ्या - रिपोः - शत्रूच्या - वघे - नाशाविषयी - अन्यः - दुसरा - उपायः - उपाय - चिन्तनीयः - शोधून काढिला पाहिजे. ॥३८॥ तां - त्या - दैवीं - आकाशापासून निघालेल्या - गिरं - वाणीला - आकर्ण्य - ऐकून - सुसमाहितः - सावध झालेला - मघवान् - इंद्र - ध्यायन् - विचार करीत - अथ - नंतर - उभयात्मकं - ओला व कोरडा दोन्ही मिळून असणारा - फेनं - फेस - उपायं - उपाय - अपश्यन् - पाहता झाला. ॥३९॥ न शुष्केण न च आर्द्रेण - कोरडा नाही आणि ओला नाही अशा - नमुचेः - नमुचीचे - शिरः - मस्तक - जहार - हरण करिता झाला - मुनिगणाः - ऋषिसमुदाय - तं - त्या - विभुं - इंद्राला - तुष्टुवुः - स्तविते झाले - च - आणि - माल्यैः - फुलांनी - अवाकिरन् - वर्षाव करिते झाले. ॥४०॥ गन्धर्वमुख्यौ - गंधर्वश्रेष्ठ - विश्वावसुपरावसू - विश्वावसु व परावसू - जगतुः - गाऊ लागले - देवदुन्दुभयः - देवांच्या दुंदुभि - नेदुः - वाजू लागल्या - नर्तक्यः - नाचणार्या स्त्रिया - मुदा - आनंदाने - ननृतुः - नाचू लागल्या. ॥४१॥ एवं - याप्रमाणे - अन्ये अपि - दुसरेही - वाय्वग्निवरुणादयः - वायु, अग्नी, वरुण आदिकरून - यथा - जसे - केसरिणः - सिंह - मृगान् - हरिणांना - अस्रौघैः - अस्रांच्या समूहांनी - प्रतिद्वन्द्वान् - शत्रूंना - सूदयामासुः - मारिते झाले. ॥४२॥ नृप - हे परीक्षित राजा - ब्रह्मणा - ब्रह्मदेवाने - देवान् - देवांकडे - प्रेषितः - पाठविलेला - देवर्षिः - देवर्षि - नारदः - नारद - दानवसंक्षयं - दैत्यांच्या नाशाला - दृष्ट्वा - अवलोकन करून - विबुधान् - देवांना - वारयामास - निवारिता झाला. ॥४३॥ नारायणभुजाश्रयैः - भगवंताच्या बाहूंचा आश्रय करणार्या - भवद्भिः - तुम्ही - अमृतं - अमृत - प्राप्तं - मिळविले - श्रिया - ऐश्वर्याने - समेधिताः - वाढलेले - सर्वे - तुम्ही सर्व - विग्रहात् - युद्धापासून - उपारमत - विराम पावा. ॥४४॥ मन्युसंरम्भं - क्रोधावेशाला - संयम्य - आवरून धरून - मुनेः - नारदमुनींचे - वचः - भाषण - मानयन्तः - मानणार्या - अनुचरैः - सेवकांनी - उपगीयमानाः - वर्णिलेले - सर्वे - सर्व देव - त्रिविष्टपं - स्वर्गाला - ययुः - जाते झाले. ॥४५॥ तस्मिन् - त्या - रणे - युद्धात - ये - जे - अवशिष्टाः - उरले - ते - ते दैत्य - नारदानुमतेन - नारदाच्या सांगण्यावरून - विपन्नं - संकटात असलेल्या - बलिं - बलिराजाला - आदाय - घेऊन - अस्तं - पश्चिमेकडील - गिरिं - पर्वतावर - उपागमन् - गेले. ॥४६॥ तत्र - तेथे - उशना - शुक्राचार्य - अविनष्टावयवान् - ज्याचे अवयव नष्ट झालेले नव्हते अशा - विद्यमानशिरोधरान् - ज्यांची मस्तके शाबूत होती अशा दैत्यांना - संजीविन्या - संजीविनिनामक - स्वविद्यया - आपल्या विद्येने - जीवयामास - जिवंत करिता झाला. ॥४७॥ च - आणि - उशनसा - शुक्राचार्याने - स्पृष्टः - स्पर्शिल्यामुळे - प्रत्यापन्नेन्द्रियस्मृतिः - इंद्रियांना तरतरी येऊन ज्याला पूर्वीचे स्मरण झाले आहे असा - बलिः - बलिराजा - पराजितः अपि - पराजय पावला होता तरीही - लोकतत्त्वविचक्षणः - लोकस्थिती उत्तम जाणणारा असा असल्यामुळे - न अखिद्यत् - खिन्न झाला नाही. ॥४८॥ अष्टमः स्कन्धः - अध्याय अकरावा समाप्त |