|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १० वा - अन्वयार्थ
देवासुर संग्राम - नृप - हे राजा - इति - याप्रमाणे - कर्मणि युक्ताः - कार्यामध्ये लागलेले - यत्ताः - दक्ष - च - आणि - (किन्तु) वासुदेवपराङ्मुखाः - पण परमेश्वराची भक्ती न करणारे - दानवदैतेयाः - दानव व दैत्य - अमृतं - अमृत - न अविंदन् - मिळविते झाले नाहीत. ॥१॥ राजन् - हे परीक्षित राजा - गरुडवाहनः - गरुड आहे वाहन ज्याचे असा श्रीविष्णु - अमृतं - अमृत - साधयित्वा - मिळवून - स्वकान् - आपले भक्त अशा - सुरान् - देवांना - पाययित्वा - पाजून - सर्वभूतानां पश्यतां - सर्व प्राणी पाहात असता - ययौ - गेला. ॥२॥ सपत्नानां - शत्रू अशा देवाची - परां ऋद्धिं - अत्यंत समृद्धि - दृष्ट्वा - पाहून - अमृष्यमाणः - सहन न करणारे - ते - ते - दितिनन्दनाः - दैत्य - देवानां प्रति - देवांना उद्देशून - उद्यतायुधाः - हातात शस्त्रास्त्रे धारण केलेले - उत्पेतुः - वर उठले. ॥३॥ ततः - नंतर - नारायणपदाश्रयाः - भगवंताच्या चरणांचा आश्रय आहे ज्यांना असे - पीतया सुधया - प्यालेल्या अमृताने - एधिताः - वृद्धी पावलेले - सर्वे - सर्व - सुरगणाः - देवगण - शस्त्रैः - शस्त्रांनी - (दैत्यान्) प्रतिसंयुयुधुः - दैत्यांबरोबर लढू लागले. ॥४॥ राजन् - हे परीक्षित राजा - तत्र - त्या - उदन्वतः - समुद्राच्या - रोधसि - किनार्यावर - नाम - खरोखर - दैवासुरः - देव व दैत्य यामधील - परमदारुणः - फारच घनघोर - रोमहर्षणः - अंगावर शहारे उठविणारे - तुमुलः - तुंबळ - रणः - युद्ध. ॥५॥ तत्र - त्या - रणे - युद्धात - संरब्धमनसः - खवळून गेली आहेत अंतःकरणे ज्यांची असे - ते - ते - सपत्नाः - शत्रु - अन्योन्यं - एकमेकांना - समासाद्य - गाठून - असिभिः - तरवारींनी - बाणैः - बाणांनी - विविधायुधैः च - आणि दुसर्या अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी - निजघ्रुः - प्रहार करिते झाले. ॥६॥ शङ्खतूर्यमृदङ्गानां - शंख, तुतार्या, व मृदंग ह्यांचा - भेरीडमरिणां - नौबद व डमरू ह्यांचा - नदतां हस्त्यश्वरथपत्तीनां (च) - आणि गर्जना करणार्या हत्ती, घोडे, रथ व पायदळ यांचा - महान् निःस्वनः - मोठा गोंगाट - अभवत् - झाला. ॥७॥ रथिनः - रथी - रथिभिः - रथींबरोबर - पत्तयः - पायदळ - पत्तिभिः सह - पायदळांबरोबर - हयाः - घोडेस्वार - हयैः - घोडेस्वारांबरोबर - च - आणि - इभाः - हत्तीस्वार - इभैः - हत्तीस्वारांबरोबर - तत्र संयुगे - त्या युद्धांत - समसज्जंत - एकमेकांशी लगट करिते झाले. ॥८॥ केचित् - कित्येक - उष्ट्रैः - उंटांनी - केचित् - कित्येक - भटाः - योद्धे - गौरमृगैः - गौरमृगांनी - ऋक्षैः - अस्वलांनी - द्वीपिभिः - वाघांनी - हरिभिः - सिंहांनी - युयुधुः - युद्ध करू लागले. ॥९॥ अन्ये - दुसरे - गृधैः - गिधाडांनी - कंकैः - कंकांनी - बकैः - बकांनी - श्येनभासैः - ससाणे व भास यांनी - तिमिङगलैः - तिमिंगिल नावाच्या जलचरांनी - शरभैः - शंरभांनी - महिषैः - महिषांनी - खङगैः - गेंडयांनी - गोवृषैः - मोठमोठया बैलांनी - गवयारुणैः - गवे व अरुण नावाचे रानटी पशु ह्यांनी - युयुधुः - लढले. ॥१०॥ केचित् - कित्येक - शिवाभिः - कोल्ह्यांनी - आखुभिः - उंदरांनी - कृकलासैः - सरडयांनी - शशैः - सशांनी - नरैः - मनुष्यांनी - एके - कित्येक - बस्तैः - बोकडांनी - अन्ये - दुसरे - कृष्णसारैः - काळविटांनी - हंसैः - हंसांनी - च - आणि - सूकरैः - डुकरांनी. ॥११॥ अन्ये - दुसरे - स्थलजलखगैः - पाण्यात, जमिनीवर व आकाशात संचार करणार्या प्राण्यांनी - विकृतविग्रहैः सत्त्वैः - भयंकर शरीराच्या प्राण्यांनी - राजन् - हे राजा - ते - ते - उभयोः - दोन्ही - सेनयोः - सैन्यांच्या - अग्रतः अग्रतः - पुढे पुढे - विविशुः - शिरले. ॥१२॥ राजन् - हे राजा - चित्रध्वजपटैः - चित्रविचित्र पताकांच्या वस्त्रांनी - सितामलैः आतपत्रैः महाधनैः वज्रदंडैः व्यजनैः - पांढर्या स्वच्छ छत्रांनी व अत्यंत मौल्यवान हिर्यांचे दांडे असलेल्या पंख्यांनी - बार्हचामरैः - मोरांच्या पिसांच्या चवर्यांनी - वातोद्धूतोत्तरोष्णीषैः - वार्यांनी उडणारी उपरणी व मुकुट यांनी - अर्चिभिः वर्मभूषणैः - तेजःपुंज कवच व अलंकार यांनी - सूर्यरश्मिभिः - सूर्यकिरणांनी - सुतरां स्फुरद्भिः विशदैः शस्त्रैः - अत्यंत चकचकणार्या निर्मळ शस्त्रांनी - पाण्डुनन्दन - हे पांडुपुत्रा परीक्षिता - सागरौ - दोन समुद्र - यादसाम् (मालाभिः) इव - जलचरांच्या थव्यांनी शोभावे तशा - देवदानववीराणां - पराक्रमी देव व दैत्य यांच्या - ध्वजिन्यौ - दोन सेना - वीरमालाभिः - पराक्रमी पुरुषांच्या रांगांनी - रेजतुः - शोभल्या. ॥१३-१५॥ प्रभो - हे परीक्षित राजा - असुराणां - दैत्यांचा - चमूपतिः - सेनापती - वैरोचनः - विरोचनाचा मुलगा - सः - तो - बलिः - बलि - संख्ये - युद्धामध्ये - वैहायसं नाम - ‘वैहायस’ नावाच्या आकाशात उडणार्या - कामगं - इच्छेप्रमाणे चालणार्या - मयनिर्मितं - मयासुराने निर्मिलेल्या - यानं - वाहनात - आस्थितः - बसला. ॥१६॥ सर्वसाङ्ग्रामिकोपेतं - सर्व प्रकारच्या युद्धसामुग्रीने भरलेल्या - सर्वाश्चर्यमयं - सर्व आश्चर्यकारक वस्तूंनी युक्त अशा - अप्रतर्क्यं - कल्पनातीत - अनिर्देश्यं - अमुकच ठिकाणी आहे असे दाखविता येणार नाही अशा - दृश्यमानं - क्षणात दृष्टिगोचर होणार्या - अदर्शनं - क्षणात न दिसणार्या - यानं - वाहण्याचे कार्य करणार्या - तत् - त्या - विमानाग्र्यं - श्रेष्ठ विमानात - आस्थितः - बसलेला - सर्वानीकाधिपैः वृतः - सर्व सेनाधिपतींनी वेष्टिलेला - वालव्यजनछत्राग्र्यैः - चवर्या, पंखे, व मोठमोठी छत्रे यांच्या योगाने - उदये चंद्रः इव - उदयकाळी चंद्र जसा तसा - रेजे - शोभला. ॥१७-१८॥ तस्य - त्या बलिराजाचे - यूथानां - सैन्यांचे - पतयः - अधिपती - असुराः - दैत्य - यानैः - आपल्या वाहनांवर बसून - सर्वतः - सभोवार - आसन् - सिद्ध होते - नमुचिः - नमुचि - शंबरः - शंबर - बाणः - बाण - विप्रचित्तिः - विप्रचित्ति - अयोमुखः - अयोमुख - द्विमूर्धा - द्विमूर्धा - कालनाभः - कालनाभ - अथ - त्याचप्रमाणे - प्रहेतिः - प्रहेति - हेतिः - हेति - इल्वलः - इल्वल - शकुनिः - शकुनि - भूतसंतापः - भूतसंताप - वज्रदंष्ट्रः - वज्रदंष्ट्र - विरोचनः - विरोचन - हयग्रीवः - हयग्रीव - शंकुशिराः - श्ंकुशिरा - कपिलः - कपिल - मेघदुंदुभिः - मेघदुंदुभि - तारकः - तारक - चक्रदृक् - चक्रदृक् - शुंभः - शुंभ - निशुंभः - निशुंभ - जंभः - जंभ - उत्कलः - उत्कल - अरिष्टः - अरिष्ट - च - आणि - अरिष्टनेमिः - अरिष्टनेमि - च - आणि - त्रिपुराधिपः मयः - तीन नगरांचा स्वामी मय - अन्ये - दुसरे - पौलोमकालेयाः - पौलोम व कालेय या नावाचे - निवातकवचादयः - निवातकवच आदिकरून - सोमस्य अलब्धभागाः - अमृताचा भाग ज्यांना मिळाला नाही असे - केवलं - फक्त - क्लेशभागिनः - श्रमाचे भागीदार झालेले - सर्वे - सर्व - एते - हे - बहुशः - बहुतेक - रणमुखे - युद्धाच्या अग्रभागी - निर्जितामराः - जिंकिले आहेत देव ज्यांनी असे - सिंहनादान् विमुञ्चन्तः - सिंहनाद करणारे - महारवान् शंखान् - मोठा शब्द करणारे शंख - दध्मुः - वाजविते झाले - बलभित् - इंद्र - सपत्नान् उत्सिक्तान् दृष्ट्वा - शत्रु उच्छृंखल झालेले पाहून - भृशं - अत्यंत - कुपितः - रागावला. ॥१९-२४॥ यथा - ज्याप्रमाणे - स्रवत्प्रस्रवणं उदयाद्रिं (आरूढः) - ज्याच्यापासून अनेक झरे पाझरत आहेत अशा उदयाचल पर्वतावर उगवलेला - अहर्पतिः - सूर्य - ऐरावतं - ऐरावतनामक - दिक्करिणं - दिग्गजावर - आरूढः - बसलेला - स्वराट् - स्वर्गाधिपति इंद्र - शुशुभे - शोभला. ॥२५॥ नानावाहध्वजायुधाः - अनेक प्रकारची वाहने, पताका व शस्त्रास्त्रे ज्यांच्याजवळ आहेत असे - लोकपालाः - लोकपाल - वाय्वग्निवरुणादयः - वायु, अग्नि, वरूण इत्यादि - देवाः - देव - गणैः सह - आपापल्या गणांसह - तस्य - त्या इंद्राच्या - सर्वतः - सभोवार - आसन् - होते. ॥२६॥ ते - ते - अन्योन्यं - परस्परांना - अभिसंसृत्य - गाठून - मर्मभिः - मर्मभेदक शब्दांनी - मिथः - एकमेकांना - क्षिपन्तः - निंदिणारे - आह्वयन्तः - एकमेकांला युद्धाकरिता बोलावणारे - अग्रे - पुढे पुढे - विशन्तः - घुसणारे - द्वन्द्वयोधिनः - जोडीजोडीने युद्ध करणारे - युयुधुः - लढू लागले. ॥२७॥ बलिः - बलिराजा - इंद्रेण - इंद्राबरोबर - युयोध - लढू लागला - गुहः - कार्तिकस्वामी - तारकेण - तारकासुराबरोबर - अस्यत - आयुधे फेकून लढला - राजन् - हे परीक्षित राजा - वरुणः - वरुण - हेतिना - हेतिनामक दैत्याबरोबर - मित्रः - मित्र - प्रहेतिना - प्रहेतिनामक दैत्याबरोबर - अयुध्यत् - लढला. ॥२८॥ यमः तु - यम तर - कालनाभेन - कालनाभाबरोबर - वै - खरोखर - विश्वकर्मा - विश्वकर्मा - मयेन - मयाबरोबर - शंबरः - शंबर - त्वष्ट्रा - त्वष्टयाबरोबर - विरोचनः तु - विरोचन तर - सवित्रा - सवित्याबरोबर - युयुधे - लढला. ॥२९॥ नमुचिः - नमुचि - अपराजितेन - अपराजिताबरोबर - अश्विनौ - अश्विनीकुमार - वृषपर्वणा - वृषपर्व्याबरोबर - च - आणि - सूर्यः देवः - सूर्यदेव - शतेन - शंभर - बाणज्येष्ठैः - ज्यात बाण वडील आहे अशा - बलिसुतैः - बलिपुत्रांसह. ॥३०॥ तथा - त्याप्रमाणे - सोमः - चंद्र - राहुणा - राहूबरोबर - अनिलः - अग्नि - पुलोम्ना - पुलोम्याबरोबर - च - आणि - तरस्विनी - वेगवती - भद्रकाली देवी - भद्रकाली देवी - शुंभनिशुंभयोः - शुंभ व निशुंभ ह्यांच्यासह - युयुधे - लढली. ॥३१॥ अरिंदम - हे शत्रुदमना परीक्षित राजा - वृषाकपिः तु - वृषाकपि तर - जंभेन - जंभाबरोबर - विभावसुः - अग्नि - महिषेण - महिषाबरोबर - सहवातापिः इल्वलः - वातापिसहित इल्वल - ब्रह्मपुत्रैः - ब्रह्मदेवाच्या पुत्रांसह. ॥३२॥ दुर्मषः - दुर्मष - कामदेवेन - कामदेवाबरोबर - उत्कलः - उत्कल - मातृभिः सह - मातृदेवतांसह - बृहस्पतीः - बृहस्पती - उशनसा - शुक्राचार्याबरोबर - च - आणि - शनैश्चरः - शनैश्चर - नरकेण - नरकाबरोबर. ॥३३॥ मरुतः - मरुत - निवातकवचैः - निवातकवचांसह - वसवः - वसु - अमराः - देव - कालेयैः - कालेयांबरोबर - विश्वेदेवाः - विश्वेदेव - पौलोमैः - पौलोमांसह - रुद्राः - रुद्र - क्रोधवशैः सह - क्रोधवशांसह. ॥३४॥ एवं - याप्रमाणे - आजौ - युद्धात - द्वंद्वेन - द्वंद्वयुद्धात - संहत्य - एकत्र गाठून - युद्ध्यमानाः - लढणारे - ते - ते - असुराः - दैत्य - च - आणि - सुरेन्द्राः - मोठे देव - ओजसा - शक्तीने - जिगीशवः - जिंकण्याची इच्छा करणारे - अन्योन्यं - एकमेकांवर - आसाद्य - चाल करून - तीक्ष्णशरासितोमरैः - तीक्ष्ण बाण, तरवार व तोमरे यांनी - निजघ्रुः - प्रहार करिते झाले. ॥३५॥ भुशुंडिभिः - भुशुंडिंनी - चक्रगदर्ष्टिपटटिशैः - चक्र, गदा, ऋष्टि व पटटिश यांनी - शक्त्युल्मुकैः - शक्ति व कोलत्या यांनी - प्रासपरश्वधैः अपि - भाले व कुर्हाडी यांनी सुद्धा - निस्त्रिंशभल्लैः - खङग व बाण यांनी - च - आणि - समुद्गरेः सभिंदिपालैः परिधैः - हातोडे, गोफणी, भिंदिपाल व काटेरी सोटे यांनी - शिरांसि - मस्तके - चिच्छिदुः - तोडिते झाले. ॥३६॥ गजाः - हत्ती - तुरंगाः - घोडे - सरथाः - रथांसह - पदातयः - पायदळ - विविधाः - अनेकप्रकारचे - सारोहवाहाः - स्वारांसह घोडे - निकृत्तबाहूशिरोधराङ्घ्रयः - ज्यांचे दंड, मांडया, मस्तके व पाय तुटून गेले आहेत असे - छिन्नध्वजेष्वासतनुत्रभूषणाः - पताका, धनुष्ये, चिलखते व अलंकार ज्यांचे छिन्नभिन्न झाले आहेत असे - विखण्डिताः (अभवन्) - खंडित झाले. ॥३७॥ तदा - त्यावेळी - तेषां - त्यांच्या - पदाघातरथांगचूर्णितात् - पादताडनांनी व रथांच्या चाकांनी चूर्ण होऊन गेलेल्या - आयोधनात् - युद्धभूमीपासून - उत्थितः - उडालेली - उल्बणः - भयंकर - रेणुः - धूळ - दिशः - दिशांना - खं - आकाशाला - च - आणि - द्युमर्णि - सूर्याला - छादयन् - आच्छादून टाकणारी - असृक्स्रुतिभिः - रक्तप्रवाहांनी - परिप्लुतात् (खात्) - भिजलेल्या आकाशातून - न्यवर्तत - परत खाली पडली. ॥३८॥ सा - ती - भूः - पृथ्वी - उध्दूतकिरीटकुंडलैः - उडालेली आहेत मुकुटकुंडले जेथून अशा - सरंभदृग्भिः - ज्यातील डोळे वटारल्यासारखे आहेत अशा - परिदष्टदच्छदैः - ज्यातील ओठ चावले गेले आहेत अशा - शिरोभिः - मस्तकांनी - साभरणैः - अलंकारासह - सहायुधैः - आयुधांसह - महाभुजैः - मोठमोठया बाहूंनी - करभोरुभिः - हत्तिशुंडेसारख्या मांडयांनी - प्रास्तृता - अंथरलेली अशी - बभौ - शोभली. ॥३९॥ च - आणि - तत्र - त्या - मृधे - युद्धात - पतितस्वशिरोऽक्षिभिः - आपल्या तुटून पडलेल्या मस्तकांच्या नेत्रांनी - कबंधाः - धडे - उद्यतायुधदोर्दण्डैः (युक्ताः) - उगारलेली आहेत आयुधे ज्यांनी अशा बाहूंनी युक्त अशी - भटान् - योध्द्यांच्या अंगावर - आधावन्तः - धावत - उत्पेतुः - चाल करून गेली. ॥४०॥ बलिः - बलिराजा - दशभिः - दहा बाणांनी - महेन्द्रं - इंद्राला - त्रिभिः - तीन - शरैः - बाणांनी - ऐरावतं - ऐरावताला - चतुर्भिः - चारांनी - चतुरः वाहान् - चार घोडयांना - एकेन - एका बाणाने - आरोहं - महाताला - आर्च्छयत् - प्रहार करिता झाला. ॥४१॥ शीघ्रविक्रमः - त्वरेने युद्ध करणारा - सः - तो - शक्रः - इंद्र - हसन् इव - हंसत हंसत - आपततः - अंगावर येणार्या - तान् - त्या बाणांना - असंप्राप्तान् एव - जवळ येण्याच्या आधीच - तावद्भिः - तितक्या - निशितैः - तीक्ष्ण - भल्लैः - बाणांनी - चिच्छेद - तोडिता झाला. ॥४२॥ तस्य - त्याचे - उत्तमं - श्रेष्ठ - कर्म - कृत्य - वीक्ष्य - पाहून - दुर्मर्षः - रागावलेला बलिराजा - शक्तिं - शक्तिनामक आयुध - आददे - घेता झाला - हरिः - इंद्र - ज्वलंतीं - तेजःपुंज - महोल्काभां - धगधगीत - हस्तस्थां - हातात असणार्या - तां - त्या शक्तीला - अच्छिनत् - तोडिता झाला. ॥४३॥ ततः - नंतर - शूलं - शूळ - ततः - नंतर - प्रासं - भाला - ततः - त्यानंतर - तोमरं - तोमर - च - आणि - ऋष्टयः - दुधारी तलवारी - यत् यत् - जे जे - शस्त्रं - शस्त्र - बलिः समादद्यात् - बलीने घेतले - तत् - ते - सर्वं - सर्व - विभुः - इंद्र - अच्छिनत् - तोडिता झाला. ॥४४॥ अथ - नंतर - असुरः - बलिराजा - अन्तर्धानं गतः - गुप्त झालेला असा - आसुरी मायां - दैत्यांच्या मायेला - ससर्ज - सोडिता झाला - ततः - नंतर - प्रभो - हे परीक्षित राजा - सुरानीकोपरि - देवसैन्यांच्या डोक्यावर - शैलः - पर्वत - प्रादुरभूत् - उत्पन्न झाला. ॥४५॥ ततः - नंतर - दवाग्निना - वणव्याने - दह्यमानाः - जळणारे - तरवः - वृक्ष - च - आणि - द्विषद्वलं - शत्रुसैन्याला - चूर्णयन्त्यः - चुरडून टाकणारे - सटंकशिखराः - टाकीसारख्या तीक्ष्ण टोकांचे - शिलाः - दगड - निपेतुः - पडले. ॥४६॥ महोरगाः - मोठमोठे सर्प - सवृश्चिकाः - विंचवांसह - दंदशूकाः - नाग - च - आणि - महागजान् - मोठमोठया हत्तींना - मर्दयन्तः - मारणारे - सिंहव्याघ्रवराहाः - सिंह, वाघ व डुक्कर - समुत्पेतुः - उडया टाकू लागले. ॥४७॥ प्रभो - हे परीक्षित राजा - शूलहस्ताः - हातात शूळ घेतलेल्या - च - आणि - विवाससः - नग्न - छिन्धि - तोडा - भिन्धि - फोडा - इति - याप्रमाणे - वादिन्यः - बोलणार्या - शतशः - शेकडो - यातुधान्यः - राक्षसिणी - तथा - त्याचप्रमाणे - रक्षोगणाः - राक्षससमूह. ॥४८॥ ततः - नंतर - व्योम्नि - आकाशात - गंभीरपुरुषस्वनाः - गंभीर व कठोर शब्द करणारे - महाघनाः - मोठमोठे मेघ - वातैः - वायूंनी - आहताः - ताडिलेले असे - स्तनयित्नवः - गर्जना करून - अंगारान् - निखारे - मुमुचुः - खाली टाकिते झाले. ॥४९॥ दैत्येन - दैत्याने - सृष्टः - उत्पन्न केलेला - श्वसनसारथिः - वायू हा सारथि ज्याचा असा - सांवर्तकः इव - प्रलयकालीनच जणू असा - अत्युग्रः - भयंकर - वह्निः - अग्नि - विबुधध्वजनीं - देवसैन्याला - अधाक् - जाळिता झाला. ॥५०॥ ततः - नंतर - सर्वतः - चारी बाजूंनी - उद्वेलः - मर्यादा सोडून उसळलेला - समुद्रः - समुद्र - प्रचण्डवातैः उध्दूत तरङगावर्तभीषणः - प्रचंड वार्यांनी उठविलेल्या लाटांमुळे उत्पन्न झालेल्या भोवर्यांनी भयंकर - प्रत्यदृश्यत - दिसला. ॥५१॥ एवं - याप्रमाणे - महामायैः - मोठया मायावी अशा - अलक्ष्यगतिभीषणैः - ज्यांच्या गति दिसत नसल्यामुळे भयंकर आहेत अशा - दैत्यैः - दैत्यांकडून - मायासु सृज्यमानासु - माया उत्पन्न केल्या जात असता - सुरसैनिकाः - देवसैन्य - विषेदुः - खिन्न झाले. ॥५२॥ नृप - हे राजा - यत्र - ज्यावेळी - इंद्रादयः - इंद्रादि देव - तत्प्रतिविधिं - त्याच्या प्रतिकाराला - न विदुः - जाणते झाले नाहीत - तत्र - त्यावेळी - विश्वभावनः - जगाला उत्पन्न करणारा - भगवान् - परमेश्वर - ध्यातः - ध्यायिलेला असा - प्रादुरभूत् - प्रगट झाला. ॥५३॥ ततः - नंतर - सुपर्णांसकृताङ्घ्रिपल्लवः - गरुडाच्या खांद्यावर ठेविले आहेत चरणकमल असा - पिशंगवासाः - पिंगट वस्त्र धारण करणारा - नवकञ्जलोचनः - नवीन कमळाप्रमाणे डोळे असलेला - अष्टायुधबाहुः - आठ हातात आठ आयुधे धारण करणारा - उल्लसच्छ्रीकौस्तुभानर्ध्यकिरीटकुण्डलः - ज्याच्यावर लक्ष्मी, कौस्तुभमणि व अमोल किरीटकुंडले शोभत आहेत असा - अदृश्यत - दिसला. ॥५४॥ यथा - ज्याप्रमाणे - प्रतिबोधे आगते - जागेपण प्राप्त झाले असता - स्वप्नः - स्वप्न - हि - त्याप्रमाणेच - तस्मिन् प्रविष्टे - तो विष्णु प्रविष्ट झाला असता - महीयसः - थोर पुरुषाच्या - महिना - माहात्म्याने - असुरकूटकर्मजाः - दैत्यांच्या कपटी कर्मापासून उद्भवणार्या - मायाः - माया - विनेशु - नष्ट झाल्या - हरिस्मृतिः - हरिस्मरण - सर्वविपद्धिमोक्षणम् (अस्ति) - संपूर्ण विपत्तींचा नाश करणारे आहे. ॥५५॥ अथ - नंतर - मृधे - युद्धात - इभारिवाहः - हत्तीचा शत्रू जो सिंह त्यावर बसणारा - कालनेमिः - कालनेमि - गरुडवाहं - विष्णूला - दृष्ट्वा - पाहून - शूलं आविध्य - शूळ घेऊन - अहिनोत् - फेकिता झाला - नृप - हे राजा - त्र्यधीशः - भगवान विष्णु - गरुडमूर्घ्रि - गरुडाच्या मस्तकावर - पतत् - पडणारा - तत् - तो शूळ - लीलया - सहज - गृहीत्वा तेन - घेऊन त्या शूलाने - सवाहं - वाहनासह - अरिं - शत्रूला - अहनत् - मारिता झाला. ॥५६॥ अतिबलौ - अत्यंत बलिष्ट - माली - माली - च - आणि - सुमाली - सुमाली - युधि - युद्धात - यच्चक्रेण - ज्याच्या चक्राने - कृत्तशिरसौ - मस्तके तुटलेले असे - पेततुः - पडले - अथ - नंतर - माल्यवान् - माल्यवान - तम् - त्याला - आहत्य - प्रहार करून - तिग्मगदया - तीक्ष्ण गदेने - अंडजेन्द्रं - गरुडाला - अहनत् - ताडिता झाला - तावत् - तितक्याच अवधीत - आद्यः - पुराणपुरुष ईश्वर - अरिणा - चक्राने - नदतः - गर्जना करणार्या - अरेः - शत्रूचे - शिरःअच्छिनत् - मस्तक तोडिता झाला. ॥५७॥ अष्टमः स्कन्धः - अध्याय दहावा समाप्त |