|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ९ वा - अन्वयार्थ
मोहिनीरूपी भगवंतांकडून अमृताचे वाटप - त्यक्तसौहृदाः - सोडिली आहे मैत्री ज्यांनी असे - अन्योन्यतः - एमकेकांपासून - पात्रं - अमृतकलश - हरन्तः - हरण करणारे - क्षिपन्तः - शिव्यागाळी करणारे - दस्युधर्माणः - चोरांसारखे वागणारे - ते - ते - असुराः - दैत्य - आयान्ति - येणार्या - स्त्रियं - स्त्रीला - ददृशुः - पाहाते झाले. ॥१॥ अहो - किती हो सुंदर - रूपं - स्वरूप - अहो - कितीहो विलक्षण - धाम - तेज - अहो - कितीहो आश्चर्यजनक - अस्याः - हिचे - नवं - तरुण - वयः - वय - इति - असे - ते - ते दैत्य - तां - तिच्याजवळ - अभिद्रुत्य - धावत जाऊन - जातहृच्छयाः - ज्यांच्या हृदयांत मदनाचा संचार झाला आहे असे - पप्रच्छुः - विचारिते झाले. ॥२॥ कञ्जपलाशाक्षि - कमलपत्राप्रमाणे नेत्र असणार्या हे स्त्रिये - त्वं - तू - का - कोण - कुतः (आयाता) - कोठून आलीस - वा - अथवा - किं चिकीर्षसि - काय करू इच्छितेस - वामोरु - हे सुंदरी - नः - आमच्या - मनांसि - अंतःकरणांचे - मथ्नन्ति इव - जणु मंथन करणारी अशी - कस्य (पत्नी) - कोणत्या पुरुषाची स्त्री - असि - आहेस - वद - सांग. ॥३॥ वयं - आम्ही - त्वां - तुला - अमरैः - देवांनी - दैत्यैः - दैत्यांनी - सिद्धगंधर्वचारणैः - सिद्ध, गंधर्व, व चारण ह्यांनी - च - आणि - लोकेशैः - लोकपालांनी - अस्पृष्टपूर्वां - पूर्वी स्पर्श न केलेली अशी - न जानीमः - जाणत नाही असे नाही - नृभिः - मनुष्यांनी - कुतः (स्पृष्टा) - कोठून स्पर्श केलेली असणार. ॥४॥ सुभ्रूः - हे सुंदरी - सघृणेन - दयाळू - विधिना - ईश्वराने - नूनं - खरोखर - त्वं - तू - शरीरिणां - प्राण्यांच्या - सर्वेंद्रियमनःप्रीतिं - सर्व इंद्रियांचा व मनाचा संतोष - विधातुं - उत्पन्न करण्याकरिता - प्रेषिता असि किं - पाठविलेली आहेस काय. ॥५॥ मानिनि - हे मानशीले - सुमध्यमे - सुंदरी - सा - ती - त्वं - तू - एकवस्तुनि - एकाच वस्तूसाठी - स्पर्धमानानां - चढाओढ करणार्या - बद्धवैराणां - परस्परांशी वैर धरिलेल्या - ज्ञातीनां - संबंधी अशा - नः - आमचे - शं - कल्याण - विधत्स्व - कर. ॥६॥ कृतपौरुषाः - पराक्रमी - वयं - आम्ही - कश्यपदायादाः - कश्यपाचे पुत्र - भ्रातरः (स्मः) - भाऊ आहोत - यथा - ज्या रीतीने - अस्माकं भेदः - आमच्यामध्ये लढा - न एव भवेत् - होणारच नाही - यथान्यायं - न्यायाला अनुसरून - विभजस्व - वाटून दे. ॥७॥ दैत्यैः - दैत्यांनी - इति - याप्रमाणे - उपामन्त्रितः - प्रार्थिलेला - मायायोषिद्वपुः - मायेने स्त्रीशरीर धारण करणारा - हरिः - श्रीविष्णु - प्रहस्य - हसून - रुचिरापाङगैः - सुंदर कटाक्षांनी - निरीक्षन् - पाहत - इदं - हे - अब्रवीत् - म्हणाला. ॥८॥ कश्यपदायादाः - अहो कश्यपपुत्र दैत्य हो - पुञ्चल्यां - जारिणी अशा - मयि - माझ्यावर - कथं संगताः - कसे आसक्त झालात - पण्डितः - विद्वान - हि - खरोखर - कामिनीषु - स्त्रियांवर - जातु - कधीही - विश्वासं - विश्वास - न याति - ठेवीत नाही. ॥९॥ सुरद्विषः - अहो दैत्य हो - नूत्नं नूत्नं - नवीन नवीन वस्तू - विचिन्वतां - शोधणार्या - सालावृकाणां - कोल्ह्यांची - च - आणि - स्वैरिणीनां स्त्रीणां - व्यभिचारी स्त्रियांची - सख्यानि - मैत्री - अनित्यानि - अस्थिर - आहुः - म्हणतात. ॥१०॥ इति - ह्याप्रमाणे - तस्याः - त्या स्त्रीस - क्ष्वेलितैः - थटटेच्या बोलण्यांनी - आश्वस्तमनसः - ज्यांच्या मनावर पूर्ण विश्वास बसला आहे असे - ते - ते - असुराः - दैत्य - भावगंभीरं - अभिप्रायाने गंभीर असे - जहसुः - हसू लागले - च - आणि - अमृतभाजनं - अमृताचा कलश - (तस्याः) हस्ते ददुः - तिच्या हाती देते झाले. ॥११॥ ततः - नंतर - हरिः - श्रीविष्णु - अमृतभाजनं - अमृताचा कलश - गृहीत्वा - घेऊन - ईषत्स्मित्शोभया - किञ्चित् हास्याने शोभणार्या - गिरा - वाणीने - बभाषे - बोलला - यदि - जर - मया - मी - कृतं - केलेले - क्व च - कोठे - साधु - चांगले - वा - किंवा - असाधु - वाईट - (युष्माभिः) अभ्युपेतं - तुम्ही मान्य कराल - वः - तुम्हाला - इमां - हे - सुधां - अमृत - विभजे - वाटून देते. ॥१२॥ इति - याप्रमाणे - तस्याः - त्या स्त्रीचे - अभिव्याहृतं - भाषण - आकर्ण्य - ऐकून - तस्यां - त्या स्त्रीचा - अप्रमाणविदः - अंत न जाणणारे - असुरपुंगवाः - दैत्याधिपति - तत् तथा इति - ते बरे आहे असे म्हणून - अन्वमंसत - अनुमोदन देते झाले. ॥१३॥ अथ - नंतर - उपोष्य - उपवास करून - कृतस्नानाः - स्नान करून - हविषा - हविर्भागाने - अनलं - अग्नीला - हुत्वा - आहुति देऊन - गोविप्रभूतेभ्यः - गाई, ब्राह्मण व भूते ह्यांना - (अन्नं) दत्वा - अन्नादि अर्पण करून - च - आणि - द्विजैः - ब्राह्मणांनी - कृतस्वस्त्ययनाः - केले आहे मंगलकारक पुण्याहवाचन ज्यांच्याकरिता असे - ते सर्वे - ते सर्व दैत्य - अहतानि - कोरी - वासांसि - वस्त्रे - परिधाय - धारण करून - अभिभूषिताः - अलंकार धारण केलेले - प्रागग्रेषु - पूर्वेला टोके असणार्या - कुशेषु - दर्भावर - प्राविशन् - बसते झाले. ॥१४-१५॥ माल्यदीपकैः - फुलांनी व दीपांनी - जुष्टायां - सेविलेल्या - धूपामोदितशालायां - धूपांनी सुगंधित केलेल्या मंडपात - सुरेषु दितिजेषु च प्राङ्मुखेषु उपविष्टेषु - देव आणि दैत्य पूर्वेस तोंड करून बसले असता ॥१६॥ अथ - नंतर - नरेंद्र - हे परीक्षित राजा - तस्यां (पटशालायाम्) - त्या मंडपात - करभोरुः - हत्तीच्या सोंडेप्रमाणे आहेत मांडया जीच्या अशी - उशद्दुकूलश्रोणीतटालसगतिः - सुंदर रेशमी वस्त्र ज्यावर आहे अशा स्थूल नितंबामुळे मंद आहे चालणे जीचे अशी - मदविहव्लाक्षी - मद्यप्राशनाने जिचे डोळे चंचल झाले आहेत अशी - कनकनूपुरशिञ्जितेन - सुवर्णांच्या पैंजणांच्या ध्वनीने - कूजती - शब्द करणारी - कुंभस्तनी - जिचे स्तन घटासारखे आहेत अशी - कलशपाणिः - अमृताचा कलश आहे हातात जिच्या अशी - सा - ती स्त्री - आविवेश - शिरली. ॥१७॥ देवासुराः - देव व दैत्य - श्रीसखीं - लक्ष्मीची मैत्रीण अशा - कनककुंडलचारुकर्णनासाकपोलवदनां - सुवर्णाच्या कुंडलांनी शोभणारे आहेत कान, नाक, गाल व मुख जिचे अशा - उत्स्मितवीक्षणेन - अत्यंत मंदहास्ययुक्त अवलोकाने - विगलितस्तनपट्टिकांतां - गळून गेला आहे स्तनावरील पदर जीच्या अशी - परदेवताख्यां - श्रेष्ठ देवता या नावाच्या - तां - त्या स्त्रीला - संवीक्ष्य - पाहून - संमुमुहुः - मोहित झाले. ॥१८॥ अच्युतः - श्रीविष्णु - जातिनृशंसानां - स्वभावतः क्रूर अशा - असुराणां - दैत्यांना - सुधादानं - अमृत देणे - सर्पाणां - सर्पांना - (क्षीरदानम्) इव - दूध देण्याप्रमाणे - दुर्नयं - अन्यायकारक - मत्वा - मानून - तां (सुधां) - ते अमृत - न व्यभजत - वाटून देता झाला नाही. ॥१९॥ च - आणि - जगत्पतिः - श्रीविष्णु - उभयेषां - दोघांही देवदैत्यांच्या - पृथक् - निरनिराळ्या - पङ्क्तीः - रांगा - कल्पयित्वा - करून - च - आणि - तान् - त्या देवदैत्यांना - स्वेषु स्वेषु - आपापल्या - पङ्क्तिषु - रांगेत - उपवेशयामास - बसविता झाला. ॥२०॥ गृहीतकलशः - हातात अमृतकलश घेतलेला श्रीविष्णु - उपसंचरैः - दैत्या जवळ फिरण्याने - दैत्यान् - दैत्यांना - वञ्चयन् - फसवीत - दूरस्थान् (देवान्) - दूर बसलेल्या देवांना - जरामृत्यूहरां - वार्धक्य व मृत्यू हरण करणारे - सुधां - अमृत - पाययामास - पाजिता झाला. ॥२१॥ नृप - हे परीक्षित राजा - कृतस्नेहाः - केली आहे मैत्री ज्यांनी असे - स्वकृतं - आपल्या केलेल्या - समयं - वचनाला - पालयन्तः - पाळणारे - ते - ते - असुराः - दैत्य - स्त्रीविवादजुगुप्सया - स्त्रियांशी वादविवाद करणे निंद्य आहे अशा समजुतीने - तूष्णीं - स्तब्ध - आसन् - होते. ॥२२॥ च - आणि - तस्यां - त्या स्त्रीच्या ठिकाणी - कृतातिप्रणयाः (ते) - अत्यंत प्रेम केले आहे ज्यांनी असे ते - प्रणयापायकातराः - प्रेमाचा भंग होईल या भीतीने व्याकूळ झालेले - बहुमानेन - पुष्कळ सत्कार केल्यामुळे - आबद्धाः - प्रेमपाशाने जखडून गेले - किञ्चन - काही एक - विप्रियं - अप्रिय - न ऊचुः - बोलते झाले नाहीत. ॥२३॥ देवलिङगप्रतिच्छन्नाः - देवांचे सोंग घेऊन दैत्य स्वरूप ज्याने झाकून टाकिले आहे असा - स्वर्भानुः - राहु - देवसंसदि - देवांच्या रांगेत - प्रविष्टः - जाऊन बसला - च - आणि - सोमं - अमृत - अपिबत् - पिता झाला - चंद्रार्काभ्यां - चंद्र व सूर्य यांनी - सूचितः - सुचविला गेला. ॥२४॥ हरिः - श्रीविष्णु - क्षुरधारेण - वस्तर्याप्रमाणे धारेच्या - चक्रेण - सुदर्शनचक्राने - पिबतः तस्य - अमृत पिणार्या त्या राहूचे - शिरः - मस्तक - जहार - हरण करिता झाला - (तस्य) कबंधः तु - त्याचे धड तर - सुधया - अमृताने - अप्लावितः - न भिजलेले असे - अपतत् - खाली पडले. ॥२५॥ अजः - श्रीविष्णु - अमरतां - अमरस्थितीप्रत - नीतं - नेलेले - शिरः तु - मस्तक तर - ग्रहं - ग्रह म्हणून - अचीक्लृपत् - कल्पिता झाला - वैरधीः - वैरबुद्धि बाळगणारा - यः तु - परंतु जो - पर्वणि - अमावस्यापौर्णिमांस - चंद्रार्कौ - सूर्य व चंद्र यांच्यावर - अभिधावति - धावत जातो. ॥२६॥ लोकभावनः - लोकांचे रक्षण करणारा - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - हरिः - श्रीविष्णु - देवैः - देवांनी - अमृते पीतप्राये - अमृत बहुतेक पिऊन टाकिले असता - असुरेन्द्राणां पश्यतां - दैत्याधिपती पाहात असता - स्वं रूपं - स्वतःच्या विष्णुस्वरूपाला - जगृहे - स्वीकारिता झाला. ॥२७॥ सुरासुरगणाः - देव व दैत्य यांचे समूह - एवं - याप्रमाणे - समदेशकालहेत्वर्थकर्ममतयः अपि - देश, काल, हेतु, अर्थ, कर्म व बुद्धि ज्यांची सारखी आहे असे असूनही - फलं - फलप्राप्तीविषयी - विकल्पाः - भेद पावले - तत्र - त्या ठिकाणी - सुरगणाः - देवसमूह - यत्पादपङकजरजःश्रयणात् - ज्याच्या चरणकमळाच्या परागांचा आश्रय केल्यामुळे - अमृतं फलं - अमृतरूपी फळ - अञ्जसा - तत्काळ - आपुः - मिळविते झाले - दैत्याः - दैत्य - न (आपुः) - मिळविते झाले नाहीत. ॥२८॥ नृभिः - पुरुषांकडून - देहात्मजादिषु - शरीर, पुत्र इत्यादिकांविषयी - असुवसुकर्ममनोवचोभिः - प्राण, द्रव्य, कर्म, मन व वाणी ह्यांनी - यत् - जे - युज्यते - केले जाते - तत् - ते - पृथक्त्वात् - भेदबुद्धीमुळे - असत् (अस्ति) - मिथ्या होय - तैः एव - त्याच प्राणादि साधनांनी - यत् - जे - अपृथक्त्वात् क्रियते - ऐक्यभावनेने केले जाते - तत् - ते - सत् - सत्यरूप - भवति - होते - यत् - जे - मूलनिषेचनं - मुळाला पाणी घालणे - तत् - ते - सर्वस्य - सर्वाला - भवति - होते. ॥२९॥ अष्टमः स्कन्धः - अध्याय नववा समाप्त |