श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय ८ वा - अन्वयार्थ

समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंतांचे मोहिनी अवतार धारण करणे -

वृषाङ्‌केण - शंकराने - गरे पीते - विष प्राशन केले असता - प्रीताः - आनंदित झालेले - ते अमरदानवाः - ते देव व दानव - तरसा - वेगाने - सिंधुं - समुद्राला - ममंथुः - घुसळू लागले - ततः - त्यातून - हविर्धानी - कामधेनु - अभवत् - उत्पन्न झाली. ॥१॥

नृप - हे परीक्षित राजा - ब्रह्मवादिनः ऋषयः - वेदवेत्ते ऋषि - अग्निहोत्रीं तां - अग्निहोत्राला उपयोगी पडणारी ती कामधेनु - देवयानस्य - ब्रह्मलोकी पोचविणार्‍या - यज्ञस्य - यज्ञाच्या - मेध्याय - पवित्र - हविषे - हविर्भागाकरिता - जगृहुः - स्वीकरिते झाले. ॥२॥

ततः - नंतर - चंद्रपांडुरः - चंद्रासारखा पांढरा - उच्चैःश्रवाः नाम - उच्चैःश्रवा नावाचा - हयः - घोडा - अभूत् - उत्पन्न झाला - तस्मिन् - त्या घोडयाविषयी - बलिः - बलिराजा - स्पृहां - इच्छा - चक्रे - करिता झाला - इंद्रः - इंद्र - स्पृहां - इच्छा - ईश्वरशिक्षया - परमेश्वराच्या उपदेशामुळे - न (स्पृहां चक्रे) - इच्छा करिता झाला नाही. ॥३॥

ततः - नंतर - चतुर्भिः दन्तैः - चार दातांनी - भगवतः श्वेताद्रेः महिम् हरन् ऐरावतः नाम वारणेन्द्रः - ऐश्वर्यवान कैलासपर्वताचा मोठेपणा हरण करणारा ऐरावत नावाचा मोठा हत्ती - विनिर्गतः - बाहेर निघाला. ॥४॥

महोदधेः - महासागरातून - कौस्तुभाख्यं - कौस्तुभ नावाचे - पद्मरागः - पद्मराग जातीचे - रत्नं - रत्न - अभूत् - उत्पन्न झाले - हरिः - विष्णु - वक्षोऽलङकरणे तस्मिन् मणौ - वक्षस्थलावर भूषणाप्रमाणे शोभेल अशा त्या रत्नाविषयी - स्पृहां - इच्छा - चक्रे - करिता झाला. ॥५॥

ततः - नंतर - सूरलोकविभूषणं - देवलोकांचा अलंकार झालेला - पारिजातः - पारिजात वृक्ष - अभवत् - उत्पन्न झाला - यथा - जसा - भुवि - पृथ्वीवर - भवान् - तू परीक्षित राजा - यः - जो - शश्वत् - नित्य - अर्थैः - पदार्थांनी - अर्थिनः - याचकांच्या इच्छा - पूरयति - पूर्ण करितो. ॥६॥

ततः च - त्यानंतर आणखी - निष्ककण्‌ठयः - सुवर्णपदके गळ्यात आहेत ज्यांच्या अशा - सुवाससः - सुंदर वस्त्रे नेसलेल्या - वल्गुगतिलीलावलोकनैः - सुंदर गमन, क्रीडापूर्वक अवलोकन ह्यांच्या योगाने - स्वर्गिणां - देवांना - रमण्यः - रमविणार्‍या - अप्सरसः - अप्सरा - जाताः - उत्पन्न झाल्या. ॥७॥

ततः च - त्यानंतर आणखी - साक्षात् श्रीः - प्रत्यक्ष संपत्ती - यथा - ज्याप्रमाणे - सौदामनी - सुदामा पर्वतावर उत्पन्न झालेली - विद्युत् - वीज - कान्त्या - कांतीने - दिशः - दिशांना - रञ्जयन्ती - शोभविणारी - भगवत्परा - भगवंताविषयी निष्ठा आहे जिची अशी - रमा - लक्ष्मी - आविरभूत् - प्रगट झाली. ॥८॥

ससुरासुरमानवाः सर्वे - देव, दैत्य, व मनुष्य ह्यांसह सर्वजण - रूपौदार्यवयोवर्णमहिमाक्षिप्तचेतसः - रूप, औदार्य, तारुण्य व कांति ह्यांच्या माहात्म्याने आकर्षून टाकिली आहेत मने ज्यांची असे - तस्यां - त्या लक्ष्मीविषयी - स्पृहां - इच्छा - चक्रुः - करिते झाले. ॥९॥

महेन्द्रः - इंद्र - तस्यै - त्या लक्ष्मीकरिता - महत् - मोठे - अद्भुतं - विचित्र - आसनं - आसन - आनिन्ये - आणिता झाला - मूर्तिमत्यः - प्रत्यक्ष शरीरधारी - सरिच्छ्रेष्ठाः - श्रेष्ठ नद्या - हेमकुम्भैः - सुवर्णाच्या कलशांनी - शुचि जलं - शुद्ध उदक. ॥१०॥

भूमिः - पृथ्वी - अभिषेचनिकाः - अभिषेकाला उपयोगी पडणार्‍या - सकलौषधीः - सर्व वनस्पती - आहरत् - आणिती झाली - गावः - गाई - पञ्च पवित्राणि - दूध दही तूप इत्यादि पाच पवित्र पदार्थ - वसन्तः - वसंत ऋतु - मधुमाधवौ - चैत्रवैशाखातील फुले-फळे ॥११।

ऋषयः - ऋषि - यथाविधि - यथाशास्त्र - अभिषेकं - अभिषेक - कल्पयाञ्चक्रुः - कल्पिते झाले - च - आणि - नटयः - नाटकी स्त्रिया - ननृतुः - नाचू लागल्या - जगुः (च) - आणि गात्या झाल्या. ॥१२॥

मेघाः - मेघ - तुमुलनिः स्वनान् - गंभीर शब्द करणारी - मृदंगपणवमुरजानकगोमुखान् - मृदंग, पणव, मुरज, आनक व गोमुख ही वाद्ये - शङ्‌खवेणुवीणाः (च) - आणि शंख, वेणु व वीणा ही - व्यनादयन् - वाजविते झाले. ॥१३॥

ततः - नंतर - दिगिभाः - दिग्गज - पद्मकरां - हातात कमळ धारण करणार्‍या - सतीं श्रियं देवीं - साध्वी लक्ष्मी देवीला - पूर्णकलशैः - उदकांनी भरलेल्या कलशांनी - द्विजेरितैः सुक्तवाक्यैः - ब्राह्मणांनी उच्चारिलेल्या श्रीसूक्तादि स्तोत्रांनी - अभिषिषिचुः - अभिषेक घालिते झाले. ॥१४॥

समुद्रः - समुद्र - पीतकौशेयवाससी - दोन पिवळी रेशमी वस्त्रे - समुपाहरत् - अर्पण करिता झाला - वरुणः - वरुण - मधुना - पुष्परसाने - मत्तषट्‌पदां - उन्मत्त झाले आहेत भ्रमर ज्यामध्ये अशी - वैजयन्तीं स्रजं - वैजयंतीनामक माळ. ॥१५॥

विश्वकर्मा - विश्वकर्मानामक - प्रजापतिः - प्रजापति - विचित्राणि - चित्रविचित्र - भूषणानि - अलंकार - सरस्वती - सरस्वती - हारं - रत्नांचा हार - अजः - ब्रह्मदेव - पद्मं - कमळ - नागाः - सर्प - कुण्डले - दोन कुंडले. ॥१६॥

ततः - नंतर - कृतस्वस्त्ययना - मंगलकारक स्वस्तिवाचनादि विधि पूर्ण झाला आहे जिचा अशी - सुकपोलकुण्डलं - जिचे गाल सुंदर कुंडल प्रभेने लकाकत आहेत - सव्रीडहासं - लज्जा व हास्य यांनी युक्त असे - सुशोभनं वक्त्रं - अत्यंत सुंदर मुख - दधती - धारण करणारी - पाणिना - हाताने - नदद्‌द्विरेफां - जीवर भ्रमर शब्द करीत आहेत अशी - उत्पलस्रजं - कमळांची माळ - परिगृह्य - घेऊन - चचाल - इकडेतिकडे फिरू लागली. ॥१७॥

अतिकृशोदरी - अत्यंत कृश आहे उदर जीचे अशी - समं - सारख्या - निरन्तरं - एकमेकाला चिकटून राहिलेल्या - चन्दनकुङ्कुमोक्षितं - चंदन व केशर ह्यांचा लेप केलेल्या - स्तनद्वयं - दोन स्तनांना - दधती - धारण करणारी - च - आणि - नूपुरवल्गुसिञ्जतैः - पैंजणांच्या मधुर शब्दांनी - ततस्ततः - इकडून तिकडे - विसर्पती - चालणारी - सा - ती लक्ष्मी - हेमलता इव - सुवर्णवल्लीप्रमाणे - बभौ - शोभली. ॥१८॥

आत्मनः - स्वतःसाठी - निरवद्यं - निर्दोष - ध्रुवं - चिरस्थायी - च - आणि - अव्यभिचारिसद्‌गुणं - न ढळणारे आहेत सद्‌गुण ज्याचे असे - पदं - आश्रयस्थान - विलोकयन्ती - शोधीत - गन्धर्वयक्षासुरसिद्धचारणत्रैविष्टपेयादिषु - गंधर्व, यक्ष, दैत्य, सिद्ध, चारण, व स्वर्गातील देव ह्यामध्ये - (तत्) न अन्वविंदत - ते न मिळविती झाली. ॥१९॥

नूनं यस्य तपः - खरोखर ज्याच्याजवळ तप आहे - मन्युनिर्जयः न - क्रोधाला जिंकिलेले नाही - च - आणि - क्वचित् - काही ठिकाणी - ज्ञानं - ज्ञान आहे - (किन्तु) तत् - पण ते ज्ञान - सङगवर्जितं न - आसक्तिरहित नाही - कश्चित् - कोणी एक - महान् - मोठा आहे - तस्य कामनिर्जयः न - त्याने कामाला जिंकिलेले नाही - परतः - दुसर्‍यावर - व्यपाश्रयः - अवलंबून राहणारा - सः - तो - ईश्वरः - समर्थ - किं (स्यात्) - कसा असेल. ॥२०॥

क्वचित् - कोठे - धर्मः (अस्ति) - धर्म आहे - तत्र - तेथे - भूतसौहृदं न - प्राण्यांविषयी दयाळूपणा नाही - क्वचित् - कोठे - त्यागः (अस्ति) - दानशीलता आहे - तत्र - तेथे - मुक्तिकारणं न - मोक्षाला साधन नाही - पुंसः - काही पुरुषांमध्ये - वीर्यं (अस्ति) - पराक्रम आहे - (किन्तु) अजवेगनिष्कृतं न - पण काळाच्या वेगातून सुटलेला नाही - गुणसङगवर्जितः - गुणांविषयी आसक्ती सोडलेला असा - द्वितीयः - पत्नी स्वीकारून द्वैत मानणारा - नहि - नाही. ॥२१॥

क्वचित् - कोठे - चिरायुः (अस्ति) - पुष्कळ आयुष्य आहे - शीलमङगलं नहि - चांगला स्वभाव नाही - क्वचित् - कोठे - तत् अपि - तो चांगला स्वभावसुद्धा - अस्ति - आहे - आयुषः - आयुष्यासंबंधाने - न वेद्यं - काही कळत नाही - च - आणि - यत्र कुत्र - ज्या कोठे - उभयं (अस्ति) - चांगला स्वभाव व आयुष्यस्थैर्य ही दोन्ही आहेत - सः अपि - तोसुद्धा - हि - खरोखर - अमङगलः - अमंगळ - च - आणि - (यः) कः - जो कोणी - सुमंगलः (अस्ति) - अत्यंत मंगल असा आहे - सः मां काङ्‌क्षते हि न - तो खरोखर माझी इच्छा करीत नाही. ॥२२॥

रमा - लक्ष्मी - एवं - याप्रमाणे - विमृश्य - विचार करून - अव्यभिचारिसद्‌गुणैः वरं - कधीही न ढळणार्‍या चांगल्या गुणांनी श्रेष्ठ अशा - निजैकाश्रयतया - स्वतःच्याच एका आधारावर राहणारा असल्यामुळे - अगुणाश्रयं - गुणांचा स्वीकार न करणारा - सर्वगुणैः अपेक्षितं - संपूर्ण गुणांनी इच्छिलेल्या - निरपेक्षं - ज्याला कशाचीही अपेक्षा नाही अशा - ईप्सितं मुकुन्दं - इष्ट अशा श्रीविष्णुला - वरं - पति - वव्रे - वरिती झाली. ॥२३॥

तस्य - त्या विष्णूच्या - अंसदेशे - खांद्यावर - माद्यन्मधुव्रतवरूथगिरा - मत्त भ्रमरसमुदायांच्या गुंजारवाने - उपघुष्टां - घुमविलेली - उशतीं - मनोहर - नवकञ्जमाला - ताज्या कमळांची माळ - निधाय - ठेवून - स्वधाम तदुरः - आपले राहण्याचे स्थान जे त्या विष्णूचे वक्षस्थळ त्याकडे - याता - गेलेली - सव्रीडहासविकसन्नयनेन - सलज्ज हास्याने शोभणार्‍या प्रफुल्लित नेत्राने पाहणारी अशी - निकटे - जवळ - तस्थौ - उभी राहिली. ॥२४॥

जनकः - त्रैलोक्याला उत्पन्न करणारा विष्णु - विभूतेः - ऐश्वर्ययुक्त अशा - तस्याः - त्या - त्रिजगतः जनन्याः - त्रैलोक्याची माता अशा - श्रियः - लक्ष्मीला - (स्वं) वक्षः - आपले वक्षस्थल - परमं - श्रेष्ठ - निवासं - राहण्याचे स्थान - अकरोत् - करिता झाला - यत्र - ज्या वक्षस्थलावर - स्थिता - राहिलेली - श्रीः - लक्ष्मी - सकरुणेन - दयायुक्त - निरीक्षणेन - अवलोकनाने - स्वाः प्रजाः - आपल्या प्रजांना - साधिपतीन् त्रिलोकान् - लोकपालांसह त्रैलोक्याला - ऐधयत - वाढविती झाली. ॥२५॥

शंखतूर्यमृदङगानां वादित्राणां - शंख, तुतार्‍या, मृदंग ह्या वाद्यांचा - नृत्यतां - नाचणार्‍यांचा - गायतां - गाणार्‍यांचा - सस्त्रीणां देवानुगाःनां पृथुः स्वनः - स्त्रियांसह देवसेवकांचा मोठा शब्द - अभूत् - उत्पन्न झाला. ॥२६॥ - पुष्पवर्षिणः - फुलांची वृष्टि करणारे - ब्रह्मरुद्रङगिरोमुख्याः - ब्रह्मदेव, शंकर, अंगिरा आदिकरून - सर्वे - सर्व - विश्वसृजः - प्रजापति - तल्लिङगैः - त्याचेच वर्णन करणार्‍या - अवितथैः - खर्‍या - मंत्रैः - वेदमंत्रांनी - विभुं ईडिरे - विष्णूला स्तविते झाले. ॥२७॥

श्रिया - लक्ष्मीने - विलोकिताः - अवलोकन केलेले - देवाः - देव - च - आणि - सप्रजापतयः - प्रजापतींसह - शीलादिगुणसंपन्नाः - सुस्वभाव व सद्‌गुण ह्यांनी युक्त झालेल्या - परां निवृतिं - अत्यंत सुख - लेभिरे - पावल्या. ॥२८॥

राजन् - हे परीक्षित राजा - लक्ष्म्या - लक्ष्मीने - यदा - जेव्हा - दैत्यदानवाः - दैत्य व दानव - उपेक्षिताः - उपेक्षिले - निःसत्त्वाः - दुर्बळ - लोलुपाः - आशाळभूत - निरुद्योगाः - आळशी - च - आणि - गतत्रपाः - निर्लज्ज - बभूवुः - झाले. ॥२९॥

अथ - नंतर - देवी - तेजस्वी - कमललोचना - कमळाप्रमाणे नेत्र असलेली - वारुणी - वरुण आहे देवता जीची अशी - कन्या - कन्या - आसीत् - उत्पन्न झाली - ते - ते - असुराः - दैत्य - हरेः - विष्णूच्या - अनुमतेन - संमतीने - तां - त्या कन्येला - वै - खरोखर - जगृहुः - अंगिकारते झाले. ॥३०॥

महाराज - हे परीक्षित राजा - अथ - नंतर - अमृतार्थिभिः - अमृताची इच्छा करणार्‍या - काश्यपैः - देवदैत्यांनी - मथ्यमानात् - घुसळलेल्या - उदधेः - समुद्रापासून - परमाद्भुतः - अत्यंत आश्चर्यजनक - पुरुषः - पुरुष - उदतिष्ठत् - वर आला. ॥३१॥

दीर्घपीवरदोर्दंडः - लांब व पुष्ठ बाहु असलेला - कंबुग्रीवः - शंखाच्या आकाराची मान असलेला - अरुणेक्षण - आरक्त नेत्रांचा - श्यामलः - निळ्या कांतीचा - तरुणः - तरुण - स्रग्वी - गळ्यात पुष्पमाळा असलेला - सर्वाभरणभूषितः - सर्व अलंकारांनी शोभलेला. ॥३२॥

पीतवासाः - पिवळे वस्त्र नेसलेला - महोरस्कः - मोठे वक्षस्थळ आहे ज्याचे असा - सुमृष्टमणिकुंडलः - चकचकित आहेत रत्नांची कुंडले ज्याची असा - स्निग्धकुञ्जितकेशांतः - ज्याच्या कुरळ केसांची अग्रे तुकतुकीत आहेत असा - सुभगः - सुंदर - सिंहविक्रमः - सिंहाप्रमाणे पराक्रमी. ॥३३॥

अमृतापूर्णकलशं बिभ्रत् - अमृताने भरलेला कलश धारण करणारा - वलयभूषितः - मनगटात कडी घातलेला - सः - तो - वै - खरोखर - साक्षात् - प्रत्यक्ष - भगवतः विष्णोः - भगवान विष्णूच्या - अंशांशसंभवः - अंशापासून उत्पन्न झालेला. ॥३४॥

आयुर्वेदृक् - वैद्यशास्त्राचे ज्याने अवलोकन केले आहे असा - इज्यभाक् - ज्याला यज्ञात हविर्भाग दिला जातो असा - धन्वंतरिः इति ख्यातः - धन्वंतरि या नावाने प्रसिद्ध असा - सः - तो पुरुष - च - आणि - सर्वे - सर्व - असुराः - दैत्य - तं - त्या - अमृताभृतं - अमृताने भरलेल्या - कलशं - कलशाला - आलोक्य - पाहून - सर्ववस्तूनि - सर्व पदार्थ - लिप्सन्तः - इच्छिणारे - कलशं - अमृतकलशाला - तरसा - वेगाने - अहरन् - हरण करिते झाले - असुरैः - दैत्यांकडून - अमृतभाजने तस्मिन् कलशे नीयमाने - अमृताने भरलेला तो कलश नेला जात असता - विषण्णमनसः - खिन्न अंतःकरण झालेले - देवाः - देव - हरिं - श्रीविष्णूला - शरणं - शरण - आययुः - गेले - भृत्यकामकृत् - भक्तांची इच्छा पूर्ण करणारा - भगवान् - श्रीविष्णु - इति - याप्रमाणे - तद्दैन्यं - त्यांच्या दीन अवस्थेला - आलोक्य - पाहून - मिथः - आपापसात - स्वमायया - आपल्या मायेने - वः - तुमच्या - अर्थं - इष्ट सिद्धीला - साधयिष्ये - साधून देईन - मा खिद्यत - खेद करू नका. ॥३५-३७॥

प्रभो - हे परीक्षित राजा - तदर्थे - त्या अमृताकरिता - तर्षचेतसां - अभिलाष करणार्‍या - तेषां - त्या दैत्यांमध्ये - मिथः - एकमेकांत - अहं पूर्वं अहं पूर्वं - मी अगोदर मी अगोदर - न त्वं न त्वं - तू नव्हे तू नव्हे - इति - असे - कलिः - भांडण - अभूत् - सुरू झाले. ॥३८॥

राजन् - हे परीक्षित राजा - दुर्बलाः - दुर्बळ - दैतेयाः - दैत्य - जातमत्सराः - ज्यामध्ये मत्सर उत्पन्न झाला आहे असे - प्रबलान् - बलवान अशा - गृहीतकलशान् - हातात कलश घेतलेल्या - स्वान् - आपल्यापैकीच कित्येकांना - सत्त्रयागे इव - यज्ञांतील हविर्भागाप्रमाणे - एतस्मिन् - ह्या कार्यात - ये - जे - तुल्यायासहेतवः सन्ति - सारखे श्रम करण्याला कारणीभूत आहेत - देवाः - देव - स्वं - आपल्या - भागं - भागाला - अर्हन्ति - योग्य आहेत - एषः - हा - धर्मः - धर्म - सनातनः - प्राचीन काळापासून चालत आलेला - इति - असे म्हणून - मुहुः - वारंवार - वै - खरोखर - प्रत्यषेधन् - निषेधिते झाले. ॥३९-४०॥

एतस्मिन् अन्तरे - इतक्या अवकाशामध्ये - सर्वोपायवित् - सर्व उपाय जाणणारा - ईश्वरः - ऐश्वर्यसंपन्न - विष्णुः - विष्णु - अनिर्देश्यं - अवर्णनीय - परमाद्भुतं - अत्यंत आश्चर्योत्पादक - प्रेक्षणीयोत्पलश्यामं - पाहाण्याजोग्या नीळ कमळाप्रमाणे श्याम वर्णाचे - सर्वावयवसुन्दरं - ज्याचे संपूर्ण अवयव सुंदर आहेत असे - समान कर्णाभरणं - दोन्ही कानांत सारखे अलंकार घातले आहेत ज्याने असे - सकपोलोन्नसाननं - गोंडस गालांचे व उंच नाकाचे - नवयौवननिर्वृत्तस्तनभारकृशोदरं - नुकतेच तारुण्य प्राप्त झाल्यामुळे गोलाकार झालेल्या स्तनांच्या भाराने कंबर जिची कृश झाली आहे असे - मुखामोदानुरक्तालिझङकारोद्विग्नलोचनं - मुखाच्या सुगंधावर अनुरक्त झालेल्या भ्रमरांच्या गुंजारवामुळे जिचे डोळे घाबरून गेले आहेत असे - स्वकेशभारेण - आपल्या केसांच्या भाराने - उत्फुल्लमल्लिकां - फुललेल्या मोगर्‍यांच्या फुलांच्या - मालां - माळेला - बिभ्रत् - धारण करणारे - सुग्रीवकण्ठाभरणं - ज्याच्या सुंदर मानेवर अलंकार घातले आहेत अशी - सुभुजाङगदभूषणं - ज्याच्या सुंदर बाहूंवर बाहुभूषणे घातली आहेत अशी - बिरजाम्बरसंवीतनितम्बद्वीपशोभया - निर्मळ वस्त्राने वेष्टिलेल्या नितंबरूप हत्तीने शोभणारी - काञ्‌च्या - कमरपटटयाने - प्रविलसत् - शोभणारे - वल्गुलसच्चरणनूपुरं - सुंदर व चमकणारी आहेत पायातील पैंजणे जिच्या अशी - सव्रीडस्मितविक्षिप्तभ्रूविलासावलोकनैः - लज्जेने मंदहास्य करून चालविलेल्या भुवयाच्या क्रीडेने युक्त अशा कटाक्षांनी - दैत्ययुथपचेतस्सु - दैत्यसेनापतींच्या अंतःकरणात - मुहुः - वारंवार - कामं - मदनाला - उद्दीपयत् - वाढविणारे - योषिद्रूपं - स्त्रीस्वरूप - दधार - धारण करिता झाला. ॥४१-४६॥

अष्टमः स्कन्धः - अध्याय आठवा समाप्त

GO TOP